Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विसोबा खेचर on Mon, 09/17/2007 - 13:55
  • Log in or register to post comments
  • 69706 views

प्रतिक्रिया

Submitted by वाटाड्या... on Fri, 09/21/2007 - 02:01

Permalink

नमस्कार तात्या

ख्ररोखरच गोटा साफ होतो...त्यात जर सकाळि सकाळि खाण्याचा योग आला तर ..मजाच मजा...कायम चुर्ण चि गरजच नाहि ...
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Fri, 09/21/2007 - 13:16

In reply to नमस्कार तात्या by वाटाड्या...

Permalink

रात्री

गोटा साफ होण्यासाठी हा पदार्थ 'सामान्यतः' रात्री खाणे आवश्यक आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by सन्जोप राव on Fri, 09/21/2007 - 07:13

Permalink

काखोटीला मारलेला पाव

कराडला मेन रोडवर व्यंकटेश नावाची एक खानावळ आहे. मी कॉलेजला असताना तिथे पाच रुपयात झणझणीत चिकन मसाला आणि अमर्याद रस्सा मिळत असे. त्या रश्श्याच्या आठवणीने अद्यापि जठराग्नी खवळतो. चिकन खाणे अधूनमधून परवडत असले तरी रोट्या खाणे आवाक्याबाहेरचे असे. म्हणून आम्ही शेजारच्या बेकरीतून अर्धा पाव घेऊन जात असू. या पावाचे मोठमोठे लचके गरमागरम रश्श्यात बुडवून डोळ्याला पाणी येईल अशा घाईघाईने फस्त केले जायचे. सोबत कांदालिंबाच्या मोठमोठ्या फोडी. हा पाव हातातून नेणे कमीपणाचे वाटत असल्याने गळ्यातल्या शबनममध्ये - म्हणजे एका प्रकारच्या पिशवीत- टाकून घेऊन जायचो. हा 'काखोटीला मारलेला पाव' आणि ती चविष्ट कोंबडी अजून आठवते. सन्जोप राव
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 09/21/2007 - 07:56

In reply to काखोटीला मारलेला पाव by सन्जोप राव

Permalink

वा!

हा 'काखोटीला मारलेला पाव' आणि ती चविष्ट कोंबडी अजून आठवते. वा! सुंदर आठवण.. तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by जुना अभिजित on Fri, 09/21/2007 - 13:18

In reply to वा! by विसोबा खेचर

Permalink

कराडला कुठे आहे?

व्यंकटेश मिसळ कुठे आहे? दत्त चौकातील गजानन मिसळ खाल्ली आहे का? मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments

Submitted by सन्जोप राव on Fri, 09/21/2007 - 16:54

In reply to कराडला कुठे आहे? by जुना अभिजित

Permalink

मिसळ नाही

'व्यंकटेश' मध्ये मिसळ मिळत नसे. फक्त जेवण. 'गजानन' ची मिसळ आणि उपवासाची मिसळही लाजवाब. त्या रस्त्याने तसेच पुढे मनोर्‍याकडे गेले की पुढच्या चौकात 'व्यंकटेश'. (चू. भू. दे. घे. कराड सोडून फार वर्षे झाली...) सन्जोप राव
  • Log in or register to post comments

Submitted by जुना अभिजित on Fri, 09/21/2007 - 17:11

In reply to मिसळ नाही by सन्जोप राव

Permalink

मनोर्‍याच्या जरा पुढे

मनोर्‍याच्या जरा पुढे आलं की चौकात बाँबे हॉटेलची आंबोळी मिळते. आमचे पिताश्री अजूनही कराडमध्ये आलो की आम्हाला घेऊन जातात तिथे. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments

Submitted by सन्जोप राव on Sat, 09/22/2007 - 07:18

In reply to मनोर्‍याच्या जरा पुढे by जुना अभिजित

Permalink

अगदी

बॉम्बे हॉटेलमधील आंबोळीविषयीही लिहिणार होतो. ती आंबोळीच - मसाला डोसा नव्हे. कुरकुरीत आंबोळी, आतमध्ये पेरलेली कोरडी चटणी आणि लुसलुशीत भाजी... व्वा! बॉम्बे हॉटेलमध्ये हात धुण्याचे एक अत्यंत लहान असे बेसिन होते. ते अजूनही तसेच आहे का? सन्जोप राव
  • Log in or register to post comments

Submitted by तर्री on Fri, 09/21/2007 - 13:11

Permalink

नासिक.......

नाशिक च्या "सायन्तारा" चा साबुदाणा वडा , "भगावन्तरावाची" जिलबी , तुशार ची मिसळ , मकाजी आणि कोन्डाजी चिवडा , जलाराम चा सामोसा , या पैकी काही कोणाच्या आठवणी ?.................मला तर ही "पन्चवटी " पेक्षा पवित्र.
  • Log in or register to post comments

Submitted by vcdatrange on Tue, 12/27/2016 - 19:19

In reply to नासिक....... by तर्री

Permalink

थालीपीठ

नाशिक रोडला राणा थालीपीठ नावानं साबुदाणा वडे, मुक्तीधाम शेजारी सम्राट वडापाव अन् पाववडा कँपात भगत(?) कडे साजुक तुपातला रगडा प्याटीस.....
  • Log in or register to post comments

Submitted by ध्रुव on Fri, 09/21/2007 - 15:51

Permalink

मोमो

नेपालचा स्थानीक पदार्थ मोमो खाल्ला आहे का कोणी? आपल्या उकडीच्या मोदकासारखी उकड करुन त्यात चिकन खिम्याचे सारण घालायचे आणि करंजीचा आकार द्यायचा. हा पदार्थ,chicken bone marrow soup मध्ये बुडवून खातात. ध्रुव
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on गुरुवार, 10/20/2011 - 17:31

Permalink

व्व्व

खाण्याचा इतका छान धागा सुटला कसा बुवा आमच्याकडून?
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com