काळ्या गाजराची कांजी

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in पाककृती
19 Jan 2014 - 3:17 pm

बरोबरच जुन्या दिल्लीत ठेल्यांवर मोठ्यामोठ्या मटक्यात कांजी विकणारे दिसायचे. आज काल कुठे-कुठेच कांजी विकणारे दिसतात. शिवाय मसाले टाकल्या मुळे या ठेल्यांवर मिळणाऱ्या कांजी मूळ स्वाद हरवलेली असते. त्या मुळे सौ. घरीच कांजी तैयार करते. सौ.चे माहेर दिल्लीतल्या शिवनगर (सिख आणि पंजाबी बहुल वस्तीतच आहे). कांजी लौह तत्वाने भरपूर स्वादिष्ट कांजी एक पाचक पेय आहे. कांजी मातीच्या, चीनी मातीच्या किंवा काचेच्या भांड्यातच बनविल्या जाते. बनविण्याची रीत अत्यंत सौपी आहे.

साहित्य : पावभर काळे गाजर, हिंग (१छोटा चमचा), काळे मीठ (१ चमचा), मोहरीची डाळ (१ १/२ चमचे) व पाणी ३ लिटर (स्वच्छ) बस एवढेच.

कृती: गाजर धुऊन, साल काढून, गाजराचे लहान लहान तुकडे करा. एका काचेच्या भांड्यात पाणी घालून त्यात गाजरांचेचे तुकडे टाका, हिंग,मोहरी आणि काळे मीठ टाकून भांडे झाकण लाऊन बंद करा. तीन ते चार दिवसात कांजी तैयार होईल. मुंबई सारख्या ठिकाणी २-३ दिवसातच. कांजी ७-८ दिवस व्यवस्थित राहते. जास्ती कडक वाटल्यास आणखीन पाणी घालता येते.
kanji

सर्व करण्याची विधी: गाजरांच्या तुकड्यांसहित कांजी एका ग्लासात टाका. स्वाद वाढविण्यासाठी लिंबू आणि चाट मसाला ही घालता येते. गाजराचे तुकडे खात कांजी पिण्याच्या आनंद काही औरच येतो.

प्रतिक्रिया

कैलासवासी सोन्याबापु's picture

19 Jan 2014 - 3:40 pm | कैलासवासी सोन्याबापु

क्या बात है!!!!!...... कनॉट प्लेस आठवले!!!

मुक्त विहारि's picture

19 Jan 2014 - 6:02 pm | मुक्त विहारि

एक वेगळाच प्रकार दिसतोय.

आता मुंबईत काळी गाजरे शोधणे आले.

दिपक.कुवेत's picture

19 Jan 2014 - 7:40 pm | दिपक.कुवेत

नुसती गाजरं नाहि तर काळि गाजरं.

दिसायला छान आहे पण कांजी प्यायची कधी वेळ आली नाहि.

दिपक.कुवेत's picture

19 Jan 2014 - 7:58 pm | दिपक.कुवेत

तुमचा प्रतिसाद नीट वाचला नाहि! गाजरं मीळाली नाहि तर सांगा येताना घेउन येतो. ईकडे काळि तर नाहि पण मागे एकदा गल्फ मार्ट मधे जांभळि गाजरं पाहिलेली. पण नुसता रंग आकर्षक होता......चवीला एकदम बेचव होती.

हे अजिबात नका आणू...

च्यामारी...

पिवळ्या भोपळी मिरच्या खावून एकदा पस्तावलोय....

वेगळेच पेय. पाकृ आवडली. काळी गाजरे कधी पाहिली नाहीत.

विवेकपटाईत's picture

19 Jan 2014 - 7:18 pm | विवेकपटाईत

हिवाळ्याच्या दिवसांत काळी गाजरे येतात. भाजीच्या मोठ्यादुकानात किंवा पंजाबी बहुल भागात सापडू शकतात.

कैलासवासी सोन्याबापु's picture

19 Jan 2014 - 7:29 pm | कैलासवासी सोन्याबापु

सर बीटरुट ची नाही बनु शकणार का कांजी ? म्हणजे कलर पण जबरदस्त येईल, प्लस, तुम्ही जे पाण्यात् मिक्स करायला सांगता आहात त्यापेक्षा जर प्लेन सोडा मधे मिक्स केले तर ? मस्त "मॉकटेल" म्हणुन पण सर्व करता येईल न पाचक पण सोडा इफेक्ट सहीत ?

पण कांजी ३-४ दिवस ठेवायची असल्याने तो पर्यत सोडयाचा ईफेक्ट बहुतेक राहणार नाहि......शेवटि ते पाण्यात मिसळल्यागतच होईल. एक करता येईल....वरिल पद्धतीने कांजी बनवुन देताना प्लेन सोडा टॉपअप करुन देता येईल. देताना ग्लासच्या रीमवर मीठ चोळुन व एक लिंबाची चकती लावुन ग्लास पेश केला कि कोणाला कळणारहि नाहि आत काय आहे ते!
बाकि कमी/अधीक माहिती विवेकजी सांगतीलच!

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Jan 2014 - 9:14 am | कैलासवासी सोन्याबापु

हो अहो मी पण टॉप अप ह्याच अर्थाने म्हणत होतो, २-३ दिवसात सोड्याचे फिझ पुर्ण निघुन जाईल हे मी पण ध्यानी घेतलेच होते :)

दिपक.कुवेत's picture

21 Jan 2014 - 10:58 am | दिपक.कुवेत

सॉरी बापु

चित्रगुप्त's picture

19 Jan 2014 - 7:57 pm | चित्रगुप्त

गेली पस्तीस वर्षे दिल्ली परिसरात राहूनही हा पदार्थ केला वा चाखलेला नाही (पंजाबी शेजारी आणून द्यायचे, तरी पिण्याची इच्छा झाली नव्हती). पण आता तुम्ही सांगितल्यावर करून बघावा म्हणतो. उकळवायचे नसते का कांजीला? याच्याबरोबर खायला काय घेऊ शकतो (मुगाचे वडे?) तसेच कांजी केंव्हा पिणे आरोग्याच्या दृष्टीने बरे ? (सकाळी-दुपारी-रात्री ?)

विवेकपटाईत's picture

20 Jan 2014 - 8:12 pm | विवेकपटाईत

थंडीचे दिवस असतात निश्चित संध्याकाळी पिणे योग्य नाही.
कांजी उकळत नाही
बरोबर मुगाचे वडे निश्चित चालतील. शिवाय कांजीत गाजराचे लहान-लहान तुकडे असतातच.
घरी कांजी करून पिणे जास्त चांगले

तीन दिवस पाण्यात ठेवून त्याला आंबूस वास नाही का येत ?

चित्रगुप्त's picture

21 Jan 2014 - 8:23 am | चित्रगुप्त

पंजाबी लोक सात-आठ दिवस (उन्हात) बरणी ठेवतात, आंबूस वास येतो, म्हणूनच आजपर्यंत पिण्याची इच्छा झाली नव्हती. याबद्दल नक्की काय करावे, हे धागकर्त्याने सांगावे.

सूड's picture

21 Jan 2014 - 2:35 pm | सूड

>>आंबूस वास येतो
असं असेल तर मग विचार करावा लागेल.

दिपक.कुवेत's picture

19 Jan 2014 - 8:01 pm | दिपक.कुवेत

चित्रगुप्त पण स्वःताच्या आरोग्याची काळजी घेतात हे बघुन डोळे प्वाणावलेत (साहेब ह. घ्या हं)

सानिकास्वप्निल's picture

19 Jan 2014 - 10:58 pm | सानिकास्वप्निल

गाजराच्या कांजीबद्द्ल ऐकले होते आज बघीतले ही :)
छान आहे कृती.

त्रिवेणी's picture

20 Jan 2014 - 10:28 am | त्रिवेणी

नवीनच पाकृ
माझा पण प्रश्न- बीटची कांजी करता येईल का?
मोहरीच्या डाळीची पेस्ट केली तर चालेल का?
पाकृ कमी वेळात होणारी असल्याने करून बघेन.

मदनबाण's picture

20 Jan 2014 - 11:07 am | मदनबाण

अरेच्च्या... हा प्रकार पहिल्यांदाच पाहिला आणि वाचला ! काळी गाजरे कधीच पाहिली नाहीत.
गाजराचे नुसते तुकडेच टाकायचे की गाजर किसुन घ्यायचे ?

विवेकपटाईत's picture

20 Jan 2014 - 8:14 pm | विवेकपटाईत

गाजराचे तुकडे करून टाकायचे असतात. किसून गाजर टाकलेले अद्याप बघितले नाही आहे. तशी कल्पना चांगली आहे.

अनन्न्या's picture

20 Jan 2014 - 11:59 am | अनन्न्या

म्हणजे आम्ही वापरलेली गाजरे तीच आहेत का ते कळेल. आपल्याकडे नेहमी मिळणारी गाजरे वापरून चालतील का?

आयुर्हित's picture

20 Jan 2014 - 12:01 pm | आयुर्हित

जबरदस्त कलरफुल ड्रिंक!
सोपी पण धम्माल पाकृ!
विटामिन अ ने भरपूर असलेली हि कांजी चष्म्याचा नंबर वाढू न देण्यासाठी/कमी करण्यात खूप उपयोगी पडेल.
स्मोकिंग न सोडू शकल्याने होणाऱ्या त्रासांनाही काही प्रमाणात कमी करू शकेल, असी हि उपयुक्त कांजी आहे.
धन्यवाद विवेकजी!

आपला मिपास्नेही: आयुर्हीत

Mrunalini's picture

20 Jan 2014 - 1:26 pm | Mrunalini

मस्त पाकॄ. वाशीला एक रेस्टॉरंट आहे,आता नाव आठवत नाहिये. मी तिथे एकदा ट्राय केले होते. मस्त लागते चवीला. त्यांनी सांगितले होते कि हे थंडिमधे आरोग्यासाठी खुप चांगले असते.

भाते's picture

20 Jan 2014 - 2:52 pm | भाते

प्रकार नक्कीच भारी दिसतो आहे. करायला सोपा आणि चवीला छान.

मुंबईत हि काळी गाजरे कुठे मिळतील?

पैसा's picture

20 Jan 2014 - 2:55 pm | पैसा

मस्त दिसतंय आणि चवीला पण छान असणार!

Atul Thakur's picture

20 Jan 2014 - 10:00 pm | Atul Thakur

मस्त पटाईतसाहेब :)

निवेदिता-ताई's picture

21 Jan 2014 - 8:33 am | निवेदिता-ताई

नविन प्रकार.

अनिरुद्ध प's picture

21 Jan 2014 - 11:33 am | अनिरुद्ध प

आणि सोपी पाक्रु,पण काळी गाजरे मात्र पहाण्यात नाही आली.

स्वाती दिनेश's picture

21 Jan 2014 - 3:01 pm | स्वाती दिनेश

छान दिसते आहे कांजी,
स्वाती

आनंदी गोपाळ's picture

9 Feb 2014 - 12:23 pm | आनंदी गोपाळ

अल्कोहोल आपोआप तयार होत असणार त्यात.