आमची प्रेरणा
http://www.misalpav.com/node/31151
(मूळ कवीची मनापासून क्षमा मागून हे विडंबन शोलेकालीन व्यथा वेदनांना वाचा फोडण्यासाठी प्रसृत झाले. कळावे आपला नकवी - खट (नक्वी नव्हे) )
अरे द्यायचेच असेल तर दे
गब्बरलाही पकडीत घेवु पाहणारे ते हात
हं ! ते तुला कधीच जमलेय
तोडलेल्या हातांवरती, कशास शाली अन बंदुकी
रामलाल काकांना या कसली आहे निवांत डुलकी
अरे गायचेच असेल तर गा
ते स्वर मेहबुबी हेलनेचे...
हं ! ते तुला कधी रे जमलेय
हिंडत्या बसंतीचे .. असेच हे हिंडतेच गाणे
टांगा न पुसता फक्त धन्नोने ओझेच वाहने
व्हायचेच असेन fool तर
सनकीपणाचे ताव वाह तु
हं ! ते तुलाच तर जमलेय
वीरुला देखणी बसंती , जय ला नुसतीच को-हांटी
हे ही बोलण्याचे सामर्थ्य तुझ्यात नाही
तु डास ठाकुरांचा .. गोधडीत टोच मारी
- न(व)कवी खट
शेवट नव्हे, ही तर (काव्यमय) सुरूवात
प्रतिक्रिया
4 May 2015 - 12:14 pm | खटासि खट
शेवटचे कडवे वगळले आहे. ललनांचे कोंदण हा सब्द्प्रयोग मान्य झाला असता की नाही याचा अंदाज आला नाही.
4 May 2015 - 7:32 pm | पैसा
शोले! कडवं वगळलंत ते बरं झालं.
4 May 2015 - 7:57 pm | प्रचेतस
=))
मस्तच.