Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विसोबा खेचर on Wed, 11/26/2008 - 23:44
  • Log in or register to post comments
  • 23081 views

प्रतिक्रिया

Submitted by प्राजु on गुरुवार, 11/27/2008 - 02:18

Permalink

.......

मेरीऑट हॉटेल मध्येही स्फोटामुळे आग लागल्याची शंका. तिथेही अतिरेकी असण्याची शक्यता.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 11/27/2008 - 02:20

Permalink

स्पीचलेस...

करकरे आणि इतर ज्येष्ठ अधिकार्‍यांचे मृत्यू झाल्याचं ऐकून मला आयुष्यात पहिल्यांदा, शॉक बसून स्पीचलेस होणं म्हणजे काय हे कळलं... शब्दश: अतिशय वाईट मनःस्थिती आहे. आता शिवराज पाटिल साहेब किती वेळा कपडे बदलतात ते बघायचं. आपले तमाम मंत्री संत्री या लोकांना कसा हाग्या दम देतात ते बघायचं. उद्या सकाळी मुंबईकर कसे धावून आले त्याच्या गोड गोड आणि अलंकारिक भाषेतल्या बातम्या वाचायच्या. मग आंघोळ करून डबा घेऊन कामावर जायचं आणि मग सगळं कसं शांत होईल, मन हलकं होईल.... पुढच्या हल्ल्यापर्यंत. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 11/27/2008 - 02:23

In reply to स्पीचलेस... by बिपिन कार्यकर्ते

Permalink

स्पीचलेस....

अक्षरशः खरं आहे रे बिपिनभौ! माझा स्वतःचा सख्खा मेव्हणा आय्.पी.एस. होता आता तो आय्.ए. एस. आहे. भावना फार तीव्रतेने जाणू शकतो!! चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by एक on गुरुवार, 11/27/2008 - 02:25

In reply to स्पीचलेस... by बिपिन कार्यकर्ते

Permalink

"...उद्या सकाळी मुंबईकर कसे धावून आले त्याच्या गोड गोड आणि

....... पुढच्या हल्ल्यापर्यं..." माय पॉईंट एक्झाक्टली.. मी तेच म्हणालो वरती..
  • Log in or register to post comments

Submitted by कपिल काळे on गुरुवार, 11/27/2008 - 02:55

In reply to स्पीचलेस... by बिपिन कार्यकर्ते

Permalink

सलाम मुंबै

अश्या बातम्या उद्या येयेतील्.बिपिन ने एकदम बरोबर सांगितले
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 11/27/2008 - 02:21

Permalink

बिपिनदा

बिपिनदा :( :(
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on गुरुवार, 11/27/2008 - 02:30

Permalink

आय बी एन लोकमत

वर फ्लॅश दाखवत आहेत की "विश्वास नांगरे पाटील" जखमी ... देव करो की त्यांना काही न होवो, ते सुरक्षीत रहावेत ही प्रार्थना ... काय होते आहे तेच कळत नाही ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 11/27/2008 - 02:32

Permalink

अतिरेक्यांकडची शस्त्रे अत्यंत आधुनिक

दुहेरी मॅगझिन्स असलेल्या ए.के ४७ आहेत. त्यामुळे अखंडपणे गोळ्यांचा वर्षाव चालू ठेवता येतो. एकाआड एक बदलत रहायचे!! ताज मधे आता एनकाऊंटर चालू आहे!! चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 11/27/2008 - 02:36

In reply to अतिरेक्यांकडची शस्त्रे अत्यंत आधुनिक by चतुरंग

Permalink

करकरेंच्य

करकरेंच्या छातीत तीन गोळ्या... म्हणजे त्याना नीट ओळखून टार्गेट करून मारण्यात आलं आहे का? सांगता येत नाही. धक्का म्हणजे एवढे सिनिअर ऑफिसर्स शहीद झाले. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 11/27/2008 - 02:38

In reply to करकरेंच्य by बिपिन कार्यकर्ते

Permalink

मला नेहेमी आश्चर्य वाटत आलेलं आहे की एवढ्या

सीनियर ऑफिसर्सना गोळ्याविरोधी जाकिटे का दिली जात नाहीत? अत्यंत सहज मनात येणारा हा विचार आहे!! चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 11/27/2008 - 02:42

In reply to मला नेहेमी आश्चर्य वाटत आलेलं आहे की एवढ्या by चतुरंग

Permalink

http://idesitv.com/nepal.php

http://idesitv.com/nepal.php वर अगोदर दाखवत होते तेह्वा ते जॅकेट्सदृश काही आणि हेल्मेट घालताना दाखवले होते.. मग ते जे काही घालतात ते बुलेट प्रूफ नसते का?
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on गुरुवार, 11/27/2008 - 02:39

Permalink

साधारण २००

साधारण २०० लोकांना बाहेर आणलं ताज हॉटेल्च्या. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 11/27/2008 - 02:39

Permalink

लष्कर

लष्कर पोचलय...
  • Log in or register to post comments

Submitted by कपिल काळे on गुरुवार, 11/27/2008 - 02:57

Permalink

बोटीने आले

शस्त्रास्त्राने भरलेली बोट सापडली गिरगावच्या समुद्रावर म्हणे..
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजीत on गुरुवार, 11/27/2008 - 03:02

Permalink

विश्वास नांगरे-पाटील

विश्वास नांगरे-पाटील हेही जखमी झाल्याची बातमी आहे. महाराष्ट्र पोलिसांचे एकसे एक मोहरे अगदी जीवावर उदार होउन लढताहेत. हे एक मिनी युद्ध आहे. हे अतिरेकी अगदी प्रोफेशनल आहेत हे नक्की. - अभिजीत
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 11/27/2008 - 03:07

In reply to विश्वास नांगरे-पाटील by अभिजीत

Permalink

लीडींग

लीडींग फ्रॉम फ्रंट बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 11/27/2008 - 03:09

Permalink

२ अतिरेकी मारले, ९ पकडले!!

अजून शोध/एनकाऊंटर चालू!! चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 11/27/2008 - 03:23

Permalink

आत्ता

आत्ता आम्ही तीनचार मित्र मुंबईला जे जे रुग्णालयात जायला निघालो आहोत. तिथे रक्ताची बरीच गरज आहे... जवळपासच्या मिपाकरांनी जेजे किंवा जीटीला रुग्णालयात रक्तदानाकरता पोहोचावे ही विनंती... ठाणा-मुलुंड-डोंबिवलीची काही मंडळी ऑलरेडी तिथेच निघाली आहेत.. तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by टुकुल on गुरुवार, 11/27/2008 - 03:35

In reply to आत्ता by विसोबा खेचर

Permalink

तात्या.... __/\__

तात्या.... अशा वेळेला घरात बसुन टिव्ही न बघत बसता बाहेर मदत करायला निघालात. सलाम जे काही होत आहे त्या बद्द्ल शब्द निघत नाही आहेत. मुंबईकर, टुकुल.
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on गुरुवार, 11/27/2008 - 03:39

In reply to तात्या.... __/\__ by टुकुल

Permalink

+१

हेच म्हणतो तात्या. सलाम... पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

Submitted by कपिल काळे on गुरुवार, 11/27/2008 - 03:40

In reply to आत्ता by विसोबा खेचर

Permalink

मान गये..

घरातून बाहेर पडून नका असा सल्ला पोलिसांनी दिला असून देखील जातायत माणसं मान गये..
  • Log in or register to post comments

Submitted by अनंत छंदी on गुरुवार, 11/27/2008 - 16:07

Permalink

कृती करुया!

माझ्या मनात एक विचार आला आहे तो मी आपणा सर्वांसमोर मांडत आहे. अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सर्वांबद्दल आपल्या मनात आदराची भावना आहे. मात्र आता वेळ आहे ती प्रत्यक्ष कृती करण्याची, या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस वा अन्य खात्यातील कर्मचारी असोत की निरपराध नागरिक त्यांच्या कुटुंबियांना आणि जखमींच्या कुटुंबियांना अशावेळी कोरड्या सहानुभूतीपेक्षा प्रत्यक्ष मदतीची गरज असते त्या करिता आपण सर्व मिसळपाववरील सदस्यांनी यथाशक्ती एक निधी जमवावा व त्या गरजूंना शक्य असेल ती मदत करावी. आपण आपल्या मित्रमंडळींनाही या निधी संकलनात सहभागी करून घ्यावे. या कामी तात्या अभ्यंकर यांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती आहे. आपणा सर्वांचे मत मांडावे.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com