जम्मू-काश्मीर व झारखन्ड निवडणू़क निकाल

मंदार कात्रे's picture
मंदार कात्रे in काथ्याकूट
23 Dec 2014 - 12:44 am
गाभा: 

जम्मू-काश्मीर व झारखंड मधील निवडणू़ नुकतीच पार पडली . या निवडणुकीची मतमोजणी उद्या सकाळी ७.०० वाजल्यापासून सुरू होत असून निकाल साधारण १०.०० वाजेपर्यंत येण्यास सुरुवात होइल. पंतप्रधान नरेन्द्र मोदी जी यांच्या सभांना काश्मीरात मिळालेला उदंड प्रतिसाद आणि काही एक्झिट पोल्स चे रिझल्ट्स बघता भाजपला काश्मीर मध्ये नक्कीच लक्षणीय यश मिळेल असा कयास असून झारखंडमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता आहे. कलम ३७० , दहशतवादी फुटीर कारवाया , तसेच अन्य अनेक समस्यानी जखडलेल्या काश्मिर मध्ये हिन्दुबहुल भाजप ला निर्णायक जागा मिळाल्यास त्याचा काश्मिर प्रश्न कायमचा निकालात काढण्याच्या दॄष्टीने घडामोडी होतील ,असा अन्दाज आहे.

या निवडणूक निकालासंबन्धी चर्चा करण्यासाठी हा धागा ..

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

10 Mar 2015 - 7:43 pm | श्रीगुरुजी

माझा प्रतिसाद पाहिल्यावर पित्त खवळून तुमचा असा प्रतिसाद येणार असं वाटलंच होतं. संतापाच्या भरात घाईघाईत लिहिताना तुमच्या पुन्हा एकदा चुका होणार हेही लक्षात आलं होतं. राजकारणाचा व एकंदरीतच सर्व प्रकारचा अभ्यास, वाचन व आकलन कमी आणि मनात ठाम दाटलेले पूर्वग्रह यामुळे मुद्देसूद प्रतिवाद न करता वैयक्तिक पातळीवर घसरणार आणि आपल्या चुकीच्या मुद्द्यांवर ठाम राहणार हेही अपेक्षित होते.

असो. स्वभावाला औषध नाही.

>>> अहो या बातमीला महिना नाही पूर्ण झाला आणि ती जुनी ? बहुतेक जुनाट विचारसरणी असल्यावर असे होत असावे .

त्यानंतर बर्‍याच घटना घडल्यात. गिलानी पाकच्या उच्चायुक्तांना २ दिवसांपूर्वी भेटला आणि तुम्ही त्याची लिंक जवळपास १ महिन्यांपूर्वी मोदींनी सार्क देशांच्या दौर्‍यावर पाठवून दिलेल्या परराष्ट्र सचिवांच्या परदेश दौर्‍याशी लावलीत. भूतकाळात घडून गेलेली घटना भविष्यकाळातील घटनांमुळे झाली असा अर्थ लावणे हे वाचन, अभ्यास व आकलन कमी असल्याचेच लक्षण आहे.

>>> आता बौद्धिक कुवतच कमी म्हंटल्यावर इलाज नाही. पण डोक्यात प्रकाश पडावा म्हणून अजून एक लिंक देतो . ती आजची आहे पण त्याला जून समजू नका . आणि हो ती इंग्रजी मध्ये आहे . झेपतंय का बघा . तुमच्यासाठी काही भाग बोल्ड करतो . समजल नाही तर भाषांतर करून देईल कस ?

पूर्वीच सविस्तर उत्तर दिलं आहे. परत टंकण्याचे कष्ट घेत नाही. ते समजण्यासाठी वाचन वाढवावं लागेल आणि पूर्वग्रह काढून टाकावे लागतील हे मात्र नक्की.

आणि इंग्लिश झेपण्याचं आणि भाषांतर करण्याचं म्हणाल तर अवघड आहे. तुमच्या आधीच्या प्रतिसादात दिलेल्या लिंकमधील खालील वाक्ये पुन्हा एकदा वाचू.

Modi also tweeted that he had called up Pakistan's Prime Minister Nawaz Sharif and the leaders of other SAARC countries, which are participating in the cricket world cup that begins Saturday, to wish their respective teams luck. Cricket is by far the most watched sport in the Indian sub-continent.

या संपूर्ण बातमीपत्रात फक्त या २-३ ओळींव्यतिरिक्त कोठेही 'क्रिकेट' हा विषय आलेला नाही. वरील वाक्यांचा माझ्या कच्च्या आणि न झेपणार्‍या इंग्लीशच्या ज्ञानानुसार असा अर्थ होतो.

"मोदींनी असे ट्वीट केले आहे की त्यांनी नवाझ शरीफ व क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भाग घेणार्‍या इतर सार्क परिवारातील देशांच्या प्रमुखांशी दूरध्वनीवर संभाषण करून त्यांच्या संघाला शुभेच्छा दिल्या. क्रिकेट हा भारतीय उपखंडात सर्वाधिक बघितला जाणारा खेळ आहे."

परंतु तुमच्या अत्यंत जबरदस्त आणि तगड्या इंग्लिश भाषेच्या ज्ञानानुसार तुम्ही याच वाक्यांचा असा अर्थ काढला की "भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेटचे सामने परत सुरू होणार."

यावर काही अजून भाष्य करण्यासारखं आहे का?

>>> आणि बौद्धिक कुवत वाढणे शक्य नाही पण इंग्रजी तेवढ सुधार्वयाच बघा हो

वरचा प्रतिसाद वाचा आणि यावरही अजून काही भाष्य करण्यासारखं असेल तर सांगा.

(संपादित)

प्रदीप's picture

11 Mar 2015 - 11:00 am | प्रदीप

चर्चेच्या दरम्यान दुसर्‍याचे मुद्दे खोडून काढतांना स्वतःचे मुद्दे (असलेच तर) तेव्हढे मांडावेत. अशा चर्चांत थोडीफार वैयक्तिक शेरेबाजी होणे समजण्यासारखे आहे. पण कुणीही इथे पैसे घेऊन एखादी बाजू मांडावयास आला आहे, हे अति झाले (आणि पोरकटही). 'कुणावरही एक बोट रोखतांना... इतर चार बोटे....' वगैरे आपण वाचले/ ऐकले असेलच!

संपादक मंडळ's picture

12 Mar 2015 - 5:47 pm | संपादक मंडळ

वैयक्तीक टीका मिसळपावच्या धोरणात बसत नाही हे घ्यानात आणून दिले जात आहे.

कृपया, सभासदांनी वैयक्तीक टीका टाळून केवळ मुद्द्यांवर आधारलेला संवाद / वादविवाद करावा.

मृत्युन्जय's picture

10 Mar 2015 - 1:42 pm | मृत्युन्जय

मुफ्ती मेहमूद सईद काही बरळली टीका मोदींवर

कोणी साध्वी काही बरळली टीका मोदींवर

शरद पवारांनी समर्थन जाहीर केले टीका मोदींवर

शशी थरुर मोदींबद्दल काही चांगले बोलले तरी टीका मोदींवर.

चोर सोडुन संन्यासाला फाशी द्यायची निराळीच पद्धत शोधुन काढली आहे खांग्रेस भक्तांनी.

नांदेडीअन's picture

10 Mar 2015 - 3:00 pm | नांदेडीअन

Decision to Free Separatist Masarat Alam Taken During Central Rule in Jammu and Kashmir, Reveal Letters

http://www.ndtv.com/india-news/decision-to-free-separatist-masarat-alam-...

पिंपातला उंदीर's picture

10 Mar 2015 - 3:05 pm | पिंपातला उंदीर

तुम्ही गुर्जींसाठी हिंदी किंवा मराठी मधली लिंक द्या पाहू . त्यांना इंग्रजी कळत नाही

काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू असतानाच कट्टर फुटीरतावादी मसरत आलमच्या सुटकेचे आदेश निघाले होते, मुफ्ती सरकारनं स्वतःहून त्याला सोडलेलं नाही, अशी खळबळजनक माहिती एका पत्राद्वारे उघड झाल्यानं मोदी सरकारच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत.
www.maharashtratimes.indiatimes.com/nation/decision-to-free-masarat-alam...

आता ?

पिंपातला उंदीर's picture

10 Mar 2015 - 8:57 pm | पिंपातला उंदीर

या मुद्द्यावर पण प्रतिसाद द्या ? पळू नका असे . किती पैसे मिळतात हो प्रत्येक पोस्ट मागे ?

पिंपातला उंदीर's picture

11 Mar 2015 - 9:39 am | पिंपातला उंदीर

गुर्जी या मुद्द्यावर पण थोड बोला की . सोयीस्कर ठिकाणी हजेरी लावून शब्दांचे खेळ करण्यापेक्षा या मुद्द्यावर पण जरा बोला . तेवढीच अजून एक पोस्ट . तेवढाच आर्थिक लाभ

पिंपातला उंदीर's picture

11 Mar 2015 - 3:43 pm | पिंपातला उंदीर

गुर्जी तिसऱ्यांदा बोलवतोय तुम्हाला इथे ? झोपेच सोंग घेतल्यासारख करू नका

पिंपातला उंदीर's picture

10 Mar 2015 - 3:23 pm | पिंपातला उंदीर

मराठीत लिंक देऊन बर केलत .

बहुदा देशाच्या गृहमंत्र्यांनी पंप्र ना अंधारात ठेवलं असेल . लवकरच ते आक्रोश करण्यात सहभागी होतीलच

नांदेडीअन's picture

10 Mar 2015 - 3:27 pm | नांदेडीअन

अगोदर कडी शब्दों में निंदा व्हायची.
आता आक्रोश व्यक्त होतोय.

पिंपातला उंदीर's picture

10 Mar 2015 - 3:37 pm | पिंपातला उंदीर

पण यांच्या बालिश आणि नामर्द attitude ची किंमत सीमेवरील जवानांना आणि सर्वसामान्य जनतेला चुकती करावी लागते

श्रीगुरुजी's picture

18 Mar 2015 - 9:12 pm | श्रीगुरुजी

जम्मू भागातील गांधीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या भाजपच्या कविंदर गुप्ता यांची जम्मू-काश्मीर विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. जम्मू-काश्मीर विधानसभेत भाजपचा सभापती असणे ही महत्त्वाची घडामोड आहे. सभापती हे अत्यंत महत्त्वाचे पद भाजपला मिळाले आहे. देशात इतर राज्यात लागू असलेला पक्षांतरबंदी कायदा जम्मू-काश्मीरमध्ये लागू नाही. पक्षांतर होताना सभापतींची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. त्याचप्रमाणे सभागृहात योग्य त्या विषयावर चर्चेला अनुमती देणे आणि अयोग्य विषयावर चर्चा टाळणे यावरही सभापतींची अनुमती आवश्यक असते. हे महत्त्वाचे पद भाजपला मिळणे ही एक आगळीवेगळी घटना आहे.

नांदेडीअन's picture

20 May 2015 - 7:43 pm | नांदेडीअन

फिर वही दिल लाया हूँ ।
http://timesofindia.indiatimes.com/india/Pakistani-flags-at-Mirwaiz-Umar...

पिंपातला उंदीर's picture

20 May 2015 - 9:06 pm | पिंपातला उंदीर

बाकी कोणी करत असेल वा नसेल मी तर श्रीगुरुजींची लई वाट बघत आहे . बाकी भक्त मंडळ लैच पुचाट आहे . तुलनेने गुर्जी बरे खमके आहेत . बाकी इथे गुर्जीनी भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सिरीज होणार नाही अस लई छातीठोक पणे सांगितलं होत . मोदिनी त्यांना तोंडावर पाडलं : )

नांदेडीअन's picture

20 May 2015 - 10:06 pm | नांदेडीअन

अहो अगोदरची क्रिकेट डिप्लोमसी देशद्रोही होती.
आत्ताची क्रिकेट डिप्लोमसी राष्ट्रहित लक्षात घेऊन अमलात आणली आहे.