दुर्गंध वाहते
दुर्गंध वाहते मुठठा माई
तीरवरल्या कोणालाही, पर्वा तीचि नाही.
कुणी टाकि तित कचरा आता,
कुणी टाकिती पूज्यदेवता.
पाषाणाची पाहूनी ह्रुदये, पाहूनी ह्रुदये,
मोजित दिन राहीली.
दुर्गंध वाहते मुठठा माई
तीरवरल्या कोणालाही, पर्वा तीचि नाही.
सतत वाहते गढुळ पाणी,
कुणी नं धजतो उचलन्या घाणी.
आळ्शांस ही व्हावी कैसी मुठठा ही फलदायी ?
दुर्गंध वाहते मुठठा माई
तीरवरल्या कोणालाही, पर्वा तीचि नाही.
माडगुळकरांची माफी मागून बरका, त्यांच्या 'गीताची' छेड काढतोय........ (संथ वाहते कृष्णामाई)
दुर्गंध मानुन घ्या......... स्मायल्या स्मायल्या स्मायल्या.
प्रतिक्रिया
22 May 2015 - 9:46 pm | श्रीरंग_जोशी
काही वर्षांपूर्वी लोकसत्तेमधे महाराष्ट्रातील बर्याच नद्यांच्या दयनीय अवस्थेवर अभ्यासपूर्ण भाष्य करणारी लेखमालिका आली होती तीचे स्मरण झाले.
बाकी शहरांचे ठाऊक नाही पण पुण्यात गणपतीविसर्जन नदीच्या पाण्यात केले जात नाही या गोष्टींचे कौतुक वाटते.
23 May 2015 - 10:25 am | पैसा
विडंबन नाय ओ! भयानक परिस्थिती आहे. मुठाच काय, सगळीकडे हाच प्रकार आहे. फोंड्यातल्या 'नागझर्याचे' रूपांतर सांडपाण्याच्या नाल्यात झालेले प्रत्यक्षच पाहिले आहे.
23 May 2015 - 8:12 pm | गरजू पाटिल.
खरंच, वाईटंय अवस्था तिची...
बरं एक किस्सा
पुण्याची नसलेली लोकबी (पुण्याची लोकं लग्गी वळखू येत्यात) किती डँबिस असत्यात-
मागच्या गम्पतीच्या टायमाला, १का संस्थेबरोबर काम करताना आम्ही निर्माल्य गोळा करुन घेत होतो, १-२ घराणी देता देईनात, एका अजूबानी तर ते पाण्यात टाकायचं म्हात्म्य सांगिटलं, आम्ही धन्य होऊन ते गेल्यानंतर पुन्हा ते गोळा केलं.....
बाप्पाच म्हणाल तरं ५व्या अनं ७व्या दिसाच्या काही भणंग मुर्तीँ तेथेच पहूडुन अर्धांग ऊन्हं खात होत्या....
माझ्या डेक्सटोपात काही फोटो असतींल तर पाहतो.
23 May 2015 - 8:37 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
फोटो असतील तरी टाकु नका. भग्न गणराजाच्या मुर्ती डोक्यात जातात. दर वर्षी बघतोचं ते फोटो. देवाचं एक सोडा पण साधा पर्यावरणाचा मान राखायचं सुद्धा लोकांना भान रहात नाही.
23 May 2015 - 8:20 pm | गरजू पाटिल.
मी लहान असतांना एका नगरात एक मिठी नावाची नदी होती, नंतर तीचं गटार झालं, गटारी नदी. नंतर नाला... आणि आता तसं काही अस्तित्वातंच नव्हतं...
24 May 2015 - 4:58 am | स्पंदना
मग मुंबईची मिठी नदी तर आहे हेच आता विसरल गेलयं त्याच काय?
बाकिची घाण तर आहेच पण खरा दणका बसलाय या नद्यांना तो शेतातल्या युरीया आणि इतर फर्टीलायझर्सचा. या खतांमुळे अल्गे भरमसाठ वाढले पाण्यातुन. हिरव्या रंगाचा थर हे एक नदिच कायमच रुप होउन बसल.