Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by तर्री on गुरुवार, 09/20/2007 - 14:54
  • Log in or register to post comments
  • 22304 views

प्रतिक्रिया

Submitted by जुना अभिजित on गुरुवार, 09/20/2007 - 15:10

Permalink

१७६१

१७६१ साली पानिपतची लढाई झाली. त्यानंतर मराठेशाही म्हणावी इतकी ताकतवान राहीली नाही. तेव्हा जे काही करायच सांगायच ते १७६० पर्यंत.. म्हणून १७६०. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on गुरुवार, 09/20/2007 - 16:07

In reply to १७६१ by जुना अभिजित

Permalink

सहमत!

१७६१ साली पानिपतची लढाई झाली. त्यानंतर मराठेशाही म्हणावी इतकी ताकतवान राहीली नाही. तेव्हा जे काही करायच सांगायच ते १७६० पर्यंत.. बरोब्बर! :)
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on गुरुवार, 09/20/2007 - 23:30

Permalink

मैलातले १७६० यार्ड

एका मैलात १७६० यार्ड (वार) असतात तेही असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Fri, 09/21/2007 - 01:08

In reply to मैलातले १७६० यार्ड by धनंजय

Permalink

पण मग

तशा अर्थाची इंग्रजी फ्रेज वापरली जाते का? डु आय हॅव टू टेल यू "सेवंटीन सिक्स्टी टाइम्स" वगैरे वगैरे ;-)?
  • Log in or register to post comments

Submitted by शंकरराव on गुरुवार, 11/20/2008 - 19:28

Permalink

१७६०

मग नक्टीच्या लग्नाला १७६० विघ्न असे का ?
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on गुरुवार, 11/20/2008 - 19:32

Permalink

हाच प्रश्न

हाच प्रश्न ६१-६२ बद्दलही पडला आहे. हा आकडा कोठून आला असावा. ७८६ या अंकाचे महत्त्व काय आहे हेदेखील जाणून घ्यायला आवडेल आपला, (अजाण) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 11/20/2008 - 19:41

In reply to हाच प्रश्न by आजानुकर्ण

Permalink

दिवार

दिवार बघा. उत्तर संपुर्ण मिळेल. ७८६ ६१= ६+१ =७ ६२=६+२=८ सातव्या आणि आठव्या महिन्यात होते ते ६१ ६२
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on गुरुवार, 11/20/2008 - 19:43

In reply to दिवार by विनायक प्रभू

Permalink

आणि १९-२०

आणि १९-२० चे काय तसेच ६९ चे काय?
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 11/20/2008 - 19:55

In reply to आणि १९-२० by अवलिया

Permalink

६९

६९ = 69 Got it? बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on गुरुवार, 11/20/2008 - 19:56

In reply to ६९ by बिपिन कार्यकर्ते

Permalink

मालुम है

मालुम है भाई..... हे पण आणि गोल्डन शॉवर पण.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 11/21/2008 - 00:06

In reply to मालुम है by अवलिया

Permalink

हाण तिच्याआयला

प्रभुंनी वेंट्री काय केली .. सगळे कासोटा सोडून मैदानात ... वा ... च्यायला हा १७६० पासून डायरेक्ट ६१-६३ ? अबब .. पुन्हा ६९ पण.... ३६ बरं कोणी बोलला नाही...भॉ भॉ भॉ ... प्रभुदेवा की जै हो .. पमकीन भैंचा इजय असो .. णाणा अमर रहे .. चालू द्या रे सिनीयर चोच्यांनो (च्युनियर चोच्या) टोच्या
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 11/21/2008 - 00:12

In reply to मालुम है by अवलिया

Permalink

:)

दोनदा ६१-६२ झालं ..
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on Fri, 11/21/2008 - 00:16

In reply to :) by टारझन

Permalink

:))

थकला असशील ना मग, की आता सवय झाली आहे? ;) 'दम' मारणं चांगलं.....पण त्याची सवय लागणं वाईट! -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments

Submitted by संजय अभ्यंकर on गुरुवार, 11/20/2008 - 20:25

In reply to दिवार by विनायक प्रभू

Permalink

६१६२

६१६२! पांडू हवालदारचा (दादा कोंडके) बक्कल नंबर! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on गुरुवार, 11/20/2008 - 22:04

In reply to ६१६२ by संजय अभ्यंकर

Permalink

बक्कल नंबर

दादा कोंडके ६१ आणि अशोक सराफ ६२ असे आहे ना? आपला, (मुंबईचा केळीवाला) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 11/20/2008 - 19:50

In reply to हाच प्रश्न by आजानुकर्ण

Permalink

७८६

इस्लामच्या शिकवणीनुसार 'ला इलाहा इल्ललाह, मुहम्मदर्रसूलिल्लाह' हे वाक्य शहादा (एक्स्प्रेशन ऑफ फेथ) म्हणून मानले जाते. एखादी सज्ञान व्यक्ति जेव्हा मुस्लिम धर्माचा स्वीकार करते तेव्हा हे वाक्य साक्षीदारांसमोर म्हणावे लागते. तसेच प्रत्येक मुसलमानाला प्रत्येक प्रार्थनेच्या वेळी पण म्हणावे लागते. अरबी भाषेतल्या प्रत्येक अक्षराबरोबर एक संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार या वाक्यातील प्रत्येक मूळाक्षराबरोबर जी संख्या आहे त्यांची बेरीज ७८६ अशी येते. म्हणून ७८६ या संख्येला महत्व आहे. पण अर्थात कट्टर (वहाबी) मुसलमान हे मानत नाहीत आणि त्यांच्यामतानुसार हे तर 'हराम' पण आहे. अश्याच अजून दोन वाक्यांबरोबर जोडल्या गेलेल्या संख्या आहेत, आत्ता आठवत नाहियेत. अजून एक गंमत, संख्या नाही पण, के.जी.एन. ही इंग्रजी अक्षरे बर्‍याच मुस्लिम दुकांनावर किंवा टेंपो - ट्रक वगैरेवर दिसतात. त्याचा अर्थ... ख्वाजा गरिब नवाझ. (शेख) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by सागर on Mon, 11/24/2008 - 19:55

In reply to हाच प्रश्न by आजानुकर्ण

Permalink

कुराणाची पृष्ठसंख्या ७८६ आहे ... म्हणून असेन

माझ्याकडे कुराण मराठीतून आहे त्याची पृष्ठसंख्या ७८६ आहे हे कदाचित कारण असावे की कुराणाची पृष्ठसंख्या ७८६ आहे (मानवजातीचा इतिहास तपासण्यात आनंद मानणारा)- सागर
  • Log in or register to post comments

Submitted by नितीनमहाजन on गुरुवार, 11/20/2008 - 19:44

Permalink

७८६ व ६१ - ६२

मुसलमानांमध्ये ७८६ म्हणजे 'बिस्मिला' म्हणजे शुभ शकुन. याचा उगम कदाचित महम्मद पैगंबर जे मदिनेहून मक्केला (किंवा उलट नक्की आठवत नाही) त्या सनासंबंधी असावे. ६१ - ६२ हे आकडे माझ्या आठवणीप्रमाणे दादा कोंडके यांच्या "पांडू हवालदार" चित्रपटा पासून प्रसिध्द झाले असावे. त्या चित्रपटात दादा कोंडके व अशोक सराफ यांचे बक्कल क्रमांक ६१ - ६२ होते. नितीन महाजन
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 11/20/2008 - 19:52

In reply to ७८६ व ६१ - ६२ by नितीनमहाजन

Permalink

६१ - ६२

६१ - ६२ हे आकडे माझ्या आठवणीप्रमाणे दादा कोंडके यांच्या "पांडू हवालदार" चित्रपटा पासून प्रसिध्द झाले असावे. त्या चित्रपटात दादा कोंडके व अशोक सराफ यांचे बक्कल क्रमांक ६१ - ६२ होते. साहेब, ६१-६२ चा जो अर्थ मला माहित आहे त्यानुसार हे पटत नाहिये. :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 11/20/2008 - 19:54

In reply to ७८६ व ६१ - ६२ by नितीनमहाजन

Permalink

बिस्मिल्लाह...

म्हणजे शुभशकुन नाही. 'बा इस्म अल्लाह...' म्हणजे 'अल्लाहच्या नावाबरोबर / अल्लाहच्या नावाने' (विथ द नेम ऑफ अल्लाह).... 'अल्लाह चे नाव घेऊन' असा भावार्थ. (शेख) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by अभिज्ञ on Fri, 11/21/2008 - 02:45

In reply to बिस्मिल्लाह... by बिपिन कार्यकर्ते

Permalink

अवांतर- "ओम"

अवांतर- "ओम" जर आरशासमोर धरला तर "७८६" असा आकडा दिसतो असे कुठेतरी वाचल्याचे स्मरते. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Fri, 11/21/2008 - 02:53

In reply to अवांतर- "ओम" by अभिज्ञ

Permalink

जबरी...

आयला हे कधी ऐकलं नव्हतं.... नविनच आहे. पण बहुधा असे नसावे. आता हे ऐका... कोका कोला (ज्या प्रकारे इंग्लिश मधे विशिष्ट प्रकारे लिहिले जाते) जर का उलटे बघितले तर 'ला मक्का ला मुहम्मद' अशी अक्षरे दिसतात अशी खूप मोठी लाट आली होती मध्यंतरी अरब (आणि पर्यायाने मुस्लिम) जगांत. आणि त्या मुळे कोका कोला वर बंदी घालावी असे उठले होते. :) गूगलवल्यावर हे मिळाले. http://www.thecoca-colacompany.com/contactus/myths_rumors/middle_east_subliminal.html http://jihadwatch.org/dhimmiwatch/archives/002735.php एंजॉय माडी. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on गुरुवार, 11/20/2008 - 20:14

Permalink

कदाचीत

मिपावरील या आधीच्या चर्चेत याचे उत्तर मिळेल :-)
  • Log in or register to post comments

Submitted by फ्रॅक्चर बंड्या on Fri, 11/21/2008 - 15:40

Permalink

४२० कुठुन आला ?

४२० कुठुन आला ?
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 11/21/2008 - 15:47

In reply to ४२० कुठुन आला ? by फ्रॅक्चर बंड्या

Permalink

बहुदा

बहुदा फसवाफसवीसंबंधीच्या भारतीय पीनल कोडमधल्या कलमावरून!
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Fri, 11/21/2008 - 18:50

In reply to बहुदा by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

बरोबर...

बरोबर... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by शंकरराव on Fri, 11/21/2008 - 18:37

Permalink

१२ गावचे

तसेच .. १२ गावचे पणी पचवलेला .. मग गावे १२ च का ?
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञ on Fri, 11/21/2008 - 18:58

Permalink

१९-२०

१९-२० चा अर्थ ९५% ते १०० % असा आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by सागरलहरी on Sat, 11/22/2008 - 01:11

Permalink

माहीती इंग्रजीत आहे त्याबद्दल माफी असावी पण खूप महत्वाची

ABOUT MISTEREOUS 786 MEANING NOT EXPLAINED BY SO CALLED MUSLIM SCHOLARS- All Arabic copies of the Koran have the mysterious figure 786 imprinted on them . No Arabic scholar has been able to determine the choice of this particular number as divine. It is an established fact that Muhammad was illiterate therefore it is obvious that he would not be able to differentiate numbers from letters. This "magical" number is none other than the Vedic holy letter "OM" written in Sanskrit (Refer to figure 2). Anyone who knows Sanskrit can try reading the symbol for "OM" backwards in the Arabic way and magically the numbers 786 will appear! Muslims in their ignorance simply do not realise that this special number is nothing more than the holiest of Vedic symbols misread. ॐ Figure 2. Read from right to left this figure of OM represents the numbers 786 Look at this symbol of Om in a mirror and you can make out the Devnagari (Sanskrit-Hindi) numerals 7-8-6
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Sat, 11/22/2008 - 01:23

In reply to माहीती इंग्रजीत आहे त्याबद्दल माफी असावी पण खूप महत्वाची by सागरलहरी

Permalink

व्वा! सागर

व्वा! सागर लहरी, मस्त माहिती आहे रे ही. माहितिच नव्हतं हे असं काही आहे. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Sat, 11/22/2008 - 04:08

In reply to व्वा! सागर by प्राजु

Permalink

"माहिती"

तुम्हाला माहिती नव्हतं तेच बरोबर आहे, कारण ही "माहिती" चूक आहे. काबा हे शिवमंदिर आहे असे मानणार्‍यांनी दुसर्‍या वाक्यात ही "माहिती" दिलेली आहे. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Mon, 11/24/2008 - 18:38

In reply to माहीती इंग्रजीत आहे त्याबद्दल माफी असावी पण खूप महत्वाची by सागरलहरी

Permalink

पु ना ओक

आपण पुनाओकांचे शिष्य का? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Sat, 11/22/2008 - 10:34

Permalink

ही माहिती चुक आहे

असे आपण सर्किटराव कोणत्या पुराव्यावर म्हणता ? काबा हे शिवमंदिर असुच शकत नाही हे तुम्ही छातीठोकपणे सांगु शकत नाही. अजुनही काबा भोवती खुप मोठे गुढवलय आहे. तिथे काय आहे व काय चालते ह्याची बिगरमुस्लिमांस काहीच माहिती नाही.तसेच काबाचे फोटो पण खुप कमी प्रमाणात उपलब्द आहेत्.संशयास खुप जागा आहे. वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Sat, 11/22/2008 - 10:38

In reply to ही माहिती चुक आहे by वेताळ

Permalink

आमच्याहीभोवती

वेताळराव, आमच्याहीभोवती बरेच गूढ वलय आहे. त्यामुळे आम्हाला काय काय माहिती आहे, हे तरी तुम्हाला कुठे ठाऊक आहे ? ईंटरनेटवरच्या चावड्यांवर जी "माहिती" दिली जाते, त्याला खुस्शाल माहिती म्हणून छापणे इथे जे चालते, त्याविषयी पुन्हा एकदा विचार व्हावा. वाटल्यास तुमच्या एखाद्या मुसलमान मित्राला विचारा ७८६ चे महत्व. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments

Submitted by शंकरराव on Mon, 11/24/2008 - 17:23

Permalink

ॐ

ॐ च्या आरश्यातील घबी मध्ये ७८६ स्पष्ट दिसते. ॐ नाद स्वयंभू आहे त्यातूनच विश्वनिर्मीती झाली आहे नूस्ते ७८६ काय घेउन बसलात. काबा च काय हो.. मक्केश्वर शिव हे सुध्दा आम्ही मानतो. निर् क्षीर विवेक जाग्रुत असावा चावड्यांच वावड नाही , शन्करराव
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 11/25/2008 - 10:50

In reply to ॐ by शंकरराव

Permalink

ॐ नाद

ॐ नाद स्वयंभू आहे त्यातूनच विश्वनिर्मीती झाली आहे ... ही विश्वनिर्मितीची थिअरी माहित नव्हती, अंमळ नवीनच आहे माझ्यासाठी. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by शंकरराव on Tue, 11/25/2008 - 13:59

Permalink

शिव आणि शक्ति

वेद-पूराणावर आधारीत विश्वनिर्मीतीचे वर्णन थोड्क्यात असे. . शिव आणि शक्ति अलग होतांना एक प्रचंड स्पोट झाला तोच हा स्वयंभू ॐ कार नाद आहे. हा नाद एक मुलतत्वाच्या (primordial elements) रुपाने प्रत्येक तत्वात आहे. व मानवि शरिरात हेच तत्व आत्मा म्हणून ओळ्खले जाते. मुलतत्वातून पंचतत्वांची , इतर तत्वाची निर्मीती व पूढे श्रुष्टी\विश्वनिर्मीती. .. (आज Large Hadron Collider च्या प्रयोगातून हेच शोधन्याचा प्रयत्न चालू आहे?) दासबोधात सूद्धा 'मुलतत्वातून पंचतत्वांची , इतर तत्वाची निर्मीती व पूढे श्रुष्टी\विश्वनिर्मीती.' चा संधर्भ मिळतो. अधिक माहिती व्य. नि. शंकरराव
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Tue, 11/25/2008 - 14:42

In reply to शिव आणि शक्ति by शंकरराव

Permalink

समजले नाही!

शिव आणि शक्ति अलग होतांना एक प्रचंड स्पोट झाला तोच हा स्वयंभू ॐ कार नाद आहे. हा नाद एक मुलतत्वाच्या (primordial elements) रुपाने प्रत्येक तत्वात आहे. व मानवि शरिरात हेच तत्व आत्मा म्हणून ओळ्खले जाते. मुलतत्वातून पंचतत्वांची , इतर तत्वाची निर्मीती व पूढे श्रुष्टी\विश्वनिर्मीती. .. एक अक्षर कळले नाही, म्हणजे फारच उच्च दर्जाचे विचार असावेत! (अडाणी) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 11/25/2008 - 15:07

In reply to समजले नाही! by सुनील

Permalink

एक अक्षर

एक अक्षर कळले नाही, म्हणजे फारच उच्च दर्जाचे विचार असावेत! +१ सहमत आणि दासबोधात विश्वनिर्मितीच्या थिअरींबद्दल चर्चा आहे हा पण शोधच माझ्यासाठी!
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Tue, 11/25/2008 - 15:08

In reply to समजले नाही! by सुनील

Permalink

खावट

=)) =)) =)) =)) -(ॐ यायच्या पण आधीपासुन आडाणी) टारझन
  • Log in or register to post comments

Submitted by शंकरराव on Tue, 11/25/2008 - 15:04

Permalink

संकल्पना विश्वनिर्मीती

संकल्पना विश्वनिर्मीतीच्या आधीचे अस्तित्व... शिव आणि शक्ति ,Kinetic and Potential Energy शंकरराव
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Tue, 11/25/2008 - 15:10

In reply to संकल्पना विश्वनिर्मीती by शंकरराव

Permalink

म्हणजे ?

शिव = कायनेटिक एनर्जी आणि शक्ति = पोटँशियल एनर्जी ? शिव शिव शिव .... सॉरी .. कायनेटिक एनर्जी.. कायनेटिक एनर्जी.. कायनेटिक एनर्जी - टारझन
  • Log in or register to post comments

Submitted by शंकरराव on Wed, 11/26/2008 - 20:41

Permalink

yin yang

काही प्रमाणात yin yang ची संकल्पना शिव आणि शक्ति संकल्पनेच्या जवळ्पास आहे दासबोधात पंचतत्वांची , इतर तत्वाची निर्मीती संधर्भ\शोध .. शंकरराव
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com