नमस्कार मिपा मंडळी,
तसा मी आजपर्यंत हौशी छायाचित्रकार आहे. आजपर्यंत जे काही टिपण्यासारख दिसेल ते भ्रमणध्वनी संचातून टिपायचा प्रयत्न केला...आणि मिपा वर प्रदर्शित केला. त्याला संमिश्र प्रतिसाद पण मिळाले.
आता मात्र जरा मोठा कॅमेरा म्हणजेच DSLR घेण्याची अतीव इच्छा झाली आहे. तर मग आता मार्गदर्शनासाठी मिपा करांकडे आलो आहे. मी स्वतः अजून एकदाही DSLR वापरला नाहीये पण तांत्रिक माहिती आणि काय आणि कस वापरायाच याची बर्यापैकी माहिती मिळवली आहे. सध्या हौशी आणि सराव करून कुशलता मिळाली कि व्यवसायिक छायाचित्रकार (लग्न आणि इतर छोटे-मोठे कार्यक्रम) म्हणून प्रयत्न करायची फार इच्छा आहे.
मी स्वतः Nikon ला झुकत माप देतो आहे, कारण Canon बद्दल फार काहीच माहिती नाहीये फक्त Canon 5D mark III अगदी व्यवस्थित माहिती आहे पण ते प्रकरण आवाक्या बाहेरच आहे त्यामुळे त्याबद्दल विचार पण नाही केलाय.
Nikon मध्ये D५२००, D५३०० चा विचार करतो आहे, तेव्हा जाणकारांनी अजून काही मोडेल्स सांगून मार्गदर्शन केल्यास फार मदत होईल.
प्रतिक्रिया
19 Mar 2015 - 2:05 pm | राजो
Please refer this thread for help. Swaps has answered most of the queries.
19 Mar 2015 - 2:23 pm | प.पु.
NIkon D3300 देखिल एक चांगला पर्याय आहे......
19 Mar 2015 - 2:49 pm | वेल्लाभट
तरीही माझ्याकडून एक मोफत सल्ला :)
कॅनन ;)
बजेटात बसणारा कुठलाही.
बाकी तज्ञ सांगतील. स्वॅप्स ना संपर्क करा.
19 Mar 2015 - 2:53 pm | वेल्लाभट
चांगला कॅमेरा म्हणजे मोठा (डीएसएलआर) कॅमेरा असं नव्हे.
आजकाल खत्राट आउटपुट व फंक्शनालिटी देणारे पॉइंट अँड शूट येतात. तेंव्हा हा समज रद्दबातल नाही केलात तरी त्यात अडकू नका. कॅनन पावरशॉट एस एक्स ५० एच एस बघा, सोनी एनएक्स सीरीज मिररलेस बघा, निकॉन ल८३० किंवा तत्सम बघा, पॅनासोनिक लुमिक्स एफझी सिरीज बघा. कडक कॅमेरे. पोर्टेबिलिटीचा फायदा वेगळाच. शिवाय चार पैसे वाचतील. मॅन्युअल मोड वर काही वर्ष हात बसूदेत. मग घ्या डीएसएलआर :)
बाकी तुमच्यावर.
नक्की विचार करा.
19 Mar 2015 - 3:34 pm | खंडेराव
मी नि़कॉन पी५१० वापरतो. हा पॉइंट अँड शूट आहे. १६ मेपि आणि ४२ झूम वाला. चांगला आहे, आणि स्वस्त DSLR च्या तुलनेत.
आणि सुरुवातीच्या खर्चाबरोबर नंतर लेन्सचा खर्च ही वाचतो वर्सेटाईल लेन्स मुळे.
काही फोटो
http://misalpav.com/node/30575
19 Mar 2015 - 3:54 pm | मृत्युन्जय
अगदी मनापासून सांगतो डीएसएलाअर च्या भानगडीत पडू नका. आता बजेट वाढले असेल तर सरळ नि़कॉन पी ५१० किंवा ५२० घ्या किंवा कॅनन पावरशॉट एस एक्स ६० एच एस घ्या. उत्तम कॅमेरे.
19 Mar 2015 - 4:47 pm | मॅक
अगदी मनापासून सांगतो डीएसएलाअर च्या भानगडीत पडू नका.......अगदी बरोबर...
निकॉन पी-600 एकदम मस्त आहे.... मी वापरतो आहे.
19 Mar 2015 - 5:03 pm | मॅक
http://www.misalpav.com/node/30009
पी-६०० चे फोटो नक्की पहा...
19 Mar 2015 - 5:09 pm | मराठी_माणूस
leica ह्या कॅमेर्या बद्दल बरेच ऐकले आहे . तो भारतात मिळतो का आणि रेंज काय असते ?
19 Mar 2015 - 5:29 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
लायका लै म्हाग हाये मास्तर...!!
19 Mar 2015 - 8:49 pm | मराठी_माणूस
काही अंदाज. एन्ट्री लेव्हल कितीला असेल ?
19 Mar 2015 - 8:57 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
लाखाच्या पुढे बेसिक डी.एस.एल.आर. चालु होतात, त्यामधे लेन्सचा अंतर्भाव नाही.
19 Mar 2015 - 8:59 pm | मराठी_माणूस
माहीती बद्दल धन्यवाद
19 Mar 2015 - 7:30 pm | पॉइंट ब्लँक
"डिएसलार घेणे हे बायको सांभाळण्याइतके महागडे काम आहे." अस सल्ला एका सुजाण मित्राणे दिलेला असतानाही डिएसलार घेवून लेन्सा व इतर अॅक्सेसरी घेण्याचा पराक्राम( किंवा चूक ) करण्याच्या अनुभवा वरून सांगतो, डीएसलार जरूर घ्या आणि वेळ द्यायची तयारी ठेवा. जाता जाता दोन मोफत सल्ले.
१. कॅनॉन भारी का निकॉन भारी ह्या भांडणात पडू नका, आणि अशा धर्तीचे सल्ले देणार्यांपासून लांब रहा. कॅमेरे हाताळून पाहा. फ्लिकरवर जावून कॅमेरा आणि लेन्स काँबिनेशनचे फोटो पाहा आणि निर्णय घ्या.
२. शक्य असेल तर एक कॅटेगरी ठरवा आणि त्यासाठी लागणारी चांगली लेन्स घ्या.
19 Mar 2015 - 7:40 pm | श्रीरंग_जोशी
डिएसएलाअरचा पर्याय बघताय तर मिररलेसचाही बघाच.
मी सोनी नेक्स ५एन वापरतोय तीन वर्षांपासून. सध्या सोनीचे ए६००० मॉडेल लोकप्रिय झाले आहे.
19 Mar 2015 - 8:25 pm | त्रिवेणी
पन्यासोनिक लुमिक्स एफ झेद ७० के घेतला मी. आप्ल्या इथला सल्ला एकुण. मस्त आहे एकदम. जमल्यास तो धागा बघा.
19 Mar 2015 - 8:43 pm | आजानुकर्ण
मनापासून सांगतो कशाला कॅमेरा घेताय? आजकाल मोबाईलचे कॅमेरे हौशी फोटूग्राफरच्या क्षमतेला सहज न्याय देतात. शिवाय हवा तेव्हा तो कॅमेरा उपलब्ध असतो. कॅमेरा आणि मोबाईल अशा हाताळायला दोन वेगवेगळ्या वस्तू कशाला ठेवायच्या? तुम्ही प्रोफेशनल फोटोग्राफर नसाल तर वेगळ्या कॅमेऱ्याची फारशी गरज आहे असे वाटत नाही.
हिलरी क्लिंटनसारखी व्यक्ती सुद्धा हाताळायला सोपा म्हणून एकच इमेल अकाऊंट वापरत होती म्हणे! आपणही सिंप्लिफाईड आयुष्य जगायला काय हरकत आहे.
19 Mar 2015 - 8:56 pm | श्रीरंग_जोशी
चतुरभ्रमणध्वनी अन कॅमेरा दोन्हीही वागवण्याचा कंटाळा असेल अन त्याच्या कॅमेर्याने समाधान होत नसेल तर सोनीने चतुरभ्रमणध्वनीला जोडायच्या लेन्सेस उपलब्ध करून दिल्या आहेत.
19 Mar 2015 - 9:42 pm | कंजूस
वरचे सर्व अनुभवाचे सल्ले बरोबर आहेत आणि म्हणूनच गोंधळात भर पडते.
१)हौस का व्यवसाय?
२)फोटोचे प्रिंटस काढणार आहे का?
३)फोटोची क्वॉलटी याला प्राधान्य आहे का झूम करणे ?
४)किती अंतरावरचे फोटो हवे आहेत?
५)फ्लैश न वापरणे महत्त्वाचे आहे का?
६)आताचे बजेट किती आणि लेन्सीजकरता पुढे दर तीन वर्षाँनी आणखी किती पैसे ओतण्याची तयारी
यांचाही विचार करा. हे सर्व तुमच्या DSLRच हवा यासंबंधीच आहेत.त्याप्रमाणे मॉडेल बदलेल. मोबाईल अधिक लेन्स हा केविलवाणा प्रयत्न आहे.
फोटोँचं नक्की काय करायचं आहे हा मुद्दा फार महत्त्वाचा गियर.
21 Mar 2015 - 6:36 pm | सांरा
बरं झालं मलाही कॅमेरा घ्यायचाच होता.
तीन कॅमेरे निवडले आहेत
Nikon coolpix L320
Nikon coolpix L330
Canon Powershot SX160 IS
Panasonic lumix DMC LZ30
थोडे बजेटच्या बाहेर आहे पण फिचर्स भन्नाट वाटले..
कुठला घेऊ...?
22 Mar 2015 - 10:06 pm | मदनबाण
http://www.dxomark.com/Cameras/Ratings इथे जा आणि तुमच्या बजेट मधे बसणार्या कॅमेराचे सेंसर रेटिंग पहा आणि तुमच्या बजेट रेंजमधल्या सर्वात जास्त सेंसर रेटिंग असणारा कॅमेरा निवडा...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- Ye Naa Gade... ;) { हंटर }
24 Mar 2015 - 2:57 pm | चिगो
सल्ला मागताच आहात तर देतो. वर बर्याच जाणांनी म्हटल्याप्रमाणे, कॅमेरा कशासाठी हवाय हे महत्त्वाचं.. DSLR(Nikon D5300) आणि Canon PS SX50 ह्या दोन कॅमेर्यांचा अनुभव आहे. (आणि तरिही जास्तीत जास्त फोटो मोबाईलच्या कॅमेर्यानेच काढले जातात.. ;-)
फोटोग्राफीच्या Nuiances and Details साठी स्वॅप्स ह्यांचे धागे वाचा. डिएसएलाअर तुम्हाला "क्रिएटीव्हीटी"चा आनंद देतो. म्हणजे फोटो असेल तसा न घेता, तुम्हाला हवा तसा घेता येतो. पण त्यात एक लोचा आहे. पहीली गोष्ट म्हणजे लेन्सेस हा एक खर्चिक प्रकार आहे. दुसरं म्हणजे, जोपर्यंत अॅपर्चर, आयएसओ, शटर स्पीड, डेप्थ ऑफ फिल्ड हे प्रकार कळतं नाहीत (खरंतर, अंगी भिनत नाही) तोपर्यंत साध्या पॉईंट अँड शुट कॅमेर्यानेपण चांगले आले असते, असे फोटोपण बिघडतात. खास करुन, ऊन-सावलीच्या खेळात कींवा प्राणी-पक्ष्यांचे फोटो काढतांना जिथे 'पी & एस' एखादा निसटता क्षण टिपू शकतो, तिथे ह्या अॅडजस्टमेंट्स मधे 'तीर निकल जाता हैं'. तिसरं म्हणजे वेगवेगळ्या कारणांसाठी लागणार्या वेगवेगळ्या लेन्सेस. प्राईम लेन्सेस पासून अतीप्रचंड महाग अल्ट्रा-झूम लेन्सेस पर्यंतची अनेक कामे एक लेन्स करते पी&एस मध्ये.. आता 'अॅडव्हान्स्ड पी&एस' मध्ये सेमी-मॅन्युअल सेटींग्जवर पण फोटो काढता येतात.
सांगायची बाब एवढीच की मॅन्युअल सेटींग्जमध्ये, प्रयोगशीलरित्या फोटोग्राफी करायची आवड असेल, आणि त्यासाठी खर्च करायची तयारी असेल, तर आणि तरच घ्या डिएसएलार. उत्साह ओसरल्यावर, काही दिवसात 'कशाला करत बसायची प्रत्येक वेळी ती कटकट' हे म्हणण्याची वेळ पण येऊ शकते. तेव्हा आपल्याला खरंच आवड आहे, की माझ्यासारखे 'आरंभशूर' आहात, ह्यावरपण बरंच काही अवलंबून आहे.
आणि हो, डिएसेलार घेतलाच तर 'मॅनुअल मोड' मधेच फोटो काढा. (हि विनंतीपण आहे आणि सल्ला पण) डिएसेलार हौसेने विकत घेऊन "ऑटो मोड" मधे फोटो काढणे, हा शुद्ध #$यापा आहे, असे माझेतरी मत आहे. लग्नात असे फोटो काढून, मग पोस्टप्रोसेसिंगमधे त्यांना पांढरेफट्ट आणि सपाट करणारे फोटोग्राफर्स हे छायाचित्रण कलेचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत, असं माझं स्पष्ट मत आहे..
लायकीच्या मानानं लै बोललो, ग्वॉड मानून घ्या.. तसेच इंग्रजाळलेल्या भाषेबद्दल क्षमस्व..
24 Mar 2015 - 5:06 pm | कंजूस
बाहेरचे फोटो काढतांना व्हुयुफाइंडर नसल्यास उन्हात स्क्रीन दिसत नाही.
24 Mar 2015 - 9:37 pm | मेघनाद
अरे……बरेच प्रतिसाद आले आहेत. मिपाकारानो धन्यवाद.
@चीगो आणि कंजूस : मला सध्या तरी dslr कॅमेरा घेऊन सराव करायचा आहे. पण कालांतराने किवा सुलभता आल्यावर व्यवसाय देखील करायचा आहे.
बाकी सर्व प्रतिसाद कर्त्यांचे मत बरोबर आहे …। पण तरी ह्या वेळेला dslr घ्यायचा आहे अस ठरवलंय
26 Mar 2015 - 9:23 pm | सुबोध खरे
मेघनाद राव
जर तुमच्या आतल्या आवाजाला वाटत असेल कि डी एस एल आर घ्यावा तर घेऊन टाका
किती वापरला जातो हा प्रश्न गौण आहे. कित्येक लोक दहा लाखांची गाडी घेतात आणी वर्षात दहा दिवस फक्त चालवतात.
तुम्ही तीस चाळीस हजारांचा डी एस एल आर घ्या फार तर बर्याच वेळेस ओटो मोड वर वापरावा लागेल. पण फोटोचा दर्जा नेहेमी उत्तमच येईल हे लक्षात ठेवा.
वेळ असेल तेंव्हा प्रत्येक फोटो वेगवेगळ्या मोड वर काढून पहा. एक ओटो मोड वर असेल तर अगदीच फोटो आला नाही असे होणार नाही बाकी जितके क्यामेर्याशी खेळाल तितके जास्त आणी तितके लवकर शिकाल. मोबाईल बद्दल असेच म्हणता येते
25 Mar 2015 - 1:24 am | कंजूस
निर्णयास थोडा उशिर झाला तरी चालेल पण तुम्हाला अभिप्रेत असणारा व्यवसाय /फोटो प्रकार ठरवूनच त्याला योग्य मॉडेल(=नग?) घ्या.
कैम्ऱ्यांचे तांत्रिक ज्ञान असणे आणि बाजारातून कैमरा विकत आणणे या दोन टोकाच्या गोष्टी आहेत. एखादी महागडी वस्तु कामास न येता पडून राहणे परवडत असेल तर --
अवांतर मुद्दा-
(वरील मदनबाण यांनी दिलेल्या सेंसर रेटिंगचा अर्थबोध झाला नाही.लाइका मामीया यासारख्यांचे रेटिंग कमी का झालंय ते. किंमतीचाही विचार केला आहे का?)
26 Mar 2015 - 12:17 pm | गुनि
i think the DSLR is good option .... you can try it out. go for it attempt...
30 Mar 2015 - 7:42 am | श्रीरंग_जोशी
या विषयाशी संबंधीत असल्याने या दुव्याबद्दल इथे लिहावेसे वाटले.
सोनीच्या साइटवर ऑनलाइन लेन्स फाइन्डर हे अप्लिकेशन आहे. एकाच ठिकाणाचा फोटो विविध लेन्सेसनी कसा वेगवेगळ्या प्रकारे येईल याचा डेमो त्यावर आहे. लेन्सची निवड करताना हे उपयुक्त ठरू शकते.