ई बे वर नुकताच मी एक मोबाइल फोन खरेदी केला. फोन ची कंडीशन व पर्फोर्मन्स हे दोन्ही पण योग्य वाटत आहे. हा फोन इम्पोर्टेड असल्यामुळे तो बराच स्वस्त मिळाला. (२६००० रुपये ओरिजनल किंमत असलेला फोन १२००० ला मिळाला ) फोन चेक केला असता तो unsealed होता. विक्रेत्याला याबाबत विचारले असता त्याने सांगितले कि हे फोन इम्पोर्टेड असल्यामुळे त्यांचे कस्टम कडून चेकिंग होते. तसेच या फोन मधले अक्सेसरीज देखील थोडी वेगळी आहेत. याबद्दल त्याने स्पष्टीकरण दिले कि हे सर्व अक्सेसरीज भारतासाठी नसून ते इतर देशांसाठी केले जातात त्यामुळे ती वेगळी आहेत. हे सर्व त्याने त्याच्या जाहिरातीमध्येही नमूद केले होते. त्याचे स्पष्टीकरण योग्य वाटत असले तरी मी पहिल्यांदाच अश्या पद्धतीची खरेदी केली असल्यामुळे काही शंका आहेत. जाणकार माझ्या खालील प्रश्नांना उत्तरे देऊ शकतील का. ?
१) इम्पोर्टेड फोने नेमके काय असतात? ते इथे भारतात विकणे आणि वापरणे गैर तर नाही ना ?
२) फोन चे अक्सेसरीज हि देशानुसार बदलतात का ?
३) फोन मी जेव्हा पहिल्यांदा चालू केला तेव्हा तो डायरेक्ट सुरु न होता त्याने मला त्याने पूर्ण सेटअप विचारले. याचा अर्थ, फोन हा नवीन आहे. हे माझे assumption बरोबर आहे का?
४) फोनला १ वर्षाची थर्ड पार्टी वॉरन्टी आहे. थर्ड पार्टी वॉरन्टीम्हणजे नेमके काय? हि विश्वसनीय आहे का.?
५) फोन ची रिसीट आणि वॉरन्टी ची त्याने सौफ्टकॉपी देण्याचे त्याने काबुल केले आहे. हे दोन्ही नसल्यामुळे मी हा फोन परत घ्यावा म्हणून मेल केला होता. मेल केल्यानंतर त्याने दोन्ही डॉक्युमेंट ई मेल करतो त्याची प्रिंट काढून घ्या असे सांगितलेय अश्या पद्धतीने मिळालेली डॉक्युमेंटस ग्राय्ह धरली जातात का ?
६) हे डॉक्युमेंट, फोन हरवल्यावर पोलिस कम्प्लेंट करतांना ग्राह्य धरले जातील का ?
प्रतिक्रिया
26 Feb 2015 - 5:14 pm | आनन्दा
योटा घेतला का?
26 Feb 2015 - 5:19 pm | बाप्पू
योटा म्हनजे काय ?
26 Feb 2015 - 5:21 pm | बाप्पू
मी एल जी च फोन घेतला आहे. वर नाव लिहायला विसरलो.
26 Feb 2015 - 5:35 pm | तुषार काळभोर
२. चार्जर वेगळा असू शकतो, कारण वेगवेगळ्या देशांत वेगवेगळ्या आकाराची विद्युत कनेक्टर्स असतात.
३. ५ तास ते ५ वर्षे (कितीही) वापरलेला जुना फोन फॅक्टरी रिसेट केल्यावर नव्यासारखा चालू होतो. त्यामुळे "पूर्ण सेटअप विचारणे" हे फोन नवा असण्याचे लक्षण नाही.
४. फ्लिपकार्ट पैसा व कागद वाचवणासाठी इन्वॉईसची हार्डकॉपी देत नाही, डिलीव्हरीनंतर मेलवर पीडीएफ स्वरुपात इन्वॉईसची सॉफ्ट्कॉपी येते. ही वॉरंटी दाव्यासाठी प्रिंट काढून वापरता येते.
५. नक्की माहिती नाही, बहुतेक पोलिसांना चालत असावेत.
26 Feb 2015 - 6:16 pm | बाप्पू
प्रतिसादबद्दल धन्यवाद पैलवान...
26 Feb 2015 - 5:35 pm | मालोजीराव
काही वर्षांपूर्वी बरेच फोन भारतात उपलब्ध नव्हते त्यावेळी HTC चे २-३ फोन मी असेच थर्ड पार्टी वॉरन्टी सह मागवले होते.चांगले आणि स्वस्त मिळालेले
HTC Touch pro 2
HTC Advantage
HTC Mytouch 3g Slide
26 Feb 2015 - 5:46 pm | आदूबाळ
कस्टम्स तत्त्वतः उघडून बघू शकतात, पण बघतीलच असं नाही. ते बहुतेक सँपल बेसिसवर तपासणी करत असल्यामुळे न उघडण्याची शक्यता जास्त असते.
हा फोन "रीफर्बिश्ड" आहे का? म्ह० परदेशात कोणीतरी अगोदर वापरलेला फोन नव्यासारखा चकाचक करून द्यायचा. वेगळ्याच अॅक्सेसरीज वगैरे याच्याशी सुसंगत आहे.
रीफर्बिश्ड असेल तर - सेकंड हँड फोन आयात करता येतो का हा प्रश्न आहे. बर्याच सेकंड हँड गोष्टी आयात करायला बंदी असते, किंवा त्यावर भयानक मोठी कस्टम्स ड्यूटी असते. उदा. सेकंडहँड कारवर माझ्या माहितीप्रमाणे १८०% कस्टम्स ड्यूटी असते.
उगाच घाबरवण्याची इच्छा नाही, अन् मला पूर्ण माहितीही नाही. तरी काळजी घ्या असं सुचवेन.
26 Feb 2015 - 5:53 pm | टवाळ कार्टा
असे असेल तर पहिली गोष्ट म्हणजे ती वस्तु ऑन्लैन खुलेआम कशी विकली जौ शकते? आणि कस्टम्स ड्यूटी आयात करणार्याने भरायला हवी....इथे विकत घेणार्याने नाही ना
26 Feb 2015 - 6:22 pm | आदूबाळ
आयात करणाराच भरतो, आणि मग वस्तूच्या किंमतीत अॅडवतो. म्हणजे शेवटी विकत घेणार्याच्या शिरावरच ती ड्यूटी पडते.
26 Feb 2015 - 6:02 pm | बाप्पू
फोन "रीफर्बिश्ड" नाही आहे. नविन च आहे.
26 Feb 2015 - 8:44 pm | योगी९००
३) फोन मी जेव्हा पहिल्यांदा चालू केला तेव्हा तो डायरेक्ट सुरु न होता त्याने मला त्याने पूर्ण सेटअप विचारले. याचा अर्थ, फोन हा नवीन आहे. हे माझे assumption बरोबर आहे का?
एखादा फोन वापरून नंतर फॅक्टरी रिसेट केला तर तो पुर्ण सेटअप परत विचारू शकतो किंवा त्यातली मुळ OS चा build परत टाकला तरी तो पुर्णपणे परत सेटअप विचारतो. असा स्वस्तातला घेतला गेलेला फोन हा एकतर चोरीचा असण्याची शक्यता आहे किंवा रिफर्बिश्ड असण्याची शक्यता आहे.
बाकी LG चा कोणता फोन घेतला? LG G2 घेतला का?
26 Feb 2015 - 9:08 pm | बाप्पू
nexus 4
27 Feb 2015 - 11:37 am | यमगर्निकर
माझ्या मते हा क्लोन पिस असावा, मध्यंतरि माझ्या मित्राने आय फोन ५ क्लोन पिस घेतला होता, तोहि ९०००/- मध्ये (ओरिजनल किंमत ४५०००/- होति,) पण कितिहि निर्खुन पाहिले तरि ओरिजनल आणि क्लोन पिस मध्ये फरक ओळखुन येत नव्हता, तर तसा काहि प्रकार आहे का? याचि खात्रि करुन घ्या, तशि खत्रि तुम्हाला एल जि च्या सर्विस सेंटर मध्येच होउ शकते.
27 Feb 2015 - 8:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
क्लोन पिस असावा ला +१००
सद्या "सामसुंग" हा शब्द गाळून फक्त गॅलॅक्सी नोट३, गॅलॅक्सी नोट४, अश्या नावांनी सर्व गॅलॅक्सी सिरीजमधले अगदी मूळ फोनसारखे दिसणारे फोन जालावर आणि ईमेलवरून सर्रास विकले जात आहेत. काही जाहिरातीत क्लोन आहे असे कुठेतरी कोपर्यात लिहीलेले असते तर इतर काहीत तेही नसते ! इतर कंपन्यांच्या बाबतीत तसेच होत असल्यास आश्चर्य नाही.
27 Feb 2015 - 1:34 pm | जानु
अलि एक्सप्रेस बद्द्ल काय मत आहे?
27 Feb 2015 - 5:32 pm | हितु
११) इम्पोर्टेड फोने नेमके काय असतात? ते इथे भारतात विकणे आणि वापरणे गैर तर नाही ना ?
हा फोन भरता साठी बनवलेला नसून, हा फोन अमेरिका किवा चीन या सारख्या देसंसाठी बनवलेला अस्तो. असे फोने इम्पोर्ट करणे किवा विकणे इल्लिगल नहि. फक्त हा फोन कश्या प्रकारे इम्पोर्ट केला आहे त्याच्या वर लीगल किवा इल्लिगल सांगता येईल .
२) फोन चे अक्सेसरीज हि देशानुसार बदलतात का ?
हो, अमेरिका मध्ये ११० volt वापरतात,आणि अमेरिकन charger पिन पण वेगळी असते .
३) फोन मी जेव्हा पहिल्यांदा चालू केला तेव्हा तो डायरेक्ट सुरु न होता त्याने मला त्याने पूर्ण सेटअप विचारले. याचा अर्थ, फोन हा नवीन आहे. हे माझे assumption बरोबर आहे का?
assumtion बरोबर असू सकते पण, फोन हार्ड रीसेट केल्यावर पण असाच मेनू येतो.
४) फोनला १ वर्षाची थर्ड पार्टी वॉरन्टी आहे. थर्ड पार्टी वॉरन्टीम्हणजे नेमके काय? हि विश्वसनीय आहे का.?
third party warranty म्हणजे , unautorized भारतातील सेर्विस कंपनी ची warranty . या कंपनिन ची सरविस नेहमीच चांगली असते असे नाही . पण त्याचे असे आहे कि "दुबते हुवे को तिन्केका सहारा "
५) फोन ची रिसीट आणि वॉरन्टी ची त्याने सौफ्टकॉपी देण्याचे त्याने काबुल केले आहे. हे दोन्ही नसल्यामुळे मी हा फोन परत घ्यावा म्हणून मेल केला होता. मेल केल्यानंतर त्याने दोन्ही डॉक्युमेंट ई मेल करतो त्याची प्रिंट काढून घ्या असे सांगितलेय अश्या पद्धतीने मिळालेली डॉक्युमेंटस ग्राय्ह धरली जातात का ?
-- असी documents चालतीलच असे नाही, document मिळाल्यावर जवळच्या service center मध्ये दाखवून खात्री करून घ्या .
६) हे डॉक्युमेंट, फोन हरवल्यावर पोलिस कम्प्लेंट करतांना ग्राह्य धरले जातील का ?
-- police station मध्ये ओळख किती आहे यावर हे अवलंबून आहे. माझ्या मते original documents असलेली बरि.
मी स्वता mobile import करून विकलेले आहेत,
28 Feb 2015 - 4:05 pm | टीपीके
http://www.imei.info/ वर चेक करून बघा, ओरीजीनल आहे की क्लोन हे कळेल.