मधुमेह (एकटा नव्हे तर दहा गंभीर आजारांचा स्त्रोत) (कृपया विषयांतर नको)

आयुर्हित's picture
आयुर्हित in काथ्याकूट
3 Jan 2014 - 9:37 pm
गाभा: 

लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य यावर :गीतारहस्याबद्दल थोडेसे"...हा अतुल ठाकुर यांचा सहभाग-

"त्यापैकी सर्वात गंभीर मधुमेह त्यांनी आहारावर संयम करुन ताब्यात ठेवला होता"

संदर्भ: “लोकमान्य” – न. र.फाटक
(पूर्वप्रकाशित)

वरील धागा वाचतांना "मधुमेह"अगदी महत्त्वाचा मुद्दा हाती आला,आणि नवीन धागा सुरु करावासा वाटला.

माझ्या मते मधुमेह हा भारतातील सर्वात गम्भीर आजार आहे.
आज भारतातील प्रत्येकी तीन व्यक्तीमागे एकास मधुमेह आहे किंवा पुढच्या आयुष्यात कधी तरी होणार आहे.
आज हीच गोष्ट कितीतरी मधुमेह तज्ञ व औषधं बनविणाऱ्या उद्योगांसाठी हवी हवीशी वाटत असली तरीही रुग्णांसाठी फारच धोकादायक आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे ९०%(नव्वद टक्के)रुग्ण याबद्दल जागरूक नाहीत.

काहींना तर हा विषयच नकोसा वाटतो. परिणामी पुढे जाऊन आपल्या पदरात काय वाढून ठेवले आहे, ह्याची जरासुद्धा खबरबात ते घेत नाहीत. काही रुग्ण तर फक्त "मी तज्ञ डॉक्टरांना हवी तेवढी भरघोस फी देतो व त्यांचाच सल्ला घेतो आहे" असे म्हणून सर्व जबाबदारी त्यांच्या डॉक्टरांवरच टाकत असतात.

पण त्या बिचाऱ्यांना काहीही कल्पना नसते कि मधुमेह जर ताब्यात ठेवला नाही तर खालील पैकी काहीही होऊ शकते.
१)उच्च रक्तदाब : High Blood Presure/ Atherosclerosis
२)हृदयरोग : Byepass / Angioplasty /myocardial infarction /Heart failure
२)मूत्राशयाचे आजार : Kidney cancer/ Kidney failure/ Proteinuria
3)दृष्टी जाणे : Glaucoma
४)पाय कापावा लागणे : Leg Amputation
५)इतर कारणास्तव उद्भवणारी महत्त्वाची शस्त्रक्रिया टाळावी लागणे
६)मेंदूचे गंभीर आजार : Brain Hemorrhage
७)कर्ण बधिरता येणे
८)क्षयरोग असल्यास योग्य ती उपाययोजना न करता येणे
९)रक्तशर्करा अचानक कमी होऊन अपघात होणे
१०)गोड न खाण्याच्या पथ्याबद्दल चीड चीड होऊन घरात/बाहेर सर्व मित्र/हीतचिंतकांशी भांडणे होणे.

हो हो मला कळले तुम्ही काय म्हणाल ते!!!

रुग्णांना न घाबरविता, त्यांना हवी ती माहिती पुरवून त्यांना सर्व तोपरी मदत व्हावी या उद्देशाने हा धागा सुरु करत आहे.कृपया आपल्या कुटुंबात/मित्रांमध्ये जर कोणी रुग्ण असतील, तर आवश्यकतेनुसार त्यांचीहि मदत घेऊन त्यांचे प्रश्न आपण सर्वांनी समजून घेऊयात.

ज्यां मान्यवरांना जी माहिती असेल ती त्यांनी मोफत या धाग्यावर पुरवावी.
याचा फायदा सर्व रुग्णांना मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

कळावे, गोडवा असावा.

आपला लाडका:आयुर्हीत

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

17 Aug 2014 - 1:09 am | प्रभाकर पेठकर

ठिक आहे. प्रयत्न करेनच.

सुजल's picture

24 Aug 2014 - 9:00 pm | सुजल

कळावे, लोभ असावा.
आपला लाडका,आयुर्हीत .हे काय आहे? :)

भारतात मधुमेह झालेल्यांची संख्या वेगाने वाढत असल्याचे "असोचेम‘ने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.
2006 मध्ये देशात मधुमेह झालेल्या नागरिकांची संख्या अडीच कोटी होती.
2014 मध्ये ही संख्या तब्बल 6 कोटी 80 लाखांवर पोचली आहे, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे.

बंगळूरमध्येच जवळपास 26.5 टक्के नागरिकांना मधुमेह झाला आहे. सततची धावपळ, अवेळी खाणे आणि ताण यामुळे मधुमेह होण्याचे प्रमाण महिलांमध्ये वाढत असल्याचेही या सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे. 14 नोव्हेंबरला असलेल्या जागतिक मधुमेह दिनानिमित्त "असोचेम‘ने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. योग्य आहार घेतला नाही आणि जीवनशैलीत बदल केला नाही, तर 2035 पर्यंत देशातील मधुमेहींची संख्या 12 कोटी 50 लाखांवर जाण्याचा धोका या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही मधुमेहाचे प्रमाण वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. मधुमेहींच्या संख्येत राजधानी दिल्ली आघाडीवर आहे. येथील लोकांच्या खाण्यामध्ये तेल, तूप आणि लोण्याचे प्रमाण अधिक असल्याने त्यांच्यात लठ्ठपणाही अधिक आहे. त्यामुळे येथे मधुमेहाचे प्रमाण अधिक आहे, असे निरीक्षण अहवालात मांडण्यात आले आहे.

रुष आणि महिलांमधील मधुमेही रुग्णांची तुलना केल्यास हा विकार झालेल्या पुरुषांची संख्या 25 टक्‍क्‍यांनी वाढली असून महिलांच्या संख्येत तब्बल 42 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. तीस ते चाळीस या वयोगटात व्यक्तींना मधुमेह होण्याचे प्रमाण वाढले असून वीस ते तीस वयोगटातील युवा पिढीमध्येही मधुमेहाचे प्रमाण 28 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. अनियमित खाणे, खाण्यात जंक फूडचा अधिक वापर यामुळे 30 ते 35 वयोगटातील महिलांमध्ये मधुमेह होण्याची शक्‍यता अधिक असते, असे या अहवालात म्हटले आहे. तसेच, देशात सध्या साडेआठ कोटी नागरिक मधुमेह होण्याच्या टप्प्यात आहेत. या नागरिकांच्या रक्तातील शर्करेचे प्रमाण अधिक असले, तरी मधुमेह होण्याइतपत नाही. मात्र, त्यांना या विकाराचा मोठा धोका आहे, असा इशारा अहवालात देण्यात आला आहे.

शहरांमधील मधुमेहींची टक्केवारी
शहर : मधुमेही व्यक्तींचे प्रमाण
दिल्ली : 42.5
मुंबई : 38.5
अहमदाबाद : 36
बंगळूर : 26.5
चेन्नई : 24.5
हैदराबाद : 22.6
कोलकता : 19.7

देशात मधुमेह झालेल्यांच्या प्रमाणात वाढ

आयुर्हित's picture

13 Mar 2015 - 10:32 am | आयुर्हित

प्राकृतिक चिकित्सा से अपनी पुरानी खांसी और अनियंत्रित मधुमेह का इलाज करा रहे आम आदमी पार्टी के प्रमुख एवं दिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल की हालत में काफी सुधार है। रक्त शर्करा में भी अपेक्षित सुधार हुआ है। शनिवार के 246 के मुकाबले गुरूवार को उनके रक्त शर्करा का स्तर घटकर 180 के करीब पहुंच गया। उन्हें खांसी से भी काफी हद तक राहत मिली है। आमतौर पर इंसान के रक्त शर्करा की मात्रा 70-140 के बीच होती है। केजरीवाल जब अस्पताल में भर्ती हुए थे तब उनके रक्त शर्करा का स्तर 300 था।

दो दिन से सेहत में काफी सुधार
अस्पताल की मुख्य चिकित्सा अधिकारी डॉ. बबीना नंदकुमार ने बताया कि खासकर गत दो दिनों से उनकी सेहत में काफी सुधार है। रक्त शर्करा सामान्य स्तर के करीब पहुंच चुका है, जिसके कारण इंसुलिन की खुराक को बेहद कम कर दिया गया है। उपचार के दौरान उन्हें इंसुलिन के अलावा और कोई दवा नहीं दी गई है। इलाज प्राकृतिक तरीके से चल रहा है। केजरीवाल उपचार के परिणामों से संतुष्ट हैं। उनके खाने पीने में जूस, चपाती, सूप, पकी हुई सब्जियां आदि शामिल हैं।

खानपान पर नियंत्रण के कारण खांसी में भी लाभ हुआ है। चार वरिष्ठ चिकित्सकों की टीम उनकी देखभाल कर रही है।
गौरतलब है कि केजरीवाल को पांच मार्च को शहर के बाहरी इलाके में स्थित जिंदल नेचर क्योर इंस्टीट्यूट में 10 दिवसीय प्राकृतिक चिकित्सा के लिए भर्ती कराया गया था। केजरीवाल के माता-पिता का भी अस्पताल में प्राकृतिक इलाज किया जा रहा है। उनकी मां को मधुमेह और गठिया है जबकि पिता को कब्ज की शिकायत है।

रविवार को लौटेंगे दिल्ली
अस्पताल सूत्रों के मुताबिक दस दिन के लिए भर्ती हुए केजरीवाल को रविवार को छुट्टी मिल जाएगी और वे उसी दिन दिल्ली लौट जाएंगे। पार्टी सूत्रों के मुताबिक केजरीवाल सोमवार को कामकाज वापस संभालेंगे। पार्टी सूत्रों के मुताबिक केजरीवाल केे दिल्ली लौटने के बाद राजनीतिक और प्रशासनिक मोर्चे पर कई महत्वपूर्ण निर्णय लिए जाएंगे।

मार्च के अंत में शुरू होने वाले दिल्ली विधानसभा के सत्र में बजट पेश होना है। जबकि राजनीति मोर्चे पर प्रशांत भूषण व योगेंद्र यादव को पार्टी की राजनीतिक मामलों की समिति से हटाने, कांग्रेस विधायकों को तोड़ने के स्टिंग ऑपरेशन और अंजली दामनिया के इस्तीफे से उपजे मसलों से केजरीवाल को निपटना है। 28 मार्च से ही पार्टी की राष्ट्रीय कार्यकारिणी की बैठक भी प्रस्तावित है, जिसका एजेंडा भी तय होना है।

योग भगाए रोग
बेंगलूरू के जिंदल प्राकृतिक आरोग्य संस्थान में गुरूवार को योग करते दिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल। केजरीवाल पांच मार्च से यहां उपचार करा रहे हैं।

साभार: बैंगलोर केजरीवाल की हालत काफी बेहतर

सुबोध खरे's picture

13 Mar 2015 - 10:38 am | सुबोध खरे

नेचरोपथि किती दिवस काम करते ते पाहू. बंगळूरू मध्ये हवा छान आहे तेंव्हा हि allergy शांत बसेलच.
दिल्लीच्या प्रदूषित हवेत परत आल्यावर पाहू या किती दिवस त्याचा परिणाम टिकतो. आणि या पूर्ण इलाजाचे पैसे किती होतात ते पण पाहू या. रोज ३०-५० रुपये देण्याची तयारी असणार्यांचे याबाबत काय म्हणणे आहे हेही समजेल.

आयुर्हित's picture

13 Mar 2015 - 10:50 am | आयुर्हित

डॉक्टर तुम्ही सुद्धा चुकीची माहिती पसरविता आहात.
मुळात "नेचरोपथि" ही काही रासायनिक औषध देऊन करायची उपचार पध्दती नाही.
ती आहे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्याची पध्दती.

उद्या आपल्याकडे आलेला रुग्ण म्हणेल "सलाईन दिल्यावर बरे वाटले, आता मी जेवण घेणार नाही, बघू या सलाईनचा परिणाम किती दिवस पुरतो ते!" चालेल का?

सुबोध खरे's picture

13 Mar 2015 - 11:32 am | सुबोध खरे

आयुर्हीत साहेब
नेचरोपथिचा इलाज केजरीवाल साहेबांनी अगोदरसुद्धा केला होता पण त्याचा उपयोग झालेला नाही हे वरील दुव्यातून स्पष्ट झाले आहे.त्यांनी गेले चार महिने राजीव बजाज यांच्या सांगण्यावरून आशियातील सर्वोत्तम अशा होमियोपाथचे पण औषध घेतले होते( याचा दुवा मिळाला कि तोही देईनच)पण त्याचा काही उपयोग झालेला दिसत नाही. आपण त्यांना दिल्लीतून नुसते बाहेर काढा त्यांचा खोकला अर्ध्याने कमी होईल याचे कारण दिल्लीतील वायुप्रदूषण. शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढायला शरीरात यकृतं आणि मूत्रपिंडे आहेतच.शरीरात बरे होण्याची नैसर्गिक उर्मी आणी आपली प्रणाली आहेच. त्याच्यासाठी निसर्गोपचार हा काही एकाच इलाज नाही. निसर्गोपचाराबद्दल मी पण बर्यापैकी अभ्यास केलेला आहे आणि त्याचा आधुनिक रसायन शास्त्राद्वारे तौलनिक अभ्यासही केलेला आहे. निसर्गोपचार हि "ती आहे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्याची पध्दती" हे चुकीचे आहे. IT IS NOT DETOXIFICATION. कारण जेंव्हा हि पद्धती विकसित झाली तेंव्हा प्रदूषण आणि निसर्गाचा र्हास झालेला नव्हता. इतर कोणतीही औषधे (यात आयुर्वेदिक औषधेहि येतात) न देता केवळ आहार विहारावर उपचार करण्याची पद्धती आहे.
कोणी आधुनिक वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला आहे म्हणजे त्याला इतर शास्त्रे माहित नाहीत किंवा योगाभ्यास आणि निसर्गोपचार किंवा अशी कोणतीही प्राचीन पद्धती हि काही आयुर्वेदिक किंवा सिद्धशास्त्राच्या व्यावसायिकांची मक्तेदारी नाही.या पद्धतींचा अभ्यास करून कोणीही त्याचा उपयोग आपल्या चिकित्सेत करू शकतो. त्या शास्त्रांची आपली बलस्थाने आहेत तशाच त्यांच्या मर्यादा पण आहेत.
मी काय चुकीची माहिती दिली आहे ते आपण सांगू शकाल काय? म्हणजे ती मी सुधारू शकेन. अधिक काय लिहिणे?

आयुर्हित's picture

13 Mar 2015 - 12:47 pm | आयुर्हित

"नेचरोपथि किती दिवस काम करते ते पाहू" या वाक्यातून नकळत चुकीची माहिती प्रदर्शित होत आहे असे मला वाटते!

सुबोध खरे's picture

13 Mar 2015 - 2:55 pm | सुबोध खरे

http://economictimes.indiatimes.com/magazines/panache/rajiv-bajajs-remed...
हा घ्या तो दुवा. अरविंद केजरीवाल न ७० टक्के बर वाटलं होतं. ( किती दिवसांसाठी? ते बोलायचं नाही)
"When he was quite unwell last winter, Dr Rajan Sankaran, generally considered the best homoeopath in the world today."
तसाच आता पाहू या नागेंद्र स्वामींच्या औषधाने किती दिवस बरं वाटत ते.

सुबोध खरे's picture

13 Mar 2015 - 3:10 pm | सुबोध खरे

अर्थात हे आत्ता पडलेल्या पावसामुळे "मुळापासून उखडलेलं" दुखण परत कसं आलं आणि त्यांना आता निसर्गोपचाराची गरज का पडली हे ते जगातील सर्वोत्तम होमियोपथ सांगतीलच. (कदाचीत त्यांनी कॉफी प्यायली असेल किंवा त्यांचा मफलर धुतला गेला नसेल.)

आयुर्हित's picture

13 Mar 2015 - 4:00 pm | आयुर्हित

आपली वरील प्रकारची उत्तरे हीच भ्रम निरास करणारी आहेत, हेच सांगायचे आहे आपल्याला.

अगदी स्पष्ट विचारतो......
पहिल्या बाळंतपणासाठी केलेली सिझेरियन दुसऱ्या बाळंतपणाला चालत का?
का दुसऱ्यांदा परत करावे लागते?

केजरीवाल साहेबांनी आयुर्वेदिक, होमेपदी, नेचरोपथी या सर्वाचा उपचार केला होता परंतु त्याचा फायदा झाला नव्हता हे पहिल्या दुव्यात स्वच्छ लिहिलेले आहे. या तिन्ही पथी आम्ही रोगाला दाबून टाकत नाही तर समूळ उच्चाटन करतो असा दावा करतात.नुसताच तसा दावा नव्हे तर आधुनिक वैद्यकशास्त्र रोगाला तिथल्या तिथे दाबून टाकतात असा धादांत खोटा प्रचार करतात. म्हणून हा प्रश्न निर्माण झाला.
नेचरोपाथी जी पाश्चात्य देशात अवलंबिली आहे तिच्या आणि भारतीय निसर्गोपचार पद्धतीत मुलभूत फरक आहेत. आपण वाचून पहा म्हणजे त्यातील फरक आपल्याला लक्षात येईल.
राहिली गोष्ट गरोदर पण. तो आपण होउन सुटणारा प्रश्न आहे. तुम्ही काहीही करा दहा महिन्यांनी गरोदर पणातून नैसर्गिक/सिझेरियनने सुटका मिळतेच. तोच प्रश्न ( गरोदरपणा हा आजार किंवा व्याधी नाही) पुन्हा उद्भवत नाही. दुसरी वेळ हा दुसरा प्रश्न असतो. केजरीवाल साहेबांचा खोकला आपण होऊन तर सोडाच उपचाराने सुद्धा बरा झालेला नाही. तेंव्हा वडाची साल पिंपळाला लावण्यात काय हशील आहे?

आयुर्हित's picture

13 Mar 2015 - 8:23 pm | आयुर्हित

आपण आपल्या पहिल्या Fri, 13/03/2015 - 11:32च्या प्रतिसादात म्हटले आहे
"इतर कोणतीही औषधे (यात आयुर्वेदिक औषधेहि येतात) न देता केवळ आहार विहारावर उपचार करण्याची पद्धती आहे."

याच्या अगदी विरुद्ध आपण पुढील Fri, 13/03/2015 - 14:55च्या प्रतिसादात म्हणत आहात कि
"आता पाहू या नागेंद्र स्वामींच्या औषधाने किती दिवस बरं वाटत ते."

हे दोन्ही विधाने आपलीच आहे व विरुद्धार्थी आहेत, यावरूनच आपल्याला नेचरोपथीची पूर्ण माहिती नाही हे स्पष्ट होते.

आपल्याला पडलेला खरा प्रश्न आहे नेचरोपथि किती दिवस काम करते ते पाहू.
आणि जर आपण सांगितलेले पहिले विधान जर खरे असेल तर हा प्रश्न पडलाच नाही पाहिजे.

सुबोध खरे's picture

13 Mar 2015 - 8:45 pm | सुबोध खरे

मला नेचरोपथि ची पूर्ण माहिती अर्थातच नाही आणि तसा माझा दावाही नाही. आपण शब्द्च्छ्ल् करीत आहात. जेंव्हा हि पथि विकसित झाली तेंव्हा त्यात औषधांचा अंतर्भाव नव्हता म्हणजे आता तो नाही अस अर्थ होत नाही. परंतु त्यांनी नेचरोपथीचा( तोच नव्हे तर आयुर्वेदिक आणि होमेपदी चाही) उपचार घेतला होता आणि त्याचा त्यांना उपयोग झाला नाही हे स्पष्ट असतानाहि आपण शब्दाचा खेळ मांडला आहे यावर काय बोलायचे? समूळ उच्चाटन वगैरे दाव्यावर आपण काही बोलत नाही. मोठे दावे करणे सोपे आहे पण ते सिद्ध करणे कठीण आहे शब्दांचा जंजाळ हि उभा करणे सोपे आहे. मला हि येतो तो. पण त्यातून निष्पन्न काहीही होत नाही( आणि लष्करात मला अशी शिकवणही नाही )
केजरीवाल साहेब जोवर बंगळूरू मध्ये आहेत तोवर त्यांना (स्वच्छ हवेचा फायदा होईल पण दिल्लीत आले कि परत त्रास सुरु होईल अशी खूप दाट शक्यता आहे यास्तव मी असे म्हटले आहे काळ ठरवेल कि केजरीवाल साहेब किती दिवस खोकला विरहीत राहतात.
"पहिले विधान जर खरे असेल तर हा प्रश्न पडलाच नाही पाहिजे". पण त्यांना नेचरोपाथीचा पूर्वी गुण आला नाही हि वस्तुस्थिती तर आपण नाकारू शकत नाही

"पण त्यांना नेचरोपाथीचा पूर्वी गुण आला नाही हि वस्तुस्थिती तर आपण नाकारू शकत नाही" असे जर आपण म्हणत असाल तर तो नेचरोपथीचा प्राब्लेम आहे कि नेचरोपथी वापरणाऱ्या तज्ञाचा कि केजरीवालचा?
त्यातही तज्ञांनी सांगितलेले उपचार केजरीवालने पूर्ण केले आहेत कि नाहीत?
उपचार दिल्लीत घेतलेत कि गाझीयाबादमध्ये कि अजून कुठे?
REGISTERED व तज्ञ डॉक्टरांकडून उपचार घेतलेत कि कि भोंदू कि बंगाली डॉक्टरांकडून?
नेचरोपाथीचा पूर्वी गुण आला नाही तर नाही पण अलोपथीचा तरी कुठे आला?
हा एकुणच शोधाचा वेगळा विषय होईल.

आधीपेक्षा चांगल्या तज्ञाला दाखवून किवा नेचरोपथी तज्ञाला दाखवून जर फायदा झाला तर आपला काय तोटा आहे?

"दिल्लीत आले कि परत त्रास सुरु होईल अशी खूप दाट शक्यता आहे" असे जर झाले तर कमीत कमी दिल्लीचे प्रदूषण कमी होईल असे काही तरी चांगले घडेल अशी किमान अपेक्षा.

पण आजच्या स्थितीला वरील दोन्ही शक्यतांमध्ये नक्कीच चांगले होईल केजरीवालचे.

रोगाचे समूळ उच्चाटन वगैरे दाव्यावर बोलायला गेलो तर हा कुठल्या एका पथीचा दावा नसून तो ती पथी वापरणाऱ्या/किंवा न वापरणाऱ्या व्यक्तीचाच आहे/असावा, हे लक्षात घ्यावे.

यात आपण प्रॅक्टिस करत असलेली पथी का बसत नाही (कि आपणच बसवत नाही) याचाही विचार व्हायलाच हवा कधीतरी.
ज्या औषधांचा SIDE EFFECT आहेत ती औषधे २ ते 3 महिन्यात थांबवायला हवीत ती आयुष्यभर घ्या सांगण्याचे प्रयोजन काय? कधीतरी हे थांबवायला पाहिजे कि नाही?

आता ही आजचीच बातमी वाचा Simple efforts can protect kidneys, say doctors VELLORE, March 13, 2015
यात एका वाक्यात सांगता आले असते ना कि अमक्या एकाच पथीचे औषधे खा, इतरांचे खावू नका.
किंवा फक्त औषधे खावून जगा, जेवण करूच नका!!

माझ्या मते.....
पथींच्या इतिहासात जाण्यापेक्षा व पथींच्या भांडणात पडण्यापेक्षा आजच्या युगात काय योग्य परिणाम साधला जातो व कसा लवकर साधला जातो ह्यावर जर आपल्यासारख्या सर्व तज्ञांचे लक्ष असते तर किती बरे झाले असते!

शेवटी एकच विनंती .....
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळ॥
आइका जी तुम्ही भक्त भागवत। कराल ते हित सत्य करा॥
कोणाही जीवाचा न घडावा मत्सर। वर्म सर्वेश्वरपूजनाचे॥
तुका म्हणे एका देहाचे अवयव। सुखदु:ख जीव भोग पावे॥

प्रसाद१९७१'s picture

20 Mar 2015 - 11:58 am | प्रसाद१९७१

डॉक्टरसाहेब - तुम्हाला व्यनी करुन एक प्रश्न विचारला आहे. तो बघता का?

वेल्लाभट's picture

13 Mar 2015 - 11:14 am | वेल्लाभट

नियमित व्यायाम* (लांबच लांब धसाधसा चालणे नव्हे) केल्याने मधुमेह लांब राहू शकतो. आहार महत्वाचा तेंव्हाही असतो पण तितका काटेकोर पाळण्याची आवश्यकता उरत नाही.

*कसा, काय, किती, कधी वगैरे तपशील मोठा आहे. वगळला आहे. तरीही अ‍ॅरोबिक व अ‍ॅनारोबिक चे योग्य मिश्रण व्यायामात हवे. ईझी ऑप्शन म्हणून फक्त चालणे, फक्त गोड सोडणे, फक्त योगासने, फक्त प्राणायम असं नाही.

आयुर्हित's picture

13 Mar 2015 - 12:41 pm | आयुर्हित

अजून जास्त माहिती हवी आहे.
त्यासाठी प्रत्यक्ष भेटता येईल काय? व कुठे व केव्हा?

वेल्लाभट's picture

13 Mar 2015 - 1:00 pm | वेल्लाभट

मी एका पुस्तकाची ओळख करून देणारा धागा काढला होता दोन आठवड्यापूर्वी. तो बघा. त्यात जे आहे तेच लिहीलंय.

सामान्य वाचक's picture

13 Mar 2015 - 3:28 pm | सामान्य वाचक

पण माझ्या घरा मध्ये १ व्यक्तीचा मधुमेह आहार वर नियंत्रण ठेवून आटोक्यात आला .
डॉक्टर प्रमोद त्रिपाठी यांचे १ workshop attend केले. त्याप्रमाणे आहार आखणी केली.
४ महिन्यामध्ये fasting १५० वरून ११८ पर्यंत आली. आणि वजन १५ किलो कमी झाले
अर्थात नियमित व्यायाम हि सुरु आहेच. पण व्यायाम तर गेली काही वर्षे सुरु होताच. पण शुगर कमी होत नव्हती . त्यामुळे या आहारा मुळे वजन आणि शुगर आटोक्यात आली, असे म्हणू शकतो

आयुर्हित's picture

13 Mar 2015 - 4:08 pm | आयुर्हित

सुंदर विवेचन आणि आहार आखणी.
असेच योग्य मार्गदर्शन घेण्याचे सर्वांना लवकर योग येवोत, ही ईश्वरचरणी प्रार्थना.

कानडाऊ योगेशु's picture

13 Mar 2015 - 7:36 pm | कानडाऊ योगेशु

मी काही दिवस बेंगलोर मधल्या डायबेटॉलिजिस्ट ची ट्रीटमेंट घेतल्यानंतर सहकार्याकडुन वायनाड इथल्या डॉ. प्रसाद ह्यांच्या उपचार पध्दतीबद्दल माहीती मिळाल्यावर त्यांची ट्रीटमेंट चालु केली आहे.
http://drprasadsdcrc.com/

सदर ट्रीटमेंट मधली सुरवातीची औषधे अ‍ॅलोपॅथीक च आहेत पण डॉक्टरांनी रेकमंड केलेले व्यायाम व त्यांचे वेळापत्रक पाळुन त्यांचा डोस हळुहळु कमी कमी करत शेवटी पूर्णपणे औषधमुक्त होणे हा ह्या उपचारपध्दतीचा उद्देश आहे.

एका पूर्ण गोळी पासुन सुरवात करुन मी १/४थ गोळीपर्यंत आलो होतो पण सकाळी व संध्याकाळी व्यायाम करणे भलतेच कंटाळवाणे व जमेनासे झाले तरीही सकाळी कण्हत कुथत व्यायाम चालु आहे.
ह्या उपचार पध्दतीचा बर्याच लोकांना लाभ झालेला आहे असे ऐकले व वाचलेलेही आहे. उपचाराचा खर्च साधारण ३०० च्या आसपास येतो ( दर भेटीत) व त्यासाठी वायनाड ला जावे लागते. ( मैसुर कडुन गेल्या मध्ये अभयारण्यही लागते.तो ही एक सुखद अनुभव आहे.)

विषाणूसंसर्गमुळे होणारे रोगप्रतिकारशक्ती विकार व सारखे सारखे रुग्णालयात दाखल होणे, निरुपयोगी आहार ह्यामुळे स्वादुपिंड कमकुवत होणे अशा व इतर वातावरणातील प्रदूषण यामुळे भारतात पाच वर्षाच्याआतील मुलांनाही मधुमेह होत आहे व होण्याचे प्रमाण हे आजकाल ३० टक्क्याने वाढले आहे.

Several experts claim it could be attributed to the rise in viral infections, leading to auto-immune disorders and increased hospitalisation that later cause a weak pancreas; others claim environmental issues are to blame. Another cause has been pegged at bingeing on unhealthy fare in nurseries and day-care centres, especially with most children from well-to-do families regularly exposed to junk food.

Not sweet news! Juvenile diabetes cases on the rise

सुबोध खरे's picture

25 Mar 2015 - 10:15 am | सुबोध खरे

स्वतःच्या धाग्यावर १७३ पैकी ७८ प्रतिसाद स्वतःचे.
blowing your own trumpet ?
दर दोन दिवसांनी एक प्रतिसाद देऊन शतक पूर्ण करून टाका म्हणजे झालं.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Mar 2015 - 11:56 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

ते काँट्रॅक्ट टक्यानी घेतलय ना?

प्रसाद१९७१'s picture

25 Mar 2015 - 1:04 pm | प्रसाद१९७१

डॉक्टर खरे साहेब - तुम्हाला खरडवहीतुन एक प्रश्न विचारला आहे, एकद वेळ काढुन उत्तर द्याल का?

the journal, Evidence-Based Complementary and Alternative Medicine मध्ये प्रकाशित झालेल्या मार्शल गोविंदन आणि डॉ. एमिलीया रिपोल्बन यांच्या शोधानुसार अर्ध मच्छेन्द्रासन सह धनुरासन, वक्रासन, मच्छेन्द्रासन, हलासन अशा योगासंनामुळे स्वादुपिंडाचे उद्दीपन होऊन अधिक इन्सुलिन तयार व्हायला मदत होते. ह्यामुळे type 1 आणि type 2 दोन्ही मधुमेहाच्या व्यक्तींना मधुमेह रोखता येऊ शकतो.

In fact, a study published in the journal, Evidence-Based Complementary and Alternative Medicine, last year analysed available research looking at yoga's influence on diabetes and complications of diabetes (for instance, kidney problems and high blood pressure) and found that regular yoga practise led to shortterm improvements in fasting glucose and cholesterol levels. The research, conducted by Marshall Govindan and Dr Emilia RipollBunn, also found that the direct stimulation of the pancreas by certain postures rejuvenated its capacity to produce insulin.

Yoga practitioner Sabir Shaikh adds, "A few asanas help balance the functioning of the endocrine system.It massages and tones the abdominal organs like pancreas and liver, stimulate the nervous and circulatory system which in turn helps in controlling diabetes."

Diabetologist Dr Pradeep Gadge concurs. "Besides medication", he says, "Yogic asanas help in harmonising the body, breath and mind, thereby contributing to the overall health of the individual. Asanas help in optimal secretions of the endocranial glands which helps insulin in the body to be used more effectively."

Studies have also confirmed that practising certain asanas such as Ardha Matsyendrasana (half-twist pose) combined with Dhanurasana (bow pose), Vakrasana (twisted pose), Matsyendrasana (half-spinal twist), Halasana (plough pose) squeezes and compresses the abdomen and helps stimulate the pancreatic secretions or hormonal secretions. As a result, more insulin is pushed into the system. This rejuvenates the insulin producing beta cells in the pancreas of diabetics suffering from both type 1 and 2. Practising the postures in a relaxed manner, without exertion, meditation and breathing techniques help most patients control the triggers or causes of diabetes.

4 yoga poses for diabetes

मराठी_माणूस's picture

31 Mar 2015 - 3:55 pm | मराठी_माणूस

टाईप-१ आणि टाईप-२ मध्ये काय फरक आहे. ह्यातला कुठला अनुवंशीक आणि कुठ्ला जीवनपध्दतीमुळे होतो

आयुर्हित's picture

31 Mar 2015 - 6:50 pm | आयुर्हित

बहुतांशी भारतीयांत असणारा टाईप-२ मधुमेह हा चुकीच्या जीवनपद्धतीमुळे होणारा आजार आहे, जो स्थुलतेशी(Obsesity)निगडीत आहे, ज्यासाठी व्यायाम व कमी कॅलरीचा आहार गरजेचा आहे. हा आजार साधारण वयाच्या २५ नंतर आढळून येतो. जे मधुमेही, बरेच वर्ष (कदाचित २ ते ५ वर्षे) मधुमेहावरील औषधे घेत असतात, त्यांनाही नंतर इन्सुलिनचे इंजेक्शन घेणे भाग पडते.

टाईप-१ हा आजार वयाच्या अगदी दुसऱ्या वर्षापासून दिसून येतो व स्वादुपिंडाला होणारे विषाणू संक्रमण हेच याचे मुख्य कारण आहे, ज्यात मानवी स्वादुपिंड इन्सुलिन बनवू शकत नसल्याने अगदी लहानपणासून इन्सुलिनचे इंजेक्शन घेणे अतिआवश्यक आहे.

दोन्ही प्रकार अनुवंशीकसुद्धा आहेत. त्यामुळे कुटुंबात मधुमेहाचा इतिहास असणाऱ्या लोकांनी सावध रहाणे गरजेचे आहे.