तर मंडळी आता अॅन्ड्रॉइड वरुन विंडोज ८.१ {अपडेट} वर शिफ्ट झालो आहे. नव्या ओएस आणि नव्या फोनचा अनुभव चांगला आहे. अॅन्ड्रॉइडच्या युजर इंटरफेसला आता अनेकजण कंटाळले आहेत, आणि सर्व जण नव्या नव्या ओएस वापरण्यास उत्सुक आहेत.
हा धागा लुमियाचे अनुभव / अॅप्स / सेटिंग्स /सिक्युरिटी / तांत्रिक माहिती यासाठी पूर्णपणे खुला आहे, इथे मिपावर लुमिया वापरकर्ते आहेतच त्यांनीही त्यांना माहित असलेल्या गोष्टींची भर या धाग्यात जरुर घालावी. :)
अॅप्स :-
१} Transfer my Data :-
नविन फोन घेतला की सगळ्यात पहिले काम असते ते आधीच्या फोन मधले फोन कॉन्टॅक्स नविन मोबाइल मधे मुव्ह करणे. बरेच जण गुगल सिंक करुन ठेवतात,पण काही वेळा काही तांत्रिक कारणांमुळे हे होत नाही. लुमिया मधे ट्रान्सफर माय डेटा हे अॅप आहे, हे अॅप वापरुन ब्लू-टुथ च्या सहाय्याने अॅन्ड्रॉइड मधले सगळे फोन कॉन्टॅक्स इंपोर्ट करता येतात.
२} Authenticator :-
विंडोजवर शिफ्ट होण्यापूर्वी मी आधी जी-मेल साठी असलेले २-स्टेप अॅथंटिकेटर अॅप वापरत होतो, मेल सिक्युरिटी महत्वाची असल्याने मी आधी विंडोजसाठी असे अॅप आहे का ? ते शोधले. ते मिळाले आणि मगच विंडोजवर स्वीच मारण्याचा निर्णय घेतला.
सध्या जसे जसे अॅप्स निवडत जाईन तसे तसे या धाग्यावर ती मी देत जाईन... अॅन्ड्रॉइडवर उपलब्ध असलेली बरीचशी अॅप्स विंडोजवर उपलब्ध आहेत,अगदी व्हॉट्अॅप सकट. अजुन बरीचशी यायची देखील आहेत. तेव्हा तुमच्या लुमिया संदर्भात सर्व प्रतिसादांचे स्वागत आहे.
मायक्रोसॉफ्ट अॅप स्टोअर :- http://www.windowsphone.com/en-us/store/featured-apps
मदनबाण.....
प्रतिक्रिया
9 Dec 2014 - 10:52 am | मदनबाण
इतर विंडोज फोनची स्पेक्स वरुन तुलना करताना हे स्पेक्स हार्डवेअर डिपेंड असतात हे नेहमी लक्षात ठेवावे. इतर फोनच्या तुलनेत मायक्रोसॉफ्ट {एक्स नोकिया } हे केव्हाही सरस ठरेल. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?
9 Dec 2014 - 11:12 am | वेल्लाभट
गॉट इट!
माझ्या कव्वा चालणा-या ६२० चं भवितव्य अंधारात आहे. म्हणून चाचपतोय. नाईलाजाने. बसमधे बसलो असताना खिशातून उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केलान त्याने. का ते त्यालाच ठाऊक. ते टचस्क्रीन वर बेतलंय त्याच्या. कोण जाणे नीट होतो का नाही आता. ५३५ महाग आहे चायला. मोअर सो, कारण ६२० ला वर्ष पूर्ण व्हायला काही दिवस असताना हे असं झालंय. म्हणून ५३५ ची किंमत मोठी भासतेय. बघू !
18 Dec 2014 - 2:29 pm | वेल्लाभट
लावारिस (लावा आयरिस) विन वन इट इज.
सो फार सो मस्त!
9 Dec 2014 - 11:33 am | मदनबाण
शेवटी फायरफॉक्स विंडोज मोबाईलसाठी रिलीज झालेच ! :)
Firefox
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?
9 Dec 2014 - 11:35 am | मदनबाण
ओह्ह... सॉरी. हे अॅप आता पब्लिश्ड नाही. :(
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?
9 Dec 2014 - 12:16 pm | कंजूस
अहो वेल्लाभट ६२०मध्ये मग्नेटिक सेंसर आणि एनेफसी आहे ना ?
10 Dec 2014 - 2:34 pm | वेल्लाभट
आहे!
10 Dec 2014 - 2:41 pm | आदिजोशी
ल्युमियाचा सि डी एम ए फोन उपलब्ध आहे का भारतात / मुंबईत? बजेट साधारण २०-२५ हजारच्या मधे आहे. नोकिया प्रायॉरिटी मधे गेलो असता नोकिया सि डी एम ए फोन बनवत नाही असं सांगितलं पण आं.जा. वर बनवतं असं दिसतंय म्हणून गोंधळ उडाला. कुणाला अनुभव आहे का?
12 Dec 2014 - 2:32 pm | मदनबाण
बहुतेक नोक्या आधी बनवायची...पण आत्ताच ठावुक नाही. बाकी कंपन्यांचे मोबाइल मॉडेल्स इतर कंपन्यांचे आहेत.
अधिक इकडे :- http://shop.rcom.co.in/ { इथे काही सीडीएमए मोबाइल दिसत आहेत. }
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
U.S. passes $18 trillion in debt, and nothing’s being done about it
Billionaire Tells Americans to Prepare For 'Financial Ruin'
Economists Caution: Prepare for 'Massive Wealth Destruction'
18 Dec 2014 - 8:27 pm | आदिजोशी
एच टि सि डिझायर ५१६ सी घेण्यात आलेला आहे. माझ्या रेंज मधे असलेला फोन हाताळायला फारच मोठा असल्याने हा घेतला. मस्त आहे फोन.
18 Dec 2014 - 4:26 pm | मदनबाण
आजचे अॅप :-
Gestures Beta :- With Gestures you can control some of the functionalities of your phone without touching the display.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Fed calls time on $5.7 trillion of emerging market dollar debt
Oil's Price Decline Weighs On High Yield Debt
U.S. shale junk debt tumbles amid oil crunch
18 Dec 2014 - 7:27 pm | फुलथ्रॉटल जिनियस
छान धागा
19 Dec 2014 - 3:50 pm | पैसा
वॉट्स अॅप आणि विंडोज फोनचे वाकडे आहे का? माझ्या फोनवर चुकून कधीतरी सुतासारखे चालते आणि कधीतरी एकदम १००-१५० मेसेज बदाबदा येऊन पडतात. कधीतरी फोन रिस्टार्ट करा म्हणून आज्ञा येते. काही उपाय आहे का? दुसर्या कोणत्याही अॅपला असला प्रॉब्लेम नाही.
19 Dec 2014 - 4:03 pm | बॅटमॅन
फोनचे माहिती नाही, परंतु वत्स अप्प जर सारखे चेक करत नसाल आणि दिवसभरात एकदाच चेक करायचे अशा पंथातील असाल तर पीशीवरही वत्स अप्प इन्स्टॉल करता येते- ब्ल्यूस्टॅक्स नामक अँड्रॉईड इम्युलेटर इन्स्टॉल करून त्याद्वारे वत्स अप्प इन्स्टॉल करून बघता येते.
19 Dec 2014 - 4:37 pm | पैसा
तो उपद्व्याप केला आहे. पण पीसीवर कायम वॉट्स अॅप ठेवणे शक्य नाही. कारण पीसी चालू नसतो बराच वेळ. तसेच मोबल्यावर दर मिनिटाला चेक करणे शक्य नसतेच. पण कधी कधी लोकांनी पाठवलेले मेसेजेस सकाळचे रात्री पोचतात म्हणून विचारले की निदान कोणाचा मेसेज आहे ते पाहून बघायचा की नंतर पाहिला तरी चालेल हे ठरवता येते.
19 Dec 2014 - 6:59 pm | मदनबाण
वॉट्स अॅप आणि विंडोज फोनचे वाकडे आहे का?
अगदीच वावडे असे नाही,पण जरासे स्लो आहे.
माझ्या फोनवर चुकून कधीतरी सुतासारखे चालते आणि कधीतरी एकदम १००-१५० मेसेज बदाबदा येऊन पडतात.
बॅटरी सेटिंगचा हा परिणाम असु शकतो... व्हॉट्सअअॅप ओपन करण्याच्या आधी पावर सेटंग ऑफ करुन पहा काही फरक पडतो आहे का ते...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : Make In India
19 Dec 2014 - 6:52 pm | फुलथ्रॉटल जिनियस
स्मार्टफोन टेक्नॉलॉजी आता 'फुलथ्रॉटल' मोडमध्ये गेल्याने भल्याभल्यांची फोन वापरताना पंचाईत होते.
20 Dec 2014 - 6:23 am | कंजूस
लुमिआ ४३० येतोय
27 Dec 2014 - 11:29 am | मदनबाण
आजची अॅप्स :-
MX Player :- हा प्लेअर आता विंडोज फोनवर सुद्धा उपलब्ध झाला आहे. :)
SDCard Tube Downloader :- या अॅप ने यूट्युबवरचे व्हिडीयो डाउनलोड करता येतात. जरी याच्यात एसडी कार्डवर फाइल सेव्ह करण्याचा ऑप्शन दिला असला तरी तो अजुन नीट चालत नाही.
यावर उपाय म्हणजे फोन मधल्या डाउनलोड फोल्डर मधे व्हिडीयो सेव्ह करणे आणि तिथुन एसडी कार्डवर मूव्ह करणे.
याचा वापर करुन मी Make In India हा व्हिडीयो आणि लोकमान्य { एक युगपुरुष } या आगामी मराठी चित्रपटातले "गजानना" गाणे व्हॉट्सअॅप वर शेअर करुन पाहिले आहे,इट वर्क्स ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
गजानना गजानना :- लोकमान्य { एक युगपुरुष } Releasing 2nd January, 2015
27 Dec 2014 - 2:24 pm | श्रीगुरुजी
एक आठवड्यापूर्वी ल्युमिया ५३५ घेतला. मस्त फोन आहे. अॅन्ड्रॉईड फोन याच्या तुलनेत खूप नीरस वाटायला लागलेत. फोटोसुद्धा खूप चांगले येताहेत.
30 Dec 2014 - 8:04 pm | कंजूस
आइ इ१० ब्राउजरची गच्छंति अटळ ?
बातमी इथे
आणि इथे वाचा
30 Dec 2014 - 8:07 pm | कंजूस
विंडोझ १०चा ब्राउजर असे वाचा
31 Dec 2014 - 12:21 pm | मदनबाण
मायक्रोसॉफ्ट नविन ब्राउजर मार्केट मधे आणणार आहे अश्या बातम्या सध्या जालावर आहेत. या नव्या ब्राउजरचे नाव "Spartan " असेल.
अधिक इकडे :-
Microsoft Is Reportedly Working On A Completely New Web Browser
Microsoft is building a new browser as part of its Windows 10 push
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Make in India: PM Narendra Modi approves action plan for ease of doing businessMake in India gets defence sector spurt as BHEL takes up submarine project
Brent falls towards $57 as demand concerns outweigh supply disruptions
US opening of oil export tap widens battle for global market
31 Dec 2014 - 2:28 pm | कंजूस
@मदनबाण तुमच्या सहीत आर्थीक बातम्या अद्ययावत होत असतात त्याचा एक "उलाढाल" धागा काढणार का? आणि थोडक्यात त्याचे महत्त्व टाकलेत तर मजा येईल. उदा रूबलचे अवमुल्यन का होतंय अमेलिकेचं कर्ज का वाढतंय ?इत्यादी. मराठी पेपरांतले असले लेख डोक्यावरून जातात अथवा काही शंका निरसन नंतर होत नाही.
31 Dec 2014 - 2:37 pm | मदनबाण
@मदनबाण तुमच्या सहीत आर्थीक बातम्या अद्ययावत होत असतात त्याचा एक "उलाढाल" धागा काढणार का?थोडक्यात त्याचे महत्त्व टाकलेत तर मजा येईल.
हम्म... आयड्या चांगली हाय, पण सध्या सही रे सही... असंच राहु द्याव अस वाटतया... आपल्या सारखी मंडळी सहीतले दुवे वाचण्याचे कष्ट घेत आहेत हे पाहुन हा उध्योग अगदीच वाया जात नाही याचा आनंद वाटला. :)
उदा रूबलचे अवमुल्यन का होतंय अमेलिकेचं कर्ज का वाढतंय ?इत्यादी. मराठी पेपरांतले असले लेख डोक्यावरून जातात अथवा काही शंका निरसन नंतर होत नाही.
ह्म्म्म,,, एक बातमी अशीही :- No, China does not hold more than 50 percent of U.S. debt
Foreign Holdings of Federal Debt {पीडीएफ}
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Make in India: PM Narendra Modi approves action plan for ease of doing business
Make in India gets defence sector spurt as BHEL takes up submarine project
Brent falls towards $57 as demand concerns outweigh supply disruptions
US opening of oil export tap widens battle for global market
24 Jan 2015 - 10:54 am | पाषाणभेद
मदणबाण यांचा अभ्यास आर्थिक, सामाजिक, तांत्रीक, सौंदर्य (तसेच गाण्यांच्या अंगाने शारिरीक) या क्षेत्रात फार मोठा आहे. त्यांना 'मिपाचे सर्व-संदर्भ व्यक्तिमत्व' हा पुरस्कार देण्यात यावा यासाठी मी सर्व सदस्यांकडे मागणी करतो.
23 Jan 2015 - 7:39 pm | आजानुकर्ण
ड्रॉपबॉक्सचे ऑफिशिअल अॅप आता विंडोज फोनसाठी उपलब्ध झाले आहे.
25 Jan 2015 - 9:41 am | कंजूस
मदनबाण यांचे वरील प्रतिसाद वाचून मला वाटतं ते खरंच लेखन थांबवतील आता इथे या लेखात मी पण शेवटचे डकवतोय
विंडोज १० अपग्रेड लवकरच ८.१साठी येत आहे :
trustedreviews dot com/news/ लिंक इथे
जयहिंद.
8 Feb 2015 - 7:02 pm | नया है वह
५३५ एक महीना वापरतोय
फोटो छान येतात फ्रन्टसुध्दा विशेष करुन दिवसा
Here maps works best special mention is it's offline
Rest all features are competitive
8 Feb 2015 - 8:50 pm | जेपी
आजच 535 मिळाला. बजेट मध्ये बसला.
असो या टायमाला तो नाल्यात जिव देणार नाही याची काळजी घेईन. नविन माहिती कळवत राहीन.
3 Mar 2015 - 1:38 am | आजानुकर्ण
नवीन लुमिया येतोय.
http://www.microsoft.com/en-in/mobile/phone/lumia640-dual-sim/specificat...
१ जीबी रॅम, उत्तम रिझॉल्युशन आणि बॅटरी आणि आवश्यक ते सर्व सेन्सर्स. लुमियाच्या सर्वच फोन्सचा फॉर्म फॅक्टर फारच छान आहे.
72.2mm
141.3mm
8.8mm
5''
Display
8.0MP
Main camera
8GB
Mass memory
3.5G
Network
Front camera:
HD 0.9 MP wide angle
Flash type:
LED flash
Processor type:
Quad-core 1.2GHz
Maximum talk time (3G):
20.3 h
Maximum standby time with dual SIM:
35 days
Free cloud storage1:
30 GB
View All Specifications
3 Mar 2015 - 10:59 pm | श्रीगुरुजी
कधीपासून येतोय आणि किंमत किती आहे?
3 Mar 2015 - 11:02 pm | आजानुकर्ण
भारतातील किंमत १०००० च्या आत असावी असं वाटतंय. किंमत नवीन मोटो ई (एलटीई) च्या आसपासच राहील.
31 Mar 2015 - 10:08 pm | आजानुकर्ण
http://au.ibtimes.com/microsoft-lumia-640-lumia-640-xl-dual-sim-variants...
इथं ल्युमिया 640 ची किंमत 4,683 अाणि 640 एक्सएलची किंमत 6,410 आहे असं आलंय. स्पेसिफिकेशनच्या तुलनेत हे फोन फारच स्वस्त आहेत.
3 Mar 2015 - 6:47 am | कंजूस
640 XLफैबलट पण काढलाय . 640XL मधला कैमरा कार्ल जाइसचा सर्वोत्तम आहे.रेजलुशन १२८० X७२० आहे.डिसेंबरपर्यँत नवीन विंडोज १०ला अपग्रेड करतील.
६३० मधला क्वॉलकॉम स्नैपड्रैगन ४०० क्वॉडकोर प्रसेसर तापतो फार. विंडोज फोन८.१ मध्ये फाईल मैनेजर नाही आणि वेबपेजिज ऑफलाइन सेव होत नाहीत.
माहितीसाठी माइक्रोसॉफ्टची ही एक लिंक पाहा
3 Mar 2015 - 9:52 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
फाईल मॅनेजर अॅप स्टोअर वर मिळतात. त्यातल फाईल एक्स्प्लोरर वापरा. पहिल्या वापराच्या वेळी फाईल रिड करायला साधारण ५-१० मिनिट लागतात अॅपला. पण एकदा १००% सिंक झालं की पी.सी. एवढचं सोपं पडतं.
3 Mar 2015 - 12:33 pm | वेल्लाभट
२ एक महिन्यापूर्वी लावा आयरिस विन वन घेण्यात आलेला आहे.
Network Technology GSM / HSPA
Launch Announced 2014, December
Status Available. Released 2014, December
Body Dimensions 125 x 64.3 x 11 mm (4.92 x 2.53 x 0.43 in)
Weight -
SIM Dual SIM (Mini-SIM, dual stand-by)
Display Type Capacitive touchscreen, 16M colors
Size 4.0 inches (~56.7% screen-to-body ratio)
Resolution 480 x 800 pixels (~233 ppi pixel density)
Multitouch Yes
Platform OS Microsoft Windows Phone 8.1
Chipset Qualcomm Snapdragon 200
CPU Quad-core 1.2 GHz
Memory Card slot microSD, up to 32 GB
Internal 8 GB, 1 GB RAM
Camera Primary 5 MP, 2592 х 1944 pixels, autofocus, LED flash
Features Geo-tagging, panorama
Video Yes
Secondary VGA
Sound Alert types Vibration; MP3, WAV ringtones
Loudspeaker Yes
3.5mm jack Yes
Comms WLAN Wi-Fi 802.11 b/g/n, Wi-Fi Direct, hotspot
Bluetooth v3.0, A2DP
GPS A-GPS
Radio FM radio
USB microUSB v2.0
Features Sensors Accelerometer, proximity
Messaging SMS (threaded view), MMS, Email, Push Email, IM
Browser HTML5
Java No
- OneDrive (15 GB cloud storage)
- MP3/WAV/eAAC+/WMA player
- MP4/H.264/WMV player
- Document viewer
- Video/photo editor
Battery Li-Ion 1950 mAh battery
रंग Black
किंमत ५०००
3 Mar 2015 - 1:30 pm | कंजूस
चांगला वाटतोय लावा आइरीस विन पाच हजारात.
एकंदरीत "विंडोज फोन ८.१" ओएस वगैरे डोकेफोड आहे.
१)दुसरा फास्ट ब्राउजर या ओएसवर उपलब्ध नाही आणि आइ ११ IE11 सिमच्या नेटवर फारच स्लो चालतो.
२)हिँदी देवनागरी कीपैड पर्याय आहे परंतू त्यात मराठीतले अनुस्वार देता येत नाहीत. इन्डिआ(इंडिआ) गङगा (गंगा)असे लिहावे लागते.
३) IE 11 डेटा फार खातो.
४)पूर्ण ऑफिस वर्ड एक्सेल वगैरे ऑफलाइन चालते हा एक प्लसपॉइंट आहे लुमिआ फोनमध्ये.
3 Mar 2015 - 2:36 pm | वेल्लाभट
क्र. १ शी तितकासा सहमत नाही. टकाटक चालतो ब्राउझर
क्र. २ शी मुळीच सहमत नाही. उत्तम टायपिंग होते. बग एकच आहे हिंदी कीबोर्ड मधे की ऑ टाईप करताना दुसरा कान्हा सुटा येतो. बघून कळतं, पण तरीही.
क्र. ३ असेल ब्वा.
क्र ४. नक्कीच.
लावा आयरिस विन वन मधेही काही सोयींचा अभाव आहे. पण ५००० मधे अजून काय हवं!
3 Mar 2015 - 3:03 pm | कंजूस
क्र १सिम कार्ड २जी/३जी आणि एअरिआवर फरक पडत असेल
क्र २ लावाचे कीपैड चांगले दिसतंय
वेबपेज ऑफलाइन सेव झाल्यास फार उपयोग होईल पुन्हा पुन्हा लोड करायला नको.
५)माईकरोसॉफ्टचं AAC वरचं प्रेम आणिWAV शी वाकडं का आहे ?साउंड रेकॉर्डीँग WAVमध्ये करायचा पर्याय हवा होता AMR कशाला ?नाहीतरी मेमरी कार्डावरच जाणार ना ?
६)लुमिआतले दुसरे सिम फोन बंद न करताच टाकता /काढता येते (मेमरी कार्डासारखे) हे आवडले.
3 Mar 2015 - 3:08 pm | कंजूस
धन्यवाद वेल्लाभट फीडबैकची नोंद केल्याबद्दल. वाचून पुढचे तरी सावध होतील आणि चांगला निर्णय घेतील.
3 Mar 2015 - 3:43 pm | वेल्लाभट
जसं की?
3 Mar 2015 - 5:21 pm | कंजूस
जसं की म्हणजे
१)विंडोज फोन वि अॅनड्रॉइड
-ऑडिओ फाईल फॉर्मेटसना सपॉर्ट
-ओपेरा ब्राउजर अजून विंडोजसाठी नीट जमला नाहीये
२)माइक्रोसॉफ्टने अथवा इतरांनी बनवलेले विंडोज फोन्स
-माइक्रोवाले सिक्युअरटि फार टाकतात DRM आहेच.
-सैमसंगने एका विँ॰मध्ये एफेम रेकॉर्डीँगही दिलं आहे.
लुमिआ ६३० मध्ये पेंट अॅप आणि फोटोवर खुणा करणे ,बोटानेच चित्र काढणे ऑफलाइन आहे ते मुलांना नक्कीच आवडेल.
4 Mar 2015 - 11:58 am | मदनबाण
ब्लू टुथ ने ट्रान्सफर झालेली आणि विंडोज फोनवर रिसीव्ह झालेली फाइल फोन मधे कुठे स्टोअर होते ते कळत नाही ! विशेषत: पिडीएफ फाइल. रिसिव्ह झालेल्या फाइल ओपन करुन पाहिल्या नाहीत तर बहुतेक त्या ऑटो डिलीट होतात असं वाटतय...सिक्युरिटीमुळे कॉल रेकॉर्ड करण्याची सुविधा नाही, हा मला न-आवडलेला मुद्दा आहे. पुढच्या अपडेट मधे काय होत ते पहायला आवडेल. अॅन्ड्रॉइडफोनवर बरेच चाळे करुन पाहिले,विंडोजवर तसे काही करता येत नसल्याने माझे फोन अॅडिक्शन अपोआप कमी झाले ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पांगळेपणाचे डोहाळे
4 Mar 2015 - 1:06 pm | वेल्लाभट
हो आहेत काही रिस्ट्रिक्शन्स. पण आयफोनातही आहेतच की. घेतात ना तरीही!
जी खरोखर त्रासाची आहेत त्याबद्दल सुधार व्हायला हवा. WPCentral kiwa Microsoft chya site war forums madhe dhaagaa suru karaa.
एफ एम लावा आयरिस विनवन मधेही आहे.
ब्लूटूथ ची फाईल सेव करावी लागते. मग दिसते डॉक्क्युमेंट्स फोल्डर मधे. बघा बरं....
4 Mar 2015 - 2:17 pm | कंजूस
१)ती फाइल लालचौकोन ऑफिस -खाली डॉक्युमेंटस ऑन यौर फोन -वन नोटमध्ये जाते.
२)कॉल रेकॉर्डीँग कायद्याने देता येत नाही परंतू कॉनफ्रन्स कॉल रेकॉर्डीग करायला परवानगी आहे.
एक कार्बनचा डबी फोन K20+ १७००रुपयात सहा महिन्यांपूर्वी एफेम रेकॉर्डीँगसाठी घेतला होता परंतू तो वामनावतार निघाला. कॉल रेकॉर्डीगही आणि साउंड रेकॉर्डींगही WAV मध्ये अफलातून करतो. वेगऴया फोल्डरात फाईल सेव होतात आणि सेंड करता येतात. कार्बनला जिव्वापाड जपतोय. आता हे आमचे लुमिआ तीन माकडांसारखे बुरा सुननेका नही बोलनेका नही देखनेका नही =लुमिआला वेव WAVऐकू येत नाही DRM मुळे MP3 रिंगटोन बोलत नाही आणि व्हिडिओची AVI फॉर्मेट देखनेका नही.
लुमिआ बिझनेस फोन आहे मल्टिमिडिआ नाही.
३)एक पिडीएफ फाइल अडोब वापरून उघडली, सेव झाली अडोबच्या फोल्डरात. परंतू त्याचे प्रिंटाउट करण्याचा सेंड टु प्रिँटर पर्याय दिसत नाही काय करायचं ?दुसरं पिडिएफ अॅप आहे का.एवढा एचटीएमेल फाइव ब्राउजर IE11ला पिडिएफ उघडायला अडोब अथवा इतर कोडचे पाय का धरावे लागतात ?हे रेडमॉंडचे लोक चीजबर्गर खाऊन काय करत असतात ?
4 Mar 2015 - 3:23 pm | मदनबाण
ती फाइल लालचौकोन ऑफिस -खाली डॉक्युमेंटस ऑन यौर फोन -वन नोटमध्ये जाते.
काहीही समजले नाही ! Adobe reader उघडल्यास पिडीएफ फाइल दिसते,पण ती कुठे स्टोअर झालीय याचा काही थांगपत्ता लागत नाही.
कॉल रेकॉर्डीँग कायद्याने देता येत नाही परंतू कॉनफ्रन्स कॉल रेकॉर्डीग करायला परवानगी आहे.
असे कसे ? आणि कुठल्या कायद्याने करता येत नाही ? ८.१ च्या आधीच्या व्हर्जन मधे ही सुविधा होती असे कळते मग आता घोडे सिक्युरिटी मधे पेंड खात बसले आहे का ? ते निश्चित कळायला काही मार्ग नाही.
बरं गुगल जर अॅड्रॉइडवर कॉल रेकॉर्डींग देत असेल तर मग मायक्रोसॉफ्ट का नाही ? कायदा असेल तर तो दोघांनाही समान लागु होइल ना ?
लुमिआ बिझनेस फोन आहे मल्टिमिडिआ नाही.
ह्म्म... मी तर म्हणेन अजुन बर्याच सुधारणांची गरज आहे.बाकी बॅटरीच्या बाबतीत मी समाधानी आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पांगळेपणाचे डोहाळे
4 Mar 2015 - 5:30 pm | कंजूस
१)मी अगोदर अडोब पिडिएफ डाउनलोड केला नव्हता तेव्हा एक पिडिएफ Aघेतली होती. ती न उघडल्याने SD card वर दिसली. नंतर अडोबरीडर घेतला आणि नवीन एक पिडिएफ B पाहिली. आता अडोब च्या स्टार फोल्डरातA आणि Bदिसताहेत ,आणि डाउनलोडस फोल्डरात फक्त A दिसते आहे बाजुला मेमरी कार्डाची खूण आहे. याचा अर्थ पिडिएफ दिसली /क्लिकली की अडोब त्याचा लगेच ताबा घेतो.
सेव डेटा ऑन sd card केल्यामुळे सर्व तिकडेच आहे.
२ पाठलेल्या फाइल औफिस टाइल उघडल्यावर डॉक्यु ऑन फोन /एस डी कार्ड अशा दिसताहेत (वननोट नाही)आणि त्या उघडून एडिट करता येतात. कारण त्या (वननोट प्रकारच्या) एचटिएमेल एडिटर मध्येच जातात.
कॉल रेकॉ चं नंतर टायपतो.
4 Mar 2015 - 6:39 pm | कंजूस
कॉल रेकॉर्ड करायचा झाला तर गुपचूप करायला परवानगी नाही. सोय असल्यास प्रथम सुचना द्यावी लागते. (कॉलसेंटरचे कंप्लेट बुकिंगला तसे करतात)आणि सर्वात महत्त्वाचे हे रेकॉर्डीँग कोर्टात पुरावा म्हणून वापरता येत नाही. चाइना तैवान मधून येणाऱ्या फोनमध्ये ते टाकतात पण इकडे ते हैंडसेट अडवण्याची यांची यंत्रणा नाही. इथे कोड टाकण्याच्या ओएसच्या क्षमतेचा प्रश्न नसून ते अमलात आणणाऱ्या फोनमेकरच्या ध्येयाबद्दल आहे.
एफेम रेकॉर्डीँगमधून ते गाणं मिळालंतरी कॉपिराइटचा एकप्रकारे भंगच होतो.
4 Mar 2015 - 7:50 pm | मदनबाण
इथे कोड टाकण्याच्या ओएसच्या क्षमतेचा प्रश्न नसून ते अमलात आणणाऱ्या फोनमेकरच्या ध्येयाबद्दल आहे.
म्हणजे गुगल आणि मायक्रोसॉफ्टची यांची ध्येय वेगवेगळे दिसते असे म्हणावे लागेल...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पांगळेपणाचे डोहाळे