नेहमीप्रमाणे सकाळी ५.३० लाच जाग आली. खरं तर रविवारचा दिवस तरी उशिरा जाग यावी की नाही? पण शरिराला फक्त २४ तासाचंच घड्याळ कळतं. वार नाही कळत. उन्हाळा नुकताच सुरू झाला होता तरी अजून मस्त थंड वाटत होतं. पहाटे पहाटे रजई लपेटून मस्तपै़की गुरफटून अंथरूणात लोळणं या सारखं सुख नाही. सारं जग आपल्या भोवती हळू हळू उलगडत असतं आणि आपण माज करत मस्त झोपून रहायचं. सुख सुख म्हणतात ते हे. आणि आज एकदम शांतही वाटत होतं. मनातल्या सगळ्या भावना / विचार एकदम थांबल्या सारख्या झाल्या होत्या. म्हणजे एरवी कधी शांत वाटत नाही असं नाही पण आज मला जरा जास्तच जाणवत होतं. गेल्या ८-१० दिवसांपासून मी खूप अस्वस्थ होतो. सारखं कोणीतरी आपल्याला बघतंय असं वाटायचं. आजूबाजूला नजर टाकली तर जो तो आपापल्या नादात धावपळ करत आयुष्याच्या गाड्याबरोबर लळत लोंबत ओढला जातोय. कोण कशाला माझ्या कडे बघतंय? कधी कधी तर आजूबाजूला चिटपाखरू पण नसायचं. पण भावना तीच व्हायची.
सगळा माझ्या एकटेपणाचा परिणाम. दुसरं काय? आज इतकी वर्षं झाली, एकटाच राहतोय. सातवीत असताना आई गेली, राहिलो फक्त वडिल आणि मी. आई गेल्यानंतर तर खूपच जास्त माया करायला लागले माझ्यावर. पण नाही म्हणलं तरी आई अशी अचानक गेल्याचं दु:ख खूप खोलवर गेलं होतं, आम्हा दोघांच्याही मनात. त्या मुळे असेल पण खूपच जवळ आलो आम्ही एकमेकांच्या. बारावीत असताना, साधं तापाचं निमित्त झालं ते वाढत वाढत न्युमोनियावर गेलं आणि गेलेच ते पण. डॉक्टर म्हणाले पण नंतर, त्यांची जगायची इच्छाच संपली होती. राहिलो मी एकटा. नाही म्हणायला एक मावशी आहे. बाकी जवळचं असं कोणीच नाही. मावशी आग्रहाने घेऊन गेली तिच्या कडे. पण तिच्या चाळितल्या दीड खोलीत कसं जमायचं? मग मीच तिला समजावलं आणि आलो परत घरी. तेव्हापासून मी हा असा एकटा. शिकायची खूप आवड होती. शिक्षण झालं आणि लगेच नोकरी पण मिळाली, मग या गावात आलो आणि आता ५-६ वर्षांपासून इथेच आहे. लग्न का नाही केलं याचं खरं कारण लग्न झालं नाही हेच. आणि आता असंच बरं वाटतंय. एकटा जीव सदाशिव. मस्तीत जगतो. कोणाचं काही घेत नाही, घेतलं तर ठेवत नाही. पण गेल्या काही दिवसांपासून माझं सगळं तंत्रच बिघडलंय. मगाशी म्हणलं तसं सारखं कोणीतरी बघतंय असं सतत वाटायला लागलं. आधी नीट लक्षातच येईना, पण मग सवयच झाली चक्क. मी मनाशीच समजूत घालून घेतली, सगळा आपल्या एकटेपणाचा परिणाम. माणसाचं मन फार गंमतीशीर आहे. थोडं दमात घेतलं की कशालाही सरावतं बिचारं.
तर सांगत काय होतो, त्या दिवशी मात्र मी अगदी खूप शांत होतो. खूप मोठ्ठं वादळ येऊन गेल्यावर कसं सगळं एकदम शांत वाटतं तसंच वाटत होतं. मस्तपैकी आठ वाजेपर्यंत असाच लोळलो अंथरूणात. पेपरवाला पोर्या अंगणात पेपर टाकून, सायकलची घंटी वाजवून गेला मग मात्र मला राहवेना. सकाळी सकाळी मस्तपैकी वाफाळता चहाचा कप हातात घेऊन ताजं वर्तमानपत्र वाचणं हा माझा दुसरा वीकपॉईंट. चहाचा आणि त्या वर्तमानपत्राचा वास असा काही इफेक्ट करतो की पूर्ण दिवस उत्साह वाटतो. उठलो. चहा वगैरे बनवला आणि सोफ्यावर मस्त तंगड्या पसरून पेपर वाचत बसलो.
"डिंग डाँग"...... डोअरबेल वाजली.
च्यायला, रविवारी सकाळी ८.३० वाजता माझ्या कडे कोण तडमडलं बुवा? आश्चर्यमिश्रित राग गिळत मी दुर्लक्ष करावं का असा विचार करत होतोच तेवढ्यात डोअरबेल परत वाजली आणि या वेळी मात्र जरा लांबच वाजली. मी सणकून उठलोच. त्याच तिरीमिरीत जाऊन दार उघडलं, साले हे सेल्समन आता रविवारी सकाळी पण यायला लागले? दार उघडलं आणि चक्रावलो. एक काळा सावळा पण तजेलदार चेहरा दोन टप्पोर्या डोळ्यातून माझ्या कडे बघत होता. एक सेकंद मी गडबडलोच. माझा एवढा अपेक्षाभंग झाला होता की काय करावं बोलावं ते सुचेचना.
तेवढ्यात तो चेहरा हलला, जिवणी रूंदावली आणि हलकेच कुठून तरी लांबून यावे तसे शब्द आले, "काका, माझं नाव सुमित्रा". मी एकदम भानावर आलो. नीट बघितलं तिच्याकडे. एक ८ - १०वर्षांची चुणचुणित मुलगी माझ्यापुढ्यात उभी होती. साधे कपडे, केस नीट चापून चोपून बसवलेले. हातात शाळेची वाटावी अशी एक बॅग.
"काका, मी आत येऊ?"
मी भारावल्यासारखा बाजूला झालो आणि ती सरळ आत येऊन सोफ्यावर बसली. माझ्या एकदम लक्षात आलं की तिला जरा दम लागल्यासारखा झालाय. धाप लागली होती हलकी.
"कोण गं तू?" माझा पहिला प्रश्न तिला.
"काका, सांगते पण आधी पटकन मला पाणी देता का?" आणि ती परत लांब श्वास घ्यायला लागली.
माझी एकदम पंचाईतच झाली. ही कोण कुठली आणि सरळ आत येऊन बसते काय आणि पाणी मागते काय. पण तिला काहितरी त्रास होतोय हे स्पष्टच दिसत होतं. मी पटकन आत जाऊन पाणी आणलं. तिला दिलं. पाचेक मिनिटं ती तशीच डोळे मिटून शांत बसली. ती लहान जरी असली तरी एक प्रकारचं आकर्षण होतं तिच्यामधे. काय होतं ते कळत नव्हतं पण काहि तरी होतं खास. मी पण गप्प बसून ती नॉर्मलला यायची वाट बघत बसलो. थोड्यावेळाने तिने डोळे उघडले आणि परत ते मगाच्चं गोड हसू हसली.
"काका माझं नाव सुमित्रा. मी इथे जवळच ट्युशनला चालले होते. मला कधी कधी दम्याचा त्रास होतो. अचानक जड वाटायला लागलं. तेवढ्यात तुमचं घर दिसलं म्हणून तशीच आले अंगणात आणि दार वाजवलं. माफ करा हं..." परत ते गोड हसू.
"अगं माफ करा काय? तू बरोबरच केलंस. आणि त्रास कसला मला त्यात. बरं आता कसं वाटतंय? डॉक्टरला बोलावू का? इथेच जवळ आहेत एक डॉक्टर."
"नको काका, आता खूपच बरं वाटतंय."
"बस जरा आराम कर." थोडा वेळ बसू तर दे बिचारीला, मग बघू काय करायचं ते. बसल्या बसल्या ती गप्पा मारायला लागली.
"आम्ही की नै, नविनच आहोत इथे. पाचवीत आहे मी. इथे जवळच शिकवणीला जाते मी. आठच दिवस झाले. मी बघते रोज तुम्हाला. यावेळी तुम्ही ऑफिसला जायला निघता ना. मला माहित आहे." तिची गाडी भरधाव सुटली होती.
मला पण मजा वाटायला लागली. इतक्या बडबडीची सवयच नहिये मला पण छानच वाटतंय की.
"काय गं, तू राहतेस कुठे?"
"हे असं इथून सरळ पुढे गेलं की देशमुखांचा वाडा लागतो की नाही त्याच्या पुढे बघा एक मोठ्ठं आंब्याचं झाड आहे आणि त्याच्या बाजूला एक विहिर आहे ना तिथे."
"विहिरीत?", मला पण तिची चेष्टा करायची हुक्की आली.
"काय हो काका, विहिरीत नै कै. पण जवळच." ती एकदम जीभ चावून म्हणाली. मस्त गोड होती पोरगी. तिची बडबड चालली होती मी पण तिच्याशी गप्पा मारत होतो. थोड्यावेळाने तिचा चेहरा बराच चांगला वाटायला लागला.
"काका मी जाते आता. पण मला थोडं थकल्यासारखं वाटतंय. मी आता सरळ घरीच जाते. मी तुम्हाला अजून थोडा त्रास देऊ का?"
"अगं त्रास कसला, बोल की."
"तुम्ही मला सोडायला माझ्या घरापर्यंत याल? प्लीऽऽऽज"
आता नाही कसं म्हणणार. तसा थकवा दिसतच होता तिच्या चेहर्यावर. मी पटकन शर्ट पँट घातली आणि आम्ही निघालो. तिची बडबड चालूच.
"काका, तुम्ही कित्ती चांगले आहात हो. मला बाई कोणी मित्र मैत्रिणीच नाही अजून इथे. इतका कंटाळा येतो. आणि मला दमा आहे ना मग सगळ्यांच्या बरोबर खेळताच येत नाही. सारखं आपलं घरातच." मला पण वाईट वाटलं. एकटेपणा सवय नसताना कसा खायला उठतो हे माझ्यापेक्षा कोणाला चांगलं माहित असणार?
तिचे डोळे एकदम लकाकले. "काका, तुम्ही याल माझ्याशी खेळायला?" तिचा उत्साह बघून मलाच वाटलं, नाही कसं म्हणायचं.
मी म्हणलं, "येईन ना गं."
"बघा हां, प्रॉमिस?"
"यस, प्रॉमिस!!!" तिचा चेहरा अजूनच खुलला. बोलता बोलता वाट संपली कधी ते कळलंच नाही. तो वाडा मागे गेला आणि त्याच्या पुढेच अगदी १०० पावलांवर ते खुणेचं झाड होतं. आंब्याच्या झाडाला मोहोर अगदी मस्त आला होता.
"काका, मला कैर्या काढून देता?" ती नुसती उत्साहाने उसळत होती.
"अगं आत्ताशी कुठे मोहोर धरलाय. अजून कैर्या यायला वेळ आहे."
"ज्जा बाई, नका देऊ. नक्काच देऊ. पण सरळ नाही म्हणा ना. उगाच काहितरी कारणं सांगू नका." नाकाचा शेंडा तेवढ्यात लाल झाला होता बाईसाहेबांच्या. मला पण जरा लागलंच ते. मी नुसतं झाडावर चढून नाटक करायचं ठरवलं. तिचं मन राखायला. चढलो तसाच झाडावर. तशी मला काय सवय असणार झाडावर चढायची. धडपडत कसा तरी चढलो. एक फांदी आधाराला घट्ट धरून ठेवली. दुसर्या फांदीवर तोल सांभाळत उभा राहिलो. थोडवेळ उगाच इकडे तिकडे शोधायचं नाटक केलं. सुमित्राबाई खालून उगाच "ते बघा ते बघा, तिकडे दिसतीय वाटतं" करत होत्या. मी पण गुंगलो. माझ्या हालचालींमुळे झाडावरच्या मोहोराची बारीच फुलं खाली पडत होती.
अचानक मला जाणवलं, खालून आवाज यायचा बंद झालाय. "अरे, गेली कुठं" मनाशीच विचार करत मी खाली बघितलं. तिथे कोणीच नव्हतं. आता हिला काय लपाछपी खेळायचा मूड आला की काय? काय काय करावं लागेल अजून कोण जाणे. पण मी सगळीकडे नजर फिरवली तर जवळपास कुठे आडोसा पण नव्हता. गेली कुठं. मला अस्वस्थता आली. काही कळेचना. इकडे तिकडे बघता बघता बाजूच्या विहिरीकडे नजर गेली. पाणी तसं बेताचंच होतं. काळं मिट्टं पाणी हलकेच डुचमळत होतं. मी सहज म्हणून थोडी मान लांबवून बघायला गेलो. जे काही मला दिसलं, मी क्षणभर सुन्न झालो,
त्या विहिरीच्या पाण्यावर आंब्याची फुलं पडली होती आणि त्यांचा एक आकार तयार झाला होता, पाण्यावर अक्षरं उमटली होती,
"या!!! तुमचं स्वागत आहे"
एक थंडगार शिरशिरी माझ्या अंगात चमकली. एक क्षणात सगळा उलगडा झाला. म्हणजे, ती सुमित्रा... ती... सुमित्रा नव्हतीच, छे ती सुमित्राच होती, पण मग ती... बाप रे... देवा हे काय रे... त्या धक्क्याने माझं अंग शहारलं, माझा आधाराचा हात सुटला, तोल गेला आणि मी खाली विहिरीच्या दिशेने जातोय एवढीच जाणीव झाली. मी जोरात ओरडलो.
.
.
.
.
.
.
एकदम माझे डोळे उघडले आणि मी भानावर आलो. घामाने अंग डबडबलेलं होतं आणि मी माझ्या बेडवर उठून बसलो होतो. बाप रे, म्हणजे हे स्वप्न होतं? शक्यच नाही. इतकं खर्यासारखं? बराच वेळ तसाच बसून राहिलो. भानावर आलो. घड्याळात अजून ४.३०च झाले होते. परत एकदा मी थरारलो. आई नेहमी म्हणायची "पहाटेची स्वप्नं नेहमी खरी होतात." तिला पण तिच्या मृत्यू आधी असंच पहाटे स्वप्नं पडलं होतं असं बाबा नेहमी म्हणायचे. मी बराच वेळ विचार करत शांत बसलो.
.
.
.
.
.
.
साडे आठ वाजत आले आहेत. मी सगळं आवरून शांत पणे बसलो आहे. सत्य अटळ आहे. मी पण मनाची पूर्ण तयारी केली आहे. आत्तापर्यंत जे जगलो तोच भास होता का? आणि आता कुठे खर्या जीवनाला सामोरं जातो आहे का? छे: सगळा कालवा झालाय, त्या पेक्षा शांत बसावं. वाट बघत.
"डिंग डाँग"...... डोअरबेल वाजली.
मी शांतपणे उठलो. दार उघडलं. तोच गोड चेहरा माझ्याकडे बघून हसत होता.
"आलीस? चल आलोच मी. जरा दोन मिनिटं थांब हं... निरोप घेऊ दे मला."
तर मंडळी, निघतो मी. भेटूच परत कधीतरी. अहो, आश्चर्य कसलं वाटतंय तुम्हाला. मला पूर्ण कल्पना आहे मी कुठे चाललो आहे. आणि तरी मी तुम्हाला भेटू परत म्हणतोय? अहो, सुमित्रा एकटी कंटाळली म्हणून मला घेऊन चाललिये बिचारी. पण आम्ही दोघंच्या दोघंच किती दिवस खेळणार एकमेकांशी? कंटाळू ना आम्ही एकमेकांना. मग आम्हाला नविन नविन मित्र मैत्रिणी नकोत का? म्हणून म्हणलं... भेटू परत. नक्की बरं का... येतो आता.
प्रतिक्रिया
17 Nov 2008 - 12:42 am | अभिज्ञ
बिपीनदा,
काय चाललय हे?
आधि खोबार,मग पाकृ अन डायरेक्ट भयकथा???????
अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग.
लै भारि लिवलय.
अभिनंदन
अभिज्ञ.
17 Nov 2008 - 12:46 am | बिपिन कार्यकर्ते
अरे भाऊ, आज सकाळी खरंच अशाच प्रकारचं स्वप्न पडलं रे मला. कथाबीज त्यातूनच आलं, बाकी मालमसाला टाकला... जागेपणी. :)
बिपिन कार्यकर्ते
21 Nov 2008 - 9:24 am | विजुभाऊ
बिपीनली कार्यकर्तेली
तुम्ही पण आता "ली" कुटुम्बीय झालात की
मस्त कथा आहे
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
17 Nov 2008 - 2:16 pm | मन्जिरि
धडधडायला लागल काय तुम्हि घाबरवता खोबर राहिल बाजुला
17 Nov 2008 - 12:43 am | टारझन
बिप्पीनभौ .. कथा सचमुच आवड्या .. लै लै आवड्या .. आता तिला तुमचीच सोबत .. तुम्ही पण पाराजवळच्या हिरीतच रावा !!! मज्जा मज्जा
- (मुंजा)
टारझन
17 Nov 2008 - 2:04 am | नंदन
भयकथेतली वातावरणनिर्मिती आणि शेवटची कलाटणी आवडली. अभिज्ञ म्हणतो तसे बिपिनभौ फॉर्मात आलेत आता :)
[अवांतर - गोरेगावकर उत्तम भयकथालेखक असतातच. त्यामुळे बिपिनभाऊंची ही कथा जबरदस्त असणार याची खात्री होतीच ;).]
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
17 Nov 2008 - 2:16 am | बिपिन कार्यकर्ते
;)
बिपिन कार्यकर्ते
17 Nov 2008 - 3:15 pm | छोटा डॉन
>> भयकथेतली वातावरणनिर्मिती आणि शेवटची कलाटणी आवडली. अभिज्ञ म्हणतो तसे बिपिनभौ फॉर्मात आलेत आता
असेच म्हणतो ...
मस्त जमली आहे भट्टी कथेची.
येऊ द्यात अजुन, पुलेशु ...
(घाबरट ) छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
18 Nov 2008 - 1:37 am | प्रियाली
असं आता मलाही म्हणावसं वाटू लागलं आहे. चांगली जमली आहे. शेवट आवडला.
बिपीन,
कधी गोरेगावात अनायसे आपण असलो तर माझ्या घराची बेल वाजवायला येऊ नकोस बॉ! विहिर जवळ नाही करायची इतक्यात. ;)
25 Mar 2009 - 7:32 pm | संदीप चित्रे
विहिरीच्या पाण्यावरची अक्षरे आणि शेवटची कलाटणी आवडली... म्हणजे शेवटी सकाळी ती खरंच येणार हे वाटलंच होतं पण दोघांना खेळून कंटाळा येईल ती कलाटणी आवडली.
17 Nov 2008 - 2:48 am | प्राजु
होनी अनहोनी या माझ्या लहानपणी, दूरदर्शनवर लागणार्या मालिकेची आठवण झाली.
मस्त जमली आहे कथा.
सध्या बिपिनदा, ऑफिसमध्ये काम कमी आहे का रे? ;) नाही म्हणजे लेखणी एकदम जोरदार चालू आहे म्हणून म्हंटलं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
17 Nov 2008 - 3:23 am | शुभान्गी
बिपिनभाउजी,
कथा छानच जमली आहे..... आवडली......
17 Nov 2008 - 5:28 am | लवंगी
मस्तच लिहिलय..
17 Nov 2008 - 5:46 am | श्रीकृष्ण सामंत
बिपीन,
तुझी कथा वाचून संपे पर्यंत पुढे काय होणार आहे ह्याची तीव्र उत्कंठा लावित राहीली.
गोष्ट खूप आवडली.
गंमत म्हणजे मी पण आजच एकटेपणावर एक लेखन केले आहे. 'शब्दांच्या पलिकडले"
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
17 Nov 2008 - 6:01 am | कपिल काळे
बिपिनभॉ
मस्तच. मीच पडतोय की काय विहिरित अस वाटत होतं. अजून तीन आठवडे मी ही येकलाच आहे. आज संध्याकाळी ही कथा वाचतानाच खरोखर माझी पण डोअरबेल वाजली. आणि शपथ सांगतो.. फाटली माझी . आय होल मधून काहीच दिसेना.. च्या आयला काय भानगड आहे? म्हणून चेन टाकून दार उघडलं तर समोर एक जक्ख काळी ( ब्लॅक )म्हातारी . तिच्या सफेद- काळ्या केसांचं भुरकुल आय होल च्या समोर येत होतं त्यामुळेच काही दिसेना.
आधीच कथा वाचत असताना अर्धवट उठून गेलेलो. त्यात ती जक्खड म्हातारी. एकदम मस्त इफेक्ट आला होता. त्यात ती थोडी भ्रमिष्ट होती. घरचा रस्ता विसरुन आली होती.
पाच मिन्ट मला काहीच सुचेना. फे- फे उडाली. नंतर आजोबा आले शोधत. घेउन गेले.
http://kalekapil.blogspot.com/
17 Nov 2008 - 2:28 pm | मन्जिरि
तुम्हि पण राव ह्सुन हसुन मुरकु॑डि वळलि
17 Nov 2008 - 6:14 am | रेवती
भयकथा फारच जमलीये.
स्वप्नं होतं हे कळल्यावर मी चक्रावले कारण तिथे कथा संपत नव्हती.
असा शेवट अपेक्षित नव्हता. आता त्या सगळ्यात वाचकाला का आमंत्रण देताय खेळायला?
दुसरोंके साथ बातां: हॅलोवीन होऊन गेल्याचं भाऊसाहेबांना सांगा कुणीतरी.;)
रेवती
17 Nov 2008 - 10:13 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
रेवतीताईशी सहमत:
दुसरोंके साथ बातां: हॅलोवीन होऊन गेल्याचं भाऊसाहेबांना सांगा कुणीतरी
रेवतीताई के साथ बातां: घाबरवायला मुहूर्ताची गरज नसते! ;-)
17 Nov 2008 - 10:21 am | कुंदन
च्यामारी तरीच म्हटल विकांताला एव्हढ प्रेमाने का बोलवतोयस ....
ए भौ , काय जमणार नै बर का मला यायला.
17 Nov 2008 - 6:40 am | घाटावरचे भट
बिपीनभौ, उत्तम कथा. तुम्ही पण भयालीदेवींना सामील झालात. आता लोकांना घाबरवायचं काम वाटून घ्या. :)
17 Nov 2008 - 8:31 am | रामदास
भयकथा म्हणू नये एव्हढी सुरेख कथा जमली आहे.मतकरी बाबानी डोक्यावर हात ठेवलेला दिसतो आहे.
शॉर्ट लेंग्थ, बाउंसींग डिलीव्हरी. जर फ्रंट फूटवर खेळायला गेलो तर विकेट पडणार नक्की.डक करून भिती वाटू दिली . आता , पुढची डिलीव्हरी...
17 Nov 2008 - 8:50 am | सहज
बिपीनदा आता तुम्ही सिद्धहस्त लेखक बनत चालले आहात!!!
मस्त म्हणजे सहीच!
17 Nov 2008 - 9:24 am | प्रमोद देव
बिपीनदा आता तुम्ही सिद्धहस्त लेखक बनत चालले आहात!!!
सहमत!
17 Nov 2008 - 9:58 am | वल्लरी
<बिपीनदा आता तुम्ही सिद्धहस्त लेखक बनत चालले आहात!!!>
नेहमी प्रमाणे एका खासी शे॑लीतलं लेखन,,,,
आता पुढे काय्??...असे होत होते कथा वाचताना...सुंदर...
17 Nov 2008 - 9:01 am | अनिल हटेला
बिपीन दा!!!
क्या बात है !!
ह्याला म्हणतात अष्टपैलू लिखाण .....अभिनंदन.........
=D> =D>
(पडक्या विहीरीतला)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
14 Mar 2009 - 12:10 pm | शक्तिमान
आप्पुन को आवड्याच!
17 Nov 2008 - 9:15 am | मदनबाण
मस्त भयकथा..:)
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
17 Nov 2008 - 9:44 am | आनंदयात्री
चामारी पहिल्यांदा टरकवले .. मग स्वप्न म्हणाले .. मग साला स्वप्न खरे केले !!
दणदणीत जमलिये कथा !! अजुन एक दोन भयकथा टाकल्या की तुमचे नाव .. बिपिनली .. किंवा बिपिन भयकर्ते !!
-
आपलाच
(विहरीतला)
आंद्या --
(वय वर्षे ११)
17 Nov 2008 - 10:15 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
आपलाच
हा आंद्या "आपलाच" कधीपासून झालाय? ;-)
(विहरीतला)
भयकथा लेखकांना किती पाण्यात आहात याऐवजी किती विहीरीत आहात विचारायला हरकत नाही! :-D
(विहीरीबाहेरची) अदिती
17 Nov 2008 - 11:49 am | आनंदयात्री
अहो आपलाच आहे. (निवडणुका जवळ आल्या आता)
>>भयकथा लेखकांना किती पाण्यात आहात याऐवजी किती विहीरीत आहात विचारायला हरकत नाही!
यांना तर म्हणुन झाले .. हिंमत असेल तर भोकाडीला म्हणुन दाखव .. बघ कशी आड दाखवते मग तुला !!
17 Nov 2008 - 12:00 pm | बिपिन कार्यकर्ते
आंद्या आमचाच आहे. शंका नसावी. पण तुम्ही 'विहिरी'बाहेरच्या आहात हे काही पटलं नाही. ;) मी बघितलंय तुम्हाला शेजारच्या विहिरीत बरेच वेळा... ;)
बिपिन कार्यकर्ते
17 Nov 2008 - 12:02 pm | आनंदयात्री
ही ही ही :)
अदिती लहानपणी सावळी होती वाटतं .. मग विंग्लंडात जाउन भुरकी झाली !!
17 Nov 2008 - 12:06 pm | बिपिन कार्यकर्ते
का भुरटी? ;)
बिपिन कार्यकर्ते
17 Nov 2008 - 2:06 pm | विसोबा खेचर
बिपिन, यात्री, आदिती,
प्रत्येकच ठिकाणी अवांतर गप्पा मारून मिपावरील मोकळ्या वातावरणाचा गैरफायदा घेऊ नका अशी पुन्हा एकदा हात जोडून कळकळीची विनंती...
अवांतर प्रतिसादांमुळे मूळ धागा काही वेळेला दुर्लक्षिला जातो. तसं होता कामा नये एवढीच या विनंतीमागे कळकळ..असो.
बिपिनदादा, झक्कास कथा..
सिद्धहस्त लेखणीच्या बाबतीत सहजरावाशी सहमत.. :)
तात्या.
17 Nov 2008 - 2:09 pm | आनंदयात्री
>>प्रत्येकच ठिकाणी अवांतर गप्पा मारून मिपावरील मोकळ्या वातावरणाचा गैरफायदा घेऊ नका अशी पुन्हा एकदा हात जोडून कळकळीची विनंती...
गैरफायदा हा शब्द टोचला .. असो.
17 Nov 2008 - 2:16 pm | विसोबा खेचर
गैरफायदा हा शब्द टोचला .. असो.
हा आंद्या "आपलाच" कधीपासून झालाय?
अहो आपलाच आहे. (निवडणुका जवळ आल्या आता)
आंद्या आमचाच आहे. शंका नसावी. पण तुम्ही 'विहिरी'बाहेरच्या आहात हे काही पटलं नाही. मी बघितलंय तुम्हाला शेजारच्या विहिरीत बरेच वेळा...
ही ही ही
अदिती लहानपणी सावळी होती वाटतं .. मग विंग्लंडात जाउन भुरकी झाली !!
का भुरटी?
खरडफळा दिलेला असताना या अवांतर गप्पा टोचल्या नाहीत तरी खटकल्या निश्चितच! असो..
आपला,
(पुराव्याने शाबित) तात्या.
आपलीच माणसं म्हणून काही एक प्रेमाने सांगायला गेलो. या पुढे नाही सांगणार.. मिपा तुमचंच आहे, काय हवं ते करा...
आपला,
(खिन्न!) तात्या.
17 Nov 2008 - 2:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
या वेळेलातरी मी फक्त अवांतरच प्रतिसाद दिला नव्हता. जो काही विनोदाचा प्रयत्न होता तो धाग्याला धरुनच होता.
बाकी कोणाला कधी काय अवांतर वाटेल ते सांगता येत नाही.
17 Nov 2008 - 4:35 pm | घाटावरचे भट
बिपीनभौंची कथा म्हणजे उत्तम करमणूक आहे. आता इथे काय त्यातल्या साहित्यीक मूल्यांवर चर्चा वगैरे अपेक्षित आहे की काय? असं झालंच तर ती चर्चा बिपीनभौच आधी थांबवतील. काय हो बिपीनभौ, आपन बोल्तो ती बात सच्ची की नै?
-(टवाळ) भटोबा
17 Nov 2008 - 4:40 pm | बिपिन कार्यकर्ते
सोला आने सच्ची.. ;)
बिपिन कार्यकर्ते
17 Nov 2008 - 2:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
.
17 Nov 2008 - 5:30 pm | टारझन
(.)
17 Nov 2008 - 9:46 am | ऋषिकेश
घाबरलो ना भौ!! :)
भयालीतैंनी शिकवणी घेललेली दिसतेय :)
-(भयंकर) ऋषिकेश
17 Nov 2008 - 10:04 am | यशोधरा
लागलात का बिपिनदा तुम्हीही घाबरवायला आता??
मस्तच जमली आहे कथा!
17 Nov 2008 - 10:20 am | विनायक प्रभू
टेस्ट क्रिकेट नंतर वन डे
आता टी २०
17 Nov 2008 - 11:28 am | राघव
झकास.. मस्त जमलिये कथा! :)
त्या चुणचुणीत सुमित्रेचं वर्णन अगदी लय भारी... कदाचित त्यामुळेच इफेक्ट आणखी जोरकस झाला असावा!!
शुभेच्छा,
मुमुक्षु
17 Nov 2008 - 11:47 am | वेताळ
पहिल्याद्या वाटले आता घरी सोडायला गेल्यावर तुम्हाला सुमित्रेची ताई भेटणार आणि तुमचा एकटेपणा जाणार. पण तुम्ही असा काही यु टर्न दिला की डोक चक्रावुन गेले.खुपच सुंदर आणि वाचकाला खिळवुन ठेवणारी कथा आहे.असे चौफेर लेखन कसे काय जमते तुम्हाला?
(विहिरीतला)वेताळ
खेळायला बोलवा आपल्याकडं टाईम आहे
17 Nov 2008 - 12:10 pm | वृषाली
श्श्श्............ कोई है.................................
कथा छान जमलीय.
17 Nov 2008 - 1:31 pm | स्वाती दिनेश
एकदम डायरेक्ट भयकथा?
छानच जमली आहे ,कलाटणी तर सह्हीच..
स्वाती
17 Nov 2008 - 4:28 pm | सुहास कार्यकर्ते
च्छान जमलिय कथा. अम्हला वाट्तय मत्करि नन्तर तुमचाच नुम्बर लगेल. अता अस्म्भव्चि पुध्चि कथा लिहय्लघाया. तुमच्यात लिहिनन्याचे इतके कसब असेल तर आगे बधो. शेवट मनला लागला.
17 Nov 2008 - 4:41 pm | सुनील
जबरा कथा. मस्त. आवडली.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
17 Nov 2008 - 4:46 pm | अवलिया
बिपिन भाउ
म्या घाबरलो की....
(घाबरट) नाना
17 Nov 2008 - 5:00 pm | घाशीराम कोतवाल १.२
लय भारि हाय
लोकशिक्षा हिच खरी ईश्वर सेवा
17 Nov 2008 - 6:05 pm | शितल
बिपिन भाऊ,
भयकथा एकदम झक्कास लिहिली आहे.:)
17 Nov 2008 - 6:21 pm | अनंत छंदी
>:) बिपिनराव
कथेची भट्टी उत्तम जमलेली आहे. बरेच दिवसांनी इतकी चांगली भयकथा वाचायला मिळाली. नारायण धारपांची गादी चालविणार तुम्ही बहुतेक...
धन्यवाद!
17 Nov 2008 - 6:27 pm | लिखाळ
अरे वा !
जोरात आहे कथा.. दोन वेळा कलाटणी !!! वा वा !!
पोहणे शिकायला सुरुवात केली आहे :)
-- लिखाळ.
17 Nov 2008 - 7:18 pm | चतुरंग
दोनदा ट्विस्ट केलेल्या कथेनी माझं घाबरुन कडबोळं होता होता राहिलो! :O :SS
आता पुढचे काही दिवस दारावरची बेल वाजली की पोटात गोळा येणार. :T
(तसा तुमचा फोटो बघितलेला असल्याने चेहरा नीट माहिती आहे त्यामुळे जपूनच दार उघडेन म्हणा! ;) )
चतुरंग
17 Nov 2008 - 8:07 pm | लिखाळ
>(तसा तुमचा फोटो बघितलेला असल्याने चेहरा नीट माहिती आहे त्यामुळे जपूनच दार उघडेन म्हणा! )<
सुमित्राला पाहिले आहे का? :)
-- लिखाळ.
17 Nov 2008 - 8:16 pm | चतुरंग
तो एक कच्चा दुवा आहेच! :S
(एकदा सुमित्राला पाहिले की तुमच्या दाराची बेल वाजवायला येईनच म्हणा!! #:S ;)
चतुरंग
17 Nov 2008 - 8:16 pm | बिपिन कार्यकर्ते
अवांतर अवांतर अवांतर ;)
पण मजा आली, रंगाशेठ आणि लिखाळ भाऊंचा संवाद वाचायला.
बिपिन कार्यकर्ते
17 Nov 2008 - 8:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिपीनसेठ,
कथा वाचुन भेव वाटणार्या कथा लिव्हणार्यांची ध्यान आली.
लै भारी लिव्हली कथा. अजून बी येऊन दे !!!
17 Nov 2008 - 8:47 pm | मुक्तसुनीत
हेच म्हणतो ! कथा आवडली !
18 Nov 2008 - 1:21 am | शशिधर केळकर
वा वा! ही कथा छानच जमली आहे. मजा आली. एखाद्या दिवाळी अंकात सहज पणे समाविष्ट होईल, इतकेच काय, कथालेखन स्पर्धेमधे ही सर्वोत्कृष्ट कथेचा मान मिळवून जाईल अशी कथा. पण म्हणूनच लिखाण असेच चालू द्या. भट्टी छान जमली आहे. कविता ही करता का हो तुम्ही? नसाल तर प्रयत्न करायला हरकत नाही! आपला सचिन नाही का? सरळ बैट ने फटके लगावून झाले - आता रिवर्स हुक आणि स्वीप मधेही उस्ताद झालाय - तसेच काहीसे तुमचे दिस्त्येय! अभिनंदन!
20 Nov 2008 - 11:04 pm | विलास आंबेकर
च्यायला बिप्या,
तु म्हन्जे लै भारिच लेखक झालास की! तुझी सर्व लिखाणे वाचली. आधी कधी बोलला नाहीस. आत्ताची भयकथा पण छानच जम गयी यार!
आता विहीरीत अजुन कोणाकोणाला घेउन जाणार रे? मला तर बाबा भितीच वाटत्यए रे.मामा म्हणुन मला माफ कर रे बाबा!
बाकीचा पुढिल भाग लवकर येऊ देत!
विलास मामा.
14 Dec 2008 - 5:29 am | पाषाणभेद
अगदी जी. ए. कुलकर्णींची आठवण झाली.
आन राती च्या पारी आशी गोट आइकाइची म्हंजे लई भ्या वाटतय बॉ.
-( सणकी )पाषाणभेद
14 Dec 2008 - 2:51 pm | भडकमकर मास्तर
:SS
बिपिन भयकर्ते...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
25 Mar 2009 - 3:19 pm | विशाल कुलकर्णी
जबरी !!
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
25 Mar 2009 - 7:27 pm | अजय भागवत
खूप आवडली कथा!
13 Apr 2015 - 1:12 pm | सस्नेह
भारी कथा !
13 Apr 2015 - 1:26 pm | स्पंदना
तिळगुळ झाला ना माझा!
(म्हणजे अंगावर काटा फुलला)
15 Apr 2015 - 3:00 am | रुपी
जबरी!