मधुमेह (एकटा नव्हे तर दहा गंभीर आजारांचा स्त्रोत) (कृपया विषयांतर नको)

आयुर्हित's picture
आयुर्हित in काथ्याकूट
3 Jan 2014 - 9:37 pm
गाभा: 

लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य यावर :गीतारहस्याबद्दल थोडेसे"...हा अतुल ठाकुर यांचा सहभाग-

"त्यापैकी सर्वात गंभीर मधुमेह त्यांनी आहारावर संयम करुन ताब्यात ठेवला होता"

संदर्भ: “लोकमान्य” – न. र.फाटक
(पूर्वप्रकाशित)

वरील धागा वाचतांना "मधुमेह"अगदी महत्त्वाचा मुद्दा हाती आला,आणि नवीन धागा सुरु करावासा वाटला.

माझ्या मते मधुमेह हा भारतातील सर्वात गम्भीर आजार आहे.
आज भारतातील प्रत्येकी तीन व्यक्तीमागे एकास मधुमेह आहे किंवा पुढच्या आयुष्यात कधी तरी होणार आहे.
आज हीच गोष्ट कितीतरी मधुमेह तज्ञ व औषधं बनविणाऱ्या उद्योगांसाठी हवी हवीशी वाटत असली तरीही रुग्णांसाठी फारच धोकादायक आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे ९०%(नव्वद टक्के)रुग्ण याबद्दल जागरूक नाहीत.

काहींना तर हा विषयच नकोसा वाटतो. परिणामी पुढे जाऊन आपल्या पदरात काय वाढून ठेवले आहे, ह्याची जरासुद्धा खबरबात ते घेत नाहीत. काही रुग्ण तर फक्त "मी तज्ञ डॉक्टरांना हवी तेवढी भरघोस फी देतो व त्यांचाच सल्ला घेतो आहे" असे म्हणून सर्व जबाबदारी त्यांच्या डॉक्टरांवरच टाकत असतात.

पण त्या बिचाऱ्यांना काहीही कल्पना नसते कि मधुमेह जर ताब्यात ठेवला नाही तर खालील पैकी काहीही होऊ शकते.
१)उच्च रक्तदाब : High Blood Presure/ Atherosclerosis
२)हृदयरोग : Byepass / Angioplasty /myocardial infarction /Heart failure
२)मूत्राशयाचे आजार : Kidney cancer/ Kidney failure/ Proteinuria
3)दृष्टी जाणे : Glaucoma
४)पाय कापावा लागणे : Leg Amputation
५)इतर कारणास्तव उद्भवणारी महत्त्वाची शस्त्रक्रिया टाळावी लागणे
६)मेंदूचे गंभीर आजार : Brain Hemorrhage
७)कर्ण बधिरता येणे
८)क्षयरोग असल्यास योग्य ती उपाययोजना न करता येणे
९)रक्तशर्करा अचानक कमी होऊन अपघात होणे
१०)गोड न खाण्याच्या पथ्याबद्दल चीड चीड होऊन घरात/बाहेर सर्व मित्र/हीतचिंतकांशी भांडणे होणे.

हो हो मला कळले तुम्ही काय म्हणाल ते!!!

रुग्णांना न घाबरविता, त्यांना हवी ती माहिती पुरवून त्यांना सर्व तोपरी मदत व्हावी या उद्देशाने हा धागा सुरु करत आहे.कृपया आपल्या कुटुंबात/मित्रांमध्ये जर कोणी रुग्ण असतील, तर आवश्यकतेनुसार त्यांचीहि मदत घेऊन त्यांचे प्रश्न आपण सर्वांनी समजून घेऊयात.

ज्यां मान्यवरांना जी माहिती असेल ती त्यांनी मोफत या धाग्यावर पुरवावी.
याचा फायदा सर्व रुग्णांना मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

कळावे, गोडवा असावा.

आपला लाडका:आयुर्हीत

प्रतिक्रिया

प्रफुल्ल पा's picture

3 Jan 2014 - 11:06 pm | प्रफुल्ल पा

क्रूपया नविन माहिति द्यावि.

आयुर्हित's picture

3 Jan 2014 - 11:56 pm | आयुर्हित

नक्कीच. जसजसे प्रश्न येत जातील, तसतसे नवीन माहितीही मिळेल.
स्वतः रुग्ण देखील छानप्रकारे आपले चांगले वाईट अनुभव लिहतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
काही succes stories मिळाल्यात तर फारच छान होईल.
तज्ञ मान्यवरांचेही मोफत मार्गदर्शन अपेक्षित आहेच.

धन्यवाद!
आपला लाडका : आयुर्हीत

मला माहीत असलेली अत्यल्प माहीती :
मधुमेह दोन प्रकारचे असतात.
प्रकार अ: या प्रकारात मधुमेह रोग्याला फारच लवकर होतो. (सहसा तिशीतच. यात त्याच्या/तिच्या प्लीहा (पॅन्क्रीया) अकार्यक्षम होउन शरीरांतर्गत शर्कारा निर्माण करण्याची शक्ती नाहीशी होते. त्यामुळे इंसुलीन्ची इंजेक्शन्स घेऊन शरीरातली शर्करा नियंत्रीत करावी लागते.
प्रकार बः इथे रोग्याला मधुमेह सहसा उशीरा होतो.यात शर्करा निर्माण जरी होत असली तरी ती पेशींमधे शोषली जात नाही. त्यामुळे रक्तातली शर्करा वाढत जाते. यामुळे पुढे मुत्रपिंडाचा त्रास होणे वगैरे सुरू होते.

(महत्वाची टीपः मी डॉक्टर वगैरे नाही. त्यामुळे ही माहीती चुकीची असण्याची शक्यता नक्कीच आहे. खालील विडीयोमधे मधुमेहाविषयी फार छान माहीती अगदी सहज समजेल अश्या भाषेत दिली आहे.)

मराठे's picture

3 Jan 2014 - 11:33 pm | मराठे
आयुर्हित's picture

4 Jan 2014 - 12:14 am | आयुर्हित

अरे व्वा ! फारच छान आणि खूप खूप महत्वाची माहिती आहे ही!
वीडीओमध्ये खूप गंभीर माहिती पण अतिशय सुंदर प्रकारे, अगदी सहजपणे दिली आहे!!!!
सर्व मधुमेही रुग्ण व त्यांचे नातेवाईक/पुढील पिढीलाही याचा फायदा होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
Truly it should proove an eye opener for Diabetic persons/heirs.

लक्ष लक्ष धन्यवाद!!!

आपला लाडका : आयुर्हीत

अत्रन्गि पाउस's picture

4 Jan 2014 - 7:14 am | अत्रन्गि पाउस

१०० वर्षांनी मधुमेह हा नाहीसा होईल असे कुठल्याश्या पाश्चात्य जर्नल चा हवाला देऊन आलेली बातमी वाचलेली आठवते...
हे जेव्हा होईल तेव्हा 'कसे' होईल ... मिपाकर वैद्यकीय तज्ञांचे काय मत आहे??
कालच एका साप्ताहिक बुलेटीन मध्ये 'मधुमेह' मुळातून घालवण्याचे प्रयत्न करा असा एका रुग्णाला दिलेला 'आयुर्वेदिक' सल्ला वाचला...म्हणजे मधुमेह घालवणे आत्ता सुद्धा शक्य आहे ??? ..मधुमेह होता आणि आता नही असे उदाहरण कुणाच्या पाहण्यात आहे का? (पाहण्यात .... ऐकण्यात नव्हे)...

आयुर्हित's picture

4 Jan 2014 - 1:22 pm | आयुर्हित

१०० वर्षांनी मधुमेह हा नाहीसा होईल असे कुठल्याश्या पाश्चात्य जर्नल चा हवाला देऊन आलेली बातमी वाचलेली आठवते...

१०० वर्षांनी मधुमेह हा नाहीसा होईल!!!!
धन्यवाद, अशा शुभ सन्देशाने दिवसाचि सुरवात केल्याने.
कसे होईल हे जाणण्यासाठी कृपया ते जर्नल शोधून काढूया का? काही अजून "क्लु" मिळेल का ?

हे जेव्हा होईल तेव्हा 'कसे' होईल ... मिपाकर वैद्यकीय तज्ञांचे काय मत आहे??

मिपाकर वैद्यकीय तज्ञांचा सहभाग नक्कीच आवश्यक आहे.

'मधुमेह' मुळातून घालवण्याचे प्रयत्न जर नाही झाले तर पुढच्या पिढीतील ७०% भारतीयांना मुळातून जावे लागेल(मूळच नष्ट होईल). हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय मी.
चला तर मग आपण समस्त मिपाकार हे शोधून काढू या.
कृपया कालच्या साप्ताहिक बुलेटीन ची लिंक पोस्ट होऊ शकेल का? सर्वांना फायदाच होईल त्याने.

धन्यवाद
कळावे, लोभ असावा.
आपला लाडका : आयुर्हीत

सकाळच्या हार्ड कॉपीमध्ये जे बालाजी तांब्यांची पुरवणी येते त्यात वाचकांच्या प्रश्नोत्तार्त हा उल्लेख आहे..

चौकटराजा's picture

10 Jan 2014 - 4:34 pm | चौकटराजा

मधुमेह हा " रोग" नसल्याने तो जाईल.तो व्हायरसने होणारा बदल नव्हे.व्हायरस हे स्वतः च एक अजब प्रयोगशाळा असतात.
ते त्वरित आपल्यात बदल करून सरव्हायव्हल ची सोय करू शकतात. स्टेमसेल थेरपी जशी सुलभ व परवडणारी होईल तशा
स्वादुपिंडाच्या पेशी नव्याने तयार करता येऊ शकतील.आज तरी फूटपाथवर पेन ड्राईव्ह घेण्याइतके ते सोपे नाही.

ब्रिटीश मधुमेह संशोधनतज्ञानुसार पुढच्या २० वर्षात Type 1 मधुमेह(Auto immume Disease)साठी लस बनवणे शक्य आहे, जेणे करून हा रोग आटोक्यात येण्याची शक्यता आहे.

भारतीयांत असणारा Type2 मधुमेह हा चुकीच्या जीवनपद्धतीमुळे होणारा आजार आहे, जो स्थुलतेशी(Obsesity)निगडीत आहे, ज्यासाठी व्यायाम व कमी कॅलरीचा आहार गरजेचा आहे, त्यावरही जोरात संशोधन सुरु आहे.

अधिक माहितीसाठी वाचा :
Diabetes experts confident they can wipe out killer disease in 20 years

आता बोला!

प्रभाकर पेठकर's picture

28 Jan 2014 - 3:10 pm | प्रभाकर पेठकर

भारतीयांत असणारा Type2 मधुमेह हा चुकीच्या जीवनपद्धतीमुळे होणारा आजार आहे, जो स्थुलतेशी(Obsesity)निगडीत आहे,

मला वाटते माझा मधुमेह Type 3 प्रकारचा आहे. म्हणजे आधी Type 2 मधुमेह होऊन, जीवनपद्धती आणि स्थुलतेत विक्रमी बदल घडत नसलाने, कायमस्वरुपी वास्तव्यास आलेला.

आयुर्हित's picture

28 Jan 2014 - 3:32 pm | आयुर्हित

काका, आपल्याला असलेला प्रकार हा Type2 चाच आहे, कारण मधुमेहमध्ये Type3 प्रकार नसतोच मुळी!
आधुनिक चिकित्सा विज्ञानानुसार मधुमेह फक्त २ प्रकारचेच असतात. नाहीतर हा प्रतिसाद वाचून चुकीचा संदेश जाईल.

आयुर्वेदामध्ये याचे खूप बारकाईने विस्तृत प्रकार सांगितले आहेत, जेणे करून व्यवस्थितपणे अचूक निदान होऊ शकते.
चिकित्सेत अचूकता असेल तरच तत्पर, इतर रोग/आजार वाढू न देता कायमस्वरूपी इलाज होणे शक्य/गरजेचे असते.

आपली तयारी असेल तर आपली पूर्ण माहिती विचारात घेऊन case study प्रकाशित करता येऊ शकेल, जेणे करून सर्वांना याचा निश्चितच फायदा होईल.

धन्यवाद.

प्रभाकर पेठकर's picture

29 Jan 2014 - 1:45 am | प्रभाकर पेठकर

अहो, माझा प्रतिसाद विनोदी अंगाने आहे.
>>>>जीवनपद्धती आणि स्थुलतेत विक्रमी बदल घडत नसलाने, कायमस्वरुपी वास्तव्यास आलेला.
हे विनोदी पद्धतीने अधोरेखित करण्याचा प्रयत्न होता. असो.

चौकटराजा's picture

4 Jan 2014 - 7:19 am | चौकटराजा

मधुमेह हा स्वत: रोग नाही ती एक शारिरीक अवस्था आहे. कावीळ ही अशीच एक अवस्था आहे.
मधुमेह होण्याची शक्यता असलेली जीन्स व होणारच नाही अशी जीन्स असलेली माणसे असतात.त्यामुळे काहीना जास्त साखर खाल्ली तर काहीना मधुमेह होणारच नाही .
मधुमेह हा आंतस्त्रावी ग्रंथी च्या कार्यात बिघाड झाल्यामुळे होणारी अवस्था असली तरी त्याचे मुख्य 'लक्ष्य' असते अभिसरण संस्था.
सतत रक्तशर्करेची पातळी सामान्य ठेवणे हे यातील मुख्य ध्येय असते. साहजिकच रूग्णाचा रोल चिकित्सकापेक्षा महत्वाचा ठरतो.
अशी पातळी सामान्य ठेवण्यासाठी स्वादुपिंडाचे उद्दीपन , वाढत्या रक्तशर्करेचा त्वरित वापर व शर्करेची पातळी अवास्तव
वाढणार नाही वा कमी होणार नाही असा आहार व आहाराची वारंवारिता ठेवणे हे तीन मुख्य उपाय आहेत.
आहारात फायबरचा वापर असेल तर अन्नाचे हळू हळू शोषण होऊन सामन्य पातळी ठेवता येते. अतः साबुदाणा, मैदा
विशुद्ध साखर या सारखे पदार्थ घेताना त्या बरोबर काहीतरी "रफेज" खाल्ले पाहिजेत. उदा.भाताबरोबर पालेभाजी खाल्ली पाहिजे, आमटी नव्हे.

धन्यवाद आपल्या छान प्रतिसादाबद्दल.

सतत रक्तशर्करेची पातळी सामान्य ठेवणे हे यातील मुख्य ध्येय असते.

फारच छान आणि खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलाय आपण.

रक्तशर्करेची आदर्श पातळी किती असावी या बद्दल आपले आणि मिपा वरील तज्ञांचे काय मत आहे?

आपण त्यासाठी

अशी पातळी सामान्य ठेवण्यासाठी स्वादुपिंडाचे उद्दीपन , वाढत्या रक्तशर्करेचा त्वरित वापर व शर्करेची पातळी अवास्तव
वाढणार नाही वा कमी होणार नाही असा आहार व आहाराची वारंवारिता ठेवणे हे तीन मुख्य उपाय आहेत.

हे उत्तर अतिशय समर्पक आहे. कृपया सर्वांनी याचा फायदा घ्यावा व कोणाची काही शंका असेल तर ती उपस्थित करावी हीच नम्र विनंती.

कृपया सर्वांनी आपआपला खारीचा वाटा उचलावा. आपणा सर्वाकडून थोडीथोडी का होईना, पण मधुमेह १०० नाही तर अगदी १० वर्षात नाहीसा होण्यात नक्कीच मदत होईल.

धन्यवाद
कळावे, लोभ असावा.
आपला लाडका : आयुर्हीत

आयुर्हित's picture

5 Jan 2014 - 3:39 pm | आयुर्हित

"स्वादुपिंडाचे उद्दीपन" हा शब्द नक्क्कीच काहीतरी गूढ मतितार्थ दर्शवितो आहे.गुगलकाका पण गप्प आहेत.
पण जबरदस्त परिणामकारी शब्द आहे हा.

आपण व मिपा वरील तज्ञ मंडळींनी कुपया अधिक मार्गदर्शन करावे हि विंनती.

कळावे, लोभ असावा.
आपला लाडका: आयुर्हीत

चौकटराजा's picture

7 Jan 2014 - 8:21 pm | चौकटराजा

स्वादुपिंडाचे उद्दीपन म्हणजे इन्सुलीन तयार करणाच्या बीटा सेल्स ला कामाला लावणे. अर्थात यात यश मर्यादित असते. पण काही औषधे हे काम करतात.

आयुर्हित's picture

8 Jan 2014 - 2:30 pm | आयुर्हित

यात कोण कोणते औषधे येतात?

आपला काय अनुभव आहे? साखरेचे प्रमाण किती कमी होते? कि होतच नाही? कि तात्पुरते कमी होते, कि जरुरी पेक्षा जास्त (अधिकच) कमी होते?

कि काही वेगळे प्रतिसाद/side effect कडे लक्ष वेधायचे आहे आपल्याया ?

सवडीने उत्तर दिले तरी चालेल, पण सखोल हवे आहे, हिच विनंती.

अधिक खोलात जाऊन विचार करायची वेळ आली आहे, म्हणून हे बारीक तपशील महत्त्वाचे वाटतात मला.

कळावे, लोभ असावा.
आपला लाडका,आयुर्हीत

साहेब आधी तुम्ही स्वत: वर उपचार केलात तर बर होईल
डोक्यावर पडल्यासारखी तीच तीच वाक्य परत परत लिहित आहात .

सन्दीप's picture

8 Jan 2014 - 2:43 pm | सन्दीप

+१०००००००

आयुर्हित's picture

8 Jan 2014 - 4:04 pm | आयुर्हित

कुठेतरी लागलेले दिसते.
तरीच म्हटले, एवढ्या जोरात का सटकलात !!!!
तुमच्या त्या स्पा च्या फरशीवर पाणी बिनी सांडले होते का हो?

धन्यवाद आपल्या स्वानुभवाबद्दल.

डोक्यावर पडल्यासारखी तीच तीच वाक्य परत परत लिहित आहात .

पैसा's picture

4 Jan 2014 - 11:05 am | पैसा

माहितीपूर्ण धागा. माझ्या आईकडून भावाला फार लहान वयात मधुमेह आला आहे. त्याच्या टेन्शनच्या नोकरीमुळे त्यात भर पडली असावी. मात्र मला अजूनतरी काही त्रास नाही. प्रतिक्रियांमधूनही आणखी माहिती मिळेल या अपेक्षेत आहे.

असेच आणखी धागे येऊ द्या. तुमच्या आयडीवरून तुम्ही वैद्यकीय क्षेत्रातले दिसताहात.

धन्यवाद आपल्या सहभागाबद्दल.
मुळात हा धागा आपल्यासारख्या मान्यवरांसाठीच आहे,
ज्यांच्या घरात मधुमेहाची दाट शक्यता आहे परंतु अजून प्रवेश झालेला नाही

आणि म्हणून सर्व प्रथम आभार त्या लाडक्या गणरायाचे.

पुढेही होऊ नये म्हणून गणरायाच्या आशीर्वादाने या नवीन वर्षात सर्वांनी एक संकल्प सोडू या व मधुमेहाला हद्दपार करू या.

मला एक श्लोक आठवला:
ॐ असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय , मॄत्योर्माअमॄतं गमय ।

हे प्रभु! असत्य से सत्य, अन्धकार से प्रकाश और मृत्यु से अमरता की ओर मेरी गति हो ।

O Lord! Lead me from the untruth to truth, darkness to light and death to immortality.

आणि वाचूया ह्याच विषयावरील "मटा" चा महत्वाचा लेख:http://maharashtratimes.indiatimes.com/edit/column/-/articleshow/2830294...

अनुवंशिकता हा एक महत्त्वाचा दुवा आणि इशारा आहे पुढच्या पीढीला/समकालीन बंधू भगिनींना वेळीच सावध होण्याचा.
आणि सर्वात महत्त्वाचे : मधुमेह टाळणे हे आपल्याच हातात आहे. कसे ते पुढे पाहूच.

कळावे,लोभ असावा.
आपला हितचिंतक(एक भुगत भोगी):आयुर्हीत

ताजा कलम: मी कोणी वैद्यकीय क्षेत्रातला तज्ञ नाही परंतु डोळे उघडे ठेऊन वावरतो आहे. माझ्या घरात/आजोळी आजवर एकूण १६ मधुमेहि रुग्ण होऊन गेलेत, त्यांच्यावर बितलेल्या बऱ्या वाईट अनुभवाने मी स्वतः शहाणा व्हायचा ठरविले आहे. नाही तर माझ्यावरही मधुमेहाची टांगती तलवार लटकलेलीच आहे. म्हणूनच वेळीच सावध होण्याचा प्रयत्न करत आहे. मिपावरील तज्ञ मान्यवर यावर उत्तम मार्गदर्शन करतील, अशी अपेक्षा आहे.

प्रभाकर पेठकर's picture

4 Jan 2014 - 12:42 pm | प्रभाकर पेठकर

मधुमेह खरोखर फार भयंकर अवस्था आहे.
मधुमेही माणसाला नुसती साखरच नाही तर एकूणच आहार फार विचारपूर्वक घ्यावा लागतो.
उष्मांकावरही लक्ष द्यावे लागते. तेल, चरबीयुक्त पदार्थ, मांसाहार, मद्यपान ह्याने यकृतावर ताण येतो. यकृत बिघाडाने कोलेस्ट्रॉल वाढीस लागते आणि कोलेस्टरॉलने हृदयविकार सुरु होऊ शकतो.
अनेक मार्गाने साखर शरीरात प्रवेश करीत असते. साखरेत डायरेक्ट साखर आणि इनडायरेक्ट साखर असे दोन भाग येतात. डायरेक्ट साखरेत आपली पांढरीसाखर, गुळ, मिठाई वगैरे वगैरे पांढरीसाखर वापरलेले पदार्थ येतात तर इनडायरेक्ट साखरेत कर्बोदके (भात, बटाटा, मैदा, साबुदाणा इ.इ.) येतात. केळी, द्राक्षं, चिकू, आंबा आदी गोड फळे सुद्धा ह्यात मोडतात.
साखरेचा प्रवेश शरीरात झाला की पचनाच्या प्रक्रियेमध्ये त्याचे ग्लुकोज मध्ये रुपांतर होते हे ग्लुकोज रक्ताच्या पेशींमध्ये शोषले जाऊन त्याचे रुपांतर उर्जेत होते. मधुमेही अवस्थेत हे ग्लुकोजचे पेशींमध्ये शोषले जाणे बंद किंवा मंद होते आणि रक्तात साखर साचू लागते. रक्तपेशीतील ग्लुकोजचे शोषण कमी झाल्याने उर्जा निर्मिती होत नाही. परिणामतः लवकर थकवा जाणवतो. झोप जास्त येते. काम करायचा उत्साह कमी होतो.
मधुमेहाची अवस्था प्रमाणाबाहेर वाढलेल्या वजनाने येते. (हे अनेक कारणांपैकी एक कारण आहे). त्यामुळे वजनावर नियंत्रण अत्यंत आवश्यक त्यामुळे तळलेले पदार्थ, मांसाहारातील ग्रेव्हीवादी पदार्थ, गोड पदार्थ, मैद्याचे पदार्थ इ.इ.इ. टाळावे लागतात. त्याच बरोबर नियमित व्यायाम (चालणे, पोहणे इ.इ.) आवश्यक असतो. कारण नियमित व्यायामाने ग्लुकोजचे शोषण होऊन उर्जा निर्मिती होते, स्नायुंपर्यंत ग्लुकोज पोहोचून थकवा आणि इतर दु:ष्पपरिणाम दूर राखले जातात.
इनडायरेक्ट साखरेत कर्बोदके अग्रक्रमाने येतात. ह्या कर्बोदकांमध्ये असलेली साखर रक्तात शोषली जाण्याचा क्षमता आणि क्रम वेगवेगळा असतो. त्या त्याच्या क्रमानुसार त्याला एक अंक देण्यात आला आहे त्याला Glycemic Index (GI) म्हणतात. त्यात ग्लुकोज हा १०० मानुन त्याच्या संदर्भात इतर पदार्थांचा GI ठरवला आहे. साखरेचा ६५ आहे. बहुतेक पदार्थांच्या GI चा तक्ता आंतरजालावर उपलब्ध आहे. ५५च्या खालील GI ला कमी GI मानतात, ५५ ते ६९ पर्यंतचे मध्यम GI तर ७०च्या वरील सर्व उच्च GI. मधुमेही माणसाला आपला आहार कमी आणि मध्यम अशा GI मध्ये ठेवणे गरजेचे असते.
कर्बोदकातील GI त्यातील साखरेचे प्रमाण ठरवते. पण खाण्यात कर्बोदकाचे प्रमाणही महत्त्वाचे असते. कमी GI ची कर्बोदके जर प्रमाणाबाहेर खाल्ली तरी रक्त शर्करा वाढते. त्यांमुळे किती कबोदके खायची हे ठरवण्यासाठी Glycemic Load (GL) हे प्रमाण ठरवावे लागते. जो पदार्थ आपण खातो त्यातील तंतू वजा जाता उरते ते निव्वळ कर्बोदक.

GL = (GI X निव्वळ कर्बोदके) भागीले १०० . येणारं उत्तर २० पेक्षा कमी असावं.

विषय सोपा करण्याऐवजी मी जास्त क्लिष्ट केला आहे का? असेलही. कारण हा एक महासागरासारखा विषय आहे तो एका प्रतिसादात मांडण्याची तारेवरची कसरत मला कितपत जमली आहे कळत नाही. मला स्वतःला मधुमेह असल्याकारणाने ह्या विषयावरील जमेल तितके वाचन, डॉक्टर - डाएटिशियनशी चर्चा ह्यातून वरील माहिती मिळाली आहे.

थोडक्यात

डायरेक्ट साखर = पूर्ण टाळा.
इन्डायरेक्ट साखर =एकदम कमी प्रमाणात घ्या.
भरपूर भाज्या (कमी तेलावर शिजवलेल्या) = जास्त खा.
पालेभाज्यांवर जास्त भर द्या.
मैदा टाळा. गव्हाचे पीठ, कोंडा खा.
नियमित व्यायाम करा.
मानसिक ताण तणाव टाळा.

बाकी मिपावरील डॉक्टर मंडळी जास्त प्रकाश टाकतीलच. ह्या विषयावरील माझे ज्ञान वाढवायला मला आवडेलच.

आयुर्हित's picture

4 Jan 2014 - 3:22 pm | आयुर्हित

मधुमेह खरोखर फार भयंकर अवस्था आहे.

हो हे अगदी खरे आहे.ज्यावर पाळी येते त्यालाच ते कळते. यातून आपण सर्व मिपाकर मान्यवर बोध घेऊ.
पुढच्यास ठेच लागली तर मागच्याने का शहाणा होऊ नये?

आज अजून एक महत्त्वाची टीप हाती आली आहे ती म्हणजे

डायरेक्ट साखर = पूर्ण टाळा.
इन्डायरेक्ट साखर =एकदम कमी प्रमाणात घ्या.
भरपूर भाज्या (कमी तेलावर शिजवलेल्या) = जास्त खा.
पालेभाज्यांवर जास्त भर द्या.
मैदा टाळा. गव्हाचे पीठ, कोंडा खा.
नियमित व्यायाम करा.
मानसिक ताण तणाव टाळा.

किती चांगले होईल, सर्व मधुमेही रुग्ण व त्यांचे नातेवाईक हि बाब समजून घेतील. यात रुग्णासोबत त्यांच्या सहचारिणी/सहचारि व आचारी(COOK/शेफ)नेहि हे समजून घ्यायला हवे.
सर्व अन्नपूर्णा माताभगिनी यात जाणीवपूर्वक लक्ष घालतीलच अशी आशा.

एकंदरीत खूप छान व उपयुक्त असा हा प्रतिसाद आहे. मनापासून धन्यवाद.

कळावे, लोभ असावा.
आपला हितचिंतक : आयुर्हीत

पेठकरसाहेबांनी खूप चांगली माहिती थोडक्यात सांगितली आहे. मला त्यात फार काही भर घालता येण्यासारखे नाही. फक्त इतकेच लिहावेसे वाटते की एकाद्याला 'मधुमेह आहे' किंवा 'नाही' असे फक्त दोनच भाग नसतात. कोणत्याही टाइपच्या मधुमेहांमध्ये त्याच्या तीव्रतेनुसार ही अवस्था कितपत गंभीर आहे यात फरक असतात. त्यानुसार किती पथ्य करायला हवे हे ठरवता येते. सगळ्या आवडत्या गोष्टी पूर्णपणे वर्ज्य करण्यामुळे मानसिक ताप होणे साहजिक आहे आणि नैराश्य आले तर ते मधुमेहाहून जास्त भयंकर वाटेल. सध्या तरी रक्तामधील साखरेचे प्रमाण हेच एक मोजमाप आहे. पण प्रत्येक व्यक्तीच्या रक्ततले हे प्रमाण क्षणोक्षणी बदलत असते. वर दिलेल्या व्हीडिओवरूनही ते स्पष्ट होते. यामुळे व्याधीचे निदान नीटपणे होण्याच्या दृष्टीने उपाशीपोटी रक्त तपासणी केली जाते. पथ्य किंवा आहारावरील नियंत्रण, नियमित व्यायाम आणि तरीही आवश्यकता असल्यास काही औषधे यांच्या सहाय्याने रक्तामधील साखरेचे प्रमाण मर्यादेत ठेवता येते असा माझा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे आणि माझ्या सुदैवाने मला कोणतेच लक्षण कधीच दिसले नाहे. त्यामुळे माझा रिपोर्ट पाहून त्या पॅथॉलोजी लॅबमध्ये आलेल्या माझ्या एका मित्राने मला डायबेटिक म्हणायचे की नाही असा प्रश्न मला विचारला होता.

धन्यवाद. फार मोलाचा अनुभव आहे हा!
सर्वात महत्वाचे म्हणजे आनंदसरांचा मधुमेह पूर्ण नियंत्रणाखाली आहे, हि विशेष बाब सर्वांनी लक्षात घ्यावी हि विनंती.

आपल्या गेल्या अनेक वर्षांचा अनुभव जर थोड्या शब्दात मांडायचा झाल्यास

व्याधीचे निदान नीटपणे होण्याच्या दृष्टीने उपाशीपोटी रक्त तपासणी

आणि

पथ्य किंवा आहारावरील नियंत्रण, नियमित व्यायाम आणि तरीही आवश्यकता असल्यास काही औषधे यांच्या सहाय्याने रक्तामधील साखरेचे प्रमाण मर्यादेत ठेवता येते असा माझा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे

चला पहिली success story मिळाली असे म्हणता येईल.
तुमचा आदर्श घेऊन सर्व मधुमेहरुग्णांनी मधुमेहावर पूर्ण नियंत्रण मिळवण्यास हरकत नाही.
आपण पथ्यावर भर दिला आहे हि फारच दुर्मिळ पण आनंदाची बाब आहे!
पथ्य काय पाळत आहात हेही सविस्तर सांगितले तर बरे होईल.

काय मिपाकारहो, होईल कि नाही सर्वांचा मधुमेह हद्दपार येत्या १० वर्षात!

असाध्य ते साध्य करीता सायास। कारण अभ्यास तुका म्हणे।।
प्रयत्न केल्यास जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही...म्हणून प्रयत्न करत राहा असा संदेश देणारे तुकोबाराय..विज्ञानवादी & प्रयत्नवादी होते...त्यांनी समाजातील दांभिकपानावर कडाडून टीका केली.

दिसेना जनीं तेंचि शोधूनि पाहें| बरें पाहतां गूज तेथेचि आहे| करीं घेउं जातां कदा आडळेना| जनीं सर्व कोंदाटले तें कळेना ॥ श्लोकार्थ – या दृष्य सृष्टीत जे सहज दिसत नाही त्याचा सूक्ष्म विचाराने शोध घ्यावा. शुध्द विचाराने नीट पाहिले की त्याचे गूढरहस्य तेथेच दडलेले आढळेल.

कळावे,लोभ असावा.
आपला लाडका : आयुर्हीत

प्रभाकर पेठकर's picture

5 Jan 2014 - 1:43 am | प्रभाकर पेठकर

>>>>सगळ्या आवडत्या गोष्टी पूर्णपणे वर्ज्य करण्यामुळे मानसिक ताप होणे साहजिक आहे आणि नैराश्य आले तर ते मधुमेहाहून जास्त भयंकर वाटेल.

नैराश्य येऊ न देण्यासाठी, ह्या विषयावरील, माझी वैचारिक बैठक विशद करतो.

एक तर आपल्याला मधुमेह आहे, ही एक भयंकर अवस्था आहे आणि ह्यातून कांही गंभीर आजार होऊ शकतात हे मनाने मान्य करणं महत्त्वाचं. दुसरं आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्टींची एक वेळ, एक स्थान असतं. जसे लहानपणी आपण विटी-दांडू, डबा ऐसपैस, सूर पारंब्या वगैरे खेळतो. पण जन्मभर तेच करतो का? तर नाही. वाढत्या वयाबरोबर आपल्या आवडीनिवडी, गरजा बदलत जातात. लहानपणी खेळलो ह्यावर आपण समाधान मानतो. हे समाधान मानणंच आपल्याला नैराश्यापासून वाचवतं. गोड, तेलकट, चमचमीत खाण्याचं आपलं वय सरलं हे मनाने मान्य करून समाधानी राहिलं तर नैराश्य येत नाही. आनंद कुठल्याही गोष्टीतून मिळवता येतो. आयुष्यभर साखरेचा गोड चहा प्यायची सवय सहजासहजी सुटत नाही. पण मनाचा निग्रह आणि वर म्हंटल्या प्रमाणे आपल्याला मधुमेह आहे हे मनाने मान्य केल्यावर बिनसाखरेचा चहा पिण्याची सवय होते. पुढे पुढे तर चुकून कुठे साखरेच्या गोड चहाचा घोट घेतला तर अगदी नकोसे वाटते. मैद्याचा पाव खाण्यापेक्षा गव्हाच्या पीठाचा पाव खाल्यावर तो जास्त चविष्ट वाटतो. बटाटा पूर्ण टाळता येतो. सुरुवातीला जेवणात भाताचा ढीग कमी कमी करत पूर्ण टाळता येतो. आंबा खूप आवडत असेल तर पूर्ण आंबा खाण्यापेक्षा आंब्याच्या मौसमात ३-४ दिवसांत एखादी फोड खाऊन नियंत्रण ही ठेवता येते आणि हौसही भागवता येते. मोसंबी आणि उसाचा रस वगैरे टाळून त्या ऐवजी अननसाचा रस (साखर न घालता), कलींगडाचा रस (साखर न घालता) वगैरे सेवन करून तुम्ही साखर आणि आपली हौस नियंत्रणात ठेवू शकता. नैराश्य वगैरे येत नाही. जवळ जवळ दररोज सकाळी रिकाम्यापोटी रक्तशर्करा तपासून (घरगुती यंत्राच्या साहाय्याने) ती १००-११० mg च्या वर जात नाहीए ह्यावर लक्ष ठेवावं. ११०च्या वर जात असेल तर खाण्यावर नियंत्रण (जेवणातील साखरेचा, कर्बोदकांचा समावेश) आणि व्यायामातील नियमितता तपासून, योग्य ते बदल करून, रक्तशर्करा ११०च्या खाली आणावी. साखरेचे प्रमाण १००च्या खाली ठेवायची तसेच त्यात फार हेलकावे ((fluctuations) ही असता कामा नये.

साखरेच्या रक्तातील शोषणाबद्दल एक उदाहरण मला फार उपयुक्त वाटते. जसे दिवसभर रिमझीम पाऊस पडत असेल तर ते सर्व पाणी जमिनीत मुरते पण दोन तास मुसळधार पाऊस पडला तर ठिकठिकाणी तळी आणि डबकी साठतात. तसेच एकदम मोठ्या प्रमाणात साखरेचा मारा केला तर साखर रक्तात साठून राहते पण मागील प्रतिसादात म्हंटल्या प्रमाणे GI आणि GL ह्यावर लक्ष दिल्यास अल्पप्रमाणात पोटात गेलेली साखर रक्तात शोषली जाऊन रक्तातील त्याचे अतिरिक्त प्रमाण वाढत नाही आणि मधुमेहाचे दु:ष्परीणाम जाणवत नाहीत.

प्रभाकर सरांनी अचूक आणि अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले आहे.मनापासून धन्यवाद.

मनाने मान्य करून समाधानी राहिलं तर नैराश्य येत नाही

आणि

जवळ जवळ दररोज सकाळी रिकाम्यापोटी रक्तशर्करा तपासून (घरगुती यंत्राच्या साहाय्याने) ती १००-११० mg च्या वर जात नाहीए ह्यावर लक्ष ठेवावं. ११०च्या वर जात असेल तर खाण्यावर नियंत्रण (जेवणातील साखरेचा, कर्बोदकांचा समावेश) आणि व्यायामातील नियमितता तपासून, योग्य ते बदल करून, रक्तशर्करा ११०च्या खाली आणावी. साखरेचे प्रमाण १००च्या खाली ठेवायची तसेच त्यात फार हेलकावे ((fluctuations) ही असता कामा नये

कोणाला काहीही शंका असतील तर अवश्य विचारा, मनात कुठलेही प्रश्न ठेऊ नये.
सर्व मिपाकरांना याचा लाभ घेतील हि ईश्वर चरणी प्रार्थना.

कळावे, लोभ असावा.
आपला लाडका: आयुर्हीत

छान लेख आणि चर्चा. वाचत आहे...

आयुर्हित's picture

4 Jan 2014 - 3:36 pm | आयुर्हित

आपल्या छान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपलाही सहभाग हवा आहे आम्हा सर्वांना.

कळावे, लोभ असावा.
आपला लाडका :आयुर्हीत

मुक्त विहारि's picture

4 Jan 2014 - 4:50 pm | मुक्त विहारि

उपयुक्त धागा.

आयुर्हित's picture

4 Jan 2014 - 5:08 pm | आयुर्हित

आपल्या छान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपलाही सहभाग हवा आहे आम्हा सर्वांना.

कळावे, लोभ असावा.
आपला लाडका :आयुर्हीत

साहेब कशाला कुंथुन धागा वर ठेवताय? 17 पॆकी 8 प्रतीसाद तुमचे, परत मुळ धाग्यातही काही स्वताचे इनपुट्स नाहीत.लोक करतील चर्चा नका घेऊ टेन्शन, बाकी लिखाण वाचा तोवर

आयुर्हित's picture

4 Jan 2014 - 6:41 pm | आयुर्हित

धन्यवाद युक्ती व Statistics बद्दल. नक्कीच बदलवीन मी स्वतःला.

आपण माझे इनपुट वाचलेले दिसत नाहीत, म्हणून परत एकदा पोस्ट करतो फक्त तुमच्यासाठी.

आणि वाचूया ह्याच विषयावरील "मटा" चा महत्वाचा लेख:http://maharashtratimes.indiatimes.com/edit/column/-/articleshow/2830294...

बाकी लिखाण खूप खूप छान आहे मिपा वर. माझी तर (वाचनाची)मेजवानी सुरु आहे.मराठीतील असे सुरेख लिखाण, सापडूनही सापडत नाही.धन्यवाद परत एकदा आपल्या सहभागाबद्दल.

कळावे, त्रागा नसावा.
आपला(हि होईन कधीतरी)लाडका: आयुर्हीत.

@@@आपला(हि होईन कधीतरी)लाडका:

ओय... असल्या आवडी नाहीत आमच्या , पलीकडील संस्थळांवर जा :-D

पैसा's picture

4 Jan 2014 - 8:34 pm | पैसा

मेल्या...

शैलेन्द्र's picture

4 Jan 2014 - 11:54 pm | शैलेन्द्र

"@@@आपला(हि होईन कधीतरी)लाडका:"

हे असं कसं झालं हो..

खंडेराव's picture

31 Mar 2015 - 10:53 pm | खंडेराव

हे काय आयुर्वेदात बसत नाही हा..

ह्घ्या :-)

मला मधुमेहाचा प्रत्यक्ष अनुभव नाही मात्र American Diabetes Association ची पुढील पुस्तके एकदा तरी जरूर वाचावीत - मधुमेहासंदर्भातील ज्ञानामध्ये भरपूर वाढ होईल.

.
.
.
.
.

साधारणपणे १०० ते १२५ पानी पुस्तके आहेत आणि पुस्तकाच्या नावानुसार त्या त्या विषयाची इत्यंभूत माहिती दिली आहे.

उदा - फूटकेअर टिप्स देताना,

पायांच्या त्वचेची काळजी काय घ्यावी व कशी..?
नखांची काळजी..
पायाच्या नसांची काळजी..
सॉक्स आणि शूज कोणते वापरावेत..? कसे निवडावेत..?
चप्पल वापराताना काय काळजी घ्यावी..?
व्यायाम करताना, ट्रेक करताना, पोहोताना, जॉगींग व रनींग करताना घ्यावयाची काळजी..
कोणत्या गोष्टींना किती महत्त्व द्यावे व एखाद्या लक्षणावर प्राथमिक पातळीवरच काय उपचार करावेत..

अशी उपयुक्त माहिती प्रश्नोत्तरातून रोचकपणे दिली आहे.

प्रभाकर पेठकर's picture

5 Jan 2014 - 3:23 am | प्रभाकर पेठकर

धन्यवाद मोदक,

नक्कीच ही सर्व पुस्तके विकत घेतली जातील. भारतात कुठे मिळू शकतील?

मोदक's picture

5 Jan 2014 - 3:30 am | मोदक

क्रॉसवर्ड किंवा लाईफस्टाईलमध्ये मिळू शकतील / ऑर्डर नोंदवावी लागेल अन्यथा अ‍ॅमेझॉन वर उपलब्ध आहेत.

प्रभाकर पेठकर's picture

5 Jan 2014 - 10:04 am | प्रभाकर पेठकर

धन्यवाद मोदक.

आयुर्हित's picture

5 Jan 2014 - 1:28 pm | आयुर्हित

मोदकजी, लक्ष लक्ष धन्यवाद.
प्रत्यक्ष मधुमेहाचा अनुभव नसतांना देखील, माणुसकीच्या नात्याने केलेली हि मदत अनमोल आहे!
सर्व मिपाकार याचा जरूर लाभ घेओत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

कळावे, लोभ असावा
आपला लाडका, आयुर्हीत.

साती's picture

5 Jan 2014 - 11:55 am | साती

पेठकरकाका मस्तं लिहिताहेत.
डबक्याचं उदाहरण खूप आवडलं. माझ्या पेशंट एज्युकेशनमध्ये नक्की घालते.
प्रत्येकवेळी ते देताना काका आठवतील. ;)

स्पा, मला वाटतं आयुर्हित यांचा हेतू धाग्याचा टि आर पी वाढविणे नसून धाग्याचे सूत्रसंचालन करण्याचा आहे.
आणि ते तो सध्यातरी व्यवस्थित पार पाडताहेत.
डायबेटिस दहा वर्षात नष्टं नक्कीच होणार नाही (आम्हा डायबेटॉलॉजिस्टची पोटे कशी भरतील)
डायबेटिस नष्ट होणे एक कविकल्पना आहे. मात्र १०० टक्के डायबेटिसच्या रुग्णांची पथ्य, आहार, व्यायाम आणि गरज पडल्यास(च) औषधे इंजेक्शने यावर रक्तशर्करा नियंत्रित राहू शकेल. आणि एंड ऑर्गन डॅमेज वाचविता येऊ शकेल.

आयुर्हित's picture

5 Jan 2014 - 1:10 pm | आयुर्हित

पेठकरकाका मस्तं लिहिताहेत.
डबक्याचं उदाहरण खूप आवडलं. माझ्या पेशंट एज्युकेशनमध्ये नक्की घालते.
प्रत्येकवेळी ते देताना काका आठवतील.

धन्यवाद आपल्या उत्कृष्ट अभिप्रायाबद्दल.
पेठकर काका,याचे पूर्ण श्रेय आपणासच आहे.

आपण व आपल्यासारखे डायबेटॉलॉजिस्ट डॉक्टरांचे(मधुमेह तज्ञांचे)मनापासून सहभाग व मार्गदर्शन मिळाले तर आम्हा मिपाकारांचा नक्कीच उध्दार होईल.

आम्हा डायबेटॉलॉजिस्टची पोटे कशी भरतील?

आपला हा प्रतिसाद मी आपला एकट्याचा नसून तो प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे, असे समजून चालतो.(Pl.do not take personally)

एक ऐकिवात असलेले वाक्य आहे : जो चोच देतो तो दाणेही देतो.(आपल्यापेक्षा त्या परमेश्वराला या सृष्टीची पुरेपूर काळजी आहे, त्या पुढे आपण कोण पामर?. आणि सर्वात महत्वाचे आपल्या जन्माचे आधी हि सर्व सोय तो करून ठेवतो मगच आपल्याला जन्म देतो. कितीही आभार मानले तरी आपण त्याचे पांग कधीच फेडू शकत नाही)

असो.

एकाच पेशंट कडून आपण किती दिवस फी घेऊ शकतो याला काही मर्यादा आहेत.पण त्या पेक्षा त्याच्या कुटूम्बातील लोकांना तो होऊ नये असे ठरवले तर नवीन ४ ते २० ग्राहक मिळू शकतात.व मधुमेहाचेही उच्चाटन होण्यास हातभार लागेलच कि नाही.जर आपली तयारी असेल तर जुन्या पेशंटबरोबर आपण ह्या नवीन ग्राहकांसाठी खूप काही करू शकता असे वाटते.

मी पामर कुठे चुकत असेल तर नक्कीच आपण माझा कान पकडू शकता.

डायबेटिस नष्ट होणे एक कविकल्पना आहे.

मान्य. पण ह्याच कविकल्पना(तात्कालिक प्राप्त परीस्थिती अनुसार "बिनडोक कल्पना") नवीन संशोधनाला जन्म देतात व राईटबंधू एक दिवस पक्ष्याप्रमाणे हवेत उडू लागतात.

मात्र १०० टक्के डायबेटिसच्या रुग्णांची पथ्य, आहार, व्यायाम आणि गरज पडल्यास(च) औषधे इंजेक्शने यावर रक्तशर्करा नियंत्रित राहू शकेल. आणि एंड ऑर्गन डॅमेज वाचविता येऊ शकेल

१००% सहमत! हेच तर हवे आहे.ज्ञान दिल्याने वाढते हेच खरे!
परत एकदा मनापासून धन्यवाद.

कळावे, लोभ असावा.
आपला लाडका: आयुर्हीत

मी ऐकले आहे की डायबेटीस होणे अतिभयंकर नाही जर रक्तातली शुगर आटोक्यात ठेवली असेल तर.
आणी असेही ऐकले आहे की शुगर हि फक्त टेन्शनमुळे वाढते.

माझ्या कुटुंबातील एक व्यक्ती नुकतीच निधन पावली जिला शेवटच्या दिवसात अतीप्रचंड टेन्शन होते व त्या व्यक्तीची शुगर ४०० झाली होती. त्यातच त्यांना हार्ट अ‍ॅटॅक आला. पण एवढ्या हाय शुगरमुळे सिव्हिअर हार्ट अ‍ॅटॅक आलेला त्यांना कळलाच नाही असे डॉक.नी सांगितले. नंतर इतर कुठल्यातरी त्रासासाठी आम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो तेव्हा डॉकनी त्यांना अ‍ॅटॅक आल्याचे सांगितले. :(

तसेच लठ्ठ व्यक्तींना मधुमेहाचा धोका बारीक माणसांपेक्षा कित्येक पट जास्त असतो असे वारंवार कानावर पडते. यात किती तथ्य आहे ह्यावरही प्रकाश टाकावा.

(अवांतरः मिपावर पाषाणभेद आहेत का? त्यांच्या इतरत्र असलेल्या स्वाक्षरीत "फाईट अगेन्स्ट डायबिटीस" वाचल्याचे आठवते).

आयुर्हित's picture

5 Jan 2014 - 10:54 pm | आयुर्हित

धन्यवाद पियु परीजी आपल्या सहभागाबद्दल.

माझ्या कुटुंबातील एक व्यक्ती नुकतीच निधन पावली

खूप दुःखद घटना आहे. त्यातून हे आपले नातेवाईक असल्याने आपल्यावरही दुःखाचे आभाळ कोसळले असणार.
आशा आहे, कि या घटनेतून आपण व सर्व नातेवाईक सावरले असतील.

जिला शेवटच्या दिवसात अतीप्रचंड टेन्शन होते व त्या व्यक्तीची शुगर ४०० झाली होती. त्यातच त्यांना हार्ट अ‍ॅटॅक आला.

मिपाकारांसाठी खूप काही शिकण्यासाठी आहे यातून. असे खूप वाईट घडू शकते,जर आपण स्वत:कडे दुर्लक्ष केले तर.

ह्या परीस्थितीत तज्ञही काही चमत्कार करू शकणार नाहीत, अनपेक्षितपणे जाताजाता रुग्ण मात्र मोट्ठे बिल करून जाणार! बिलापेक्षाही रुग्णाला व त्याच्या कुटुंबाला होणारा त्रास काही कमी नसणार.

पण एवढ्या हाय शुगरमुळे सिव्हिअर हार्ट अ‍ॅटॅक आलेला त्यांना कळलाच नाही असे डॉक.नी सांगितले. नंतर इतर कुठल्यातरी त्रासासाठी आम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो तेव्हा डॉकनी त्यांना अ‍ॅटॅक आल्याचे सांगितले

हो हेही खरे आहे कि प्रमाणाबाहेर साखर असेल तर हार्ट अँटँक येऊन गेला तरी कळत नाही.

काही बाबतीत काही लोकांना पायाला झालेली जखमही कळून येत नाही. नंतर त्याचे खतरनाक Gangrene मध्ये रुपांतर व्हायला वेळ लागत नाही.

शुगर हि फक्त टेन्शनमुळे वाढते

नक्कीच महत्त्वाचा घातक घटक आहे.
टेन्शन हा ही (इतर घटकांइतकाच)एक फार महत्त्वाचा घटक आहे, ज्याने आपल्या शरीरावर घातक परिणाम होत असतात. फक्त हा परिणाम इतका हळूहळू होतो की तो कळायला काही ५ ते ७ वर्षे जाऊ शकतात.

म्हणूनच ह्या आजाराला silent killer म्हटले जाते.

आणि रुग्णाला/त्याच्या नातेवाईकांना/आपल्याला वाटते कि सर्व अगदी अचानक घडले.कालपर्यंत अगदी सर्व काही ओके होते आणि आज हे अचानक काय झाले?

काही बाबतीत प्रिय व्यक्तीच्या निधनामुळे, काहींच्या अपघातामुळे/इतर आजारामुळे/त्यावरील औषधउपचारामुळेही, साखरेचे प्रमाण वाढू शकते. पण ते काही दिवसापुरतेच मर्यादित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण बऱ्याच बाबतीत हा एक महत्त्वाचा Trigger होऊ शकतो व तेथून महुमेहाचा त्रास सुरु व्हायची शक्यता नाकारता येत नाही.

लठ्ठ व्यक्तींना मधुमेहाचा धोका बारीक माणसांपेक्षा कित्येक पट जास्त असतो

हो हेही खरे आहे. हा ही (इतर घटकांइतकाच)एक फार महत्त्वाचा घटक आहे,ज्याने आपल्या शरीरावर घातक परिणाम होत असतात.

एकंदरीत हि एक दर्द्नाक कहाणी आहे,जर वेळीच आपण सावध झालो नाही तर! पण हीच Fact (सत्य परिस्थिती) सर्व मिपाकरांनी Seriously लक्षात घ्यावी हि विनंती. माझ्या कुटुंबाच्या बाबतीत असे १६ वेगवेगळे किस्से (end result)घडले आहेत, ज्या मुळे मी खुपदा व्यथित होत असतो.

माझीही शॅम्पेन's picture

5 Jan 2014 - 11:21 pm | माझीही शॅम्पेन

आयुर्हित साहेब तुम्ही सातत्याने आणि अनावश्यक प्रतिक्रिया देऊन चांगल्या धाग्याचा गुंता करी आहात , सहसा मिपाकर हे स्वयंभू असून त्यांना कुठल्याही प्रोत्साहंनाची गरज नाही म्हणून कृपया सध्या फक्त वाचन मात्र राहा ही नम्र विनंती !!!
प्रतिक्रिया न आवडल्यास कृपया दुर्लक्ष करा आणि प्रतिक्रिया नियमात न बसल्यास स.म. ने उडवून टाकावी !

आयुर्हित's picture

6 Jan 2014 - 12:21 am | आयुर्हित

मनापासून धन्यवाद, कारण सूचना मनापासून लिहिलेली वाटली.
प्रतिक्रिया आवडली, असू देत. शेवटी हे आपल्या सर्वांसाठीच आहे.

कळावे,लोभ असावा.
आपला लाडका: आयुर्हीत

आयुर्हित's picture

6 Jan 2014 - 11:06 am | आयुर्हित

Defective ‘MADD’ gene responsible for type 2 diabetes, discovers Indian origin scientist

धन्यवाद त्या श्री. बेल्लूर एस प्रभाकर सरांना, ज्यांचा हा शोध आहे.
Defective "MADD" gene

कळावे, लोभ असावा
आपला लाडका, आयुर्हीत

कपिलमुनी's picture

6 Jan 2014 - 11:42 am | कपिलमुनी

बाबा पाटील आणि खरे काका अजून या धाग्यापासून लांब राहिल्यचे पाहून आश्चर्य वाटले ..

http://www.diabetesmukti.com/

काल झी हॅलो डॉक्टर मध्ये ह्याची माहिती आली होती..
बहुतेक प्रायोजित कार्यक्रम असावा

प्रभाकर पेठकर's picture

7 Jan 2014 - 12:09 pm | प्रभाकर पेठकर

>>>>बाबा पाटील आणि खरे काका अजून या धाग्यापासून लांब राहिल्यचे पाहून आश्चर्य वाटले ..

ते दोघेही, कदाचित, मधूमेही नसल्याकारणाने त्यांना अजून चर्चेचे गांभिर्य जाणवले नसेल. आणि असेही, फुकटचे सल्ले कोणी मागू नयेत आणि डॉक्टरांनी ते देऊ नयेत.

कपिलमुनी's picture

7 Jan 2014 - 1:07 pm | कपिलमुनी

नेट कंन्सलटींग हा अतिशय धोकादायक प्रकार आहे.
ते बर्‍याच धाग्यावर माहिती देत असतात ..

पूर्व-काळजी आणि लक्षणांबद्दलची माहिती .. तसेच गांभिर्य ( सोनारांनी कान टोचले की बरा असता :) ) एवढेच अपेक्षित होते.. कदाचित कार्य बाहुल्यमुळे त्यांना जमले नसावे किंवा धाग्यावर प्रतिसाद (सल्ला) देणे यथोचित वाटले नसावे ..

मी सध्या डायबेटिक नसलो तरी त्या सीमेपार पोहोचीन ही दाट शक्यता आहेच.. :)

त्यामुळे धाग्याच्या उद्देशाबद्दल अभिनंदन.

बाकी भारतात नवे डायबेटिस मार्केट उगवते आहे असं काही वृत्तपत्रांच्या पूर्णप्रथमपृष्ठीय जाहिराती पाहून दिसतं.

सध्या मजबाबतीत ते रक्तशर्करा थेट डायबेटिक रेंजमधे नसली तरी जनरल रीडिंगमधे साखर नेहमीपेक्षा (तरुण असतानापेक्षा बरीच) वाढताना दिसली आहे.

प्रत्येक पदार्थाचा ग्लायसेमिक इन्डेक्स बघूनच ती खाणे उत्तम. म्युजली वगैरे खाल्ल्यास ऊर्जा मिळते पण साखर एकदम वाढत नाही. त्यामुळे ते फायद्याचं, पण साधारण असे चघळचोथायुक्त पदार्थ चवीलाही आकर्षक नसतात. त्यांची सुरुवातीला बळंच सवयच करुन घ्यायला पाहिजे हे खरं.

ग्लुकोमीटर घरी आणून गेल्या काही वर्षांत जे सेल्फ चेक केले त्यावरुन काढलेले निष्कर्षः

भात, नूडल्स, पांढरा पाव/ब्रेड, बटाटा, साबुदाणा, फलरस या पदार्थांच्या सेवनानंतर रक्तातली साखर तातडीने डायबेटिक रेंजला स्पर्ष करु लागते आणि अनेक तास ती वरच्या पातळीवरच राहते.

थालीपीठ, चिकन (स्किनलेस ग्रिल्ड चिकन ब्रेस्ट), फिश फ्राय / करी, सॅलड, म्युजली या पदार्थांनंतर साखर एकदम नॉर्मल रेंजमधे राहते आणि दोनचार तासात खाली उतरते.

भाकरी, पोळी यांनी भाताइतकी नाही तरी बर्‍यापैकी साखर वाढते.

माफक वारुणीसेवन काही कारणाने जाहले तर काही तासांनंतर साखर झपाट्याने खाली येते.

व्यायाम (चालणे) हे क्वचित घडले तर त्यानंतर साखर कमी होते, तात्पुरतीच अर्थात.

इत्यादि..

साती's picture

6 Jan 2014 - 3:47 pm | साती

किती टोचलंत स्वतःला?
;)
पण निष्कर्ष परफेक्ट आहेत.
दारू पिल्याने साखर वाढते (लगेच).
एक एम एल अल्कोहोल सात उष्मांक देतो. पण त्या रिकामटेकड्या कॅलर्यांचा बॉडिला उपयोग नसतो.

आयुर्हित's picture

18 Jan 2014 - 12:52 pm | आयुर्हित

हाती आलेल्या गुगल ब्लॉग नुसार Blood sugar level तपासण्यासाठी,येणाऱ्या काळात सुई टोचायची गरज नसणार.हे काम डोळ्यात घातलेला कॉन्टॅक्ट लेन्सच करेल.

आयुर्हित's picture

22 Jan 2014 - 8:28 am | आयुर्हित
प्रभाकर पेठकर's picture

6 Jan 2014 - 3:56 pm | प्रभाकर पेठकर

चांगली निरिक्षणे, गवि. उपयुक्त आहेत.

इडलीडोसे इ.इ. मुळे साखर किती वाढते? आंबवलेल्या पदार्थांमुळे जास्त वाढते की कमी?

आयुर्हित's picture

7 Jan 2014 - 7:51 pm | आयुर्हित

नक्कीच वाढते, कारण यात simple carbohydrates (साधारण प्रतीचे कर्बोदके) जास्त असतात.

अधिक माहिती साठी "मधुमेह खरोखर फार भयंकर अवस्था" हा प्रतिसाद
व नंतर glycemic index
मध्ये शोधावे.

आयुर्हित's picture

18 Jan 2014 - 2:07 pm | आयुर्हित

इडलीच्या आत काय खाद्यपदार्थ आहे या वरुन इडलीचा glycemic index हा कमी जास्त होऊ शकतो.
चकचकीत (polished)बासमती तांदळाचा GI: ६८ ते ७४
मसुरी तांदुळाचा GI: ५५ ते ६०
उकडा(सेल्ला/parboiled/steam)तांदुळाचा GI: ४८ ते ५५
गव्हाचा रवा चा GI:३५ ते ५५
(धन्यवाद रेवती ताई)

मधुमेह असणाऱ्यांनी शक्यतोवर रवा इडली खावी. जर तांदळाची इडली असेल तर कमीत कमी इडली बरोबर जास्तीत जास्त सांबार व चटणीवर ताव मारावा,म्हणजे रक्तातील साखर जास्त वाढणार नाही.

कळावे, लोभ असावा.
आपला लाडका: आयुर्हीत

बॅटमॅन's picture

27 Jan 2014 - 8:00 pm | बॅटमॅन

धन्यवाद आयुर्हित साहेब. सांबार-चटणीवर आम्ही ताव कायमच मारीत असतो, सबब टेण्षण नाही.

बापु देवकर's picture

6 Jan 2014 - 12:25 pm | बापु देवकर

रात्री मुनीर खान ह्यांच्या बद्दल बर्याच लोकांचे मत ऐकले. दवा चांगली आहे म्हणतात. कुणा मिपाकराला अजून काही माहिती आहे काय?

आजच "India न्यूज" TV channel वर सांगितल्याप्रमाणे मुनीरखानला अटक करण्यात आली आहे, जो बॉडी रिवाइवल ट्रीटमेंट उपचारासाठी एका बाटलीचे रुपये १६०००/- घेत असे, ज्याचे उत्पादनमूल्य १००/- आहे.

साभार TOI 'Miracle doc' Munir Khan held by Versova police

आनंद घारे's picture

6 Jan 2014 - 4:43 pm | आनंद घारे

पेठकरांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या मनाची समजूत मीसुद्धा यशस्वी रीतीने घातली आहे. त्यामुळे मला स्वतःला त्यापासून मानसिक त्रास होत नाही, कदाचित ते सुद्धा वयोमानावर अवलंबून असेल. पण ज्यांना त्या बंधनांचा खूप त्रास होतो अशी माणसे मी पाहिली आहेत, त्यांच्या बाबतीत कळते पण वळत नाही असे घडत असते. पाऊस आणि डबके हे उदाहरण चपखल आहे. पण पावसाची एकादीच मोठी सर आली तर ते पाणीसुद्धा जमीनीत जिरून जाते. त्याचप्रमाणे मेजवानीच्या जेवणात भात, पोळी वगैरे टाळून आयस्क्रीम किंवा एकादा गुलाबजामिन खाल्याने निदान माझ्या रक्तातली साखर काही वाढत नाही.

आयुर्हित's picture

6 Jan 2014 - 5:09 pm | आयुर्हित

धन्यवाद आनंद सर,

पण ज्यांना त्या बंधनांचा खूप त्रास होतो अशी माणसे मी पाहिली आहेत, त्यांच्या बाबतीत कळते पण वळत नाही असे घडत असते.

याला "काही शारिरीक कारणे" च जबाबदार असतात, असे मला वाटते.हीच तर खरी परीक्षा आहे मधुमेहतज्ञांची.

अशी काही लोक आपल्या माहितीत असतील, तर कृपया करून भेटवा मिपावर.
मला काही खऱ्या खुऱ्या success stories तयार करायचा आहेत.
कळावे, लोभ असावा.
आपला लाडका: आयुर्हीत

हा मधुमेह लई वाईट . माझ्या मामीला cancer झाला होता . तिचा operation करायचं होतं पण मधुमेहामुळे जखमा बर्या होणार नाहीत म्हणून केला नाही. आणि आजार वाढतच गेला. गेल्याच आठवड्यात गेली ती

चिरोटा's picture

7 Jan 2014 - 2:47 pm | चिरोटा

काही डॉक्टर मंडळी वजन कमी करण्याचे सल्ले देतात.वजन जास्त असले तर मधुमेह होण्याची शक्यता वाढते हे खरे आहे का?

हो हे १००% खरे आहे.
यावरील अधिक माहिती साठी "शुगर हि टेन्शनमुळेही वाढते" हा प्रतिसाद परत एकदा वाचवा.

कोणी अशी व्यक्ती आपल्या माहितीत असेल तर तिलाही हि माहिती पुरवावी, हि विनंती.

धन्यवाद
कळावे,लोभ असावा.
आपला लाडका: आयुर्हीत

चिरोटा's picture

7 Jan 2014 - 3:00 pm | चिरोटा

अनेक डॉक्टर्स/आहार तज्ञांकडून 'वाट्टेल ते खा, व्यायाम केला की प्रश्न मिटला.' अशा स्वरुपाचे सल्ले मिळतात मिडियामधून. कितपत तथ्य असते त्यात?

कपिलमुनी's picture

7 Jan 2014 - 5:20 pm | कपिलमुनी

मिडियामधून. कितपत तथ्य असते त्यात?

तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे .. मीडिया मधल्या बातम्या बघून सल्ला घेण्यापेक्षा १०० रु. खर्च केलेले बरे

आयुर्हित's picture

7 Jan 2014 - 8:41 pm | आयुर्हित

वाट्टेल ते खावे ते निरोगी माणसाने.
पण कोणत्याही मधुमेही /रुग्णासाठी पथ्य फार महत्त्वाचे असते.

(अपवाद: आपण हे वाक्य ऐकले असेल, तर ते त्या एकट्या व्यक्तीलाच लागू होऊ शकतात, ज्याची casestudy डॉक्टरांनी पूर्ण केली आहे, ज्याची इत्यंभूत माहिती त्यांना असली पाहिजे. पण ते न करताच जर वरील सल्ला देत असतील तर मात्र धन्य ते डॉक्टर! व धन्य तो रुग्ण!!!!)

यावरील अधिक माहितीसाठी "मधुमेह खरोखर फार भयंकर अवस्था" हा श्री. प्रभाकार पेठकर यांचा प्रतिसाद वाचावा.

कळावे, लोभ असावा.
आपला लाडका:आयुर्हीत

वर्तमानपत्रातील भविष्य इतकेच खात्रीचे असतात.

चौकटराजा's picture

7 Jan 2014 - 8:17 pm | चौकटराजा

आपल्या जीवन शैलीत तन आणि मन या दोनही पातळीवर बदल आवश्यक आहेत.
पुढच्या पिढीची काळजी फारशी करू नये. एकंदरीत आपण एकटेच येतो एकतेच जातो मग नातेसंबधात अतिरिक्त गुंतवणूक मग साहजिकच ताण ही साखळी मोडावी.
एका तंगडी वर दुसरी टाकून बसू नये.
व्यायाम टाळण्यासाठी मन सबबी शोधत असते त्याला गप्प बसवावे.
आपले वाहन आपल्या वास्तूतून रस्त्यावर हाताने ओढत न्यावे. वाहन लांब पार्क करून बँकेत वगैरे जावे. फायदे दोन
साखर वापरली जाते व डबल पार्किंग म्हणून गाडी उचलून नेली जात नाही.
घरातील धुणे वाळत घालणे , मशीनवर कपडे धुणे. घरातील केर काढणे , बागेतील काम ई कामे मधुमेहीने स्वतः वर लादून घ्यावीत. दोन मजल्यापर्यंत तरी लिफ्टचा वापर करू नये.

माझ्या विषयापुरते डायबेटीसचे अनुभव सांगते.
डायबेटीस आणि हिरड्यांच्या आजारांचा जवळून संबंध असतो. डायबेटीक असल्याने हिरड्यांना लवकर जंतू संसर्ग होण्याची शक्यता असते त्यामुळे हिरड्यातुन रक्त येणे,दुर्गंधी येणे,पू येणे,दात हलायला लागणे असे प्रकार उद्भवु शकतात. डायबेटीसमध्ये जंतूंशी लढण्याची प्रतिकारशक्ती कमी होते आणि प्रक्रुती मात्र संसर्ग धार्जिणी झालेली असू शकते. तसेच या इन्फेक्शनमुळे रक्तातील साखर वाढायला लागली असेही होउ शकते.त्यामुळेही डायबेटीसची गुंतागुंत वाढू शकते. आणि म्हणुनच मुख आरोग्य अतिशय काळजीपूर्वक सांभळले पाहिजे. ते कसे..
डेंटीस्टकडुन नियमीत तपासणी करुन घेणे.
दातांची साफसफाई दर सहा महिन्यानी डेंटीस्टकडुन करुन घेणे.
रोज कसे दात घासावे हे समजावून घेणे.(कसे हे फार महत्त्वाचे आहे.)
कवळी वापरत असल्यास ती अत्यंत स्वच्छ ठेवणे.
डायबेटीसमुळे तोंडाला कोरड पडू शकते. त्याने दात किडायचा धोका वाढतो. रक्तातील साखर नियंत्रित झाल्यावर कोरड कमी होते,न झाल्यास त्यावर उपाययोजना करुन घ्यावी.
किडलेले दात, लाल झालेल्या हिरड्या,हलणारे दात यांचा वेळीच बंदोबस्त करुन घ्यावा.
अती झाल्यावर डॉक्टरकडे जाऊ अशी व्रुत्ती टाळावी.
( मराठी टायपींग नीट होत नाही आहे,अशुद्धलेखन माफ करा)

डॉक्टर अजयाजी,
एक स्त्रीशक्ती (woman power)चे जाज्वल्य उदाहरण म्हणून आपले सर्वप्रथम स्वागत असो.वेळात वेळ काढून फार मोलाची माहिती दिलीत त्याबद्दलही धन्यवाद.

एक मोठ्ठी चूक लक्षात आणून दिलीत आपण. ह्या लेखात मधुमेहामुळे हिरड्यांना होणारे आजार मी तर विचारातच घेतले नव्हते(आता हे ११नंबर ला येतील),जंतूंशी लढण्याची प्रतिकारशक्ती कमी होणे(आता हे १२नंबर ला येतील).

फार फार महत्वाचा विषय हे हा.

इन्फेक्शनमुळे रक्तातील साखर वाढायला लागली असेही होउ शकते.त्यामुळेही डायबेटीसची गुंतागुंत वाढू शकते. आणि म्हणुनच मुख आरोग्य अतिशय काळजीपूर्वक सांभाळले पाहिजे.

त्यासाठी

डेंटीस्टकडुन नियमीत तपासणी करुन घेणे.
दातांची साफसफाई दर सहा महिन्यानी डेंटीस्टकडुन करुन घेणे.
रोज कसे दात घासावे हे समजावून घेणे.(कसे हे फार महत्त्वाचे आहे.)
कवळी वापरत असल्यास ती अत्यंत स्वच्छ ठेवणे.
डायबेटीसमुळे तोंडाला कोरड पडू शकते. त्याने दात किडायचा धोका वाढतो. रक्तातील साखर नियंत्रित झाल्यावर कोरड कमी होते,न झाल्यास त्यावर उपाययोजना करुन घ्यावी.
किडलेले दात, लाल झालेल्या हिरड्या,हलणारे दात यांचा वेळीच बंदोबस्त करुन घ्यावा.
अती झाल्यावर डॉक्टरकडे जाऊ अशी वृत्ती टाळावी.

इतके छान मार्गदर्शन आज फक्त मिपाकारानाच मिळतेय, ह्यापेक्षा अधिक ते सुख कोणते?
तर आज पासून कोण कोण करतंय तंबाखू,१२०/३००,जर्दा, किमाम, पानमसाला इ.इ. बंद........ !!!!
कळवा हो आम्हाला कसे वाटले ते.

कळावे, लोभ असावा.
आपला लाडका : आयुर्हीत

प्रभाकर पेठकर's picture

8 Jan 2014 - 2:05 am | प्रभाकर पेठकर

>>>>ह्या लेखात मधुमेहामुळे हिरड्यांना होणारे आजार मी तर विचारातच घेतले नव्हते(आता हे ११नंबर ला येतील),

ह्याहून गंभिर दुष्परीणाम म्हणजे लैंगिक इच्छाशक्तीचा र्‍हास होतो. आयुष्यातला शारीरीक प्रणय जवळ जवळ संपुष्टात येतो. (नंबर १ ला टाका).

आयुर्हित's picture

25 Jan 2014 - 10:59 am | आयुर्हित

Rachel Fiske, Certified Nutrition Consultant and Owner of Madrona Wellness in San Francisco
लैंगिक शक्तीचा ऱ्हासाबद्दल काय सांगतो ते पहा:

10 Surprising Foods that Kill Your Sex Life

सौजन्य : The New England Journal of Medicine, Bollywoodshaadis.com

अनुप ढेरे's picture

8 Jan 2014 - 1:49 pm | अनुप ढेरे

वरचा प्रतिसाद चांगला होता पण डायरेक

स्त्रीशक्ती (woman power)चे जाज्वल्य उदाहरण

??

अजया's picture

8 Jan 2014 - 10:16 pm | अजया

=))

सुबोध खरे's picture

7 Jan 2014 - 11:44 pm | सुबोध खरे

मधुमेह या रोगाबद्दल आपल्या मित्र मंडळीनी बरेच काही छान आणि माहितीपूर्ण लिहिले आहे. या विषयावर प्रचंड माहिती जालावर पुस्तकात आणि इतरत्र उपलब्ध आहेच त्यात मी आपले चार थेंब टाकण्यात फार काही हशील नाही. पण काही मुद्दे वैद्यकीय शाखेत नसलेल्या मित्रांसाठी लिहित आहे.
१) मधुमेहावर नियंत्रण ठेवणे एवढे कठीण का?(व्यायाम करणे किंवा वजन कमी करणे हे एवढे अवघड का याची पण उत्तरे यात आहेत) - आपण आपला चेहरा धुतला कि तो लगेच स्व्च्छ दिसतो. फेशियल केलें तर लगेच चमकू लागतो. हा ताबडतोब दिसणारा (मूर्त) प्रभाव आहे.(tangible effect) असा कोणताही ताबडतोबीचा प्रभाव मधुमेह नियंत्रणाने दिसत नाही. त्यामुळे आज खाउन घेऊ उद्यापासून पथ्य करू असे शंभरात नव्वद लोक करीत राहतात.
२)मोठ्या प्रमाणावर लोक असे आहेत ज्यांना मधुमेहाचा त्रास असा काही होत नसतो त्यामुळे आपल्याला मधुमेह आहे हे त्यांना उशिरा लक्षात येते आणि निदान झाल्यावरही त्यांच्या "लक्षात"रहात नाही.
३) कित्येक व्यक्ती रक्तातील साखर तपासणी च्या आदल्या दिवशी उपास करून जातात. यात त्यांना हे लक्षात येत नाही कि ते स्वतःला फसवत असतात कि आपल्या नातेवाईकांना कि आपल्या डॉक्टरना. यात डॉक्टरला फार काही फरक पडत नसतो कारण रक्तातील साखर कमी दिसली कि डॉक्टर औषधाचा डोस कमी करतात त्यामुळे रुग्णाची साखर मधल्या काळात वाढलेली राहते आणि त्याचा दूरगामी परिणाम रुग्णालाच भोगावा लागतो.
४)मुळात हा रोग इतका गंभीर आहे हेच लोकांना पटत नाही त्यामुळे ते जो भेटेल त्याला सल्ला विचारत राहतात किंवा आपल्या स्वतःच्या अनुभवांची देवाण घेवाण करीत राहतात. दुर्दैवाने लोक सुद्धा भेटेल त्याला स्वताचे अनुभव हे वैद्यकीय सल्ला म्हणून देत राहतात आणि त्यातून अर्धवट ज्ञान वाढीस लागलेले असते.
५) मधुमेहाचे रुग्ण आपले डॉक्टर आणि/ किंवा (पाथी- आयुर्वेद होमियो किंवा आधुनिक वैद्यकशास्त्र) प्रणाली बदलत राहतात त्यामुळे कोणत्याच पाथी चा उपाय पूर्णपणे होत नाही. शिवाय दरवेळी डॉक्टरला पैसे कशाला द्यायचे म्हणून लोक वेळच्या वेळी डॉक्टरचा सल्ला घेत नाहीत. बहुसंख्य डॉक्टरांकडे येणारे रुग्ण हे सहा ते आठ महिन्यांनी येतात. मधल्या काळात त्यांच्या मधुमेहाची पातळी काय आहे हे त्यांना सांगता येत नाही (किंवा सांगायचे नसते-दुसर्या डॉक्टर/पाथी कडे गेलेले असतात.
६) आपला ज्या पाथी वर विश्वास आहे त्या डॉक्टरला कमीत कमी एक वर्ष वेळ द्यावा म्हणजे त्यांचा गुण येतो आहे कि नाही हे आपल्याला स्पष्ट कळेल. दर दोन चार महिन्यांनी डॉक्टर बदलणे म्हणजे आपल्या मुलाला तीन महीने एका शाळेत तीन महिने दुसर्या आणि तीन महिने तिसर्या शाळेत घातल्यासारखे आहे. त्याचा अभ्यास होईल काय?डॉक्टर पासून काहीही लपवू नये असे म्हटले जाते. परंतु डॉक्टर आपल्याला ओरडतील या भीतीने सर्रास लोक लपवा छपवी करतात किंवा खोटे सांगतात. (याचे प्रमाण जवळ जवळ ९९-१०० % आहे.)
७) केवळ रक्तातील साखर तपासून आपला मधुमेह पूर्ण नियंत्रणात येत नाही त्यासाठी Hb १ C (glyacated hempoglobin) याची तपासणी आवश्यक आहे. हि तपासणी आपल्या रक्तातील साखरेची गेल्या दोन ते तीन महिन्यातील सरासरी पातळी दाखवते. http://en.wikipedia.org/wiki/Glycated_hemoglobin.
साती ताई या विषयातील तज्ञ आहेत त्यांनी यावर प्रकाश टाकला तर ते योग्य ठरेल. मी एक विकिरण विशेषज्ञ आहे मधुमेह तज्ञ नाही. चूक भूल द्यावी घ्यावी.
क्रमशः

आयुर्हित's picture

8 Jan 2014 - 1:17 am | आयुर्हित

धन्यवाद सुबोध सर,
फारच समर्पक रीत्या काही कुरितींचा उल्लेख केलाय आपण, ज्यात

मोठ्या प्रमाणावर लोक असे आहेत ज्यांना मधुमेहाचा त्रास असा काही होत नसतो त्यामुळे आपल्याला मधुमेह आहे हे त्यांना उशिरा लक्षात येते आणि निदान झाल्यावरही त्यांच्या "लक्षात"रहात नाही.

आणि

मुळात हा रोग इतका गंभीर आहे हेच लोकांना पटत नाही त्यामुळे ते जो भेटेल त्याला सल्ला विचारत राहतात व दुर्दैवाने लोक सुद्धा भेटेल त्याला स्वताचे अनुभव हे वैद्यकीय सल्ला म्हणून देत राहतात आणि त्यातून अर्धवट ज्ञान वाढीस लागलेले असते.

सुबोध सर,आपणा सर्वांना आपले डॉक्टर/path/प्रणाली न बदलण्यासही सांगतात:

आपला ज्या पाथी वर विश्वास आहे त्या डॉक्टरला कमीत कमी एक वर्ष वेळ द्यावा म्हणजे त्यांचा गुण येतो आहे कि नाही हे आपल्याला स्पष्ट कळेल.

एक जबरदस्त नवीन माहिती हाती आली आहे ती म्हणजे

केवळ रक्तातील साखर तपासून आपला मधुमेह पूर्ण नियंत्रणात येत नाही त्यासाठी Hb १ C (glyacated hempoglobin) याची तपासणी आवश्यक आहे. हि तपासणी आपल्या रक्तातील साखरेची गेल्या दोन ते तीन महिन्यातील सरासरी पातळी दाखवते.

From wikipedia_Glycated_hemoglobin
In general, the reference range(that found in healthy persons)is about 20–40 mmol/mol (4–5.9 DCCT %).

Higher levels of HbA1c are found in people with persistently elevated blood sugar, as in diabetes mellitus.

The International Diabetes Federation and American College of Endocrinology recommend HbA1c values below 48 mmol/mol (6.5 DCCT %)

A retrospective study of 47,970 diabetes patients found that patients with an A1C more than 48 mmol/mol (6.5 DCCT %) had an increased mortality rate

कळावे,लोभ असावा
आपला लाडका: आयुर्हीत

अस्वस्थामा's picture

8 Jan 2014 - 2:20 am | अस्वस्थामा

कोणीतरी आवरा हो या आयुर्हितचिंतक 'अखिल पाघळे'ना..!! चांगल्या प्रतिसादाच्य मागे पुढे हे शेपुट आहेच साऱखे..

नित्य नुतन's picture

8 Jan 2014 - 1:11 pm | नित्य नुतन

लाइव्ह कॉमेंट्री चा असाही आस्वाद घेता येतो ..
ते आजकालच्या मेडिया ला झालेय नं... तेच तेच पुन्हा पुन्हा ... वाक्याची तोडफोड करून सांगणे
मधुमेहापेक्षा भयानक
खी खी खी

आस्वाद घेता येतो ही चांगली बाब आहे.
आपल्याप्रमाणे सर्वांना(अगदी मधुमेही रुग्णांनाही)आयुष्यभर आस्वाद घेता यावी या साठीच आहे हा उपक्रम.
अधिक खोलात जाऊन विचार करायची वेळ आली आहे, म्हणून हे बारीक तपशील परत उद्धृत (highlight)करणे महत्त्वाचे वाटते मला.

गंभीरपणे(seriously) सांगतो, आत्तापासून फक्त एक आठवडा साखर/गोड/आवडीचे पदार्थ खाणे बंद करून पहा, म्हणजे समजेल आपल्याया! १५ जानेवारीला भेटूच परत.

कळावे, लोभ असावा.
आपला लाडका,आयुर्हीत

आनन्दिता's picture

8 Jan 2014 - 10:01 pm | आनन्दिता

ओक्के आयुर्हित काका आता तुम्ही डायरेक्ट १५ जानेवारीलाच या धाग्यावर परत प्रतिसाद द्या...

तुमच्या हेतुंबद्दल कोणाच्याही मनात येथे शंका नाही...
धागा खरोखर माहीतीपुर्ण व्हावा त्याचा सिरियसनेस रहावा यासाठीच सगळे तुम्हाला आवरायचा प्रयत्न करतायत..
. प्रत्येक प्रतिसादानंतर त्यातले मुद्दे हायलाईट करणारा उपप्र्तिसाद द्यायची खरच गरज नाहीये..
महत्वाचे मुद्दे स्वतः समजुन घेण्याईतका इथला प्रत्येक सदस्य सुजाण आहेच..
कुठलाही मुद्दा कोणाच्याही नजरेतुन मिस होणार नाही याची खात्री बाळगा...
वाट्ल्यास चर्चा संपत आल्यावर तुम्ही ' कन्क्लूजन ' चा एक मोठा प्रतिसाद द्या.. त्यात सगळे मुद्दे अधोरेखित करा.. रादर आपण सगळेच करु....
या धाग्यावर अतिशय उत्क्रुष्ट चर्चा घडवुन आणण्यास मिपाकर समर्थ आहेत.. तुम्ही निश्चिंत रहा.. जस्ट वेट अँड वॉच!!!

उद्देश उत्तमच आहे धाग्याचा. मधुमेहाविषयी प्रबोधन आणि चर्चा होणं जरुरी आहेच.

पण .. तरीही मला मधेच होमशॉप १८ पाहात / ऐकत असल्याचा फील का येतोय?

की हेही शुगर वाढल्याचं लक्षण ? ;)

साती's picture

8 Jan 2014 - 8:43 pm | साती

शुगर वाढल्याचं लक्षण आहे.
;)

टिवटिव's picture

8 Jan 2014 - 11:05 pm | टिवटिव

*lol* *lol* *lol*

माझीही शॅम्पेन's picture

8 Jan 2014 - 11:31 pm | माझीही शॅम्पेन

धाग्याचा बाजार उठणार हे आधीच्या प्रतिक्रियेत जाणल होत :)
आयला मधुमेह परवडला पण प्रतिक्रिया आवरा म्हणाव ,
आमच्या कडे म्हणतात गाढव मारताय ओझाने अं शिंगरू मरताय हेलपाट्यने !!!!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

9 Jan 2014 - 1:01 pm | विश्वनाथ मेहेंदळे

घोडी रे, घोडी !!!

प्यारे१'s picture

18 Jan 2014 - 1:48 pm | प्यारे१

आयुर्हित आपण स्वतः मधुमेहग्रस्त आहात का फक्त इतरांच्या मधुमेहाची काळजी जिकडेतिकडे घेता?

आयुर्हित's picture

19 Jan 2014 - 11:29 am | आयुर्हित

उत्तरासाठी परत एकदा डायबेटिस अर्थात मधुमेह: लक्षणे, कारणे व उपाय या प्रतिसादातील ताजा कलम वाचावे.

कृपया विषयांतर टाळावे व मुद्द्याचे प्रश्न ह्या लेखात विचारावे, ज्याने सर्वांना याचा फायदा होईल(असे प्रश्न व्यनि तूनच विचारावे)ही विनंती.

उद्दाम's picture

19 Jan 2014 - 11:36 am | उद्दाम

रक्त तपासणी साठी स्वस्तात मस्त शुगर स्ट्रिप मशीन कुठे उपलब्ध आहे का?

आयुर्हित's picture

19 Jan 2014 - 12:32 pm | आयुर्हित

शक्यतोवर जवळच्या मेडीकल शॉप मधून घेणे. सोबत medicated cotton व spirit ही घ्यावे.

मार्केट भाव माहिती साठी
Ebay वर Accu check १३९९/- व १०० स्ट्रिप्स २४०/(with free door delivery.)

उद्दाम's picture

19 Jan 2014 - 12:41 pm | उद्दाम

यांचा रेगुलर वापर करणारे लोक याची अ‍ॅक्युरसी किती यावर प्रकाश टाकू शकतील का?

आयुर्हित's picture

19 Jan 2014 - 3:10 pm | आयुर्हित

क्षमा करा, मला वापरावे लागत नाही त्यामुळे अधिक माहिती देता येणार नाही.
पण माझ्या मते अगदी ९५ ते ९९% accuracy असावी असा अंदाज आहे. यात calibration ची सोय नसावी.

जर आपल्यात कोणाला मधुमेह असेल तर येणारे/असलेले अनुभव शेअर करावेत व
आमच्या या धाग्याचा काही फायदा झाल्यास ते हि कळवावे हि विनंती.

आपला मिपास्नेही : आयुर्हीत

संदिप एस's picture

19 Jan 2014 - 11:39 pm | संदिप एस

<strong> हो वापरत आहे आई साठी ; रीलायबल आहे, डायबेटोलॉजीस्ट ने सा.न्गीतले आहे वाप्राय्ला आणी रीडी.न्ज त्या.ना चालतात आपण घेतलेले हे म्शीन वापरुन सोर्री फोर बॅड टायपी.न्ग

आयुर्हित's picture

20 Jan 2014 - 12:34 pm | आयुर्हित

Journal of Nutrition मध्ये आलेले नवीन संशोधन आपल्या सर्वांसाठी उपयोगी आहे. रेड वाईन प्या मधुमेह टाळा! (अर्थात हे ज्यांची साखर व वजन दोन्ही नियंत्रणात आहे त्यांनीच याचा फायदा घ्यावा)

कृपया लक्षात घ्या: यात चकण्याचा उल्लेख नाही, त्यामुळे फक्त रेड वाईन प्या! तेही प्रमाणात म्हणजे १ ते १.५ पेग, जेवण्याच्या अर्धा तास आधी!

ज्यांना रेड वाईन चालत नाही त्यासाठी काळ्या गाजराची कांजी थोड्या फार प्रमाणात नक्कीच मदत करेल. (धन्यवाद विवेकजी)

कळावे, लोभ असावा.
आपला लाडका: आयुर्हीत

प्रभाकर पेठकर's picture

20 Jan 2014 - 1:59 pm | प्रभाकर पेठकर

मला वाटतं रेड वाईन मध्ये सर्वात जास्त साखर आणि उष्मांक असतात. मधूमेहासाठी कसे चालेल?

>>>>चकण्याचा

'चकणा' नाही हो, 'चखना'. हा हिन्दी शब्द आहे. ह्याचा अर्थ, 'कांही तरी चाखून पाहण्याचा पदार्थ'. मद्याबरोबर कांहीतरी 'चाखतमाखत' खाण्यासाठी जे लागतं त्याला 'चखना' म्हणता. 'चकणा' हा डोळ्यांमध्ये समन्वय नसण्याचा शारीरीक दोष आहे.

आयुर्हित's picture

20 Jan 2014 - 2:35 pm | आयुर्हित

रेड वाईन GI zero आणि उष्मांक २५ कॅलरीज पर पेग(१औंस =२९.५ml)

'चखना' मान्य

धन्यवाद

प्रभाकर पेठकर's picture

21 Jan 2014 - 11:01 am | प्रभाकर पेठकर

आयुर्हित साहेब,

तुमच्या वरील प्रतिसादात 'रेड वाईन प्या मधुमेह टाळा!' असा सरसकट सल्ला आहे. त्यात किती प्या हे दिलेले नाही. म्हणजेच नुसत्या GI चा विचार मांडला आहे. GL चा नाही. तुम्ही देताय तो हिशोब व्हिस्कीच्या एका पेगाचा (३० ml) आहे. व्हिस्की आणि वाईन आणि बिअर ह्यांच्या संदर्भात पेगची व्याख्या बदलत जाते. . (1units=30ml whiskey =100 ml wine= 250 ml beer) कालच्याच पार्टीत माझ्या असं निदर्शनास आलं की सर्वसामान्य माणूस, एका बैठकीत, जवळजवळ पाऊण लिटर हाऊस वाईन पितो.
तुम्ही हिशोब मांडला आहे तो ड्राय वाईनचा वाटतो आहे. स्वीट वाईन मध्ये जास्त साखर असते. नुसते रेड वाईन प्या आणि मधुमेह टाळा हा सल्ला गोंधळात टाकणारा आहे.
रोज फक्त १ औंस (३० एम एल ) ड्राय वाईन प्या आणि मधुमेह टाळा असा सल्ला असू शकतो.
वाईन मध्ये LCBO नांवाचा साखर मोजणारा कोड असतो. ० ते ३० ह्या अंकात तो मोजला जातो. १-२ हा ड्राय वाईनचा, ३ ते ६ हा मध्यम ड्राय वाईनचा ७ ते ३० स्वीट वाईनचा असतो. नुसते वाईन म्हंटल्यास १ ते ३० ह्या रेंज मधील सर्व वाईन्स येतात. जास्त साखरेचे प्रमाण आणि एका बैठकीत अर्धी बाटली वाईन पिणार्‍यांच्या (जे नॉर्मल आहे) पोटात किती साखर आणि उष्मांक जात असेल?

आयुर्हित's picture

21 Jan 2014 - 9:33 pm | आयुर्हित

धन्यवाद पेठकर काका, अगदी महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे आपण.

कृपया माझा प्रतिसाद सर्वांनी परत एकदा "in detail" वाचणे ही विनंती.

पेठकर काकांचे मुद्दे व माझा प्रतिसाद यातील तफावत:

१)सरसकट सल्ला आहे.: साफ चुकताय आपण conditions परत एकदा वाचणे.

२)किती प्या हे दिलेले नाही.: साफ चुकताय आपण प्रमाण परत एकदा वाचणे.

3)नुसत्या GI चा विचार मांडला आहे, GL चा नाही.: zero आहे, त्यामुळे GL ही zero!

४)हिशोब एका पेगाचा आहे: अगदी बरोबर वाचले. याबाबतीत मी अधिकच काळजी घेतली आहे. एक पेग म्हणजे precisely १ औंस=२९.५ml (even तुम्ही म्हणता तेवढे ३०ml ही नाही). हे एक माप असते, जे bar मध्ये वापरले जाते. आपल्या जवळच्या bar मध्येहि जाऊन आपण चेक करू शकता.

५)सर्वसामान्य माणूस, एका बैठकीत, जवळजवळ पाऊण लिटर हाऊस वाईन पितो.: असेलही. किती प्यायची हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. आपण येथे फक्त मधुमेही रुग्णांचाच विचार करतोय, त्याने प्रमाणातच, दिलेल्या पद्धतीत, conditions पूर्ण होत असेल तरच प्यावी हेच खरे.,

६)जर आपण जेवणातही साखर कमी जावी असे म्हणतोय, तर वाईन मध्ये तरी कशाला हवी? त्यामुळे स्वीट हा शब्द वर्ज्य करू यात, अगदी वाईन मध्येही. In Short go for lesser GI only.

७)Wine Pairing with foods: याची अधिक माहिती घेतल्यास,स्वीट वाईन बद्दल काहीच शंका राहणार नाहीत.(कारण स्वीट वाईन फक्त स्वीट डिश बरोबरच घेतली जाते)

कृपया काहीही गोंधळ वाटला असेल तर मिपावर विचारून मगच पेग उचला!

कळावे, लोभ असावा.
आपला लाडका: आयुर्हीत

प्रभाकर पेठकर's picture

22 Jan 2014 - 2:07 am | प्रभाकर पेठकर

१ औंस=२९.५ml

ही व्हिस्कीची सर्व्हींग साईज आहे. वाईनची नाही. ३० ml म्हणजे दोन टेबलस्पून होते. तेवढी तरी का घ्यावी मग? घेऊच नये नं.
The standard portion size of dry red wine is 4 oz. (म्हणजे २९.५ X ४ = ११८ ml) and contains around 100 calories.
मधूमेही माणसाने नुसती साखरच नाही तर उष्मांकावरही लक्ष द्यावे लागते. तेल, तेलकट पदार्थही टाळावे लागतात. नुसता इन्सुलीनचा विचार न करता यकृतावर ताण देणार्‍या गोष्टीही टाळाव्या लागतात.

Although red table wine has a glycemic index of zero, it is important to remember that the sweet wines have more residual sugar, a higher carbohydrate content, more calories and a greater percentage of alcohol per ounce than the dry red table wines.

तुमचे सरसकट विधान असे आहे की 'रेड वाईन प्या आणि मधूमेह टाळा'. रेड वाईन मध्ये तीन प्रकार येतात ड्राय, सेमी ड्राय (किंवा सेमी स्वीट) आणि स्वीट रेड वाईन.
ह्यापैकी फक्त ड्राय रेड वाईनच चालू शकेल. सर्व रेड वाईन्स नाही.
आपण स्वीट वाईन्सचा विचार करायचा नाही हे तुम्ही फक्त ह्या प्रतिसादात म्हंटले आहे. मूळ प्रतिसादात ड्राय रेड वाईन आणि स्वीट रेड वाईन असा फरक न करता सरसकट रेड वाईन असा शब्दप्रयोग आहे.

तरीही तुमचा २९.५ ml रेड वाईनचा आग्रह असेल तर माझी हरकत नाही. व्यक्तिशः मी वाईनकडे पाहणारही नाही. मधूमेह नियंत्रणात ठेवायचे अनेक सोपे उपाय आहेत.

पेठकर काकांचा मुद्दा अगदी रास्तच आहे.मधुमेही रुग्णांनी खूप खूप विचार करूनच आपला आहार ठरवावा. यासाठी शक्य असेल तर आहारतज्ञांचेही मार्गदर्शन घेतले पाहिजे.

जे फक्त मधुमेह तज्ञ आहेत त्यांनीही आहाराबद्दल अधिक माहिती मधुमेही रुग्णांना द्यावी असे मला मनापासून वाटते. कारण “Let food be thy medicine and medicine be thy food” ― Hippocrates

वाइन न पिणाऱ्या मधुमेही रुग्णासाठी साखरेशिवाय चहा, चॉकलेट व बेरी वर्गातील फळे उपयोगी पडू शक्तील असे संशोधन हाती आले आहे. पण याचा वापर करतांना पेठकर काकांचा मुद्दा लक्षात ठेवावा. सर्वात महत्त्वाचे आपल्या डॉक्टरांना विचारूनच ह्याचा फायदा घ्यावा.

"मेरी बेरी के बेर मत तोडो" असे इतरांना सांगून फक्त मधुमेही रुग्णांनाच याचा फायदा घेऊ द्यावा म्हणजे स्वतः तोडून द्यावीत जेणे करून त्यांना काटाही लागणार नाही.

चू.भू.दे.घे.

धन्यवाद
कळावे, लोभ असावा
आपला लाडका :आयुर्हीत

नेहा_ग's picture

20 Jan 2014 - 1:59 pm | नेहा_ग

चांगला धागा

धन्यवाद

कपिलमुनी's picture

21 Jan 2014 - 11:53 pm | कपिलमुनी

ajoon ek taaka re Konitari

या धाग्यावर काही नवीन म्हणी/घोषवाक्ये सुचलीत.

जिलब्या टाळा!
मधुमेहाला आळा!

किंवा

आपलाच धागा नि आपलेच प्रतिसाद!

आयुर्हित's picture

24 Jan 2014 - 7:54 pm | आयुर्हित

BMC Medicineच नविन शोध निबन्ध.

Clinical Oral Investigations च्या निष्कर्षानुसार motivational health coaching केलेल्या मधुमेही रुग्णामधील loose teeth disease च्या त्रासांपासून ५०% फायदा झाला आहे व रक्तातील साखरेचे प्रमाणही कमी झाले आहे.

यांत मुख्यत्वे योग्य आहार, तणाव मुक्त जीवन व मुख आरोग्य यावर ३ ते ६ वेळेला माहिती देण्यात आली होती.

आयुर्हित's picture

31 Jan 2014 - 6:52 pm | आयुर्हित

आम्ही नेहमी मानत आलो आहे कि न्याहारी ही राजाप्रमाणे असावी, म्हणजेच नियमित पुरेसी व पौष्टीक असावी.

हाती आलेल्या Public Health Nutrition च्या नवीनतम(latest) अहवालानुसार जी व्यक्ती आपल्या युवावस्थेत नियमितपणे न्याहारी/ नाश्ता/ breakfast करत असते, ती तीच्या पुढील प्रौढ आयुष्यात चयापचयाची क्रिया(metabolism) उत्तम ठेऊन पोटावरील चरबी (ढेरी) वाढणे (gut fat), उच्च रक्तदाब आणि रक्तात जादा साखर असणे(IGT/मधुमेह) अशा व चयापचयात बिघाड होण्यामुळे (metabolic syndrom) झालेल्या इतरहि अनेक आजारापासून स्वत:ला कायमस्वरूपी मुक्त ठेवू शकते.

गेल्या २७ वर्षे चाललेल्या अध्ययनाअंती असे आढळून आले आहे की, नियमित न्याहारी घेणाऱ्या लोकांपेक्षा न्याहारी न घेणाऱ्या लोकांमध्ये चयापचयात बिघाड होण्याचा धोका ६८% ने जास्त आहे.

तर मग मित्रांनो, घ्याल ना नियमितपणे न्याहारी!

कळावे, लोभ असावा.
आपला लाडका: आयुर्हीत

टिवटिव's picture

5 Feb 2014 - 6:11 am | टिवटिव

हो॓ ़़़़़़़़़

तेल अविव विद्यापीठातील नवीन संशोधनानुसार जास्त उर्जादायी पौष्टिक न्याहारी व त्यामानाने कमीत कमी उर्जा असणारे रात्रीच जेवण घेवून रक्तातील साखरेचे प्रमाण २०%ने कमी करता येणे शक्य आहे.

A new Tel Aviv University study published in Diabetologia proposes a new way to suppress deadly glucose surges throughout the day - eating a high-caloric breakfast and a more modest dinner

Health tips for diabetics: Have high-energy breakfast

International Public Health Organization चा अहवाल.

मधुमेह, ह्र्दयरोग व कॅन्सर या सारखे इतरही आजार काबूत यावेत म्हणून अवास्तव वाढणाऱ्या वजनाला रोखण्यासाठी सरकारने फास्ट फूड, शीत पेये, रासायनिक खते व जंतुनाशके यावर योग्य ते कडक निर्बंध घातले पाहिजेत हे म्हणणे आहे जागतिक आरोग्य संघटनेचे (world health organisation)

सरकारे रोक सकती है मोटापा

आयुर्हित's picture

6 Feb 2014 - 12:06 pm | आयुर्हित

हाती आलेल्या U.S. Surgeon General’s Report नुसार धुम्रपानामुळे शरीराचे अतोनात नुकसान तर होतेच त्याच बरोबर मधुमेह(Type2)होण्याचा धोका ३० ते ४०% ने वाढतो.

माहितीचा अभाव हेच मोठे आव्हान आहे हे म्हणणे आहे पद्म श्री डॉक्टर व्ही मोहन यांचे.
'Lack of awareness biggest challenge in treating diabetes'

ही बातमी वाचूनच थक्क झालो!
कारण

"telediabetology van" हा एक उत्तम मार्ग शोधला आहे पद्म श्री डॉक्टर व्ही मोहन यांनी माहितीचा प्रचार करण्यासाठी.

The solution, according to him, is urgent implementation of four A's of diabetes care (availability, accessibility, affordability and acceptability) in the villages.

आयुर्हित's picture

3 Mar 2014 - 11:55 am | आयुर्हित

Nature Genetics च्या नवीन शोधानुसार,पेशीतील SLC30A8 जीन्स च्या Mutuation मुळे मधुमेहाचा धोका ६५% ने कमी होतो.

SLC30A8 जीन्सचा स्वादुपिंडाच्या इन्सुलिन तयार करणाऱ्या Beta Cells च्या कामात महत्वाचा सहभाग आहे.

ZnT8 प्रथिने इन्सुलिन तयार करणाऱ्या Beta Cells साठी झिंक Zinc वाहून नेतात, ज्यामुळे इन्सुलिनचे स्फटिक तयार होण्यास (the crystallization of insulin) मदत होते.

पुढील शोधनिबंध हाती येई पर्यंत आपण अधिक झिंक मिळवण्यासाठी समुद्री ऑईस्टर Oysters(शिंपले), व्हीट जर्म Wheat Germ, भोपळ्याच्या व जवसाच्या बिया, काजू, बदाम,पिस्ता,अक्रोड,शेंगदाणे,पाईननट, हेजलनट, राजमा, काळेचणे Black beans, छोले खाऊ या!

आयुर्हित's picture

3 Mar 2014 - 12:22 pm | आयुर्हित

नुकतेच मुधमेहाच्या रुग्णांना भविष्यात दिलासा मिळवून देईल, असे संशोधनही जगापुढे मांडण्यात आले आहे. मधुमेही रुग्ण इन्सुलीन हे संप्रेरक कमी प्रमाणात बनवतात; त्यामुळे त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. स्वादुपिंडातील बीटा पेशीसमूहांमध्ये तयार झालेल्या दोषामुळे हे घडत असते. या वाढलेल्या साखरेमुळे मूत्रपिंड, डोळे यांवर दूरगामी परिणाम होऊन व्यक्ती कोमातही जाऊ शकते.
मुधमेहींना इन्सुलीन किंवा अन्य औषधे घेऊन साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवावे लागते. मानवी शरीरातील इन्सुलीन बनवणार्‍या पेशींमध्ये रूपांतर करता आले आहे. या रूपांतरित मानवी पेशी उंदरांमध्ये चांगल्या प्रकारे इन्सुलीन बनवून रक्तातील साखरेचे प्रमाण राखताना दिसल्या.

साभार: लोकमत वरदान स्टेमसेल्सचे

आयुर्हित's picture

7 Mar 2014 - 1:53 pm | आयुर्हित

जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने साखर खाण्याबाबत बंधनावर नवीन मार्गदर्शक मसुदा तयार करतांना कमीत कमी साखर(ज्यात गोड पदार्थ, मध, फळांचा रस, सिरप्स, शीतपेये व इतर पदार्थात लपलेली साखर)खावी असा आरोग्यसल्ला दिला आहे, जेणेकरून लोकांमधील स्थूलता, दंतक्षय, मधुमेह कमी होण्यास व गंभीर आजार टाळण्यास मोलाची मदत होईल.

Pure, White and Deadly हे पुस्तक John Yudkin ह्या प्राध्यापक महाशयांनी १९७२ सालीच लिहिले होते, ज्यावर बऱ्याच भांडवलदारांनी बंधने घातली होती. परंतु त्यांनी मांडलेल्या साखरेवरच्या बंधनाचे विचार आज काळाची गरज ठरले आहेत.

दही जर तुम्हांला आवडत असेल तर ते अधिक प्रमाणात खा.. कारण दुग्धजन्य पदार्थ खाल्याने टाइप २ डायबेटीजचा धोका कमी होतो.

युनिव्हरसीटी ऑफ केंब्रीजच्या नीता फोरौही यांनी केलेल्या संशोधनात असे समोर आले की, दुग्धजन्य पदार्थ खाल्याने टाइप २ डायबेटीजचा धोका कमी होतो. दह्यामधील गुणधर्मांमुळे हा धोका २८ टक्क्यांपर्यंत कमी होतो.

या संशोधनासाठी ब्रिटनच्या २५००० पुरूष आणि महिलांचा समावेश करण्यात आला. या संशोधनात ७५३ जणांच्या एका आठवड्याच्या खाण्यामधील पदार्थांची तुलना करण्यात आली. या २५ हजार जणांना पुढील ११ वर्षात टाइप २ डायबेटीजची शक्यता आहे.

दही आणि पनीर सारख्या दुग्धजन्य पदार्थ खाणाऱ्यांमध्ये ११ वर्षात टाइप २ डायबेटीजचा धोका २४ टक्क्यांनी कमी होतो. दुग्धजन्य पदार्थांतून प्रोबायोटिक बॅक्टेरिया आणि आंबविण्याच्या प्रक्रियेमुळे त्यात एक व्हिटॅमिन तयार होते. ते खूप लाभदायक असते. सध्याच्या फास्ट फूडच्या जमान्यात दही खाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे दही खाल्याने मधुमेह म्हणजे डायबिटीजचा धोका कमी होऊ शकतो.

साभार:Live कोल्हापूर

आयुर्हित's picture

14 Mar 2014 - 12:16 am | आयुर्हित

भारतातील प्रत्येकी १० माणसांमागे एकाला मूत्रपिंड विकार होण्याची शक्यता आहे.
ह्या १० लोकांपैकी मधुमेह व त्यासोबत उच्च रक्तदाब असलेले ६ रुग्ण सापडतात.
कोणत्याही क्षणी किमान ५ लाख लोकांना मूत्रपिंड बदलायचे असते किंवा डायलिसीस वर अवलंबून राहावे लागते.
फक्त पुण्यात सांगायचे झाले तर किमान १०हजार रुग्णांना मूत्रपिंड विकार आहे.

मूत्रपिंड विकार टाळण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करा. भरपूर पाणी प्या. स्वतःहून कुठलीही औषधे घेणे टाळा. आहारातील मिठाचे प्रमाण कमी करा. फास्ट फूड टाळा. धूम्रपान आणि मद्यपान टाळा. रक्तदाब-मधुमेह असल्यास अधिक काळजी घ्या. ठराविक अंतराने लघवी-रक्त तपासा. डायबेटिस, बीपीच्या पेशंटने दर सहा महिन्यात रक्तातील चरबी (कोलोस्टरॉल), किडनीसाठी क्रेयाटिन, लघवी याच्या नियमित चाचण्या केल्यास किडनी विकार बळावणार नाही.

साभार:किडनीची काळजी घ्या
‘डायबेटिस’च्या १० हजार पेशंटला किडनीचे विकार

आयुर्हित's picture

15 Mar 2014 - 3:26 pm | आयुर्हित

गुर्दे की बीमारी गंभीर समस्या बनती जा रही है। देश की करीब आठ फीसद आबादी जहां इसकी चपेट में है वहीं पूर्वाचल में यह तादाद इससे कहीं ज्यादा है। गंभीर बात तो है बीमारी के लक्षण तब सामने आते हैं जब गुर्दे सत्तर से अस्सी फीसद क्षतिग्रस्त हो चुके होते हैं। तब तक इलाज बेहद कठिन होता है। ये कहना है गुर्दा रोग विशेषज्ञ डा. आनन्द बंका जीका. आगे पढिये:मधुमेह, बीपी, दर्द निवारक दवाएं गुर्दे के दुश्मन

बाळकराम's picture

18 Mar 2014 - 1:45 am | बाळकराम

तुमचा संदेश मिळाला- सवडीने याविषयावर नक्की लिहीन- इथे अनेकांनी उपयुक्त माहिती दिली आहे, त्यामुळे पुनरावृत्ती करत नाही पण डायबेटिस यूकेची ही वेबसाईट नक्की बघा, छान माहिती आहे सर्वसामान्यांना कळेलशी. तसेच डायबेटिसच्या रुग्णांसाठी हेल्दी इंडियन कुकिंग फॉर डायबेटिस हे एक रेसिपी बुक सुद्धा सुचवू शकतो. आणखी एक- डायबेटिस आणि तत्सम दीर्घकालिन आजारांबाबत आता इथे यूकेमध्ये तरी विशेषज्ञांवर, हॉस्पिटल्स वर जास्त अवलंबून न राहाता कम्युनिटी केअर, स्पेशालिस्ट डायबेटिक नर्सिंग, इ.द्वारे एक सर्वंकष आरोग्य (holistic care) वा एकात्मिक आरोग्य (integrated care) पद्धतीने एकप्रकारे de-medicalisation of medicine करणारी मॉडेल्स आता आम्ही विकसित करत आहोत आणि त्यात यशसुद्धा येत आहे. त्याबद्दल पुन्हा कधीतरी.

धन्यवाद, आपण मोलाची माहिती दिल्याबद्दल. लवकरच अजून इतर माहितीही येऊ द्यात.

आता आपण सर्वंकष आरोग्य वा एकात्मिक आरोग्य पद्धतीने एकप्रकारे de-medicalisation of medicine करणारी मॉडेल्स विकसित करत आहात, हे वाचून बरे वाटले.

पण आयुर्वेदात व हठयोगात या पद्धती सांगितल्या आहेतच की.
योगगुरू बाबा रामदेव यांचे Yoga for Diabetes (Madhumeh Ke Liye) हे या विषयावर खूप मोठे योगदान आहे.
आपले काय विचार आहेत या वर?

बाळकराम's picture

18 Mar 2014 - 2:51 am | बाळकराम

नियंत्रणासाठी मोलाचा उपयोग होऊ शकतो, नव्हे होतोच विशेषतः त्यातल्या पथ्यापथ्य संकल्पनेचा. त्यामुळे आयुर्वेदाचा अर्वाचीन उपचार पद्धतीला पूरक म्हणून मोलाचा उपयोग होउ शकतो याबद्दल माझ्या मनात तरी शंका नाही. रामदेव बाबांबद्दल माझे मात्र मत चांगले नाही- हा एक ढोंगी बाबा असून- अशा सातवी नापास माणसाने आरोग्यक्षेत्रात लुडबूड करावी हीच गोष्ट चीड आणणारी आहे. योग, ध्यान वा तत्सम भारतीय पद्धतींचे महत्त्व मी वेगळे सांगण्याची गरज नाही पण त्या आधारे रामदेव बाबा वा बालाजी तांब्यांसारख्या भामट्यांनी आपली दुकाने चालवून आपले खिसे भरु नयेत असे माझे स्पष्ट मत आहे.

Hippocrates, आचार्य चरक, महर्षी सुश्रुत हे तर सातवीच काय पण (मेकालेच्या पद्धतीच्या)शाळेतही गेलेले नाहीत.

याचा अर्थ मग तुमच्या मते आरोग्यक्षेत्रात लुडबूड फक्त जास्त शिकलेल्या लोकांनीच, तज्ञ डॉक्टरांनीच करावी!
असे आहे का?

बाळकराम's picture

18 Mar 2014 - 3:38 am | बाळकराम

सारख्याची तुलना तुम्ही महर्षि चरक, सुश्रुत, वाग्भट वा हिप्पोक्रेटस यांच्याशी केलेली बघून डोळे पाणावले! हेच ऐकायचं बाकी राहिलं होतं ;) असो तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा!

Journal Acta Neurologica Scandinavica मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या Kuopio Ischaemic Heart Disease Risk Factor Study (KIHD) अनुसार जी लोकं आठवड्यात दोन पेक्षा जास्त वेळा दारू(अल्कोहोल) पितात त्यांना स्ट्रोक चा धोका न पिणाऱ्या व्यक्तींपेक्षा निश्चित पणे जास्त असतो. हा अहवाल गेल्या २० वर्षात घेतलेल्या निरीक्षणांवर आधारित आहे.

मेंदूपेशीघात(स्ट्रोक) चा धोका वाढवणारे घटक: दारू (अल्कोहोल) पिणे, उच्च रक्तदाब, ह्रदयाला रक्तपुरवठा करणार्यास रक्तवाहिन्यांसंबंधी आजार, हृदयाघात, अलिंद विकंपन, मधुमेह, धुम्रपान, अतिरिक्त वजन, आभ्यंतर करोटीय धमनी (मेंदूला रक्तपुरवठा करणारी मुख्य रक्तवाहिनी) अरुंद होणे हा लक्षणे नसलेला आजार आणि वाढलेले कोलेस्ट्रोल

भुमध्यसागरीदेशांचे (ग्रीक) भोजन ताजी फळे आणि भाजीपाला,संपूर्ण(साबूत)धान्य, कडधान्ये, सुकामेवा,मासे आणि ऑलिवचे तेल वापरून बनवले जाते, जे खाऊन मधुमेहाचा धोका २१% ने कमी होऊ शकतो हा गेल्या साडे पाच वर्षाचा अभ्यास दर्शवितो.
Mediterranean diet linked to lower risk of diabetes
यात आश्चर्य म्हणजे चीज (चक्का)हा शब्द कोठे दिसला नाही.

आयुर्हित's picture

21 Apr 2014 - 9:37 pm | आयुर्हित

नमस्कार मिपाकर मित्रहो,
http://www.misalpav.com/node/27657:ब्रोकोली सॅलॅड (साभार:मस्त कलंदर)
ही पाकृ मधुमेह आटोक्यात आणायला खरोखर उपयोगी ठरेल, अशी १००% खात्री आहे.

त्याचबरोबर ज्यांच्या कुटुंबात आईवडिलांना/आजी आजोबांना किंवा नातेवाईकांना मधुमेहाचा त्रास आहे तया सर्वांनी
याचा खाण्यात जास्तीत जास्त वापर करावा ही नम्र विनंती.
धन्यवाद.

आयुर्हित's picture

23 Apr 2014 - 11:00 am | आयुर्हित

मधुमेहामुळे डोळे, हृदय, मूत्रपिंड व नसा इत्यादींना होणारे गुंतागुंतीचे व जटील आजार रोखण्यासाठी वर्षातून एकदा तरी आपण आपली संपूर्ण आरोग्य तपासणी करून घेणं आवश्यक आहे. नाही तर, या एका आजारापायी बऱ्याच डॉक्टरांना वारंवार जाऊन भेटण्याची वेळ येऊ शकते. तुम्हाला काय सोयीस्कर वाटतं? वर्षातून एकदा भेट की वारंवार भेट? निवड तुमची!

अशा या छुप्या आजाराला योग्य वेळी काबूत आणलं नाही, तर त्याचा विषारी विळखा सर्व महत्त्वाच्या अवयवांना बसल्याशिवाय राहणार नाही.

दर महिन्याला केलेल्या रक्त शर्करेचे निष्कर्ष नियंत्रणातील साखर दाखवत असले तरी इतर महत्त्वाच्या अवयवांना जटील आजार झालेले आढळतात. याचं कारण म्हणजे दोन तपासण्यांतील (साधारण १ महिना) जो अंतरिम कालावधी असतो, त्यामध्ये सतत वर-खाली होणारी (अस्थिर) रक्तशर्करा पातळी. अशा या निदान न झालेल्या व अस्थिर रक्तशर्करा पातळीमुळे वेगवेगळे, जटील व गुंतागुंतीचे आजार, शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना (हृदय, डोळे, मूत्रपिंड, नसा इ.) होण्याची शक्यता दाट होते.

केवळ आजार वाढण्याची वाट पाहून मग त्यावर उपचार करत बसण्यापेक्षा ते टाळण्यासाठी उपाययोजना करणं, खचितच शहाणपणाचं आहे. कारण मूत्रपिंड निकामी होणं किंवा मधुमेहामुळे आलेलं अंधत्त्व यासारखे काही आजार कितीही औषधोपचार केले, तरी पुन्हा पूर्वपदावर आणता येत नाहीत. तर, आजच आपली वार्षिक आरोग्य तपासणी करून घ्या आणि मधुमेहाला आटोक्यात ठेवा.

आयुर्हित's picture

4 Jun 2014 - 12:56 pm | आयुर्हित

“Why do we need inner peace? because, for one thing, a calm mind is important for our health. Constant fear, anger and stress can make us ill. All sentient beings want to live a happy life, but most, like animals and birds seek to do so only a sensory level. Their intelligence is limited and yet they respond to affection and kind words. We human beings have intelligence that allows us to project into the future and remember the past. We invented language and writing, but we also developed faith.”

His Holiness explained that in theistic terms there is faith in a creator god, but in non-theistic terms there is faith in causality. Both approaches have been of great benefit to humanity in the past and will continue to be so in the future.

Living, Loving, Laughing and Dying: the Buddhist Way - Mumbai

मधुमेहींसाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे आता ग्लुकोजची चाचणी रक्ताऐवजी लाळेच्या वापरातूनही करता येणे शक्य आहे, ही पद्धत विश्वासार्ह असून त्यामुळे सुई टोचून रक्त काढण्याची समस्या दूर होणार आहे.

ब्राऊन येथील वैज्ञानिकांनी एक जैविक चीप (पट्टिका) विकसित केली असून त्यात लाळेसारख्या गुंतागुंतीच्या द्रवातून ग्लुकोज तपासता येते. ही एक प्रगत पद्धत विकसित करण्यात आली असून रक्त न काढताही शरीरातील शर्करेचे मापन करता येणार आहे. ही छोटीशी चिप अवघ्या एक इंच चौरस आकाराची असून त्यात क्वार्टझला चांदीचा थर दिला असतो.

चांदीच्या पत्र्यात दोन मार्गिका कोरलेल्या असतात. त्यातील २०० नॅनोमीटर बाय १०० नॅनोमीटर आकाराच्या मार्गिका आहेत त्या मानवी केसाच्या १००० पट बारीक आहेत. ब्राऊन येथील डॉमनिको पॅसिफिकी यांनी सांगितले की, आम्ही लाळ तपासून अतिशय विश्वासार्ह पद्धतीने शर्करेचे प्रमाण सांगू शकतो. खरेतर रक्तापेक्षा लाळेत कमी शर्करा असते पण तरीही संवेदनशील मार्गाने शर्करा मोजता येते. लाळेत ९९ टक्के पाणी व १ टक्का मात्र वेगळा पदार्थ असतो त्यात विकर, क्षार व इतर घटक असतात त्यांच्या मदतीने रक्तातील साखर मोजता येते. ज्याचा माग काढता येईल असा ग्लुकोज दर्शक वैज्ञानिकांनी तयार केला व तो चिपवरील मार्गिकांमधून सोडला नंतर त्याची अभिक्रिया रक्तातील ग्लुकोजची दोन विकरांशी अभिक्रिया होते.

पहिले विकर हे ग्लुकोज ऑक्सिडेज असून त्याची ग्लुकोजशी अभिक्रिया होऊन हायड्रोजन पेरॉक्साईडचे रेणू तयार होतात व त्यातून हॉर्सरॅडीश पेरॉक्सिडेज तयार होते त्यातून रिसोरुफिन बनते ते लाल प्रकाश शोषून घेऊ शकते किंवा बाहेर सोडते त्यामुळे द्रावणाला रंग प्राप्त होतो. त्यानंतर लाल रंगाच्या द्रावणातील रिसोरुफिन रेणू तपासता येतात. या पथकाने रंग रसायनशास्त्र व प्लासमोनिक इंटरफेरोमेट्री यांच्या मदतीने कृत्रिम लाळेतील ग्लुकोजचे प्रमाण तपासले, ही कृत्रिम लाळ म्हणजे, पाणी, क्षार व विकर यांचे मिश्रण होते ते खऱ्या लाळेसारखेच होते. त्यांना त्यातील ग्लुकोजचे प्रमाण लिटरला ०.१ मायक्रोमोल इतके आढळले. ते इंटरफेरोमीटरने मापन केलेल्या प्रमाणापेक्षा १० पट अचूक होते. आता मानवी लाळेवर याचे प्रयोग केले जाणार असून ही पद्धत ग्लुकोज तपासण्यासाठी सोपी व सुटसुटीत ठरणार आहे

मधुमेहींना आता सुई टोचून रक्त देण्याची गरज नाही

बिएमजे जरनलमध्ये प्रकाशित झालेल्या ८ वर्षे सुरु असलेल्या रक्तशर्करा तपासणी अभ्यासात तिघा व्यक्तींत एक मधुमेहाच्या तावडीत किंवा उंबरठ्यावर आहे असे निदर्शनात आले आहे.

One in three adults have borderline diabetes, study finds

एस डी एम आणि सायक्लिक मेडीटेशन या विषयावर इथे लेखन झाले नाही पण बंगलोरच्या स्वामी विवेकानंद योगा युनिवर्सिटी ने योगाद्वारे मधुमेहावर पूर्ण नियंत्रण मिळविण्याची पद्धत विकसित केली आहे. गुगलून पहावे , खूप माहीती मिळेल.
गेल्या आठवड्यात पुण्यात एक शिबिर आयोजित केले होते आणि मी या शिबिराला जाउन आलो.
ही उपचार पद्धती मधुमेही लोकांना वरदान आहे असे मला वाटते.

आयुर्हित's picture

25 Jun 2014 - 8:45 pm | आयुर्हित

अगदी महत्त्वाची माहिती! धन्यवाद.
क्रुपया आपल्या सवडीनुसार एक कट्टा करु या कि!
आम्हाला आवडेल ही माहिती समजून घ्यायला.

स्मिता श्रीपाद's picture

26 Jun 2014 - 3:35 pm | स्मिता श्रीपाद

http://freedomfromdiabetes.org/

डॉ.प्रमोद त्रिपाठी....यांची कार्यशाळा...
माझ्या मैत्रिणीची डायबेटीस ची गोळी पुर्ण बंद झाली आहे...
तसेच तिच्या वडीलांना देखिल १८ वर्शांपासुन हा आजार होता त्यांची ही गोळी, ईन्शुलीन पुर्णपणे बन्द...

विटेकर's picture

30 Jun 2014 - 10:36 am | विटेकर

पण हे सन्केत स्थळ ओपेन होत नाही

भडकमकर मास्तर's picture

26 Jun 2014 - 4:24 pm | भडकमकर मास्तर

chitnis

धागा वाचून हा माणूस आठवला ... काय सांगता येईल?

भडकमकर मास्तर's picture

26 Jun 2014 - 4:29 pm | भडकमकर मास्तर

chitnis

सॉरी.. धागा वाचून हा माणूस आठवला ... काय सांगता येईल?

आयुर्हित's picture

26 Jun 2014 - 9:07 pm | आयुर्हित

"In about 80% of cases, we can prevent, or delay, type 2 diabetes," says Libby Bowling, clinical adviser at the charity Diabetes UK.

"So I think a key message to get across to people is that we've coined this phrase, 'pre-diabetes', because it's easy to understand, but it's unfortunate that it gives the impression it's then inevitable that we will go on to develop full-blown type 2.

"That's not the case. Actually, it's a bit of a wake-up call. You still have a lot in your power to prevent developing type 2 diabetes in full."

Type 2 diabetes recently hit the headlines again, with major new research – published in the British Medical Journal – revealing that some 14 million people in England alone now have pre-diabetes, three times higher than figures from 2006.

Learning to read the warning signs of diabetes danger

चौकटराजा's picture

17 Aug 2014 - 7:02 am | चौकटराजा

काय सांगता येईल बरोबर वरचेवर " निश्चितच" हा शब्द ही या डॉ चा आवडता शब्द आहे.

आयुर्हित's picture

2 Jul 2014 - 11:17 am | आयुर्हित

गुंडेगाव (ता. नगर) येथील राजाराम भापकर गुरूजी (वय ८४). सध्या जलसंधारणाच्या कामाने झपाटले आहेत. ब्रिटिशांच्या काळात नदी-नाल्यांच्या किनारी जांभळाची बने होती. त्यामुळे पाणी आणि माती धरून ठेवण्याचे काम होत असे, हा संदर्भ त्यांना सापडला. तेव्हापासून त्यांनी गावातील नदी-नाल्यांच्या काठी जांभळाची लागवड करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यासाठी ते दररोज सकाळी आपल्या मोपेडवर गुंडेगावहून नगरला येतात. त्यांच्या दुचाकीला एक प्लास्टीकचा क्रेट बांधलेले असते. मार्केट यार्डमध्ये जाऊन ते जांभळे खरेदी करतात. सध्या जांभूळ सुमारे १०० ते १२० रुपये किलो आहे. दररोज हजार रुपयांची जांभळे घेऊन ते शहरात येतात, बँका, दुकाने, लोकांची एकत्र बसण्याची ठिकाणे येथे जाऊन गप्पा मारत बसलेल्या लोकांना ते मोफत जांभळे देतात. त्यांनी सोबत कॅरी बॅगही ठेवल्या आहेत. जांभळे खाणाऱ्याला त्या देऊन त्यात बिया संकलित करतात. लोक जांभळे खात असताना गुरूजी त्यांना जलसंधरणाचे महत्त्व सांगतात. लोकांनाही ही कल्पना आवडते. या वयातही गुरूजी करीत असलेल्या धडपडीचे कौतुक करीत लोक जांभळांवर ताव मारतात. तर काही आणखी फुकटे भेटतात. मिळालेली जांभळे पार्सल बनवून घरी नेण्याचाही प्रयत्न करतात, असा अनुभवही गुरूजींनी सांगितला.

आता या बिया भापकर गुरूजी वनविभागाकडे देणार आहेत. उपवनसंरक्षक डी. टी. चव्हाण यांनी या बियांपासून रोपे करून देण्याचे आश्वासन गुरुजींना दिले आहे. रोपे तयार होण्यासाठी साधारणपणे वर्ष लागले. पुढील पावसाळ्यात ती गुंडेगाव येथील नदी नाल्यांच्या किनारी लावण्यात येणार आहेत.

'बिया दान करा'

यासंबंधी भापकर गुरूजी म्हणाले की, सध्या आपण पेन्शनच्या पैशातून हा उपक्रम राबवित आहोत. एक हजार रुपयांची जांभळे घेतल्यानंतर दोन ते तीन किलो बिया पडतात. मात्र आणखी बियांची आवश्यकता आहे. त्यामुळे नागरिकांनी जांभळे खाऊन बिया दान कराव्यात. अधिक माहितीसाठी ९४२०६४२९८१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

जांभूळ खा, जलसंधारण वाढवा!

एस's picture

2 Jul 2014 - 12:17 pm | एस

तुम्ही हे ह्या धाग्यावर का टाकलं कळलं नाही. स्वतंत्र धागा काढला असतात तर जास्त लोकांपर्यंत हा उपक्रम पोहोचला असता असे वाटते. भापकर गुरुजींना धन्यवाद व ऑल द बेस्ट.

साबुत कुळीथ horse gram (Ulavalu in Telugu, Kulthi in Hindi, Kollu in Tamil)शरिरात उष्णता निर्माण करण्याबरोबर इंसुलिन रेझिस्टंट कमी करण्यासाठी मदत करतो, असे आढळून आले आहे Indian Institute of Chemical Technology च्या शास्त्रज्ञांना.

ब्रावुन राईस किंवा हातसडीचा तांदुळ व साबुत कुळीथ मधुमेहींसाठी उपयुक्त आहे.

साभारः Raw horse gram good for diabetics
http://www.thehindu.com/sci-tech/health/diet-and-nutrition/raw-horse-gra...

प्रभाकर पेठकर's picture

16 Aug 2014 - 1:57 pm | प्रभाकर पेठकर

आख्खे कुळीथ की कुळीथाचे पिठलेही चालते? पिठले आवडते.

जोडणी (लिंक) मधीच छायाचित्रात कुळीथात 'झुरळ' पडले आहे का?

पिठल्यासाठी पीठ दळतांना आख्खे कुळीथच घ्यावेत. म्हणजे त्याचे आवरणही पीठात राहिल. कोंडा काढुन फेकू नये. आवरण महत्त्वाचे आहे.त्यातच मधुमेहाला रोखण्याचा गुणधर्म आहे.