आजपर्यंत बर्याच कविंनी,
आई,बहीण,पत्नी,मुलगी या सर्वांवर
अनन्य साधारण कविता रचल्या आहेत
पण सासुवर कधी कोणी कविता रचलीय?
कि नुसत्या नावानेच तुमची हिंम्मत खचलीय?
अरे,असतील तुम्हाला खर्या भावना
तर रचवा सासुवर कविता
आणि समजू द्या या जगाला
सासुच्याही मनातल्या यातना.
आजपर्यंत सासुची प्रतिमा नेहमी
सुनेला छळणारी म्हणुनच केली गेलीय
पण कधी तिलाही सुनेने छळले असेल
याची कल्पना तरी कोणी केलीय?
प्रत्येक सासु सुद्धा कधी एक सुन असते
तिलादेखील भावना असतात,मन असते
तिचे मन जाणुन घेण्याचा प्रयत्न केला
तर,कळेल की तिनेही किती सहन केलंय.
तिलाही तिच्या सासुने छळलेलं असतं
तिच्याही इच्छा मारल्या गेलेल्या असतात.
संसाराच्या रहाटगाडग्यात अडकलेली ती
तिच्याही आकांक्षा चिरडल्या गेल्या असतात.
जेव्हा हीच सुन आता होणार असते सासु
तेव्हा हळुच तिच्या चेहर्यावर उमलतं हसु
ठरवते ती मनातल्या मनात स्वःताशीच
की, मी माञ होइल एक चांगली सासु.
तिनेही तिचा संसार फुलवलेला असतो
तिनेही सासरची मनं सांभाळलेली असतात
तिचाही कोणी आदर करावा, प्रेम करावं
अशीच स्वप्न उराशी बाळगलेली असतात.
तिचे हे स्वप्न समजुन घेण्याचा
आपण कधीच प्रयत्न करत नाही
तिच्याही आपल्याप्रति अपेक्षा असतील
याचा काडीमाञ ही विचार करत नाही.
सुनेने आपली सेवा करावी,सुख द्यावं
असेच तिला नेहमी वाटत असतं
इतकेच नव्हे तर या समाजात फक्त
आपल्याच सुनेचं कौतुक व्हावं
असंही प्रत्येक सासुला वाटत असतं.
पुर्वीची सासु "बोलकी" होती
पण स्वभावाने नव्हती मनमोकळी
कारण तेव्हा सासु-सुनेच्या वयात
होती एक असाधारण पोकळी.
आजची सासु पुर्वीसारखी राहीली नाहीय
ती आता सुनेशी मैञी करायला लागलीय
वाटुन घेतेय सुनांसोबत स्वःताचे सुखदुःख
त्यांच्याही भावनांचा विचार करायला लागलीय.
आपणही एक पाऊल पुढे जाऊया
आपल्या पुढे आलेला तिचा हात
कायमचा आपल्या हातात घेऊया
करुया कधीतरी तिच्याही मनाजोगं
तिच्या नाजुक मनाला अलगद जपुया.
प्रतिक्रिया
14 Apr 2015 - 12:19 pm | ज्ञानोबाचे पैजार
हत्ती असाच चालत राहूद्या, भुंकणार्यांची पर्वा न करता.
आता सासरे, अजेसासरे, अजेसासुबाई, दिर, भावजय, नणंद, जावई, साडु, सवती- सवती, सवते- सवते,
यांच्या भावनांना वाट मोकळी करुन देणारी अशी एक काव्य माला होउन जाउदे असे नम्रपणे सुचवू इच्छीतो.
पैजारबुवा,
14 Apr 2015 - 12:45 pm | यसवायजी
त्याचबरोबर गल्ली आणि दिल्लीतल्या काऊ-माऊ-चिऊ,भुब्बू,घोदा,दुक्कर,बगला वगैरेवर कविता बरसूद्यात.
14 Apr 2015 - 12:20 pm | प्रचेतस
सासूप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र.
अतिशय सहज सुंदर कविता.
सासूची बाजू घेणारी कविता येईल असं आमच्या मनीही नव्हतं.
अजूनही अशाच काही हृदयाचा ठाव घेणाऱ्या कविता येऊ दया.
14 Apr 2015 - 12:22 pm | अत्रुप्त आत्मा
आगोबाच्या निर् मळ मणानी दिलेल्या या प्रतिसादाशी मी ही तितुक्याच निर् मळ मणाणे सहमत आहे.
14 Apr 2015 - 12:22 pm | जेपी
+1
14 Apr 2015 - 2:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> सासूची बाजू घेणारी कविता येईल असं आमच्या मनीही नव्हतं.
सासु आणि सुनबै यांचं अतिशय प्राचीन आणि गुंतागुंतीचं असं नातं आहे.
वल्ली, एखाद्या शिल्पकलेत यांची कुठे शिल्प दिसलीत का तुम्हाला ?
भग्वदगीतेत भगवंतांनी अर्जुनाला मार्गदर्शन करण्याऐवजी एखाद्या सासु-सुनेच्या
समुहाला मार्गदर्शन केलं असतं तर...अनेक प्रश्न सुटले असते, असं मला वाटतं.
मन की बाते : प्रा.डॉ. आजचा सुटीचा दिवस सासु-सुनेतच जाईल असं वाटतं. :(
-दिलीप बिरुटे
14 Apr 2015 - 3:27 pm | प्रचेतस
सासू - सून नै पण सासू आणि जावई अशी शिल्पे पाहिली आहेत मी बरीच.
14 Apr 2015 - 9:42 pm | चाणक्य
शिल्पांचे हातपाय तुटलेले असतील नाही.
14 Apr 2015 - 9:58 pm | कवितानागेश
=))
14 Apr 2015 - 12:56 pm | खंडेराव
काही यमके खुप आवडली
कविता-यातना, हसु-सासु, मनमो़कळी-पोकळी, जाउया-घेउया
अभिनंदन..
14 Apr 2015 - 1:02 pm | होबासराव
सांस भी कभि बहु थि
14 Apr 2015 - 10:18 pm | सस्नेह
मग आम्ही तर दुसरं काय म्हणतो ?
हवे तर हे पहा
http://www.misalpav.com/node/21458
14 Apr 2015 - 1:10 pm | कपिलमुनी
चान चान
14 Apr 2015 - 1:27 pm | संदीप डांगे
त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र
पाहिजे तितके घ्या आणि वापरा, फुकट आहेत.
14 Apr 2015 - 1:34 pm | अन्या दातार
रचवा हा शब्द लै म्हन्जे लैच आवडल्या गेला आहे. =))
काय एकेक भारी शब्द शोधून काढतात राव लोक! कम्माल आहे नुसती.
14 Apr 2015 - 4:31 pm | नाखु
सासू =सारख्या सूचना
सुना =सूचना नको
अखिल मिपा भावी-आजी-माजी(पाजी)हाजी-राजी-ताजी सास्वांच्या सामसूमजावई संघातर्फे सासूंच्या लेकी हितार्थ प्रसारीत.
14 Apr 2015 - 2:11 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
मिपावरच्या एका प्रसिद्ध सासुबैंच्या प्रतिसादाच्या परतिकशेत.
14 Apr 2015 - 2:32 pm | टवाळ कार्टा
त्यांची बालीका सुन्बै पण फिरकली नैयै बरेच दिवस...कै माहीत आलीपण असेल दुसर्या रुपात ;)
14 Apr 2015 - 1:46 pm | मनीषा
डोळे भरून आल्याने अक्षरे पुसट दिसत आहेत ..
जरा वेळाने (डोळे कोरडे झाले की ) वाचीन
14 Apr 2015 - 1:51 pm | खेडूत
म्हणजेच तुम्ही डायरेक पर्तिसाद वाचलेत !
त्याशिवाय का डोळे भरून येणारेत?
15 Apr 2015 - 6:56 am | मनीषा
नाही हो ... नाही वाचले प्रतिसाद .
नुस्ता लेखाचा मथळा वाचला .. (हेडींग .. हेडींग) ....
आणि असं झालं .. :( :))
14 Apr 2015 - 1:47 pm | खेडूत
यावेळी माञ आम्हाला अहंकार रुपी ठसका बसला नाही.
कारण आपल्या लेखनातील आशय आम्ही समजुन घेतला आहे!
14 Apr 2015 - 1:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कविता मुक्तछंदात असली तरी तिलाही एक ताल हवा असे वाटले.
बाकी, तुम्ही लिहित राहा. एकाच दिवसात सर्व कविता टाकु नका.
कुठे तरी कोणाच्या तरी कवितेचं कौतुक करा. प्रतिसादही लिहा.
बाकी, अजून चांगला विषय येऊ देत कवितेत. दाद आतुन आली पाहिजे.
दत्ता हलसगीकर यांच्या चार ओळी...
कविता रस्त्यांच्या
येतात कुठुन हे रस्ते जातात कोणत्या गावा.
भेटतात कोठे रस्ते अन त्यांचा कुठे दुरावा ?
रस्त्यांना रस्त्याचीही असते का ओळख सांगा ?
का रस्त्यांच्याही मनातुन चालतो दिशांचा दंगा ?
-दिलीप बिरुटे
14 Apr 2015 - 3:50 pm | यसवायजी
वाव्वा.किती सांभाळून घेतात ना प्राडॉ नव्या लोकांना.
अशेच आस्ते सपोर्टीव, स्पोर्टीव्ह आम्चेही गुरजी।
आमीबी शाने झालो अस्तो वदले यसवायजी।
14 Apr 2015 - 4:17 pm | बॅटमॅन
ठ्ठो =)) एकच नंबर रे. =))
14 Apr 2015 - 7:42 pm | शलभ
खतरनाक..:)
14 Apr 2015 - 10:51 pm | पॉइंट ब्लँक
लै मंजे लैच भारी. +१००००
15 Apr 2015 - 1:10 am | अत्रुप्त आत्मा
@ आमीबी शाने झालो अस्तो वदले यसवायजी।>> ह्ह़ा ह्ह़ा ह्हा! SYG! :-D
14 Apr 2015 - 2:16 pm | स्वधर्म
बिरूटे सर, ईथे डकवल्याबद्दल धन्यवाद.
14 Apr 2015 - 2:22 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
जबरदस्त. सासुविषयी एवढा चांगला विचार करणारे लोक हल्ली विरळेचं असतात. एक विनंती आहे, एक कवी किंवा कवियत्रीचं फक्त आपल्या कवितांना सुरेल चाल लावु शकते. तुम्हीही तसा प्रयत्न करा नं. चाल लावुन, स्वत:च्या आवाजात रेकॉर्ड करुन इथे शेअर करा. मिपाकरांना कविता वाचण्यापेक्षा सुरेल आवाजात ऐकायला आवडतात असं निरि़क्षण आहे. शिवाय तिथल्या तिथे कवितेचे शब्दही वाचायला मिळाल्यावर कवितेचा परिणाम अजुन गहिरा होईल असं वाटतं. आपलं मत जरुर कळवा. रेकॉर्डिंग आणि एंबेड साठी मदत लागल्यास इथेचं एक गद्य धागा काढा लोकं मदत नक्की करतील.
14 Apr 2015 - 3:41 pm | पॉइंट ब्लँक
कॅप्ट्न, त्यो संदिप खरे का कोन हाय , तेला जमल काय चाल लावायला हितं?
14 Apr 2015 - 4:10 pm | संदीप डांगे
दमलेल्या सासूची कहानी
'दमलेल्या...'ची चाल जगातल्या कुठल्याही गद्याला लागू शकते. तस्मात वरील कवितेस ती चाल लावून बघा.
14 Apr 2015 - 4:12 pm | नाखु
दमलेल्या असे नाही तर दम(न)लेल्या असे ठेवले तर चालेल काय?
14 Apr 2015 - 4:39 pm | पॉइंट ब्लँक
चालेल काय पळल!
14 Apr 2015 - 5:31 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
@नाखु काका आणि @पॉईंट ब्लँक
मी शिर्यसली सांगत होतो. माझ्या प्रतिसादामधे शप्पथ सांगतो एकही शब्द खवचटपणाचा नव्हता. :(
तुम्हीचं सांगा तुम्हाला कविता वाचायला आवडेल का नीट चाल लावलेली ऐकायला आवडेल? आता कवियत्री तैंनी वाचलं तर परत त्या हत्ती आणि कुत्र्यावर घसरणार. परत वाद विवाद होणार. :(
14 Apr 2015 - 5:41 pm | पॉइंट ब्लँक
सहमत.
14 Apr 2015 - 5:42 pm | नाखु
मी शिर्यसली सांगतोय वर्षानू वर्षे सासवांचे दमन झाल्येय आत्ता कुठं त्याला वाचा फोड्ली जातेय !
14 Apr 2015 - 2:37 pm | काळा पहाड
आजकालची सून आहे मोकळी ढाकळी
सासू चालू ठेवते सतत टकळी
फूल ना फुलाची पाकळी
रेल्वेत कधी ओढू नका साखळी
14 Apr 2015 - 2:57 pm | सूड
सासूच्या कोवळ्या, निरागस भावना मांडणारं काव्य आवडलं. तुमच्या सारख्या कवयि'ञी' आहेत म्हणून आम्ही मिपावर येतो.
14 Apr 2015 - 3:25 pm | स्पा
आवरा
14 Apr 2015 - 3:43 pm | पॉइंट ब्लँक
स्पा, असं अर्धवट लिवून गोंधळ नई घालायचा. कुणी कशाला आवरायचे ते सपष्ट करणे. ;)
14 Apr 2015 - 4:13 pm | जेपी
यावर...
"सासरा -एक धुरकट व्यक्तिमत्व "
.
.
असा लेख आला पायजे आता.
14 Apr 2015 - 4:22 pm | खेडूत
धुरकट नको- बिड्या वडनारा वाटतो!
धुक्यात हरवलेलं कसं वाटेल? का मीटरमधे बसत नाय?
14 Apr 2015 - 4:24 pm | नाखु
खालील शिर्षके राखीव आहेत.
"सासरा -एक तुरगट व्यक्तिमत्व "
"नणंद -एक खुस्पट व्यक्तिमत्व "
"जाऊ -एक जळकट व्यक्तिमत्व "
"दीर थोरला -एक कळकट व्यक्तिमत्व "
"दीर धाकला -एक पोरकट व्यक्तिमत्व "
"नवरा -एक मेंगळट व्यक्तिमत्व "
अखिल मिपामापंकाढे मंडळ संचालीत दिसेल तिथे आरक्षण ! खड्ड्यात गेले संरक्षण !!
समिती तर्फे नवजिल्बीकर हितार्थ प्रसारीत
14 Apr 2015 - 4:25 pm | बॅटमॅन
अच्रत आणि बव्लत यांना वगळल्याचा निशेद.
14 Apr 2015 - 4:30 pm | नाखु
(मिपा)पोरांसाठी आणि सोत्तासाठी राखून ठेवल्य बर कां.
14 Apr 2015 - 4:42 pm | पिलीयन रायडर
एक नंबर!! आव्डलं!!
14 Apr 2015 - 5:14 pm | वेल्लाभट
हे क्लासच !
14 Apr 2015 - 5:21 pm | बॅटमॅन
प्रेरणास्थान एकता कपूर अन स्मृती इराणी असाव्यात काय?
14 Apr 2015 - 5:25 pm | वेल्लाभट
हं... आठवतंय बुवा असं काहीतरी ऐकलेलं.
14 Apr 2015 - 5:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ह्या शिर्षकाच्या निमित्ताने इथुन गायबलेल्या आणि सर्वांची प्रेमाsssSsssSSने
एका महान, एपिक कवियत्रीची आठवण झाली.
14 Apr 2015 - 5:38 pm | अजया
मी या कवितेचा शिलालेख बनवुन ठेवणार आहे.बारा तेरा वर्षानी मी सासू होईन तेव्हा बराय वापरायला.
14 Apr 2015 - 5:39 pm | वेल्लाभट
शिलालेख ! लोल !
14 Apr 2015 - 5:52 pm | बॅटमॅन
तुझं नाव काय? तू कुठे चाललीस?
एकमेवोत्तरम् |
- इयत्ता लहानी फ.
14 Apr 2015 - 5:43 pm | अजया
सून एक निसटतं व्यक्तिमत्व
सासरा एक सपकसं व्यक्तिमत्व
नणंद एक कुजकसं व्यक्तिमत्व
जाऊ एक येडपटसं व्यक्तिमत्व
ही डोमेन अव्हेलेबल आहेत.काव्यसंधीचा लाभ घ्यावा हि विणंती.
14 Apr 2015 - 5:48 pm | काळा पहाड
कशाला ओ कशाला? आधीच दोन गद्य कवितांनी इथं वादळं उठलेत. कशाला उचकवताय त्यांना?
14 Apr 2015 - 5:52 pm | स्पंदना
विहीण?????? ;)
एक नकोसं व्यक्तीमत्व?
14 Apr 2015 - 6:00 pm | अजया
##%%^^&& भापो
14 Apr 2015 - 6:01 pm | सूड
हे सासूच्या दृष्टीने झालं, सासरा कदाचित 'विहीण एक मैत्रीण' असं म्हणण्याची शक्यता नाकारता येत नाही. ;)
14 Apr 2015 - 6:03 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
दुसर्या दिवशी सासरेबुवा: एक आठवण किंवा सासरेबुवा: एक पुण्यस्मरण वगैरे पण कविता पाडायला लागतील मग. ;)
14 Apr 2015 - 6:07 pm | बॅटमॅन
आज हमारे दिलमें अजब ये उलझन है;
गाने बैठे गाना, सामने समधन है!
हम कुछ आज सुनाये, ये उनका भी मन है;
गाने बैठे गाना, सामने समधन है!
-एकालग्नाचीअखंडडीव्हीडी ऊर्फ हमाप्केहैकौन.
15 Apr 2015 - 2:52 pm | सूड
सासू एक अवजड व्यक्तिमत्व
सासरा एक सज्जड व्यक्तिमत्व
मेव्हणा एक डोईजड व्यक्तिमत्व
मेव्हणी एक भानगड व्यक्तिमत्व
साडू एक बोजड व्यक्तिमत्व
हे सुद्धा विषय विचारात घेता येतील.
14 Apr 2015 - 5:47 pm | वेल्लाभट
आता येतीलच या डोमेन्स वर काव्यं.
समर्थ मंडळी आहेत इथे खूप.
14 Apr 2015 - 5:50 pm | वेल्लाभट
डेब्यू तर कडक झालाच
पण दुसरी इनिंग पण दमदार चालू आहे
५० अप !
14 Apr 2015 - 7:48 pm | आदूबाळ
कोल्हेकाकू - आज काय नवीन?
14 Apr 2015 - 9:51 pm | प्रसाद गोडबोले
मेव्हणी-एक हवंहवंसं व्यक्तिमत्व अशी कविता लिहावी म्हणतो ;)
#हीनप्रतिसाद
14 Apr 2015 - 10:17 pm | पियुशा
_^_ धन्य आहात तुम्ही , आमच्या सारख्या भावी सुनांना तुमचा हां प्रेरणादायी लेख / कविता मैलाचा दगड ठरणार आहे याची णोंद घ्यावी , ए व्हड़े बोलून मी माझे ५० शब्द संपवते जय महाराष्ट्र
15 Apr 2015 - 2:10 am | खटपट्या
ह्म्म्म चांगलंय...
15 Apr 2015 - 9:34 am | गौरी लेले
छान गं आशुताई !
तू लिहित रहा हळुहळु सफाई येइल लेखनात !
टवाळ मिपाकराङ्कडे दुर्लक्ष करणे हेच उत्तम !
22 Feb 2016 - 7:48 pm | होबासराव
वाह !
15 Apr 2015 - 9:59 am | तिमा
प्रश्न मिपावरील ज्ञानी मंडळींना:
पदार्पणातच, दोन्ही इनिंग्ज् मधे सेंचुरी ठोकणारे क्रिकेटर्स कोण कोण आहेत हो ?
15 Apr 2015 - 10:52 am | आदूबाळ
यासिर हमीद?
23 Feb 2016 - 8:25 am | बोका-ए-आझम
.
15 Apr 2015 - 10:32 am | विशाखा पाटील
या कवितेतलं गद्य, वाचकाला आक्रस्ताळेपणे विचारलेले प्रश्न, यमकाचा अभाव, उपदेशाचे डोस, अभिनिवेष इत्यादी इत्यादी वगळल्यावर जे काय उरेल ते उत्तमच असेल. तेवढं टाळता येतं का ते बघा.
आपल्याला आणि वाचकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा!
15 Apr 2015 - 10:40 am | पलाश
इत्यादी वगळल्यावर जे काय उरेल ते!! ;) :) :))
15 Apr 2015 - 11:17 am | तिमा
इत्यादी वगळल्यावर
या प्रतिसादानेच गलित गाञ झाल्यासारखे वाटत आहे.
15 Apr 2015 - 1:00 pm | अत्रुप्त आत्मा
@ गाञ>>> :-D
15 Apr 2015 - 12:23 pm | अजया
वाचनमाञ रहावं आता!
15 Apr 2015 - 3:20 pm | अन्या दातार
धागा तेवढा 'वाचनमाञ' करु नका
15 Apr 2015 - 4:39 pm | मोहनराव
मला कवितेतल काय कलत नाय पन इतके परतिसाद मंजी नक्कीच चांगलं लिवलं अस्नार..!!
पुढच्या वाट्चालीस (जिलबीस) शूबेच्चा!!
16 Apr 2015 - 12:19 am | मयुरा गुप्ते
अश्या सासुबाई कुठे असतात आम्हालांही दाखवा एकदा..
"वाचकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा!
" हे बेश्ट आहे.
-मयुरा
16 Apr 2015 - 2:53 pm | दिपक.कुवेत
भरपुर करमणूक करत आहे त्या बद्दल कोल्हेबाईंचे अभिनंदन. पुकप्र....(पुढिल कवितेच्या प्रतिक्षेत)
16 Apr 2015 - 2:58 pm | होबासराव
मजा आली माञ.
मी लिहीणारच. मिसळपाव वर पण टाकणार.कितीही आक्षेप आले तरी.
मिञांनो वाट पहा माझ्या नविन कवितेची.
कोल्हे तै कधि टाकताय नविन कविता ?
23 Feb 2016 - 7:45 am | यशोधरा
हैला! हे वाचलच नव्हतं अजून!
इतक्या कळकळीने लिहिलेल्या कवितेवर मिपाकरांनी असा धुडगूस घातलेला पाहून..
.
.
.
.
.
.
धुडगूस घालायला मीही का नव्हते हे मनात येऊन, एक मिपाकर म्हणून... वगैरे, वगैरे..
9 Mar 2016 - 8:18 pm | होबासराव
:)