अ : काय हिरो , काय काय . जोब कसा चालू आहे
ब . काय नाय निवांत . जोब मस्त . सध्या टीम लीड झालो आहे त्यामुळे फक्त दुसर्याचे काम चेक करतो . फारसे टेक्निअल काम करत नाही हल्ली
अ : मजा आहे कि मग .आता अजून ३-४ वर्षात मेनेजर झाल्यावर मग तर पूर्ण इमेल आणि एक्सेल आणि फोन एवडेच वापरावे लागेल
ब . हो ना यार . मेनेज्मेण्ट मध्ये गेलेले बरे असतंय रे
वरचे अ आणि ब ६-९ वर्षे अनुभव असलेले आईटी(सर्विस) क्षेत्रामध्ये एक सर्वसाधारण अभियंते.सर्वसाधारण म्हणण्याचे म्हणजे प्रत्तेक क्षेत्रामध्ये उत्तम काम करणारे , स्वत:चे काम आवडत असणारे , नवीन संकल्पना पुढे आणणारे असे लोक असतातच पण हे लोक सर्व साधारण या गटात येत नाहीत तर अपवाद या गटात येतात .
त्यामुळे खालील लिखाण/प्रश्न हे बहुसंख्य सर्वसाधारण लोकांना डोळ्यासमोर धरून पडलेले आहेत
तर सांगायचा मुद्दा हा कि आईटी क्षेत्रामध्ये माणूस फ्रेशर म्हणून लागला कि सर्वसाधारणपणे ५ वर्षात त्याला आपले प्रोमोशन झाले नाही तर तर अपराधी असल्याची भावना येते आणि लवकरात लवकर मेनेजर बनून त्याला टेक्निअल काम बंद करायचे असते . पण हे असे अजून किती वर्षे चालणार ?
१. स्वत: ला सारखे अपडेट ठेवणे सगळ्यांना शक्य होईल का ?
आईटी मधले स्किल हे साधारण ३-४ वर्षात पूर्ण बदलत असते . जी लोक सो कॉल्ड मेनेज्मेण्ट मध्ये
नसतील त्यांना जर नोकरी टिकवायची असेल तर रिटायर होऊ पर्यंत सतत अभ्यास करावा लागणार . सतत नवीन शिकावे लागणार . ३०-४० पर्यन्त नवीन स्किल आत्मसात करणे जमू शकेल पण ४५+ नंतर हे शक्य होईल का ?
२.अजून १५-२० वर्षांनी भारतीय आईटी(सर्विस) कंपनी वर परिणाम कसा होईल आणि त्या तो कसा हाताळतील ?
साधारण पणे भारतीय आईटी(सर्विस) कंपनी या ओफशोर वरच्या २-७ वर्ष अनुभव असलेल्या लोकामुलेच फायदा कमवत असतात आणि एखादी वेळ अशी येईल कि कंपनीमधले बरेच लोक १५-२०् वर्षे
अनुभव असलेलो साधारण लोक असतील . एक तर कंपनी त्यांचा पगार कमी करेल नाही तर कामावरून काढून टाकेल . पण काहीही झाले तरी नुकसानी मध्ये धंदा करणार नाही , त्यावेळचे चित्र कसे असेल ?
३ आईटी मधला रिटायर झालेला माणूस कसा असेल ?
सध्या तरी आईटी मधला एवेरेज वय साधारण ३० च्या आसपास असेल असे मानले तरी यातले सगळेच लोकांना काही दर वर्षी ५-२० टक्के पगार वाढ , दर ३-४ वर्षांनी प्रोमोशन मिळणार नाही .
तर अजून २०-३० वर्षांनी आईटी चे चित्र कसे असेल ?
आईटी मधील लोकांना रिटायर होने नशिबात असेल का ?
४. सध्या तरी आईटी ओफशोरिंग मध्ये भारत बाप आहे . पण फिलिपिन्स , मलेशिया पोलंड , चाइना , स्लोवाकिया सारखे देश पण सध्या बराच मार्केट मारत आहेत . या देशाकडून स्पर्धा चालू झाली कि भारत कसा रीस्पोंड करेल ? हि स्पर्धा एकदम तीव्र झाली तर वरचे सगळेच प्रश्न इनव्हेलीड होतील का ?
तुम्हाला काय वाटते ?
प्रतिक्रिया
21 Feb 2015 - 8:13 pm | श्रीगुरुजी
>>> "पर्सोनल" प्रश्न
?
नाही. मी Clustra डेटाबेस वर काम केलेले नाही.
24 Feb 2015 - 6:34 pm | डॉ सुहास म्हात्रे
ते "पर्सोनेल" असं असेल तर ते Clustra डेटाबेस चा अनुभव असलेल्या माणसाच्या शोधात आहेत असे समजायला हरकत नाही :)
22 Feb 2015 - 3:50 am | संदीप डांगे
हा बाबा काय म्हंतो बगा जरा. लै भारी बोल्ला बॉ....
"Do not become Engineering Graduate, Become Engineers, Engineer SOMEthing."
https://www.youtube.com/watch?v=oQEFO393cd0
22 Feb 2015 - 2:01 pm | डॉ सुहास म्हात्रे
भारी व्हिडीओ आहे... कोणीतरी उत्तरांसाठी पश्चिमेकडे न बघता आपल्यापण पायाखालीसुद्धा मजबूत जमीन आहे असा विचार करायला लागले आहे, हा विचारच उत्साहवर्धक आहे.
भारतातल्या सदोष शिक्षणपद्धतीमुळे आपल्याला प्रत्येक प्रश्न स्वतंत्रपणे सोडवायचा प्रयत्न करण्याऐवजी पश्चिमेत त्याचे उत्तर कोणी शोधले आहे का ते शोधायची आणि त्यांचा अंधपणे त्याचा पाठपुरावा करण्याची सवय लागली आहे... अगदी ते उत्तर आपल्या परिस्थितीला योग्य नसले तरी... आणि मग यशस्वी झालो नाही की 'सिस्टीम' आहेच दोष द्यायला !
मंगळयान मोहिमेत इस्रोने गुरुत्वाकर्षणाचा विरोध टाळायला गुरुत्वाकर्षणच यशस्वीपणे वापरले आणि खर्च अनेक पटींनी कमी केला. या संदर्भात अवकाशप्रवासाच्या प्रगतीतली अजून एक कथा आठवली. कदाचित दंतकथाही असू शकेल आणि कदाचित खूप जणांना आधीच माहित असेल. पण उद्बोधक आहे म्हणून व्दिरुक्तीचा दोष पत्करून इथे लिहीतो आहे...
तुकडे होण्यापूर्वी सोव्हिएट युनियनचे अवकाशयान तंत्र अमेरिकेच्या बरेच पुढे होते. सोव्हिएट युनियनचे तुकडे झाल्यावर बरेच अवकाश शास्रज्ञ/तंत्रज्ञ अमेरिकेत स्थलांतरीत झाले. नासामध्ये एकदा चर्चा चालू होती. अमेरिकन तंत्रज्ञांनी अश्याच एका रशियन तंत्रज्ञासमोर, अवकाशात (गुरुत्वाकर्षण नसल्याने) शाईच्या/बॉल पेनने लिहीण्याला असणारा अडथळा पार करण्यासाठी ५ दशलक्ष डॉलर्स खर्च करून खास पेन कसे बनवले, त्याची कहाणी अभिमानाने खुलवून खुलवून सांगितली.
मग शेवटी एकाने त्या रशियन तंत्रज्ञाला विचारले, "तुम्ही लोकांनी तर युरी गागारीनला आमच्या अगोदर अवकाशात पाठवले होते. तुम्ही ही समस्या कशी सोडवलीत ?
रशियन सहजपणे बोलून गेला, "आम्ही पेन्सिल वापरली." +D
22 Feb 2015 - 11:51 pm | संदीप डांगे
साधे शाळा-कॉलेजमधले उदाहरण बघितले तरी शिक्षणपद्धती किंवा सामाजिक परिस्थिती कशी आहे ते लक्षात येते. एखाद्या प्रश्नाचे उत्तर नेमके कसे लिहिले की शिक्षकांना बरोबर वाटेल ह्या पद्धतीने शोधले जाते. निबंध लिहायला सांगितला गायीवर तर गेले कित्येक दशके तोच तोच निबंध लिहिला जात आहे. जशी पहिल्या पानावरची प्रतिज्ञा तसाच गायीचा निबंध हे भारतिय राज्यघटनेत लिहिलेले कुठलेसे कलम किंवा विज्ञानच्या पुस्तकातली एखादी व्याख्या आहे जिचा एक शब्द इकडे का तिकडे होता कामा नये.
बारावी ला कॉलेजमधे साधा परिक्षेचा अर्ज स्वतःचा स्वतः न भरता येणारे ९०% टक्के मुले पाहिलीत. त्यातही ते दुसर्याने काय लिहिले आहे ते बघून लिहित होते. :-)
23 Feb 2015 - 9:25 am | अमित खोजे
सोत्रीजी,
तुमचे प्रतिसाद आवडले. अतिशय अभ्यासपूर्णक आणि विस्तृत आहेत. एकंदरीत सर्वांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे आणि त्याला तुम्ही आणि बर्याच लोकांनी दिलेल्या परिपूर्ण - अर्थपूर्ण प्रतिसादांमुळे हा धागा अगदी संग्रही ठेवण्यासारखा झाला आहे. त्यामध्ये कालच वाचत असताना हि लिंक मिळाली. विप्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी - श्री कुरेन यांनी दिलेल्या मुलाखतीमधील मधल्या स्तरातील व्यवस्थापनाची गरज आणि त्यामागील नोकरदार माणसांचा दृष्टीकोन हा मुद्दा मला महत्वाचा वाटतो.
http://boomlive.in/middle-managers-act-routers-future-wipro-ceo-kurien/
23 Feb 2015 - 2:46 pm | पेट थेरपी
सोत्री उत्तम प्रतिसाद. मला एक सांगा बिझनेस प्रोसेस कोअर नॉलेज असणे महत्त्वाचे का सॉफ्ट्वेअर जसे इआर पी
चे ज्ञान असलेले जास्त चांगले.
23 Feb 2015 - 4:11 pm | विजुभाऊ
सॉफ्टवेअर चे ज्ञान शिकुन मिळवता येते. कोअर बिझनेस प्रोसेस चे ज्ञान अनुभवाने मिळते. अर्थात बिझनेस प्रोसेस चे ज्ञान असणे महत्वाचे. त्बिझनेस प्रोसेस ला. केम्द्रस्थानीठेवून बनवलेले सॉफ्टवेर ( उदा: ई आर पी) हे जर मूळ ज्ञान असेल तर सहज शिकता येते. बिझनेस प्रोसेस जर आस्तित्वातच नसेल तर सॉफ्टवेअर तरी कशाचे बनवणार?
23 Feb 2015 - 6:47 pm | सांगलीचा भडंग
ज्ञान आणि अनुभव : कोणत्याही गोष्टीचे ज्ञान (कोअर बिझनेस ,सॉफ्टवेअर अथवा दुसरे काही ) हे पहिल्यांदा शिकूनच मिळवता येते . आणि अनुभव म्हणाल तर त्या त्या क्षेत्रात जेवढे काम कराल तेवढा तो वाढतो . खाचाखोचा कळतात . कोअर /सॉफ्टवेअर असा फरक करायचे काही कारण नाही .
बिझनेस प्रोसेस जर आस्तित्वातच नसेल तर सॉफ्टवेअर तरी कशाचे बनवणार?
हे वर वर जरी वाचायला बरे वाटत असले तरी सध्याच्या काळात सगळेच एकमेकावर अवलंबून आहेत. आणि सगळ्यांनाच एकमेकांची गरज असते .
त्यामुळे सगळ्यांनी एकमेकांची मदत केल्याशिवाय कुणाचीही प्रगती होत नाही . विमान प्रवास , बेंक , मोबैल , संरक्षण क्षेत्र , मनोरंजन , हॉस्पिटल या सगळी कडे एकदा नजर टाकून बघितले तर जाणवेल कि सॉफ्टवेअर सगळी कडेच आहे .
त्यामुळे बिझनेस प्रोसेस जर आस्तित्वातच नसेल तर … हा जर तर चा प्रश्न काहीही उपयोगाचा नाही . प्रोसेस सगळी कडे फार पूर्वीपासून होत्या .
23 Feb 2015 - 7:28 pm | विजुभाऊ
असहमत. उदा: १) तिकीट काढून विमान प्रवास उपलब्ध आहे. तिकीट बुकिंग च्या सॉफ्टवेअर शिवायसुद्धा विमानप्रवास होतच होता की. त्याच्या शिवाय विमानप्रवास होऊ शकणार नाही असे नाही. अर्थात सॉफ्टवेअर वापरल्यामुळे त्या ऑपरेशन मधे सुसूत्रता आली. गतिमानता आली. बिझनेस प्रोसेस होती म्हणून सॉफ्टवेअर निर्माण करण्याची गरज निर्माण झाली
२) ए टी एम मशीन नसताना ब्यांकेच्या काउंटर वर पैसे मिळत होते. ए टी एम आले म्हणून पैसे मिळायला लागले असे नाही. काही ब्याम्कानी रात्री अपरात्री पैसे मिळतील अशा शाखा उघडल्या होत्या. कोअर ब्याम्किंग मुळे ब्यांकांच्या व्यवहारात सुसूत्रता आली . गतिमानता आली. बिझनेस प्रोसेस होती म्हणून सॉफ्टवेअर निर्माण करण्याची गरज निर्माण झाली
३) मोबाइल फोन नव्हते त्या काळात साधे फोन आस्तित्वात होते.
४) मनोरम्जन क्षेत्रात सम्गणक नव्हते त्या काळापासून चित्रपत बनत होते. टीव्ही कार्यक्रम बनत होते. सॉफ्टवेअर आल्यामुळे एडीटिंग ट्रान्मिशन वगैरे मधे कल्प्पनातीत सुधारणा झाल्या. सॉफ्टवेअर वापरल्यामुळे त्या ऑपरेशन मधे सुसूत्रता आली. गतिमानता आली. बिझनेस प्रोसेस होती म्हणून सॉफ्टवेअर निर्माण करण्याची गरज निर्माण झाली
23 Feb 2015 - 7:50 pm | सांगलीचा भडंग
बिझनेस प्रोसेस होती म्हणून - सॉफ्टवेअर- निर्माण करण्याची गरज निर्माण झाली यामध्ये सॉफ्टवेअर हा शब्द काढून दुसरे काहीही टाकले तरी माझा मुद्दा कळेल.
आधी शेती करताना बैल वापरत होते नांगरणी साठी . मग ट्रेक्तर आले . ( नांगरणी आली म्हणून ट्रेक्तर निर्माण करायची वेळ आली )
आधी शिडाच्या जहाजामधून प्रवास होत होता आता मोठी शिप्स आहेत ( म्हणजे प्रवास आला म्हणून मोठी शिप्स निर्माण करायची निर्माण झाली )
आधी लोक कमरेला पाने बांधायचे आता अंगभर कपडे घालतात त्यामुळे कापड गिरण्या आल्या ( म्हणजे कापड आले म्हणून कापड गिरणी निर्माण झाली )
आधी लोक मनोरंजन म्हणून रेदिओ आईकायचे आता टीव्ही , इंटरनेट सारखी साधने आली ( म्हणजे लोकाना मनोरंजन चांगले पाहिजे म्हणून टीवी तयार झला )
वरच्या सगळ्या क्षेत्रा मध्ये बिझनेस प्रोसेस आहे आणि त्यामध्ये मध्ये सुधारणा होत आहे . सॉफ्टवेअर हा पण त्या बदलाचा एक भाग आहे ती पण एक प्रोसेस आहे . सगळी कडे प्रगती होण्यासाठी मेकानिकल , सिविल , एलेक्ट्रिकल सारख्या क्षेत्र बरोबर मेनेज्मेण्ट ,सॉफ्टवेअर, या सगळ्यांचा सहभाग असतो
सर्वात शेवटी माणसाची गरज हीच सगळ्या बिझनेस आणि त्याच्या प्रोसेस शी जननी असते त्यामुळे कोर बिझनेस असे काही नसते . सगळेच एकमेकावर अवलंबून आहेत
24 Feb 2015 - 12:15 am | संदीप डांगे
मी एक संगणक अभियंता आहे. कंपनीने माझी नेमणूक परदेशी केली. तिथे जाण्यासाठी मला विमान वापरावे लागले. मोठ्या हुद्द्यावर असल्याने चांगले कपडे, सूट-बिट विकत घ्यावा लागला. तिथे येण्याजाण्यासाठी एक कार घेतली. जेवणासाठी मीटींगसाठी वेगवेगळ्या हॉटेल्स मधे जाउ लागलो. पैसा बर्यापैकी मीळत असल्याने गावाकडे घर घेतले, शेअर बाजारात गुंतवणूक केली. यासाठी वेबसाइट वापरल्या.
माझ्या सारखे हजारो अभियंते काम करू लागले, त्यांच्या गरजा ह्या आधारित व्यवसायांना चालना देणार्या ठरल्या. त्यांचा व्यापार वाढला, त्यांना लागणार्या सॉफ्ट्वेअरसाठी आमची मागणी वाढली.
सगळे एकमेकांवर आधारित आहे. कोअर बिझनेस आहे म्हणून प्रोसेस आहे, आणि प्रोसेस हा सुद्धा एक कोअर बिझनेस आहे.
24 Feb 2015 - 12:23 am | संदीप डांगे
माझ्यामते कोअर बिझनेस म्हणजे रोटी, कपडा और मकान.
बाकी सर्व अधिकाधिक श्रीमंत होण्यासाठी ह्या कोअर बिझनेसला आधारित इतर सहाय्यक बिझनेसेस. त्यांच्या सोयीसाठीच प्रवास, बँका, दळण्वळणाची साधने.... कोअर बिझनेसमधे जरा कुठे खुट्ट झाले की सगळीकडे त्याचे पडसाद उमटतात.
26 Feb 2015 - 9:36 am | मदनबाण
आयटीवाल्यांसाठी बातमी...
IT sector to create 13% less jobs in FY16, says Nasscom; companies like Infosys, Capgemini, others to hire fewer people
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Swine
flu: India's Ahmedabad limits public gatherings
12 May 2017 - 9:44 pm | मदनबाण
आयटी अपडेट्स :-
Why I have become pessimistic about Indian IT industry
5 reasons why Indian IT giants are laying off employees
Carnage in Indian IT: Wipro, Infosys, Tech Mahindra, Cognizant slash jobs
Indian IT Workers Brace For Bloodbath As Industry Veers Towards Jobless Growth
Indian IT Layoffs: Thousands of Jobs Set to be Axed
Indian IT firms seek to cut costs; techies may lose jobs to robots, not Donald Trump
‘This is a nightmare’: Techies outrage on social media over mass layoffs in the Indian IT sector
Pink slip woes: 7 IT companies in India to ask at least 56,000 employees to leave, say reports
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Infosys defers salary hikes till July; no job cuts planned
IT cos had firing list ready 5 years back
Techie, and worried about layoffs? These 20 skills can help you stay relevant
12 May 2017 - 10:55 pm | उदय
आता भारतात पण मोठ्या प्रमाणात पिंकस्लिपचे पर्व सुरू झाले तर. :( वेलकम टू ग्लोबल इकॉनॉमी.