नंगा नाचेन मी एक दिवस

पथिक's picture
पथिक in जे न देखे रवी...
26 Jun 2015 - 3:08 pm

हाता पायातील बेड्या तोडून
अंगावरील लक्तरं वाऱ्यावर भिरकावून
नंगा नाचेन मी एक दिवस
या संत औलीयांच्या भूमीत

अंधाराची होळी करून
प्रकाशानं मनाची झोळी भरून
नंगा नाचेन मी एक दिवस
या संत औलीयांच्या भूमीत

नाव गाव पाण्याखाली बुडवून
स्वत्त:चीच राख पायाखाली तुडवून
नंगा नाचेन मी एक दिवस
या संत औलीयांच्या भूमीत

कविता

प्रतिक्रिया

भिंगरी's picture

26 Jun 2015 - 3:10 pm | भिंगरी

नाच बाबा तुला वाटेल तिथे.

वेल्लाभट's picture

26 Jun 2015 - 3:17 pm | वेल्लाभट

नाही पोचली बुआ.

ओके. मी चांगली आहे या भ्रमात होतो! :)

सगळ्याचा नंगा नाचण्याशी काय संबंध आहे ते कळलं नाही.

सगळे विकार, वासना, बंधने, इ. (आत्म्याची वस्त्रे या अर्थाने) चा त्याग केल्यावर नंगाच असणार ना !

सूड's picture

26 Jun 2015 - 4:40 pm | सूड

आत्म्याची वस्त्रे

यावरुन नंगा हे देहासंदर्भात आलं असं समजतो. जर आत्म्याचे वस्त्र, म्हणजे देहच नसेल तर नंगा होण्याचा संबंध कुठे येतो.

देह रुपी वस्त्र तर फार सहज गळून जाते आणि नाही गेले तरीही फारसे नुकसान नाही त्यापासून. आत्मा जी प्रतिष्ठेची, लज्जेची, संकोचाची, इ. लक्तरे नेसून असतो ते इथे अभिप्रेत आहे. 'सर्व बंधनांतून मुक्त होऊन ' त्या आनंदात नंगा नाचेन असा अर्थ आहे.

मोहनराव's picture

26 Jun 2015 - 3:21 pm | मोहनराव

नाचो जी भरके!!

कपिलमुनी's picture

26 Jun 2015 - 3:25 pm | कपिलमुनी

क भौ ? काहून नाचू राह्यला बे ?

होबासराव's picture

26 Jun 2015 - 3:32 pm | होबासराव

देखिये जी इस तरह धमकि देने से तो काम नहि होगा..जंतर मंतर हमारी वजह से हि आज दुनिया मे जाना जाता है!
अगली पांच साल का हमारा अ‍ॅडव्हांस बुकिंग हय. आप अगर इस तरह से नाचने कि धमकि दोगे तो यार हमारे लिये क्या काम रह जायेगा.

तिमा's picture

26 Jun 2015 - 3:40 pm | तिमा

नाचायचंच तर नच बलिये वा आजा नच ले, अशा कार्यक्रमात नाचा, म्हणजे टी.व्ही. वरुन सगळ्यांनाच दिसेल.

मोहनराव's picture

26 Jun 2015 - 3:45 pm | मोहनराव

त्यांना तुमचा नंगा नाच आवडला तर बक्षिस पण मिळेल!!

ज्ञानोबाचे पैजार's picture

26 Jun 2015 - 4:12 pm | ज्ञानोबाचे पैजार

नगरशेव्हक, आमदार किंवा खासदार होउन,
अंगावरती खादिची झूल पांघरुन,
पैशांच्या राशीत लोळेन मी एकदिवस,
या सुरेश, लालु, जया आणि मायाच्या भूमीत,

न्याय नितीची होळी करुन,
टेंडर साठी बड्या अधिकार्‍यांची झोळी भरुन,
पैशांच्या राशीत लोळेन मी एकदिवस,
या सुरेश, लालु, जया आणि मायाच्या भूमीत

टगेगिरी करत धरणाचे पाणी पळवून,
जमिनी लुबाडून टोलेजंग इमारती बांधून,
पैशांच्या राशीत लोळेन मी एकदिवस,
या सुरेश, लालु, जया आणि मायाच्या भूमीत,

पैजारबुवा,

बॅटमॅन's picture

26 Jun 2015 - 4:21 pm | बॅटमॅन

पैजारबुवा, मस्तच एकदम.

तदुपरि नगरशेव्हक म्हणजे अख्ख्या गावाची भादरणारा, बरोबर?

हा म्हणजे खरच कळस आहे :) नगर- शेव्हक :) अर्रारा

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jun 2015 - 6:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

शब्दखाटूक या पदवीला साजेसा प्रतिसाद. =)) आणि टाळ्या !

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Jun 2015 - 9:23 am | ज्ञानोबाचे पैजार

अख्ख्या गावाची भादरणारा = ग्रामशेव्हक
अख्ख्या नगराची भादरणारा = नगरशेव्हक
अख्ख्या देशाची भादरणारा = प्रधानशेव्हक

पैजारबुवा,

अविनाश पांढरकर's picture

26 Jun 2015 - 5:01 pm | अविनाश पांढरकर

जबराट!

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jun 2015 - 6:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

लै भारी !

जडभरत's picture

5 Jul 2015 - 8:48 am | जडभरत

मस्तच हो बुवा मस्तच!
झक्कास विडंबन

निरन्जनदास's picture

8 Jul 2015 - 1:42 pm | निरन्जनदास

पैजारबुवा ,
तू चीज बडी है मस्त मस्त
तू चीज बडी है मस्त
तू चीज बडी है must must.

अविनाशकुलकर्णी's picture

26 Sep 2015 - 9:19 am | अविनाशकुलकर्णी

माऊली झकास

होबासराव's picture

26 Jun 2015 - 4:17 pm | होबासराव

खतरनाक आणि समर्पक लिहिलय

मंदार कुमठेकर's picture

26 Jun 2015 - 4:21 pm | मंदार कुमठेकर

छान

होबासराव's picture

26 Jun 2015 - 4:36 pm | होबासराव

नाना तर्‍हेच्या डु आयडया काढुन
ब्रिगेडि साहित्यसूर्यांचे साहित्य वाचुन
नंगा नाचेन मी एक दिवस
या द्वेष मत्सराच्या गुर्मित

जातिवाचक धागे काढुन
त्यांचेच आडनाव उधार घेउन
नंगा नाचेन मी एक दिवस
या द्वेष मत्सराच्या गुर्मित

होबासराव's picture

26 Jun 2015 - 4:44 pm | होबासराव

20 hours 1 min

मार्मिक गोडसे's picture

26 Jun 2015 - 6:15 pm | मार्मिक गोडसे

स्वत्त:चीच राख पायाखाली तुडवून

अरे भाई आखीर क्या दिखाना चाहते हो ?
हाडुक???

प्यारे१'s picture

26 Jun 2015 - 6:51 pm | प्यारे१

बघ तुला जमेल तसं कर.

यसवायजी's picture

26 Jun 2015 - 7:05 pm | यसवायजी

(चाल- नाच मेरी जान नाच नाच)
-
नाच पथिका नाच नाच
तुझ्या पाण्याखाली गाव गाव
राख पायात तुडव दण दण दण.
दं दं दं दण... दं दं दं दण
नाच पथिका नाच नाच.

विशाल कुलकर्णी's picture

26 Jun 2015 - 7:18 pm | विशाल कुलकर्णी

कल्पना चांगली आहे पण नंगानाचाचा अतिरेक झाल्यामुळे फसलीय. प्रत्येक कडव्यातल्या त्या दोन ओळी काढून शेवटी कनक्लूजनच्या स्वरुपात वापरा. मजा येईल.

पैसा's picture

26 Jun 2015 - 7:23 pm | पैसा

+१

धन्यवाद! पुढल्या वेळी कुठे शेअर केली तुमची सूचना अंमलात आणिन.

पथिक's picture

29 Jun 2015 - 1:13 pm | पथिक

'नंगानाचाचा अतिरेक' :D

शशांक कोणो's picture

29 Jun 2015 - 1:18 pm | शशांक कोणो

मी विकू भाऊ शी सहमत आहे. अति तिथे माती होते. त्यामुळे थोडक्यात गोडी असते असे समजून नाचावे. बघायला येउत..............

दमामि's picture

26 Jun 2015 - 7:21 pm | दमामि

कविता आवडली.

धन्यवाद! बस्स! आता तुमच्या या पावतीरुपी काडीला घट्ट धरून टीकेच्या या महापुरात तग धरीन मी! :)

अत्रुप्त आत्मा's picture

26 Jun 2015 - 9:22 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-018.gif + http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-005.gif = http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-026.gif

टवाळ कार्टा's picture

27 Jun 2015 - 7:43 pm | टवाळ कार्टा

स्मायलीबुवा इज ब्याक :)

मदनबाण's picture

27 Jun 2015 - 7:58 pm | मदनबाण

नारायण ! नारायण ! या घोर कलियुगात नेत्रांवर अजुन कोण कोणत्या प्रकारचा ताण सहन करावा लागेल हे त्या वैकुंठपतीसच ठावुक ! देवा नारायणा... मी यक्ष लोकात एक चक्कर टाकुन आपल्या चरणी लोटांगण घालण्यास परत यावे म्हणतो... कसे ? नारायण ! नारयण ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दारु Peeke डांन्स... ;) :- Kuch Kuch Locha Hai

चिनार's picture

29 Jun 2015 - 11:19 am | चिनार

नाच बावा ...आम्ही का बोलाव आता

धर्मराजमुटके's picture

29 Jun 2015 - 1:21 pm | धर्मराजमुटके

कुंभमेळा जवळ आला आहे. कविमहाराज, या वर्षी नाशिक/ त्र्यंब्यकला येणं करा. तुमची इच्छा पुर्ण करण्यासाठी एकदम गोल्डन चांस.
बाय द वे, पुनम पांडेंचं काय झालं ?

टीप : हा प्रश्न मारुती कांबळेचं काय झालं ? (चित्रपट : सामना) या चालीवर वाचावा.

अविनाशकुलकर्णी's picture

30 Jun 2015 - 10:10 am | अविनाशकुलकर्णी

नाच नाचुन अति म्या दमले

संदीप डांगे's picture

5 Jul 2015 - 12:24 pm | संदीप डांगे
ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Jul 2015 - 12:40 pm | ज्ञानोबाचे पैजार

एकदम चपखल गाणं

या गाण्यातले लोक सुध्दा "अव्वा अव्वा" नाचतात.

पैजारबुवा,

कवितानागेश's picture

5 Jul 2015 - 6:58 pm | कवितानागेश

चांगलिये की कविता.

भाऊ कविता चांगलीच आहे. फक्त त्यातला गहन आध्यात्मिक अर्थ लक्षात येत नसावा.
पण एक सुधारणा केलीत तर बरे होईल. नंगा नाच याला आपल्या समाजात वाईट हास्यास्पद अर्थ चिकटलेला आहे. त्यामुळे लोकांच्या डोळ्यासमोर वेगळी चित्रे तरळली असतील. त्यापेक्षा "नग्न होईन मी अर्भकापरी" अशी शब्दरचना चालली असती. असो आपले आपले मत!

यसवायजी's picture

6 Jul 2015 - 3:24 am | यसवायजी

भाऊ कविता चांगलीच आहे.
भाऊ नाही माऊ (तै) म्हणा.

यसवायजी's picture

6 Jul 2015 - 3:26 am | यसवायजी

सोरी. गल्ली चुकली. ३.३० ला झोपेत प्रतिसाद दिल्याचा पर्णाम. :D

यसवायजी's picture

6 Jul 2015 - 3:28 am | यसवायजी

मिपाच गंडलय. झोपतो.

धन्यवाद!
तुमची सूचना आवडली.

अविनाशकुलकर्णी's picture

26 Sep 2015 - 9:58 am | अविनाशकुलकर्णी

साप व नाग चिडवाचिडवी खेळत होते...
नाग.....ए सापड्या..
.
साप..ए नागड्या

हरकाम्या's picture

29 Sep 2015 - 10:40 am | हरकाम्या

नाच बाबा आम्हाला कंटाळा येइपर्यन्त नाच. सध्या मी डोळे झाकुन घेतो.

नंदू's picture

13 May 2016 - 10:28 am | नंदू

आवडली.

पथिक's picture

16 May 2016 - 10:34 am | पथिक

धन्यवाद!