भ्रष्टाचाराचा भस्मासूर

नांदेडीअन's picture
नांदेडीअन in काथ्याकूट
22 May 2015 - 3:54 pm
गाभा: 

सध्या बरेच लोक सांगत सुटले आहेत की गेल्या वर्षभरात एकही भ्रष्टाचार झाला नाही.
त्या सगळ्यांसाठी काही प्रश्न आहेत.
कृपया उत्तरं देऊन माझ्या माहितीत भर घालावी ही नम्र विनंती.

सुब्रमनिअन स्वामी राफेल विमान खरेदी प्रकरणामध्ये सरकारच्या विरोधात कोर्टात जातो म्हणाले होते.
असे का बरे ?

सामनामध्ये LED Scam बद्दल लिहून आले होते.
असे का बरे ?

राम जेठमलानी म्हणाले, "भ्रष्ट सरकार भ्रष्ट जजों की ही नियुक्ति करेगी ।"
असे का बरे ?

Chief Information Commissioner, Central Vigilance Commision , Lokayukta या जागांवर गेल्या वर्षभरात कुणाचीही नियुक्ती झाली नाही.
असे का बरे ?

माहिती अधिकारा अंतर्गत मागवलेली माहिती नाकारण्यात PMO ऑफिस सगळ्यात पुढे आहे.
असे का बरे ?

आजच एक नोटिफिकेशन काढले आहे केंद्र सरकारने.
त्यात लिहिले आहे की ’दिल्ली ऍंटी करप्शन ब्युरोने केंद्र सरकारमधल्या ऑफिसर किंवा कर्मचार्‍याच्या कोणत्याही गुन्ह्याचा तपास करू नये.
असे का बरे ?

भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणार्‍या अशोक खेमकांना पुरातत्व खात्यात म्युझिअम सांभाळायला पाठवले.
असे का बरे ?

AIIMS मधल्या भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढणार्‍या संजीव चतुर्वेदींचे ट्रान्सफर केल्या गेले.
असे का बरे ?

निवडणुकीपूर्वी लाखो-करोडो अब्ज असलेल्या काळ्या पैशातून एकही पैसा भारतात आला नाही.
असे का बरे ?

व्यापम घोटाळ्यातल्या सलग आठव्या साक्षिदाराचा संशयास्पद मृत्यू झाला.
असे का बरे ?

प्रतिक्रिया

अनुप ढेरे's picture

22 May 2015 - 4:28 pm | अनुप ढेरे

सीवीसी नेमायला कोर्टाने बंदी घातली होती जी आता उठवली आहे
http://www.firstpost.com/india/supreme-court-lifts-embargo-allows-centre...

बाकी रफॅलमध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून कोर्टात जातो असे स्वामी नाही म्हणाले. त्यांच्या मते ही विमानं भारतात निरुपयोगी आहेत. आता तुम्ही म्हणालच की यामागे भ्रष्टाचार असणारच तर त्यावर मी वाद घालू इच्छित नाही. मला फायटर विमानांबद्दल माहिती नाही त्यामुळे मी उपयुक्तता यावर बोलु शकत नाही.

बाकी आमच्या भाजपाच्या नगरसेवकाने देखील गेल्या वर्षात बराच भ्रष्टाचार केलाय. मोदींनी याचा जवाब दिला पाहिजे.

कपिलमुनी's picture

22 May 2015 - 4:35 pm | कपिलमुनी

मिपाचे स्वरूप राजकीय धुळवड असणारे संस्थळ असे झाले आहे काय ?

बाकी प्रश्नांवर अभ्यास करून उत्तर देइलच ..पण या प्रश्नाचा अर्थ कळला नाही

राम जेठमलानी म्हणाले, "भ्रष्ट सरकार भ्रष्ट जजों की ही नियुक्ति करेगी ।"
असे का बरे ?

कोणाविषयी बोलले आहेत ते ? बर सरकार किंवा जज (जे कोणी असतील ते ) ह्यांच्याविरोधात काही पुरावे आहेत का त्यांच्याजवळ ? की सकाळी झोपेतून उठवून मिडीया ने माईक तोंडाजवळ धरला म्हणून तोंडाला येईल ते बोलणं आहे हे ? असा कोणी उठून काहीही बोललं तर ते ग्राह्य धरायचं असतं का ? (शेवटला प्रश्न विचारायचं कारण की ..आमच्या मोलकरणीला कुठल्यातरी योजने अंतर्गत सरकारकडून दर महिन्याला काही पैसे मिळतात..गेल्या महिन्यात ते पैसे मिळायला थोडा उशीर झाला तर ती माझ्या बायकोजवळ म्हणाली ,"बाईसाहेब आमचे पैसे खाल्ले बघा मोदीनी?)

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

22 May 2015 - 6:18 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

त्या शिवसेना व राम जेठमलानीकडे जास्त लक्ष द्यायचे कारण नाही रे नांदेडियना.गेले ६० वर्षे वकीली करत आहात तर भर्ष्ट न्यायाधिशांची यादी बनवा की.आवडीची मंत्रीपदे न मिळाल्याने सेना सुरुवातीपासूनच खट्टू आहे.उद्या महत्वाचे पद मिळाले की तो उद्धवच "कुठले LED Scam?"?म्हणून विचारेल. असो.

निवडणुकीपूर्वी लाखो-करोडो अब्ज असलेल्या काळ्या पैशातून एकही पैसा भारतात आला नाही.

काळा पैसा परदेशात मोठ्या ट्रंकांमध्ये भरून ठेवला आहे असा गैरसमज अण्णा व अरविंंदने लोकांना करून दिलाय.तो तसा नसून वेगळ्या रुपात गुंतवला आहे असे वाटते.काळा पैसा मुळात तयार कसा होतो व त्यावर निर्बंध कसा घालायचा ह्यावर चर्चा हवी असे ह्यांचे मत.
बाकी विचारलेले प्रश्न योग्य आहेत पण त्यासाठी थोडा अवधी द्यायला हवा सरकारला.

प्रतापराव's picture

22 May 2015 - 6:36 pm | प्रतापराव

भाजपा नि कॉंग्रेस मध्ये मुळात फार फरक नाहीये. दोघेही एकाला झाकावे नि दुसर्याला काढावे ह्याच प्रकारचे पक्ष आहेत. परंतु ह्यावेळी मोदींनी जाहिरातीच्या माध्यमातून स्वताचे प्रतिमा संवर्धन केले नि विकासाचे गाजर दाखवले. आपल्याला हे गाजर खायला मिळेल ह्या स्वप्नात भोळीभाबडी जनता गुंगून गेली नि तिने मोदींना सत्ता दिली. परंतु मोदिंमध्ये नि इतर नेत्यांमध्ये काहीच फरक नाहीये हे जनतेच्या आता वर्षभराने ध्यानात आले असेल.सरकारला वर्ष झाले आहे. उरलेल्या दोन वर्षात मोदींचे सारे जग फिरून होवो नि त्यांच्या हाती २ वर्षे राहतील त्यात त्यांनी सामान्यांना अच्छे दिन दाखवावेत हीच इच्छा.

उगा काहितरीच's picture

22 May 2015 - 6:49 pm | उगा काहितरीच

भाजप हा पक्ष काँग्रेस पेक्षा बेटर आहे पण बेस्ट नाही. १०० % पारदर्शकता हे दिवास्वप्न आहे हो. एवढ्या मोठ्या देशाची सत्ता मिळवताना , राज्यकारभार करताना कुठतरी काहीतरी बग रहानारच ना. हं फक्त या बग नी ओव्हरऑल फंक्शनॅलिटी खराब करु नये बस.

अर्धवटराव's picture

22 May 2015 - 8:53 pm | अर्धवटराव

सुब्रमनिअन स्वामी राफेल विमान खरेदी प्रकरणामध्ये सरकारच्या विरोधात कोर्टात जातो म्हणाले होते.
असे का बरे ?

पहिलं कारण ढेरे साहेबांनी सांगीतलय. दुसरं कारण म्हणजे स्वामींना बौन्सरकरवी लाथा मारुन पक्षाबाहेर हाकलण्याची भिती नाहि. त्यामुळे ते सरकार विरोधी मत मांडु शकतात.

सामनामध्ये LED Scam बद्दल लिहून आले होते.
असे का बरे ?

सामनावाल्यांना त्यात खरच भ्रष्टाचार दिसला असेल. चौकशी होण्याचे चान्सेस नाहित. उद्या सामनावाले द ओन्ली नॉनकरप्ट कॉमनमॅन सरकारबद्द्लपण भ्रष्टाचाराचे आरोप लावतील (आप ने मुंबई नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला घाम फोडावा अशी फार इच्छा आहे). त्याचीही चौकशी होण्याचे चान्सेस नाहित.

राम जेठमलानी म्हणाले, "भ्रष्ट सरकार भ्रष्ट जजों की ही नियुक्ति करेगी ।"
असे का बरे ?

जेठमलानी साहेबांना न्यायव्यवस्थेविषयी फारच काळजी आहे म्हणुन. या साहेबांना दिल्ली राज्याच्या कारभाराविषयीसुद्धा असा कळवळा कधितरी येईलच. बघु.

Chief Information Commissioner, Central Vigilance Commision , Lokayukta या जागांवर गेल्या वर्षभरात कुणाचीही नियुक्ती झाली नाही.
असे का बरे ?

लायक लोकं मिळाले नसतील. आप सर्टीफाईड लोकांच्या नेमणुका करायला केंद्र सरकार बाध्य आहे. पण केजरीसाहेबांनी अजुन तसे आदेश सोडले नसतील. तसं या मुद्यावर आंदोलन करण्याची नामी संधी आहे.

आजच एक नोटिफिकेशन काढले आहे केंद्र सरकारने.
त्यात लिहिले आहे की ’दिल्ली ऍंटी करप्शन ब्युरोने केंद्र सरकारमधल्या ऑफिसर किंवा कर्मचार्‍याच्या कोणत्याही गुन्ह्याचा तपास करू नये.
असे का बरे ?

अधिकारांची कक्षा केंद्र सरकारला जास्त कळत असावी म्हणुन. शिवाय आप ने अजुन त्यांची स्वतःची तपास यंत्रणा पुरेशी विकसीत केली नाहि. त्यांच्या पार्टीत लोकपालाच्या नियुक्तीवरुनच घमासान झालं मध्यंतरी. एकदाका हि यंत्रणा तयार झाली कि तसंही सगळा तपास त्या यंत्रणेअंतर्गतच होणार आहे भारतात. लवकरच तो दिन यावा.

भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणार्‍या अशोक खेमकांना पुरातत्व खात्यात म्युझिअम सांभाळायला पाठवले.
असे का बरे ?

प्रत्येकाला आपल्या हिताची काळजी आणि काय. दिल्ली राज्य सरकार येत्या ५ वर्षात एकाही इमानदार अधिकार्‍याची बदली करणार नाहि असं ऐकलं आहे. स्वतः केजरीसाहेब अत्यंत इमानदार असल्यामुळे त्यांच्या वाट्याला फार काहि बदल्या आल्या नव्हत्या असं म्हणतात.

AIIMS मधल्या भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढणार्‍या संजीव चतुर्वेदींचे ट्रान्सफर केल्या गेले.
असे का बरे ?

दुसरीकडे भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर निघावी म्हणुन.

निवडणुकीपूर्वी लाखो-करोडो अब्ज असलेल्या काळ्या पैशातून एकही पैसा भारतात आला नाही.
असे का बरे ?

निवडणुकीपुर्वी जी वचनं दिली त्याच्या साधरणतः किती टक्के वचनांनी पुर्ती होऊ शकते याचा एक फॉर्मुला आप ने शोधुन काढला आहे. त्या फॉर्मुलानुसार हा पैसा अजुन भारतात आला नाहि. बाकि या प्रकरणातली प्रगती, या संदर्भातले नवीन कायदे वगैरे गोष्टी अर्थमंत्री वेळोवेळी सांगत असतात. पण त्याकडे दुर्लक्ष्य करणच बरं. बिकॉझ इट्स नॉट आप सर्टीफाईड यट.

व्यापम घोटाळ्यातल्या सलग आठव्या साक्षिदाराचा संशयास्पद मृत्यू झाला.
असे का बरे ?

भारतात तसंही माणसाच्या जीवाची किंमत काय? आता काहि दिवसांपुर्वी एका राजस्थानी सधन शेतकर्‍याला एका राजकीय सभेत सर्वांदेखत फासावर लटकवुन मारलच ना? अगदी त्याच्या हाती खोटी सुसाईड नोट देणे, त्याच्या नावाने नक्राश्रू ढाळत टिव्हीवर गळे काढणे, तो मरत असताना व मेल्यानंतरही आपली भाषणबाजी सुरु ठेवणे असले प्रकार झाले आहेत. आपण मिपाकरांस कितीही खेद वाटला तरी हि राजकारणी जमात आपल्या कह्यात थोडीच आहे.

आताशी मलासुद्धा प्रश्न पडायला लागली आहेत. पण आमच्या अत्यंत गंभीर प्रश्नांवर राहुल गांधी आणि मिपाकर काय प्रतिक्रिया देतील याचीच भिती वाटतेय :(

प्रदीप's picture

22 May 2015 - 9:18 pm | प्रदीप

चपखल प्रतिसाद!

चिगो's picture

31 Jul 2015 - 5:11 pm | चिगो

थोडी जाहीरात करतोय स्वतःच्या धाग्याची.. मात्र लोकपालबद्दल ठाम भुमिका घेणार्‍या आणि त्यानुशंगाने केजरीवालांना सपोर्ट असावा, असं वाटायला लावणार्‍या अर्धवटरावांसारख्या लोकांनी आज केजरीवालांच्या कार्यपद्धतीविरुध्द लिहावे, ह्यातच अरविंदरावजी केजरीवालसाहेब महाराज ह्यांचे अपयश सामवलेले आहे..

'लोकपाल'ला समर्थन आणि केजरीवालांना समर्थन म्हणजे एकूण एकच आहे, असं समजण्यात माझी चुक झाली असेल तर त्याबद्दल क्षमस्वः आणि आगाऊ माफीनामा..

अर्धवटराव's picture

31 Jul 2015 - 9:30 pm | अर्धवटराव

केजरीसाहेबांच्या कार्यपद्धतीबद्द्ल काहि मोठे आक्षेप आहेत पण त्यांना अजुनही 'अपयश' म्हणवत नाहि. व्यक्ती केजरीवाल आपल्या मूळ सामर्थ्य, मर्यांदा, नीती आणि विचारधारा घेऊन आपलं काम करतो आहे. लेट हिम वर्क.

सुब्रमनिअन स्वामी राफेल विमान खरेदी प्रकरणामध्ये सरकारच्या विरोधात कोर्टात जातो म्हणाले होते.
असे का बरे ?

यात घोटाळा झालाय असे त्यांनी म्हटलंय का? आणि म्हटले असेल तर तसे पुरावे तरी द्या.

सामनामध्ये LED Scam बद्दल लिहून आले होते.
असे का बरे ?

या बद्दलही जरा पुरावे द्या. म्हणजे कमीत कमी बातम्या तरी पुरवा.

राम जेठमलानी म्हणाले, "भ्रष्ट सरकार भ्रष्ट जजों की ही नियुक्ति करेगी ।"
असे का बरे ?

हे NJAC संदर्भात असावे असे वाटते. आता हे प्रकरण अजून सर्वोच्च न्यायालयात आहे. सुनावणी नुकतीच सुरु झालीय. हा कायदा संविधानसुसंगत आहे कि नाही याची सुनावणी सुरु आहे.

Chief Information Commissioner, Central Vigilance Commision , Lokayukta या जागांवर गेल्या वर्षभरात कुणाचीही नियुक्ती झाली नाही.
असे का बरे ?

या तीनही प्रश्नाचे उत्तर डॉ. जितेंद्र सिंग या मंत्र्यांनी लोकसभेत दिले आहे. आपली इच्छा असेल तर ते आपण पाहू शकता.
बाकी केंद्र सरकार लोकपाल नेमते, लोकायुक्त राज्य सरकार नेमते.

माहिती अधिकारा अंतर्गत मागवलेली माहिती नाकारण्यात PMO ऑफिस सगळ्यात पुढे आहे.
असे का बरे ?

असे समजून चालू कि PMO ने माहिती नाकारली. मग त्याचा भ्रष्टाचाराशी संबंध कसा?

आजच एक नोटिफिकेशन काढले आहे केंद्र सरकारने.
त्यात लिहिले आहे की ’दिल्ली ऍंटी करप्शन ब्युरोने केंद्र सरकारमधल्या ऑफिसर किंवा कर्मचार्‍याच्या कोणत्याही गुन्ह्याचा तपास करू नये.
असे का बरे ?

कारण दिल्ली सरकारची स्वतःची 'पब्लिक सर्विस' नाही. त्यामुळे या गोष्टी केंद्राच्या अखत्यारीत येतात. आता केंद्राचा अधिकार असणे म्हणजेच भ्रष्टाचार असा बादरायण संबंध इथे अपेक्षित आहे का?

भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणार्‍या अशोक खेमकांना पुरातत्व खात्यात म्युझिअम सांभाळायला पाठवले.
असे का बरे ?

खेमकांची बदली कधीपासून केंद्राच्या अखत्यारीत आली? आणि बदली केली म्हणजे भ्रष्टाचार बोकाळलाय असा संबंध इथे लावला जातो आहे का?

AIIMS मधल्या भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढणार्‍या संजीव चतुर्वेदींचे ट्रान्सफर केल्या गेले.
असे का बरे ?

यालाही हर्षवर्धन यांनी उत्तर दिले होते माझ्या माहितीप्रमाणे.

निवडणुकीपूर्वी लाखो-करोडो अब्ज असलेल्या काळ्या पैशातून एकही पैसा भारतात आला नाही.
असे का बरे ?

पैसा आला नाही असे म्हणताना ती आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले नाहीत असे म्हणले जाते आहे का? या सगळ्या प्रयत्नांमध्ये असलेल्या अडचणींचा थोडासा विचार करून पहा.

व्यापम घोटाळ्यातल्या सलग आठव्या साक्षिदाराचा संशयास्पद मृत्यू झाला.
असे का बरे ?

हे पण प्रकरण कधीपासून केंद्र सरकारच्या कक्षेत आले???

डँबिस००७'s picture

22 May 2015 - 10:33 pm | डँबिस००७

भ्रष्टाचाराचा भस्मासूर !!

एका माणसाला सर्वां समोर मारुन हे लोक आता म्हणताहेत सर्व नेते भ्रष्ट !!
आणि केजरीवाल कोण ! हरिश्चंद्र का ?

खंडेराव's picture

22 May 2015 - 10:39 pm | खंडेराव

बाकी काय ते बरोबर चुक माहित नाही, पण हे माणुस मारल्याचे कळत नाहीये. दिल्ली पोलिस भाजपाच्या, पक्ष्रि केंन्द्राच्या हातात आहे ना? मग धरावे केजरिवालला आणि टाकावे आत. अजुन आत टाकले नाही म्हणजे आपचा आत्महत्येत हात नसावा असे म्हणायला जागा आहे.

मृत्युन्जय's picture

23 May 2015 - 10:40 am | मृत्युन्जय

खरे आहे. मोदी आतुन केजरीवालला मिळालेले आह्हेत.

चिनार's picture

25 May 2015 - 9:59 am | चिनार

मृत्युंजय साहेब ,

तुम्ही फारच नवखे आहात बुवा राजकारण विषयात !
मोदी आतुन केजरीवालला मिळालेले आह्हेत. केजरीवाल आतून राहुल गांधींना मिळाले आहेत.राहुल गांधी आतून शरद पवारांना मिळाले आहेत. शरद पवार नक्की कोणाला मिळाले आहेत याच्यावर राजकीय विश्लेषक गेल्या ५० वर्षांपासून संशोधन करत आहेत. त्यांना उत्तर मिळालं की लगेच कळवू तुम्हाला ..
पण एवढं मात्र खरं की... हे सगळे अंबानीचे ऐजण्ट आहेत !

नाखु's picture

25 May 2015 - 2:09 pm | नाखु

पण एवढं मात्र खरं की... हे सगळे अंबानीचे ऐजण्ट आहेत !

आणी अंबानी रोजच्या रोज (अर्थात दिवसभर) मिपा वाचून या सगळ्यांशी सल्ला-मसलत करतात !!!!!

चिनार's picture

25 May 2015 - 2:20 pm | चिनार

+१०००००

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Jul 2015 - 11:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

कोई शक ???!!! =))

मना सज्जना's picture

30 Jul 2015 - 7:31 pm | मना सज्जना

एकदम खरे आहे राव ........

अर्धच राज्य असलेल्या दिल्लीची सत्ता ह्यांना सांभाळता येत नाही !

गेल्या वेळेला ४९ दिवस आणी आता ३=४ महीन्यातच पळण्याची तयारी ?
देशाच्या कायद्यात राहुन काम करता येत नाही मग ह्यांना सगळे कसे भ्रष्ट वाटायला लागलेत !

ज्या बाबासाहेबांनी देशाची संविधान लिहीले ते सुद्धा भ्रष्टच होते काय ?

आणी लक्ष केंद्र सरकार कडे ?

डँबिस००७'s picture

22 May 2015 - 10:54 pm | डँबिस००७

खंडेराव,

त्याच काय आहे ना ! धरुन आत टाकायला काय औरंगजेबच राज्य आहे का ?
केजरीवाल विरुद्ध केस तयार होतच असेल !

बाकी दिल्लीच्या निवडणुकीच्या आधी सोनिया गांधी पासुन भ्रष्ट लोकांची लिस्ट देणार्या केजरीवालने किती लोकांना आत टाकल ते सुद्धा आम्हाला सांगाच ! कारण तो एक साधा सुधा माणुस ना ही सुपरमॅन आहे !

खंडेराव's picture

22 May 2015 - 11:54 pm | खंडेराव

खरे आहे हो तुमचे..इथे बाबु बजरंगी, सलमान खान सारख्या देव माणसांना बेल मिळतोच. कायद्याचे राज्य आहे आपले.

बाकी, १ वर्षात वद्रा ला ही आत टाकायला जमले नाही का आपल्याला? आणि मी काय केजरीवालची बाजु घेउन उतरलो नाहीये. ते आत्महत्त्या प्रकरण फकत मला पुर्वनियोजित वाटत नाहीये.

( आपल्याला हे तुम्हाला उद्देशुन नसुन या कायद्याच्या राज्याला उद्देशुन आहे )

विकास's picture

23 May 2015 - 12:20 am | विकास

ते आत्महत्त्या प्रकरण फकत मला पुर्वनियोजित वाटत नाहीये.

आत्महत्या प्रत्यक्षात करण्याच्या दृष्टीने हे प्रकरण पुर्वनियोजित नसेल. पण आत्महत्या करतो आहे असे नाटक करण्याच्या दृष्टीने पूर्वनियोजित नक्कीच असावे असे वाटते. नाहीतर आत्महत्या करण्याची कारणे सांगणारी चिठ्ठी व्यासपिठापर्यंत कशी पोचली? त्यात "आत्महत्या करतो आहे", असे म्हणलेले नसताना देखील ते कुमार विश्वास का म्हणाले वगैरे प्रश्न उद्भवतताच. त्या व्यतिरीक्त गजेन्द्र सिंग आणि सिसोदीया यांच्या फोन संवादावरून सगळे गप्प आहे. सिसोदीया या प्रकरणातच गप्प आहेत.

इथे बाबु बजरंगी, सलमान खान सारख्या देव माणसांना बेल मिळतोच.

तो कायदा आहे. याच दोघांना कशाला लालूप्रसाद आणि स्ववर्तनाने तेहेलका "करणारे" तरूण तेजपाल ह देखील बेल घेउन उंडारत आहेत. या संदर्भात व्यवस्थेचा दोष आहे. कोर्टाना प्रकरणे पटकन हाताळायला मिळणे हे अत्यंत आवश्यक आहे.

तीच गोष्ट अफझल गुरू आणि कसाबच्या बाबतीत झाली होती. बेल मिळाला नसला तरी दिलेली शिक्षा ठोठवायला दिरंगाई केली जात होती. निवडणुकीचे भय नसते तर ते आत्ता देखील तुरूंगात निवांत बिर्याणी खात बसलेत असे ऐकायला मिळाले असते.

असो.

...यासाठी थांबा आणि वाट पहा, राजकारणात अशा प्रकरणात तर 'योग्य वेळीच योग्य ती पावले' टाकली जातात, तशी ती याबाबतीतही टाकली जातीलच याची खात्री बाळगा.

टवाळ कार्टा's picture

25 May 2015 - 12:04 pm | टवाळ कार्टा

हे होईल असे मात्र जर्रासुध्धा वाटत नाही

मृत्युन्जय's picture

25 May 2015 - 12:23 pm | मृत्युन्जय

खरे आहे. वद्रा आत जाइल असे वाटत नाही. मोदी काय किंवा केजरीवाल काय किंवा अजुन कोणी काय. यापैकी कोणिही आले तरी राजघराण्यातले लोक आत जाणार नाहित ही खात्री आहे. यापैकी जो कोणी माझे मत खोटे ठरवेल त्याला मी हे धैर्य (आणि मुत्सद्देगिरी) दाखवल्याबद्दल तहहयात मतदान करेन. प्रत्यक्षात मात्र काही व्यक्ती सर्वकाळ प्रोटेक्टेड असतात हे नक्की. वद्राच काय, भाजपाने तर काका पुतण्याला देखील आत टाकायच्या वल्गना केल्या होत्या ना? काय झाले त्याचे? आणि अश्य्चाच वल्गना युगपुरुषांनी देखील वद्रा आणि शीला दिक्षित यांच्याबद्दल केल्या होत्या ना? काय झाले त्याचे?

सरकार कोणाचेही असो. काही लोक नेहमीच प्रिव्हिलेज्ड असतात. हे दुर्दैवाने सत्य आहे.

मला राजकारणातलं जास्त कळत नाही पण एक गोष्ट मात्र वाटत राहते - १९९५ सालच्या निवडणुकीत मुंडे साहेबांकडे पवारांविरुध्ध गुन्हेगारांशी, अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे पुरावे होते (असं ते निवडणुकीच्या सभांमधून सांगायचे) तर ते कोर्टात का गेले नाहीत? त्या निवडणुका झाल्यानंतर राज्यात त्यांचं सरकार आलं होतं ज्यात ते गृहमंत्री होते, केंद्रात त्यांच्या पक्षाचं सरकार आलं होतं. ते का कोर्टात गेले नसतील? त्या नंतरही ते ~२० वर्ष होते. ते कोर्टात जाऊ शकत होते. जयललिता, लालू यांना अटक झालीच ना? पवारांना सुध्धा झाली असती.

मागच्या निवडणुकीवेळी त्यांना पवारांविषयी एका पत्रकाराने विचारलं होतं, तेंव्हा ते म्हणाले ९५ साली माझ्याकडे पुरावे होते म्हणून मी आरोप केले, आता पुरावे नाहीत म्हणून आरोप करणार नाही. पुराव्याना एक्सपायरी डेट असते काय?

जर कोर्टात केस झाली असती तर "काका" कायमचे आता गेले असते, पण मुंडे साहेबांकडे खरंच पुरावे होते का? त्यांच्यात आणि केजरीवाल (सलमान खुर्शीद वर आरोप करणारे पण - जेव्हढ मला माहित आहे - कोर्टात न जाणारे) यांच्यात फरक मला तरी वाटत नाही.

एबीपी माझाने गडकरी साहेबांच्या कंपनीच्या पत्त्यावर कैक वर्ष बंद असलेली झोपडपट्टी दाखवली होती. त्यांच्यावर काय कारवाई झाली? दोन pan कार्ड असणाऱ्या, विना परवाना शस्त्र ठेवणाऱ्या कृपा शंकर सिंह यांच्यावर काय कारवाई झाली? हे सुध्धा प्रिविलेज्ड नाहीत का?

एकदा औरंगाबाद मध्ये मुंडेंची धान्यापासून मद्य निर्मिती ला आमचा विरोध आहे असं सांगण्यासाठी पत्रकार परिषद चालली होती. ते म्हणाले धान्यापासून मद्य निर्मिती केली तर गरिबाने खायचे काय? एका पत्रकाराने (तिथेच की पत्रकार परिषदेनंतर बहुतेक) विचारलं कि त्यांच्या मुलीचा असा एक कारखाना आहे, तर त्यावर साहेबांचं म्हणणं होतं की "आमचा विरोध नव्या कारखान्यांना आहे". अरे, म्हणजे असलेल्या / नव्या कारखान्यांसाठी वेगळं पीक घेतलं जातं काय? आणी त्यामुळे गरिबांना काहीच फरक पडत नाही?

महाराष्ट्रातल्या एका भाजपा खासदाराला पहिल्यांदा खासदार झाल्यानंतर राज्यमंत्रीपद मिळालं. त्यांच्याच पक्षातल्या महाराष्ट्रातल्या एका "वरिष्ठ" नेत्याने त्याने केलेल्या एका डील मध्ये हिस्सा मागितला. तो न दिल्याने त्याचं पुढच्या वेळचं तिकिट कापलं. नंतर त्या खासदाराला तो "वरिष्ठ" नेता गेल्यानंतरच तिकिट मिळालं.
मी जिथे राहायचो तिथला एक मित्र एका मोठ्या परीक्षेच्या पेपर फुटीत सापडला. त्याला सगळ्यातून भाजपाच्याच एका मंत्र्याने कसं बाहेर काढलं हे ऐकून कुणाला खरं वाटणार नाही.
पहिल्या केस मधला खासदार माझ्या मित्राचा नातेवाईक आहे आणी दुसरा माझा मित्रच आहे. त्यामुळे जास्त डिटेल लिहू शकत नाही. म्हणायचं फक्त एव्हढंच आहे कि इथे कुणी वेगळा नाही - सारे सारखे आहेत.

सलमान खान / जयललिता कॉंग्रेस च्या काळात सुटला असता / सुटल्या असत्या तर? आजकाल रोज ज्या बलात्काराच्या बातम्या येतात त्या कॉंग्रेस च्या काळात आल्या असत्या तर? किंवा इथेच कपिलमुनींनी दिलेली बातमी ची लिंक (ट्राफिक हवालदाराला मारले) जर कॉंग्रेस च्या काळात झालं असतं तर? मी नक्की सांगतो भाजपा समर्थकांनी या सगळ्या गोष्टी सरकार बरोबर जोडल्या असत्या. आज तेच त्या बाबत काही बोलत नाहीत.

खंडेराव's picture

25 May 2015 - 5:45 pm | खंडेराव

दिली तुम्ही..धन्यवाद..काही गोष्टी नविन कळाल्या..

नितिन थत्ते's picture

23 May 2015 - 9:07 am | नितिन थत्ते

>>मिपाचे स्वरूप राजकीय धुळवड असणारे संस्थळ असे झाले आहे काय ?

सहमत आहे. निवडणुका संपून आता वर्ष झाले आहे.

विकास's picture

27 May 2015 - 12:34 am | विकास

त्याला मात्र नक्कीच मोदी जबाबदार आहेत. ते जर पंतप्रधान झाले नसते तर धुळवडविरहीत अच्छे दिन आले असते. ;)

कशाला जबाबदार?
सहमतीला, की निवडणूका संपून एक वर्ष व्हायला?

विकास's picture

29 Jun 2015 - 8:50 pm | विकास

"मिपाचे स्वरूप राजकीय धुळवड असणारे संस्थळ..." होण्यास जबाबदार.

मृत्युन्जय's picture

23 May 2015 - 10:53 am | मृत्युन्जय

पण मी काय म्हणतो नांदेडीयन लोकांनी काही ठोस पुरावे अथवा कारणे सादर करावीत म्हणजे यापैकी कुठल्या आरोपावर भाष्य करता येइल अन्यथा आरोप करणारी लोक असेही म्हणतात की:

१. राहुल गांधीने एका मुलीवर बलात्कार केला होता आणि ते प्रकरण दडपले.
२. इंदिरा गांधींनी संजय गांधीला मारले.
३. केजरीवाल अण्णा हजारेंच्या जीवावर उठले होते/ मूळावर टपले होते.

त्यामुळे असोच. त्या परदेश दौर्‍याच्या धाग्याचा बोर्‍या वाजला. किती बिनबुडाची आणि निरर्थक (आणि मुख्य म्हणजे बिन्डोक) टीका होती ते तिथे सिद्ध झालेच. आता हा धागा. एकुणच सध्या बिनबुडाची टीका करण्याची अहमहिका चालु आहे. कंटाळा आला आता.

लॉर्ड फॉकलन्ड's picture

23 May 2015 - 2:24 pm | लॉर्ड फॉकलन्ड

सध्या बरेच लोक सांगत सुटले आहेत की गेल्या वर्षभरात एकही भ्रष्टाचार झाला नाही.

डोंगर खणून मुंगी सुद्धा मिळाली नाही.भ्रष्टाचार झालेला आहे हे सांगताना झालेल्या भ्रष्टाचाराचे एकही उदाहरण न देता रोज बिनबुडाचे नवीन आरोप करणार्‍या स्वामी,जेठमलानी,सामना इ. वाचाळांचे एकेक वाक्य दिले आहे.कोणाची तरी बदली,कोणते तरी नोटीफिकेशन असली उदाहरणे देऊन भ्रष्टाचार झाला नाही हे खोटे आहे असे दर्शविण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे.निव्वळ केजरीवाल नव्हे तर त्यांचे भक्त देखील हास्यास्पद झालेले आहेत.

लॉर्ड फॉकलन्ड's picture

23 May 2015 - 2:28 pm | लॉर्ड फॉकलन्ड

लेखाचे टायटल काय तर "भ्रष्टाचाराच भस्मासूर" आणि या भस्मासुराला आधार काय आहे तर २-३ वाचाळांची एकेक वाक्ये,कोणाची तरी बदली,कसले तरी नोटीफिकेशन... जरा पावणेदोन लाख कोटींचा कोळसा घोटाळा,पावणेदोन लाख कोटींचा स्पेक्ट्रम घोटाळा,सत्तर हजार कोटींचा कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा अशी सणसणीत उदाहरणे द्या,म्हणजे लेखाचे टायटल सार्थ होईल.

पिंपातला उंदीर's picture

23 May 2015 - 8:59 pm | पिंपातला उंदीर

राजकारणाचा अभ्यास शून्य असला की अस होत . चला थोडी शिकवणी घेऊ . सगळ्या शाळेत ढ मुलांची घेतात तशी . उदाहरणार्थ एक वाक्य घेऊ -

स्वामी,जेठमलानी,सामना इ. वाचाळांचे एकेक वाक्य दिले आहे.

तर भक्त ज्याना वाचाळ म्हणतात ते कोण आहेत . एक एक घेऊ हा .

यातले तीनही वाचाळ भाजप समर्थकच आहेत . एक एक बघू .

स्वामी - यांनी आपला जनता पक्ष भाजपात विलीन केला आहे . लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि नंतर पण काही विशिष्ट कारणांमुळे ते भक्तांचे 'लाडके ' होते . पण त्यांच्या मुलीने सुहासिनी हैदर ने मोदी यांच्या विदेश दौऱ्यांवर टीका करताच आणि मुख्य म्हणजे राफेल डील नंतर सुसु यांनी कोर्टात जायची भाषा करताच ते सध्या भक्तांच्या हिट लिस्ट वर आहेत . वाजपेयी यांच्यावर त्यांनी अभद्र टीका केली होती तेंव्हा एक पण भक्त समार्थानाथ पुढे आला होता पण त्यांनी या दोन भक्त विरोधी गोष्टी काय केल्या ते एकदमच भक्त पंथा साठी वाचाळ ठरले . बर झाल अटलजी सक्रिय राजकारणात नाहीत . असले आंधळे समर्थक बघून त्या संवेदनशील कवी माणसाची अवस्था काय झाली असती ते एक अयोध्येचा रामच जाणे .

जेठमलानी - हे पण भाजप मध्येच आहेत . हे सातत्याने गडकरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे . पण पक्ष त्यांना अजून पक्षातून काढत नाहीये म्हणजे भाजप ला पण त्यांचे आरोप खरे वाटत नाहीयेत . त्यांनी परवा मोदी सरकारवर टीका करताच लगेच ते भक्त पंथाच्या रडारवर आले . समजूतदार लोक काय अर्थ काढ्याचा तो काढतीलच .

सामना - हे काय वो . शिवसेना तुमचा मित्र पक्ष ना . आताच तर तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवल्या ना . बर केंद्रात आणि राज्यात तुम्ही सत्तेत भागीदार . जर मित्र लोकांना च वाटत नसेल तर आम्हाला कसे वाटेल बुवा अच्छे दिन आल्याच . बघा विचार करा . हे सगळे 'वाचाळ ' तुमचेच लोक आहेत . जमले तर उत्तर द्या .

नांदेडीअन's picture

23 May 2015 - 10:25 pm | नांदेडीअन

राजकारणाचा अभ्यास शून्य असला की अस होत . चला थोडी शिकवणी घेऊ . सगळ्या शाळेत ढ मुलांची घेतात तशी.

वेगवेगळ्या धाग्यांवर तुमचे विचार वाचून तुमची माझ्या मनात एक प्रतिमा तयार झाली आहे.
तुम्ही बर्‍यापैकी तटस्थ वाटता, तुम्हाला राजकारणाची चांगली जाण आहे, तुम्ही भक्तांना सहज लोळवू शकता. (भक्तांची बौद्धिक कुवत अशीही मायनसमध्येच असते म्हणा.)
तुमच्या मानाने 'राजकारण' या विषयात मी तर अगदीच नवखा आहे, पण भक्तांच्या आणि परमभक्तांच्या जास्त नादी लागायचे नाही हे मी उशिरा का होईना पण शिकलोय.
तुम्ही का अजून एंटरटेन करताय त्यांना ?

हळूहळू तुम्हीसुद्धा कमी करा हे.
एकतर खूप वेळ वाचेल तुमचा.
आणि दुरून भक्तांची ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ ही अवस्था बघायला खूप मजा येईल.

पिंपातला उंदीर's picture

24 May 2015 - 9:45 pm | पिंपातला उंदीर

मला जेंव्हा low वाटायला लागत तेंव्हा मी राजकारणाच्या धाग्यावर येतो . भक्तांनी शून्य राजकीय ज्ञान वाटलेले प्रतिसाद वाटच पाहत असतात . सुदैवाने प्रादेशिक , राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांच थोड ज्ञान मला आहे . मग मी त्या शुन्य प्रतिसादाच्या धज्ज्या उडवतो . मजा येते . पुन्हा मी माझ्या रोजच्या जीवनाला भिडतो . त्यामुळे मला वाटेल तेंव्हाच मी इथे येतो . इथे येउन रोज विद्वता पाजळणे ही काय माझी गरज नाही . मी वर्तमानपत्रात column लिहितो . मला virtual आयुष्यात प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा खर्याखुर्या आयुष्यात प्रसिद्धी मिळवण्यात रस आहे . पण तुमचा मुद्दा खरा आहे . पण भक्तांची खिल्ली उडवायला मजा येते राव . : )

सुबोध खरे's picture

25 May 2015 - 12:35 pm | सुबोध खरे

भक्तांनी शून्य राजकीय ज्ञान वाटलेले प्रतिसाद वाटच पाहत असतात
"सगळ्या भक्ताना शून्य राजकीय ज्ञान असते" हे विधान जरा अतिशयोक्तीचे वाटते. आपले ज्ञान उच्च कोटीचे असेल म्हणून इतर लोक अगदीच गाळात आहेत अस अर्थ यातून निघतो. म्हणजे मी इंजिनियर आहे तर जे इंजिनियर नाहीत त्यांना अभियांत्रिकीचे ज्ञान शून्य असे मी म्हणालो तर कसे वाटेल.
लोकांची खिल्ली उडवायला फार कष्ट लागत नाहीत शब्दाचे कीस पाडणे आणि गुंत्यात अडकवणे असे केले कि माणूस कुठेतरी अडकतोच. आपला मूड सुधारण्यासाठी अज्ञानी लोकांची खिल्ली उडवण्यात आपल्याला मजा येते हे पाहून वाईट वाटले इतकेच.

संदीप डांगे's picture

25 May 2015 - 2:10 pm | संदीप डांगे

ज्याला आपल्या ज्ञानाचा गर्व होतो त्याला खरंतर काहीच माहित नसतं असं म्हणतात...

पुण्याचे वटवाघूळ's picture

30 Jun 2015 - 10:48 am | पुण्याचे वटवाघूळ

"सगळ्या भक्ताना शून्य राजकीय ज्ञान असते" हे विधान जरा अतिशयोक्तीचे वाटते. आपले ज्ञान उच्च कोटीचे असेल म्हणून इतर लोक अगदीच गाळात आहेत अस अर्थ यातून निघतो. म्हणजे मी इंजिनियर आहे तर जे इंजिनियर नाहीत त्यांना अभियांत्रिकीचे ज्ञान शून्य असे मी म्हणालो तर कसे वाटेल.

अगदी योग्य लिहिलेत डोक्टरराव. य आसल्या अहंमन्य उंदरांना असेच चोपले पाहिजे. हे असले एकाहून एकेक उथळ प्रतिसाद देणार्‍या उंदरांना वेचून वेचून चोपले पाहिजे.

भले साब्बास उंदीर्साब, तुम्चा म मा मि मी मु मू मे मै मो मौ मं मः चा आब्यास लै जोर्दार हाय ! त्येच्याबद्दल जंक्शण हाबीणंदण !

पन त्ये काय कोलम (तांदूळ नाय, त्यो पेप्रात आस्तो त्यो) लिव्ता म्हंता तर जर्रा सम्तोल का काय म्हंत्यात तसं लिवा भौ. लिव्ताना येका बाजूला झुक्लं की लोकान्ला लग्गी कळ्तं की ह्यो कोंच्या बाजुचा हमाल हाय. लोकान्ला बरी आक्कल आसतिया, लोकांन्ला कायबी सम्जत नाय आसा इचार कर्नार्यांना खिनभर कमी आसती, आसं सादूसंत ब्वोलून ग्येल्यात. तुमी लैच हुश्शार हाहात, तुमाला ह्ये सग्ळं म्हाय्ती आसंलच.

चिनार's picture

25 May 2015 - 10:31 am | चिनार

अहो पिम्पातला उंदीर ,

तुमचा राजकारणाचा अभ्यास खरच खूप आहे आहे. तुमचे विचार सुद्धा तटस्थ असतात. पण मी काय म्हणतो जशी मोदी भक्तांची खेचता तशीच इतर भक्तांची ....माफ करा .. "विशिष्ट विचारधारेच्या समर्थकांची" सुद्धा खेचा की राव..सगळ्याना मजा येईल..
हलके घ्यावे

विनोद१८'s picture

24 May 2015 - 10:18 pm | विनोद१८

जेठमलानी - हे पण भाजप मध्येच आहेत . हे सातत्याने गडकरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे .

हे आरोप कोणते ??? हे आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत का ?? फक्त सु. स्वामींचा आरोप मला माहीत आहे व त्याचे कारणही, पुढे काय झाले त्याचे ???

एक आठवण करुन देतो, ह्याच गडकरींवर बिनबुडाचे बेफाम आरोप करून अरविंद केजरीवाल केस हरला व काही दिवस बिनभाड्याच्या खोलीत राहोन आला, याला फार दिवस नाही झाले. भा.ज.पा.मध्ये पक्षांतर्गत जाहीर टिकेला वाव आहे, हेच यातुन दिसते, नाही का ? असे चित्र दुसर्या कोणत्या पक्षात दिसते. ??

नांदेडीअन's picture

25 May 2015 - 8:15 am | नांदेडीअन

हे आरोप कोणते ???

Govt is least interested in bringing back the black money.
http://timesofindia.indiatimes.com/india/Govt-least-interested-in-gettin...

Corrupt government requires corrupt judiciary
http://www.dnaindia.com/india/report-corrupt-government-requires-corrupt...

"ह्याच गडकरींवर बिनबुडाचे बेफाम आरोप करून अरविंद केजरीवाल केस हरला"

अच्छा अच्छा, अस्सं झालं होय ?
फारच लवकर निकाल लागला.

बाय द वे, मी ही बातमी वाचली होती.

Court imposes Rs 10,000 fine on Nitin Gadkari in defamation case against Arvind Kejriwal
http://timesofindia.indiatimes.com/india/Court-imposes-Rs-10000-fine-on-...

नांदेडीअन's picture

25 May 2015 - 5:08 pm | नांदेडीअन

"जरा हे पण वाचा :-
http://www.thehindu.com/news/national/possibility-of-compromise-in-nitin..."

अरे वा !
हे Compromise केजरीवाल मानहानीसाठी जेलमध्ये गेले होते तेव्हा झाले की जेलमध्ये जाण्याच्या अगोदर, की जेलमधून बाहेर आल्यानंतर ?

साहेबांच्या भाषेचे जास्त ज्ञान नाहीये मला, पण माझ्या माहितीप्रमाणे Compromise ला मराठीत तडजोड किंवा समेट म्हणतात.
आणि (परत) माझ्या माहितीप्रमाणे तडजोड किंवा समेट हा दोन्ही व्यक्तींच्या सहमतीने होतो, फक्त एका व्यक्तीकडून नाही.

गडकरींच्या ड्रायव्हर, नौकर इत्यादी लोकांच्या नावावर कंपनीचे शेअर्स वगैरे आहेत.
कॅगनेसुद्धा गडकरींवर पूर्ती प्रकरणामध्ये ठपका ठेवलाय.
पण तरीही केजरीवालने त्यांचे नाव जिंदल, वाड्रा, अंबानीसारख्या भ्रष्ट नसलेल्या लोकांच्या यादीत टाकले.
केजरीवालने इतका मोठा गुन्हा केलाय की गडकरी साहेब त्याला सहजासहजी सोडतील असे वाटत नाही.

गडकरींनी या केसमधून असा धडका शिकवावा ना त्या चिरकूट केजरीला, पुढच्या वेळी कुणाचेही नाव घेतांना १०० वेळा विचार केला पाहिजे त्याने.

विनोद१८'s picture

25 May 2015 - 10:57 pm | विनोद१८

Tethehi tyane nehmichich natake keli, puravaa nasatana Gadkarinvar aarop kele kortaane te maagitale ha deu shakala nahi. Kortacha vel vaya ghalavala, Belbondche paise Rs.10,000/- bharalee naahit. Gela aatmadhye, Gadakarinchi Lekhee maafi maganyachi namushki gheunch Ha nantar baher aalaa, haa aata yachya baapjanmaat Gadakrinvar ase khote aarop karu dhjaavanàr naahi.

Mhantaat na Jityachi khod melyashivay jaat naahi, tasa ha aata jar kuthe adakala tar nakkich yalaa baher yene kathin hoil, he nakki. Yachi attaachi natke paahata tasech hoil ase malaa vatate.

नांदेडीअन's picture

25 May 2015 - 11:22 pm | नांदेडीअन

अहो दादा, लिहिण्याअगोदर थोडी तरी माहिती घेत चला हो.
केस अजूनही सुरूच आहे कोर्टात.
काहीही निकाल वगैरे आलेला नाहीये.

नांदेडीअन's picture

26 May 2015 - 4:28 pm | नांदेडीअन

मानहानीची केस गडकरींनी दाखल केलीये हो.
केजरीवाल कशी माघार घेऊ शकेल ?

ही केस अजूनही संपलेली नाहीये.
तसे असेल तर सोप्या भाषेत समजावून सांगा हो मला.
पाया पडतो तुमच्या.
की कट्टी करू तुमच्याशी ? :(

पिंपातला उंदीर's picture

25 May 2015 - 8:26 am | पिंपातला उंदीर

जेठमलानी यांनी केलेले आरोप अतिशय गंभीर आहेत . हे बघा

http://www.firstpost.com/politics/jethmalani-slams-gadkari-for-taking-bj...

http://www.ibnlive.com/news/india/jethmalani-slams-sick-bjp-478176.html

पक्षांतर्गत टीका हि पक्षाच्या व्यासपीठावर (पक्षाची बैठक ) चार भिंतीच्या आंत करायची असते माध्यमामध्ये नाही .

केजरीवाल केस हरला ? कुठल्या जगात ? कुठल्या समांतर विश्वात ही घटना घडली असली तर कल्पना नाही . काही पुरावा किंवा लिंक द्या पाहू .

अवांतर -बाकी सुसु ने वाजपेयी यांच्यावर कसली अभद्र टीका केली आहे याची कल्पना आहे का ?

पिंपातला उंदीर's picture

23 May 2015 - 9:01 pm | पिंपातला उंदीर

भाजप ला पण त्यांचे आरोप खरे वाटत नाहीयेत

खरे च्या जागी 'खोटे ' असे वाचावे

भ्रष्टाचाराचा भस्मासूर म्हणजे काँग्रेस !!
पंधरा लाख कोटींचा कोळसा घोटाळा,पावणेदोन लाख कोटींचा स्पेक्ट्रम घोटाळा,सत्तर हजार कोटींचा कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा अशी सणसणीत उदाहरणे देता येतील !

कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा होताच, त्यात वाद नाही, पण हे ७०,००० कोटी कुठुन आले?
हा एकून खर्च होता. सगळा घोटाळा असेल तर गेम्स काय फु़कट झाले का?
Of the total Games- related spending on improving Delhi's infrastructure, Rs 5,700 crore has been allocated for flyovers and bridges alone, Rs 650 crore for stadiums, Rs 16,887 crore for the Delhi Metro expansion and Rs 35,000 crore for new power plants.
बाकी, notional value विषयी बघा जरा. इतरही दोन आकडे चुकीचे आहेत. CAG चा रिपोर्ट कुठेही कोळसा खाण वाटपात पैसे खाल्ले असे म्हणत नाही, फक्त वाटप अजुनही नीट करता आले असते.

आणि कळस म्हणजे यातील एकही पैसा कोणत्याही सरकारला परत सरकारी तोजरीत आणता आला नाही. अश्या प्रकारे पैसा गायब करण्याचा चमत्कार फक्त राजकरणी करु शकतात.

पिंपातला उंदीर's picture

24 May 2015 - 8:21 am | पिंपातला उंदीर

तंबी दुराई यांचा अच्छे दिन वरचा जबरी टेक वाचा . Its worth

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/47398257.cms

खंडेराव's picture

25 May 2015 - 6:00 pm | खंडेराव

मस्त लिहिलाय!

इरसाल's picture

25 May 2015 - 4:04 pm | इरसाल

मग काय ठरलं ?

संदीप डांगे's picture

25 May 2015 - 4:54 pm | संदीप डांगे

सगळ्यांना हक्काचे घर मिळेपर्यंत थांबायचं...

नांदेडीअन's picture

29 Jun 2015 - 4:26 pm | नांदेडीअन

व्यापम घोटाळ्यातल्या सलग आठव्या साक्षिदाराचा संशयास्पद मृत्यू झाला.
असे का बरे ?

हा पोस्ट लिहिला होता तेव्हा 'व्यापम' घोटाळ्यातले एकूण ८ आरोपी/साक्षिदार मेले होते.
गेल्या ४० दिवसात ही संख्या ८ वरून २४ वर गेली आहे.
http://navbharattimes.indiatimes.com/state/madhya-pradesh/bhopal/indore/...

नाव आडनाव's picture

29 Jun 2015 - 5:08 pm | नाव आडनाव

हे भयानक आहे. राज्यसरकार, राज्यातला विरोधी पक्ष, एनजीओ, केंद्रातलं सरकार, केंद्रातले विरोधी पक्ष कोणंच कसं काही बोलत नाही या बद्दल?

मृत्युन्जय's picture

29 Jun 2015 - 7:14 pm | मृत्युन्जय

काँग्रेस याबाबत निदर्शने करत आहेच. यावर आधीही बातमी येउन गेली होती. त्यावेळेसपर्यंत ८ लोक गेले होते.

नांदेडीअन's picture

30 Jun 2015 - 12:29 pm | नांदेडीअन

हा पोस्ट लिहिला होता तेव्हा 'व्यापम' घोटाळ्यातले एकूण ८ आरोपी/साक्षिदार मेले होते.
गेल्या ४० दिवसात ही संख्या ८ वरून २४ वर गेली आहे.
http://navbharattimes.indiatimes.com/state/madhya-pradesh/bhopal/indore/...

व्यापमं आरोपियों की मौत की CBI जांच जरूरी नहीं ।
- गृहमंत्री बाबुलाल गौर
http://www.samaylive.com/regional-news-in-hindi/madhya-pradesh-news-in-h...

लिओ's picture

29 Jun 2015 - 7:11 pm | लिओ

या धाग्यावर भ्रष्टाचाराची पर्‍करणे व त्यावर चर्चा सुरु आहे.

फरक पडणार असेल अथवा नसेल तरी, भारतीय संरक्षण दलाबद्दल अथवा भारतीय संरक्षण दलात होत असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल आपले मत व्यक्त करण्याएवजी भ्रष्टाचारासहीत अथवा भ्रष्टाचाराशिवाय संरक्षण दलास योग्य ती व आवश्यक युद्धसाहित्य मिळावी यासाठी प्रार्थना करा. सध्या याची जास्त गरज आहे. (संरक्षण दलाच्या गरजा हा स्वतंत्र धागा होउ शकतो. ).

राफेल विमान खरेदीचा या धाग्यात उल्लेख झाला म्हनुन मी माझे हे वैयक्तिक मत मांडत आहे. जाणकारांनी कोणत्याही सरकारवर टीका अथवा कौतुक वर्षाव न करता भारतीय संरक्षण दलाच्या गरजेवर खुलासा करावा.

होबासराव's picture

29 Jun 2015 - 8:04 pm | होबासराव

हे तर एखादया चित्रपटातल्या कथानकात शोभेल असे माणस खरोखर मारत सुटलेयत.. जे काहि बाहेर निघेल चौकशी झालिच तर ते फार भयानक असेल.

अर्धवटराव's picture

29 Jun 2015 - 8:51 pm | अर्धवटराव

अ‍ॅक्च्युअल उघड झालेल्या हत्या इतक्या आहेत. बाकि पडद्यामागे किती बळी गेले असतील, किती मानसीक छळ झाला असेल कोण जाणे :(

विकास's picture

8 Jul 2015 - 9:40 pm | विकास

आज व्हॉट्सअ‍ॅप वर एक उपरोध वाचला: There is only one way to kill Dawood Abraahim now..Add his name too in Vyapam scam

कदाचीत त्याच्या पुढे असे म्हणता येईलः जर व्यापम प्रकरण बंदच करायचे असेल तर "साहेबांचे" नाव घाला! :)

पुण्याचे वटवाघूळ's picture

30 Jun 2015 - 10:44 am | पुण्याचे वटवाघूळ

व्यापम प्रकरणात अनेक साक्षीदार्/संशयित संशयास्पदपणे गेले हे नक्कीच धक्कादायक आहे. याची चौकशी होऊन गरज असल्यास शिवराजसिंगांवर कारवाई व्हायला हवी.

अहो नांदेडियनराव, तुम्ही म्हणता त्या मोदीभक्तांमध्ये आणि तुमच्यासरख्या केजरीच्या गुलामांमध्ये हाच फरक आहे. तथाकथित मोदीभक्तांपैकी बरेचसे व्यापम प्रकरणातील एकामागोमाग एक लोक मरत आहेत त्याला धक्कादायकच म्हणतील.पण केजरीच्या गुलामांपैकी फारच थोडे गजेन्द्रसिंग प्रकरणी काहीच काळेबेरे आहे हे मान्य करतील. आआपच्या बैठकीत बाऊंसर आणले होते आणि एकाची हाडे मोडली तर त्याला 'फेविकॉलने चिकटवलेली हाडे' असे तुम्हीच की अन्य कुणा आपटार्डने म्हटले होते.

हाच मोदीभक्तांमध्ये आणि केजरीच्या गुलामांमध्ये उर्फ आपटार्डांमध्ये फरक आहे.

नांदेडीअन's picture

30 Jun 2015 - 12:02 pm | नांदेडीअन

तुम्ही म्हणता त्या मोदीभक्तांमध्ये आणि तुमच्यासरख्या केजरीच्या गुलामांमध्ये हाच फरक आहे.

झाडावर उलटं लटकण्यात आयुष्य गेलं तुमचं.
साहजिक आहे, रक्तप्रवाह सुरळीत नसेल मेंदूपर्यंत. :)

dadadarekar's picture

30 Jun 2015 - 12:22 pm | dadadarekar

गुरित्वाकर्षणाने रक्त डोक्यात साचून साकळले असेल .

पुण्याचे वटवाघूळ's picture

30 Jun 2015 - 12:29 pm | पुण्याचे वटवाघूळ

मुद्दे न राहिल्यामुळे वैयक्तिक चर्चेवर घसरायचे ही आपटार्डांची सवयच आहे. त्यामुळे मुद्देसूद चर्चेची अपेक्षा तुमच्याकडून नव्हतीच. बरोबर अहे. जर तुमचे नेतेच असा आक्रस्ताळेपणा करत असतील तर तुमच्यासारखे लोक वेगळे कसे करणार?

नांदेडीअन's picture

30 Jun 2015 - 12:35 pm | नांदेडीअन

हो का ? :O
थोडा वेळ सरळ उभे टाका, रक्तप्रवाह सुरळीत होईल.
आणि तासाभरापूर्वी आपण स्वतः काय लिहिले होते हा विसरण्याचा जो रोग जडलाय, तोसुद्धा बरा होईल कदाचित.

२ आठवड्या पूर्वीची एक बातमी देत आहे :-
जेव्हा वाळू माफियांना सोडण्यासाठी ऊर्जामंत्र्यांचा फोन जातो!
ही कालची :-
आठ महिन्यात सरकारच्या प्रतिमेला तडे

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chittiyaan Kalaiyaan... :- Roy

नांदेडीअन's picture

30 Jun 2015 - 2:59 pm | नांदेडीअन

After Pankaja Munde, Vinod Tawde faces allegations of irregularities in awarding contract.
http://indianexpress.com/article/india/india-others/after-pankaja-munde-...

Maharashtra minister Pankaja Munde lands in fresh controversy
http://indiatoday.intoday.in/story/pankaja-munde-jalyukta-shivaar-scam-m...

श्रीगुरुजी's picture

1 Jul 2015 - 3:32 pm | श्रीगुरुजी

जेव्हा एखादा शाहीर खड्या आवाजात पोवाडा म्हणत असतो, तेव्हा त्याच्या मागे उभे असलेले त्याचे साथीदार गप्प उभे असतात. पोवाड्याच्या काही ओळी म्हणून तो समेवर येऊन थांबतो, तेव्हा मागचे साथीदार एक हात कानावर ठेवून 'जीजी रं जीजी रं जी जी जी' असे म्हणून पोवाड्यात खंड पडू देत नाहीत.

फेब्रुवारी-एप्रिल या काळात जवळपास ८ आठवडे परदेशी जाऊन श्रमपरिहार करून ताजेतवाने झालेल्या युवराजांना भारताच्या भेटीवर आल्यावर अचानक कंठ फुटला आणि ते मनाला येईल ते बरळायला लागले. सूटबूट की सरकार असे काहीतरी आचरटासारखे बोलणे, मी आयुष्यभर तुमच्या साठी लढत राहीन असे शेतकर्‍यांना/कोळ्यांना सांगणे, मनमोहन सिंगांनी मोदींची शिकवणी घेतली अशी हास्यास्पद विधाने करणे, बोलताना प्रत्येक तिसर्‍या वाक्यात किसान, मजदूर, गरीब या शब्दांचा न चुकता वापर करणे असा पोवाडा त्यांनी सुरू केला.

बराचवेळ खड्या आवाजात पोवाडा गायल्यावर ते थकले आणि नेहमीप्रमाणे १०-१२ दिवसांपूर्वीच परदेशी रवाना झाले. यावेळी बरोबर राजमाता, युवराज्ञी, जमाई राजा इ. बरोबर होते. लंडनमध्ये एका हॉटेलच्या लॉबीत चुकून त्यांचा एका व्यक्तीला धक्का लागला आणि आश्चर्य म्हणजे ती व्यक्ती होती ललित मोदी. मग दोघांनी एकमेकांना हाय, हॅलो वगैरे केले. भारतात शेतकरी, कामगार, गरीब इ. ची परिस्थिती कशी आहे, त्यांना रोजचे जेवण वगैरे मिळते का इ. मोदींनी कळवळून युवराजांना विचारले. ही भेट ठरवून झाली होती असा भाजप उगाचच कांगावा करीत आहे.

दरम्यानच्या काळात भारतात पोवाड्यात खंड पडू नये म्हणून जयराम रमेश, सचिन सावंत वगैरे पाठीमागचे साथीदार कानावर हात ठेवून 'जीजी रं जीजी रं जी जी जी' करीत आहेत व त्यातूनच पंकजा मुंडे, तावडे इ. वर हास्यास्पद आरोप होत आहेत. हे आरोप म्हणजे फुसका बार आहे. त्यातून आवाज निघणार नाही, प्रकाश दिसणार नाही आणि धूरही येणार नाही.

बादवे, माध्यमात भुजबळांवर होत असलेल्या आरोपांची चर्चा थांबावी म्हणून काकांनीच ही काडी लावून दिल्याचे बोलले जात आहे. त्यांची खेळी यशस्वी झाल्याचे दिसत आहे.

dadadarekar's picture

1 Jul 2015 - 3:40 pm | dadadarekar

आणि ते वरुण गांधी कधी भेटले होते म्हणे ?

वरुण गांधी सोनियाच्या मदतीने ललित मोदीला सोडवणार होते ना हो ?

चक्क काकू मला वाचवा ?

माय मरो पण मावशी जगो ही म्हण आता माय मरो पण काकु जगो अशी करावी का ?

नांदेडीअन's picture

5 Jul 2015 - 2:59 pm | नांदेडीअन

व्यापम घोटाळा कव्हर करायला गेलेल्या आज तकच्या पत्रकाराचा काल मध्यप्रदेशमध्ये संशयास्पद मृत्यू झाला.
आणि आज परत एकाचा मृत्यू.

Jabalpur medical college dean with links to Vyapam accused found dead
http://www.business-standard.com/article/pti-stories/jabal-med-college-d...

संदीप डांगे's picture

5 Jul 2015 - 3:30 pm | संदीप डांगे

माझ्यामते व्यापम घोटाळा सर्वच बाबतीत भाजपसरकारवर एक सर्वात मोठा डाग असेल. याबद्दल अजिबात योग्य ती चौकशी होत नाहीये. ललितमोदी प्रकरणावर फुकाचं रान माजवणार्‍या च्यानलांना हे दिसत नाहीये का? अरे इथे तर अलिबाबाची गुहा आहे. पँडोराज बॉक्स आहे. मधमाशांच पोळं आहे. इतक्या अटका आणि इतके मृत्यू, काय चाल्लंय तरी काय?

श्रीगुरुजी's picture

5 Jul 2015 - 7:52 pm | श्रीगुरुजी

या प्रकरणातील गूढ दिवसेंदिवस वाढत चाललंय. अनेक साक्षीदारांचा व आरोपींचा संशयास्पद मृत्यु झालाय. यामागे नक्की कोण आहे आणि नक्की किती जण आहेत हे बाहेर येत नाहीय्ये. सध्याच्या तपासयंत्रणेला हे गूढ उकलत नाहीय्ये किंवा जाणूनबुजून तपास नीट होत नाहीय्ये. मध्यप्रदेश मधल्या भाजप सरकारचे हे एक प्रचंड मोठे अपयश आहे आणि आता सरकारवरच संशय येतोय. एकंदरीत या भ्रष्टाचारात एकापेक्षा जास्त पक्षांचे हितसंबंध असणार असं दिसतंय.

आता सर्वोच्च न्यायालयानेच सर्व तपास हाती घेऊन फक्त स्वतःच्याच नियंत्रणाखाली असलेली एक एसआयटी बनवून तपास करावा व या प्रकरणातील सर्व साक्षीदारांना तातडीने २४ तास संरक्षण पुरवावे.

विकास's picture

6 Jul 2015 - 7:15 pm | विकास

हे प्रकरण गंभीर आहे. त्या संदर्भात सरकारने पारदर्शक रहाणे अतिमहत्वाचे आहे. त्याहूनही महत्वाचे म्हणजे जे कोणी त्यातील आरोपी आणि फिर्यादी असतील त्या सर्वांच्या जीवाची काळजी घेणे महत्वाचे आहे.

बाकी ललित मोदी वरून रान माजवणारी काँग्रेस या संदर्भात बर्‍यापैकी "हात रे" असे लहान मुलासमोर म्हणावे इतकी कमी निषेध करत आहे असे वाटते. शिवराजसिंग चौहान यांच्या बद्दल कायम चांगले ऐकले आहे. त्यांची ही नक्की सत्वपरीक्षा आहे. भले स्वत: (कदाचीत) गुंतले नसले तरी हे प्रकरण कसे सोडवणार आहेत ह्यावर त्यांचे राजकीय चारीत्र्य आणि नेतृत्व ठरेल.

मात्र जो काही सिबिआय चौकशी करा म्हणून ओरडा चालला आहे ते पाहून काही समजत नाही. कारण हायकोर्टाच्या आदेशामुळे सिबिआय चौकशी करता येत नाही आहे. In 2014, the Madhya Pradesh High Court rejected demands for a CBI inquiry from the Congress and others. हा दुवा एनडीटिव्ही मधला आहे. पण माध्यमातले मथळे वाचून असे वाटते की सरकार करायला तयार नाही म्हणून, जे वास्तवाला धरून नाही.

श्रीगुरुजी's picture

6 Jul 2015 - 10:54 pm | श्रीगुरुजी

>>> . In 2014, the Madhya Pradesh High Court rejected demands for a CBI inquiry from the Congress and others

सीबीआय चौकशीची मागणी फक्त राज्य सरकार केंद्र सरकारकडे करू शकते. इतरांना तो कायदेशीर अधिकार नाही. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी ही कोणीतरी त्रयस्थाने केलेली मागणी त्यामुळेच कदाचित न्यायालयाने फेटाळली असावी.

परंतु या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता राज्य सरकारने स्वतःहून हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे. राज्य सरकारवर येणारा संशय कदाचित त्यामुळे कमी होईल.

२ दिवसांपूर्वी वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन दिल्लीत मृत अवस्थेत आढळले. म्हणजे हे प्रकरण मध्य प्रदेशच्या सीमा ओलांडून केव्हाच बाहेर गेले. हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. या प्रकरणात सर्वपक्षीय सहभाग असणार हे नक्की. म्हणून तर प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस क्षीण विरोध करीत आहे.

कोळसा घोटाळा, २-जी तरंगलहरी घोटाळा, राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळा इ. प्रकरणातील मुख्य आरोपी व लाभार्थी काँग्रेसचे व मित्रपक्षांचे होते. इतर विरोधी पक्षांचा त्यात फारसा हात नव्हता. त्यामुळेच भाजप व इतर विरोधी पक्षांनी प्रचंड गदारोळ माजवून प्रकरण दाबून दिले नाही.

व्यापम् प्रकरणात सर्व पक्षांचा मोठा हात दिसत आहे. त्यामुळेच विरोधी पक्ष सुद्धा लुटुपुटीचा विरोध करीत आहेत.

शिवराजसिंग चौहान यांची व भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे हे नक्की. ते जेवढा उशीर करतील तेवढा त्यांच्याविषयी संशय वाढत राहील.

नाव आडनाव's picture

5 Jul 2015 - 8:47 pm | नाव आडनाव

या घोटाळ्याशी संबंधित जे लोक जिवंत आहेत, ते कसे जगत असतील देवाला माहित. त्यांना मरणाची रोज - खरंतर दर तासाला, दर मिनिटाला भिती वाटत असेल.

इरसाल's picture

8 Jul 2015 - 4:38 pm | इरसाल

या घोटाळ्याशी संबंधित जे लोक जिवंत आहेत, ते कसे जगत असतील देवाला माहित. त्यांना मरणाची रोज - खरंतर दर तासाला, दर मिनिटाला भिती वाटत असेल.

मी तर असं म्हणतो की ही भिती अजुन हजारपट वाढेल तर चांगलेच आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jul 2015 - 9:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

व्यापम घोटाळा पाण्यातल्या बर्फासारखा, जितका वर (उघड) आहे त्यापेक्षा अनेक पटींनी लपवलेला आहे असेच दिसत आहे. छोट्यांपासून ते राज्यपालांच्या घरापर्यंत पसरलेल्या आणि सर्व राजकीय पक्षांना पंखाखाली घेतलेल्या ह्या घोटाळ्यातील सर्व सत्य बाहेर येईल असे वाटत नाही. कारण, इतका हजारो लोक गुंतण्याइतका मोठा घोटाळा असून आणि क्षुल्लक राईचे पर्वत बनविण्याची सवय असूनसुद्धा, कोणताच प़क्ष त्याचे भांडवल बनवू इच्छीत नाही !... यातच काय ते आले, नाही का ?!

यातील पहिली तक्रार २००० साली केली गेली. पण हे एवढे मोठे professional racket आहे हे मात्र समजायला २००७ साल उजाडले आणि त्यात अटकसत्र आणि मोठ्या प्रमाणावर तपास २०१३ पासून चालू आहे.

२०१३ मध्ये मध्यप्रदेश हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे special task force ची स्थापना झाली. पुढे याच कोर्टाने दिग्विजय सिंगांची CBI तपासणीची विनंती फेटाळून लावली. या घोटाळ्यामध्ये २००० पेक्षा जास्त आरोपी आहेत आणि आत्तापर्यंत १९०० आरोपींना अटक झालेली आहे व जवळपास ५०० आरोपी फरार आहेत. मुख्य आरोपी म्हणून राम नरेश यादव (राज्यपाल) यांचे नाव आहे जे कॉंग्रेसचे आहेत. तसेच भाजपाचे लक्ष्मीकांत शर्मा यांचे ही नाव आहे व त्यांनाही अटक झालेली आहे. अजून पण विविध पक्षांचे लोक यात अडकलेले असून सर्वांवर कारवाई (भाजपाच्या लोकांवर सुद्धा) चालू आहे.

त्यामुळे असे वाटत नाही की शिवराज सिंग कोणाला पाठीशी घालत आहेत.

विकास's picture

6 Jul 2015 - 8:59 pm | विकास

माहिती बद्दल धन्यवाद!

त्यामुळे असे वाटत नाही की शिवराज सिंग कोणाला पाठीशी घालत आहेत.

शिवराज सिंग यांची प्रतिमा स्वच्छ चारीत्र्याचे नेते म्हणून आहे. त्यामुळे काही म्हणा, पण त्यांच्याकडून अधिक अपेक्षा केल्या जातील. (जया अंगी मोठेपण...). त्या जागी दिग्गीराजा असते तर लोकं म्हणाली असती, चालायचचं!

नाखु's picture

8 Jul 2015 - 9:35 am | नाखु

या गंभीर बाबीवर तुटून पडत नाही अगदी कमुनिष्ट ही म्हणजे सगळेच गुंतलेले आहेत. भाजपाने याची सखोल आणि निप्क्ष चौकशी करून अगदी भाजपाचे आमदार असतील त्यांना सुद्धा जबर शिक्षा केली पाहिजे.

  • चांगला संदेश जाईल आणि संभाव्य भुजबळी थंडावतील
कपिलमुनी's picture

8 Jul 2015 - 1:23 pm | कपिलमुनी

निष्पक्ष प्रतिसाद
:)

विकास's picture

8 Jul 2015 - 9:19 pm | विकास

मध्यप्रदेश हायकोर्टाने मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांची सिबिआय चौकशी साठीची याचिका फेटाळून लावली! नक्की काय भानगड आहे कळत नाही!

श्रीगुरुजी's picture

8 Jul 2015 - 11:39 pm | श्रीगुरुजी

“We requested the (Madhya Pradesh) High Court that the probe should be done by CBI. The matter is likely to come up before the Supreme Court tomorrow. We will make the same prayer there too,” Chouhan said.

Earlier, the Madhya Pradesh High Court refused to hear the govt’s plea for a CBI probe into the Vyapam scam and deferred the matter till July 20.

The HC cited pendency of similar plea in Supreme Court for deferring the hearing. The apex court will hear the plea on July 9.

सर्वोच्च न्यायालयाने व्यापम घोटाळ्याची चौकशी सीबीआयला देऊ केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली हि चौकशी होण्याची शक्यता आहे. आजपर्यंत या केसशी संबंधित सगळ्या मृत्यूंची चौकशीही सीबीआय करणार आहे.

श्रीगुरुजी's picture

9 Jul 2015 - 12:38 pm | श्रीगुरुजी

सीबीआयचा आजवरचा इतिहास पाहिला तर सीबीआयच्या चौकशीतून फार काही निष्पन्न होणार नाही याची खात्री आहे.

सव्यसाची's picture

9 Jul 2015 - 12:51 pm | सव्यसाची

जर सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली हे झाले तर काहीतरी बाहेर निघेल असे वाटते. जर फक्त सीबीआय चौकशी करणार असेल तर मग काहीच सांगता येत नाही.

कपिलमुनी's picture

9 Jul 2015 - 1:06 pm | कपिलमुनी

सीबीआय ही केवळ राजकीय पक्षांची बटकी आहे.
जो पक्ष सत्तेवर त्यांच्या तालावर नाचण्यात धन्यता मानतात

सीबीआय ही केवळ राजकीय पक्षांची बटकी आहे...
खंप्लिटलि अ‍ॅग्री

नांदेडीअन's picture

22 Jul 2015 - 7:05 pm | नांदेडीअन

‘आप’च्या आमदारांना जेलमध्ये टाकण्यासाठी आता काही कारण भेटत नसल्यामुळे कदाचित दिल्ली पोलीसांनी हा नवीन मार्ग अवलंबला असावा.
कोणी सांगावे, व्यापमची अर्धशतकीय इनिंग दिल्लीमध्ये कंटिन्यु करून यांना शतक मारायचे असेल.
जरा दोन मिनिटांचा हा व्हिडिओ बघा.
https://www.youtube.com/watch?v=LlXuOny6W5Y

श्रीगुरुजी's picture

23 Jul 2015 - 2:04 pm | श्रीगुरुजी

ही चित्रफीत जेमतेम १ मिनिट ४८ सेकन्दान्ची आहे. यात बोलणार्‍या दिलीप पान्डेनेच काही दिवसान्पूर्वी एका वृत्तपत्राला मुलाखत देऊन असा दावा केला होता की दिल्ली सरकारने जरी काही वस्तून्वर मूल्यवर्धित कर वाढविला असला तरी त्यात पेट्रोल/डिझेलचा समावेश नाही आणि त्यामुळे पेट्रोल/डिझेलचे भाव अजिबात वाढणार नाहीत.

अर्थातच ही थाप होती, कारण गेल्याच आठवड्यात वाढीव मूल्यवर्धित करामुळे भारतात सर्वत्र पेट्रोल/डिझेलचे भाव कमी झाले असताना दिल्लीत त्यात वाढ झाली.

ही चित्रफीत एकूणच सन्शयास्पद आहे. चित्रफीत जेमतेम १ मिनिट ४८ सेकन्दान्ची आहे. इतक्या कमी वेळात चित्रफीतीत दाखविलेली घटना घडून जाणे अशक्य आहे. नक्कीच ही चित्रफीत एडीट आणि मॉर्फ केलेली दिसत आहे. दिलीप पान्डे घोळक्यात उभा राहून पत्रकारान्शी कॅमेर्‍यासमोर बोलत असताना दिल्ली पोलिसान्नी आपली व्हॅन त्याच्या अन्गावर घालून मारण्याचा प्रयत्न करणे ही शुद्ध थापेबाजी दिसतेय. जर व्हॅन खरोखरच दिलीप पान्डेवर आदळली असती तर त्याच्याबरोबर त्याच्या आजूबाजूला घोळक्यात उभे असलेले किमान १०-१२ जण ठार झाले असते व त्यावरून देशात वादळ माजले असते. त्यामुळे असे काही दिल्ली पोलिस करणे अशक्य आहे.

दुसरे म्हणजे दिलीप पान्डे तिथे उभा आहे हे व्हॅनचालकाला कसे कळले?

चित्रफीतीत व्हॅन येण्याचा प्रसन्ग ३३ व्या सेकन्दाला सुरू होतो आणि १०८ व्या सेकन्दाला व्हॅन निघून गेलेली दाखविली आहे.

व्हॅन जवळून जाते, नन्तर पुढे जाऊन थाम्बते, नन्तर जमाव व्हॅनच्या चालकाला बाहेर ओढून मारायचा प्रयत्न करतो, नन्तर आतले पोलिस बाहेर येऊन जमावाला शान्त करून परत व्हॅनमध्ये बसून निघून जातात हा सम्पूर्ण घटनाक्रम जेमतेम ७५ सेकन्दात घडणे ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे.

आणि ही घटना माध्यमान्मध्ये कशी नाही दिसली?

एकन्दरीत कोणत्या तरी सिनेमातील व्हॅनचे दृश्य, दिलीप पान्डे जमावात बोलत असल्याच्या दृश्यात मिसळून नवीन खोटी चित्रफीत तयार केली आहे हे अगदी स्पष्ट आहे. कान्गावखोर आणि खोटारड्या आआपच्या लोकान्ना असे करणे अगदी सहज शक्य आहे.

अर्धवटराव's picture

23 Jul 2015 - 11:17 pm | अर्धवटराव

मागे केजरीसाहेबांनी गुजरात दौरा करताना तिथे दशकभर विरोधकांचं शिरकण चाललय असा काहिसा निश्कर्ष काढला होता. तसं थेट विधनच केलं होतं म्हणाना. त्यांच्या पर्टीत थोडंफार तरी हे गुण उतरतीलच.
पोलीसांकरवी लांछानास्पद राजकीय हत्या भारतात दुर्दैवाने होतात. इतक्या गंभीर विषयाचं असं थिल्लरीकरण व्हावं... अवघड आहे.

पुण्याचे वटवाघूळ's picture

24 Jul 2015 - 10:23 am | पुण्याचे वटवाघूळ

इतक्या गंभीर विषयाचं असं थिल्लरीकरण व्हावं... अवघड आहे.

अर्धवटराव, आम आदमी पार्टीने कुठलाही सो कॉल्ड गंभीर विषय हाती घेतला की ते त्याचे थिल्लरीकरण करणारच. आपच्या नेत्याच्या रक्तातच असा नाटकीपणा असेल तर इतर समर्थकही तसेच असणार.

सुबोध खरे's picture

24 Jul 2015 - 10:29 am | सुबोध खरे

व्यापम थोडक्या शब्दात
http://www.thenewsminute.com/article/what-vyapam-scam-and-who-are-implic...

प्रसाद१९७१'s picture

24 Jul 2015 - 10:42 am | प्रसाद१९७१

ह्याचा इतका का बाऊ केला जातो आहे आणि ते सुद्धा भारतात? इथे प्रत्येक परीक्षेतच प्रचंड कॉपी होत असते. महाराष्ट्रात पण पुणे मुंबई च्या शहरी भाग सोडुन १० वी आणी १२ वी ला मोठ्या प्रमाणावर आणि ऑर्गनाईझ्ड कॉपी केली जाते. त्यात शाळा, कॉलेज आणि पालक सर्व भाग घेतात. बाकीच्या राज्याबद्दल तर बोलायलाच नको.

सध्या महाराष्ट्रात सुद्धा काही कोटी घेउन खात्रीशीर MBBS ची डीग्री मिळण्याची सोय असल्याचे ऐकुन आहे. ह्या स्कीम मधे कॉलेज सर्व काळजी घेते अगदी हजेरी सुद्धा लावली जाते. हा जो कोण डॉक्टर होणार असतो त्याला कॉलेज चे तोंड बघायची पण गरज नाही.

ह्या वर्षी सुद्धा राष्ट्रीय लेव्हलच्या प्रीमेडीकल परीक्षेत ५-७ लाख घेउन हाय्टेक कॉपीचे प्रकार उघडकीस आले आहेत. सर्वोच्च न्यायालयानी पुन्हा परीक्षा घ्यायला सांगितल्या आहेत.

सुबोध खरे's picture

24 Jul 2015 - 10:50 am | सुबोध खरे

प्रसाद साहेब
काही कोटी रुपये म्हणजे फार झाले. गेला बाजार रेट १८ ते ३५ लाख रुपये एम बी बी एस च्या प्रवेशासाठी आणि १० लाख रुपये फी दर वर्षी १० % फी वाढ दर वर्षी असे ७०-७५ लाख रुपयात आपले मुल एम बी बि एस होते. १ कोटी रुपये आज दिल्यावर आपल्या मुलाला एम बी बी एस आणि एम डी गायने कोलोजी (स्त्री रोग तज्ञ) असे पाकेज डील आहे. आपल्याला कुणासाठी प्रवेश हवा आहे का?
हा का ना का

प्रसाद१९७१'s picture

24 Jul 2015 - 10:54 am | प्रसाद१९७१

डॉक्टरसाहेब, मी कोटीची स्कीम सांगीतली ती वेगळी आहे. त्यात कॉलेज हजेरी लावणे, दुसर्‍याला परीक्षेला बसवून पास करणे वगैरे सर्व सोय करते. फक्त साडेचार वर्ष थांबायचे, पण एकदम फुलप्रूफ डीग्री, ते पण कॉलेजला न जाता, परीक्षेला न बसता. कधी काही चौकशी झाली तरे सर्व रे़कॉर्ड एकदम जागच्या जागी.

कपिलमुनी's picture

24 Jul 2015 - 11:20 am | कपिलमुनी

बाऊ यासाठी केला जातो कारण एवढ्या घाउक प्रमाणात सर्व पक्षीय सर्वसंमत घोटाळा करणे या बाकीच्यासाठी अन्याय आहे .
आणि यामधल्याअ साक्षीदारांचे हत्याकांड घडवले जात आहे.

पुणे मुंबई च्या शहरी भाग सोडुन १० वी आणी १२ वी ला मोठ्या प्रमाणावर आणि ऑर्गनाईझ्ड कॉपी केली जाते

केजरीवाल सारखा तद्दन खोडसाळ आरोप आहे . काही ठिकाणी कॉपी होत असेल पण मोठ्या प्रमाणावर आणि ऑर्गनाईझ्ड कॉपी मुळीच नाही.

सुबोध खरे's picture

24 Jul 2015 - 10:45 am | सुबोध खरे

https://en.wikipedia.org/wiki/Vyapam_scam
विस्तृत प्रमाणात व्यापम.
माझ्या मध्य प्रदेशातील मित्राच्या म्हणण्याप्रमाणे हा घोटाळा कोणत्याही एका पक्षाचा नसून सर्व पक्षीय लोकांचा आहे. सर्व पक्षात चोर लोक असतातच. हा घोटाळा फार खोलवर रुजलेला आहे आणि तो शोधून काढणे आणि आरोपींना शिक्षा देणे हा कार्यक्रम ५ पंच वार्षिक योजनांची बेगमी होईल इतका आहे.
तेथिलच एका भाजपाच्या कार्यकर्त्याच्या शब्दात-- बरेच भाजपचे कार्यकर्ते २०१४ च्या निवडणुकीच्या अगोदर कॉंग्रेस आणि इतर पक्षातून भाजप मध्ये आलेले आहेत आणि त्यांना भाजप ने तिकीट देऊन चूक केली. ( मुळात जे लोक निवडून येऊ शकतील अशांनाच भाजप प्रवेश आणि तिकीट दिले गेले) त्यामुळे आज अनेक मुळचे काँग्रेसी (आणि आता भाजपचे) या व्यापम मध्ये अडकलेले आहेत आणि त्यांचे साटेलोटे मुळ पक्षाशी आहेत म्हणून कॉंग्रेस यावर " हात रे" सारखा क्षीण आवाज उठवत आहे. ( यातील राजकीय रंग काढून टाकला तरी मूळ मुद्दा लक्षात येईल) "मिल जुल के खाओ"

कपिलमुनी's picture

24 Jul 2015 - 11:22 am | कपिलमुनी

व्यापाम हा एका राजकीय पक्षाचा घोटाळा नसून म. प्रा. मधल्या नोकरशाहीने सर्व पक्षीय संधान बांधून घडवलेला घोटाळा आहे.
त्यामुळे सध्या तेरी भी चूप मेरी भी चूप असे धोरण सर्वांनी घेतले आहे

अभिजित - १'s picture

24 Jul 2015 - 11:49 am | अभिजित - १

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/bmc/articlesho...

महापालिकेतील सब इंजिनीअरला पाच लाखांची लाच घेताना बुधवारी सकाळी एसीबीने रंगेहाथ पकडले. त्यामुळे लाचखोरीचा मुद्दा हा प्रकर्षाने अधोरेखित झाला आहे. एसीबीने या वर्षांत मुंबईत आतापर्यंत केलेल्या कारवाईवर नजर टाकली असता, लाचखोरीच्या ३६ सापळ्यांपैकी २० प्रकरणे ही पोलिस आणि पालिका यांच्या विभागाशी संबंधित आहेत. या २० प्रकरणांमध्ये ३० पोलिस अधिकारी-कर्मचारी आणि पालिका कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले आहे. लाच घेताना पकडल्यानंतरही आपल्या कर्मचाऱ्यांना पाठिशी घालण्यात मात्र पालिका पुढे असल्याचेच दिसून येत आहे. २०१३पासून आतापर्यंत कारवाई केलेल्या पालिकेच्या ११ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पालिकेने निलंबित केलेले नाही. याविषयी एसीबीचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांना विचारले असता ते म्हणाले, 'वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कनिष्ठांवर वचक नसल्यामुळेच लाचखोरांना प्रोत्साहन मिळते. लाचखोरांना पकडल्यानंतर त्यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई केली, तर अन्य कर्मचाऱ्यांनाही जरब बसेल.'

dadadarekar's picture

24 Jul 2015 - 12:51 pm | dadadarekar

कोट्यावधी रु खर्चलेली चिक्की खराब असल्याने सरकारने मागे घेतली आहे.

राज्य ह केन्द्राचेच पिल्लू.

dadadarekar's picture

24 Jul 2015 - 1:37 pm | dadadarekar

http://www.mtmobile.in/text/details.php?storyid=48199238&section=tajya-b...

लाच द्लि नसल्याने रेलवेतून फेकले.

काळा पहाड's picture

24 Jul 2015 - 2:50 pm | काळा पहाड

हेच काय अच्चे दिन म्हणायचं राहिलं की

नांदेडीअन's picture

30 Jul 2015 - 11:16 am | नांदेडीअन

Disappointed with functioning of Prime Minister's Office
- Magsaysay awardee Sanjiv Chaturvedi
http://www.firstpost.com/india/disappointed-functioning-prime-ministers-...

भाजपाशी लागेबांधे असणार्‍यांची प्रकरणे यांनी बाहेर काढली होती.
त्यामुळे काही महिन्यांपूर्वीच त्यांना एम्सच्या Chief Vigilance Officer (CVO) या पदावरून काढून टाकण्यात आले होते.
असा निडर अधिकारी दिल्लीत असावा म्हणून केजरीवालने केंद्र सरकारला विनंती केली होती की या अधिकार्‍याची पोस्टिंग दिल्लीला करण्यात यावी.
पण ‘ना काम करूंगा, ना करने दुंगा’ हे भाजप सरकारने इतके मनावर घेतले आहे की त्यांनी या विनंतीला केराची टोपली दाखवली.

आज त्याच अधिकार्‍याला प्रतिष्ठेचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे.
त्यामुळे भक्तांनी आणि परमभक्तांनी संजीव चतुर्वेदी यांना देशद्रोही ठरवून पाकिस्तानमध्ये पाठवून द्यायला हरकत नाही.

श्रीगुरुजी's picture

30 Jul 2015 - 12:41 pm | श्रीगुरुजी

>>> असा निडर अधिकारी दिल्लीत असावा म्हणून केजरीवालने केंद्र सरकारला विनंती केली होती की या अधिकार्‍याची पोस्टिंग दिल्लीला करण्यात यावी.

हहपुवा. केजरीवालांचा भंपकपणा संपत नाही आणि त्यांच्या भंपकपणावर अंधश्रद्धा ठेवणार्‍यांची संख्या अतोनात आहे.

हेच केजरीवाल आपल्या मंत्रीमंडळातील तोमर व इतर सहकार्‍यांच्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालतात आणि शकुंतला गॅम्लीन सारख्या आपल्या नावडत्या अधिकार्‍यांवर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करतात.

आपल्यावर पोलिसांनी व्हॅन घालून मारण्याचा प्रयत्न केला हे दाखविणारी खोटी चित्रफीत यांचेच दिलीप पांडे तयार करतात आणि त्यावर केजरीवाल मौन धरतात.

हेच केजरीवाल २०१३ पर्यंत शीला दिक्षितांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत होते आणि मुख्यमंत्री झाल्यावर हेच केजरीवाल त्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे मागायला लागले.

हेच केजरीवाल करदात्यांच्या पैशातून स्वतःचा उदोउदो करणार्‍या दोन-दोन मिनिटांच्या जाहिराती दाखवितात, स्वतःला ७ खोल्यांचा बंगला घेतात आणि दरमहा लाखो रूपयांची वीज जाळून विजेचे बिल करदात्यांच्या पैशातून भरतात.
.
.
.

आणि हेच केजरीवाल असा निडर अधिकारी दिल्लीत असावा म्हणून केंद्र सरकारला विनंती करतात!

वा!

>>> त्यामुळे भक्तांनी आणि परमभक्तांनी संजीव चतुर्वेदी यांना देशद्रोही ठरवून पाकिस्तानमध्ये पाठवून द्यायला हरकत नाही.

त्यामुळे अंधभक्तांनी आणि परमभक्तांनी केजरीवाल यांना महान देशभक्त ठरवून अमेरिकेतील 'स्वातंत्र्य देवतेच्या' पुतळ्याप्रमाणे केजरीवालांचा अका हातात भ्रष्टाचाराविरूद्ध लढण्यासाठी मशाल घेतलेला, दुसर्‍या हातात झाडू घेतलेला आणि डोक्यावर आआपची 'मै केजरीवाल हूं' असे लिहिलेली टोपी घातलेला १००० मीटर उंच पुतळा उभारण्यास हरकत नाही.

गॅरी ट्रुमन's picture

30 Jul 2015 - 3:04 pm | गॅरी ट्रुमन

आज त्याच अधिकार्‍याला प्रतिष्ठेचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे.

या केसमध्ये कोणाची बदली कुठे झाली आहे याची कल्पना नाही.पण मॅगॅसेसे पुरस्काराचे कौतुक तुम्ही सांगूच नका. तो पुरस्कार केजरीवाल सारख्या अत्यंत ढोंगी आणि नाटकी माणसालाही मिळाला तिथेच त्या पुरस्काराचे अवमूल्यन झाले.तेव्हा तुमचा तो मॅगॅसेसे पुरस्कार तुमच्याकडेच ठेवा.हिंग लावून विचारणार नाही त्याला.

बाकी केजरीवालांना एका अतरंगी स्वभावाबद्दल मात्र मानले. लहान मुले कशी मोठ्या माणसांनी बराच वेळ लक्ष दिले नाही की भोकाड पसरून किंवा अन्य काहीतरी करून आपल्याकडे लक्ष वेधून घेतात त्याप्रमाणेच केजरीवालांचे आहे. एक तर गेली २-३ दिवस कलामसाहेबांच्या निधनामुळे आणि याकूब मेमन प्रकरणामुळे त्यांच्याकडे फारसे लक्ष कोणाचे गेले नाही. त्यातूनच अजय माकन यांच्या याचिकेवर हायकोर्टाने म्हटले-- दिल्ली सरकारच्या जाहिराती म्हणजे करदात्यांच्या पैशाचा अपव्यय आहे असे वरकरणी वाटते. ही प्रतिकूल टिप्पणी आली. आता काय करा? मग या बदल्यांविषयी आकांडतांडव करून आपल्यावर सतत प्रसिध्दीचा झोत कसा राहिल हे केजरीवाल बघत असतील अशीच शंका केजरीवालांचा पूर्वेतिहास लक्षात घेता आली.

हे अधिकारी कोण आहेत, खरोखरच चांगले आहेत का, त्यांची गरज दिल्लीत अधिक की जिथे कुठे त्यांना हलविले आहे तिथे अधिक इत्यादी गोष्टी मला माहित नाहीत. पण केजरीवाल कुठलाही मुद्दा उठवायला लागले की पहिली हीच शंका येते. केजरीवालांमुळे जितक्या महत्वाच्या गोष्टींचे ट्रिव्हियलायझेशन झाले असेल तितके क्वचितच इतर कुणा राजकारण्यामुळे असेल.

पुतळ्याचि उंची कितिहि असो पण ह्याचा पुतळा उभारणे आवश्यक आहे... तो सुदीन लवकर येवो.

होबासराव's picture

30 Jul 2015 - 3:38 pm | होबासराव

सरकारनामा

अभिजित - १'s picture

30 Jul 2015 - 4:06 pm | अभिजित - १

मगसेसे काय , नोबेल जरी मिळालं तरी ते ठेवा तुमच्या कडे . हा सगळा वैश्विक कट आहे. मोदी सारखा पंतप्रधान फार नवसा ने मिळाला आहे भारतीय जनतेला. त्या वर जळतात हे लोक. मोदी साहेबाना अख्या देशाचा कारभार सम्भलयचा आहे. ते असल्या चिल्लर एम्स कडे कुठून लक्ष देणार ? आता झाला जरी तिकडे छोटा मोठा घपला , त्याच्यात मोदी साहेबांचा चा काय दोष ? त्यांना काय तितकीच कामे आहेत काय ?
RBI वगैरे गड त्यांना जिंकायाचेत. इंटरेस्ट रेट ठरवायचं अधिकार काबीज करायचाय. ते पहिले. अंबानी अदानी आज नवनिर्माण करायला एका पायावर तयार आहेत. NPA वाढले आहेत सरकारी बँक चे त्यात पण मोदी साहेबांचा काय पण दोष नाही हे आधीच सांगून टाकतोय.
५ star मध्ये MP राहतात, त्यांचे पगार वाढवायचे काम करायचेय. disinvestment करून ३० / ४० हजार कोटी निर्माण करायचेत. ज्याच्या वर बाबूशाही जोमाने फोफावेल. ८ व्या वेतन आयोगात बघाच तुम्ही. बाकी आम जनता मूर्ख आहे म्हणून ती १५ / २० हजार महिना पगार वर काम करते. सरकारी बाबू काही तसले नाहीत. काय समजलात ? आणि बाबुना हा पैसा कमी पडला तर जनतेवर नवीन tax कधी लावता येतीलच. शेवटी भारतीय जनतेचा फायदाच आहे ह्या सगळ्यात.
बाकी नेट neutrality ला वगैरे ते यु खिशात घालतीलच हा विश्वास आहे. हि सगळी पाश्चिमात्य देशांची नाटके आहेत. इकडे हा असला भंकस प्रकार अजिबात नको.
अर्थात हे सगळे एकदम करणार नाहीत ते. पण हळू हळू तिकडेच वाटचाल चालू आहे त्यांची. आणि ते यशस्वी होणारच.
Dear Guruji. Pls don't get stressed. This is my last post on this thread !!

dadadarekar's picture

30 Jul 2015 - 6:03 pm | dadadarekar

हा हा हा हा !!!!

पेट्रोल उतरले , भ्रष्टाचार शून्यावर आलाय म्हणे.

पण रिक्षा , बस , .... ते अगदी तूरडाळ सगळे का महाग होतेय हे समजेना झालेय.

काँग्रेसमुक्त भारत म्हणे ! काँग्रेस , रा वा वगैरेचीच माणसे भाजपात आयात करून मोदी सत्तेवर आलेत ना ?

पण असे नेहमी 'इश्श' किंवा 'अग बै' म्हणाल तर मात्र पंचाईत होइल तुमचि नाहि हो...तुमच्या मतदारांचि..

विकास's picture

3 Aug 2015 - 9:09 pm | विकास

केजरीवाल सरकारने मुख्यत्वे मोदी सरकार विरोधातील आणि आत्मप्रौढीसाठीच्या जाहीरातींवर सरकारी तिजोरीतून गेल्या ३ महीन्यात रु. २२ कोटी फक्त खर्च केले आहेत. त्यांचे जाहीरातींसाठीचे वार्षिक अंदाजपत्रक हे रू. ५२६ कोटी फक्त आहे.

श्रीगुरुजी's picture

10 Aug 2015 - 2:26 pm | श्रीगुरुजी

आआपवाल्यांचा अजून एक खोटारडेपणा उघडकीला आला आहे.

आपल्याला भाजपच्या आमदाराच्या दुकानात काम करणार्‍या नोकराने डोक्यात दगड मारून जखमी केले असा आरोप काल अलका लांबाने केला होता. आज त्यातला खोटेपणा उघड झाला.

ही आहे वस्तुस्थिती -

१) ते दुकान भाजप आमदाराचे नसून त्याच्या भावाचे आहे. तो भाऊ राजकारणात नाही. परंतु आआपने ताबडतोब भाजपवर आरोप केला आहे.

२) सर्वात आधी त्या दुकानात अलका लांबा व तिच्या टोळीने जाऊन बिलिंग मशीन उलथून दिले व बिलिंग मशीन ठेवलेल्या टेबलाला लाथ मारून उलथून टाकल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे. अलका बिलिंग मशीन ढकलून खाली पाडताना तिच्या डोक्यावर कोठेही जखम किंवा बॅन्डेज दिसत नाही. त्यामुळे दगड मारायच्या आधीच या टो़ळक्याने दुकानात झूंडीने जाऊन तोडफोड/नासधूस केलेली आहे. अलकाचा दावा आहे की दगड मारल्यानंतरचे हे चित्रीकरण आहे. परंतु दगड लागल्यानंतरचे हे चित्रीकरण असेल तर तिच्या डोक्यावर जखम किंवा बॅन्डेज कसे नाही आणि तिचे दोन्ही हात दुकानात शिरल्यापासून मोकळेच दिसतात. इतक्यात जखम वाळली असावी.

३) दगड मारल्याचे किंवा मारतानाचे चित्रण कोठेही नाही. मात्र दगड मारल्यानंतर अलका डाव्या हातात रूमाल घेऊन तो डाव्या कानाच्या वरच्या बाजूला दाबून धरल्याचे दिसत आहे व त्याचवेळी ती उजव्या हाताने भ्रमणध्वनी संच उजव्या कानाला लावून बोलताना दिसत आहे. याचा अर्थ जर दगड लागला असेल तर तो डाव्या कानाच्या वर लागलेला आहे. परंतु दाबून धरलेल्या रूमालावर कोठेही रक्त दिसत नाही.

४) नंतरच्या छायाचित्रात अलकाच्या डोक्याभोवती हनुवटीपासून बॅन्डेज गुंडाळलेले दिसत असून डाव्या बाजूऐवजी उजव्या कानाच्या वर बॅन्डेजच्या आत बॅन्डएडच्या पट्ट्या लावलेल्या दिसत आहेत व डाव्या कानाच्या बाजूला काहीही लावलेले दिसत नाही. म्हणजे दगड उजव्या बाजूला कानाच्या वर लागला असावा.

५) नंतरच्या छायाचित्रात संपूर्ण बॅन्डेज बदललेले आहे आणि दोन्ही कानांच्या वर बॅन्डएड दिसत नाही. म्हणजे दगड कोठेच लागलेला नाही व नसलेल्या जखमेवर बॅन्डेज गुंडाळलेले दिसते.

६) वाहिन्यांशी बोलताना अलकाने डाव्या हाताने खुणा करून दाखविले की दगड कसा आला व डाव्या कानाच्या वर लागला व लगेच तिने वर पाहिल्यावर दुकानाच्या गच्चीतून एक मुलगा पळत आत जाताना दिसला. कोणालाही डोक्यावर दगड लागून जखम झाली तर उस्फूर्त प्रतिक्रिया खाली वाकण्याची असते. परंतु अलकाने वर बघितलेले दिसते.

७) अवतारी महापुरूष श्री श्री १००८ केजरीवाल यांनी लगेच ट्विट करून 'अलका, मुझे तुमपर गर्व है' असे ट्विट करून अलकाच्या खोटारडेपणाबद्दल आणि गुंडगिरीबद्दल आपल्याला अभिमान वाटतो असे जाहीर केले आहे.

निष्कर्ष -

आआपच्या भूतकाळातील इतर सर्व आरोपांप्रमाणेच हा आरोप देखील खोटा आहे कारण अशी घटना घडल्याचे दिसत नाही. डोक्यावर नक्की कोठे जखम झाली (डाव्या बाजूला की उजव्या बाजूला की जखम झालीच नाही) याबद्दल संभ्रम आहे. अलका व तिच्या टोळक्याने दुकानात घुसून गुंडगिरी केल्याचे स्पष्ट दिसत आहे.

आआपने नेहमीप्रमाणेच भाजपवर खोटा आरोप केला आहे.

यापूर्वी केजरीवाल स्वतःच्या कार्यकर्त्यांकडून स्वतःला थोबाडीत मारायला लावायचे किंवा स्वतःच्या कपड्यांवर शाई शिंपडायला सांगायचे, पण त्यासाठी भाजपला जबाबदार धरायचे.

एप्रिलमध्ये केजरीवाल आणि त्यांच्या कंपूने गजेंद्रसिंहला आत्महत्या करायला लावली, त्याच्या नावाने खोटी चिठ्ठी लिहिली आणि नाव मात्र भाजपचे घेतले.

१-२ आठवड्यांपूर्वी आआपच्या दिलीप पांडेने खोटी चित्रफीत तयार करून दिल्ली पोलिस आपल्यावर व्हॅन घालून मारायचा प्रयत्न करीत होते असा खोटा आरोप केला.

मागील वर्षी आआपच्या मंत्री राखी बिर्लाने असा आरोप केला की आपल्या गाडीवर दगडफेक करून काच फोडली. प्रत्यक्षात हे सिद्ध झाले की रस्त्यात खेळणार्‍या मुलांचा चेंडू तिच्या गाडीवर लागला होता.

अंतर्बाह्य खोटारडे आणि ढोंगी असणार्‍या आआपवाल्यांनी आता हा डोक्यात दगड मारल्याचा नवीन खोटा आरोप केला आहे. हे आयुष्यात कधीही प्रामाणिकपणे वागू शकणार नाहीत.

दिल्लीच्या जनतेने जो मूर्खपणा केला त्याची फळे दिल्लीकरांना भोगावी लागणारच. ५ वर्षांनंतर दिल्लीकरांच्या पदरात काय असेल? जनतेच्या पैशाने हजारो कोटी रूपये खर्च करून केजरीवालांच्या उदोउदो करणार्‍या जाहिराती आणि आआपचे स्वतःवर हल्ले झाल्याचे खोटे आरोप याव्यतिरिक्त दिल्लीकरांच्या हाती काहीही लागणार नाही.

जय राधे मां!

गॅरी ट्रुमन's picture

10 Aug 2015 - 3:55 pm | गॅरी ट्रुमन

हे आपवाले जामच माजले आहेत.जनतेने गाढवांना निवडून दिले तर मग त्याच गाढवांनी लाथा मारल्या अशा तक्रारींना ५ वर्षे तरी काही अर्थ नसतो.

दिल्लीच्या जनतेने जो मूर्खपणा केला त्याची फळे दिल्लीकरांना भोगावी लागणारच. ५ वर्षांनंतर दिल्लीकरांच्या पदरात काय असेल? जनतेच्या पैशाने हजारो कोटी रूपये खर्च करून केजरीवालांच्या उदोउदो करणार्‍या जाहिराती आणि आआपचे स्वतःवर हल्ले झाल्याचे खोटे आरोप याव्यतिरिक्त दिल्लीकरांच्या हाती काहीही लागणार नाही.

+१

नांदेडीअन's picture

12 Aug 2015 - 10:04 am | नांदेडीअन

27 judges, sitting & retired, get High Court notice for plots they got from Gujarat govt
http://indianexpress.com/article/india/gujarat/27-judges-sitting-retired...

श्रीगुरुजी's picture

12 Aug 2015 - 2:18 pm | श्रीगुरुजी

लिंक उघडत नाही.

श्रीगुरुजी's picture

12 Aug 2015 - 11:28 pm | श्रीगुरुजी

आताच लिंक उघडली आणि बातमी वाचली. तुमच्या इतर "भ्रष्टाचाराच्या" आरोपांच्या लिंकप्रमाणे हा देखील फुसका आणि सादळलेला बार निघाला. तस्मात यापुढे केजरीवाल आणि त्यांच्या टोळीवर कसा अन्याय होत आहे या बातम्या देताना आणि केजरीवाल सरकार सोडून इतर सर्वजण कसे भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले आहेत अशा बातम्या देताना स्वतः आधी नीट वाचा आणि त्यात काही तथ्य असेल तरच इथे द्या अशी विनंती करतो.
___________________________________________________

वरील बातमीत दिल्याप्रमाणे खालील वस्तुस्थिती दिसते.

गुजरातमधील "commission of inquiry for polarisation of population on the basis of different religions" या आयोगाच्या अध्यक्षपदी २००९ मध्ये नेमणूक झाल्यावर न्यायाधीश सेठना यांनी स्वतःसाठी ४०० स्क्वेअर मीटर्स क्षेत्रफळाचा भूखंड आपल्याला द्यावा अशी मागणी केली होती. त्यांच्या दाव्यानुसार त्यांचे पद वर्तमान उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या बरोबरीचे असल्याने असा भूखंड मिळणे हा आपला कायदेशीर हक्क आहे असा त्यांचा दावा होता.

सेठनांनी २०१३ मध्ये गुजरातच्या उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश यांना पत्र लिहून भूखंड देण्यासाठी आपल्या नावाची शिफारस करावी अशी मागणी केली होती. परंतु अहमदाबादच्या जिल्हाधिकार्‍यांनी असे सांगितले की गुजरात सरकारच्या ६ नोव्हेंबर २००८ च्या आदेशानुसार असे भूखंड फक्त वर्तमान उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना किंवा गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून भूतकाळात काम केलेल्या न्यायाधीशांना किंवा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच देता येतात. वरील अटीत न्यायाधीश सेठना बसत नसल्याने असा भूखंड मिळण्यास ते पात्र नाहीत

न्यायाधीश सेठनांचा असा दावा आहे की वरील आदेश ही एक मोठी भानगड आहे व या प्रकरणाची चौकशी करावी यासाठी त्यांनी एक जनहित याचिका दाखल केली आहे.

त्यानुसार न्यायालयाने २७ वर्तमान व निवृत्त न्यायाधीश, राज्य महसूल विभाग आणि अहमदाबाद महानगरपालिका यांना नोटिसा पाठविल्या आहेत. यामध्ये गुजरातमधील ८ वर्तमान न्यायाधीश, मुंबई व ओरिसा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि एक वर्तमान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत.

सारांश - भूखंड मिळविण्यासाठी लागणार्‍या अटींची पूर्तता करता न आल्याने न्यायाधीश सेठनांना भूखंड मिळाला नाही व त्यामुळेच त्यांनी आपल्याला भूखंड मिळावा यासाठी हा खटाटोप केला आहे. ही बातमी "भ्रष्टाचाराचा भस्मासूर" या धाग्यात टाकण्याचे प्रयोजन समजले नाही कारण यात कोठेही भ्रष्टाचार झालेला दिसत नाही आणि निव्वळ वैयक्तिक मागणीतून ही जनहित याचिका केलेली आहे.

श्रीगुरुजी's picture

13 Aug 2015 - 2:00 pm | श्रीगुरुजी

नांडेडिअन यांच्या फुसक्या आणि सादळलेल्या फटाक्यातील उरलीसुरली वात न जळता, धूर न येता, आवाज किंवा प्रकाश येताच विझून गेली.

आजच्या वृत्तपत्रातील बातमीनुसार, गुजरात उच्च न्यायालयाने २७ वर्तमान व निवृत्त न्यायाधीश, राज्य महसूल विभाग आणि अहमदाबाद महानगरपालिका यांना ज्या नोटिसा पाठविल्या आहेत, त्या नोटिसा घाईघाईत पाठविलेल्या आहेत असे कारण देऊन सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

श्रीगुरुजी's picture

14 Aug 2015 - 8:44 pm | श्रीगुरुजी

आआपच्या अंधभक्तांसाठी -

http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/arvind-kejr...

Delhi Chief Minister Arvind Kejriwal has been fighting a vociferous battle - through radio spots — with the Centre for handing over control of police to Delhi government. But information accessed under Right to Information Act has revealed that Kejriwal has not written a single letter to the Centre on the issue.

The application was filed after Turkman Gate road rage case where a man was beaten to death in front of his children and a farmer's alleged suicide at an AAP rally at Jantar Mantar. The replies from different public authorities were received last week and said that Delhi government had not even written letters to expedite probes in the two cases.

After a gruesome murder case in Anand Parbat where a girl was stabbed multiple times last month, Kejriwal had started a media campaign seeking control over Delhi Police. In a radio advertisement, he had appealed directly to Modi addressing him as "Sir" and seeking his intervention.

Speaking to ET, Bhattacharya pointed out, "The replies show that Kejriwal has not written any letter to formally seek control over Delhi Police. It makes one wonder if all the advertisements in the media are just to carry on a blame game and not seriously address such an issue."

नांदेडीअन's picture

21 Aug 2015 - 10:22 pm | नांदेडीअन

ना काम करेंगे, ना करने देंगे ।

दिल्लीमध्ये शीला दीक्षित यांच्या काळात झालेल्या सीएनजी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या सरकारने एक चौकशी आयोग नेमला होता, ज्यात मोठमोठे अधिकारी अडकण्याची शक्यता होती.
पण आज केंद्र सरकारने एक नोटीस काढून हा चौकशी आयोग रद्द केला.
स्वतः काही करायचे नाही आणि दुसरे कोणी काही करत असेल, तर त्यालाही ते करू द्यायचे नाही.

जनतेचे लक्ष या बातमीपासून वळवण्यासाठी भाजपा पोलीसांनी आज दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीच्या अजून एका आमदाराला अटक केली.
बरं, अटकेचे कारण काय, तर आपच्या या आमदाराने म्हणे दिल्ली महानगरपालिकेच्या एका कर्मचार्‍याला शिवीगाळ आणि मारहाण केली.
या आमदाराच्या म्हणण्याप्रमाणे महानगरपालिकेचे काही कर्मचारी एका हातगाडा चालवणार्‍याला त्रास देऊन त्याच्याकडून पैसे उकळत होते.
त्यावेळी त्यांनी फक्त या कर्मचार्‍यांना याचा जाब विचारला.

त्या आमदाराचे नाव आहे कमांडो सुरेंद्र सिंह.
सुरेंद्र सिंह हे एक माजी एनएसजी कमांडो आहेत.
२६/११ च्या हल्ल्यात आतंकवाद्यांसोबत लढताना ते जखमी झाले होते, परिणामी त्यांना आज एका कानाने कमी ऎकू येते.
हे सांगण्याचे कारण एवढेच की भाजपा आम आदमी पार्टीला विनाकारण त्रास देण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकते, याची तुम्हाला कल्पना यावी.

अर्धवटराव's picture

21 Aug 2015 - 11:57 pm | अर्धवटराव

शीला दिक्षीतांविरुद्ध खंडीभर पुरावे हातात असणारे आणि त्याद्वारे शीलाबाईंना जेलची हवा खायला भाग पाडण्याचा दावा करणारे केजरीवाल आता चौकशी आयोगाच्या आधाराची, आणि ते ही काहि बड्या अधिकार्‍यांच्या इन्व्हॉल्व्ह्मेण्टची बात करतात... आणि त्याची बातमी करावी लागते त्यांना??

श्रीगुरुजी's picture

22 Aug 2015 - 1:04 pm | श्रीगुरुजी

बरं, अटकेचे कारण काय, तर आपच्या या आमदाराने म्हणे दिल्ली महानगरपालिकेच्या एका कर्मचार्‍याला शिवीगाळ आणि मारहाण केली.
या आमदाराच्या म्हणण्याप्रमाणे महानगरपालिकेचे काही कर्मचारी एका हातगाडा चालवणार्‍याला त्रास देऊन त्याच्याकडून पैसे उकळत होते.
त्यावेळी त्यांनी फक्त या कर्मचार्‍यांना याचा जाब विचारला.

आआपच्या आमदारावर कसा विश्वास ठेवायचा. आजपर्यंत दस्तुरखुद्द केजरीवालांपासून राखी बिडला, दिलीप पांडे, अलका लांबा, जितेंद्र तोमर, सोमनाथ भारती इ. चा खोटारडेपणा असंख्य वेळा उघडकीला येऊन सिद्ध झाला आहे. तस्मात हे सुरेंद्र सिंह जे सांगतात ते आआपच्या परंपरेला अनुसरून खोटेच असणार. त्यामुळे या सुरेंद्र सिंहांवर अजिबात विश्वास ठेवता येत नाही.

>>> हे सांगण्याचे कारण एवढेच की भाजपा आम आदमी पार्टीला विनाकारण त्रास देण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकते, याची तुम्हाला कल्पना यावी.

भाजपला बदनाम करण्यासाठी केजरीवाल आणि आआप किती खालच्या थराला जाऊ शकते याची तुम्हाला कल्पना आहेत. केजरीवालांनी स्वतःला थोबाडीत मारण्याचे फेक कार्यक्रम मॅनेज केले आणि लगेच भाजपवर खोटे आरोप केले. दिलीप पांडेने आपल्यावर केंद्र सरकारच्या पोलिसांनी व्हॅन घालून मारायचा प्रयत्न केला अशी खोटी चित्रफीत तयार केली. अलका लांंबाने भाजप आमदाराच्या भावाच्या दुकानात जाऊन तोडफोड केली आणि आपल्याला दगड मारला अशी खोटी बतावणी केली. राखी बिडलाने मुलांचा खेळताना चेंडू गाडीवर आपटल्यावर, आपल्या गाडीवर दगडफेक केली अशी खोटी तक्रार दिली. गजेंद्र सिंहला आआपच्या सर्व नेत्यांनी प्लॅन करून आत्महत्येला प्रवृत्त केल्यावर दोष भाजपला दिला.

सारांश - भाजपच्या बदनामीसाठी आणि प्रसिद्धीसाठी हपापलेले केजरीवाल आणि त्यांचा पक्ष कितीही खालच्या थराला जाऊ शकतात.

मार्मिक गोडसे's picture

26 Aug 2015 - 3:59 pm | मार्मिक गोडसे

ममोचे सरकार २ जी स्पेक्ट्रम व कोळसा घोटाळ्यामुळे गेले. 'ना करुंगा ना करने दुंगा' असे म्हणत नमोचे सरकार आले. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव झपाट्याने खाली आले, त्यामुळे देशातील पेट्रोल व डिझेलचे दरही कमी झाले, परंतु त्यामुळे ना खासगी वाहतुक सेवांचे ना सरकारी वाहतुक सेवांचे दर कमी झाले. एलबीटी गेला तरी पेट्रोल व डिझेलवरील स्थानिक कर कमी झाले नाही,ग्राहकांना लुबाडणे चालुच आहे.

गेल्या एका वर्षात डाळींचे भाव दुप्पट झाले. कांदा महागला. परंतू नमो सरकारने डाळी व कांदा आयात करुन भाव नियंत्रणात आणले नाही. व्यापार्‍यांच्या साठेबाजीकडे वा नफेबाजीकडे दुर्लक्ष केले. व्यापार्‍यांनी करोडो रुपये कमावले. हा एक प्रकारचा घोटाळाच आहे, 'बनिया घोटाळा' म्हणता येईल त्याला.

साखरेचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे साखरेचे किरकोळ बाजारातील भाव २२ रु. प्रतीकिलो इतके खाली आले होते. नमो सरकारने निर्यात साखरेचा कोटा वाढविल्यामुळे १० दिवसात साखरेचा भाव २६ रु. प्रतीकिलो झाला. ह्यातही व्यापार्‍यांनी प्रचंड फायदा क्मावला.

असे बरेच न उघडकीस येणारे 'बनिया घोटाले' आपल्याला पुढील काळात बघावयास मिळतील. २ जी व कोळसा घोटाळ्यात देशाचे महसुली नुकसान झाले असेल परंतू प्रत्यक्ष जनतेच्या खिशाला फटका बसला नाही. परंतू ह्या 'बनिया घोटाळ्यामुळे' जनतेच्या खिशाला फटका बसतोय.

श्रीगुरुजी's picture

29 Aug 2015 - 3:10 pm | श्रीगुरुजी

राजस्थानमधील अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळ्यासंबंधात माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोट, सचिन पायलट, पी चिदंबरम यांचे सुपुत्र कार्ती चिदंबरम, वायलर रवी यांचे सुपुत्र रवी कृष्णा इ. च्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात छगन भुजबळ यांच्या मालमत्तेविरूद्ध धाडी टाकून त्यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील बाळगंगा धरण घोटाळा प्रकरणी कंत्राटदार व अधिकार्‍यांविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अजित पवार आणि तटकरे यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हरयानातील कॉंग्रेस सरकारने वड्राला दिलेली जमीन काढून घेतलेली आहे.

अमेठीतील राजीव गांधी ट्रस्टने बळकावलेली जमीन शेतकर्‍यांना परत द्यायचा न्यायालयाने आदेश दिला आहे.

दिल्ली जल बोर्ड वॉटर टँकर घोटाळा प्रकरणातील मुख्य संशयित शीला दिक्षित यांच्याविरूद्ध एफआयआर अजूनही दाखल केलेला नाही.

राजस्थान, महाराष्ट्र, हरयाना या राज्यात भाजप सत्तेवर आहे. दिल्लीत आआप सत्तेवर आहे. फरक सहज लक्षात येतोय.

dadadarekar's picture

29 Aug 2015 - 9:21 pm | dadadarekar

बळजबरीच्या भूमी अधिग्रहण काय्ड्याला काँग्रेसने विरोध केला होता. हे त्याचे फळ काय ?

मार्मिक गोडसे's picture

29 Aug 2015 - 10:13 pm | मार्मिक गोडसे

असे एफआयआर दाखल केले की 'बनिया घोटाळे' करण्याचा अधिकार प्राप्त होतो काय?

lakhu risbud's picture

29 Aug 2015 - 10:25 pm | lakhu risbud

हे dadadaekar आणि असेच काही आयडीज यांचा कर्ता करविता Multiple personality syndrome चे शिकार आहेत का याची एकदा शहानिशा झाली पाहिजे

शीला दिक्षित यांच्यावर एफ.आय.आर दाखल केल्यानंतर दोन दिवसातच कपिल मिश्रा यांची दिल्लीच्या कायदामंत्री पदावरून उचलबांगडी झाली. २८ ऑगस्ट रोजी केजरीवालांना लिहिलेल्या पत्रात कपिल मिश्रांनी म्हटले आहे---"This is a big expose and I am afraid that immediately after this expose, there will be attempts to destabilize our Government in Delhi and also to remove me from this chair." बहुदा आपल्याला त्या पदावरून हटविणारा माणूस बाहेरचा नाही तर खुद्द दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालच आहेत हे त्यांना समजले नसावे.आणि नितीश-लालूंबरोबर हातमिळवणी करून लालूला KCHP (Kejriwal Certified Honest Politician) हे अत्यंत कव्हेटेड सर्टिफिकेट दिल्यानंतर शीला दिक्षित यांच्याविरूध्द काही पावले उचलणे केजरीवालांना अडचणीचे वाटले का?

हे पत्र लिहिल्यानंतरच दोन दिवसातच त्यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आली. असे का बरे?

Mishra

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

1 Sep 2015 - 9:16 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

थोडे दिवस वाट बघावी असे सुचवते रे ट्रुमना.शिला दी़क्षितांच्या कारभाराविरुद्ध तर अरविंदाने आवाज ऊठवला होता व सत्ता प्राप्त केली होती.
नांदेडियन काय म्हणतो बघुया.

नाव आडनाव's picture

1 Sep 2015 - 9:28 pm | नाव आडनाव

ट्रुमना शब्द लैच भारी आहे :)

नांदेडियन साहेबांना सोडा, "ह्यांचं" मत काय आहे ते सांगा?
माई, ईतक्या वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात दोनंच घरात होत असणार -
१) जळून जाती रेशीम गाठी मधले नाना - माई.
२) मिसळपाव वरच्या माई आणि माईंचे "हे". "ह्यांचं" मत नाही असा विषयंच नाही मिसळपाव वर काथ्याकूट साठी :)

गॅरी ट्रुमन's picture

2 Sep 2015 - 10:36 am | गॅरी ट्रुमन

नांदेडियन काय म्हणतो बघुया.

अहो माई, काही म्हणणार नाही तो. आतापर्यंत अनेकांनी स्पेसिफिक प्रश्न विचारले असूनही एका तरी प्रश्नाचे उत्तर दिले आहे का आतापर्यंत? अनेक दिवस गायब होऊन अचानक एखाद्या दिवशी उगवून एखादी नवीन लिंक टाकून गायब होणे ही परंपरा यावेळीही चालू राहणार असेच दिसते.

नांदेडीअन's picture

2 Sep 2015 - 12:06 pm | नांदेडीअन

माफ करा, उशीरा पाहिला हा कमेंट.
http://www.misalpav.com/comment/737254#comment-737254
^^
या धाग्यावर कमेंट केलाय.
वेळ भेटल्यास वाचून घ्या.

नांदेडीअन's picture

2 Sep 2015 - 12:08 pm | नांदेडीअन

माफ करा, उशीरा पाहिला हा कमेंट.
http://www.misalpav.com/comment/737254#comment-737254
^^
या धाग्यावर कमेंट केलाय.
वेळ भेटल्यास वाचून घ्या.

माईसाहेब कुरसूंदीकर, तुमच्यासाठी आहे हा प्रतिसाद.

श्रीगुरुजी's picture

1 Sep 2015 - 10:49 pm | श्रीगुरुजी

शीला दिक्षित यांच्यावर एफ.आय.आर दाखल केल्यानंतर

एफआयआर दाखल करावा अशी शिफारस कपिल मिश्रांनी केली आहे. परंतु शीला दिक्षितांवर अजून एफआयआर दाखल केलेला नाही.

गॅरी ट्रुमन's picture

2 Sep 2015 - 10:33 am | गॅरी ट्रुमन

एफआयआर दाखल करावा अशी शिफारस कपिल मिश्रांनी केली आहे. परंतु शीला दिक्षितांवर अजून एफआयआर दाखल केलेला नाही.

हो बरोबर. एफ.आय.आर दाखल करावा अशी शिफारस कपिल मिश्रांनी केली होती पण अजून एफ.आय.आर दाखल झालेला नाही.