गुलाल

महासंग्राम's picture
महासंग्राम in जे न देखे रवी...
23 Jun 2015 - 9:32 am

जरी देवळात उडवला मी गुलाल काल काही,
तरी पायरीत आज भेटले दलाल काही

मदिरेतच झिंगतात लोक असे नाही
देवळातही होतात हलाल काही,

उगाच वाहतो का ओझे फुकाचे,
जीवना मी तुझा हमाल नाही

का विझावे पणती परी,
अजूनही पेटवु मशाल काही.

#Gypsy
gypsykavita.blogspot.in

गझल

प्रतिक्रिया

विशाल कुलकर्णी's picture

23 Jun 2015 - 9:42 am | विशाल कुलकर्णी

तुम्ही विषय खुप छान हाताळता. आता थोडेसे ल़क्ष लय आणि विशेषतः मिटरवरही द्या. पुलेशु :)

थोडासा आगाऊपणा करतोय तरी क्षमस्व..

जरी मंदीरी उडवला गुलाल काही
पायरीवरी आज भेटले दलाल काही

मद्यातच मात्र झिंगती असे नाही
होतात मंदीरातही हलाल लोक काही

उगा वाहतो का ओझे हे फ़ुकाचे
रे जीवना, मी तुझा हमाल नाही

का विझावे नेहमी...,पणतीपरी?
अजूनही पेटवू चला मशाली काही

महासंग्राम's picture

23 Jun 2015 - 11:11 am | महासंग्राम

विशाल मी पण प्रयत्न करतोय सुधारण्याचा ,
पुढच्या वेळेस अजून चांगल लिहीन याची खात्री देतो

पैसा's picture

26 Jun 2015 - 2:41 pm | पैसा

लिखाणात स्पार्क आहे. विशालने म्हटले त्याकडे लक्ष द्या. खूप छान लिहू शकाल!

अविनाश पांढरकर's picture

26 Jun 2015 - 4:42 pm | अविनाश पांढरकर

पुलेशु!