काय सांगतील पोरी
या आसवांच्या ओळी
दु:खाच्या खाणीत
तव स्वप्नांची होळी
नको येवुस माहेराला
अवकळा सारी
क्षीण आहे भाव अन
जीव झाला भारी
सुख गेली दावणीला
शब्दही फितुर झाली
झोपडीच्या झरोक्यातुन
रात्र टिपुस ओली
उजाडलं रान सारं
तिथ आठवांची धुळ
माखलेल मन आज
जनु पारंब्याचा पिळ
नाही काही इथं
सार सार संपल
तुझ्या पिर्तीची ओढ
बस हीच जीवन वेल
- शब्दमेघ
प्रतिक्रिया
13 May 2015 - 2:19 pm | चित्रगुप्त
व्वा. प्रथम ही कविता वाचली, तेंव्हा नीट अर्थबोध झाला नाही, मात्र वर दिलेल्या दुव्यावरून या आधीच्या दोन्ही कविता वाचल्यावर सर्व उलगडा झाला.
तिन्ही कवितात हुरहुर, वेदना जास्त जास्त टोकदार होत गेली असल्याचे जाणवले.
असा अनुभव मला चित्रकलेच्या बाबतीत अनेकदा आलेला आहे, परंतु "तुझ्या पिर्तीची ओढ - बस हीच जीवन वेल" असल्याने ती वेल पुन्हा पुन्हा बहरत जाते, हे नक्की.
14 May 2015 - 12:18 am | गणेशा
धन्यवाद !
अवांतर :
चित्रकलेचा अनुभव जास्त उत्साह आणाणारा असेल कदाचित...चित्रकला ही मला आवडणारी ( येणारी नाही [:(] ) कला आहे.
त्यातील नवनिर्मितीचा आनंद अती उच्च असतो असे वाटते.. रेषेच्या/रंगाच्या प्रत्येक फटकार्यात एक नविन भाव निर्माण होत असतो .. शब्दांचे तसे नसते कायम , तरी त्यांच्यातील भावना चित्रांच्या असंख्य तुकड्यांच्या वेड्यावाकड्या रेषाच असु शकतात... परंतु नवनिर्मितीचा आनंद त्यामानाने कमीच.
14 May 2015 - 12:41 am | चित्रगुप्त
कविता, गद्य लेखन आणि चित्रकला या तिन्ही प्रकारांबद्दल माझा अनुभव असा, की कविता ही फार क्वचित सुचून जाते, आणि तेंव्हाच्या तेंव्हा लिहून काढली नाही, तर विस्मृतीत जाते. गद्य लेखनाचा एकादा विषय बहुधा पहाटे सुचतो, अनेक दिवस तो मनात घोळत राहतो, आणि लेखन सुद्धा अनेक दिवस चालते. चित्रकला बहुधा सतत डोक्यात असतेच, प्रत्यक्ष निर्मिती जरी होत नसली, तरी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ती मन व्यापून असते.
13 May 2015 - 2:23 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
__/\__!
13 May 2015 - 2:27 pm | ज्ञानोबाचे पैजार
ही कविता पण आवडली.
पैजारबुवा,
13 May 2015 - 3:15 pm | अत्रुप्त आत्मा
शब्दमेघच!
13 May 2015 - 3:31 pm | प्यारे१
कवितामालिका आवडली.
थोडं धाडस करुन खालचे बदल केलेत. बघ आवडतं का ? फक्त लय/ गेयता वाढतेय म्हणून
काय सांगतील पोरी
तुला आसवांच्या या ओळी
दु:खाच्या खाणीत
तव स्वप्नांची गं होळी
नको येवुस माहेराला
अवकळा आहे सारी
क्षीण आहे भाव आज सारा
जीव झाला की गं भारी
सुख गेली दावणीला
शब्द फितुर झालेती
झोपडीच्या झरोक्यातुन
रात्र टिपुस ओलेती
उजाडलं रान सारं
तिथ आठवांची धुळ
माखलेल मन आज
जनु पारंब्याचा पिळ
नाही नाही काही इथं
सारं सारं गं संपलं
तुझ्या पीरतीची ओढ
बस हीच जीवन वेल
14 May 2015 - 12:25 am | गणेशा
बदल आवडला ! परंतु थोडासा भाव बदलला येथे.
मी लिहिलेली कविता, त्या मुलीचा शेतकरी बाप, निराशेच्या गर्तेत .. स्वताशीच पुटपुटत आहे
आणि ती बोली भाषा आहे..
पुढील शेवटच्या कवितेत असा गेय भाग नक्कीच वाचायला मिळेल कारण ती दूर असणार्या मुलीच्या तोंडुन आहे.
सर्वांना धन्यवाद !
13 May 2015 - 3:46 pm | मदनबाण
छान...
उजाडलं रान सारं
तिथ आठवांची धुळ
माखलेल मन आज
जनु पारंब्याचा पिळ
वा...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Internet of Things
The Internet of Things Is Far Bigger Than Anyone Realizes { Part 1}
The Internet of Things Is Far Bigger Than Anyone Realizes { Part 2}
What does Verizon's AOL buy have to do with the internet of things?
Samsung takes another step into Internet of Things
Samsung's Artik platform aims to jump-start the Internet of Things
13 May 2015 - 4:28 pm | प्रचेतस
उच्च कविता.
13 May 2015 - 4:46 pm | नाखु
पु भा प्र.
14 May 2015 - 3:22 am | रातराणी
खूप सुंदर! प्रचंड आवडली!