विश्वास श्वासावरचा

शब्दानुज's picture
शब्दानुज in जे न देखे रवी...
6 May 2015 - 9:28 am

रोज पुन्हापुन्हा तो बाहेर पडतो
संगे फक्त कोरडा उःश्वास घेतो

हजारो वर्षापासुन तो तिला शोधतो
ती अजुनही असल्यावर विश्चास ठेवतो

प्रत्येकाच्या शरीरात जावुन तो पाहतो
तिच्या अोळखीच्या खुणा शरीरात शोधतो

पवनाच्या रुपातुन तो मला रोज भेटतो
पुन्हापुन्हा तिचे कुशल मला विचारतो

प्रत्येक श्वासातुन मी समजावु पाहतो
श्वासाशिवायच्या शरीरास मी तरी नाकारतो

तो मात्र अजुनही विश्वास ठेवतो
तिच्या श्वासहिन शरीरास शोधत राहतो

श्वासाशिवाय तो तरी भटकत राहतो
श्वासावरच्या विश्वासास ठोकरु पाहतो.....

फ्री स्टाइलसांत्वनाकरुणजीवनमानरेखाटन

प्रतिक्रिया

शब्दानुज's picture

6 May 2015 - 9:32 am | शब्दानुज

तुम्ही कोणता अर्थ लावाल हे वाचायला आवडेल

गणेशा's picture

6 May 2015 - 11:24 am | गणेशा

कविता अवघड वाटली,
अर्थ वाचायला आवडेल असे म्हंटल्याने म्हणुन आपला साधासा अर्थ घेतलेला सांगतो...
-----
येथे तो म्हणजे 'आत्मा'
मी म्हणजे 'प्राण'
आणि ती म्हणजे 'प्राणहिन प्रेयशी'
प्राण .. आत्म्या बद्दल बोलत आहे त्यांचे बोलण्याचे माध्यम 'श्वास'

शब्दानुज's picture

6 May 2015 - 12:03 pm | शब्दानुज

विरहाची ही कथा आहे
वाहणारा वारा हा पियकर आहे असे मानले आहे
तो वारा तिला शोधण्यासाठी फिरतो आहे अशी कल्पना आहे
बाकी माझ्याहुन तुमचीच कल्पना चांगली आहे..

गणेशा's picture

6 May 2015 - 12:44 pm | गणेशा

तुमच्या अर्थाने कविता वाचल्यावर कविता लगेच कळाली. .मस्त आहे.
मी उगाच उलट क्लिष्ट करुन ठेवला होता अर्थ.. असो पण मज्जा आली..
माझ्या अर्थाने एकदा कविता वाचुन बघा बरे..