४-५ वर्षांपूर्वी चार-चाकीने लोहगड च्या पायथ्या पर्यंत म्हणजे जिथे गाव आहे आणि पायऱ्या सुरु होतात तिथे पर्यंत वॅगन-आर नेली होती. पवना धरणाकडून लोणावळ्याला जाताना एक छोटी खिंड लागते तिथून डावीकडे वर कच्चा रस्ता सुरु होतो असे आठवतेय.
सध्या कसा रस्ता आहे तिथे पर्यंत काही कल्पना आहे का?
(अर्थातच छोटी गाडी आहे, एस.यु.व्ही. नाही :) )
प्रतिक्रिया
20 Jun 2015 - 10:39 am | सतिश गावडे
जाते. तीन वर्षांपूर्वी तुम्ही म्हणत आहात त्याच रस्त्याने आम्ही चार मिपाकर आय टेन घेऊन गेलो होतो.
आम्ही गेलो तेव्हा गडाच्या पाय्थ्यापर्यंत डांबरी रस्ता असल्यासे पुसटसे आठवते.
20 Jun 2015 - 11:34 am | एस
लोहगडवाडीपर्यंत म्हणजे लोहगड आणि विसापूर यांच्यातील खिंडीत वसलेल्या गावापर्यंत गाडीरस्ता आहे.
20 Jun 2015 - 11:47 am | सत्याचे प्रयोग
रस्ता साधाच असावा . पण गेलाच अन Non veg
खात असाल तर गावात ढाकोळ चे घरगुती हॉटेल आहे चिकन अन तांदुळाची भाकरी आवश्य खा. २ वर्षापूर्वी खाल्लीय अजून आठवणीत आहे अशी चव .
20 Jun 2015 - 1:16 pm | नांदेडीअन
पवना धरणाकडून लोणावळ्याला जाताना जी खिंड लागते, ती दुधीवरे खिंड आहे.
मागच्या वर्षीचा एक किस्सा सांगतो.
दुचाकी खिंडीच्याच एका कोपर्यात पार्क करून मी आणि माझा मित्र खिंडीचे फोटो काढत होतोत.
तेव्हढ्यात पवनेकडच्या रस्त्याने एक इंडिका गाडी भरधाव वेगात हॉर्न वाजवत आम्हाला कट मारून गेली.
आणि अगदी पाचच मिनिटात झाडांच्या फांद्या तुटल्याचा आवाज आला आणि लगेच माणसांचा आरडा ओरडा सुरू झाला.
आम्ही गाडी घेऊन लगेच कोपर्यावरच्या चहाच्या टपरीवर पोहोचलो. (इथूनच उजव्या हाताला लोहगडकडे जाणारा रस्ता सुरू होतो.)
२०-३० लोक जमा झाले होते.
त्यातल्याच एकाला आम्ही काय झाले हे विचारले असता त्याने दरीकडे बोट दाखवले.
आम्हाला कट मारून गेलेली गाडी त्या तीव्र चढावर चढता न आल्यामुळे मागे घसरत येऊन खाली ३०-४० फूट दरीत कोसळली होती.
सुदैवाने गावातलीच काही मंडळी त्या टपरीजवळ थांबलेली होती.
त्यांच्यापैकी ४-५ जणांनी खाली जाऊन गाडीतल्या माणसांना बाहेर काढले.
माझ्या मते एकूण ५ जण होते गाडीमध्ये. कुणालाही गंभीर दुखापत झालेली नव्हती.
तो सुरूवातीचा चढ आहेच थोडा अवघड.
आणि त्यावेळी तर तिथे गिट्टी टाकून ठेवलेली होती.
हा अपघात होण्याच्या थोड्याच वेळापूर्वी अजून एक फोर व्हिलरवाला वर चढण्याचा प्रयत्न करत होता, पण त्यालाही ते न जमल्यामुळे त्याने घाटातल्याच थोड्या मोकळ्या असलेल्या जागेत गाडी पार्क केली आणि पायीच वर जायचे ठरवले.
पण काल याच रस्त्याने मी लोणावळ्याला जाऊन आलो तेव्हा त्या जागी गार्ड स्टोन लावलेले दिसले.
20 Jun 2015 - 1:26 pm | सतिश गावडे
मी नवखा वाहनचालक असताना या रस्त्याने अगदी गडाच्या पायथ्याशी गाडी नेली होती. गाडी चढ चढून जाईपर्यंत जीवात जीव नव्हता. सोबत असलेले मिपाकर मित्र धीर देत होते. :)
21 Jun 2015 - 5:36 pm | अनिरुद्ध.वैद्य
तो चढ डेंजरस आहेच! माझी गाडीसुद्धा घसरायला लागली होती.
20 Jun 2015 - 1:37 pm | कंजूस
भाजे लेणी ( मळवली )कडूनही बरेच पुढे जाऊन गाडी पार्क का नाही करत ?लोहगडवाडीतली मुले रोज मळवलीला खाली शा ळेत जाऊन येतात.
20 Jun 2015 - 1:45 pm | सतिश गावडे
काका, रोज चढ-उतार करणार्यांची गोष्ट वेगळी असते. कधीतरी हौस-मौजेखातर ट्रेकला जाणार्यांची गोष्ट वेगळी असते. या दोन गोष्टींची तुलना नाही होऊ शकत.
20 Jun 2015 - 2:29 pm | एस
मळवली ते लोहगडवाडी हा चढ जास्त नाहीये. त्यामानाने मळवलीकडचा रस्ताही चांगला आणि सोयिस्कर आहे.
20 Jun 2015 - 2:37 pm | प्रचेतस
मळवली ते लोहगडवाडी हा रस्ता अलीकडेच संपूर्ण डांबरी झालाय. वाट लावून टाकलीय पर्यावरणाची सगळी.
21 Jun 2015 - 3:51 pm | यशोधरा
झाला का? :( आता काही दिवसांत भकास व्हायला हरकत नै. :(
21 Jun 2015 - 4:40 pm | धनावडे
काही दिवसात सुरुवात तर कधीच झालेय
21 Jun 2015 - 11:02 pm | एस
आम्ही गेलो होतो तेव्हा फक्त पायवाट होती!!!
22 Jun 2015 - 1:01 pm | अनिरुद्ध.वैद्य
गेल्या डिसेंबरमध्ये तर नव्हता ...
21 Jun 2015 - 2:08 pm | वेल्लाभट
व्यवस्थित जाते.
21 Jun 2015 - 9:26 pm | सुहास झेले
संपूर्ण डांबरीकरण झालेले आहे ... प्लॉटिंग ही झालेय.
नुसता लोहगड नाही तर संपूर्ण पवना काठ विकला गेला आहे. दोन वर्षापूर्वी अनेक मुंबई-पुणेकरांचे बंगले बघितलेत... असो !!
22 Jun 2015 - 11:37 am | वेल्लाभट
असोच ! उघड्या डोळ्यांनी बघत रहायचं फक्त.
22 Jun 2015 - 12:47 pm | भटक्या योगी
अगदी बरोबर...... वर्षापूर्वीच जाउन आलो होतो. आता फोर व्हिलरच काय, कन्टेनर-ट्रेलर नेला तरी जाईल ओ. पायथ्यची सगळी जमिन विकली गेली आहे. आता गड पण विकयला काढावा म्हणजे मिळवलं.
22 Jun 2015 - 1:13 pm | अनिरुद्ध.वैद्य
कालच ताम्हिणीला गेलेलो, सगळीकडे कुंपण घालून मार्किंग करून ठेवलेत! सालतर खिंडीकडे महाराष्ट्र व्हैली तयार होतेय.
22 Jun 2015 - 9:05 am | लई भारी
सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
अपेक्षित माहिती मिळाली पण एकंदरीत या परिसराची लागलेली वाट बघून वाईट वाटतय.
22 Jun 2015 - 4:55 pm | धनावडे
गडावरील बांधकाम बघुन तर आणखीण वाटेल
16 Jul 2015 - 12:02 pm | लई भारी
बहुधा लक्षात येतंय तुम्ही काय म्हणताय ते! ४-५ वर्षापूर्वीच्या प्रथम भेटीतच डोक फिरलं होत. आता बघुया अजून कशाची आणि किती भर पडलीय.
24 Jun 2015 - 1:55 am | अभिजीत अवलिया
विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची जी हानी चाललेली आहे ती बघवत नाही. आमची मूले मोठी
होतील तेव्हा त्याना अनुभावायला थोड़ातरी निसर्ग शिल्लक राहावा हीच इच्छा.
16 Jul 2015 - 1:02 pm | यमगर्निकर
मळवली फाट्यावरुन भाजे लेणीच्या पायथ्याला जा तेथुन लोहगड ला गेल्या वर्षि नवीन डांबरि रस्ता झाला आहे तो थेट लोहगड च्या पायथ्याशि जातो, हाच रस्ता पुढे त्या खिंडित जाउन मिळतो. मळवली वरुन लोहगड पायथा ८ - ९ कि.मी अंतर पडेल.