गवसणी.(चारोळ्या)

प्रल्हाद दुधाळ.'s picture
प्रल्हाद दुधाळ. in जे न देखे रवी...
27 Mar 2015 - 4:41 pm

गवसणी.(चारोळ्या)

शिकविलेस स्वाभिमानी जगणे,
माणुसकीने जिंकण्याचा ध्यास...
संकटातही आई शोधेन संधी,
घालेन गवसणी मी गगनास..!!

प्रीती तुझी ही संजीवनी मजला,
अर्थ नव्याने आला या जगण्यास....
साथीने या जीवन मंगल गाणे,
घालेन गवसणी मी गगनास..!!

मांडला डाव वारंवार मोडला
हिरावला आलेला तोंडाशी घास...
लढाई जगण्याची पुन्हा नव्याने
घालेन गवसणी मी गगनास..!!

माणसांना अनुभवले इतके,
समृद्ध समर्थ केले जीवनास....
साथीत जगतो समरसतेने,
घालेन गवसणी मी गगनास..!!
......प्रल्हाद दुधाळ

चारोळ्या

प्रतिक्रिया

छान आहे. लेखनासाठी शुभेच्छा.

आईच्या प्रेमाबाबत प्रीती असा शब्द यापूर्वी वाचल्याचं स्मरत नाही. प्रेम, माया, भक्ती, ममता असे शब्द आठवतात.

शशिका॑त गराडे's picture

30 Mar 2015 - 2:29 pm | शशिका॑त गराडे

मांडला डाव वारंवार मोडला
हिरावला आलेला तोंडाशी घास...

अप्रतिम शब्द रचना

विवेकपटाईत's picture

30 Mar 2015 - 5:18 pm | विवेकपटाईत

मस्त कविता, आवडली.