ऋषिकेश यांनी सुचवल्या प्रमाणे विणीचा नवा धागा घेत आहे विणायला.. प्रकाश रावांच्या पाचोळिचे हि स्वागत आहे. कोणाला जमली तशी तर जरूर लिहावी.
वीणकरांनी सहकार्य करावे..
विनायक रावांची चारोळी..
सुख क्षणभंगूर
दुखः असे निरंतर
सुख 'सुखाचा सोबती'
दुखः खरा मैतर
पुढे मी लिहित आहे...
नको असा तू दु:खी होऊ
विश्वासाने चालत रहा..
दु:खानंतर सुखाच रंग
कळेल नक्की पुन्हा..
- प्राजु.
प्रतिक्रिया
8 Jan 2008 - 12:40 am | प्राजु
अहो... माझ्या नादी लागून अस नका हो म्हणू..
चरोळ्या तुम्ही सुंदरच लिहिता... कविता तुमच्यात होतीच मी फक्त कारण झाले..
अशाच लिहा छान छान चारोळ्या.
- प्राजु.
8 Jan 2008 - 1:19 am | इनोबा म्हणे
अगं प्राजू,तुला दुखवायचं नव्हतं गं,मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की,तु माझ्यातला कवि जागा केलास.स्वारी बरं का!
कृपया करुन मला ह्या राव,शेठ,साहेब सारखी विशेषणे देऊ नका!!!त्यापेक्षा मला इनोबा,विनोबा किंवा नुसता विन्या म्हणा.
(त्रस्त) -इनोबा
8 Jan 2008 - 1:23 am | ब्रिटिश टिंग्या
तुमाला इनायकभौ म्हनलं त चालन का?
8 Jan 2008 - 1:28 am | इनोबा म्हणे
टिंग्या,तु आपला भाऊच आहेस की रं...तेरे लिये सब माफ...
(टिंग्याचा भाऊ) -इनायकभौ
8 Jan 2008 - 12:53 am | ब्रिटिश टिंग्या
मद्यपान करोनी गाडी चालविणे
करी क्षणात रंगाचा बेरंग
त्यापरि रिक्षा करोनी घरी जाणे
ही बुद्धी देवो पांडुरंग
आपला,
(रिक्षावाला) छोटी टिंगी
8 Jan 2008 - 1:13 am | इनोबा म्हणे
च्यायला!टिंग्या सही बोललास अगदी...आम्ही एकदा अनुभव घेतलाय रे!....तेव्हापासून 'नो ड्रिंक एन ड्राईव'...
(तुकोबाचा वारकरी आणि शिवबाचा धारकरी) -इनोबा
8 Jan 2008 - 1:10 am | प्राजु
पांडुरंग कांति
दिव्य तेज झळकती..
प्राजु, म्हणे अशी
असावी रूपाची किर्ती...
- प्राजु.
8 Jan 2008 - 1:21 am | प्राजु
विनोबा,
होऊन जाऊद्या मस्त चारोळी...
- प्राजु.
8 Jan 2008 - 1:25 am | इनोबा म्हणे
पांडुरंगाचीया दारी
उभा 'विनू' वारकरी
म्हणे दर्शन देगा देवा
कर ठेवूनी कटेवरी...
(तुकोबाचा वारकरी आणि शिवबाचा धारकरी) -इनोबा
8 Jan 2008 - 1:33 am | प्राजु
कर कटेवरी
तुरा मस्तकी मंजिरी
येता तुझिया दारी
सुख माझिया अंतरी..
- प्राजु
8 Jan 2008 - 1:46 am | इनोबा म्हणे
सुख सापडले गे मज
तुझीया अंतरात
तुची माझी गे प्राजू
गुरूमाऊली या जगात...
यापूर्वी खुप प्रयत्न केला,पण नेहमी मी कविता करताना 'हळवा' व्हायचो...माझ्या सारख्या माणसाने हळवा होणे कदाचित माझ्या पुरुषी अहंकाराला सहान झाले नाही म्हणून मी कविता करणेच सोडून दिले होते...पण आज प्राजूमुळे मी पुन्हा कवितेत रमायला लागलो...खरंच...मनापासून थँक्स!
(प्राजूचा एकलव्य) -इनोबा
8 Jan 2008 - 1:39 am | ऋषिकेश
सुख माझिया अंतरी
दु:ख गेले विरघळून
हास्य उमटले डोळी
आसवे गेली ती वाळून
8 Jan 2008 - 1:55 am | प्राजु
कोमल हात इवली बोटे
नाजूक ती फुलापरी
खळी उमलली गालावरी
हास्य निखळ ते ओठावरी
-प्राजु.
8 Jan 2008 - 2:05 am | इनोबा म्हणे
ओठ तुझे ग कोमल
जणू मदिरेचा प्याला
डोळे डोह जणू खोल
मन तुझे मधूशाला
(देवदास) -इनोबा
13 Jan 2008 - 5:55 pm | सुधीर कांदळकर
क्या बात है!
8 Jan 2008 - 2:13 am | प्राजु
सुख सापडले गे मज
तुझीया अंतरात
तुची माझी गे प्राजू
गुरूमाऊली या जगात...
नको लाजवू विनोबा
तूच कवितेतला गुरू
मधुशाला दूर दूर, सध्या
कवितेचाच प्याला भरू...
- प्राजु.
8 Jan 2008 - 2:25 am | ब्रिटिश टिंग्या
नाही सुचत शब्द
ना स्फुरते कविता
कशी विणू ही चारोळी मी
खुप झोप आलीये आता ;)
आपला,
(झोपलेला) छोटी टिंगी
13 Jan 2008 - 5:59 pm | सुधीर कांदळकर
घोरणे तुझे
हीच आमची चारोळी
व्यर्थ नको दु:ख करू
ऐक सुधीरची ही आरोळी
8 Jan 2008 - 2:16 am | ऋषिकेश
तुला भेटल ना की
पोटातल ओठावर येतं..
तुझ्या एका कटाक्षानेच
ओठांपसुन ते दुर दुर पळतं..
8 Jan 2008 - 2:21 am | प्राजु
मला घायाळ करायला
तुझा एक कटाक्षच पुरे आहे...
श्वास आहेस तू माझा
जीवन तुजवीन अपुरे आहे...
-प्राजु
8 Jan 2008 - 2:30 am | इनोबा म्हणे
श्वास तुझा,श्वास माझा
आज एकची गे झाला
प्राण तुझा,प्राण माझा
नव्या देहात जन्मला
(ये कहा आ गये हम) -इनोबा
8 Jan 2008 - 2:37 am | ऋषिकेश
इनोबा मस्तच रे!
8 Jan 2008 - 3:23 am | इनोबा म्हणे
ऋषा...तूही प्रयत्न करत रहा...बरोबर जमेल...म्हणजे तु 'फ्लो' मधे आलास ना की शब्दांना शब्द आणि भावना जुळतील...
(नवकवी) -इनोबा
8 Jan 2008 - 2:33 am | प्राजु
तुझ्या श्वासात मी
माझा श्वास गुंफला
तुला पाहिले नि
माझा शोध संपला...
(सदर चारोळी माझी आई सौ. मंजुश्री गोखले हिच्या आकृतीगंध या चारोळी संग्रहातील आहे.)
8 Jan 2008 - 3:29 am | इनोबा म्हणे
म्हणजे चारोळीचा वारसा तुम्हाला मातोश्रींकडून मिळाला म्हणायचा...तुमच्या मातोश्रींचा हा संग्रह कुठे मिळेल?
(आज कल पाव(खायचा नव्हे)जमीनपर नही पडते मेरे) -इनोबा
8 Jan 2008 - 2:39 am | ऋषिकेश
माझा शोध संपला
एका उत्तराचा...
तुझ्या उत्तराने दिलाय
अदमास नवीन प्रश्नांचा
8 Jan 2008 - 2:42 am | इनोबा म्हणे
तुला पाहिले गं नाही
तरी का मना भावली
मना भासतसे तू गं
जणू ग्रीष्मात सावली
8 Jan 2008 - 2:44 am | प्राजु
प्रश्नाला प्रश्नानेच
उत्तर देता येते..
उद्या भेटू पुन्हा, आता
आपला निरोप घेते..
- प्राजु.
नव्या धाग्याने सुंदर वीण विणली जात आहे.
मी आपल्या सगळ्यांची आभारी आहे. असेच विणत रहा. मी उद्या पुन्हा भाग घेईन.
-प्राजु.
8 Jan 2008 - 2:45 am | ऋषिकेश
जणू ग्रीष्मात सावली
हसणे अवखळ तुझे
गालावरची खळी
चंद्रकोरीसम साजे
8 Jan 2008 - 2:58 am | इनोबा म्हणे
चंद्रकोरीच्या ह्या कला
नाना अवखळ परी
बाळा तुझेच खट्याळ
सोंग त्याचीया अंतरी
(चांदोमामा) -इनोबा
8 Jan 2008 - 3:28 am | ऋषिकेश
सोंग तिच्या अंतरी
रोज नवीन असते
कधी वसंत फुलून येतो
कधी शिरीराची पानगळ असते
(प्रयत्नशील) ऋष्या
8 Jan 2008 - 3:33 am | इनोबा म्हणे
शिशिर आला जरी आज
मनी वसंत फुलला
काव्य स्फुरले रे मज
कवी पुन्हा रे जन्मला
(नवकवी) -इनोबा
8 Jan 2008 - 3:37 am | ऋषिकेश
कवीजन्माने खळीची होते कळी,
अन हास्याचे चांदणे होते
मर्त्य सृष्टीला झिडकार मित्रा...
इथे केवळ प्रतिभेचे नांदणे होते.
8 Jan 2008 - 3:47 am | इनोबा म्हणे
हास्य मिळाले रे मला
सखा तुझ्यात पाहिला
'इनोबाच्या' मदतीला
जणू 'इठोबा' धावला...
छान रे ऋषा...याला म्हणतात काव्य...
13 Jan 2008 - 6:03 pm | सुधीर कांदळकर
वा. चारोळ्यांची अशी जुगलबंदी खरेच मजा देऊन जाते आहे. अभिनंदन आणि अनुपम आनंद दिल्याबद्दल तुम्हाला तसेच प्राजुताईंना देखील.
8 Jan 2008 - 4:09 am | ब्रिटिश टिंग्या
पौर्णिमेची रात अन गुलाबी थंडी
तो तिरपा कटाक्ष अन लाडिक हसणे
परि सोडून गेलीस मजला
सोबतीस राहिले चंद्र अन चांदणे
8 Jan 2008 - 6:27 am | ऋषिकेश
तो तिरपा कटाक्ष अन लाडिक हसणे
तो सुटलेला बाण हृदयी बसणे
चांदण्यांचाही करणारे प्रकाश फिका..
तिच्या हास्याने उधळलेले चांदणे असणे
8 Jan 2008 - 10:08 am | प्राजु
अफाट लहरीना चंद्र रिझवतो..
ठिपूर चांदण्यावर चकोर भाळतो
दवबिंदूंचा गजरा नाजूक, डोंगर
दरीच्या केसात अलगद माळतो..
आपण सगळे खूप सुंदर लिहिता आहात. आता तात्यांना बहुतेक मिसळपाव चारोळी संग्रह काढावा लागणार असं दिसतंय.
- प्राजु.
8 Jan 2008 - 11:11 am | इनोबा म्हणे
डोंगर दर्यात नांदला
माझा इठोबा सावळा
सृष्टी झाली सारी गोळा
जसा भक्तांचा सोहळा...
प्राजूची कल्पना आवडली...चारोळी संग्रह काढायलाच हवा... हि जबाबदारी माझी
(तुकोबाचा वारकरी अन शिवबाचा धारकरी) -इनोबा
13 Jan 2008 - 6:06 pm | सुधीर कांदळकर
मुलगा म्हणतो त्याप्रमाणे माझेदेखील काजळाचे बोट मधे मधे लावले आहेच.
8 Jan 2008 - 4:34 pm | धमाल मुलगा
नि:शब्द मनाच्या कोषी
चाहुल अस्फुट पावला॑ची
तुझ्या एका कटाक्षासाठी
थरथर भाव-सावल्या॑ची....
===================
आता तुम्ही म्हणाल एव्हढ्या सुन्दर चारोळ्या॑मध्ये हे काय "प्राचीला गच्ची" ?
तर त्याच॑ कारण अस॑, सगळ्याच चारोळ्या सुद॑र, मग कोणितरी काजळाच॑ बोट नको लावायला? नाहीतर द्रुष्ट लागेल ना त्या॓ना !!!!
असो, र॑गाचा बेर॑ग केल्याबद्दल क्षमस्व!
आपला,
(अचानक-पण "भयाssनक कवी) धमाल मुलगा.
8 Jan 2008 - 10:30 pm | इनोबा म्हणे
आता नित्याचंच झालंय
तुझं मला बघून लाजणं...
अन तुझ्या दिलखेच अदेने
माझं वेड्यासारखं वागणं...
प्राजू आल्याशिवाय रंगत वाढणार नाही...
(कविता'च्या प्रेमात पडलेला) -इनोबा
8 Jan 2008 - 10:58 pm | इनोबा म्हणे
लाज पुरे सखे आता
सोड लाजेचा बहाणा
मन वेडावले माझे
मिठीमधे मला घे ना!
:( -इनोबा
13 Jan 2008 - 10:30 pm | पुष्कर
तुझी मिठी
इतकी मिठी,
जशी मिठी
साखर-पिठी
8 Jan 2008 - 11:35 pm | ब्रिटिश टिंग्या
घेताच घट्ट मिठीत तीने
धुंद मी झालो तिच्या गंधाने,
अवचित शब्द निघाले मुखातुनी
कृपया उद्यापासुन 'डिओ' लावणे ;)
13 Jan 2008 - 6:14 pm | सुधीर कांदळकर
इफेक्ट नको. आमच्यासाठी कोणीच उरणार नाही.
8 Jan 2008 - 11:37 pm | अव्यक्त
एक धागा सुखाचा, शम्भर धागे सौख्याचे...
एक जागा मोक्याचि, बाकि सार्या धोख्याच्या
एक शन शोकाचा, चोविस घतिका मौजेचा
एक श्वास सुत्केचा अन सारा जन्म भोगन्याचा....
9 Jan 2008 - 12:14 am | प्राजु
आलेच मी...
धागा धागा जोडून
मिपा वासि जोडले गेले
प्राजुच्या नावाने शंख करत
सगळे कविताच रचू लागले..
- प्राजु.
13 Jan 2008 - 6:17 pm | सुधीर कांदळकर
हा शंखध्वनी आहे
प्राजूच्या विजयाचा
आणि मिपा करांच्या
प्रतिभेच्या डौलाचा
9 Jan 2008 - 12:23 am | इनोबा म्हणे
मिपाच्या या कट्ट्यावर
आमची प्रतिभा खुलू लागली
धाग्या-धाग्याने आता
कवितेची बाग फुलु लागली...
(कृतज्ञ) -इनोबा
9 Jan 2008 - 12:28 am | प्राजु
विनोबा...सह्ही..
शब्दाला शब्द जोडून
कविता होत नसते..
तिला लागते कवि मन
जे मिपा वासियांकडे असते..
- प्राजु.
9 Jan 2008 - 12:33 am | इनोबा म्हणे
अव्यक्त हे शब्द माझे
आता मनमोकळं बोलत आहेत
लाख प्रयत्न केला परी
आता गुपीत खोलत आहेत...
(मनमोकळा) -इनोबा
9 Jan 2008 - 12:42 am | प्राजु
धरतीचे गुपीत
आभाळाने सांगितले..
पाऊस पडून गेला
आणि जीवनच पालटले...
- प्राजु.
9 Jan 2008 - 12:46 am | इनोबा म्हणे
पाऊस पडतो जेव्हा...
तेव्हा तू मला आठवतेस
अन पावसाचे पाणी नकळत...
डोळ्यात माझ्या साठवतेस
(चातक) -इनोबा
9 Jan 2008 - 1:02 am | ऋषिकेश
तुझ्या ओठांवरचे शब्द
माझ्या मुखी थरथरले....
अन माझ्या हृदयातील पाणी
तुझ्या डोळ्यातून झरझरले
9 Jan 2008 - 1:06 am | ब्रिटिश टिंग्या
क्या बात है.......फारच सुरेख!!!!
9 Jan 2008 - 12:49 am | प्राजु
पावसाने मला
अलगद गाठले
तो कोसळत होता
पण तळहातावर तळे साठले..
-प्राजु.
9 Jan 2008 - 1:10 am | अव्यक्त
पाउस अलवार होता,
ती भिजत होती
तो सुखाच होता,
मन रदत होते
अन हुन्दका अबोल होता...
9 Jan 2008 - 1:14 am | इनोबा म्हणे
पावसाच्या थेंबाने ओठ भिजतील
पण तृष्णेला काही पुरत नाहीत
किती झेलले थेंब हातावर
हाती काही उरत नाहीत...
13 Jan 2008 - 6:23 pm | सुधीर कांदळकर
असा बरसेन असा बरसेन
माझ्या बरसण्याच्या आवेगाने
वर्षावाच्या प्रपातात
तृष्णाहि वाहून जाईल
9 Jan 2008 - 1:14 am | अव्यक्त
पाउस अलवार होता,
ती भिजत होती
तो सुखाच होता,
मन रदत होते
अन हुन्दका अबोल होता...
9 Jan 2008 - 1:16 am | प्राजु
पाऊस झिरमिर झिरमिर
पानापानात बरसतो
पाऊस अल्लड अवखळ
धरेशी पिंगा घालतो..
- प्राजु.
9 Jan 2008 - 1:11 pm | धमाल मुलगा
लप॑डाव ऊन-पावसाचा
गुलमोहोर सोन्यात भिजलेला
मी खिडकीशी ऊभा न्याहाळत,
पारा विजेत थिजलेला...
-धमाल.
10 Jan 2008 - 10:29 pm | सनिल पांगे
जीवन जगताना असे
का होते आपल्या बरोबर
डोहाळे लागतात सुखाला
पण दुःख होते गरोदर
@ सनिल
10 Jan 2008 - 10:30 pm | सनिल पांगे
जीवन जगताना असे
आपण इतकच करत असतो
"घटस्फोट" नको म्हणून क्षणाक्षणाला
श्वासाला वरत असतो
@सनिल
10 Jan 2008 - 10:34 pm | सनिल पांगे
सत्याला कितीही झाकलं जरी
कधीतरी बाहेर येतचं ना
कितीही पळालं मरणा पासून
हमखास कवेत घेतचं ना
@सनिल
10 Jan 2008 - 10:35 pm | सनिल पांगे
काट्यांसकट गुलाब
याचसाठी विकत घेतात
कारण हास्य व अश्रूं
प्रेमात एकत्र येतात
@सनिल
10 Jan 2008 - 10:59 pm | देवदत्त
लोकांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला भरपूर दारोळया घेतल्या वाटते. ;)
नुसत्या चारोळ्या/पाचोळ्यांचा पूर आला आहे.
असो,
तुमचे चालू द्या... आम्हाला त्यात जास्त काही जमत नाही. आम्ही वाचूनच आनंद घेण्याचा प्रयत्न करू :)
11 Jan 2008 - 10:16 pm | सनिल पांगे
प्रेमात जमा - खर्च??
हा हिशोब कुठला
का हल्ली प्रेमातही
व्यवहाराचा अंकूर फुटला
@सनिल