मुंबईत गोळीबार/बॉम्बस्फोट..! (चर्चा क्र. २)

विकास's picture
विकास in काथ्याकूट
27 Nov 2008 - 3:48 am
गाभा: 

मुंबईत गोळीबार/बॉम्बस्फोट..! या मूळ चर्चेस तात्काळ खूप प्रतिसाद आल्याने. येथे अधिक प्रतिसाद करणे आणी नवीन वाचणे सोपे जावे म्हणून हा धागा चालू केला आहे.

हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटेसह नऊ पोलिस शहीद
डेक्कन मुजाहिदीनने घेतली जबाबदारी - मुंबईत बुधवारी रात्री ठिकठिकाणी गोळीबार करत सुरू झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी डेक्कन मुजाहिदीन नावाच्या संघटनेने घेतली आहे. मिडियाला इ-मेल करुन संघटनेने ही जबाबदारी स्वीकारली आहे.

येथे अतिरेक्याचे छायाचित्र पाहू शकाल.

प्रतिक्रिया

प्रियाली's picture

27 Nov 2008 - 4:04 am | प्रियाली

कृपया, वरील फोटो काढून टाकावा असे मला वाटते. इथे लोक आपला राग आणि दु:ख व्यक्त करण्यासाठी काहीतरी लिहितील त्या प्रत्येकाला प्रत्येकवेळी या नराधमाचे दर्शन घडवून आणणे अयोग्य वाटते असे माझे व्यक्तिगत मत आहे.

चीड येईल असा फोटो आणि मुद्रा आहे.

विकास's picture

27 Nov 2008 - 4:04 am | विकास

थोड्यावेळा पूर्वी गाडीत रेडीओवर नॅशनल पब्लीक रेडीओवर सतत मधून मधून यावरून जाहीर करणे चालू होते त्यामुळे प्रसंग खूपच गंभीर आहे हे समजत होते. पटकन जेव्हढे फोनवर बघता आले तेव्हढे वाचले पण कधी एकदा घरी येऊन पहातोय असे झाले होते...

वाईट वाटलेच, चीडपण आली पण त्याहूनही त्रागा (फ्रस्ट्रेशन आले) झाला.... पण आत्ता ही वेळ नाही म्हणून इतकेच म्हणत पुढे काय चालले आहे ते पहातो.

यामधे बळी पडलेल्या सामान्य तसेच पोलीसांना श्रद्धांजली आणि लवकरात लवकर इतरत्र अडकलेली माणसे सुटावीत अशी इश्वरचरणी प्रार्थना.

रेवती's picture

27 Nov 2008 - 4:06 am | रेवती

शब्द सुचत नाहीयेत काही.
सर्व निरपराध लोकांची व्यवस्थित सुटका होऊ दे अशी प्रार्थना.
सर्व शहिद पोलीस व नागरिकांच्या आत्म्यास शांती मिळू दे.

रेवती

प्रत्येक खोलीच्या खिडकीत स्नॉर्केल शिडी नेऊन आत अडकलेले लोक बाहेर काढत आहेत!

२ अतिरेकी अजूनही आत आहेत असे समजते!

चतुरंग

विकास's picture

27 Nov 2008 - 4:14 am | विकास

प्रेस ट्रस्ट ऑफ इंडीया च्या संकेत स्थळावर भारतीय प्रमाण वेळ ४:१५ पहाट, अजून बातमीपण नाही....

कोलबेर's picture

27 Nov 2008 - 4:25 am | कोलबेर

डेक्कन मुजाहिदीन वगैरे लोकल फुटकळ अतिरेकी संघटनांचे हे कृत्य नसावे असे विध्वंसाचा आवाका बघुन वाटते आहे. डेक्कन मुजाहिदिन वगैरे निव्वळ धूळफेक असावी. इतका भिषण हल्ला 'अल कायदा' सारखी अमानुष संघटनाच करु शकते. अमेरिकेत/युकेत घुसण्यापेक्षा भारतात येउन त्यांच्या नागरिकांना ओलिस ठेवणे सोपे वाटले असावे. सीएनएन, फॉक्स वरील चाललेले अखंड कव्हरेज पाहुन पाश्चात्य देशांचे लक्ष वेधून घेणे हाच ह्या भ**चा उद्देश दिसतो.

आजानुकर्ण's picture

27 Nov 2008 - 7:54 am | आजानुकर्ण

ह्या मादर*दांचा हेतू लोकांच्या मनात भीती उत्पन्न करणे हा होता असे स्पष्ट दिसते. एनडीटीव्हीवर वाचलेल्या बातमीनुसार एखाद्या कॉलेजकुमाराप्रमाणे पाठीवर सॅक घेऊन हे अतिरेकी वावरत होते. एकादोघांनी स्वतः हिंदू आहोत अशी दिशाभूल करण्याकरिता मनगटाला लाल रंगाचा दोराही बांधला होता. बोरीबंदर वगैरे स्थानकांवर गोळीबार करण्यामध्ये अमेरिकेच्या नागरिकांना धोका पोचवणे हा नेमका हेतू नसावा.

मात्र एकंदर परिस्थिती किती बिघडत चालली आहे. उद्यापासून कोणीहा असा विचार करू लागेल की शेजारी उभा असलेला तरुण झटकन बॅगेतून एके ४७ काढेल आणि गोळीबार करेल... अशी समाजस्वास्थ्य बिघडवणारी ही योजना आहे.

उपमन्यू's picture

27 Nov 2008 - 11:40 am | उपमन्यू

ह्या मादर*दांचा हेतू लोकांच्या मनात भीती उत्पन्न करणे हा होता असे स्पष्ट दिसते

आपल्या भावनेशी मनापासून सहमत....

सुगावा लागू नये आणि लक्ष्य सतत हलते रहावे हा उद्देश.
निश्चीतच अतिशय नियोजनबद्ध हल्ला होता. कुलाब्या जवळ एक पेट्रोलपंपहि पेटवून दिलाय असे समजते.
सगळीकडे घबराट उडवून देणे, गोंधळाचा फायदा घेऊन लोकांचे खून पाडणे हाच उद्देश दिसतो.
शस्त्रे आधुनिक आहेत त्यामुळे मोठ्या संघटनेचा हात आहे हे नक्की.

चतुरंग

योगी९००'s picture

27 Nov 2008 - 4:45 am | योगी९००

आबा मिडियाशी बोलताना कापत होते...कारण ...???...भुजबळांनी मधे तोंड घालून आबांना वाचवले...

खादाडमाऊ

उमा's picture

27 Nov 2008 - 4:59 am | उमा

आबांची मुलाखत कुठे बघायला मिळेल?
बातमी ऐकुन सुन्न झालेय मन. शहिद अधिकार्याना अभिवादन.

भास्कर केन्डे's picture

27 Nov 2008 - 6:43 am | भास्कर केन्डे

उद्या पुन्हा कामाला लागण्या ऐवजी आपण सगळ्या देशभर सरकारवर अतिरेकी पकडण्यासाठी दबाव आणला पाहिजे. हे ज्यांचे कोणाचे काम आहे त्यांना कंठस्नानच घालायला हवे. किती दिवस बाश्कळ सहनशीलतेचे पाढे पढत हे हल्ले मूकपणे बघत बसायचे. बस्स झाले...

जनता म्हणून आपण काय करू शकतो? अर्थात तात्या आणी मंडळी रक्तदानाला गेले आहेत. पण त्यापुढे काही करता येईल काय? विषेशतः जे मुंबईत नाहीत त्यांना सुद्धा?

पांथस्थ's picture

27 Nov 2008 - 7:17 am | पांथस्थ

उद्या पुन्हा कामाला लागण्या ऐवजी आपण सगळ्या देशभर सरकारवर अतिरेकी पकडण्यासाठी दबाव आणला पाहिजे. हे ज्यांचे कोणाचे काम आहे त्यांना कंठस्नानच घालायला हवे. किती दिवस बाश्कळ सहनशीलतेचे पाढे पढत हे हल्ले मूकपणे बघत बसायचे. बस्स झाले...

असेल तिथे घुसून ठोका मा****ना....

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...

सुक्या's picture

27 Nov 2008 - 7:05 am | सुक्या

अगदी सुन्न होउन बातम्या पाहातो आहे. काय बोलावे तेच कळत नाही. बंदुकिच्या टोकावर निरपराध लोकांना धमकावने ह्यात काय पुरुषार्थ आहे ?

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

अनिल हटेला's picture

27 Nov 2008 - 7:30 am | अनिल हटेला

काय चाललये कळत नाय !!
आता पाणी डोक्यावरून चाललये.....
सहन शक्ती संपलीये ......

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

आजानुकर्ण's picture

27 Nov 2008 - 7:35 am | आजानुकर्ण

निंदनीय आणि अतिशय वाईट प्रकार. काहीही गुन्हा नसलेल्या शेकडो निष्पाप लोकांना या प्रसंगात प्राण गमवावे लागले.

अक्षरशः सुन्न झालो आहे. काहीही बोलण्याची मनस्थिती नाही.

मदनबाण's picture

27 Nov 2008 - 7:37 am | मदनबाण

मृतांची संख्या ८१ तर २१९ जण जखमी झाले आहेत..दिल्ली वरुन स्पेशल टिम(एन एस जी) मुंबईत आली आहे.
ताज आणि ऑबेरॉय हॉटेल मधे अतिरेक्यांनी लोकांना ओलिस ठेवण्यात आले आहे तसेच ताज हॉटेल मधे अतिरेक्या़कडुन आग लावण्यात आली आहे,,ही आग विझवण्याचे प्रयत्न चालु आहेत.
मुंबई मधील शाळा व कॉलेज आज बंद असणार आहेत.

मदनबाण.....

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर

लवंगी's picture

27 Nov 2008 - 7:49 am | लवंगी

अश्या लोकांना गोळ्या घालण्यापेक्ष्या रस्त्यावर लोकांच्या हातात दिले पाहिजे.. हाल हाल करून नरक यातना दिल्या पाहिजेत .. काय काय भोगाव लागतय मुंबईला.. नजर लागली आहे या सैतानाची

आजानुकर्ण's picture

27 Nov 2008 - 7:46 am | आजानुकर्ण

मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानुसार मुंबईत 10 ठिकाणी हा हल्ला झाला. मात्र फक्त 6 अतिरेकी ठार झाले... 9 'संशयित' अतिरेकी पकडले आणि 3 पसार झाले असे वाचले.

हा एकंदर प्रकार समजेनासा झाला आहे. मूठभर लोक काही हत्यारे घेऊन आख्खा देश वेठीला धरू शकतात हे अनाकलनीय आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Nov 2008 - 8:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राहिले त्या अतिरिक्यांना गोळ्या घालाव्यात.

अनिल हटेला's picture

27 Nov 2008 - 8:23 am | अनिल हटेला

पकडून काहीही उपयोग नाही..
एक अफजल गूरू पूरेसा आहे...
आता तरी सरकार डोळ्यावर कातडे पांघरून बसणार नाही,अशी अपेक्षा ...
एकदाच काय तरी जालीम उपाय करायला हवा..

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

विकास's picture

27 Nov 2008 - 8:43 am | विकास

ह्या सर्व घटनेत जसे अनेक सामान्य बळी गेले, धार्मिक हला, लोकशाहीवरील हल्ला वगैरे झाला. तसेच सामान्य मुसलमानांना पण तोटा झालाय. उद्या जर उद्योगधंदे सामान्य मुसलमानांना अप्रत्यक्ष घेयचे टाळायला लागले, सामान्य अ-मुस्लीम जर त्यांच्याशी संबंध जरा लांबून ठेवू लागले तर त्यातून अजून प्रश्न वाढतात... त्याच बरोबर असे होते तेंव्हा "दहशतवादाला धर्म नसतो" म्हणायचे, "मानवी हक्क सांगायचे" आणि आरोपपत्र नसताना देखील "हिंदू टेररीझम" "टेरर गुरू" वगैरे म्हणायचे याने दुसरे प्रश्न तयार होतात.

या नष्टचक्रावर उपाय काय वाटतो?

आजानुकर्ण's picture

27 Nov 2008 - 8:53 am | आजानुकर्ण

साध्वी प्रज्ञासिंग आणि कर्नल पुरोहित यांच्यासारख्या हिंदू दहशतवाद्यानी जे उद्योग केले त्यावेळी तुमच्या माझ्यासारखे सामान्य हिंदू काहीही करू शकले नाहीत. त्याचप्रमाणे आज ह्या हलकटांनी जे उद्योग केले त्याबाबत सामान्य मुसलमान काही करू शकतील असे वाटत नाही.

निदान मी तरी या प्रसंगानंतर एखाद्या सामान्य मुस्लिमाशी परक्याप्रमाणे वागेल असे वाटत नाही.

या नष्टचक्रावर उपाय म्हणजे अशा नष्टचक्रांचे परिणाम योग्य प्रकारे समजावून सांगणे आणि दहशतवाद्यांना धर्माचे लेबल न लावणे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Nov 2008 - 9:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माफ करा पण मुस्लीम धर्मात 'जिहाद' ची कल्पना आहे. मुस्लीमांनी मुस्लीमेतरांची हत्या करावी त्यांच्याविरुद्ध प्राणपणाने लढावे असे जिहाद सांगतो. अशी जगातील बहुतेक मुस्लिमतरांची ( हिंदू, ख्रिस्ती, बौद्ध) धारणा आहे. बरेच मुस्लीम तसे मानतात. जिहादचा अर्थ त्यांना भले माहित नसेल,(माहित नाहीच) दहशतवादी धार्मिक, धर्माभिमानी, धर्मप्रेमी, धर्मांध, धर्मवेडे, असेच असले पाहिजेत असेही नाही पण निरपराध लोकांची हत्या करणार्‍यांची सरासरी काढली तर ती कोणत्या धर्माची आहे हे सांगायला ज्योतिशाची गरज पडणार नाही. मग आम्ही अशा लोकांना धार्मिक लेबले लावली तर बिघडले कोठे ?

-दिलीप बिरुटे

पांथस्थ's picture

27 Nov 2008 - 10:11 am | पांथस्थ

सहमत आहे. मालेगाव हल्ल्यांमधे मिडीयावाले हिंदु दहशतवादी असा उल्लेख करु शकतात तर मुस्लीम दहशतवाद म्हणण्यात मला काहि वावगे वाटत नाहि.

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...

उपमन्यू's picture

27 Nov 2008 - 11:29 am | उपमन्यू

प्रा. डॉ. दिलीप बिरुटे यांच्याशी पूर्णपणे सहमत.

कुराणाच्या हिंदी भाषांतराच्या आंतरजालावरील दुव्यासाठी (डाउनलोड करता येण्याजोगी PDF धारिका) येथे पहा
http://www.scribd.com/doc/6784741/QuranEPaakHindiTranslate
पण डाउनलोड करण्यासाठी आपल्याला आधी या संकेतस्थळाचे सदस्य व्हावे लागेल. अन्यथा Download Tab वर टिचकी मारूनही ती आज्ञा कार्यान्वित होणार नाही.

(अवांतर याच संकेतस्थळावर गीतारहस्याची डाउनलोड करता येण्याजोगी PDF धारिका उपलब्ध आहे(श्लोकांवरील टीका सोडून).
दुवा : http://www.scribd.com/people/documents/635222/folder/24465
)

आजानुकर्ण's picture

27 Nov 2008 - 6:03 pm | आजानुकर्ण

मटामध्ये मृतांची नावे आहेत ही वाचा. आता तरी हा हिंदूंवरचा हल्ला न मानता भारतावरचा हल्ला मानावा आणि सर्वांना शासन करावे असे वाटण्यास हरकत नसावी.

मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सुमारे १०१ जण मृत्युमुखी पडल्याचे वृत्त आहे. त्यातील शवविच्छेदनासाठी नेलेल्या मृतांची उपलब्ध नावं पुढीलप्रमाणे...

जेजे हॉस्पिटल

* शशांक शिंदे
* जयवंत पाटील
* सलीम अहमद लाला
* मेझनीन हारावाला
* मुरलीधर चौधरी
* जाधव (होमगार्ड)
* बाळासाहेब भोसले
* योगेश शिवाजी पाटील
* सुभाष व्ही. पाटील
* अंबादास पवार
* एच. मटवाला
* सीताराम साखरे
* एडीआर-५४ कुलाबा ( हा त्या व्यक्तिच्या बिल्ला क्रमांक असावा)
* बाबूसाहेब दारगुडे
* मीराबाई चरणी
* इजाज हाजी
* अशफ अल्लारखा
* शेख ( एवढेच नाव उपलब्ध आहे)
* कमल मोटवानी

नायर हॉस्पिटल
* विनोद गुप्ता
* अरखा लालजी सोलंखी
* सुनील ठाकरे
* सुशीलकुमार शर्मा
* काझी हिदायतुल्ला
* प्रकाश मंडल
* अमानत मोहम्मद अली

केईएम हॉस्पिटल
* आफरिन कुरेशी
* चंदुलाल तांडेल
* अमिनाबाई
* शिरीष सावला चारी

धार्मिक भेद न करणे हाच उपाय मान्य आहे. म्हणून पुर्वी जसे होते तसेच आत्ता देखील मनापासून सगळ्यांसाठी पाळायचे. धार्मिक लेबल न लावणे. पण आता परत वर आपणच "हिंदू दहशतवादी" असे म्हणालातच!

बरे दुसरा भाग म्हणजे आज साध्वी प्रज्ञा/पुरोहीत आदींच्या संदर्भात जेव्हढी टिका हिंदू करत आहेत, त्यांच्यावर अजून आरोपपत्र नसून देखील त्यात वृत्तपत्रे आले, समाज चलवळीत कामे करणारे आले, वगैरे. तशी टिका मुसलमानी बुद्धीवादी मुसलमान दहशतवादावर करताना दिसतात का? आता परत बघूया कोण कोण आत्ताच्या कृत्याचा निषेध करतय ते...

निदान मी तरी या प्रसंगानंतर एखाद्या सामान्य मुस्लिमाशी परक्याप्रमाणे वागेल असे वाटत नाही.

प्रश्न तुमचा आणि माझा नाही आहे. शिवाय माझे वाक्य मी आपल्या "उद्यापासून कोणीहा असा विचार करू लागेल की शेजारी उभा असलेला तरुण झटकन बॅगेतून एके ४७ काढेल आणि गोळीबार करेल... अशी समाजस्वास्थ्य बिघडवणारी ही योजना आहे. " या विधानाच्या संदर्भात केले होते.

विसोबा खेचर's picture

27 Nov 2008 - 8:48 am | विसोबा खेचर

अजूनही कारवाई सुरूच आहे..

ओबेऱोय हॉटेलात अतिक्यांनी पुन्हा ग्रेनेडचा हल्ला केला आहे...

ताज परिसरात कर्फ्यू लागू केलेला असून युद्धजन्य परिस्थिती आहे.. अनेक परदेशी नागरीकांना ओलिस ठेवले असून त्यांना सोडवण्याचे निकाराचे प्रयत्न सुरू आहेत..

कमांडोजना आणि पोलिसांना लौकरच या युद्धात यश मिळो व परदेशी नागरीकांची सुखरूप सुटका होवो, हीच प्रार्थना..

तात्या.

मिंटी's picture

27 Nov 2008 - 11:01 am | मिंटी

तात्यांशी एकदम सहमत....
हे सगळं करण्यामागे त्यांचा नक्की उद्देश काय तर त्यांना हैदराबाद भारतापासुन तोडुन पाकिस्तानात समावेश व्हावा असं वाट्टंय.....
चिड याची येते की हे असं करणारे हे सगळे आतंकवादी आपल्याच देशाचे नागरीक आहेत...
हैदराबादचे....

मुसलमानांना त्रास होऊ नये म्हणुन हे सगळं कृत्य करण्यात येतय..... X(

विसुनाना's picture

27 Nov 2008 - 11:22 am | विसुनाना

मिंटी, तुम्ही हे कुठं वाचलं त्याचा दुवा द्या.

यशोधरा's picture

27 Nov 2008 - 10:09 am | यशोधरा

अजूनही कारवाई सुरुच आहे का? इतका वेळ का लागतोय?

वैभवपवार's picture

27 Nov 2008 - 11:00 am | वैभवपवार

आपले सरकारच याला जवाबदार आहे . आफ्ज्ल गुरु ला अजुन फाशि दिलि नही ...अतिरेक्यन चि सेवा करन्यात गुन्तले आहे

धमाल मुलगा's picture

27 Nov 2008 - 11:05 am | धमाल मुलगा

ताजमध्ये कमांडोंच्या प्रतिहल्ल्यात ३ अतिरेकी ठार.

गुजरात पोलिसांनी म्हणे गेल्या महिन्यात इशारा दिलेला होता की मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता आहे.
पोलिसांसारख्या महत्वाच्या आणि जबाबदार सुत्रांकरवि मिळणार्‍या ह्या बातमीवर गांभिर्याने विचार केलेला दिसत नाही.

मुंबई परत पुर्वपदावर येत आहे.

*(अवांतरः
१. दहशतवादाला चेहरा नसतो हे वेळोवेळी चर्चिले गेले आहेच. सध्याची करुण आणि संतापदायक परिस्थिती पाहता 'हिंदू दहशतवाद' आणि 'मुस्लिम (किंवा अ-हिंदू) दहशतवाद' अश्या वादात सध्यातरी कलगीतुरे करणे व्यक्तिशः मलातरी योग्य वाटत नाही.
२.ए.टी.एस.चे कै.हेमंत करकरे ह्यांच्या बलिदानानंतर निदान काहीकाळ तरी त्यावर तात्विक का होईना वाद घडु नयेत असं मनापासुन वाटतं.
समस्त मिपाकर सुजाण आहेतच. निदान ह्या परिस्थितीत तरी तात्विक वाद बाजुला ठेऊन एकत्र रहावे ही हात जोडुन कळकळीची विनंती.
माझे हे बोलणे अयोग्य, अस्थानी असल्यास् / वाटल्यास क्षमस्व!
)

अतिशय उत्तम आणि संयत प्रतिक्रिया धमु, काहीही अस्थानी नाही.

हा देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला आहे. त्यात धर्म असलाच तर तो त्या अतिरेक्यांनी जी काही कथित मागणी केली आहे तेवढाच. गोळी झाडणारा आणि निरपराधी लोकांचे जीव घेणारा एक गुन्हेगार असतो. त्याची जात धर्म हा त्याच्या नावाचा किंवा आयडेंटिफिकेशन चा भाग आहे बस.
ए टी एस वरच्या वादाला सध्या पडदा टाकावा. हेमंत करकरे यांना अभिवादन होत आहे कारण ते प्रमुख होते मोठे अधिकारी होते तरी जिवावर उदार होऊन पहिल्या आघाडीत लढले. पण नाव नसलेले बाकी नऊ कर्मचारी तितकेच महत्त्वाचे. त्यांना मरणानंतर सुद्धा तो मान नाही. एका चॅनेलवर एक साधा हवालदार पाहिला काल रात्री ज्याच्या पोटात गोळी लागली होती. त्यांना चक्कर यायला लागली. काही लोक गोळा झाले. एका बलदंड माणसाने चक्क त्या पोलिसाला हातावर उचलून घेतले आणि काहीही दुसरे साधन नव्हते म्हणून एका स्प्लेंडर च्या मागे हातात घेऊन ते हॉस्पिटल ला गेले. मला अक्षरशः पोटात ढवळलं.. केवळ भयाण.
तो मनुष्य गेला तर एका कॉन्स्टेबलला काय मदत मिळणार. अतिशय वाईट वाटलं.
दुसरा एक मुद्दा: हे इतके मोठे अधिकारी पुढे का गेले. करकरे यांच्या शेवटच्या व्हिडिओ मध्ये ते सैन्या सारखं हेल्मेट व बुलेटप्रूफ जॅकेट घालताना दिसले. मग त्यांना छातीत तीन गोळ्या कशा लागल्या? यात या शूरवीराचा अवमान करण्याचा हेतू नाही.
उलट या माणसांचे जीव अति महत्त्वाचे आहेत. इतके स्वस्त नाहीत ... ते आले आणि आता तयार होत आहेत ही बातमी पाहून झोपलो आणि सकाळी करकरे डेड वाचून विलक्षण त्रास झाला.
सर्व शहीद, पोलिस आणि जीव धोक्यात घालून लोकांना बाहेर काढणार्‍या अग्निशमन दलाच्या जवानांना विनम्र अभिवादन.
आत्ताच वाचलं की हा राष्ट्रावर हल्ला आहे. सरकारवर कुठलीही टीका न करता सर्व पक्षांनी एकत्र यावे. इतक्या जहाल नेत्याकडून हे ऐकून वाटलं की अजून सगळं संपलं नाही. हीच संधी आहे एकत्र येण्याची.. आणि ही गरज आहे -मँडेटरी म्हणतात तशी. http://www.ndtv.com/convergence/ndtv/story.aspx?id=NEWEN20080074274&ch=6...

अवांतर: झेंडा अर्ध्यावर आणून राष्ट्रीय दुखवटा जाहीर करावा आणि भारतीय सेनेच्या इतिहासाला आणि नावाला शोभेल असा प्रतिहल्ला करावा.
जय हिंद.

(अतिशय दु:खी)....

यशोधरा's picture

27 Nov 2008 - 11:41 am | यशोधरा

मैत्र, धमु सहमत.

स्मिता श्रीपाद's picture

27 Nov 2008 - 11:07 am | स्मिता श्रीपाद

अजुनही ताज च्या बाहेर कारवाई सुरु आहे...

इतकी भयानक घटना .....आज पेपर वाचु नये असं वाटत होतं......बातम्या वाचताना डोळ्यात पाणी कधी आलं कळलच नाही...

देवा...आता तरी जागा हो.... :-(

हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटेसह नऊ पोलिस शहीद झाले , अहो शहीद केले म्हणा ! ह्या नालयक, नाकर्त्या, नामर्द सरकारच्या नेभळट धोरणाचे बळी आहेत हे. अजुन किति दिवस सगळ्यात मोठ्या लोकशाहिचा झेंडा हलवत बसणार आहे ?
मला तर कधि कधि वाटते आपला देश ह्या अतिरेकी लोकांना सराव करण्यासाठी आंदण दिला आहे. ९/११ नंतर अमेरिकेत हल्ला करण्याचे विचार सुध्दा करणे अवघड बनवले आहे त्या देशानी, पण आपल्याकडे सगळा आनंदी आनंद आहे. फक्त तारिख आणी ठिकाण बदला आणी द्या निषेधाचे खलिते पाठवुन !!

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।
आमचे राज्य

कवटी's picture

27 Nov 2008 - 2:59 pm | कवटी

निळा ट्याग बंद केला.

कित्तेक किलो आर्.डि.एक्स. जप्त.
आजुनही २ दिवस पुरेल येवढा दारुगोळा अतिरेक्यांकडे.
आरे या रां*च्याना दुसरे उद्योग नाहित का? कष्ट कर कमव आणि सुखाची भाकर खा ना.

गुरुजी's picture

27 Nov 2008 - 11:15 am | गुरुजी

हे स्फोट विधानभवन मंत्रालय अशा ठिकाणी व्हायला पाहीजे होतो आणि अतिरेक्यानी नेत्याना ओलिस ठेवायला हवं मग सालं सरकार वठणीवर येईल आता नाहीतरी सरकारला निवडणुकीशिवाय जनतेचं महत्व नाहीच ते काय म्हणतील मरतायत ना मरुदेत मदत फक्त जाहीर करायला पुढे सरकाय यावर फार तर दोन दिवस उड्या मारेल नंतर शांत बसेल आणि वर 'पोटा कायद्याची काही गरज नाही' म्हणायला तयार

पांथस्थ's picture

27 Nov 2008 - 12:24 pm | पांथस्थ

सहमत. मला वाटत एकदा तरि मंत्री नावाचा एखादा कीडा मारला गेला पाहिजे. मग जागे होतील. सामान्य माणसाल्या बसलेल्या झळेचे हे लोक फक्त 'तीव्र शब्दात निषेध' करु शकतात.

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...

धमाल मुलगा's picture

27 Nov 2008 - 12:46 pm | धमाल मुलगा

नको हो मालक!
असं काही मनातही आणू नका!

एखादा मंत्री गचकला ह्यात तर बाकीचे बोंबाबोंब करुन अतिरेकी असलेल्या इमारतीच्या छतावर एखादं 'चार्टर्ड प्लेन' उतरवून त्या अतिरेक्यांच्या पाया पडुन त्यांना इमानात बसवून एखाद्या सुरक्षित (अतिरेक्यांसाठी!) अशा देशात 'दिल्या घरी सुखी रहा' म्हणत पाठवणी करतील.....हे सगळं तुमच्या, माझ्या, सगळ्यांच्या कर भरलेल्या पैशातून!!!!

अहो, जिथं हिंदुस्थानाच्या लोकशाहीचं परमोच्च स्थान 'संसद' ह्यावर हल्ले करणारा अफजल गेली इतकी वर्षं सुखात आणी सुरक्षितपणे (हे एव्हढ्यासाठी, की जर त्या कुत्तरड्याला रस्त्यावर आणलं तर दगड्यानं ठेचुन त्याचा जीव 'मायबाप जन्ता'च घेईल.पण मग त्याच्या नावावर राजकारण करणं शक्य नाही ना होणार? ) फुकटच्या रोट्या तोडतोय तिथं एखाद्या मंत्र्यासंत्र्याला त्रास झाला तर काय आपला हा अजगर जागा होणार आहे?

दुर्दैव देशाचं!

मेरा भारत परेशान !!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Nov 2008 - 2:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

वाटत नाही हो! इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हे दोन आजी/माजी पंतप्रधान दहशतवाद्यांनीच मारले ना?

हे सूत्र अत्यंत कठोरपणे अमलात आणणे जरुर आहे. प्रतिकार केला तर गोळ्या घालून मारा. पकडले गेले तर लवकरात लवकर जास्तितजास्त माहिती काढून फासावर लटकवा!
न्याय हा महिन्या दोन महिन्यातच मिळायला हवा. १९९३ चे बाँबस्फोट खटले १३-१३ वर्ष चालतात ह्यातच आपली नाचक्की आहे. काय वचक बसणार आणि कसली दहशत वाटणार?
ज्यांना शिक्षा झाल्या आहेत त्याची लगेच अंमलबजावणी! अफजल गुरु - लगेच फाशी देऊन टाका, लगेच आज देता आली तर उत्तम, कसली वाट बघता?
अरे वाट बघत बसलात म्हणून वाट लागली आहे आता!!

चतुरंग

स्वप्निल..'s picture

27 Nov 2008 - 12:01 pm | स्वप्निल..

वाटाघाटी नकोत..सर्व अतिरेकी ठार झालेच पाहीजे..
चतुरंगशी ११० % सहमत..

झाले ते अतिशय वाइट आहे..

स्वप्निल

उम्मि's picture

27 Nov 2008 - 11:36 am | उम्मि

आम जनतेनेच सरकारवर दबाव आणला पाहीजे या समुळ भ्याडांना(सामान्य नागरीकांना ओलीस धरणारयांना) मौत के घाट उतारण्यासाठि....

हिच वेळ आहे दहशतवाद उखडुन टाकण्याची...

साल्यांना, सळो की पळो करुन सोडल पाहीजे.......

उम्मि.

विसुनाना's picture

27 Nov 2008 - 11:45 am | विसुनाना

शिवराज असे ओजस्वी नाव धारण केलेले भारताचे गृहमंत्री दिल्लीत (मुंबई) हल्ल्यानंतरची पहिली मुलाखत देताना सांगत होते, "एकूण पाच ठिकाणी हल्ले झालेले आहेत. नक्की किती लोक मेले ते उद्या सकाळी स्पष्ट होईल. माझ्या अधिकार्‍यांना मी मृतांची यादी बनवण्यास सांगितले आहे. उद्या सकाळी ते तुमच्याशी याबाबत सविस्तर बोलतील आणि ती यादीही तुम्हाला देतील."
या महानुभावांच्या चेहर्‍यावरचा पराभव आणि आवाजातला फोलपणाचा भाव इतका स्पष्ट होता की हे महर्षी भारताचे गृहमंत्री नसून जन्ममृत्यू नोंदणी करण्यास फिरत असलेले कारकून असावेत असे वाटले.
भारतात सरकार फक्त मृत व्यक्तींची यादी बनवण्यापुरते आणि ती यादी संपर्क माध्यमांना पुरवण्यापुरते शिल्लक आहे असे स्पष्ट जाणवले.

चतुरंग's picture

27 Nov 2008 - 11:51 am | चतुरंग

इतके शेळपटासारखे भाव चेहेर्‍यावर होते की मला लाज वाटली!
काय तो खोल गेलेला आवाज?
अरे असला भीषण हल्ला होऊन इतकी माणसं हकनाक गेली आहेत तुमच्या आवाजात, देहबोलीत, चेहर्‍यावर काहीही दिसू नये?
काय म्हणावं? असले लांच्छनास्पद लोक भारताच्या गृहमंत्रीपदी असल्यावर उद्या घराघरातून घुसून लोकांना गोळ्या घातल्या जातील तरीही आपण निषेधच करत बसू!!

चतुरंग

विसुनाना's picture

27 Nov 2008 - 12:12 pm | विसुनाना

निषेध करायला तरी आपण जिवंत असू का? :(

कवटी's picture

27 Nov 2008 - 3:02 pm | कवटी

काल पासून आज पर्यंत यानी कितीवेळा कडक इस्त्री चा सफारी बदलला हो?

चतुरंग's picture

27 Nov 2008 - 11:41 am | चतुरंग

चतुरंग

काल पासून मी सर्व वृत्त वाहिन्यांवर पहात आहे. जे पाहिले ते सगळे सुन्न करुन टाकणारे आहे
अतिरेक्यांच्या एका गोळीला हजार गोळ्यांनी उत्तर दिले पाहिजे

अनेक प्रश्न उपस्थित राहतात
१.
आलेले अतिरेकी सगळे गुजरात मधून मुंबईला थेट गेट वे ऑफ इंडिया मधून आले आणि सगळीकडे पसरले अशी बातमी आहे न्यूज चॅनल्स ची.
सागरी सीमा सुरक्षा दले काय झोपा काढत होती का? की पैसे खाऊन बोटी चेक न करण्याच्या विलासी शौक पायी कर्तव्याचा विसर पडला ?
२.
मुंबई पोलिस चा एक हवालदार गोळी लागलेला चॅनेलवर थेट प्रक्षेपण पाहिले. काय करावे त्याने? बिचार्‍याच्या हातात काठी होती
काठीने लढावे की काय त्याने एके-४७ बरोबर? हा सरकारचा नाकर्तेपणा आहे की पोलिस स्वतःच्या कर्मचार्‍यांनाच सुरक्षा देऊ शकत नाही तर सामान्य जनतेला काय कप्पाळ देणार?
मुंबईत राहणार्‍या आपल्या बांधवांचे आयुष्य एवढे स्वस्त आहे?
सरकारने याचा जाब दिला तर पाहिजेच. पण एवढी वर्षे झोपा काढत होते की काय सरकार?

ना सागरी सीमेवर लक्ष, ना भूसीमेकडे लक्ष
सगळे लक्ष आपले मतांच्या लाचारीकडे..... बांगला देशी लाखोंच्या संख्येने राजरोस भारतात सगळीकडे रोज पसरत आहेत आणि सरकार डोळ्यांवर पट्टी बांधून बसले आहे.

ज्यांची निष्ठा सीमेपार वाहिलेली आहे अशांना आपल्या देशाचे नागरिकत्व? अरे कुठे फेडतील हे पाप काँग्रेसवाले... नरकातही यांना जागा मिळणार नाही. त्यांच्यासाठी यमालाही खास नरक तयार करावा लागेल.
राष्ट्रहित हे सगळ्या राजकारणापेक्षा पहिले आहे हे काँग्रेसच्या लक्षात का नाही येत?

घडलेल्या घटनेचा जाहिर निषेध आणि मुंबईकरांचे अभिनंदन की अशा आतंकी कारवायांमधेही पळून न जाता एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून जखमींना मदत केली. आणि इंग्लंड टीमचाही जाहीर निषेध की असल्या अतिरेकी हल्ल्याचे कारण काढून मोठ्या पराभवाची मानहानी टाळून मैदानातून पळ काढला...

(देशभक्त) सागर

सत्यवादी's picture

27 Nov 2008 - 11:48 am | सत्यवादी

11:09 AM: Latest reports say that the Navy and Army have taken control at Oberoi. Meanwhile, a child of foreign nationality and an Indian maid have been seen coming out of Nariman House in South Mumbai. Reports also say that US intelligence officials are among the foreigners killed at Taj Hotel.

-- सत्यवादी

सुक्या's picture

27 Nov 2008 - 11:57 am | सुक्या

भारतात सरकार फक्त मृत व्यक्तींची यादी बनवण्यापुरते आणि ती यादी संपर्क माध्यमांना पुरवण्यापुरते शिल्लक आहे असे स्पष्ट जाणवले.

शिवराज पाटीलांसारखे ग्रुहमंत्री , मनमोहनासारखे पंतप्रधान अन लल्लु , अमरसिंह सारखे नेते या भारतात असतील तर आणखी काय व्हायचे शिल्लक आहे. सरदार पटेलांसारखा ग्रुहमंत्री पाहीलेल्या भारताला असले नेभळाट मंत्री पहायला मिळावेत ही खरी शोकांतीका आहे. या अतीरेक्यांची बाजु घेणारे महाभाग डोके वर काढु नयेत म्हणजे मिळवली. तसे हे तथाकथीत कैवारी या बाबतीत निषेध नोंदवण्याऐवजी मुग गिळुन गप्प राहतील असेच मला वाटते आहे. बघुया.

सर्व म्रुतांच्या आत्म्यास शांती लाभो. जखमींना लवकर आराम मिळो. म्रुतांचा आकडा न वाढो हीच ईश्वर्चरणी प्रार्थना.

सुक्या (बोंबील)

मुक्तसुनीत's picture

27 Nov 2008 - 12:18 pm | मुक्तसुनीत

सर्वात महत्त्वाची गरज : आपला देश एक "सॉफ्ट टार्गेट" आहे ही प्रतिमा काहीही करून पुसली जायला हवी. जी हिम्मत त्यांना इस्रायल विरुद्ध होत नाही ती आपल्या विरुद्ध होता कामा नये. एकदा हे ध्येय निश्चित केले तर सरकार कुणाचेही येवो , ते कुणीही असोत : लालू, शिवराज , डॉ. सिंग, मायावती, अडवाणी ...कुणीही. सुरक्षा यंत्रणा ही तितकीच परिणामकारक असायला हवी. बस्स. एव्हढेच हवे आहे.

अवलिया's picture

27 Nov 2008 - 12:25 pm | अवलिया

खरे आहे तुमचे म्हणणे परंतु जोपर्यंत काहि विशिष्ट समाजाला खुश करण्याचा एककलमी कार्यक्रम बंद होत नाही तो पर्यंत असेच घडत रहाणार आहे. तुमच्यामाझ्यासारखा याविरोधात उभा राहिला तर संपुर्ण यंत्रणा केवळ आपल्याच विरुद्ध वापरली जाईल पण ज्यांचा बंदोबस्त करायचा ते राजरोसपणे गेट वे ऑफ इंडिया तुन प्रवेश करत रहाणार.

गेट वे चा गेट अवे होणे गरजेचे आहे. त्याकरता करावा लागणारा स्वार्थत्याग करण्याची हिंमत जनतेने अन जनतेच्या नेत्यांनी दाखवला पाहिजे. पण असे होणे फार अशक्य आहे असे वाटते.

स्वप्निल..'s picture

27 Nov 2008 - 12:25 pm | स्वप्निल..

आपल्या सरकार ला केव्हा समजणार काय माहिती... :(

स्वप्निल

विसुनाना's picture

27 Nov 2008 - 12:40 pm | विसुनाना

सॉफ्ट टार्गेट तर आपण आहोतच! अनेक कारणे आहेत. विचार करायला लागले तर डोके भंजाळून जाते.
मागे मोठा इतिहास आहे.
कोणे एके काळी नंग्या तलवारी घेऊन लोक कत्ले-आम करत फिरत. आज एके-४७/५६, हँडग्रेनेडस घेऊन करत फिरत आहेत.

पाकिस्तान नावाची फॅक्टरी आहे. बांग्लादेश नावाची ऍंन्क्सिलरी आहे. आय एस आय नावाची आर अँड डी आहे. दिशाहीन तरुण नावाचे रॉ मटेरियल आहे. भारत नावाचे ओपन मार्केट आहे. मग दहशतवादाचे प्रॉडक्ट स्वस्तात तयार होऊन भरपूर खपायला काय प्रतिबंध आहे?
हे प्रकार आता इतक्या थराला गेले आहेत की (वर कुणी म्हटल्याप्रमाणे) दहशतवादी भारताला प्रॅक्टिस ग्राऊंड समजतात असे वाटू लागलेले आहे.

सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? या चालीवर सरकारला कधीतरी डोके होते काय? असे म्हणावेसे वाटते. पायाखाली काय जळते आहे याची कल्पना करवत नाही. पण सामान्य भारतीय माणूस अजूनही समंजस आहे. त्याचे सामंजस्य 'मूर्खपणा' ठरू नये ही मनापासून इच्छा!

पांथस्थ's picture

27 Nov 2008 - 2:48 pm | पांथस्थ

पाकिस्तान नावाची फॅक्टरी आहे. बांग्लादेश नावाची ऍंन्क्सिलरी आहे. आय एस आय नावाची आर अँड डी आहे. दिशाहीन तरुण नावाचे रॉ मटेरियल आहे. भारत नावाचे ओपन मार्केट आहे. मग दहशतवादाचे प्रॉडक्ट स्वस्तात तयार होऊन भरपूर खपायला काय प्रतिबंध आहे?
हे प्रकार आता इतक्या थराला गेले आहेत की (वर कुणी म्हटल्याप्रमाणे) दहशतवादी भारताला प्रॅक्टिस ग्राऊंड समजतात असे वाटू लागलेले आहे.

नाना,
खेळ एकदम सोपा करुन सांगीतला हो.

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...

अनामिका's picture

27 Nov 2008 - 12:23 pm | अनामिका

आबा प्रतिक्रिया देताना कापत होते. घाम फुटला होता त्यांना .#:S
काल रात्री हा हल्ला सुरु असताना रस्त्यावर उतरणार्‍यांमधे फक्त मला विनोद तावडे आणि रामदास कदम हेच दिसले.
बाकी स्वत:ला महाराजांचे वंशज म्हणवणारे शुरविर काँग्रेसचे कावळे मात्र शेपुट घालुन आपापल्या बंगल्यात कुठल्यातरी कोपर्‍यात अंग चोरुन बसले असावेत.
विलासराव केरळला कुठल्यातरी सुनामी संबंधातील उद्घाटनाला गेले होते आणि इथे मुंबईत अतिरेक्यांची सुनामी आली.
छातीचा कोट करुन उत्तरभारतियांचे रक्षण करु अशी गर्जना करणारे शरदराव देखिल कुठे गायब झालेत त्यांनाच ठावुक?

"अनामिका"

विनोद तावडे आणि रामदास कदम रस्त्यावर उतरले म्हणजे नक्की त्यांनी काय केले? ते देखील या कारवाईत सहभागी झाले होते का? असेच माहितीसाठी विचारत आहे.

तीस वर्षापूर्वी शत्रू राष्ट्रात घुसून हजारो मैल रातोरात काटून एका अधिकार्‍याच्या मोबदल्यात २५० लोकांना परत आणणारे इस्रायल (पहा - एन्टेबी : http://en.wikipedia.org/wiki/Operation_Entebbe) आणि काही प्रमाणात मदत मिळत असताना अत्यंत कडवे अतिरेकी परत देणासाठी जाणारे गृहमंत्री.
प्रचंड फरक आहे दोन्ही मध्ये.
दुसरा मुद्दा : सुरक्षा फक्त अनेक कमांडोज आणि सैन्याने होत नाही. इस्रायल प्रत्येक नागरिकाची, अभ्यागताची जितकी माहिती ठेवली जाते त्या प्रमाणात भारतात १०% पण नसेल. काय ट्रॅक करणार ? इथे साधी मतदार यादी साठ वर्षात नीट करता आली नाही. लोकांवर लक्ष काय ठेवणार? सरकार दरबारी नागरिकांची किती माहिती सरकारला पाहिजे म्हणून ठेवली आणी ट्रॅक केली जाते? कदाचित काहीही नाही.

अनामिका's picture

27 Nov 2008 - 12:34 pm | अनामिका

मैत्र तुमचा मुद्दा मान्य
अहो पण जिथे राज्यकर्त्यांनाच आपल्या घरातली लोकसंख्या नियंत्रित करता येत नाही. तिथे देशाच्या वाढत असलेल्या लोकसंख्येला आळा कधी घालणार्?आणि मग इतक्या मोठया प्रंमाणावर लोकसंख्या असलेल्या देशाच्या प्रत्येक नागरिकाचि माहिती कशी उपलब्ध असु शकणार नाही का?
आपल्याला अहिंसेचे डोस पोलिओ डोस प्रमाणे बालपणापासुन पाजले गेले आहेत तेंव्हा इस्रायल आणि आपली तुलना कुठल्याच बाबतीत होवु शकत नाही.
"अनामिका"

जैनाचं कार्ट's picture

27 Nov 2008 - 12:35 pm | जैनाचं कार्ट (not verified)

आतंकवादीचा ईमेल आला आला आहे एका चॅनेला !!!
वाचा येथे

जैनाचं कार्ट
देहि शिवा वर मोहि इहै...
शुभ करमन ते कबहूं न टरूं...
न डरूं अरि सौं जब जाई लरूं...
निसचै कर अपनी जीत करूं...

आपले संकेतस्थळ

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Nov 2008 - 12:41 pm | llपुण्याचे पेशवेll

सामना काय म्हणतो आहे ते पहा.

पुण्याचे पेशवे

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Nov 2008 - 12:41 pm | llपुण्याचे पेशवेll

सामना काय म्हणतो आहे ते पहा.

पुण्याचे पेशवे

योगी९००'s picture

27 Nov 2008 - 12:50 pm | योगी९००

अरेच्या..अबू आझमी साहेब कोठे आहेत...? हिम्मत आहे का बाहेर येउन अतिरेक्यांच्या समोर जायची....?

बरेचसे नेते घरीच आहेत...(आणि घरीच बरे..नाहीतर त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस धावायचे..)

खादाडमाऊ

स्वाती दिनेश's picture

27 Nov 2008 - 1:07 pm | स्वाती दिनेश

काल बीबीसी वर एकदम हिंदी अक्षरे दिसायला लागली म्हणून कुतुहलाने पाहिले तर बातमी ताज,ओबेरॉयवरच्या हल्ल्यासंदर्भातच होती, क्षणभर समजलेच नाही.हल्ल्याचे स्वरुप समजले आणि संताप झाला.. मुंबईकर मिपाकर सुखरुप आहेत ना? असा विचारही लगेचच मनात आला पण जी हानी तेथे निरपराध लोकांना आणि पोलिस अधिकार्‍यांना मृत्यूचे द्यावे लागलेले मोल पाहून सुन्न व्हायला
झाले.
स्वाती

अप्पासाहेब's picture

27 Nov 2008 - 2:26 pm | अप्पासाहेब

अफज्ल गुरु च्या फाशी बद्द्ल फार बोलले जाते, प्रत्यक्षात परिस्थीती जरा वेगळी आणि जोखमीची आहे. फाशी काय आत्ता ह्या क्षणी देता येइल , पण एका फार मोठ्या आंतर राष्ट्रीय दबावा मुळे हे करता येत नाही, अफज्ल गुरु च्या फाशीने काही फार मोठे गंभिर प्रश्न निर्माण होतील ह्याची बहुतेकांना कल्पना नाही.

अन्यथा माजी राष्ट्र्पती कलाम आणि आत्ताच्या प्रतिभाताइ अश्या व्यक्ती तोंडात मिठाची गुळणी धरुन बसणार नाहीत. त्यांना गप्प बसावे लागत आहे.

नेताजी सुभाष हयात असुन, त्यांचे वास्तव्य कोठे आहे हे नेहरु , शास्त्री , इंदिरा , मोरारजी यांना माहीत होतेच पण ते जाहीर करणे म्हणजे नेताजींना फाशीच्या तख्तावर चढवणे होते, त्याच्या मागचे कारण नेताजींनी केलेली हिट्लर व जपान्यांशी केलेली हात मिळ्वणी त्यांना युध्द गुन्हेगार ठरवते व स्वातंत्र्या साठी ब्रिटीशांशी केलेल्या करारा नुसार असा गुन्हेगार ब्रिटन कडे सोपवणे भाग पड्ले असते.

लै मिसळ खाल्ली कि मुळव्याध होते

जैनाचं कार्ट's picture

27 Nov 2008 - 2:43 pm | जैनाचं कार्ट (not verified)

अफज्ल गुरु च्या फाशीने काही फार मोठे गंभिर प्रश्न निर्माण होतील ह्याची बहुतेकांना कल्पना नाही.

=))

फालतु विधाने नका करु !
जर योग्य पध्दतीने मुद्दा मांडा !!!
काय परिणाम होतील त्या **डेच्याला फाशी दिली तर ?

जैनाचं कार्ट
देहि शिवा वर मोहि इहै...
शुभ करमन ते कबहूं न टरूं...
न डरूं अरि सौं जब जाई लरूं...
निसचै कर अपनी जीत करूं...

आपले संकेतस्थळ

धमाल मुलगा's picture

27 Nov 2008 - 2:52 pm | धमाल मुलगा

पण निदान एन्काऊंटर तरी करा साल्याचं! सांगा, पळुन जात होता, घातल्या गोळ्या!
तेही नसेल जमत तर दुसर्‍या एखाद्या कैद्याला फितवून (पैसे/शिक्षेत सवलत इ.इ.) त्याच्याकरवि मारा त्याला...सांगा कैद्यांच्या अंतर्गत हाणामारीत अकस्मात मृत्यू!

काय च्यायला, कसले बोडक्याचे प्रश्न निर्माण होतील हो?
उभ्या जगात....उभ्या जगात एकतरी देश असा दाखवा की जो स्वतःवर असा हल्ला झालानंतरही आपल्यासारखं दुसर्‍याच्या दारचं कुत्रं भुंकेल म्हणुन आपलीच गळचेपी करुन घेतो!

मालक, मतांचं राजकारण आहे सगळं. अफजलला फाशी दिली तर तेच फिस्कटेल हो.
एक पक्ष 'अफजल अल्पसंख्याक आहे त्याला आम्ही समजुन घेण्याचा प्रयत्न करतोय, शक्य ती मदत करु' म्हणत मतांचा जोगवा मागतो तर दुसरा पक्ष 'अजुन अफजल जिवंत का?' असं विचारुन भडकलेल्या भावना मतांमध्ये परिवर्तित करण्याचा प्रयत्न करतोय.
तिसरे म्हणजे काश्मिरातले स्वयंघोषित राजकारणी आणि मानवाधिकारवाले! त्यांनाही अफजलमुळे स्थानिक लोकभावनांचा मलिदा मिळतोय ना!

गंगेचं गटार झालंय हेच खरं!

वेताळ's picture

27 Nov 2008 - 5:41 pm | वेताळ

पण एका फार मोठ्या आंतर राष्ट्रीय दबावा मुळे हे करता येत नाही, अफज्ल गुरु च्या फाशीने काही फार मोठे गंभिर प्रश्न निर्माण होतील ह्याची बहुतेकांना कल्पना नाही.

काय सांगता काय राव. आईशप्पथ आम्हाला काहिच माहित नव्हतं.शिवराज पाटिल आणि तुम्ही एका गावचे काय?
लै मिसळ खाल्ली कि मुळव्याध होते
तो बरा करण्याचं देशी जबरा औशीद हाय आपल्याकडं
वेताळ

ANIMANI's picture

27 Nov 2008 - 2:51 pm | ANIMANI

Appsaheb,
there is no comparison between a terrorist and our national heroes.
you r insulting our history by comparing them.
I am fully agreed with Jainache Kart.

विकि's picture

27 Nov 2008 - 2:59 pm | विकि

शासनाच्या नाकर्तेपणामुळे व गुप्तचर विभागाच्या अपयशामुळे झालेल्या या हल्ल्यानिमित्त तातडीने राज्यसरकारने राजीनामा द्यायला हवा.राज्यात राष्ट्रपती लागवट त्वरीत लागू करायला हवी.

यशोधरा's picture

27 Nov 2008 - 3:30 pm | यशोधरा

रे हिंदबांधवा, थांब या स्थळी, दोन अश्रू ढाळी..

आपल्या शहीद पोलिस अधिकार्‍यांना अभिवादन म्हणून एक मेणबत्ती पेटवाल?

http://features.ibnlive.in.com/packages/mumbai-attack-light-a-candle.php

शंकरराव's picture

27 Nov 2008 - 3:32 pm | शंकरराव

नेताजी सुभाष हयात असुन, त्यांचे वास्तव्य कोठे आहे हे नेहरु , शास्त्री , इंदिरा , मोरारजी यांना माहीत होतेच पण ते ....

अप्पासाहेबांनी चांजलाच जावईशोध लावला बॉ

अन्यथा माजी राष्ट्र्पती कलाम आणि आत्ताच्या प्रतिभाताइ अश्या व्यक्ती तोंडात मिठाची गुळणी धरुन बसणार नाहीत. त्यांना गप्प बसावे लागत आहे...

आता आप्पासाहेबानी तोंडात मिठाची गुळणी न धरता त्या एका फार मोठ्या आंतर राष्ट्रीय दबावा बद्द्ल लिहवे.

जैनाचं कार्ट यांच्याशी सहमत

अतिरेकी हे मनोरुग्न असतात
मनोरुग्नांना व्याधि अनेक

शंकरराव

वल्लरी's picture

27 Nov 2008 - 4:41 pm | वल्लरी

अगदी बधीर व्हायला झाले आहे...
काय लिहावे ते पण सुचत नाही आहे..काल पासुन न्युज बघते आहे अगदी सुन्न होऊन..
परमेश्वर करो नी सगळे सुरळीत होवो...

वल्लरी's picture

27 Nov 2008 - 4:41 pm | वल्लरी

अगदी बधीर व्हायला झाले आहे...
काय लिहावे ते पण सुचत नाही आहे..काल पासुन न्युज बघते आहे अगदी सुन्न होऊन..
परमेश्वर करो नी सगळे सुरळीत होवो...

मेणबत्त्या पेटवण्यापेक्षा खरच जर श्रद्धांजली द्यायची मनापासुन इच्छा असेल तर आपली मन आणि मनगटे पेटवा.
उगिच फालतु अमेरिकन नाटक इथे नको.
मेणबत्त्या पेटवण्याचा फायदा एकच .त्या मेणबत्तीचे उत्पादन करणार्‍यांचा धंदा तेजीत येतो.
"अनामिका"

यशोधरा's picture

27 Nov 2008 - 5:27 pm | यशोधरा

अनामिका, तुमच्या भावना कळतात, पण म्हणून इतरांच्या भावनांना अमेरिकन नाटक म्हणून कृपया हिणवू नका. :(

अनामिका's picture

27 Nov 2008 - 6:01 pm | अनामिका

यशोधरा इथे कुणाच्या भावना दुखावण्याचा अथवा कुणालाही हिणवण्याचा प्रश्न नाही .
श्रद्धांजलीच द्यायची ना तर ती देवापुढे हात जोडुन निर्मळ मनाने देखिल देता येतेच की त्यासाठी मेणबत्त्याच कशाला हव्यात पेटवायला?
आयबीएन आल्यापासुन हा तमाशा जास्तच वाढू लागलाय.आज मेणबत्त्या पेटवायच्या आणि उद्या याच शहिदांची नाव आठवण्याचे कष्ट घ्यायचे.आपण सर्वसामान्य फक्त हृदयातुन विचार करतो पण या माध्यमांना आपला टिआरपी वाढवण्याशी मतलब असतो.
तुम्ही दुखावला गेला असाल तर क्षमा करा.
"अनामिका"

जैनाचं कार्ट's picture

27 Nov 2008 - 6:04 pm | जैनाचं कार्ट (not verified)

सहमत अनामिका !

जैनाचं कार्ट
देहि शिवा वर मोहि इहै...
शुभ करमन ते कबहूं न टरूं...
न डरूं अरि सौं जब जाई लरूं...
निसचै कर अपनी जीत करूं...

आपले संकेतस्थळ

तुम्ही तुमच्या घरावर काळा झेंडा लावा निषेध म्हणुन. ते योग्य आहे.
वेताळ