१७६० .

तर्री's picture
तर्री in काथ्याकूट
20 Sep 2007 - 2:54 pm
गाभा: 

१७६० ह्या आकड्याचा वापर मराठीत इतका का बरे होतो ?
ऊदा.: तुला १७६० वेळा सान्गितले तरी समजत नाही.........

हा आकडा कोठून आला ?

.....तर्री.

प्रतिक्रिया

जुना अभिजित's picture

20 Sep 2007 - 3:10 pm | जुना अभिजित

१७६१ साली पानिपतची लढाई झाली. त्यानंतर मराठेशाही म्हणावी इतकी ताकतवान राहीली नाही.
तेव्हा जे काही करायच सांगायच ते १७६० पर्यंत..

म्हणून १७६०.

मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

प्रियाली's picture

20 Sep 2007 - 4:07 pm | प्रियाली

१७६१ साली पानिपतची लढाई झाली. त्यानंतर मराठेशाही म्हणावी इतकी ताकतवान राहीली नाही. तेव्हा जे काही करायच सांगायच ते १७६० पर्यंत..

बरोब्बर! :)

धनंजय's picture

20 Sep 2007 - 11:30 pm | धनंजय

एका मैलात १७६० यार्ड (वार) असतात तेही असेल.

प्रियाली's picture

21 Sep 2007 - 1:08 am | प्रियाली

तशा अर्थाची इंग्रजी फ्रेज वापरली जाते का? डु आय हॅव टू टेल यू "सेवंटीन सिक्स्टी टाइम्स" वगैरे वगैरे ;-)?

शंकरराव's picture

20 Nov 2008 - 7:28 pm | शंकरराव

मग नक्टीच्या लग्नाला १७६० विघ्न असे का ?

आजानुकर्ण's picture

20 Nov 2008 - 7:32 pm | आजानुकर्ण

हाच प्रश्न ६१-६२ बद्दलही पडला आहे.

हा आकडा कोठून आला असावा. ७८६ या अंकाचे महत्त्व काय आहे हेदेखील जाणून घ्यायला आवडेल

आपला,
(अजाण) आजानुकर्ण

विनायक प्रभू's picture

20 Nov 2008 - 7:41 pm | विनायक प्रभू

दिवार बघा. उत्तर संपुर्ण मिळेल. ७८६
६१= ६+१ =७
६२=६+२=८
सातव्या आणि आठव्या महिन्यात होते ते ६१ ६२

अवलिया's picture

20 Nov 2008 - 7:43 pm | अवलिया

आणि १९-२० चे काय तसेच ६९ चे काय?

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Nov 2008 - 7:55 pm | बिपिन कार्यकर्ते

६९ = 69

Got it?

बिपिन कार्यकर्ते

अवलिया's picture

20 Nov 2008 - 7:56 pm | अवलिया

मालुम है भाई.....
हे पण आणि गोल्डन शॉवर पण.

टारझन's picture

21 Nov 2008 - 12:06 am | टारझन

प्रभुंनी वेंट्री काय केली .. सगळे कासोटा सोडून मैदानात ... वा ...
च्यायला हा १७६० पासून डायरेक्ट ६१-६३ ? अबब .. पुन्हा ६९ पण.... ३६ बरं कोणी बोलला नाही...भॉ भॉ भॉ ...

प्रभुदेवा की जै हो .. पमकीन भैंचा इजय असो .. णाणा अमर रहे .. चालू द्या रे सिनीयर चोच्यांनो

(च्युनियर चोच्या) टोच्या

टारझन's picture

21 Nov 2008 - 12:12 am | टारझन

दोनदा ६१-६२ झालं ..

इनोबा म्हणे's picture

21 Nov 2008 - 12:16 am | इनोबा म्हणे

थकला असशील ना मग, की आता सवय झाली आहे? ;)

'दम' मारणं चांगलं.....पण त्याची सवय लागणं वाईट!
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

संजय अभ्यंकर's picture

20 Nov 2008 - 8:25 pm | संजय अभ्यंकर

६१६२!
पांडू हवालदारचा (दादा कोंडके) बक्कल नंबर!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

आजानुकर्ण's picture

20 Nov 2008 - 10:04 pm | आजानुकर्ण

दादा कोंडके ६१ आणि अशोक सराफ ६२ असे आहे ना?

आपला,
(मुंबईचा केळीवाला) आजानुकर्ण

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Nov 2008 - 7:50 pm | बिपिन कार्यकर्ते

इस्लामच्या शिकवणीनुसार 'ला इलाहा इल्ललाह, मुहम्मदर्रसूलिल्लाह' हे वाक्य शहादा (एक्स्प्रेशन ऑफ फेथ) म्हणून मानले जाते. एखादी सज्ञान व्यक्ति जेव्हा मुस्लिम धर्माचा स्वीकार करते तेव्हा हे वाक्य साक्षीदारांसमोर म्हणावे लागते. तसेच प्रत्येक मुसलमानाला प्रत्येक प्रार्थनेच्या वेळी पण म्हणावे लागते.

अरबी भाषेतल्या प्रत्येक अक्षराबरोबर एक संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार या वाक्यातील प्रत्येक मूळाक्षराबरोबर जी संख्या आहे त्यांची बेरीज ७८६ अशी येते. म्हणून ७८६ या संख्येला महत्व आहे. पण अर्थात कट्टर (वहाबी) मुसलमान हे मानत नाहीत आणि त्यांच्यामतानुसार हे तर 'हराम' पण आहे. अश्याच अजून दोन वाक्यांबरोबर जोडल्या गेलेल्या संख्या आहेत, आत्ता आठवत नाहियेत.

अजून एक गंमत, संख्या नाही पण, के.जी.एन. ही इंग्रजी अक्षरे बर्‍याच मुस्लिम दुकांनावर किंवा टेंपो - ट्रक वगैरेवर दिसतात. त्याचा अर्थ... ख्वाजा गरिब नवाझ.

(शेख) बिपिन कार्यकर्ते

माझ्याकडे कुराण मराठीतून आहे त्याची पृष्ठसंख्या ७८६ आहे
हे कदाचित कारण असावे की कुराणाची पृष्ठसंख्या ७८६ आहे

(मानवजातीचा इतिहास तपासण्यात आनंद मानणारा)- सागर

नितीनमहाजन's picture

20 Nov 2008 - 7:44 pm | नितीनमहाजन

मुसलमानांमध्ये ७८६ म्हणजे 'बिस्मिला' म्हणजे शुभ शकुन. याचा उगम कदाचित महम्मद पैगंबर जे मदिनेहून मक्केला (किंवा उलट नक्की आठवत नाही) त्या सनासंबंधी असावे.

६१ - ६२ हे आकडे माझ्या आठवणीप्रमाणे दादा कोंडके यांच्या "पांडू हवालदार" चित्रपटा पासून प्रसिध्द झाले असावे. त्या चित्रपटात दादा कोंडके व अशोक सराफ यांचे बक्कल क्रमांक ६१ - ६२ होते.

नितीन महाजन

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Nov 2008 - 7:52 pm | बिपिन कार्यकर्ते

६१ - ६२ हे आकडे माझ्या आठवणीप्रमाणे दादा कोंडके यांच्या "पांडू हवालदार" चित्रपटा पासून प्रसिध्द झाले असावे. त्या चित्रपटात दादा कोंडके व अशोक सराफ यांचे बक्कल क्रमांक ६१ - ६२ होते.

साहेब, ६१-६२ चा जो अर्थ मला माहित आहे त्यानुसार हे पटत नाहिये. :)

बिपिन कार्यकर्ते

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Nov 2008 - 7:54 pm | बिपिन कार्यकर्ते

म्हणजे शुभशकुन नाही. 'बा इस्म अल्लाह...' म्हणजे 'अल्लाहच्या नावाबरोबर / अल्लाहच्या नावाने' (विथ द नेम ऑफ अल्लाह).... 'अल्लाह चे नाव घेऊन' असा भावार्थ.

(शेख) बिपिन कार्यकर्ते

अभिज्ञ's picture

21 Nov 2008 - 2:45 am | अभिज्ञ

अवांतर-
"ओम" जर आरशासमोर धरला तर "७८६" असा आकडा दिसतो असे कुठेतरी वाचल्याचे स्मरते.

अभिज्ञ.

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Nov 2008 - 2:53 am | बिपिन कार्यकर्ते

आयला हे कधी ऐकलं नव्हतं.... नविनच आहे. पण बहुधा असे नसावे.

आता हे ऐका... कोका कोला (ज्या प्रकारे इंग्लिश मधे विशिष्ट प्रकारे लिहिले जाते) जर का उलटे बघितले तर 'ला मक्का ला मुहम्मद' अशी अक्षरे दिसतात अशी खूप मोठी लाट आली होती मध्यंतरी अरब (आणि पर्यायाने मुस्लिम) जगांत. आणि त्या मुळे कोका कोला वर बंदी घालावी असे उठले होते. :)

गूगलवल्यावर हे मिळाले.

http://www.thecoca-colacompany.com/contactus/myths_rumors/middle_east_su...
http://jihadwatch.org/dhimmiwatch/archives/002735.php

एंजॉय माडी. ;)

बिपिन कार्यकर्ते

विकास's picture

20 Nov 2008 - 8:14 pm | विकास

मिपावरील या आधीच्या चर्चेत याचे उत्तर मिळेल :-)

फ्रॅक्चर बंड्या's picture

21 Nov 2008 - 3:40 pm | फ्रॅक्चर बंड्या

४२० कुठुन आला ?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Nov 2008 - 3:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बहुदा फसवाफसवीसंबंधीच्या भारतीय पीनल कोडमधल्या कलमावरून!

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Nov 2008 - 6:50 pm | बिपिन कार्यकर्ते

बरोबर...

बिपिन कार्यकर्ते

शंकरराव's picture

21 Nov 2008 - 6:37 pm | शंकरराव

तसेच .. १२ गावचे पणी पचवलेला ..
मग गावे १२ च का ?

ज्ञ's picture

21 Nov 2008 - 6:58 pm | ज्ञ

१९-२० चा अर्थ ९५% ते १०० % असा आहे..

ABOUT MISTEREOUS 786 MEANING NOT EXPLAINED BY SO CALLED MUSLIM SCHOLARS-
All Arabic copies of the Koran have the mysterious figure 786 imprinted on them . No Arabic scholar has been able to determine the choice of this particular number as divine. It is an established fact that Muhammad was illiterate therefore it is obvious that he would not be able to differentiate numbers from letters. This "magical" number is none other than the Vedic holy letter "OM" written in Sanskrit (Refer to figure 2). Anyone who knows Sanskrit can try reading the symbol for "OM" backwards in the Arabic way and magically the numbers 786 will appear! Muslims in their ignorance simply do not realise that this special number is nothing more than the holiest of Vedic symbols misread.

Figure 2.
Read from right to left this figure
of OM represents the numbers 786
Look at this symbol of Om in a mirror and
you can make out the Devnagari (Sanskrit-Hindi)
numerals 7-8-6

प्राजु's picture

22 Nov 2008 - 1:23 am | प्राजु

व्वा! सागर लहरी,
मस्त माहिती आहे रे ही. माहितिच नव्हतं हे असं काही आहे. धन्यवाद.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सर्किट's picture

22 Nov 2008 - 4:08 am | सर्किट (not verified)

तुम्हाला माहिती नव्हतं तेच बरोबर आहे, कारण ही "माहिती" चूक आहे. काबा हे शिवमंदिर आहे असे मानणार्‍यांनी दुसर्‍या वाक्यात ही "माहिती" दिलेली आहे.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

सुनील's picture

24 Nov 2008 - 6:38 pm | सुनील

आपण पुनाओकांचे शिष्य का?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

वेताळ's picture

22 Nov 2008 - 10:34 am | वेताळ

असे आपण सर्किटराव कोणत्या पुराव्यावर म्हणता ? काबा हे शिवमंदिर असुच शकत नाही हे तुम्ही छातीठोकपणे सांगु शकत नाही. अजुनही काबा भोवती खुप मोठे गुढवलय आहे. तिथे काय आहे व काय चालते ह्याची बिगरमुस्लिमांस काहीच माहिती नाही.तसेच काबाचे फोटो पण खुप कमी प्रमाणात उपलब्द आहेत्.संशयास खुप जागा आहे.
वेताळ

सर्किट's picture

22 Nov 2008 - 10:38 am | सर्किट (not verified)

वेताळराव,

आमच्याहीभोवती बरेच गूढ वलय आहे.

त्यामुळे आम्हाला काय काय माहिती आहे, हे तरी तुम्हाला कुठे ठाऊक आहे ?

ईंटरनेटवरच्या चावड्यांवर जी "माहिती" दिली जाते, त्याला खुस्शाल माहिती म्हणून छापणे इथे जे चालते, त्याविषयी पुन्हा एकदा विचार व्हावा.

वाटल्यास तुमच्या एखाद्या मुसलमान मित्राला विचारा ७८६ चे महत्व.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

शंकरराव's picture

24 Nov 2008 - 5:23 pm | शंकरराव

ॐ च्या आरश्यातील घबी मध्ये ७८६ स्पष्ट दिसते.
ॐ नाद स्वयंभू आहे त्यातूनच विश्वनिर्मीती झाली आहे नूस्ते ७८६ काय घेउन बसलात.
काबा च काय हो.. मक्केश्वर शिव हे सुध्दा आम्ही मानतो.

निर् क्षीर विवेक जाग्रुत असावा
चावड्यांच वावड नाही ,
शन्करराव

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Nov 2008 - 10:50 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

ॐ नाद स्वयंभू आहे त्यातूनच विश्वनिर्मीती झाली आहे ...
ही विश्वनिर्मितीची थिअरी माहित नव्हती, अंमळ नवीनच आहे माझ्यासाठी.

बाकी चालू द्या.

शंकरराव's picture

25 Nov 2008 - 1:59 pm | शंकरराव

वेद-पूराणावर आधारीत विश्वनिर्मीतीचे वर्णन थोड्क्यात असे. .

शिव आणि शक्ति अलग होतांना एक प्रचंड स्पोट झाला तोच हा स्वयंभू ॐ कार नाद आहे. हा नाद एक मुलतत्वाच्या (primordial elements) रुपाने प्रत्येक तत्वात आहे. व मानवि शरिरात हेच तत्व आत्मा म्हणून ओळ्खले जाते.
मुलतत्वातून पंचतत्वांची , इतर तत्वाची निर्मीती व पूढे श्रुष्टी\विश्वनिर्मीती. ..

(आज Large Hadron Collider च्या प्रयोगातून हेच शोधन्याचा प्रयत्न चालू आहे?)
दासबोधात सूद्धा 'मुलतत्वातून पंचतत्वांची , इतर तत्वाची निर्मीती व पूढे श्रुष्टी\विश्वनिर्मीती.' चा संधर्भ मिळतो.

अधिक माहिती व्य. नि.
शंकरराव

सुनील's picture

25 Nov 2008 - 2:42 pm | सुनील

शिव आणि शक्ति अलग होतांना एक प्रचंड स्पोट झाला तोच हा स्वयंभू ॐ कार नाद आहे. हा नाद एक मुलतत्वाच्या (primordial elements) रुपाने प्रत्येक तत्वात आहे. व मानवि शरिरात हेच तत्व आत्मा म्हणून ओळ्खले जाते.
मुलतत्वातून पंचतत्वांची , इतर तत्वाची निर्मीती व पूढे श्रुष्टी\विश्वनिर्मीती. ..

एक अक्षर कळले नाही, म्हणजे फारच उच्च दर्जाचे विचार असावेत!

(अडाणी) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Nov 2008 - 3:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

एक अक्षर कळले नाही, म्हणजे फारच उच्च दर्जाचे विचार असावेत!
+१ सहमत

आणि दासबोधात विश्वनिर्मितीच्या थिअरींबद्दल चर्चा आहे हा पण शोधच माझ्यासाठी!

टारझन's picture

25 Nov 2008 - 3:08 pm | टारझन

=)) =)) =)) =))

-(ॐ यायच्या पण आधीपासुन आडाणी)
टारझन

शंकरराव's picture

25 Nov 2008 - 3:04 pm | शंकरराव

संकल्पना विश्वनिर्मीतीच्या आधीचे अस्तित्व...
शिव आणि शक्ति ,Kinetic and Potential Energy

शंकरराव

टारझन's picture

25 Nov 2008 - 3:10 pm | टारझन

शिव = कायनेटिक एनर्जी
आणि शक्ति = पोटँशियल एनर्जी ?

शिव शिव शिव .... सॉरी .. कायनेटिक एनर्जी.. कायनेटिक एनर्जी.. कायनेटिक एनर्जी

- टारझन

शंकरराव's picture

26 Nov 2008 - 8:41 pm | शंकरराव

काही प्रमाणात yin yang ची संकल्पना शिव आणि शक्ति संकल्पनेच्या जवळ्पास आहे

दासबोधात पंचतत्वांची , इतर तत्वाची निर्मीती संधर्भ\शोध ..

शंकरराव