Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Profile picture for user नांदेडीअन
Submitted by नांदेडीअन on Fri, 05/22/2015 - 15:54
सध्या बरेच लोक सांगत सुटले आहेत की गेल्या वर्षभरात एकही भ्रष्टाचार झाला नाही. त्या सगळ्यांसाठी काही प्रश्न आहेत. कृपया उत्तरं देऊन माझ्या माहितीत भर घालावी ही नम्र विनंती. सुब्रमनिअन स्वामी राफेल विमान खरेदी प्रकरणामध्ये सरकारच्या विरोधात कोर्टात जातो म्हणाले होते. असे का बरे ? सामनामध्ये LED Scam बद्दल लिहून आले होते. असे का बरे ? राम जेठमलानी म्हणाले, "भ्रष्ट सरकार भ्रष्ट जजों की ही नियुक्ति करेगी ।" असे का बरे ? Chief Information Commissioner, Central Vigilance Commision , Lokayukta या जागांवर गेल्या वर्षभरात कुणाचीही नियुक्ती झाली नाही. असे का बरे ? माहिती अधिकारा अंतर्गत मागवलेली माहिती नाकारण्यात PMO ऑफिस सगळ्यात पुढे आहे. असे का बरे ? आजच एक नोटिफिकेशन काढले आहे केंद्र सरकारने. त्यात लिहिले आहे की ’दिल्ली ऍंटी करप्शन ब्युरोने केंद्र सरकारमधल्या ऑफिसर किंवा कर्मचार्‍याच्या कोणत्याही गुन्ह्याचा तपास करू नये. असे का बरे ? भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणार्‍या अशोक खेमकांना पुरातत्व खात्यात म्युझिअम सांभाळायला पाठवले. असे का बरे ? AIIMS मधल्या भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढणार्‍या संजीव चतुर्वेदींचे ट्रान्सफर केल्या गेले. असे का बरे ? निवडणुकीपूर्वी लाखो-करोडो अब्ज असलेल्या काळ्या पैशातून एकही पैसा भारतात आला नाही. असे का बरे ? व्यापम घोटाळ्यातल्या सलग आठव्या साक्षिदाराचा संशयास्पद मृत्यू झाला. असे का बरे ?
  • Log in or register to post comments
  • 44927 views

प्रतिक्रिया

Submitted by अनुप ढेरे on Fri, 05/22/2015 - 16:28

Permalink

सीवीसी नेमायला कोर्टाने बंदी

सीवीसी नेमायला कोर्टाने बंदी घातली होती जी आता उठवली आहे http://www.firstpost.com/india/supreme-court-lifts-embargo-allows-centre-appoint-cvc-vc-2242712.html बाकी रफॅलमध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून कोर्टात जातो असे स्वामी नाही म्हणाले. त्यांच्या मते ही विमानं भारतात निरुपयोगी आहेत. आता तुम्ही म्हणालच की यामागे भ्रष्टाचार असणारच तर त्यावर मी वाद घालू इच्छित नाही. मला फायटर विमानांबद्दल माहिती नाही त्यामुळे मी उपयुक्तता यावर बोलु शकत नाही. बाकी आमच्या भाजपाच्या नगरसेवकाने देखील गेल्या वर्षात बराच भ्रष्टाचार केलाय. मोदींनी याचा जवाब दिला पाहिजे.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Fri, 05/22/2015 - 16:35

Permalink

राजकीय धागे

मिपाचे स्वरूप राजकीय धुळवड असणारे संस्थळ असे झाले आहे काय ?
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Fri, 05/22/2015 - 16:39

Permalink

कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली

कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली झाल्यावर विरोधी पक्षात असताना आवाज उठविणाऱ्या भाजपने, सत्तेत आल्यानंतर मात्र, आपणही वेगळे नाही हेच दाखवून दिले.

मदनबाण.....

आजची बदललेली स्वाक्षरी :- Shakira... ;) :- Welcome 2 Karachi
  • Log in or register to post comments

Submitted by चिनार on Fri, 05/22/2015 - 16:54

Permalink

बाकी प्रश्नांवर अभ्यास करून

बाकी प्रश्नांवर अभ्यास करून उत्तर देइलच ..पण या प्रश्नाचा अर्थ कळला नाही
राम जेठमलानी म्हणाले, "भ्रष्ट सरकार भ्रष्ट जजों की ही नियुक्ति करेगी ।" असे का बरे ?
कोणाविषयी बोलले आहेत ते ? बर सरकार किंवा जज (जे कोणी असतील ते ) ह्यांच्याविरोधात काही पुरावे आहेत का त्यांच्याजवळ ? की सकाळी झोपेतून उठवून मिडीया ने माईक तोंडाजवळ धरला म्हणून तोंडाला येईल ते बोलणं आहे हे ? असा कोणी उठून काहीही बोललं तर ते ग्राह्य धरायचं असतं का ? (शेवटला प्रश्न विचारायचं कारण की ..आमच्या मोलकरणीला कुठल्यातरी योजने अंतर्गत सरकारकडून दर महिन्याला काही पैसे मिळतात..गेल्या महिन्यात ते पैसे मिळायला थोडा उशीर झाला तर ती माझ्या बायकोजवळ म्हणाली ,"बाईसाहेब आमचे पैसे खाल्ले बघा मोदीनी?)
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Fri, 05/22/2015 - 18:18

Permalink

त्या

त्या शिवसेना व राम जेठमलानीकडे जास्त लक्ष द्यायचे कारण नाही रे नांदेडियना.गेले ६० वर्षे वकीली करत आहात तर भर्ष्ट न्यायाधिशांची यादी बनवा की.आवडीची मंत्रीपदे न मिळाल्याने सेना सुरुवातीपासूनच खट्टू आहे.उद्या महत्वाचे पद मिळाले की तो उद्धवच "कुठले LED Scam?"?म्हणून विचारेल. असो.
निवडणुकीपूर्वी लाखो-करोडो अब्ज असलेल्या काळ्या पैशातून एकही पैसा भारतात आला नाही.
काळा पैसा परदेशात मोठ्या ट्रंकांमध्ये भरून ठेवला आहे असा गैरसमज अण्णा व अरविंंदने लोकांना करून दिलाय.तो तसा नसून वेगळ्या रुपात गुंतवला आहे असे वाटते.काळा पैसा मुळात तयार कसा होतो व त्यावर निर्बंध कसा घालायचा ह्यावर चर्चा हवी असे ह्यांचे मत. बाकी विचारलेले प्रश्न योग्य आहेत पण त्यासाठी थोडा अवधी द्यायला हवा सरकारला.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रतापराव on Fri, 05/22/2015 - 18:36

Permalink

भाजपा नि कॉंग्रेस मध्ये मुळात

भाजपा नि कॉंग्रेस मध्ये मुळात फार फरक नाहीये. दोघेही एकाला झाकावे नि दुसर्याला काढावे ह्याच प्रकारचे पक्ष आहेत. परंतु ह्यावेळी मोदींनी जाहिरातीच्या माध्यमातून स्वताचे प्रतिमा संवर्धन केले नि विकासाचे गाजर दाखवले. आपल्याला हे गाजर खायला मिळेल ह्या स्वप्नात भोळीभाबडी जनता गुंगून गेली नि तिने मोदींना सत्ता दिली. परंतु मोदिंमध्ये नि इतर नेत्यांमध्ये काहीच फरक नाहीये हे जनतेच्या आता वर्षभराने ध्यानात आले असेल.सरकारला वर्ष झाले आहे. उरलेल्या दोन वर्षात मोदींचे सारे जग फिरून होवो नि त्यांच्या हाती २ वर्षे राहतील त्यात त्यांनी सामान्यांना अच्छे दिन दाखवावेत हीच इच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on Fri, 05/22/2015 - 18:49

Permalink

भाजप हा पक्ष काँग्रेस पेक्षा

भाजप हा पक्ष काँग्रेस पेक्षा बेटर आहे पण बेस्ट नाही. १०० % पारदर्शकता हे दिवास्वप्न आहे हो. एवढ्या मोठ्या देशाची सत्ता मिळवताना , राज्यकारभार करताना कुठतरी काहीतरी बग रहानारच ना. हं फक्त या बग नी ओव्हरऑल फंक्शनॅलिटी खराब करु नये बस.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Fri, 05/22/2015 - 20:53

Permalink

वाह !!

सुब्रमनिअन स्वामी राफेल विमान खरेदी प्रकरणामध्ये सरकारच्या विरोधात कोर्टात जातो म्हणाले होते. असे का बरे ?
पहिलं कारण ढेरे साहेबांनी सांगीतलय. दुसरं कारण म्हणजे स्वामींना बौन्सरकरवी लाथा मारुन पक्षाबाहेर हाकलण्याची भिती नाहि. त्यामुळे ते सरकार विरोधी मत मांडु शकतात.
सामनामध्ये LED Scam बद्दल लिहून आले होते. असे का बरे ?
सामनावाल्यांना त्यात खरच भ्रष्टाचार दिसला असेल. चौकशी होण्याचे चान्सेस नाहित. उद्या सामनावाले द ओन्ली नॉनकरप्ट कॉमनमॅन सरकारबद्द्लपण भ्रष्टाचाराचे आरोप लावतील (आप ने मुंबई नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला घाम फोडावा अशी फार इच्छा आहे). त्याचीही चौकशी होण्याचे चान्सेस नाहित.
राम जेठमलानी म्हणाले, "भ्रष्ट सरकार भ्रष्ट जजों की ही नियुक्ति करेगी ।" असे का बरे ?
जेठमलानी साहेबांना न्यायव्यवस्थेविषयी फारच काळजी आहे म्हणुन. या साहेबांना दिल्ली राज्याच्या कारभाराविषयीसुद्धा असा कळवळा कधितरी येईलच. बघु.
Chief Information Commissioner, Central Vigilance Commision , Lokayukta या जागांवर गेल्या वर्षभरात कुणाचीही नियुक्ती झाली नाही. असे का बरे ?
लायक लोकं मिळाले नसतील. आप सर्टीफाईड लोकांच्या नेमणुका करायला केंद्र सरकार बाध्य आहे. पण केजरीसाहेबांनी अजुन तसे आदेश सोडले नसतील. तसं या मुद्यावर आंदोलन करण्याची नामी संधी आहे.
आजच एक नोटिफिकेशन काढले आहे केंद्र सरकारने. त्यात लिहिले आहे की ’दिल्ली ऍंटी करप्शन ब्युरोने केंद्र सरकारमधल्या ऑफिसर किंवा कर्मचार्‍याच्या कोणत्याही गुन्ह्याचा तपास करू नये. असे का बरे ?
अधिकारांची कक्षा केंद्र सरकारला जास्त कळत असावी म्हणुन. शिवाय आप ने अजुन त्यांची स्वतःची तपास यंत्रणा पुरेशी विकसीत केली नाहि. त्यांच्या पार्टीत लोकपालाच्या नियुक्तीवरुनच घमासान झालं मध्यंतरी. एकदाका हि यंत्रणा तयार झाली कि तसंही सगळा तपास त्या यंत्रणेअंतर्गतच होणार आहे भारतात. लवकरच तो दिन यावा.
भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणार्‍या अशोक खेमकांना पुरातत्व खात्यात म्युझिअम सांभाळायला पाठवले. असे का बरे ?
प्रत्येकाला आपल्या हिताची काळजी आणि काय. दिल्ली राज्य सरकार येत्या ५ वर्षात एकाही इमानदार अधिकार्‍याची बदली करणार नाहि असं ऐकलं आहे. स्वतः केजरीसाहेब अत्यंत इमानदार असल्यामुळे त्यांच्या वाट्याला फार काहि बदल्या आल्या नव्हत्या असं म्हणतात.
AIIMS मधल्या भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढणार्‍या संजीव चतुर्वेदींचे ट्रान्सफर केल्या गेले. असे का बरे ?
दुसरीकडे भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर निघावी म्हणुन.
निवडणुकीपूर्वी लाखो-करोडो अब्ज असलेल्या काळ्या पैशातून एकही पैसा भारतात आला नाही. असे का बरे ?
निवडणुकीपुर्वी जी वचनं दिली त्याच्या साधरणतः किती टक्के वचनांनी पुर्ती होऊ शकते याचा एक फॉर्मुला आप ने शोधुन काढला आहे. त्या फॉर्मुलानुसार हा पैसा अजुन भारतात आला नाहि. बाकि या प्रकरणातली प्रगती, या संदर्भातले नवीन कायदे वगैरे गोष्टी अर्थमंत्री वेळोवेळी सांगत असतात. पण त्याकडे दुर्लक्ष्य करणच बरं. बिकॉझ इट्स नॉट आप सर्टीफाईड यट.
व्यापम घोटाळ्यातल्या सलग आठव्या साक्षिदाराचा संशयास्पद मृत्यू झाला. असे का बरे ?
भारतात तसंही माणसाच्या जीवाची किंमत काय? आता काहि दिवसांपुर्वी एका राजस्थानी सधन शेतकर्‍याला एका राजकीय सभेत सर्वांदेखत फासावर लटकवुन मारलच ना? अगदी त्याच्या हाती खोटी सुसाईड नोट देणे, त्याच्या नावाने नक्राश्रू ढाळत टिव्हीवर गळे काढणे, तो मरत असताना व मेल्यानंतरही आपली भाषणबाजी सुरु ठेवणे असले प्रकार झाले आहेत. आपण मिपाकरांस कितीही खेद वाटला तरी हि राजकारणी जमात आपल्या कह्यात थोडीच आहे. आताशी मलासुद्धा प्रश्न पडायला लागली आहेत. पण आमच्या अत्यंत गंभीर प्रश्नांवर राहुल गांधी आणि मिपाकर काय प्रतिक्रिया देतील याचीच भिती वाटतेय :(
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on Fri, 05/22/2015 - 21:18

In reply to वाह !! by अर्धवटराव

Permalink

ठो:!

चपखल प्रतिसाद!
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Fri, 07/31/2015 - 17:11

In reply to वाह !! by अर्धवटराव

Permalink

थोडी जाहीरात..

थोडी जाहीरात करतोय स्वतःच्या धाग्याची.. मात्र लोकपालबद्दल ठाम भुमिका घेणार्‍या आणि त्यानुशंगाने केजरीवालांना सपोर्ट असावा, असं वाटायला लावणार्‍या अर्धवटरावांसारख्या लोकांनी आज केजरीवालांच्या कार्यपद्धतीविरुध्द लिहावे, ह्यातच अरविंदरावजी केजरीवालसाहेब महाराज ह्यांचे अपयश सामवलेले आहे.. 'लोकपाल'ला समर्थन आणि केजरीवालांना समर्थन म्हणजे एकूण एकच आहे, असं समजण्यात माझी चुक झाली असेल तर त्याबद्दल क्षमस्वः आणि आगाऊ माफीनामा..
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Fri, 07/31/2015 - 21:30

In reply to थोडी जाहीरात.. by चिगो

Permalink

:)

केजरीसाहेबांच्या कार्यपद्धतीबद्द्ल काहि मोठे आक्षेप आहेत पण त्यांना अजुनही 'अपयश' म्हणवत नाहि. व्यक्ती केजरीवाल आपल्या मूळ सामर्थ्य, मर्यांदा, नीती आणि विचारधारा घेऊन आपलं काम करतो आहे. लेट हिम वर्क.
  • Log in or register to post comments

Submitted by सव्यसाची on Fri, 05/22/2015 - 21:58

Permalink

सुब्रमनिअन स्वामी राफेल विमान

सुब्रमनिअन स्वामी राफेल विमान खरेदी प्रकरणामध्ये सरकारच्या विरोधात कोर्टात जातो म्हणाले होते. असे का बरे ?
यात घोटाळा झालाय असे त्यांनी म्हटलंय का? आणि म्हटले असेल तर तसे पुरावे तरी द्या.
सामनामध्ये LED Scam बद्दल लिहून आले होते. असे का बरे ?
या बद्दलही जरा पुरावे द्या. म्हणजे कमीत कमी बातम्या तरी पुरवा.
राम जेठमलानी म्हणाले, "भ्रष्ट सरकार भ्रष्ट जजों की ही नियुक्ति करेगी ।" असे का बरे ?
हे NJAC संदर्भात असावे असे वाटते. आता हे प्रकरण अजून सर्वोच्च न्यायालयात आहे. सुनावणी नुकतीच सुरु झालीय. हा कायदा संविधानसुसंगत आहे कि नाही याची सुनावणी सुरु आहे.
Chief Information Commissioner, Central Vigilance Commision , Lokayukta या जागांवर गेल्या वर्षभरात कुणाचीही नियुक्ती झाली नाही. असे का बरे ?
या तीनही प्रश्नाचे उत्तर डॉ. जितेंद्र सिंग या मंत्र्यांनी लोकसभेत दिले आहे. आपली इच्छा असेल तर ते आपण पाहू शकता. बाकी केंद्र सरकार लोकपाल नेमते, लोकायुक्त राज्य सरकार नेमते.
माहिती अधिकारा अंतर्गत मागवलेली माहिती नाकारण्यात PMO ऑफिस सगळ्यात पुढे आहे. असे का बरे ?
असे समजून चालू कि PMO ने माहिती नाकारली. मग त्याचा भ्रष्टाचाराशी संबंध कसा?
आजच एक नोटिफिकेशन काढले आहे केंद्र सरकारने. त्यात लिहिले आहे की ’दिल्ली ऍंटी करप्शन ब्युरोने केंद्र सरकारमधल्या ऑफिसर किंवा कर्मचार्‍याच्या कोणत्याही गुन्ह्याचा तपास करू नये. असे का बरे ?
कारण दिल्ली सरकारची स्वतःची 'पब्लिक सर्विस' नाही. त्यामुळे या गोष्टी केंद्राच्या अखत्यारीत येतात. आता केंद्राचा अधिकार असणे म्हणजेच भ्रष्टाचार असा बादरायण संबंध इथे अपेक्षित आहे का?
भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणार्‍या अशोक खेमकांना पुरातत्व खात्यात म्युझिअम सांभाळायला पाठवले. असे का बरे ?
खेमकांची बदली कधीपासून केंद्राच्या अखत्यारीत आली? आणि बदली केली म्हणजे भ्रष्टाचार बोकाळलाय असा संबंध इथे लावला जातो आहे का?
AIIMS मधल्या भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढणार्‍या संजीव चतुर्वेदींचे ट्रान्सफर केल्या गेले. असे का बरे ?
यालाही हर्षवर्धन यांनी उत्तर दिले होते माझ्या माहितीप्रमाणे.
निवडणुकीपूर्वी लाखो-करोडो अब्ज असलेल्या काळ्या पैशातून एकही पैसा भारतात आला नाही. असे का बरे ?
पैसा आला नाही असे म्हणताना ती आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले नाहीत असे म्हणले जाते आहे का? या सगळ्या प्रयत्नांमध्ये असलेल्या अडचणींचा थोडासा विचार करून पहा.
व्यापम घोटाळ्यातल्या सलग आठव्या साक्षिदाराचा संशयास्पद मृत्यू झाला. असे का बरे ?
हे पण प्रकरण कधीपासून केंद्र सरकारच्या कक्षेत आले???
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on Fri, 05/22/2015 - 22:33

Permalink

हरिश्चंद्र केजरू

भ्रष्टाचाराचा भस्मासूर !! एका माणसाला सर्वां समोर मारुन हे लोक आता म्हणताहेत सर्व नेते भ्रष्ट !! आणि केजरीवाल कोण ! हरिश्चंद्र का ?
  • Log in or register to post comments

Submitted by खंडेराव on Fri, 05/22/2015 - 22:39

In reply to हरिश्चंद्र केजरू by डँबिस००७

Permalink

तुमचे

बाकी काय ते बरोबर चुक माहित नाही, पण हे माणुस मारल्याचे कळत नाहीये. दिल्ली पोलिस भाजपाच्या, पक्ष्रि केंन्द्राच्या हातात आहे ना? मग धरावे केजरिवालला आणि टाकावे आत. अजुन आत टाकले नाही म्हणजे आपचा आत्महत्येत हात नसावा असे म्हणायला जागा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Sat, 05/23/2015 - 10:40

In reply to तुमचे by खंडेराव

Permalink

खरे आहे. मोदी आतुन केजरीवालला

खरे आहे. मोदी आतुन केजरीवालला मिळालेले आह्हेत.
  • Log in or register to post comments

Submitted by चिनार on Mon, 05/25/2015 - 09:59

In reply to खरे आहे. मोदी आतुन केजरीवालला by मृत्युन्जय

Permalink

मृत्युंजय साहेब ,

मृत्युंजय साहेब , तुम्ही फारच नवखे आहात बुवा राजकारण विषयात ! मोदी आतुन केजरीवालला मिळालेले आह्हेत. केजरीवाल आतून राहुल गांधींना मिळाले आहेत.राहुल गांधी आतून शरद पवारांना मिळाले आहेत. शरद पवार नक्की कोणाला मिळाले आहेत याच्यावर राजकीय विश्लेषक गेल्या ५० वर्षांपासून संशोधन करत आहेत. त्यांना उत्तर मिळालं की लगेच कळवू तुम्हाला .. पण एवढं मात्र खरं की... हे सगळे अंबानीचे ऐजण्ट आहेत !
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Mon, 05/25/2015 - 14:09

In reply to मृत्युंजय साहेब , by चिनार

Permalink

+१

पण एवढं मात्र खरं की... हे सगळे अंबानीचे ऐजण्ट आहेत !
आणी अंबानी रोजच्या रोज (अर्थात दिवसभर) मिपा वाचून या सगळ्यांशी सल्ला-मसलत करतात !!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by चिनार on Mon, 05/25/2015 - 14:20

In reply to +१ by नाखु

Permalink

+१०००००

+१०००००
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 07/31/2015 - 23:03

In reply to +१ by नाखु

Permalink

कोई शक ???!!! =))

कोई शक ???!!! =))
  • Log in or register to post comments
Profile picture for user मना सज्जना

Submitted by मना सज्जना on गुरुवार, 07/30/2015 - 19:31

In reply to मृत्युंजय साहेब , by चिनार

Permalink

एकदम खरे आहे राव ........

एकदम खरे आहे राव ........
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on Fri, 05/22/2015 - 22:49

Permalink

दिल्लीच्या राज्यपालाबरोबरच युद्ध लपवण्याचा केविलवाणा प्रयन्त !!

अर्धच राज्य असलेल्या दिल्लीची सत्ता ह्यांना सांभाळता येत नाही ! गेल्या वेळेला ४९ दिवस आणी आता ३=४ महीन्यातच पळण्याची तयारी ? देशाच्या कायद्यात राहुन काम करता येत नाही मग ह्यांना सगळे कसे भ्रष्ट वाटायला लागलेत ! ज्या बाबासाहेबांनी देशाची संविधान लिहीले ते सुद्धा भ्रष्टच होते काय ? आणी लक्ष केंद्र सरकार कडे ?
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on Fri, 05/22/2015 - 22:54

Permalink

खंडेराव,

खंडेराव, त्याच काय आहे ना ! धरुन आत टाकायला काय औरंगजेबच राज्य आहे का ? केजरीवाल विरुद्ध केस तयार होतच असेल ! बाकी दिल्लीच्या निवडणुकीच्या आधी सोनिया गांधी पासुन भ्रष्ट लोकांची लिस्ट देणार्या केजरीवालने किती लोकांना आत टाकल ते सुद्धा आम्हाला सांगाच ! कारण तो एक साधा सुधा माणुस ना ही सुपरमॅन आहे !
  • Log in or register to post comments

Submitted by खंडेराव on Fri, 05/22/2015 - 23:54

In reply to खंडेराव, by डँबिस००७

Permalink

हो हे मात्र

खरे आहे हो तुमचे..इथे बाबु बजरंगी, सलमान खान सारख्या देव माणसांना बेल मिळतोच. कायद्याचे राज्य आहे आपले. बाकी, १ वर्षात वद्रा ला ही आत टाकायला जमले नाही का आपल्याला? आणि मी काय केजरीवालची बाजु घेउन उतरलो नाहीये. ते आत्महत्त्या प्रकरण फकत मला पुर्वनियोजित वाटत नाहीये. ( आपल्याला हे तुम्हाला उद्देशुन नसुन या कायद्याच्या राज्याला उद्देशुन आहे )
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Sat, 05/23/2015 - 00:20

In reply to हो हे मात्र by खंडेराव

Permalink

+/-

ते आत्महत्त्या प्रकरण फकत मला पुर्वनियोजित वाटत नाहीये. आत्महत्या प्रत्यक्षात करण्याच्या दृष्टीने हे प्रकरण पुर्वनियोजित नसेल. पण आत्महत्या करतो आहे असे नाटक करण्याच्या दृष्टीने पूर्वनियोजित नक्कीच असावे असे वाटते. नाहीतर आत्महत्या करण्याची कारणे सांगणारी चिठ्ठी व्यासपिठापर्यंत कशी पोचली? त्यात "आत्महत्या करतो आहे", असे म्हणलेले नसताना देखील ते कुमार विश्वास का म्हणाले वगैरे प्रश्न उद्भवतताच. त्या व्यतिरीक्त गजेन्द्र सिंग आणि सिसोदीया यांच्या फोन संवादावरून सगळे गप्प आहे. सिसोदीया या प्रकरणातच गप्प आहेत. इथे बाबु बजरंगी, सलमान खान सारख्या देव माणसांना बेल मिळतोच. तो कायदा आहे. याच दोघांना कशाला लालूप्रसाद आणि स्ववर्तनाने तेहेलका "करणारे" तरूण तेजपाल ह देखील बेल घेउन उंडारत आहेत. या संदर्भात व्यवस्थेचा दोष आहे. कोर्टाना प्रकरणे पटकन हाताळायला मिळणे हे अत्यंत आवश्यक आहे. तीच गोष्ट अफझल गुरू आणि कसाबच्या बाबतीत झाली होती. बेल मिळाला नसला तरी दिलेली शिक्षा ठोठवायला दिरंगाई केली जात होती. निवडणुकीचे भय नसते तर ते आत्ता देखील तुरूंगात निवांत बिर्याणी खात बसलेत असे ऐकायला मिळाले असते. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by विनोद१८ on Sun, 05/24/2015 - 21:57

In reply to हो हे मात्र by खंडेराव

Permalink

......बाकी, १ वर्षात वद्राला ही आत टाकायला......!!!!!

...यासाठी थांबा आणि वाट पहा, राजकारणात अशा प्रकरणात तर 'योग्य वेळीच योग्य ती पावले' टाकली जातात, तशी ती याबाबतीतही टाकली जातीलच याची खात्री बाळगा.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 05/25/2015 - 12:04

In reply to ......बाकी, १ वर्षात वद्राला ही आत टाकायला......!!!!! by विनोद१८

Permalink

हे होईल असे मात्र जर्रासुध्धा

हे होईल असे मात्र जर्रासुध्धा वाटत नाही
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Mon, 05/25/2015 - 12:23

In reply to हे होईल असे मात्र जर्रासुध्धा by टवाळ कार्टा

Permalink

+ १

खरे आहे. वद्रा आत जाइल असे वाटत नाही. मोदी काय किंवा केजरीवाल काय किंवा अजुन कोणी काय. यापैकी कोणिही आले तरी राजघराण्यातले लोक आत जाणार नाहित ही खात्री आहे. यापैकी जो कोणी माझे मत खोटे ठरवेल त्याला मी हे धैर्य (आणि मुत्सद्देगिरी) दाखवल्याबद्दल तहहयात मतदान करेन. प्रत्यक्षात मात्र काही व्यक्ती सर्वकाळ प्रोटेक्टेड असतात हे नक्की. वद्राच काय, भाजपाने तर काका पुतण्याला देखील आत टाकायच्या वल्गना केल्या होत्या ना? काय झाले त्याचे? आणि अश्य्चाच वल्गना युगपुरुषांनी देखील वद्रा आणि शीला दिक्षित यांच्याबद्दल केल्या होत्या ना? काय झाले त्याचे? सरकार कोणाचेही असो. काही लोक नेहमीच प्रिव्हिलेज्ड असतात. हे दुर्दैवाने सत्य आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by नाव आडनाव on Mon, 05/25/2015 - 15:13

In reply to + १ by मृत्युन्जय

Permalink

काही लोक प्रिव्हिलेज्ड का असतात?

मला राजकारणातलं जास्त कळत नाही पण एक गोष्ट मात्र वाटत राहते - १९९५ सालच्या निवडणुकीत मुंडे साहेबांकडे पवारांविरुध्ध गुन्हेगारांशी, अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे पुरावे होते (असं ते निवडणुकीच्या सभांमधून सांगायचे) तर ते कोर्टात का गेले नाहीत? त्या निवडणुका झाल्यानंतर राज्यात त्यांचं सरकार आलं होतं ज्यात ते गृहमंत्री होते, केंद्रात त्यांच्या पक्षाचं सरकार आलं होतं. ते का कोर्टात गेले नसतील? त्या नंतरही ते ~२० वर्ष होते. ते कोर्टात जाऊ शकत होते. जयललिता, लालू यांना अटक झालीच ना? पवारांना सुध्धा झाली असती. मागच्या निवडणुकीवेळी त्यांना पवारांविषयी एका पत्रकाराने विचारलं होतं, तेंव्हा ते म्हणाले ९५ साली माझ्याकडे पुरावे होते म्हणून मी आरोप केले, आता पुरावे नाहीत म्हणून आरोप करणार नाही. पुराव्याना एक्सपायरी डेट असते काय? जर कोर्टात केस झाली असती तर "काका" कायमचे आता गेले असते, पण मुंडे साहेबांकडे खरंच पुरावे होते का? त्यांच्यात आणि केजरीवाल (सलमान खुर्शीद वर आरोप करणारे पण - जेव्हढ मला माहित आहे - कोर्टात न जाणारे) यांच्यात फरक मला तरी वाटत नाही. एबीपी माझाने गडकरी साहेबांच्या कंपनीच्या पत्त्यावर कैक वर्ष बंद असलेली झोपडपट्टी दाखवली होती. त्यांच्यावर काय कारवाई झाली? दोन pan कार्ड असणाऱ्या, विना परवाना शस्त्र ठेवणाऱ्या कृपा शंकर सिंह यांच्यावर काय कारवाई झाली? हे सुध्धा प्रिविलेज्ड नाहीत का? एकदा औरंगाबाद मध्ये मुंडेंची धान्यापासून मद्य निर्मिती ला आमचा विरोध आहे असं सांगण्यासाठी पत्रकार परिषद चालली होती. ते म्हणाले धान्यापासून मद्य निर्मिती केली तर गरिबाने खायचे काय? एका पत्रकाराने (तिथेच की पत्रकार परिषदेनंतर बहुतेक) विचारलं कि त्यांच्या मुलीचा असा एक कारखाना आहे, तर त्यावर साहेबांचं म्हणणं होतं की "आमचा विरोध नव्या कारखान्यांना आहे". अरे, म्हणजे असलेल्या / नव्या कारखान्यांसाठी वेगळं पीक घेतलं जातं काय? आणी त्यामुळे गरिबांना काहीच फरक पडत नाही? महाराष्ट्रातल्या एका भाजपा खासदाराला पहिल्यांदा खासदार झाल्यानंतर राज्यमंत्रीपद मिळालं. त्यांच्याच पक्षातल्या महाराष्ट्रातल्या एका "वरिष्ठ" नेत्याने त्याने केलेल्या एका डील मध्ये हिस्सा मागितला. तो न दिल्याने त्याचं पुढच्या वेळचं तिकिट कापलं. नंतर त्या खासदाराला तो "वरिष्ठ" नेता गेल्यानंतरच तिकिट मिळालं. मी जिथे राहायचो तिथला एक मित्र एका मोठ्या परीक्षेच्या पेपर फुटीत सापडला. त्याला सगळ्यातून भाजपाच्याच एका मंत्र्याने कसं बाहेर काढलं हे ऐकून कुणाला खरं वाटणार नाही. पहिल्या केस मधला खासदार माझ्या मित्राचा नातेवाईक आहे आणी दुसरा माझा मित्रच आहे. त्यामुळे जास्त डिटेल लिहू शकत नाही. म्हणायचं फक्त एव्हढंच आहे कि इथे कुणी वेगळा नाही - सारे सारखे आहेत. सलमान खान / जयललिता कॉंग्रेस च्या काळात सुटला असता / सुटल्या असत्या तर? आजकाल रोज ज्या बलात्काराच्या बातम्या येतात त्या कॉंग्रेस च्या काळात आल्या असत्या तर? किंवा इथेच कपिलमुनींनी दिलेली बातमी ची लिंक (ट्राफिक हवालदाराला मारले) जर कॉंग्रेस च्या काळात झालं असतं तर? मी नक्की सांगतो भाजपा समर्थकांनी या सगळ्या गोष्टी सरकार बरोबर जोडल्या असत्या. आज तेच त्या बाबत काही बोलत नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by खंडेराव on Mon, 05/25/2015 - 17:45

In reply to काही लोक प्रिव्हिलेज्ड का असतात? by नाव आडनाव

Permalink

उत्तम माहीती

दिली तुम्ही..धन्यवाद..काही गोष्टी नविन कळाल्या..
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Sat, 05/23/2015 - 09:07

Permalink

.

>>मिपाचे स्वरूप राजकीय धुळवड असणारे संस्थळ असे झाले आहे काय ? सहमत आहे. निवडणुका संपून आता वर्ष झाले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Wed, 05/27/2015 - 00:34

In reply to . by नितिन थत्ते

Permalink

त्याला मात्र नक्की

त्याला मात्र नक्कीच मोदी जबाबदार आहेत. ते जर पंतप्रधान झाले नसते तर धुळवडविरहीत अच्छे दिन आले असते. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Mon, 06/29/2015 - 20:27

In reply to त्याला मात्र नक्की by विकास

Permalink

त्याला मात्र नक्कीच मोदी जबाबदार आहेत.

कशाला जबाबदार? सहमतीला, की निवडणूका संपून एक वर्ष व्हायला?
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Mon, 06/29/2015 - 20:50

In reply to त्याला मात्र नक्कीच मोदी जबाबदार आहेत. by आनंदी गोपाळ

Permalink

जबाबदार...

"मिपाचे स्वरूप राजकीय धुळवड असणारे संस्थळ..." होण्यास जबाबदार.
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Sat, 05/23/2015 - 10:53

Permalink

पण मी काय म्हणतो नांदेडीयन

पण मी काय म्हणतो नांदेडीयन लोकांनी काही ठोस पुरावे अथवा कारणे सादर करावीत म्हणजे यापैकी कुठल्या आरोपावर भाष्य करता येइल अन्यथा आरोप करणारी लोक असेही म्हणतात की: १. राहुल गांधीने एका मुलीवर बलात्कार केला होता आणि ते प्रकरण दडपले. २. इंदिरा गांधींनी संजय गांधीला मारले. ३. केजरीवाल अण्णा हजारेंच्या जीवावर उठले होते/ मूळावर टपले होते. त्यामुळे असोच. त्या परदेश दौर्‍याच्या धाग्याचा बोर्‍या वाजला. किती बिनबुडाची आणि निरर्थक (आणि मुख्य म्हणजे बिन्डोक) टीका होती ते तिथे सिद्ध झालेच. आता हा धागा. एकुणच सध्या बिनबुडाची टीका करण्याची अहमहिका चालु आहे. कंटाळा आला आता.
  • Log in or register to post comments

Submitted by लॉर्ड फॉकलन्ड on Sat, 05/23/2015 - 14:24

Permalink

.

सध्या बरेच लोक सांगत सुटले आहेत की गेल्या वर्षभरात एकही भ्रष्टाचार झाला नाही.
डोंगर खणून मुंगी सुद्धा मिळाली नाही.भ्रष्टाचार झालेला आहे हे सांगताना झालेल्या भ्रष्टाचाराचे एकही उदाहरण न देता रोज बिनबुडाचे नवीन आरोप करणार्‍या स्वामी,जेठमलानी,सामना इ. वाचाळांचे एकेक वाक्य दिले आहे.कोणाची तरी बदली,कोणते तरी नोटीफिकेशन असली उदाहरणे देऊन भ्रष्टाचार झाला नाही हे खोटे आहे असे दर्शविण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे.निव्वळ केजरीवाल नव्हे तर त्यांचे भक्त देखील हास्यास्पद झालेले आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by लॉर्ड फॉकलन्ड on Sat, 05/23/2015 - 14:28

Permalink

.

लेखाचे टायटल काय तर "भ्रष्टाचाराच भस्मासूर" आणि या भस्मासुराला आधार काय आहे तर २-३ वाचाळांची एकेक वाक्ये,कोणाची तरी बदली,कसले तरी नोटीफिकेशन... जरा पावणेदोन लाख कोटींचा कोळसा घोटाळा,पावणेदोन लाख कोटींचा स्पेक्ट्रम घोटाळा,सत्तर हजार कोटींचा कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा अशी सणसणीत उदाहरणे द्या,म्हणजे लेखाचे टायटल सार्थ होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on Sat, 05/23/2015 - 20:59

Permalink

राजकारणाचा अभ्यास शून्य असला

राजकारणाचा अभ्यास शून्य असला की अस होत . चला थोडी शिकवणी घेऊ . सगळ्या शाळेत ढ मुलांची घेतात तशी . उदाहरणार्थ एक वाक्य घेऊ - स्वामी,जेठमलानी,सामना इ. वाचाळांचे एकेक वाक्य दिले आहे. तर भक्त ज्याना वाचाळ म्हणतात ते कोण आहेत . एक एक घेऊ हा . यातले तीनही वाचाळ भाजप समर्थकच आहेत . एक एक बघू . स्वामी - यांनी आपला जनता पक्ष भाजपात विलीन केला आहे . लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि नंतर पण काही विशिष्ट कारणांमुळे ते भक्तांचे 'लाडके ' होते . पण त्यांच्या मुलीने सुहासिनी हैदर ने मोदी यांच्या विदेश दौऱ्यांवर टीका करताच आणि मुख्य म्हणजे राफेल डील नंतर सुसु यांनी कोर्टात जायची भाषा करताच ते सध्या भक्तांच्या हिट लिस्ट वर आहेत . वाजपेयी यांच्यावर त्यांनी अभद्र टीका केली होती तेंव्हा एक पण भक्त समार्थानाथ पुढे आला होता पण त्यांनी या दोन भक्त विरोधी गोष्टी काय केल्या ते एकदमच भक्त पंथा साठी वाचाळ ठरले . बर झाल अटलजी सक्रिय राजकारणात नाहीत . असले आंधळे समर्थक बघून त्या संवेदनशील कवी माणसाची अवस्था काय झाली असती ते एक अयोध्येचा रामच जाणे . जेठमलानी - हे पण भाजप मध्येच आहेत . हे सातत्याने गडकरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे . पण पक्ष त्यांना अजून पक्षातून काढत नाहीये म्हणजे भाजप ला पण त्यांचे आरोप खरे वाटत नाहीयेत . त्यांनी परवा मोदी सरकारवर टीका करताच लगेच ते भक्त पंथाच्या रडारवर आले . समजूतदार लोक काय अर्थ काढ्याचा तो काढतीलच . सामना - हे काय वो . शिवसेना तुमचा मित्र पक्ष ना . आताच तर तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवल्या ना . बर केंद्रात आणि राज्यात तुम्ही सत्तेत भागीदार . जर मित्र लोकांना च वाटत नसेल तर आम्हाला कसे वाटेल बुवा अच्छे दिन आल्याच . बघा विचार करा . हे सगळे 'वाचाळ ' तुमचेच लोक आहेत . जमले तर उत्तर द्या .
  • Log in or register to post comments
Profile picture for user नांदेडीअन

Submitted by नांदेडीअन on Sat, 05/23/2015 - 22:25

In reply to राजकारणाचा अभ्यास शून्य असला by पिंपातला उंदीर

Permalink

राजकारणाचा अभ्यास शून्य असला

राजकारणाचा अभ्यास शून्य असला की अस होत . चला थोडी शिकवणी घेऊ . सगळ्या शाळेत ढ मुलांची घेतात तशी.
वेगवेगळ्या धाग्यांवर तुमचे विचार वाचून तुमची माझ्या मनात एक प्रतिमा तयार झाली आहे. तुम्ही बर्‍यापैकी तटस्थ वाटता, तुम्हाला राजकारणाची चांगली जाण आहे, तुम्ही भक्तांना सहज लोळवू शकता. (भक्तांची बौद्धिक कुवत अशीही मायनसमध्येच असते म्हणा.) तुमच्या मानाने 'राजकारण' या विषयात मी तर अगदीच नवखा आहे, पण भक्तांच्या आणि परमभक्तांच्या जास्त नादी लागायचे नाही हे मी उशिरा का होईना पण शिकलोय. तुम्ही का अजून एंटरटेन करताय त्यांना ? हळूहळू तुम्हीसुद्धा कमी करा हे. एकतर खूप वेळ वाचेल तुमचा. आणि दुरून भक्तांची ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ ही अवस्था बघायला खूप मजा येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on Sun, 05/24/2015 - 21:45

In reply to राजकारणाचा अभ्यास शून्य असला by नांदेडीअन

Permalink

मला जेंव्हा low वाटायला लागत

मला जेंव्हा low वाटायला लागत तेंव्हा मी राजकारणाच्या धाग्यावर येतो . भक्तांनी शून्य राजकीय ज्ञान वाटलेले प्रतिसाद वाटच पाहत असतात . सुदैवाने प्रादेशिक , राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांच थोड ज्ञान मला आहे . मग मी त्या शुन्य प्रतिसादाच्या धज्ज्या उडवतो . मजा येते . पुन्हा मी माझ्या रोजच्या जीवनाला भिडतो . त्यामुळे मला वाटेल तेंव्हाच मी इथे येतो . इथे येउन रोज विद्वता पाजळणे ही काय माझी गरज नाही . मी वर्तमानपत्रात column लिहितो . मला virtual आयुष्यात प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा खर्याखुर्या आयुष्यात प्रसिद्धी मिळवण्यात रस आहे . पण तुमचा मुद्दा खरा आहे . पण भक्तांची खिल्ली उडवायला मजा येते राव . : )
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Mon, 05/25/2015 - 12:35

In reply to मला जेंव्हा low वाटायला लागत by पिंपातला उंदीर

Permalink

भक्तांनी शून्य राजकीय ज्ञान

भक्तांनी शून्य राजकीय ज्ञान वाटलेले प्रतिसाद वाटच पाहत असतात "सगळ्या भक्ताना शून्य राजकीय ज्ञान असते" हे विधान जरा अतिशयोक्तीचे वाटते. आपले ज्ञान उच्च कोटीचे असेल म्हणून इतर लोक अगदीच गाळात आहेत अस अर्थ यातून निघतो. म्हणजे मी इंजिनियर आहे तर जे इंजिनियर नाहीत त्यांना अभियांत्रिकीचे ज्ञान शून्य असे मी म्हणालो तर कसे वाटेल. लोकांची खिल्ली उडवायला फार कष्ट लागत नाहीत शब्दाचे कीस पाडणे आणि गुंत्यात अडकवणे असे केले कि माणूस कुठेतरी अडकतोच. आपला मूड सुधारण्यासाठी अज्ञानी लोकांची खिल्ली उडवण्यात आपल्याला मजा येते हे पाहून वाईट वाटले इतकेच.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Mon, 05/25/2015 - 14:10

In reply to भक्तांनी शून्य राजकीय ज्ञान by सुबोध खरे

Permalink

+१०००००

ज्याला आपल्या ज्ञानाचा गर्व होतो त्याला खरंतर काहीच माहित नसतं असं म्हणतात...
  • Log in or register to post comments

Submitted by पुण्याचे वटवाघूळ on Tue, 06/30/2015 - 10:48

In reply to भक्तांनी शून्य राजकीय ज्ञान by सुबोध खरे

Permalink

अगदी योग्य

"सगळ्या भक्ताना शून्य राजकीय ज्ञान असते" हे विधान जरा अतिशयोक्तीचे वाटते. आपले ज्ञान उच्च कोटीचे असेल म्हणून इतर लोक अगदीच गाळात आहेत अस अर्थ यातून निघतो. म्हणजे मी इंजिनियर आहे तर जे इंजिनियर नाहीत त्यांना अभियांत्रिकीचे ज्ञान शून्य असे मी म्हणालो तर कसे वाटेल.
अगदी योग्य लिहिलेत डोक्टरराव. य आसल्या अहंमन्य उंदरांना असेच चोपले पाहिजे. हे असले एकाहून एकेक उथळ प्रतिसाद देणार्‍या उंदरांना वेचून वेचून चोपले पाहिजे.
  • Log in or register to post comments

Submitted by गब्रिएल on Mon, 05/25/2015 - 13:32

In reply to मला जेंव्हा low वाटायला लागत by पिंपातला उंदीर

Permalink

भले साब्बास उंदीर्साब, तुम्चा

भले साब्बास उंदीर्साब, तुम्चा म मा मि मी मु मू मे मै मो मौ मं मः चा आब्यास लै जोर्दार हाय ! त्येच्याबद्दल जंक्शण हाबीणंदण ! पन त्ये काय कोलम (तांदूळ नाय, त्यो पेप्रात आस्तो त्यो) लिव्ता म्हंता तर जर्रा सम्तोल का काय म्हंत्यात तसं लिवा भौ. लिव्ताना येका बाजूला झुक्लं की लोकान्ला लग्गी कळ्तं की ह्यो कोंच्या बाजुचा हमाल हाय. लोकान्ला बरी आक्कल आसतिया, लोकांन्ला कायबी सम्जत नाय आसा इचार कर्नार्यांना खिनभर कमी आसती, आसं सादूसंत ब्वोलून ग्येल्यात. तुमी लैच हुश्शार हाहात, तुमाला ह्ये सग्ळं म्हाय्ती आसंलच.
  • Log in or register to post comments

Submitted by चिनार on Mon, 05/25/2015 - 10:31

In reply to राजकारणाचा अभ्यास शून्य असला by नांदेडीअन

Permalink

अहो पिम्पातला उंदीर ,

अहो पिम्पातला उंदीर , तुमचा राजकारणाचा अभ्यास खरच खूप आहे आहे. तुमचे विचार सुद्धा तटस्थ असतात. पण मी काय म्हणतो जशी मोदी भक्तांची खेचता तशीच इतर भक्तांची ....माफ करा .. "विशिष्ट विचारधारेच्या समर्थकांची" सुद्धा खेचा की राव..सगळ्याना मजा येईल.. हलके घ्यावे
  • Log in or register to post comments

Submitted by विनोद१८ on Sun, 05/24/2015 - 22:18

In reply to राजकारणाचा अभ्यास शून्य असला by पिंपातला उंदीर

Permalink

....गडकरी.....!!!!

जेठमलानी - हे पण भाजप मध्येच आहेत . हे सातत्याने गडकरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे .
हे आरोप कोणते ??? हे आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत का ?? फक्त सु. स्वामींचा आरोप मला माहीत आहे व त्याचे कारणही, पुढे काय झाले त्याचे ??? एक आठवण करुन देतो, ह्याच गडकरींवर बिनबुडाचे बेफाम आरोप करून अरविंद केजरीवाल केस हरला व काही दिवस बिनभाड्याच्या खोलीत राहोन आला, याला फार दिवस नाही झाले. भा.ज.पा.मध्ये पक्षांतर्गत जाहीर टिकेला वाव आहे, हेच यातुन दिसते, नाही का ? असे चित्र दुसर्या कोणत्या पक्षात दिसते. ??
  • Log in or register to post comments
Profile picture for user नांदेडीअन

Submitted by नांदेडीअन on Mon, 05/25/2015 - 08:15

In reply to ....गडकरी.....!!!! by विनोद१८

Permalink

हे आरोप कोणते ???

हे आरोप कोणते ???
Govt is least interested in bringing back the black money. http://timesofindia.indiatimes.com/india/Govt-least-interested-in-getting-black-money-back-Ram-Jethmalani-says/articleshow/47256917.cms Corrupt government requires corrupt judiciary http://www.dnaindia.com/india/report-corrupt-government-requires-corrupt-judiciary-ram-jethmalani-lashed-out-at-govt-2081944
"ह्याच गडकरींवर बिनबुडाचे बेफाम आरोप करून अरविंद केजरीवाल केस हरला"
अच्छा अच्छा, अस्सं झालं होय ? फारच लवकर निकाल लागला. बाय द वे, मी ही बातमी वाचली होती. Court imposes Rs 10,000 fine on Nitin Gadkari in defamation case against Arvind Kejriwal http://timesofindia.indiatimes.com/india/Court-imposes-Rs-10000-fine-on-Nitin-Gadkari-in-defamation-case-against-Arvind-Kejriwal/articleshow/45585228.cms
  • Log in or register to post comments

Submitted by विनोद१८ on Mon, 05/25/2015 - 13:58

In reply to हे आरोप कोणते ??? by नांदेडीअन

Permalink

...जरा अजुन मेहनत घ्यावी.. खरे खोटे काय ते समजेल...!!!

जरा हे पण वाचा :- http://www.thehindu.com/news/national/possibility-of-compromise-in-nitin-gadkari-defamation-complaint-arvind-kejriwal/article6386374.ece
  • Log in or register to post comments
Profile picture for user नांदेडीअन

Submitted by नांदेडीअन on Mon, 05/25/2015 - 17:08

In reply to ...जरा अजुन मेहनत घ्यावी.. खरे खोटे काय ते समजेल...!!! by विनोद१८

Permalink

"जरा हे पण वाचा :-http://www

"जरा हे पण वाचा :- http://www.thehindu.com/news/national/possibility-of-compromise-in-nitin-gadkari-defamation-complaint-arvind-kejriwal/article6386374.ece"

अरे वा ! हे Compromise केजरीवाल मानहानीसाठी जेलमध्ये गेले होते तेव्हा झाले की जेलमध्ये जाण्याच्या अगोदर, की जेलमधून बाहेर आल्यानंतर ? साहेबांच्या भाषेचे जास्त ज्ञान नाहीये मला, पण माझ्या माहितीप्रमाणे Compromise ला मराठीत तडजोड किंवा समेट म्हणतात. आणि (परत) माझ्या माहितीप्रमाणे तडजोड किंवा समेट हा दोन्ही व्यक्तींच्या सहमतीने होतो, फक्त एका व्यक्तीकडून नाही. गडकरींच्या ड्रायव्हर, नौकर इत्यादी लोकांच्या नावावर कंपनीचे शेअर्स वगैरे आहेत. कॅगनेसुद्धा गडकरींवर पूर्ती प्रकरणामध्ये ठपका ठेवलाय. पण तरीही केजरीवालने त्यांचे नाव जिंदल, वाड्रा, अंबानीसारख्या भ्रष्ट नसलेल्या लोकांच्या यादीत टाकले. केजरीवालने इतका मोठा गुन्हा केलाय की गडकरी साहेब त्याला सहजासहजी सोडतील असे वाटत नाही. गडकरींनी या केसमधून असा धडका शिकवावा ना त्या चिरकूट केजरीला, पुढच्या वेळी कुणाचेही नाव घेतांना १०० वेळा विचार केला पाहिजे त्याने.
  • Log in or register to post comments

Submitted by विनोद१८ on Mon, 05/25/2015 - 22:57

In reply to "जरा हे पण वाचा :-http://www by नांदेडीअन

Permalink

yaa kesmadhye Arvind aat gela hota......

Tethehi tyane nehmichich natake keli, puravaa nasatana Gadkarinvar aarop kele kortaane te maagitale ha deu shakala nahi. Kortacha vel vaya ghalavala, Belbondche paise Rs.10,000/- bharalee naahit. Gela aatmadhye, Gadakarinchi Lekhee maafi maganyachi namushki gheunch Ha nantar baher aalaa, haa aata yachya baapjanmaat Gadakrinvar ase khote aarop karu dhjaavanàr naahi. Mhantaat na Jityachi khod melyashivay jaat naahi, tasa ha aata jar kuthe adakala tar nakkich yalaa baher yene kathin hoil, he nakki. Yachi attaachi natke paahata tasech hoil ase malaa vatate.
  • Log in or register to post comments
Profile picture for user नांदेडीअन

Submitted by नांदेडीअन on Mon, 05/25/2015 - 23:22

In reply to yaa kesmadhye Arvind aat gela hota...... by विनोद१८

Permalink

अहो दादा, लिहिण्याअगोदर थोडी

अहो दादा, लिहिण्याअगोदर थोडी तरी माहिती घेत चला हो. केस अजूनही सुरूच आहे कोर्टात. काहीही निकाल वगैरे आलेला नाहीये.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com