मुंबईत गोळीबार/बॉम्बस्फोट..! (कृपया विकासने सुरु केलेल्या दुसर्‍या धाग्यावर प्रतिसाद देऊन सहकार्य करावे!)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
26 Nov 2008 - 11:44 pm
गाभा: 

आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार मुंबईत ताज हॉटेलच्या परिसरात गोळीबार सुरू आहे...

हा अतिरेकी हल्ला असल्याचे समजते व अद्यापही पोलिस आणि अतिरेकी यांच्यात ताज परिसरात प्रचंड गोळीबार सुरू आहे..

नरीमन पॉईंट येथील ओबेरॉय हॉटेलात व ताजमध्ये अद्यापही अतिरेकी लपल्याची खबर आहे व तिथेही प्रचंड गोळीबात सुरू आहे...

सी एस टी, कामा रुग्णालय आणि विलेपार्ले येथे बॉम्बस्फोट झाले आहेत व जखमींची व मृतांची संख्या ३० च्या वर आहे...

महाराष्ट्रात हाय ऍलर्ट लागू झाले असून मुंबईत कमांडो ऍक्शन सुरू आहे...

या अतिरेकी हल्ल्यात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लौकरात लौकर सुधारणा होवो हीच इच्छा. या हल्ल्यात बळी पडलेल्या सर्वसामान्य नागरीकांना मिपा परिवाराची विनम्र आदरांजली..

तसेच या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना मिपा परिवाराची मानवंदना..

तात्या.

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

26 Nov 2008 - 11:59 pm | यशोधरा

आत्ताच बातमी समजली.. :( फारच भयानक आणि चीड आणण्याजोगे आहे हे सगळे!
मुंबईकर मिपावासी ठीक आहेत ना?

मुक्तसुनीत's picture

27 Nov 2008 - 12:00 am | मुक्तसुनीत

मुंबईकर मिपावासी ठीक आहेत ना?
हेच म्हणतो !

धनंजय's picture

27 Nov 2008 - 1:33 am | धनंजय

मुंबईकर मिपावासी ठीक आहेत ना?

संदीप चित्रे's picture

27 Nov 2008 - 1:48 am | संदीप चित्रे

सगळे ठीक आहेत ना?

प्रियाली's picture

27 Nov 2008 - 3:36 am | प्रियाली

लोकांचे देह कचर्‍यासारखे उचलून नेताना, रक्ताने वाहणार्‍या हाताला मलमपट्टी करण्याऐवजी त्यावर कॅमेरा रोखणार्‍यांना, ताज हॉटेल जळताना त्याचे रसभरीत वर्णन करताना पहावले नाही. :-(

भयंकर दुर्दैवी घटना.

चतुरंग's picture

27 Nov 2008 - 3:38 am | चतुरंग

सत्य परिस्थिती दाखवतानाही माध्यमांना तारतम्य बाळगायला हवे हे नक्की!!

चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Nov 2008 - 3:49 am | बिपिन कार्यकर्ते

काही कारणामुळे मला टीव्हीवर फक्त हिंदी न्यूज चॅनल्सच दिसत आहेत. अतिशय घृणास्पद कव्हरेज आणि भाषा. चीप. आता नेटवर आय.बी.एन. लोकमत आणि एन.डी.टी.व्ही दिसते आहे. खूपच बरे आहे. पूर्ण ठीक नाहीच.

दहशतवादी कुलाबा कॉजवेच्या शेवटी पोचले आहेत. 'बूटलेगर्स' च्या बाहेर चकमक चालू झाली. ४ पोलिस शहीद.

बिपिन कार्यकर्ते

वाटाड्या...'s picture

27 Nov 2008 - 12:00 am | वाटाड्या...

तात्या व मिपा सदस्यांनी काळजी घ्यावी व आपापली ख्याली खुशाली कळवावी....
च्यामारी इथ जग महागाई आणि मंदी आणि कशाकशान रोज मरतय अन ह्या लोकाना दहशतवाद सुचतो...तात्यांच्या शब्दात अंमळ **** च आहेत...:)

मुकुल

भाग्यश्री's picture

27 Nov 2008 - 12:03 am | भाग्यश्री

2 नायजेरीयन लोकं घुसले म्हणे एके४७ घेऊन.. आपली लोकं झोपलेली असतात काय ?? असे कसे घुसुन गोळीबार करतात?
बरंच काय काय होतंय.. सीएस्टी,ताज हॉटेल च्या आसपास गोळीबार.. पार्ल्यात बाँबस्फोट.. रीगल थिएटर,ओबेरॉय हॉटेल मधे आग..
:(

मुंबईकर मिपाकरांनी लवकर खुशाली कळवावी ..

http://idesitv.com/nepal.php इथे न्युज दिसत आहे..

छोटा डॉन's picture

27 Nov 2008 - 12:17 am | छोटा डॉन

इथे व्यवस्थीत आणि डिटेल कव्हरेज आहे ...
http://www.ndtv.com/convergence/ndtv/video/video_live.aspx?id=1

मुंबईकर मिपाकरांनी लवकर खुशाली कळवावी ..

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

कपिल काळे's picture

27 Nov 2008 - 12:07 am | कपिल काळे

मुंबईकर मिपा सदस्य सुखरुप आहेत ना?

झकासराव's picture

27 Nov 2008 - 12:08 am | झकासराव

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3761446.cms

हेच बघत होतो आता. :(
मुंबई वासी आपली खुशाली कळवा रे.

................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

अजूनही माझ्या अंगाला किंचित कंप आहे! X(
फारच उद्वेगजनक घटना आहेत.
(मृतांबद्दल शोक वाटतो. जखमींना लवकर आराम पडो ही प्रार्थना. अधिक कोणी बळी पडू नये ही इच्छा.)

चतुरंग

पिवळा डांबिस's picture

27 Nov 2008 - 12:43 am | पिवळा डांबिस

मुंबयवासी मिपाकरांनो, काळजी घ्या रे!
प्रथम तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची सुरक्षितता जपा आणि मग तुमची खुशाली इथे कळवा...
-पिडां

कोलबेर's picture

27 Nov 2008 - 2:02 am | कोलबेर

अजूनही माझ्या अंगाला किंचित कंप आहे!
एटीएस च्या प्रमुखाला अतिरेक्यांनी कंठस्नान घातल्याचे ऐकले आणि क्षणभर बधीर झाल्यासारखे वाटले.

नंदन's picture

27 Nov 2008 - 4:18 am | नंदन

वाटले. मानसिक खच्चीकरणाचा एक डाव म्हणून करकरे, साळस्कर सारख्या अधिकार्‍यांना लक्ष्य करण्यात आले असावे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

घाटावरचे भट's picture

27 Nov 2008 - 4:25 am | घाटावरचे भट

करकरे किंवा साळसकर अतिरेक्यांचे लक्ष्य नव्हते. ते नंतरच्या गोळीबारात शहीद झाले. सकाळ मध्ये बातमी आहे की करकरे बाँबच्या (बहुधा ग्रेनेडच्या) स्फोटात जखमी झाले.

चित्रा's picture

27 Nov 2008 - 3:50 am | चित्रा

अतिशय दुर्दैवी घटना.
दरवेळी हेच लिहावे लागते, परिस्थितीत कसलाही बदल घडून येत नाही.
साधी माणसे बळी जातातच, यावेळी पोलिसही लक्ष्य बनले.
आपले सरकार नक्की काय करीत आहे?

टारझन's picture

27 Nov 2008 - 12:21 am | टारझन

देवा रे ... मुंबई सुरक्षित ठेव !!

- टारझन

शितल's picture

27 Nov 2008 - 12:24 am | शितल

बातम्या पहायचे धाडस ही होत नाही आहे.
:(
खुपच मानसिक त्रास होतो हे वाचुन, ऐकुन.

मी स्वतः परदेशात असल्याने सुखरूप आहे. पत्नी आणि मुलगी मुंबईला सुखरूप आहेत. सर्व हितचिंतक मि.पा. करांचे आभार..

१६ जणांचा जीव गेला. एक परदेशी महिला सुद्धा म्रुत्युमूखी पडली.. बरेच जखमी ..पर्यटनाचा ओघ कमी व्हावा हा उद्देश दिसतोय.

बाकीच्या मुंबईकर मिपाकरांनी लवकर खुशाली कळवावी .. सर्वजण सुखरूप रहावेत अशी देवाकडे प्रार्थना करतो.

खादाडमाऊ

फास्टरफेणे's picture

27 Nov 2008 - 12:36 am | फास्टरफेणे

वाहिन्यांचे बातमीदार आणि नागरिक मुक्तपणे अपघातस्थळी वावरत आहेत...अपघातस्थळ "सील" वगैरे करत नाहीत का?
तशातच आता नेते या ठिकाणांना भेटी द्यायला येतील, उगाच पोलीस यंत्रणांवरचा ताण कशाला वाढवतात ही मंडळी?

भाग्यश्री's picture

27 Nov 2008 - 12:39 am | भाग्यश्री

नाही नाही.. नेते कशाला येतील तिथे ( मरायला!) .. त्यांना आदेश मिळालेत म्हणे, जागा सोडू नकाचे.. इथे बाकीचे लोक ओळख पाळख नसताना धावतायत.. आणि नेत्यांच्या जिवाची काळजी घेणं चालू आहे..

संताप येतो असं स्फोट अन गोळीबार वाचलं की.. कधी संपणार हे सगळं?

http://bhagyashreee.blogspot.com/

फास्टरफेणे's picture

27 Nov 2008 - 12:54 am | फास्टरफेणे

रामदास कदम भेट देउन गेले...(साध्य काय कुणास ठाउक!)

प्राजु's picture

27 Nov 2008 - 2:55 am | प्राजु

रूग्णांना बंधक बनवले आहे अतिरेक्यांनी..
याला काय म्हणायचं??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

यशोधरा's picture

27 Nov 2008 - 12:41 am | यशोधरा

खरय गं भाग्यश्री..

प्राजु's picture

27 Nov 2008 - 12:42 am | प्राजु

तेव्हा.. खूप भिती वाटली. जपून रहा..
संताप होतो आहे जीवाचा..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सर्किट's picture

27 Nov 2008 - 12:58 am | सर्किट (not verified)

पंतप्रधानांनी घटनेची निंदा केली आहे.

सरकारची जबाबदारी संपली.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

भास्कर केन्डे's picture

27 Nov 2008 - 1:03 am | भास्कर केन्डे

देवा, मुंबईचे अन माझ्या भारताचे या अतिरेक्यांपासून अन दुश्मनांपासून रक्षण कर रे!

मुंबईकर मिपाबंधु-भगिनिंनो... सुखरुप असल्याचे कळवा हो लवकर.

आपला,
(चिंतीत) भास्कर
आम्ही येथे वसतो.

अनामिका's picture

27 Nov 2008 - 1:04 am | अनामिका

रोज मरे त्याला कोण रडे "
हे आता रोजचेच होणार आहे का?कधी थांबणार हे दुष्टचक्र?अजुन किती निरपराधांचे बळी घेणार हे दहशतवादी
मिपाकर आणि त्यांचे आप्त व समस्त मुंबईकर काळजी घ्या बाबांनो रात्र वैर्‍याची आहे.आपली खुशाली कळवत रहा.
विलेपार्ले येथे झालेला स्फोट भयंकर होता .असे आताच माझ्या वहिनीने फोन करुन सांगितले .ती बिचारी घरात सुद्धा त्या आवाजाने कोसळली.
विधानभवनाजवळ देखिल गोळीबार सुरु आहे असे समजते?मुख्यमंत्री बिळात जाऊन बसले असतिल?
"अनामिका"

लिखाळ's picture

27 Nov 2008 - 1:17 am | लिखाळ

बापरे.. अघटित..
शब्द नाहीत...
-- लिखाळ.

घाटावरचे भट's picture

27 Nov 2008 - 1:24 am | घाटावरचे भट

टाईम्स मधे ८० लोक मृत आणि २५० जखमी झाल्याचं सांगितलंय. भयानक आहे हे. आणि आता हे एटीएस वाले काय करत होते?

कपिल काळे's picture

27 Nov 2008 - 1:36 am | कपिल काळे

एटीएस चे लोक साध्वीच्या पाठी आहेत. चॅनेल्सवाल्यांना मुलाखती देण्यापुढे वेळ कुठे त्यांना?

चतुरंग's picture

27 Nov 2008 - 1:44 am | चतुरंग

प्रचंड लोकसंख्येला आणि भीतीला तोंड देताना नियंत्रण ठेवणे अवघड असते. टीका करु नका.

आताच समजलेल्या बातमीनुसार ए.टी.एस. चे एक अँटी टेररिस्ट स्पेशलिस्ट विजय सालसकर आणि प्रमुख हेमंत करकरे हे दोघेही मृत्यूमुखी पडलेले आहेत!! पोलिसांच्या मनोधर्याची कल्पना करा त्यांना ह्या वेळी धीराची आणि मदतीची गरज आहे!!!

चतुरंग

घाटावरचे भट's picture

27 Nov 2008 - 2:17 am | घाटावरचे भट

>>आताच समजलेल्या बातमीनुसार ए.टी.एस. चे एक अँटी टेररिस्ट स्पेशलिस्ट विजय सालसकर आणि प्रमुख हेमंत करकरे हे दोघेही मृत्यूमुखी पडलेले आहेत!! पोलिसांच्या मनोधर्याची कल्पना करा त्यांना ह्या वेळी धीराची आणि मदतीची गरज आहे!!!

हे मला ठाऊक नव्हतं. क्षमस्व.

कपिल काळे's picture

27 Nov 2008 - 2:59 am | कपिल काळे

हो ते करकरे ए टी एस वाले , कामटे आणि साळसकर मारले गेले.

त्यांच्या आत्म्याला शांती मिळो

यशोधरा's picture

27 Nov 2008 - 1:50 am | यशोधरा

अजून एक अधिकारी अशोक कामतेही शहीद...

आता तरी राजकारण्यांना अक्कल येणार आहे का?? X(

मृदुला's picture

27 Nov 2008 - 1:48 am | मृदुला

बातमी मिपावरच समजली. आधी काही एप्रिल फूल प्रकार असावा असे वाटले. पण खरीच बातमी आहे हे कळल्यावर अवाक झाले आहे.

अशोक कामटे, विजय सालसकर.. यांनाही मारलं..
नक्की.. काय? मुंबई पोलिसांना धडा शिकवायचा उद्देश होता का आतंकवाद्यांचा?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अशोक कामटे, विजय सालसकर.. यांनाही मारलं..
नक्की.. काय? मुंबई पोलिसांना धडा शिकवायचा उद्देश होता का आतंकवाद्यांचा?

डेक्कन मुजाहिद्दिन ने.. जबाबदारी घेतली आहे.. ७८ मृत्यू..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

हा हल्ला आहे!
ताज हॉटेलच्या सर्वात जुन्या अशा हेरिटेज विंगमधे स्फोटामुळे मोठी आग लागलेली आहे.
अतिरेकी हे ताज आणि ओबेरॉयमधे अजूनही आहेत आणि ए.टी.एस. व कमांडोज दोन्ही ठिकाणी घुसले आहेत.
ट्रायडंट हॉटेलमधे लष्कराचे जवानही आले आहेत.
जवळजवळ युद्धसदृश परिस्थिती आहे!!

चतुरंग

सर्किट's picture

27 Nov 2008 - 2:13 am | सर्किट (not verified)

रात्री सव्वा वाजता दिल्लीहून २०० कमांडोंचे एक विमान मुंबईला रवाना झाले. रात्री अडीचला ते मुंबईला पोहोचेल, आणि ताज, ओबेरॉय, कामा इस्पितळ येथील ओलीसांना सोडवण्याचा प्रयत्न करेल.

असे शिवराजजींनी सांगितले. मात्र शिवराजजी अतिरेक्यांना "दीज पर्सन्स" असे संबोधत होते. अद्यापही हे लोक अतिरेकी आहेत, ह्याची जाणीव शिवराजजींना झालेली दिसत नाही.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

चतुरंग's picture

27 Nov 2008 - 2:17 am | चतुरंग

आवाज थरथरत होता त्यांचा बोलताना.
सरदार पटेलांचा आत्मा तळमळला असेल!!

चतुरंग

कपिल काळे's picture

27 Nov 2008 - 3:01 am | कपिल काळे

चापून चोपून भांग.
ह्यातून वेळ मिळाला तर ते काही कारवाइ करतील.... आता दिले की कमांडो पाठवून

अतिरेक्यानी विजय साळस्कर, अशोक कामते, हेमंत करकरे अशा अधिकार्‍यानाही कंठस्नान घातले आहे. अतिरेकी सरळ सरळ थुंकले आहेत आपल्या तोंडावर असे वाटते आहे. अशा जगण्यापेक्षा मरण बरे..
पुण्याचे पेशवे

लष्कर आणि नौदलाला सज्ज रहाण्याचे आदेश आहेत!!

चतुरंग

ईंटेलिजन्स डिपार्टमेंट काय करत होतं असं विचारून त्यांची झोप मोड करायची इच्छा नाही.

यावेळीही आपण निषेध, खेद व्यक्त करण्यापलिकडे काय करणार आहोत? फार उत्सुकता आहे.

यशोधरा's picture

27 Nov 2008 - 2:15 am | यशोधरा

त्या शिवराज पाटलांनाच द्यायला हवे "दीज पर्सन्स" च्या ताब्यात आधी! किती कणाहीन मंत्री! :(

कोलबेर's picture

27 Nov 2008 - 2:17 am | कोलबेर

वाहिन्यांवरुन अतिरेक्यांची इमेल वाचली जात आहे. १९४७ साली राज्ये हडपली त्याचा सूड घेत आहोत असले असंबद्ध इमेल पाठवले आहे.

भाग्यश्री's picture

27 Nov 2008 - 2:17 am | भाग्यश्री

सारखे हल्ले होत असतात मुंबईत.. मग आधीपासून या यंत्रणा,सुरक्षा व्यवस्था का नाहीत आपल्याकडे..
मला पोलिसांच्या धैर्याचं कौतुक आहे. पण नंतर धावाधाव का नेहेमी.. आधी पासून नाही का काही करता येणार..

मटात त्या नायजेरीयन हल्लेखोराचा फोटो पण आहे. म्हणजे आपले रिपोर्ट्स जास्त धाडशी म्हणायचे पोलिसांपेक्षा..
आत्ताच सिएनेन वर वाचलं, की अन-ऑफिशिअल न्युज आहे की त्या लोकांनी परदेशी लोकांना ओलिस ठेवलेच आहे. प्लस अमेरिकन्,ब्रिटीश पासपोर्ट्स असलेल्या लोकांची माहीती मागितली आहे..
एटीसचे अधिकारी, पोलिस यांचा मृत्यु.. :(
काही कळत नाहीए.. इथे बसून नुस्ता जिवाला घोर लागलाय.. तिथल्या लोकांची काय परिस्थिती असेल.. किती टेन्शन... युद्धच वाटतेय खरंच!

प्राजु's picture

27 Nov 2008 - 2:18 am | प्राजु

मेरीऑट हॉटेल मध्येही स्फोटामुळे आग लागल्याची शंका. तिथेही अतिरेकी असण्याची शक्यता..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Nov 2008 - 2:20 am | बिपिन कार्यकर्ते

करकरे आणि इतर ज्येष्ठ अधिकार्‍यांचे मृत्यू झाल्याचं ऐकून मला आयुष्यात पहिल्यांदा, शॉक बसून स्पीचलेस होणं म्हणजे काय हे कळलं... शब्दश:

अतिशय वाईट मनःस्थिती आहे.

आता शिवराज पाटिल साहेब किती वेळा कपडे बदलतात ते बघायचं. आपले तमाम मंत्री संत्री या लोकांना कसा हाग्या दम देतात ते बघायचं. उद्या सकाळी मुंबईकर कसे धावून आले त्याच्या गोड गोड आणि अलंकारिक भाषेतल्या बातम्या वाचायच्या. मग आंघोळ करून डबा घेऊन कामावर जायचं आणि मग सगळं कसं शांत होईल, मन हलकं होईल.... पुढच्या हल्ल्यापर्यंत.

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

27 Nov 2008 - 2:23 am | चतुरंग

अक्षरशः खरं आहे रे बिपिनभौ!
माझा स्वतःचा सख्खा मेव्हणा आय्.पी.एस. होता आता तो आय्.ए. एस. आहे. भावना फार तीव्रतेने जाणू शकतो!!

चतुरंग

....... पुढच्या हल्ल्यापर्यं..."

माय पॉईंट एक्झाक्टली.. मी तेच म्हणालो वरती..

कपिल काळे's picture

27 Nov 2008 - 2:55 am | कपिल काळे

अश्या बातम्या उद्या येयेतील्.बिपिन ने एकदम बरोबर सांगितले

यशोधरा's picture

27 Nov 2008 - 2:21 am | यशोधरा

बिपिनदा :( :(

छोटा डॉन's picture

27 Nov 2008 - 2:30 am | छोटा डॉन

वर फ्लॅश दाखवत आहेत की "विश्वास नांगरे पाटील" जखमी ...
देव करो की त्यांना काही न होवो, ते सुरक्षीत रहावेत ही प्रार्थना ...

काय होते आहे तेच कळत नाही ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

दुहेरी मॅगझिन्स असलेल्या ए.के ४७ आहेत. त्यामुळे अखंडपणे गोळ्यांचा वर्षाव चालू ठेवता येतो. एकाआड एक बदलत रहायचे!!
ताज मधे आता एनकाऊंटर चालू आहे!!

चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Nov 2008 - 2:36 am | बिपिन कार्यकर्ते

करकरेंच्या छातीत तीन गोळ्या...

म्हणजे त्याना नीट ओळखून टार्गेट करून मारण्यात आलं आहे का? सांगता येत नाही. धक्का म्हणजे एवढे सिनिअर ऑफिसर्स शहीद झाले.

बिपिन कार्यकर्ते

सीनियर ऑफिसर्सना गोळ्याविरोधी जाकिटे का दिली जात नाहीत? अत्यंत सहज मनात येणारा हा विचार आहे!!

चतुरंग

यशोधरा's picture

27 Nov 2008 - 2:42 am | यशोधरा

http://idesitv.com/nepal.php वर अगोदर दाखवत होते तेह्वा ते जॅकेट्सदृश काही आणि हेल्मेट घालताना दाखवले होते.. मग ते जे काही घालतात ते बुलेट प्रूफ नसते का?

प्राजु's picture

27 Nov 2008 - 2:39 am | प्राजु

साधारण २०० लोकांना बाहेर आणलं ताज हॉटेल्च्या.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

यशोधरा's picture

27 Nov 2008 - 2:39 am | यशोधरा

लष्कर पोचलय...

कपिल काळे's picture

27 Nov 2008 - 2:57 am | कपिल काळे

शस्त्रास्त्राने भरलेली बोट सापडली गिरगावच्या समुद्रावर म्हणे..

अभिजीत's picture

27 Nov 2008 - 3:02 am | अभिजीत

विश्वास नांगरे-पाटील हेही जखमी झाल्याची बातमी आहे.
महाराष्ट्र पोलिसांचे एकसे एक मोहरे अगदी जीवावर उदार होउन लढताहेत.

हे एक मिनी युद्ध आहे. हे अतिरेकी अगदी प्रोफेशनल आहेत हे नक्की.

- अभिजीत

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Nov 2008 - 3:07 am | बिपिन कार्यकर्ते

लीडींग फ्रॉम फ्रंट

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

27 Nov 2008 - 3:09 am | चतुरंग

अजून शोध/एनकाऊंटर चालू!!

चतुरंग

विसोबा खेचर's picture

27 Nov 2008 - 3:23 am | विसोबा खेचर

आत्ता आम्ही तीनचार मित्र मुंबईला जे जे रुग्णालयात जायला निघालो आहोत. तिथे रक्ताची बरीच गरज आहे... जवळपासच्या मिपाकरांनी जेजे किंवा जीटीला रुग्णालयात रक्तदानाकरता पोहोचावे ही विनंती...

ठाणा-मुलुंड-डोंबिवलीची काही मंडळी ऑलरेडी तिथेच निघाली आहेत..

तात्या.

टुकुल's picture

27 Nov 2008 - 3:35 am | टुकुल

तात्या.... अशा वेळेला घरात बसुन टिव्ही न बघत बसता बाहेर मदत करायला निघालात. सलाम

जे काही होत आहे त्या बद्द्ल शब्द निघत नाही आहेत.
मुंबईकर, टुकुल.

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Nov 2008 - 3:39 am | llपुण्याचे पेशवेll

हेच म्हणतो तात्या. सलाम...
पुण्याचे पेशवे

कपिल काळे's picture

27 Nov 2008 - 3:40 am | कपिल काळे

घरातून बाहेर पडून नका असा सल्ला पोलिसांनी दिला असून देखील जातायत माणसं

मान गये..

अनंत छंदी's picture

27 Nov 2008 - 4:07 pm | अनंत छंदी

माझ्या मनात एक विचार आला आहे तो मी आपणा सर्वांसमोर मांडत आहे. अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सर्वांबद्दल आपल्या मनात आदराची भावना आहे. मात्र आता वेळ आहे ती प्रत्यक्ष कृती करण्याची, या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस वा अन्य खात्यातील कर्मचारी असोत की निरपराध नागरिक त्यांच्या कुटुंबियांना आणि जखमींच्या कुटुंबियांना अशावेळी कोरड्या सहानुभूतीपेक्षा प्रत्यक्ष मदतीची गरज असते त्या करिता आपण सर्व मिसळपाववरील सदस्यांनी यथाशक्ती एक निधी जमवावा व त्या गरजूंना शक्य असेल ती मदत करावी. आपण आपल्या मित्रमंडळींनाही या निधी संकलनात सहभागी करून घ्यावे. या कामी तात्या अभ्यंकर यांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती आहे. आपणा सर्वांचे मत मांडावे.