भटकंती - हरिहरेश्वर (२)

मिंटी's picture
मिंटी in कलादालन
26 Nov 2008 - 4:12 pm

http://www.misalpav.com/node/4761

नंतर मग आमचे पाय वळले ते त्या रम्य अशा समुद्र किनारी.
(क्रमशः )

पण आभाळात फारच ढगांची गर्दी व्हायला लागली आणि आम्ही परत रूमवर आलो. गप्पा मारता मारता ठरवलं की उद्या सकाळीच मंदिरात जायचं दर्शनाला.ठरल्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी सकाळीच आम्ही मंदिरात जायला निघालो.

मंदिरापाशी पोचताच आम्हाला खुणावलं ते त्या मनोहर अश्या समुद्रानं -

हरिहरेश्वरचं मंदिर हे शिवाचं मंदिर आहे.ते केव्हा बांधलं याचा अंदाज करणं जरा कठिण आहे पण बहुदा ते शिवकालीन असावं. या मंदिराचा प्रथम जिर्णोद्धार पहिल्या बाजिराव पेशव्यांनी केला अशी माहिती आम्हाला तिथल्या पुजार्‍यांनी दिली. मंदिरात शंकरा बरोबरच पार्वतीचं पण मंदिर आहे. दर्शन घेतल्यानंतर आम्ही प्रदक्षिणा घालायच्या हेतुनी मार्गस्थ झालो.प्रदक्षिणामार्गावर जाताना जपुन जा वाट फार डेंजर आहे असा प्रेमळ सल्लापण मिळाला स्थानिक लोकांकडुन......

प्रदक्षिणामार्गाची सुरुवात -

प्रदक्षिणा मार्गावरुन दिसणारा समुद्र -

प्रदक्षिणामार्ग तिथल्या रॉकी बीचवरुन जातो...

रॉकीबीच चं समुद्राच्या लाटांनी इरोजन होऊन हनीकोंब स्ट्रक्चर तयार होतात. थोडिशी मधमाश्यांच्या पोळ्यासारखी रचना असल्यानी त्यांना हे नाव पडलं आहे-

रॉकी बीच -

समुद्राच्या फेसाळत्या लाटा खुणावत होत्या.......त्या फेसाळत्या लाटांमधे खेळण्यासाठी आम्ही मर्गस्थ झालो....

( क्रमशः)

छायाचित्रण

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

26 Nov 2008 - 4:22 pm | लिखाळ

वा !
त्या हनिकोंब रचनेची माझ्याकडे चांगली चित्रे आहेत.. पण आत्ता हाताशी नाहीत.
तेथला खडकाळ किनारा खरेच छान आहे. त्या खडकांच्या खळग्यांत दिसणारे समुद्री प्राणी पाहुन खूप नवल वाटले होते.
-- लिखाळ.

ता. क. - अरे वा.. तुम्ही छान चित्र टाकलेतच.. मस्त आहे..
-- लिखाळ.

मिंटी's picture

26 Nov 2008 - 4:25 pm | मिंटी

धन्यवाद :)

तुमच्याकडची चित्रं बघायला मिळतील का?

जैनाचं कार्ट's picture

26 Nov 2008 - 4:25 pm | जैनाचं कार्ट (not verified)

वा !

सुंदर !
मिंटे सर्व फोटो मस्त आले आहेत व निसर्गाबद्दल काय बोलू ... जबरा लोकेशन !

जैनाचं कार्ट
देहि शिवा वर मोहि इहै...
शुभ करमन ते कबहूं न टरूं...
न डरूं अरि सौं जब जाई लरूं...
निसचै कर अपनी जीत करूं...

आपले संकेतस्थळ

धमाल मुलगा's picture

26 Nov 2008 - 4:33 pm | धमाल मुलगा

ज ह ब ह र्‍या फोटु गं मिंटे!!

आयला, कधी आम्हालाही बोलवा की अश्या छान सहलींना. जमलं तर शक्य तितके मिपाकर गोळा करु आणि मस्त फिरुन येऊ :)

मिंटी's picture

26 Nov 2008 - 4:39 pm | मिंटी

नक्की रे पुढल्यावेळी जाऊयात आपण.. नाहीतरी आपलं ठरलं आहे ना..... ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Nov 2008 - 6:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लैच भारी फोटो, आवडले !!!

व्यंकु's picture

26 Nov 2008 - 6:22 pm | व्यंकु

झक्कास फोतो

व्यंकु's picture

26 Nov 2008 - 6:22 pm | व्यंकु

झक्कास फोतो

विनायक प्रभू's picture

26 Nov 2008 - 6:28 pm | विनायक प्रभू

मस्त फोटो
गणपती पुळ्याला समुद्राने खुणावले. जरा आणखी आत गेलो असतो तर कायमचा गेलो असतो एवढा जोर होता पाण्याचा.

धोंडोपंत's picture

26 Nov 2008 - 6:31 pm | धोंडोपंत

प्रवासवर्णन आणि छायाचित्रे छान आहेत. आनंद वाटला. धन्यवाद.

हरिहरेश्वरबद्दल दोन चार गोष्टी सांगतो.

काळभैरवाचे मंदीर हे हरिहरेश्वरचे वैशिष्ट्य आहे.

तुम्ही ज्याला रॉकी बीच असे म्हटले आहे त्या ठिकाणी पांडवांनी त्यांच्या पितरांचे श्राद्धकर्म केल्याचा उल्लेख आहे.

त्या स्थानाच्या डाव्या बाजूस जेथे सावित्री नदी समुद्राला मिळते तेथून समोरच्या किनार्‍यावर ऐतिहासिक बाणकोण किल्ला आहे. बाणकोटावरून हरिहरेश्वरचा डोंगरपट्टा कासवासारखा दिसतो.

बाणकोट समोरच्या किनार्‍यावर दिसत असूनसुद्धा तरीने जाता येत नाही. कारण तिथे समुद्र मौजा फार मारतो. त्यामुळे आत बागमांडल्यापर्यंत जाऊन बागमांडल्याला तर पकडायची आणि समोरच्या किनार्‍यावर वेळासला ( नाना फडणवीसांचे गाव) उतरून वेळास बाणकोट जायचे असे सव्यापसव्य करायला लागते.

त्या ठिकाणी रायगड जिल्ह्याची हद्द संपून पुढे समोरच्या किनार्‍यावर म्हणजे वेळास, बाणकोट येथून रत्नागिरी जिल्हा सुरू होतो.

आपला,
(कोकण्या) धोंडोपंत

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)

मिंटी's picture

27 Nov 2008 - 10:06 am | मिंटी

धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल...
कोकणची अजुन माहिती वाचायला आवडेल... :)

मनस्वी's picture

26 Nov 2008 - 6:36 pm | मनस्वी

मस्त मिंटे! फोटो नं २ आणि ३ भन्नाट आहेत.

शितल's picture

26 Nov 2008 - 8:09 pm | शितल

मिंटे,
सुरेख फोटो आहेत :)
धोंडोपंतानी छान माहिती सांगितली आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद !
:)

झकासराव's picture

26 Nov 2008 - 9:21 pm | झकासराव

फोटॉ मस्त आहेत. :)
पहिला फोटु मला जरा जास्तच आवडलाय.
तो मोठ्या आकारात बघायची ईच्छा आहे.
फ्लिकर वर असेल तर लिन्क देणार काय?
नसेल तर फ्लिकरवर ओरिजिनल फोटु चिकटवुन लिन्क देच खरडवहीत. :)

................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

रेवती's picture

26 Nov 2008 - 9:40 pm | रेवती

प्रसन्न वाटलं फोटो बघून.
मला जायला नाही मिळालं म्हणून वाईट वाटलं.;)

रेवती

ऋषिकेश's picture

26 Nov 2008 - 10:01 pm | ऋषिकेश

सुंदर फोटो! खूप आवडले!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश

ऋषिकेश's picture

26 Nov 2008 - 10:02 pm | ऋषिकेश

सुंदर फोटो! खूप आवडले!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश

यशोधरा's picture

27 Nov 2008 - 1:39 am | यशोधरा

मिंटी, अतिशय सुरेख काढले आहेस गं फोटो! आवडले.
धोंडोपंत, उत्तम माहिती.

सूर्य's picture

27 Nov 2008 - 3:31 am | सूर्य

छान चित्रे .. आवडली.
- सूर्य.

वर्षा's picture

27 Nov 2008 - 11:11 am | वर्षा

छान फोटो! प्रसन्न वाटलं

मदनबाण's picture

27 Nov 2008 - 10:00 pm | मदनबाण

मस्त फोटो.. :)

मदनबाण.....

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर