गाभा:
राम राम मंडळी,
आपण जर एखाद दोन दिवसांच्या सुट्टीवर, किंवा त्यापेक्षा अधिक सुट्टीवर जर कुठे गेलात तर त्या ठिकाणी आपण काय पाहिलं, काय खाल्लं, कोणते खाद्यपदार्थ त्या ठिकाणी विशेष मिळतात या विषयी येथे लिहा.
अर्थात, आपले प्रवासवर्णन अगदीच जर विस्तृत असेल तर त्या करता स्वतंत्र लेखनही अवश्य करता येईल.
परंतु नुकत्याच अनुभवलेल्या एखाद्या प्रवासाबद्दल किंवा खादाडीबद्दल जर कुणाला 'स्वीट ऍन्ड शॉर्ट' स्वरुपात काही लिहायचे असेल तर त्याकरता हे सदर वापरून त्याचे या ठिकाणी चांगले संकलनही होऊ शकेल असे वाटते! तुम्ही काय खाल्लं, कुठे खालं, चवीला कसं होतं हे सर्वांना सांगा आणि खादाडीचा आनंद द्विगुणित करा..
बराय मंडळी,
आपला,
तात्या.
--
मिसळ, बटाटवडे आणि भजी -
'ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले,
मला हे दत्तगुरू दिसले!" :)
प्रतिक्रिया
17 Sep 2007 - 2:53 pm | आजानुकर्ण
गुंडोपंत,
ज्याला जे हवे ते लिहिण्याची मिसळपावावर परवानगी आहे. त्यामुळे टीकाकार यांना लिहू द्या.
29 Dec 2009 - 6:24 pm | दशानन
विशाल कुलकर्णींचा धागा वाचला व अंमळ ह्या धाग्याची आठव झाली..
असो,
तात्या कुठे आहात तुम्ही.. तुमची आठवण येत आहे....
कोणी रागवणार नाही, दंगा करणार नाही, अवांतर करणार नाही तुम्ही जेथे असाल तेथून परत आपल्या मिपावर या ही विनंती.
©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©
17 Sep 2007 - 4:23 pm | गुंडोपंत
ठीक,
त्याच न्यायानं मलाही असावी ती परवानगी असे मी मानतो ;)
टीका करायला काहीच हरकत नाही, आम्हाला कौतुकच वाटेल.निंदकाचे घर असावे शेजारी,
पण उग्गाच जे हुळहुळतय तेच नि तेव्ह्ढच खाजवत बसायचं कारण नाही.
आपला
गुंडोपंत
18 Sep 2007 - 5:31 pm | प्रसाद गुमास्ते
तात्या,
"तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे | तुझे गीत गाण्यासाठी मिसळ खाऊ दे ! :)"
ह्याच्या जोडीला अजुन एक वाक्य सादर करतोय. आवड्ल्यास समावेश करा.
"जो आवडीने खाईल | त्यालाच देव मिसळ-पाव देईल ! ;)"
18 Sep 2007 - 7:46 pm | विसोबा खेचर
"जो आवडीने खाईल | त्यालाच देव मिसळ-पाव देईल ! ;)"
मस्त! :)
18 Sep 2007 - 8:12 pm | तर्री
गेले ५ हप्ते आम्ही विलायतेल वस्तव्य करुन रहिलो आहोत. हे ५ हप्ते जवळ्-जवळ ऊपास्मारीचे गेले.
तिकडे मोदकाच्या जेवणाच्या त्रुप्तिचे डेकर ऐकु येत आहेत्...........................आणि आम्ही येथे ब्रेड्-बटर खाऊन दिवस रेट्णे सुरु आहे.
अशा वेळी आळुचे फद्फदे ,सुरणाची भाजी , हे पदाथ॑ सुधद्दा पक्वान्ने बनुन स्वप्नी येतात.
मिसळ-बटाटवडे -भजी - बासुन्दी -पुरी -श्रीखण्ड -यान्चे डोहाळे लागले आहेत.............
मिसळ्-पाव्.......मदत करवी.......
18 Sep 2007 - 8:29 pm | ॐकार
लेबेनॉन आणि इजिप्त मध्ये मूळ असलेला आणि इस्रायल तसेच मध्यपूर्वेत पसरलेला वडापाव म्हणजे फलाफल.
थोडक्यात वर्णन असे:
पिता ब्रेड ( तळहाताइतका मोठा नरम ब्रेड दुपदरी) त्याचा तोंडाशी कापतात. त्यात कांदा, टॉमेटो, कोबी ( कच्ची किंवा उकडून) यांची कोशिंबीर ( म्हणे सलाद). सोबत ऑलिव्हची फळे. तिळाची पेस्ट. हुमुस*, हुमुसची भजी. वेगवेगळ्या चटण्या. लेटसची माने ( हे काय असते हे अजून मला कळले नाही).
साधारण १०-१२ शेकल्स ( इस्रायलचे चलन, १ शेकल = १० रु.) ला फलाफल मिळते. वडापाव पेक्षा नक्कीच महाग आहे. पण एक फलाफल खाल्ले की अर्धे-पाऊण जेवण झाल्यासारखे आहे. (हे मी माझ्या सुटणार्या पोटाकडे पाहून म्हणतो आहे, प्रमाण म्हणून तात्यांचे अथवा शंतनुरावांचे पोट ग्राह्य धरलेले नाही ;) )
मुंबईत आणि पुण्यात काही ठिकाणी फलाफल मिळत असल्याचे ऐकून आहे. परंतु चवीचा अंदाज नाही.
*हुमुस - हुमुस म्हणजे पांढर्या वाटाणा उकडून त्याला भरडून केलेली पेस्ट. त्यात चवीला तिखट मीठ आणि वरून घातलेले ऑलिव्हचे तेल ( कच्चेच, फोडणी नव्हे).
18 Sep 2007 - 9:15 pm | चित्रा
लेटसची माने - तुम्हाला पाने म्हणायचे असावे. लेटसही काहीशी कुरकुरीत (कचकचीत) लागणारी सॅलडची (कोशिंबिरीची) पाने असतात.
अवांतर -
याची बारीक कापून दाण्याचे कूट- मिरच्या वगैरे घालून आपल्या पद्धतीनेही कोशिंबीर चांगली लागते.
तसेच हमस मध्ये तिळाची पेस्ट , लिंबाचा रस आणि लसणीची पेस्टही
घालतात.
18 Sep 2007 - 9:34 pm | आजानुकर्ण
भूमध्य समुद्राच्या आसपासच्या प्रदेशातील अनेक गोड पदार्थ (अमेरिकेत) खाण्याचा योग आला आहे (त्यामुळे किती जेन्युईन-अस्सल आहे हे माहिती नाही आणि) . त्यांची नावे लक्षात नाही. पण खजुराच्या वापरामुळे यांचा गोडवा वेगळाच असतो हे लक्षात आहे.
त्यातला एक पदार्थ आठवला. आपल्या रव्याच्या शिर्यासारखा हा एक पदार्थ होता. रवा घालूनच केला होता (मी भोचकपणा करून वेटरला 'कसला आहे' हे विचारले होते.) पण त्यात टाकलेले वेगळ्या वासाचे तूप (हॉटेलात लावलेल्या उंटाच्या मूर्ती व तंबू बघून उगाचच सांडणीच्या दुधाचे तूप वापरतात का अशी शंका आली. सांडणीला इंग्रजीत काय म्हणतात ते लवकर न आठवल्याने वेटर वाचला.)
आणि खजूर यामुळे चव फारच वेगळी लागत होती. खजूरामुळे थोडा चिकटपणाही आला होता आणि चिक्की खाताना वाटते तसे थोडेसे वाटत होते. या पदार्थाचे नाव कोणाला माहिती आहे का?
18 Sep 2007 - 9:47 pm | ॐकार
नावाचा एक गोड पदार्थ ठाऊक आहे. तसे पाहता "यांच्या" गोड पदार्थांना मिठाई म्हणणे जीवावर येते. खाण्याचा बाबतीत भारतासारखा देश नाही.
चित्रा यांस,
लेटसची पानेच म्हणायचे होते. चुकून माने झाले. उकडलेल्या रताळ्यानंतर उकडलेले मासे खाल्ले की *एखाद स्वर चुकीचा लागतो ( प च्या ऐवजी म लागला )
अवांतर
*हिब्रूमध्ये १ ला एखाद म्हणतात. पाच ला खामेश.( ख चा उच्चार घसा खरवडताना होतो तसा) शत्रुघ्नची आठवण होते... खामोश.
18 Sep 2007 - 9:55 pm | आजानुकर्ण
येथे
शोधले असता तेच नाव सापडले. हाच तो तिथला प्रसिद्ध पदार्थ. धन्यवाद ॐकार. तू सांगितले नसतेस तर दातात अडकलेल्या पेरूच्या बीप्रमाणे हा प्रश्न मनात राहिला असता आणि झोप आली नसती. आता सुखाने झोपू शकतो. :)
19 Sep 2007 - 8:23 am | कोलबेर
.. (एका इजिप्शीयन मित्राकडे खाल्लेला) बकलावा आणि शिरा ह्यांच्यात काही साधर्म्य आढळले नाही हो.. बकलावा मात्र जाम आवडला होता!!
19 Sep 2007 - 1:33 pm | स्वाती दिनेश
मलाही बाकलावा आणि शिरा यात साम्य आढळले नाही,पण बाकलावा मात्र झकासच लागतो.
आणखी एक, अगदी बारीक शेवया सुतरफेणीसारख्या बारीक शेवयांचा गोलाकार करून त्यात बदाम्,पिस्त्यांचे काप भरतात्,ते देखील मस्त लागते,त्याचे नाव आठवत नाही,आता फ्रा.फु मधील 'त्या' हलवायाकडे जाऊन त्यालाच नाव विचारुन परत एकदा आणलेच पाहिजे,:)
स्वाती
19 Sep 2007 - 1:40 pm | बेसनलाडू
अगदी बारीक शेवया सुतरफेणीसारख्या बारीक शेवयांचा गोलाकार करून त्यात बदाम्,पिस्त्यांचे काप भरतात्,ते देखील मस्त लागते,त्याचे नाव आठवत नाही,आता फ्रा.फु मधील 'त्या' हलवायाकडे जाऊन त्यालाच नाव विचारुन परत एकदा आणलेच पाहिजे,:)
यात थोडे सुके खोबरे (कीस स्वरूपात) असते, असे वाटते. नुकताच हा पदार्थ कचेरीतील एका तुर्की सहकार्याच्या मुलाच्या लग्नानिमिताने खाण्यात आला. मस्तच! नाव येथे जरूर कळवा.
19 Sep 2007 - 1:57 pm | स्वाती दिनेश
हो,सुके खोबरेही होते त्यात्(डेसिकेटेड कोकोनट) लिहायला विसरले.
आणि तुर्की हलवायाकडूनच आणली होती ती मिठाई मी!
21 Sep 2007 - 3:02 pm | नंदन
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
21 Sep 2007 - 3:59 pm | स्वाती दिनेश
सुतरफेणी सारखे शेवयांचे गोलाकार केले होते आणि मधील खड्ड्यात बदामपिस्त्यांचे सारण भरले होते.
22 Sep 2007 - 12:03 am | बेसनलाडू
वरील चित्रात दाखवलेला पदार्थ 'तो' नाही :)
21 Sep 2007 - 6:22 am | चित्रा
तुम्ही म्हणता तो रवा/खजूराचा पदार्थ बकलावा नव्हे, बकलाव्यात अनेक पातळ पापुद्र्यांमध्ये (phyllo sheets) पिस्ते, अक्रोड आणि तसाच सुका मेवा बारीक चिरून भरलेला असतो आणि मधही, आणि ते बेक करून त्याचे आवरण आपल्याकडच्या खार्या बिस्कीटांप्रमाणे कुरकुरीत पण गोड केलेले असते. अमेरिकेत ह्या phyllo sheets मोठ्या दुकानांमध्ये विकत मिळतात. तुम्ही म्हणता त्या पदार्थाचा गूगलवर सर्च केला तर त्याला Ma'amool B' Tamer असे म्हणतात असे वाटते.
अवांतर रेसिपी - या phyllo शीटस मध्ये पालक बारीक चिरून/ रिकोटा चीज (काहीसे रवाळ दिसते - मावा -खवा यांसारखे)/ जायफळ (वासासाठी)/मीठ घालून मिश्रण भरून बेक केल्यास मस्त होते.
बकलावा असा दिसतो -
21 Sep 2007 - 1:17 pm | आजानुकर्ण
मग 'तो' पदार्थ कोणता? (परत पेरूची बी दातात अडकली!)
21 Sep 2007 - 7:40 pm | चित्रा
बहुतेक तुम्ही जे खाल्लेत ते हे असावे -
ही पहा पाककृती आणि छायाचित्र!
निघाली का पेरूची बी??
21 Sep 2007 - 8:41 pm | आजानुकर्ण
ओळखीचा वाटतो आहे.
:)
19 Sep 2007 - 8:16 am | कोलबेर
चीनमध्ये (निदान बेजींगमध्ये तरी) अतिशय चविष्ट बदक खायला मिळाले. एकदम लुसलुशीत बदक आणि सोबतीला 'सिंग टाओ' ही त्यांची लोकल बियर.
त्याचबरोबर बदकाची त्वचा खरपूस भाजून साखरेत बुडवुन खातात.. चव छानच होती पण मेद प्रमाण इतके होते की आगदी आपल्या साजुक तुपाची आठवण आली.
19 Sep 2007 - 8:35 am | विसोबा खेचर
चीनमध्ये (निदान बेजींगमध्ये तरी) अतिशय चविष्ट बदक खायला मिळाले. एकदम लुसलुशीत बदक आणि सोबतीला 'सिंग टाओ' ही त्यांची लोकल बियर.
वा! च्यामारी एक डाव गेलं पाहिजे बिजिंगला! :)
आपला,
(कोकणस्थ!) तात्या.
19 Sep 2007 - 8:44 am | कोलबेर
तात्या ह्या हाटेलात बदक खायला जा,
आणि जेवण झाल्यावर ही बदक मिठाई खायला विसरू नका :-)
19 Sep 2007 - 9:17 am | सर्किट (not verified)
कोलबेर,
पीकिंग डक च्या अमेरिकन आवृत्तिपेक्षा हे जर जास्त चविष्ट असेल, तर जॅक मा (अलिबाबा, याहू चीन) ला मेल पाठवतो. खरंच सांग.
- सर्किट
19 Sep 2007 - 9:19 am | सर्किट (not verified)
सिंघ टाऑ इथे पण मिळते. अगदी थाई (ठाई ठाई) रेस्तरॉ मध्ये. त्या व्यतिरीक्त काही मज्जा असेल तर सांग.
- सर्किट
19 Sep 2007 - 11:05 am | कोलबेर
तीन चार प्रकारच्या लोकल बियर्स दिसल्या.. सगळ्यांची चव मस्त होती!! आणि रस्त्यालगत टपरीवर पण बियर मिळते मजेत आस्वाद घेत रस्त्याने फिरा!! (कधी मेंफिस ला आलात तर 'बील स्ट्रीट' वर जाऊ..तिथे पण असे करता येते :-)
ही आणखि एक आठवली.. यानजींग बियर.. ही पण सर्वत्र भरपूर दिसते!!
19 Sep 2007 - 11:07 am | विसोबा खेचर
बाटली छान आहे! :)
आपला,
(निर्व्यसनी!) तात्या.
19 Sep 2007 - 8:44 am | सहज
>>मेद प्रमाण इतके होते की आगदी आपल्या साजुक तुपाची आठवण आली.
कोलबेर - किंग ऑफ लार्ड :-)
19 Sep 2007 - 1:37 pm | स्वाती दिनेश
लोकहो,बिअरचा खरा स्वाद घ्यायचा असेल तर जर्मनीला पर्याय नाही.बिअर हे जर्मनीचे नॅशनल ड्रिंक आहे आणि आमचा एक मित्र बिअरला 'लिक्विड ब्रेड्' (फ्लुसिग ब्रोट) म्हणतो.
19 Sep 2007 - 1:47 pm | सर्किट (not verified)
खरंच एकदा ऑक्टोबर फेस्ट मध्ये जर्मनीत यायचे आहे. कधी जमते ते बघू.
- सर्किट
19 Sep 2007 - 2:19 pm | सहज
जर्मनीतील प्रत्येक गावात (लोकल ब्रू)गणीक नवीन बियर मिळते. सहीच.
विविध बियरचे तितकेच खरे स्वाद बेल्जीयममधे पण.
ऑक्टोबर फेस्ट्मधे गर्दी ...नो थॅक्स..
तो पर्यंत बियरगार्टन मधील एक रम्य आठवण
19 Sep 2007 - 8:15 pm | धनंजय
या देशातल्या मस्तपैकी बियरपण आजमावा! माझ्या पलीकडच्या गल्लीत बेल्जियन पद्धतीने बियर बनवणार्या एका स्थानिक कंपनीची खानावळ आहे.
http://www.belgianbeer.com/
माझ्या मित्रांचा हा अड्डा - कधी आमच्या गावात आलात तर यांच्या बियरच्या तर्हा बघाल (पहिले बिल मी भरेनच, नाही आवडली तर शिवाय छिंगदाव ची बाटली देईन ही पैज!). आणि बटाट्यांच्या काचर्यांवर "रोझमेरी"नामक मसाला या एकाच ठिकाणी खाल्लेला आहे.
19 Sep 2007 - 2:00 pm | स्वाती दिनेश
हम्म.. मजा असते,२२ सप्टे. ते ७ ऑक्टोबर या वर्षीचा ऑक्टो. फेस्ट आहे..आणि त्यासाठी येणार असाल तर बुकिंग वेल इन ऍडवान्स करा हा अनाहुत सल्ला आधीच देते,
मजा येते त्या फेस्ट ला..धमालच असते.
स्वाती
19 Sep 2007 - 2:01 pm | स्वाती दिनेश
२००८ च्या फेस्टची बउकिंग्ज आत्ताच सुरू होतील
19 Sep 2007 - 3:12 pm | स्वाती दिनेश
कोकणातील राजापूर जवळच्या अडिवरे गावी महाकाली मंदिराच्या बाहेरच एक टपरी आहे,मालकाचे नाव शेटये आहे असे वाटते,त्याच्याकडची 'मिसळ' मस्तच असते..
स्वाती
19 Sep 2007 - 3:49 pm | तर्री
कोल्हापूरामधिल चोरगेन्ची मिसळ देखिल चविश्ट असते..........................
19 Sep 2007 - 3:56 pm | टीकाकार-१
पन्ढर्पूरला महाद्वारा जवळ द्क्शिण्मुखी हनुमाना शेजारी उमदे गल्लि आहे. त्या बोळातुन आत गेल कि १ बुक्क्यच दुकान आहे तिथुन उज्वि काडे वळायचे.
तिथे सार्वजनिक मुतारि शेजारि १ म्हातारा चुरमुरे विकतो. त्या चुर्मुर्याचा चिवडा खाउन बघा राव..
19 Sep 2007 - 3:59 pm | विसोबा खेचर
तिथे सार्वजनिक मुतारि शेजारि १ म्हातारा चुरमुरे विकतो. त्या चुर्मुर्याचा चिवडा खाउन बघा राव..
हा हा हा! चुरमुरे विकायची जागा बाकी नामीच आहे..:)
तात्या.
19 Sep 2007 - 4:12 pm | झकासराव
फडतरे मिसळ जबरा असते. :)
आणि मिसळ खावुन डोळ्यातुन पाणी आल की मग एक कॉर्पोरेशन जवळ लस्सी मारायची. :)
फक्त एकच प्रॉब्लेम आहे. ही दोन्ही ठिकाण लांब आहेत. :)
21 Sep 2007 - 3:41 pm | ध्रुव
फडतरे मिसळ जबरा असते. :)
हे बाकी खरं!!
पण ही मिसळ खाल्याने डोळ्यातुन पाणी नाही आले कधी.
ध्रुव
अवांतरः बाकी मिसळवरुन आठवले... आजच मित्रांशी पैज लावली आहे, जर भारत उद्या जिंकला तर माझ्याकडुन मिसळ. जर हारला तर तुमच्याकडुन. बघा कोण लावतय का पैज? (कोणीही लावा!! मला मिसळ खायल मिळेलच :) )
19 Sep 2007 - 7:31 pm | आवडाबाई
अर्थात ओन्ली पराठाज - आयनॉक्स च्या शेजारी
सही पराठे !! शिवाय, सोबत काला चना करी आणि काली दाल complimentary !! पराठ्यावरचं घी कुठे दिसत नसलं तरी खाताना जाणवतं. त्या शिवाय सर्व प्रकारच्या चाटदेखिल छानच असतात !!
एकुणात किंमत, ambience आणि सेवा सर्वांचा योग्य बॅलंस आहे.
21 Sep 2007 - 3:44 pm | ध्रुव
इकडेपण छान मिळतात पराठे
पराठे - नंदूज आणि चैतन्य (दोन्ही ठिकाणे पुणे)
ध्रुव
23 Sep 2007 - 2:01 pm | आवडाबाई
नंदूज - एक पराठा = एका वेळचं जेवण
चैतन्य - उत्तमच !!
20 Sep 2007 - 1:20 am | वाटाड्या...
मिनाक्षि चि मिसळ खाल्लि आहे का कुणि? पौड फाटयावर् सकाळि...गोटा साफ..:)
20 Sep 2007 - 9:00 am | विसोबा खेचर
हा हा हा!
'गोटा साफ होणे' हा वाक्प्रचार अतिशय आवडला...:))
21 Sep 2007 - 3:47 pm | ध्रुव
म्हणजे, ही मिसळ खाल्यावर पौड फाटयावर सकाळी गोटा साफ होतो की काय??? :)
ध्रुव
20 Sep 2007 - 9:18 am | सहज
एकदा एका संघ्याकाळी चायनीज मित्राने आम्हाला एके ठीकाणी खायला नेले. एक डीश ट्राय करायला दिली. एक तु़कडा खाल्ला मला तो जरा निबर व बेचव वाटला. मी म्हणालो काय आहे हे, उत्तर ऐकून उल्टी येइल असे वाटले पण नाही आली. पण काही दिवस नॉनवेजला शिवलो नाही. :-) एक फोटो (नेट वरून मिळवलेला) दाखवतो आहे, म्हणजे तसे काही संशयास्पद वाटले नाही ति डीश बघून.
ती होती पिग टंग - हो हो.. डूकराची जिभ
आता बंदी आहे पण मित्र म्हणाला की पूर्वी गोलाकार टेबलस (मधे एक भोक ) टेबल खाली माकडाला ठेवायचे की जेणे करून फक्त माकडाचे डोके त्या भोकातून वर येईल, ते डोके कापले जायचे व त्यातून ताजा मेंदू काढून मस्त पैकी स्टिम बोट बार्बेक्यू.........
कोणाला भूक लागली आहे का?
-------------------------------------------------------------------------------
ही पोस्ट वेगवेगळ्या मराठी संकेतस्थळांवर टाकून "अभिव्यक्तीस्वातंत्र्याची" लस टोचता येईल का? म्हणजे लहान मुलांना नाही का मोठेपणी होऊ नये म्हणून वेगवेगळ्या रोगांच्या लशी देतात तसे...
20 Sep 2007 - 10:37 am | अप्पासाहेब
कोणी खाल्ला आहे का? नाव ऐकुन कुतुहल वाट्ले पण शेवटी आपल्या 'उपमा/ उप्पीट' सारखा लागला.
21 Sep 2007 - 2:01 am | वाटाड्या...
ख्ररोखरच गोटा साफ होतो...त्यात जर सकाळि सकाळि खाण्याचा योग आला तर ..मजाच मजा...कायम चुर्ण चि गरजच नाहि ...
21 Sep 2007 - 1:16 pm | आजानुकर्ण
गोटा साफ होण्यासाठी हा पदार्थ 'सामान्यतः' रात्री खाणे आवश्यक आहे असे वाटते.
21 Sep 2007 - 7:13 am | सन्जोप राव
कराडला मेन रोडवर व्यंकटेश नावाची एक खानावळ आहे. मी कॉलेजला असताना तिथे पाच रुपयात झणझणीत चिकन मसाला आणि अमर्याद रस्सा मिळत असे. त्या रश्श्याच्या आठवणीने अद्यापि जठराग्नी खवळतो. चिकन खाणे अधूनमधून परवडत असले तरी रोट्या खाणे आवाक्याबाहेरचे असे. म्हणून आम्ही शेजारच्या बेकरीतून अर्धा पाव घेऊन जात असू. या पावाचे मोठमोठे लचके गरमागरम रश्श्यात बुडवून डोळ्याला पाणी येईल अशा घाईघाईने फस्त केले जायचे. सोबत कांदालिंबाच्या मोठमोठ्या फोडी. हा पाव हातातून नेणे कमीपणाचे वाटत असल्याने गळ्यातल्या शबनममध्ये - म्हणजे एका प्रकारच्या पिशवीत- टाकून घेऊन जायचो. हा 'काखोटीला मारलेला पाव' आणि ती चविष्ट कोंबडी अजून आठवते.
सन्जोप राव
21 Sep 2007 - 7:56 am | विसोबा खेचर
हा 'काखोटीला मारलेला पाव' आणि ती चविष्ट कोंबडी अजून आठवते.
वा! सुंदर आठवण..
तात्या.
21 Sep 2007 - 1:18 pm | जुना अभिजित
व्यंकटेश मिसळ कुठे आहे?
दत्त चौकातील गजानन मिसळ खाल्ली आहे का?
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
21 Sep 2007 - 4:54 pm | सन्जोप राव
'व्यंकटेश' मध्ये मिसळ मिळत नसे. फक्त जेवण. 'गजानन' ची मिसळ आणि उपवासाची मिसळही लाजवाब. त्या रस्त्याने तसेच पुढे मनोर्याकडे गेले की पुढच्या चौकात 'व्यंकटेश'. (चू. भू. दे. घे. कराड सोडून फार वर्षे झाली...)
सन्जोप राव
21 Sep 2007 - 5:11 pm | जुना अभिजित
मनोर्याच्या जरा पुढे आलं की चौकात बाँबे हॉटेलची आंबोळी मिळते.
आमचे पिताश्री अजूनही कराडमध्ये आलो की आम्हाला घेऊन जातात तिथे.
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
22 Sep 2007 - 7:18 am | सन्जोप राव
बॉम्बे हॉटेलमधील आंबोळीविषयीही लिहिणार होतो. ती आंबोळीच - मसाला डोसा नव्हे. कुरकुरीत आंबोळी, आतमध्ये पेरलेली कोरडी चटणी आणि लुसलुशीत भाजी... व्वा!
बॉम्बे हॉटेलमध्ये हात धुण्याचे एक अत्यंत लहान असे बेसिन होते. ते अजूनही तसेच आहे का?
सन्जोप राव
21 Sep 2007 - 1:11 pm | तर्री
नाशिक च्या "सायन्तारा" चा साबुदाणा वडा , "भगावन्तरावाची" जिलबी , तुशार ची मिसळ , मकाजी आणि कोन्डाजी चिवडा , जलाराम चा सामोसा , या पैकी काही कोणाच्या आठवणी ?.................मला तर ही "पन्चवटी " पेक्षा पवित्र.
27 Dec 2016 - 7:19 pm | vcdatrange
नाशिक रोडला राणा थालीपीठ नावानं साबुदाणा वडे, मुक्तीधाम शेजारी सम्राट वडापाव अन् पाववडा कँपात भगत(?) कडे साजुक तुपातला रगडा प्याटीस.....
21 Sep 2007 - 3:51 pm | ध्रुव
नेपालचा स्थानीक पदार्थ मोमो खाल्ला आहे का कोणी? आपल्या उकडीच्या मोदकासारखी उकड करुन त्यात चिकन खिम्याचे सारण घालायचे आणि करंजीचा आकार द्यायचा. हा पदार्थ,chicken bone marrow soup मध्ये बुडवून खातात.
ध्रुव
20 Oct 2011 - 5:31 pm | मन१
खाण्याचा इतका छान धागा सुटला कसा बुवा आमच्याकडून?