आईटी(सर्विस) क्षेत्रामधील सर्वसाधारण अभियंते

सांगलीचा भडंग's picture
सांगलीचा भडंग in काथ्याकूट
19 Feb 2015 - 2:46 am
गाभा: 

अ : काय हिरो , काय काय . जोब कसा चालू आहे
ब . काय नाय निवांत . जोब मस्त . सध्या टीम लीड झालो आहे त्यामुळे फक्त दुसर्याचे काम चेक करतो . फारसे टेक्निअल काम करत नाही हल्ली
अ : मजा आहे कि मग .आता अजून ३-४ वर्षात मेनेजर झाल्यावर मग तर पूर्ण इमेल आणि एक्सेल आणि फोन एवडेच वापरावे लागेल
ब . हो ना यार . मेनेज्मेण्ट मध्ये गेलेले बरे असतंय रे

वरचे अ आणि ब ६-९ वर्षे अनुभव असलेले आईटी(सर्विस) क्षेत्रामध्ये एक सर्वसाधारण अभियंते.सर्वसाधारण म्हणण्याचे म्हणजे प्रत्तेक क्षेत्रामध्ये उत्तम काम करणारे , स्वत:चे काम आवडत असणारे , नवीन संकल्पना पुढे आणणारे असे लोक असतातच पण हे लोक सर्व साधारण या गटात येत नाहीत तर अपवाद या गटात येतात .
त्यामुळे खालील लिखाण/प्रश्न हे बहुसंख्य सर्वसाधारण लोकांना डोळ्यासमोर धरून पडलेले आहेत

तर सांगायचा मुद्दा हा कि आईटी क्षेत्रामध्ये माणूस फ्रेशर म्हणून लागला कि सर्वसाधारणपणे ५ वर्षात त्याला आपले प्रोमोशन झाले नाही तर तर अपराधी असल्याची भावना येते आणि लवकरात लवकर मेनेजर बनून त्याला टेक्निअल काम बंद करायचे असते . पण हे असे अजून किती वर्षे चालणार ?

१. स्वत: ला सारखे अपडेट ठेवणे सगळ्यांना शक्य होईल का ?
आईटी मधले स्किल हे साधारण ३-४ वर्षात पूर्ण बदलत असते . जी लोक सो कॉल्ड मेनेज्मेण्ट मध्ये
नसतील त्यांना जर नोकरी टिकवायची असेल तर रिटायर होऊ पर्यंत सतत अभ्यास करावा लागणार . सतत नवीन शिकावे लागणार . ३०-४० पर्यन्त नवीन स्किल आत्मसात करणे जमू शकेल पण ४५+ नंतर हे शक्य होईल का ?

२.अजून १५-२० वर्षांनी भारतीय आईटी(सर्विस) कंपनी वर परिणाम कसा होईल आणि त्या तो कसा हाताळतील ?
साधारण पणे भारतीय आईटी(सर्विस) कंपनी या ओफशोर वरच्या २-७ वर्ष अनुभव असलेल्या लोकामुलेच फायदा कमवत असतात आणि एखादी वेळ अशी येईल कि कंपनीमधले बरेच लोक १५-२०् वर्षे
अनुभव असलेलो साधारण लोक असतील . एक तर कंपनी त्यांचा पगार कमी करेल नाही तर कामावरून काढून टाकेल . पण काहीही झाले तरी नुकसानी मध्ये धंदा करणार नाही , त्यावेळचे चित्र कसे असेल ?

३ आईटी मधला रिटायर झालेला माणूस कसा असेल ?
सध्या तरी आईटी मधला एवेरेज वय साधारण ३० च्या आसपास असेल असे मानले तरी यातले सगळेच लोकांना काही दर वर्षी ५-२० टक्के पगार वाढ , दर ३-४ वर्षांनी प्रोमोशन मिळणार नाही .
तर अजून २०-३० वर्षांनी आईटी चे चित्र कसे असेल ?
आईटी मधील लोकांना रिटायर होने नशिबात असेल का ?

४. सध्या तरी आईटी ओफशोरिंग मध्ये भारत बाप आहे . पण फिलिपिन्स , मलेशिया पोलंड , चाइना , स्लोवाकिया सारखे देश पण सध्या बराच मार्केट मारत आहेत . या देशाकडून स्पर्धा चालू झाली कि भारत कसा रीस्पोंड करेल ? हि स्पर्धा एकदम तीव्र झाली तर वरचे सगळेच प्रश्न इनव्हेलीड होतील का ?

तुम्हाला काय वाटते ?

प्रतिक्रिया

नंबर २ ची परीस्थीती सुरू झाली आहे.

स्रुजा's picture

19 Feb 2015 - 5:55 am | स्रुजा

सहमत ! गोष्टी आता १५-२० वर्षांनी बदलत नाहीत. बद्लण्याचा काळ आता ५-६ वर येऊन थांबलाय.

९०- २००० च्या दशकात आयटी क्षेत्र बाल्यावस्थेत होतं , तिकडून इकडे बिझिनेस आणणारे उत्तर अमेरिकेतले लोकं पण ऑफ शोअर च्या खाचा खो चा शिकत होते. आता फ्रेशर्सना आणि मिड लेव्हलच्या लोकांना मिळणारा पगार बघत त्यांच्या गुंतवणुकीचा परतावा कमी झालाय. हेच लोकं खरे डिलीव्हरेबल्स देतात बाकी मॅनेजमेंट आणि एच आर वगैरे खरं तर ओव्हर हेडच असतात.
हे सगळं बघता भारतामध्ये पुर्ण प्रॉ डक्ट तयार करणं हे व्ही. सी. ज ना जास्त किफायतशीर वाटतंय कारण भारतात कौशल्य आहे आणि आता इंडस्ट्री अगदी योग्य प्रगल्भ स्थितीवर आहे जिथे ते एक पुर्ण प्रॉडक्ट बनवू शकतील. आत्ता एक तर स्वतः एखादी प्रॉडक्ट ची कल्पना तयार ठेवोन त्यासाठी गुंतवणूक्दार शोधणे अथवा अशा एखाद्या कंपनी मध्ये काम करणे हे जास्त चांगलं आहे.

राहता राहिली स्किल सेट अपडेट करण्याची गोष्ट. एक तर फकत आमची इंडस्ट्री नाही जिथे हे करावं लागतं. वैद्यकीय क्षेत्रातले लोक हे सातत्याने करत असतात. ज्या त्या व्यवसायाची ती गरज आहे. दुसरी गोष्ट अशी की नवीन टेक्नोलॉजी आली म्हणून जुनं लगेच जात नाही. अनेकदा नव्या कंपन्या ज्यांना बूटस्ट्रॅपिंग करून कंपनी चालू करावी लागली आहे ते एक जनरेशन जुन्या टेक्नॉलोजी नी सुरु करतात आणि ग्राहक मिळाले की रीव्हॅम्प करतात कारण बर्याचदा प्रॉडक्ट परवडणार्या लोकांना घेऊन आणि परव डणार्‍या टेक्नॉलॉजी ने आधी बाजारात आणावं लागतं. साधारण हेल्थ केअर ,ई लर्निंग, ई रेक्रुटींग (एच आर एम एस ) वाले आधी प्रॉडक्ट बाजारात आणण्याला महत्त्व देतात कारण त्यांचा ग्राहक जो हे रोज च्या रोज वापरणार असतो तो मध्यम ते उत्तम रित्या एक्सेल वर प्रभुत्त्व असणार ग्रूप असतो आणि त्यांना पडद्यामागच्या टेक्नॉलॉजीपेक्षा किती सहजतेने हे वापरता येतंय याची जास्त फिकीर असते.

योगी९००'s picture

19 Feb 2015 - 7:41 am | योगी९००

मॅनेजमेंट आणि एच आर वगैरे खरं तर ओव्हर हेडच असतात.
वरील वाक्याने ड्वाळे पाणावले. अशा बेसलेस स्टेटमेंटस मुळे खरे तर हसावे की रडावे तेच कळले नाही त्यामुळे डोळ्यात पाणी नक्की कशाने आले हेच कळलं नाही.

कसं काय बेसलेस ? मॅनेजर च्या पो झिशन ला घेतलं तरी हॅन्ड्स ऑन आता सगळी क डे जरुरी झालंय. नुसता मॅनेजमेंट चा अनुभव असलेल्या अनेकांना नोकरि बदलताना मर्यादा येतात. हल्ली आय सी ( Individual contributor) चं महत्त्व अतोनात वाढलंय. जे मॅनेजर्स ओव्हरहेड नसतात ते हॅन्ड्स ऑन करतात म्हणून नसतात . आणि मी बरेचदा ओव्हर हेड असतात अशा अर्थाने ते वाकय टाकलं आहे तुमचे डोळे पाणवले तर पुसा.

योगी९००'s picture

19 Feb 2015 - 7:53 am | योगी९००

पण मॅनेजमेंट आणि HR यांचे काम काय असते याची पुर्ण कल्पना असल्याने मला वाद घालायची इच्छा नाही.

बाकी हॅन्डस ऑन म्ह्णजे नक्की काय हे जरा विस्तार करून सांगू शकाल काय?

त्यांना काम नसते असं माझं पण मत नाहीये. पण पुर्ण प्रोजे़क्ट/ प्रॉड्क्ट ची डिलिव्हरी लक्षात घेता खरे डिलीव्हरेबल्स ते जे कोड पूर्ण करून अंतिम प्रॉडक्ट ग्राहकाला विकण्याच्या स्थिती पर्यंत आणतात. आता हे होण्यासाठी जी पोषक परिस्थिती लागते ऑफ शोअर मध्ये ती एच आ र आणि इतर सगळे घटक पुरवतात म्हणजे एच आर च नसली तर लोकं भरती करणं वेळखाऊ होणार , पर्यायाने अंतिम निकाल उशिरा लागणार वगैरे. हे सगळं मान्यच आहे. पण ते सगळं पुरक आहे, मुख्य उद्देश्य ग्राहकाला माल देणं आहे.

कुठलाही डेव्ह मॅनेजर अथवा टेस्टींग चा मॅनेजर यांना हल्ली टेक्निकल टच असेल आणि स्वतः कोडींग करायची किंवा ऑटोमेशन करायची तयारी असेल आणी तसा अनूभव असेल तर प्राधान्य देतात. माझा मुख्य भर हा सेर्व्हिस बेस्ड वर नसून प्रॉड्क्ट बेस्ड वर आहे. पण सर्व्हिस बेस्ड दोन कंपन्यांमधला माझा अनुभव देखील हाच आहे. एक तर खुद्द क्लायंटकडून मागणी असायची की मॅनेजर नी स्वतः प्रत्यक्ष काम करायला हवं , तशी तयारी आणि नजिकच्या काळात त्यांचा त्यात सराव असावा. चार वर्षांपुर्वी कोडींग केलं होतं या कारणापायी काही लोकं त्यांनी नाकारले होते या पोस्टसाठी. मॅनेजर कडून त्यांना मॅनेजमेंट अशी फक्त तांत्रिक अपेक्षित होती. लोकं मॅनेज करायला कुणी नको होतं. ४० पैकी १६ - २० तास तरी मॅनेजर कडून प्रत्यक्ष काम अपेक्षित होतं. आणि अशा अजून ३ टीम्स होत्या. आधी मॅनेजर म्हणजे लोकांकडून काम करून घेणे हा पण एक भाग असायचा कामाचा. हळूहळू तो कमी होतोय, काही ठिकाणी तो गेलाय. त्या जागी आता या लोकांनी काही डिलीव्हरीज देण्याची अपेक्षा वाढलीये.

माझ्या इथल्या अनुभवावरून सांगते, मॅनेजर म्हणून माझी जबाबदारी टेस्टिंग साठी वातावरण, प्रोसेसेस बनवणं , सगळ्या घटकांना ( डेव्ह , सपोर्ट, बिझिनेस टिम ई) त्या पाळण्याचं महत्त्व पटवणं आणि वेळेचा अंदाज देणं एवढीच प्रामुख्याने येते. पण याही इतकीच किंबहुना जास्त माझी जबाबदारी आय. सी. म्हणून प्रत्यक्ष टेस्टिंगची आहे. ऑटोमेशनची आहे. त्या अनुषंगाने मग स्कोप ठरवणं , तसे प्लान्स बनवणं या सगळ्या तांत्रिक बाबी त्यात येतात. हॅन्ड्स ऑन म्हणजे हे सांगायचं आहे. आता हे थोडं विस्कळीत झालंय कारण मराठी ईंग्रजी सगल्याची पार भेळ केलीये मी. पण भा पो झाल्या तरी पुष्कळ

हो आणि अजून एक राहिलं की हे सगळं मोठ्या कंपन्यां मध्ये सरसकट लागू नाहीये याची पण मला कल्पना आहे पण या सगळ्याचं (हॅन्ड्स ऑन वगैरे)लक्षणीय प्रमाण आहे आणि ते दखल घेण्याजोगं आहे.

अत्रन्गि पाउस's picture

19 Feb 2015 - 10:21 am | अत्रन्गि पाउस

pmp वगैरे भम्पक असेल मग तुमच्या मते !!! आं ?

चिकित्सक's picture

19 Feb 2015 - 12:17 pm | चिकित्सक

आमच्या कंपनी मधे एकाने पीएमपी केले, आणि तो डिप्लोमा केलेल्या मॅनेजर ला रिपोर्ट करतो .
मी सुद्धा एम टेक केलेले आहे आणि माझा मॅनेजर तोच डिप्लोमा होल्डर आहे .
त्याने पीएमपी सर्टिफिकेशन साठी रियिमबर्समेंट मागितले तर सांगण्यात आले कि 'बाहेरच्या सर्टिफिकेशन' चे पैसे देत नाही म्हणून. मुद्दा हा कि इथे डिग्री ला कोणी विचारात नाही तीत सर्टिफिकेशन च काय ? ते तर काही काळा पुरते वॅलिड असतात , नंतर तुम्हाला परत अपीयर व्हाव लागत् अश्या ही काही एमेंसी कंपञीया आहेत ज्या पीएमपी सर्टिफिकेशन ला मनात नाही

सोत्रि's picture

19 Feb 2015 - 2:45 pm | सोत्रि

pmp वगैरे भम्पक असेल मग तुमच्या मते

अतिशयच भंपक!

- (आयटी हमाल) सोकाजी

बादवे - पीएमपी म्हणजे काय? ते नक्की काय करतात?

अनुप ढेरे's picture

19 Feb 2015 - 4:09 pm | अनुप ढेरे

Project Manager Professional असं गूगल केल्यावर दिसलं.

आता मी देखील आयटीत काम करतोय गेले ७ वर्ष. पण ही टर्म पहिल्यांदाच ऐकली आज. हपिसला जाताना रस्त्यातल्या बोर्डावर अनेक कंपन्यांच्या जाहिराती दिसतात. त्यातल्या निम्याहून अधिक टर्म्स मी कधी ऐकलेल्याही नसतात. त्यामुळे आपण आयटी मध्ये काम करतो का नक्की हा प्रश्न पडतो बर्‍याचदा. :D

प्रसाद१९७१'s picture

19 Feb 2015 - 4:36 pm | प्रसाद१९७१

तुम्ही ६ वर्ष आयटी मधे काम करुन PMP माहीती नसेल तर धन्य आहे तुमची अनुपराव.

टवाळ कार्टा's picture

19 Feb 2015 - 4:41 pm | टवाळ कार्टा

+१११११

अनुप ढेरे's picture

19 Feb 2015 - 5:00 pm | अनुप ढेरे

माझ्या ऐकण्यात खरच ही टर्म आलेली नाही कधीही. मी एका प्रॉडक्ट कंपनीत काम करतो. बहुदा सर्वीस बेस्ड कंपनीतली टर्म असेल.

ह्म्म... पीएमपी म्हणजे काय ते आयटीवाल्यांना माहित असायला हवे ते ठीक, पण फ्लोअरवर काम करताना सुद्धा बाजुच्या लाइन मधे कोण बसतो ते सुद्धा कळत नाही. प्रत्येक आयटी टर्म / कोर्स हा माहित असायलाच हवा असे काही नाही.
असो...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोदींनी नऊ महिन्यांत केले काय?

अत्रन्गि पाउस's picture

19 Feb 2015 - 5:39 pm | अत्रन्गि पाउस

Project Manager Professional हे फक्त आयटी साठी नाही कोणत्याही प्रकल्पीय व्यवस्थापनाशी संलग्न आहे ...

ITIL prince२ वगैरे सारखे नाही..;)

हो, माझाही तसाच काहीसा समज आहे.

माझ्या माहितीचे एक गृहस्थ अपस्ट्रीम ऑईल कंपनीत आहेत. तेही पीएम्पीचं बिरुद मिरवतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Feb 2015 - 8:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

ते Project Management Professional आहे.

बाकी चालू द्या ! :)

सतिश गावडे's picture

12 May 2017 - 9:35 pm | सतिश गावडे
कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Feb 2015 - 5:03 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

पी.एम.पी.= पिढीजात माजुरडेपणाचा पुरावा..

थॉर माणूस's picture

19 Feb 2015 - 3:58 pm | थॉर माणूस

*ok* *yes3*

-(PMP वाल्या ड्यामेजरच्या हाताखाली राबलेला) थॉर माणूस

अभिजित - १'s picture

19 Feb 2015 - 8:57 pm | अभिजित - १

एका कंपनी मध्ये PMP असलेला manager २ वर्ष office मध्ये येताच नव्हता .. HR शी सेटिंग होती. पाठदुखीचे निमित करून घरून काम. आणि याचे काम काय तर रिपोर्ट बनवणे फक्त. ते पण हा स्वत न बनवता टीम लीड ला बनवायला सांगायचा. तेच नंतर वरती पाठवायचे. थोडक्यात फुकट पगार खात होता. सुट्ट्या कधीच पास न करणे हेच त्याचे काम. एक दिवस सर्व टीम ने ( ८ लोक ) एकदम राजीनामा फेकला. तेव्हा हायर management जागी झाली आणि त्याला कामावरून काढला.

एकुलता एक डॉन's picture

15 May 2017 - 10:14 am | एकुलता एक डॉन

कोणती कंपनी?
व्यनि करू शकाल ?

नितिन थत्ते's picture

19 Feb 2015 - 8:14 am | नितिन थत्ते

>>आता फ्रेशर्सना आणि मिड लेव्हलच्या लोकांना मिळणारा पगार बघत त्यांच्या गुंतवणुकीचा परतावा कमी झालाय. हेच लोकं खरे डिलीव्हरेबल्स देतात बाकी मॅनेजमेंट आणि एच आर वगैरे खरं तर ओव्हर हेडच असतात.

सत्तरच्या दशकातल्या कामगार नेत्याचे वाक्य वाटते आहे. :)

स्रुजा's picture

19 Feb 2015 - 8:35 am | स्रुजा

हाहा, वाटतंय खरं तसं. म्हणायचा उद्देश हा की मुळात ऑफशोअर व्यवस्था बघता बघाता वाढली कारण कामं करायला भरपूर लोकं आणि अगदी १५- २० हजारात पण मिळत होती. आता आपल्याला चालेल का? क्लायंटला आधी वाटायचं ३००-४०० $ मध्ये काम होतंय. आता तसं होत नाही, आणि ते बरोबरच आहे. आलं का या दशकात वाक्य? :)

सुनील's picture

19 Feb 2015 - 8:48 am | सुनील

आलं का या दशकात वाक्य?

नै हो.

मला वाटतं, त्यांचा मुख्य रोख तुमच्या दुसर्‍या वाक्यकडे होता'

हेच लोकं खरे डिलीव्हरेबल्स देतात बाकी मॅनेजमेंट आणि एच आर वगैरे खरं तर ओव्हर हेडच असतात

हे ते वाक्य.

अत्रन्गि पाउस's picture

19 Feb 2015 - 5:46 pm | अत्रन्गि पाउस

कुठल्याही ...
-हॉटेलात आचारी काय ते काम करतात आणि थोडेफार वेटर्स ..बाकी ओव्हरहेड
-एयर लाईन मध्ये वैमानिक आणि क्र्यू काय ते काम करतात आणि थोडेफार लोडर्स ..बाकी ओव्हरहेड
असे म्हटल्यासारखे वाटते ...

भडंगकाका या लिखाणावरून तुम्ही आयटी हमाल नाही आहात हे जाणवून येते. किंवा फारच नवशिके आहात. आयटी हे एक जेनेरीक टर्म आहे. मुळातआयटी सर्व्हिसेस आणि इंजिनीअरिंग सर्व्हिसेस यांची आपण का गल्लत करतो कोण जाणे.
निव्वळ कोडिंग किंवा टेस्टिंग ही फारच कमी दर्जाची कामे आहेत. फ्रेशर्स साठी एन्ट्री लेव्हल जॉब्ज म्हणाना.
खरे तर आयटी सर्व्हिसेस देण्यासाठी ग्राहकांच्या अपेक्षा समजण्यासाठी योग्य अनुभव असलेले लोक गरजेचे असतात. तसे बनण्यासाठी वेळ जावा लागतो. तेवढा वेळ दिल्यानंतर अनुभवी व्यक्तीनी कोडिंग सारख्या प्राथमिक कामाकडून रीक्वायरमेंट अ‍ॅनालिसीस वगैरेसारख्या कामांकडे वळणे यात गैर ते काय. प्रोजेक्ट डिलीव्हर करणे हे काम नवशिक्या लोकानी करणे यामुळे काय होते याचा अनुभव घेवुन बर्‍याच कम्पन्यानी हात पोळून घेतलेले असतात.

निव्वळ कोडिंग किंवा टेस्टिंग ही फारच कमी दर्जाची कामे आहेत. फ्रेशर्स साठी एन्ट्री लेव्हल जॉब्ज म्हणाना.
खरे तर आयटी सर्व्हिसेस देण्यासाठी ग्राहकांच्या अपेक्षा समजण्यासाठी योग्य अनुभव असलेले लोक गरजेचे असतात. तसे बनण्यासाठी वेळ जावा लागतो. तेवढा वेळ दिल्यानंतर अनुभवी व्यक्तीनी कोडिंग सारख्या प्राथमिक कामाकडून रीक्वायरमेंट अ‍ॅनालिसीस वगैरेसारख्या कामांकडे वळणे यात गैर ते काय.

विजुभाऊ, मी अर्थ काढायला चुकत नसेन तर "निव्वळ कोडिंग किंवा टेस्टिंग ही फारच कमी दर्जाची कामे आहेत." या वाक्याला असहमती तसेच तीव्र आक्षेप. हा भारतातला बर्याच ठिकाणी ऐकलेला दृष्टीकोन आहे आणि म्हणूनच बरेच पब्लिक टीएल, पीएल अशा मिळवायला बघते. हे खूपच चूक आहे.
आपल्याकडे यातही एकप्रकारची जातिव्यवस्था तयार केली आहे आणि ती गोष्ट कोडींगची कलात्मकता आपल्याकडे कधी वाढू देत नाही असे वाटते.

उदाहरण द्यायचं तर कोडींग म्हणजे "दगड तासणे". मग तुम्ही पाटा-वरवंटा बनवण्यातच धन्यता मानत असाल तर आजू-बाजूला तेच ओबड-धोबड दिसणार ना. तिच छिन्नी आणि हतोडा वापरून लेणी कोरली जातात, नवीन मूर्त्या, आश्चर्ये पण तयार केली जातात.

बाकी "रीक्वायरमेंट अ‍ॅनालिसीस" पासून ते "टेस्टींग"च्या आधी स्वतः "टेस्ट" करुन कोड "टेस्टींग"ला देण्यापर्यंतचा भाग इतका पण कमी समजला जातो हे वाटले नव्हते. आपला देश या इंडस्ट्रीत इतका काळ असून पण गेला बाजार एकही नोंद घेण्याजोगे टूल (प्रोडक्ट) किंवा संशोधन जगाला देऊ शकला नाहीये त्याचे मूळ अशा विचारसरणीतच असावे कदाचित.

(२५-३० वर्षे कोडर म्हणून काम केलेल्या सहकार्‍यांसोबत काम करण्यात अभिमान बाळगणारा)

टवाळ कार्टा's picture

23 Feb 2015 - 5:37 pm | टवाळ कार्टा

+१११११११११११

"निव्वळ कोडिंग किंवा टेस्टिंग ही फारच कमी दर्जाची कामे आहेत." या वाक्याला असहमती तसेच तीव्र आक्षेप.

घ्या बॉ आक्षेप. आक्षेप घ्यायला कोणाचीच हरकत नसावी.
तुमच्या भावनांचा आदर करतो. मी सुद्धा सध्या एका टेस्टिंग प्रोजेक्ट वर काम करतोय. माझे बरेचसे टीम मेट्स टेस्टिंग प्रोजेक्टचेच काम केलेले आहेत. त्यांच्या मते म्यान्यूअल टेस्टिंग हे काम सर्वोच्च आहे. मात्र कधीकधी इंटर्व्ह्यू घेताना आठ दहा वर्ष टेस्टिंगमधील अनुभव असलेल्याना सुद्धा फंक्षनल ज्ञान नसते हे जाणवते. त्यांचे बिझनेस प्रोसेस चे ज्ञान अत्यल्प असते. हे अवलोकन आहे.
टेस्टिंग म्हणजे पूर्ण असे म्हणत नाही मात्र इम्प्लिमेम्टेशन प्रोजेक्ट च्या तुलनेत टेस्टिंग हे थोडे कमी दर्जाचेच आहेत. क्लायंटला सोल्यूशन हवे असते. नुसते टेस्टिंग करताना तुम्ही काही सोल्यूशन देत नसता . एखाद्या इंप्लिमेंटेशन प्रोजेक्ट मधे टेस्टिंग हा केवळ २ ते ३ % भाग असतो. इंप्लिमेंटेशन प्रोजेक्ट हे सम्पुर्ण सोल्युशन असते.
टेस्टिंग हा स्वतन्त्र प्रोजेक्ट नसतो तो एखाद्या मुख्य प्रोजेक्टचा २% ते ३ % भाग असतो.
अर्थात हे माझेच नव्हे तर अच्यूत गोडबोल्यांचेदेखील मत आहे.

टेस्टींगबद्दल इतकीही माहिती नाही की प्रतिवाद करु धजेन पण तुम्ही कोडींग बद्दलपण त्याबरोबर बोललात म्हणून जो प्रतिसाद दिलाय तो कोडींग संदर्भातच दिलाय. तुम्ही मात्र त्यावर बोलताना टेस्टींगबद्दल बोलताय, हे संत्री नि सफरचंद झाले. बाकी इथे कोणी टेस्टर असतील तर ते जास्त प्रकाश टाकतीलच.

<कपाळावर हात मारलेली स्मायली/><कपाळावर हात मारलेली स्मायली/><कपाळावर हात मारलेली स्मायली/>

विजूभौ, तुमचे दोन्ही प्रतिसाद अतिशय हुकलेले आहेत हे जाता जाता नम्रपणे नमूद करतो!

- (आयटीतले कुठलेही काम हे दर्जेदारच असते ह्यावर विश्वास असलेला) सोकाजी

विजुभाऊ's picture

24 Feb 2015 - 11:38 am | विजुभाऊ

सोत्री भौ कामाचा दर्जा आणि कामामुळे क्लायंटच्या बिझनेस मधे होणारी व्हॅल्यू अ‍ॅडिशन या अर्थाने दर्जेदार काम म्हणतोय.
प्रतिसाद "हुक"लेले असतील कदाचित . पण मला सांगा मस्त उंचीवर आलेला बाउन्सर " हुक" केला नाहीतर तो बाउन्सरचा अपमान असतो म्हणे

टवाळ कार्टा's picture

24 Feb 2015 - 12:28 pm | टवाळ कार्टा

आयटीतले कुठलेही काम हे दर्जेदारच असते ह्यावर विश्वास असलेला

यापेक्षा

कामाचा दर्जा ते काम करणार्यावर अवलंबून असतो हे जास्त बरोबर नाही का?

नितिन थत्ते's picture

23 Feb 2015 - 9:07 pm | नितिन थत्ते

जौंद्या हो विजुभाऊ.

प्रोग्रॅम लिहिणारे बरेच लोक (फंक्शनल) कन्सल्टंट होण्याची स्वप्नं पाहतात. असू द्या.

टेस्टींगबद्दल थोडेसे... बघाच

https://www.facebook.com/video.php?v=10204628442403338

संदीप डांगे's picture

23 Feb 2015 - 11:36 pm | संदीप डांगे

बाकी "रीक्वायरमेंट अ‍ॅनालिसीस" पासून ते "टेस्टींग"च्या आधी स्वतः "टेस्ट" करुन कोड "टेस्टींग"ला देण्यापर्यंतचा भाग इतका पण कमी समजला जातो हे वाटले नव्हते. आपला देश या इंडस्ट्रीत इतका काळ असून पण गेला बाजार एकही नोंद घेण्याजोगे टूल (प्रोडक्ट) किंवा संशोधन जगाला देऊ शकला नाहीये त्याचे मूळ अशा विचारसरणीतच असावे कदाचित.

हे अगदी खरे असावे.

माझ्या सॉफ्ट्वेअर इंजिनीअर मेव्हण्याला प्रायोगिक तत्वावर मोबाइल अ‍ॅप विकसित करण्याबद्दल विचारले होते. तो टेस्टिंग करतो. मी ते करत नाही असे सांगून मोकळा. प्रयत्न करतो किंवा आव्हानात्मक आहे, करुन बघुया, मजा येइल वैगेरे काही नाही. कदाचित ह्याच विचारसरणीमुळे नविन काही करण्याची इच्छा होत नसावी.

टवाळ कार्टा's picture

23 Feb 2015 - 11:39 pm | टवाळ कार्टा

कोडरची जात वेगळी आणि टेस्टरची जात वेगळी :)

संदीप डांगे's picture

24 Feb 2015 - 12:37 am | संदीप डांगे

कोडरच होता तो पूर्वाश्रमीचा... म्ह्णून विचारले होते. त्या क्षेत्रातली पदवी आहे त्याच्याकडे आणि करिअरची सुरुवात कोडर म्हणूनच केली होती.

बाकी माझा एक मित्र जो एमेफए झालेला म्हणजे फाइन आर्टीस्ट आहे, तो बरेच कोडींग शिकून मला वेबसाइट बनवण्यासाठी मदत करतो. त्याने कधीच अरे मी आर्टीस्ट आहे कोडींग करू शकत नाही म्हणून सांगीतले नाही. माझा मूळ मुद्दा मनातल्या काहीतरी अचाट आणि वेगळे करून पाहण्याच्या इच्छाशक्तीबद्दलचा आहे. ती आपल्या अभियंत्यामध्ये (तेवढ्या प्रमाणात) दिसत नाही असे वाटते.

आयायटी मध्ये जाण्यासाठी मरमर करणारी जन्ता फक्त गलेलठ्ठ पगार आणि निर्धास्त आयुष्य याच्यासाठीच उत्सुक असते. मूलभूत संशोधन करण्यामध्ये आयायटी चा जगात कितवा नंबर आहे हे सगळे जाणतातच. त्यामागे तुम्ही उल्लेखलेली विचारसरणीच आहे. पार रक्तात खोलवर रुजलेली.

बादवे, कोडर आणी टेस्टर मधे असा काय फरक असतो आणि टेस्टर कोडिंग नाही करू शकत का ठरवले तर? म्हणजे पुरुष गरोदर राहू शकत नाही असे काही आहे का?

राघवेंद्र's picture

24 Feb 2015 - 2:29 am | राघवेंद्र

बादवे, कोडर आणी टेस्टर मधे असा काय फरक असतो आणि टेस्टर कोडिंग नाही करू शकत का ठरवले तर? म्हणजे पुरुष गरोदर राहू शकत नाही असे काही आहे का?

*unknw* *DONT_KNOW* *UNKNOWN* :HZ: :hz: *unknw* *DONT_KNOW* *UNKNOWN* :HZ: :hz: *smile* :-) :) +) =) :smile: *smile* :-) :) +) =) :smile:

असे काही नसावे बहुतेक.

संदीप डांगे's picture

24 Feb 2015 - 4:16 pm | संदीप डांगे

:-) :-) :-) अहो तशीपण अपेक्षा करणारे मॅनेजर पाहिलेत अस्मादिकांनी.

कपिलमुनी's picture

24 Feb 2015 - 12:47 pm | कपिलमुनी

निर्धास्त आयुष्य ??
कुठल्या जगात आहात भौ ?

आम्हाला कोणत्याही क्षणी लाथ बसण्याची शक्यता असते आणि भांडायला युनियन पण नसतात.

तुम्ही आयआयटीयन आहात का...?

बाकी मूलभूत संशोधन व संकल्पना विकास यासाठी खरंच कुणी आयआयटीत जात असेल तर त्याला साष्टांग दंडवत.

आजमितिस आयआयटी म्हणजे हमखास चांगला जॉब मिळवण्यासाठी प्रवेश घेण्याची जागा एवढीच जनमानसात प्रतिमा आहे.

बॅटमॅन's picture

24 Feb 2015 - 12:53 pm | बॅटमॅन

आयायटी मध्ये जाण्यासाठी मरमर करणारी जन्ता फक्त गलेलठ्ठ पगार आणि निर्धास्त आयुष्य याच्यासाठीच उत्सुक असते.

ही टिप्पणी केल्याशिवाय बाकीचा प्रतिसाद सार्थ ठरत नाही.

काळा पहाड's picture

24 Feb 2015 - 1:59 pm | काळा पहाड

डांगे साहेब, आपले विचार जुळतात. मला स्वतःला एक ओएस डेव्हलप करायची इच्छा आहे. काँप्लेक्स अल्गॉरिदम्स (उदा: स्वार्म लिहायचे आहेत) दुर्दैवाने वेळ मिळत नाही.

संदीप डांगे's picture

24 Feb 2015 - 4:13 pm | संदीप डांगे

खरंच करा हो... माझ्या शुभेच्छा.

मागच्या महिन्यात एका जागतिक कंपनीच्या नाशिक इथल्या पोलाद पाईप्स कारखान्याच्या आयटी हेडशी कामानिमित्ताने ओळख झाली. त्यांचे वय ५० चे आसपास. पोलाद कारखान्यात रोज तसे काही काम नाही आयटीला. त्यामुळे फुकटचा पगार खातोय अशी भावना मनात होती म्हणे. काय करावे अशा विचारात असतांना त्यांना एक समस्या आढळली. त्यांच्याकडे उत्पादनसंबंधी शेकडो रिपोर्ट्स आणि तक्ते रोज तयार होत असतात. त्यांच्या योग्य समन्वय व व्यवस्थापनासाठी सॅप प्रणाली वापरली जाते. परंतु महिनाअखेर हे सगळे हजारो रिपोर्ट्स संकलित करून अंतिम प्रिंटेबल रिपोर्ट बनवायला सॅप ऑपरेटरला ४ दिवस लागायचे. त्या प्रणालीत ह्यांना हवे तसे काहीतरी नसावे.

म्हणून या उच्चपदस्थ आयटी हेड ने सहा महिने स्वतः खपून कंपनीत कुणालाही सहज वापरता येइल असा एमएस एक्सेल चा प्रोग्राम लिहिला. फक्त सगळ्या फाईल्स असलेल्या फोल्डरमधे जायचे आणि ctrl+M दाबायचा. हा M त्यांच्या नावाच्या आद्याक्षरावरून ठेवला म्हणे. तर त्या फोल्डर मधे असलेल्या फाईल्स आधिच निर्धारित केलेल्या फॉरमॅटमधे आपोआप अक्षरशः काही मिनिटांत तयार होऊन अंतिम रिपोर्ट हातात मिळतो.

चार दिवसांचे कंटाळवाणे हाताने फार लक्ष देऊन करायचे काम चार तासांवर आणले, कंपनीचे पर्यायाने देशाचेही हजारो तास वाचवले. तेही कुणालाही वापरता येईल असे, म्हणजे ऑपरेटर सुट्टीवर असला तर थांबायला नको. तेही कुणीही न सांगता स्वतःहून कंपनीसाठी केले. तेही त्या वयात आणि परिस्थितीत जिथे नविन आव्हाने घ्यायला, पुरी करायला मन तयार नसते. हे सर्वच वा़खाणण्यासारखे आहे. कंपनीने त्यांना ५०% पगारवाढ आणि इतर सोयी पण तत्काळ लागू केल्या.

आता त्यांना हा प्रोग्राम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिकवायचा आहे. उद्देश हा की गरिब होतकरू मुलांची ह्या निमित्ताने काही पोटा-पाण्याची सोय होईल.

अशी उदाहरणे पाहीली की हुरूप येतो.

(मी तिथे फक्त त्या प्रोग्रामचे प्रात्यक्षिक पाहिले. सॅप प्रणाली बद्दल अजिबात माहीती नाही. त्यामुळे... )

फक्त सगळ्या फाईल्स असलेल्या फोल्डरमधे जायचे आणि ctrl+M दाबायचा. हा M त्यांच्या नावाच्या आद्याक्षरावरून ठेवला म्हणे. तर त्या फोल्डर मधे असलेल्या फाईल्स आधिच निर्धारित केलेल्या फॉरमॅटमधे आपोआप अक्षरशः काही मिनिटांत तयार होऊन अंतिम रिपोर्ट हातात मिळतो

त्यासाठी मॅक्रो लिहिला तर ते सहज होइल.एक्सेल फाईल मधे मॅक्रो रन करता येतो. सॅप ऑपरेटरला मॅक्रो येत असेल असे नाही. सॅप वापरणारा आयटी एक्स्पर्ट असेलच असे नाही. मी सध्या असाच एक एक्सेल मधे मॅक्रो प्रोग्राम वापरतो.
त्यात खूप अवघड असे काही नाही

संदीप डांगे's picture

24 Feb 2015 - 6:48 pm | संदीप डांगे

तेच म्हटले मी विजू भाऊ, मी काही सॉफ्टवेअर इंजिनीअर नाही त्यामुळे अवघड किंवा सोपे ह्यावर भाष्य करू शकत नाही.

त्यांच्या विशिष्ट समस्यांवर त्यांनी तो उपाय स्वतः शोधला. त्यांना हव्या असलेल्या रिपोर्ट्सची अगडबंब संख्या, गुंतागुंत आणि वेळेचा अपव्यय बघितला. त्यामुळे त्यांचे काम कौतुकास्पद वाटले. दुसर्‍या कोणी तेच काम ऑउट्सोर्स करून वर कमिशन खाल्ले असते. आणि त्यात त्यांना विचारणारे कुणी नाही.

नंबर ३ आणि ४ वर सगळ्यांची मतं वाचायला आवडतील. माझी मतं अजून तयार नाहीत या मुद्द्यांवर.

कैलासवासी सोन्याबापु's picture

19 Feb 2015 - 8:24 am | कैलासवासी सोन्याबापु

मला वाटते भारतीय सॉफ्टवेयर उद्योग सुद्धा उत्क्रांत होईल, आधी फ़क्त कोड बेस्ड आउटसोर्सिंग असणारा हा व्यवसाय होता, इंफोसिस फिनाकल घेऊन आले तेव्हा पासुन बहुदा "प्रोडक्ट" बेस्ड सॉफ्टवेयर डेवलपमेंट सुरु झाली, आजमितिस भारताचा सॉफ्टवेयर धंदा हा "कोड updating" अन कोड एनहांसमेंट चा होता तो आता ओरिजिनल सोर्स कोड्स मेकिंग पर्यंत जाईल असे वाटते

(मी सरकारी नोकर आहे साधा, माझे अंदाज हे एका प्रतितयश सॉफ्टवेयर कंपनी मधे सीनियर सॉफ्ट असलेल्या एका मित्राच्या व्यु वर आधारले आहेत, ते बरोबर असावेतच असा आग्रह नाही जाणकार लोकांनी मला चुकलो तिथे दुरुस्त करावे)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Feb 2015 - 9:17 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

१. स्वत: ला सारखे अपडेट ठेवणे सगळ्यांना शक्य होईल का ?
आईटी मधले स्किल हे साधारण ३-४ वर्षात पूर्ण बदलत असते . जी लोक सो कॉल्ड मेनेज्मेण्ट मध्ये
नसतील त्यांना जर नोकरी टिकवायची असेल तर रिटायर होऊ पर्यंत सतत अभ्यास करावा लागणार . सतत नवीन शिकावे लागणार . ३०-४० पर्यन्त नवीन स्किल आत्मसात करणे जमू शकेल पण ४५+ नंतर हे शक्य होईल का ?

सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट. तुम्ही मॅनेजर झालात म्हणुन शिकायचं बंद थोडीचं होणारे? लागणारी कौशल्यं बदलतील. प्रत्यक्ष टेक्निकल कामामधे लागणार्‍या गोष्टींची त्या त्या मॅनेजरला माहिती हवीचं. मी एका दुसर्‍या धाग्यावर एच.आर. विषयी एक प्रतिसाद लिहिला होता तोचं इथे लिहितो.

जर तुम्हाला तुमच्या हाताखालच्या किंवा सहकारी लोकांकडुन नेमकं काय अपेक्षित असेल आणि ते काम कसं करायचयं हेचं माहिती नसेल तर तो मॅनेजर एक चांगला "लीडर" होउचं शकतं नाही. आय.टी. विषयी माहिती नाही जास्तं पण बहुतेक हे सर्वचं क्षेत्रांना लागु पडावं.

२.अजून १५-२० वर्षांनी भारतीय आईटी(सर्विस) कंपनी वर परिणाम कसा होईल आणि त्या तो कसा हाताळतील ?
साधारण पणे भारतीय आईटी(सर्विस) कंपनी या ओफशोर वरच्या २-७ वर्ष अनुभव असलेल्या लोकामुलेच फायदा कमवत असतात आणि एखादी वेळ अशी येईल कि कंपनीमधले बरेच लोक १५-२०् वर्षे
अनुभव असलेलो साधारण लोक असतील . एक तर कंपनी त्यांचा पगार कमी करेल नाही तर कामावरून काढून टाकेल . पण काहीही झाले तरी नुकसानी मध्ये धंदा करणार नाही , त्यावेळचे चित्र कसे असेल ?

णो आयडीया. आयटीवाला नसल्याने आयटी क्षेत्रामधल्या पगार सोडुन बाकीच्या गोष्टींची माहिती नाही =))

४. सध्या तरी आईटी ओफशोरिंग मध्ये भारत बाप आहे . पण फिलिपिन्स , मलेशिया पोलंड , चाइना , स्लोवाकिया सारखे देश पण सध्या बराच मार्केट मारत आहेत . या देशाकडून स्पर्धा चालू झाली कि भारत कसा रीस्पोंड करेल ? हि स्पर्धा एकदम तीव्र झाली तर वरचे सगळेच प्रश्न इनव्हेलीड होतील का ?

स्पर्धा सगळ्याचं क्षेत्रात आहे. जर अजुन स्पर्धा निर्माण झाली तर आयटी हमालांचं पण शोषण चालु होईल ह्यात काही शंका नाही. कमी पगारात राबवुन घ्यायचा जो फंडा (तु नही तो कोई और काम करेगा इस्से कम दाम मे दृष्टीकोन) मेकॅनिकल इंडस्ट्रीमधे गेल्या काही वर्षांमधे सुरु झालाय तोचं तिकडेही सुरु होईल बहुधा.

टवाळ कार्टा's picture

19 Feb 2015 - 11:00 am | टवाळ कार्टा

स्पर्धा सगळ्याचं क्षेत्रात आहे. जर अजुन स्पर्धा निर्माण झाली तर आयटी हमालांचं पण शोषण चालु होईल ह्यात काही शंका नाही

म्हणजे तुझ्यामते आयटी हमालांचं अजून शोषण चालू झालेले नाही??? :(

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Feb 2015 - 1:14 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

माहित नाही रे. माझे आयटीवाले मित्र तर कायम खुश असतात. कमीत कमी कटकटी तरी करतं नाहीत. सो आय्ड्या नै बॉ!!!

सांगलीचा भडंग's picture

19 Feb 2015 - 1:34 pm | सांगलीचा भडंग

शोषण सध्या चालू नसले तरी आधी बर्याच सवलती होत्या त्या हळू हळू काही हॊउ लागतील . सध्या शनिवार - रविवार सुट्टी असते पण काही काळाने हे बंद होईल . कामाचे तास वाढतील ( ओफ़िशिअल ), हा आत काही लोकांना हे शोषण वाटू शकेल

१. स्वत: ला सारखे अपडेट ठेवणे सगळ्यांना शक्य होईल का ?
हे प्रत्येकालाच शक्य होइल असे नाही ! प्रत्येकाची परिस्थीती ही वेगळी असते आणि त्यामुळे एखाद्याला जी गोष्ट जमेल ती दुसर्‍याला देखील जमेल असे नाही. अनेक वर्ष सातत्याने ताणात / हायपर टेंशन मधे काम करण्याने तसेच शिफ्ट मधे काम केल्याने प्रचंड प्रमाणात मेमरी लॉस होतो,तसेच फिजीकल फिटनेस राहत नाही याचा सुद्धा परिणाम नविन टेक्नॉलॉजी शिकताना होतो.

२.अजून १५-२० वर्षांनी भारतीय आईटी(सर्विस) कंपनी वर परिणाम कसा होईल आणि त्या तो कसा हाताळतील ?
अजुनही आपल्या इथे बरेचसे काम हे सपोर्ट चे होते. परंतु हे ठेवुन सुद्धा इतर अनेक क्षेत्र आहेत जिथे प्रचंड वाव आहे. हिंदूस्थानच्या आयटी इंडस्ट्रीला ४० पेक्षा जास्त वर्ष पूर्ण झाली आहेत आणि अ‍ॅव्हरेज आयटी हमालाचे वय हे ३५ आहे. त्यामुळे सध्याच्या काळात ही इंडस्ट्री वयस्य हमालांनी त्रस्त आहे ! कॉल सेंटर / बीपीओ नंतर आयटी इंडस्ट्रीत वयाचा क्रायटेरिया, जॉब बदलण्याचा ट्रेंड हा वेगवान आहे. येणारा काळ लक्षात घेता अनेक आयटी प्रोफेशनल्स वरती {ज्यांचे वय ३५ आणि अधिक आहे } पिंक स्लीपची तलवार चालवली जाईल असे वाटते ! यात मुख्यत्वे दोष कोणाचा ? कंपन्या त्यांच्या नफा पाहणारच ! परंतू त्यांनी नफा पाहताना त्यांच्या कंन्स्ल्टंट साठी काही विशेष मेहनत घेतली आहे असे फार कमी वेळा आणि ठराविक कंपन्यां मधेच हे झालेले दिसुन येइल. येणारा काळ हा डेटा मॅनेजमेंट / इन्फरमेशन मॅनेजमेंटचा असेल.

३ आईटी मधला रिटायर झालेला माणूस कसा असेल ?

अत्यंत कठीण प्रश्न ! मुळात तो रिटायर होइ पर्यंत त्याला कंपनीने कामावर ठेवलेले असेल का ? हा मुख्य प्रश्न आहे !

४. सध्या तरी आईटी ओफशोरिंग मध्ये भारत बाप आहे . पण फिलिपिन्स , मलेशिया पोलंड , चाइना , स्लोवाकिया सारखे देश पण सध्या बराच मार्केट मारत आहेत . या देशाकडून स्पर्धा चालू झाली कि भारत कसा रीस्पोंड करेल ? हि स्पर्धा एकदम तीव्र झाली तर वरचे सगळेच प्रश्न इनव्हेलीड होतील का ?
मुळात आपल्या कंपन्यांनी विदेशी कंपन्यांना तुम्ही द्याल त्या पेक्षा कमी किंमतीत कामे करुन देउ ही घाणेरडी सवय इतके वर्ष लावुन ठेवली आहे. आम्ही दर्जेदार काम करु आणि त्या दर्जानेच पेमेंट केले जावे आणि दर्जा उत्तम ठेवल्यास तुमचे काम हिरावुन घेण्याचा धोका नक्कीच कमी होइल. आयटी इंडस्ट्रीला त्यांचा माईंड सेट आधी बदलण्याची गरज आहे !

@ स्पॅरो मामा
जर तुम्हाला तुमच्या हाताखालच्या किंवा सहकारी लोकांकडुन नेमकं काय अपेक्षित असेल आणि ते काम कसं करायचयं हेचं माहिती नसेल तर तो मॅनेजर एक चांगला "लीडर" होउचं शकतं नाही. आय.टी. विषयी माहिती नाही जास्तं पण बहुतेक हे सर्वचं क्षेत्रांना लागु पडावं.
पूर्णपणे सहमत, परंतु उत्तम स्कील सेट असणार्‍याकडे उत्तम मॅनेजमेंट स्कील असेलच असे नाही हे देखील लक्षात ठेवायला हवे.

आयटी हमालांचं पण शोषण चालु होईल ह्यात काही शंका नाही. कमी पगारात राबवुन घ्यायचा जो फंडा (तु नही तो कोई और काम करेगा इस्से कम दाम मे दृष्टीकोन) मेकॅनिकल इंडस्ट्रीमधे गेल्या काही वर्षांमधे सुरु झालाय तोचं तिकडेही सुरु होईल बहुधा.
आयटी हमालांचे शोषण अनेक वर्ष चालु आहे, परंतु या क्षेत्राला "युनियचे" संरक्षण नाही ! कामाच्या ताणाने / स्वरुपाने आयटी प्रोफेशनल्सच्या पर्सनल लाईफची आणि हेल्थची पार वाट लागली आहे ! हाय ब्लड प्रशर, हार्ट प्रॉब्लेम, मेंटल डिसऑर्डर तसेच ड्र्ग्स अ‍ॅडिक्शन मधे अडकणे आहेच. आयटी प्रोफेशनल्सचा पगार अनेक जणांना जास्त वाटतो, परंतु ज्या पटीत ते कंपनीला कमवुन देत असतात त्या मानाने तो काहीच नसतो... निदान सध्याच्या काळात तरी हेच चित्र आहे.
बरेचसे आयटीवाले अगदी रोबोटिक लाइफ जगतात ! राहत्या जागेच्या भाड्यापोटी महिन्याला १२-१५ हजार तसेच खाण्या-पिण्यावर खर्च धरल्यावर हातात उरणारा पगार हा फारच कमी असतो.

काही वाचनिय दुवे :-
Once the preserve of youth, IT staffing enters middle age
A New Trend of Suicides in India
Why Bangalore is India's suicide capita
India: High Tech Mirage
‘डिजिटल अंधार युग’ येणार?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोदींनी नऊ महिन्यांत केले काय?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Feb 2015 - 1:22 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

@मदनभाचा:

सहमत. पण जर फायनान्शिअल स्टेबिलीटी, ग्रोथ आणि जॉब सिक्युरिटीचा विचार केला तर आयटी सारखं क्षेत्र नाही. ह्यापैकी जॉब सिक्युरिटी हा मुद्दा हल्ली डळमळीत व्हायला लागलाय हे खरं, पण अगदी गाळं क्वालिटी, कशीबशी पास झालेली, कंपनीमधे दुसर्‍याकडुन कामं बिनदिक्कतं करुन घेणारी लोकंसुद्धा आयटीमधे जाउन ऐटीतं रहातात. आणि त्यांच्या मुळे चांगले आणि डिझर्व्हींग उमेदवार मागे पडतात.

हे थोडं अवांतर झालं बाकी एक घटना व्यनि करुन सांगीन किंवा आपल्या गृपावर टाकतो. हा द रा ल!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Feb 2015 - 1:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

टाका इथेच. आमालाबी हा द र ण्या त लय विंट्रेष्ट हाय :)

ह्यापैकी जॉब सिक्युरिटी हा मुद्दा हल्ली डळमळीत व्हायला लागलाय हे खरं, पण अगदी गाळं क्वालिटी, कशीबशी पास झालेली, कंपनीमधे दुसर्‍याकडुन कामं बिनदिक्कतं करुन घेणारी लोकंसुद्धा आयटीमधे जाउन ऐटीतं रहातात. आणि त्यांच्या मुळे चांगले आणि डिझर्व्हींग उमेदवार मागे पडतात.
काही अंशी सहमत... परंतु मागच्या फायनॅनशिअल क्रायसिस नंतर आयटी इंड्रस्ट्रीची पुंगी वाजली ती अजुन तशीच आहे ! दुसर्‍या कडुन काम करुन घेणे हे सुद्धा स्कील सेट आहे बरं का ! ;) पण काही काळाने ते अंगाशी येउ शकते.कंपन्याना आता आयटी हमाल नकोत तर आयटी माथाडी कामगार हवेत ! त्यामुळे गाळं क्वालिटी भरली गेली तर जवाबदार कंपनीच नाही का ?
ती घटना इथे टाका बिनधास्त ! वरती एक्का काका आहेच काय झाल तर प्रतिसाद संपादित करायला तप्तर ! :)
बाकी हल्ली आयटीचा विषय आला की काय ठावूक मला माझ्याशी मोकळेपणाने गप्पा मारणारे एक गॄहस्थ { माझ्याच कंपनीतले एक मॅनेजर } आठवतात ! अगदी कमी वयात ब्रेन हॅमरेज ने गेले ते ! :(

Dr P Satish Chandra is the director of India’s National Institute of Mental Health and Neurosciences. He says the pressures on young IT workers can sometimes become intolerable. “Expectations from the young professionals are very high - the demands from their jobs is very high. In the early years, they may be able to handle the challenge but as the time passes their needs are different, their family needs are different; with this in mind, what happens is, the pressure mounts.”

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोदींनी नऊ महिन्यांत केले काय?

आयटी हमालांचे शोषण अनेक वर्ष चालु आहे, परंतु या क्षेत्राला "युनियचे" संरक्षण नाही !

Layoffs in IT companies: Is it time for trade unions to come into play?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Infosys defers salary hikes till July; no job cuts planned
IT cos had firing list ready 5 years back
Techie, and worried about layoffs? These 20 skills can help you stay relevant

उदय's picture

12 May 2017 - 11:10 pm | उदय

"युनियनचे" संरक्षण नाही >> अतिशय योग्य. युनियन आली की कंपन्या काँपिटिटिव्ह राहू शकणार नाहीत.

विटेकर's picture

19 Feb 2015 - 11:08 am | विटेकर

अर्थाचे दोन प्रकार आहेत
१. मुख्य अर्थ
२. गौण अर्थ
मुख्य अर्थ म्हणजे जिथे संपत्ती निर्माण होते असे निर्माण करण्याचे काम... प्रत्यक्ष वस्तु उत्पन्न होतात ..शेती अथवा वस्तुंचे उत्पादन
गौण अर्थ म्हणजे उत्पादित वस्तूंचे अथवा शेतीमालाचे कृत्रिम रित्या मूल्यवर्धन ! दलाली , सेवा या गोष्टी म्हणजे गौण अर्थ होय.
मुख्य अर्थ निर्माण करनारी यंत्रणा कायमस्वरुपी आणि जगाच्या हिताची असते . गौण अर्थ बाजारपेठ मध्यवर्ती ठेऊन निर्माण होत असतो. बाजारपेठ ही सतत बदलणारी असते आणि म्हणूनच गौण अर्थ हा सतत खाली- वर होत असतो. काही दिवस वकिलांची चलती होती .. मग मेक्यानिकल इन्जिनीयर आणि आता आय टी ...
चालायचेच !
फक्त मुख्य अर्थ वाल्यांना जगात मरण नाही !
.

सांगलीचा भडंग's picture

19 Feb 2015 - 1:28 pm | सांगलीचा भडंग

मुंबई मधल्या ज्या कापड गिरण्या बंद झाल्या तिथे पण वस्तु उत्पादन होत होते . त्या पण काळाच्या मागे बंद पडल्या . जास्त ऑटोमेशन मुले कामगार लोकांची गरज कमी झाली
त्यामुळे मुख्य अर्थ किव्वा गौण अर्थ असा काही नसेल पण ज्या वेळी ज्या क्षेत्राची चलती आहे तिथे जास्त पैसा मिळणार . प्रत्तेक क्षेत्रामध्ये चढ उतार असणारच .
बेंक , टेलेकोम कंपनी , विमा क्षेत्र , माल वाहतूक हे तुमच्या म्हणण्या प्रमाणे गौण अर्थ मध्ये येत असतील पण सध्या ग्लोबल एकोनोमि आणि मुक्त व्यापार व्यवस्थेमध्ये हि क्षेत्रे फार महत्वाची आहेत .
म्हणजे समजा भारतात टोमेतो चे उत्पादन बरेच होते आणि ते निर्यात करायचे असतील तर वाहतूक , साठवण , कस्टमर मिळवणे या गोष्टी वर बराच खर्च येऊ शकतो ....म्हणजे मरण सगळ्यांना आहे मुख्य अर्थ किव्वा गौण अर्थ असा काही नाही

कपिलमुनी's picture

19 Feb 2015 - 1:51 pm | कपिलमुनी

आयटीवाले आणि नॉन आयटीवाले हा सध्याचा सर्वात मोठी जातीभेद आहे.

चौकटराजा's picture

19 Feb 2015 - 2:30 pm | चौकटराजा

मला वाटते आता यापेक्षा वेगळे क्रांतिकारक असे सॉफ्टवेअर निर्माण होण्याचे दिवस संपले आहेत. उत्पादन क्षेत्रात सी एन सी च्या रूपाने आणखी काही काळ काहीतरी बाहेर येत राहील त्याला योग्य असे सॉफ्टवेअर बनत राहील. पण जी क्षेत्रे केवळ सॉर्ट, सेपरेट अशा वर अवलंबून आहेत त्यातील स्कोप संपलेला असेल.

काळजी खरी अशी आहे की येत्या काही वर्षात सुतार, शिंपी. सोनार हे धंदे पार लयाला जातील.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Feb 2015 - 5:07 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सद्ध्याही सी.एन.सी. टेक्नॉलॉजी जवळजवळ मॅचुअर लेव्हलला पोचली आहे. टुलआता माझ्या मते सायमल्टेनिअस मशिनिंग मधे जास्तं शोधं लागायला हवेत. पाथ ऑप्टिमायझेशन आणि स्मार्ट मशिनिंग मधे जे काय बदल होतील तेवढेचं. आणि ३-डी प्रिंटर मधे सुद्धा.

वायटू के नंतरची भारतीय आयटी इंडस्ट्री काही तुरळक अपवाद वगळता प्रामुख्याने 'बॉडी शोपिंग'ह्याच प्रकाराची होती. क्लायंटला जसे कुशल प्रोग्रामर्स लागतील तसे ते पुरवायचे, असे सोप्पे मॉडेल होते. त्यात अनुभव गाठीशी आल्यावर 'मॅनेज्ड सर्व्हिसेस' असे ऑनसाईटवरच काम घेणे सुरू झाले. १९९९-२००० च्या डॉटकॉम बबलच्या बुडबुड्यातल्या झीलीयन डॉलर्सच्या नुकसानीनंतर 'ऑफशोअर' मोडेल तेजीत आले, तसे ते चालूच होते पण त्यातला फायदा आता 'अर्थ'पूर्ण झाला होता.

इथून 'मॅनेजर' ही जमात भारतीय आयटी इंडस्ट्रीत तयार झाली. सुरुवातीला हे मॅनेजर्स हॅन्ड्स ऑन असावे लागायचे पण कालांतराने त्याची गरज उरली नाही आणि एका मोठ्या क्रायसिसची मुहुर्तमेढ रोबली गेली. सॉफ्टवेयर बांधणीच्या क्षेत्रात यायचे आकर्षण तर सर्वांना खुणवू लागले पण 'मॅनेजर' हे पद जास्त भुरळ पाडू लागले कारण कोडींग करायची जरजच उरली नाही मॅनेजर्सना. कसली मज्जा ना! सॉफ्टवेयर बांधणीच्या उद्योगात जायचे पण सॉफ्टवेयर बांधणीचे कामच करायचे नाही!

पण जसे जसे बाजारपेठेला सॉफ्टवेयर बांधणीच्या उद्योगाची कल्पाना येऊ लागली तसा ग्राहक जागरूक होऊन कमी किमतीत सॉफ्टवेयर बांधणीची मागणी करू लागला. स्पर्धाही वाढत गेली आणि प्रॉफिट मार्जिन कमी होऊ लागले. ह्याच्यात आयटी उद्योगाने शहाणे होण्याऐवजी 'फ्रेशर्स भरती' हा स्वस्त मनुष्यबळाचा मार्ग पकडला. ह्यामुळे 'मॅनेजर' हे प्रस्थ आणखिणच गब्बर झाले.

ह्या सर्वामुळे भारतीय आयटी इंडस्ट्री ही खर्‍या अर्थाने 'अ‍ॅक्चुअल सॉफ्टवेयर बांधणी'च्या विभागात पुढे गेलीच नाही (काही तुरळक अपवाद वगळता). त्यामुळे भारतीय आयटी इंडस्ट्री 'टॉप हेवी' होऊन ओव्हरहेड्स वाढत गेले.

मोड्यूल लीड, टीम लीड, प्रोजेक्ट लीड, मॅनेजर, सिनीयर मॅनेजर, ग्रुप मॅनेजर... हे काय आहे? कोडींग कोण करणार? अनुभव वाढला की कोडींग करण्याची मॅच्युरीटी वाढते पण इथे मॅनेजर बनून कोडींग करायचेच नाहीयेय, अशी आजची स्थिती आहे!

आता परदेशी कंपन्यांना भारतातच सॉफ्टवेयर बांधणीचे दुकान उघडणे सोपे वाटू लागल्याने त्या तसे करू लागल्या आहेत. त्यांना मॅनेजर्स 'नको असतात' आणि घेतले तरी ही ते हॅन्डस ऑन हवे असतात कारण त्यांनी भारतात दुकान सॉफ्टवेयर बांधणीसाठी उघडलेले असते न की 'बनियागीरी करायला'.

तमाम मॅनेजर्स आणि नॉन हॅन्ड्स ऑन मंडळींसाठी (३५-४० च्या वयातील) हा 'वेकअप कॉल' समजावा. TCS चे नुकतेच झालेले ले ऑफ्स हे फक्त ट्रेलर होते.

- (हॅन्ड्स ऑन) सोकाजी

टवाळ कार्टा's picture

19 Feb 2015 - 3:48 pm | टवाळ कार्टा

++११११११११११११११११११११११११

१ निरिक्षण...जर ३०+ वय असूनसुध्धा कोडींगचे काम मागितले तर लगेच शिक्का मारतात रिस्पाँसिबीलीटी नकोय :(

संदीप डांगे's picture

19 Feb 2015 - 4:00 pm | संदीप डांगे

अतिशय उत्तम आणि अभ्यासपूर्ण प्रतिसाद.

मी नेहमी म्हणतो की इतके जर आपले आयटी वाले हुशार तर एक साधी ओएस का नाही बनवली आज्पतुर...
बनवली असल्यास सांगावे. मला तरी म्हाइत नाही.

प्रसाद१९७१'s picture

19 Feb 2015 - 4:41 pm | प्रसाद१९७१

कधीही वीटांवर वीटा ठेवुन भिंत बांधली नसलेला सिव्हिल इंजिनियर सुपरवायझर म्हणुन चालु शकतो. ते कसे काय?

संदीप डांगे's picture

19 Feb 2015 - 4:48 pm | संदीप डांगे

गवंडीकाम आणि कोडींग मध्ये काहीच फरक नाही का?

प्रसाद१९७१'s picture

19 Feb 2015 - 5:02 pm | प्रसाद१९७१

तसेच कधीही कोडींग नाही केलेला माणुस मॅनेजर म्हणुन चालायला काहीच हरकत नाही.

अवांतर - गवंडीकाम बरेच अवघड असते. कोडींग साठी आयटी आय काढल्या पाहीजेत, ग्रॅज्यएशन ची काही गरज नाही.

चिरोटा's picture

19 Feb 2015 - 8:19 pm | चिरोटा

कोडींग साठी आयटी आय काढल्या पाहीजेत, ग्रॅज्यएशन ची काही गरज नाही.

कोडिंग कशासाठी करताय हे महत्वाचे. पे-रोल सिस्टिम बनवायला साधे कोडिंग चालेल.ट्रेडिंग सिस्टिम्,जिथे मिलिसेकंद महत्वाचा असेल तिथे कोडिण्ग पलिकडे अनेक गोष्टी माहित पाहिजेत.

इंजिनियर पोरं येउन गलिच्छ कोड लिहितात, iti काढले तर ...
कल्पनेनेच शहारे आले !

अर्थात चांगलं कोडिंग साठी डिग्री पेक्षा चांगला intuition जास्त आवश्यक आहे, हे माझं मत. (http://www.paulgraham.com/knuth.html)

ती एक कला आहे, सगळ्यांनाच ती जमते असे नाही.ज्यांना नाही जमत ते लवकरात लवकर मॅनेजर होण्याच्या घाईत असतात.

टवाळ कार्टा's picture

21 Feb 2015 - 1:02 am | टवाळ कार्टा

ती एक कला आहे, सगळ्यांनाच ती जमते असे नाही.ज्यांना नाही जमत ते लवकरात लवकर मॅनेजर होण्याच्या घाईत असतात.

प्रचंड सहमत...पण त्यापेक्षा महत्वाचे आहे सोल्यूशन डिझाईनींग
साले ८०% लोक ठिगळे लावण्यात धन्यता मानतात

अत्रन्गि पाउस's picture

21 Feb 2015 - 1:16 am | अत्रन्गि पाउस

हि कला आहे हे सत्यच बरेच लोक मान्य करत नाहीत ..त्यामुळे रचतात विटेवर वीट ...उडाला तर पक्षी ..बुडाला तर बेडूक

.सोल्युशन डिझाईन ह्यासाठी आपल्या लोकांना नं वेळ नं धीर ...अर्थात सकाळी रुपया गुंतवला तर संध्याकाळी सव्वा रुपया निघाला नाही तर 'समदा घाटा' ह्या मानसिकते मधे व्यवसाय करणाऱ्यांना ह्यात फार वावगे वाटत नाही ...

अर्थात हे फक्त आयटी नाही बरे का ... रस्ते/ बिल्डिंगा /कुठलीही सिस्टीम घ्या हे असेच दिसेल ...
साधे उदाहरण घ्या
ठाण्याचा माजिवडे नाका ते कॅडबरी सिग्नल हा पट्टा बघा ...
१. माजिवडे नाक्याला मुंबई कडे जातांना जी वळणे घ्यावी लागतात ती अतिशय संतापजनक आहेत ...ती वळणे घेऊन हायवे ला लागावे तर उजवीकडून येणारा फ्लायओव्हरवरून येणारी वाहने कडकडून भेटायला आल्यासारखी ...
२. पलीकडे ज्युपिटर हॉस्पिटल, एका बाजूला उच्चभ्रू हॉटेल दुसर्या बाजूला प्रचंड व्हीव्हीयाना मॉल ...ह्या सगळ्या इमारतीतील मिनिटाला डझनावारी वाहने आतबाहेर करतात ती इवल्याश्या सर्व्हिस रोड वर...एखादी अम्ब्युलन्स अडकली कि अडकली ...
जाऊ देत उगीच डोक फिरवून घेण्यात अर्थ नाही ...:(

मदनबाण's picture

22 Feb 2015 - 2:20 pm | मदनबाण

ठाण्याचा माजिवडे नाका ते कॅडबरी सिग्नल हा पट्टा बघा ...
१. माजिवडे नाक्याला मुंबई कडे जातांना जी वळणे घ्यावी लागतात ती अतिशय संतापजनक आहेत ...ती वळणे घेऊन हायवे ला लागावे तर उजवीकडून येणारा फ्लायओव्हरवरून येणारी वाहने कडकडून भेटायला आल्यासारखी ...
२. पलीकडे ज्युपिटर हॉस्पिटल, एका बाजूला उच्चभ्रू हॉटेल दुसर्या बाजूला प्रचंड व्हीव्हीयाना मॉल ...ह्या सगळ्या इमारतीतील मिनिटाला डझनावारी वाहने आतबाहेर करतात ती इवल्याश्या सर्व्हिस रोड वर...एखादी अम्ब्युलन्स अडकली कि अडकली ...
जाऊ देत उगीच डोक फिरवून घेण्यात अर्थ नाही ...:(

अगदी ! पेव्हर ब्लॉकचे रस्ते म्हणजे तुमच्या सुंदर रस्त्यांच्या स्वप्नाला लागलेला शाप आहे ! शरीरातली हाडं आणि हाड हलण म्हणजे काय ? याचा अनुभव घ्यायचा असेल तर इथे अवश्य यावे. या हायवेजवर लोकांसाठी स्कायवॉक जवळपास कुठेच नाही. लोकांना हायवे क्रॉस करताना पाहताना हल्ली फारच भिती वाटते... सर्व वयोगटातील लोक असा जीव घेणा प्रकार रोज करतात ! मला रोजचा हा प्रवास म्हणजे रोजचा मॄत्युशी लढाच वाटतो. रस्ते कसे बांधतात याची कप्लनाच इथल्या राज्यकर्त्यांना ठावूक नाही आणि ती सामान्य जनतेला ते अनभवु देखील देणार नाहीत.हिंदूस्थानात उत्तम पद्धतीचे नुसते रस्ते जरी बांधलेत तरी सुद्धा देशाची उत्तम प्रगती होउ शकते...
असो...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jiya Re... - { Jab Tak Hai Jaan }

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Feb 2015 - 2:24 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सहमत बाणा....
ह्या छपराडांना रस्त्यावरुन चालायला लागायला पाहिजे मग समजेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Feb 2015 - 2:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

सहमत !

पण, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा जनता केवळ स्वतःच्याच प्रगतीतच रस असलेल्या राजकारण्यांना सोडून देशाच्या प्रगतीत रस असलेल्या राजकारण्यांना मते द्यायला सुरुवात करेल.

नितिन थत्ते's picture

22 Feb 2015 - 9:10 pm | नितिन थत्ते

आता दिली ना यंदा मतं?

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Feb 2015 - 12:25 am | डॉ सुहास म्हात्रे

थांबा, थांबा साहेब. तुमचे घोडे आताच उधळवून नका. इतकी घिसाडघाई करणे हा आमचा स्वभाव नाही

जनतेने नक्की योग्य प्रकारे मत दिले की नाही हे भविष्यच ठरवेल. कारण...

"भूतकाळात सतत अपेक्षाभंग झालेला असताना आंधळेपणे कोणाचीही पाठराखण करण्यापेक्षा किंवा कोणाचाही सतत आंधळा विरोध करण्यापेक्षा निवडणुकीपूर्वी दिलेल्या वचनांवर काय कारवाई होत आहे आणि त्याचे योग्य कार्यकालात योग्य ते परिणाम झाले की नाही हे उघड्या डोळ्यांनी पाहून आपले मत ठरवणेच शहाणपणाचे असते." असे आमचे ठाम मत आहे.

या सर्वामधे पक्ष आणि व्यक्ती गौण असतात... जमिनीवरचे वट्ट काम महत्वाचे असते.

आम्हाला कोणताही रंग अथवा झूल पेहेनण्याचा शोक नाही हे तुमच्या ध्यानात आलेले दिसत नाही... तेव्हा असो. :)

हाडक्या's picture

24 Feb 2015 - 9:14 pm | हाडक्या

सहमत..

त्याचबरोबर.. दिलीत ना मतं ? "मग आता भोगा फळं" किंवा "आता गप्प बसा आणि त्यांना काम करु द्या" हे दोन्ही गजर मान्य नाहीत. मतं देऊन कर्तव्य संपलं किंवा मत दिलय म्हणून त्यांनाच समर्थन द्यायची नैतिक जबाबदारी वगैरे देखील मान्य नाही.

थोडक्यात,
या सर्वामधे पक्ष आणि व्यक्ती गौण असतात... जमिनीवरचे वट्ट काम महत्वाचे असते.

आम्हाला कोणताही रंग अथवा झूल पांघरण्याचा शोक नाही हे तुमच्या ध्यानात आलेले दिसत नाही... तेव्हा असो.

नितिन थत्ते's picture

24 Feb 2015 - 11:41 pm | नितिन थत्ते

>>जनतेने नक्की योग्य प्रकारे मत दिले की नाही हे भविष्यच ठरवेल. कारण...

म्हंजे, मत देताना योग्य की अयोग्य ठरवायचा मार्गच नाही म्हण्टा? नेहमीच ट्रायल एरर..

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Feb 2015 - 12:17 am | डॉ सुहास म्हात्रे

थत्ते साहेब, पूर्वानुभव म्हणूनही काही गोष्ट असतेच, तो चांगला अथवा वाईट कसाही असू शकतो. मानवाने आपली बुद्धी वापरून त्याचा उपयोग पुढची कृती ठरवण्यासाठी करायचा असतो, हे विसरून कसं चालेल ? शिवाय, कधी कधी निवड करताना, "दगडापेक्षा वीट मऊ" हा वाक्प्रचार कामी येतो.

पण तरीही, वस्तुस्थितीमध्ये, भविष्यातला दर अनुभव "भूतकालातला चांगला अनुभव भविष्यात तसेच घडेल अशी शास्वती देत नाही." अश्या लिखीत-अलिखीत संवैधानिक इशार्‍यासह येतो.

त्यामुळे अगदी पूर्ण विश्वास ठेऊन मत दिले असले तरी, निवडलेल्या नेत्याचे प्रामाणिक परिक्षण चालू ठेवायचे असतेच, किंबहुना तो पक्ष्/नेता आपला अगदी आवडीचा असला तरी आणि अगदी तो पक्ष/नेता शतकभर अथवा जास्त आस्तित्वात असला तरी ! हे न केल्यास लोकशाही संपून सरंजामशाही सुरू होते याची पैशाला पासरी उदाहरणे दिसतील... फक्त फक्त डोळे उघडून आजूबाजूला प्रामाणिकपणे पाहण्याची गरज आहे... बस्स !

लोकशाहीतसुद्धा कोणत्याही पक्ष/नेत्याच्या पायावर आपली सर्व बुद्धी अर्पण करून आंधळेपणाने वागायचे नसते ही समज काहींना असते, काहींना नसते. नसल्यास, असे लोक आपला मार्ग चुकला हे ध्यानात आल्यावरही ते नाकारत राहतात, पूर्वीचाच हट्ट चालू ठेवतात, माझा (चुकलेला) मार्गच बरोबर आणि इतर सर्व झूट आहे असे म्हणत राहतात. याला मानसशास्त्रात "डिनायल मोड" असे म्हणतात.

अर्थात तुमचे पूर्वीचे लिखाण बघता तुम्हाला हे सगळे पटेलच असे नाही. पण तरीही मी "अत्यंत आशावादी" असल्याने वरचा संवैधानिक इशारा जितका राजकारणात लागू पडतो तितकाच माणसाच्या व्यक्तीगत गैरसमजूतींनाही लागू पडतो असे मानतो. म्हणूनच केवळ हा खटाटोप !

इतकेच. बाकी चालूद्या ! या धाग्यात झाले तितके अवांतर खूप झाले.

वेल्लाभट's picture

24 Feb 2015 - 5:20 pm | वेल्लाभट

एकदम अ‍ॅग्रीच म्हणजे. विवियाना ला परवानगीच कशी दिली कळत नाही. असो. ठाण्यात कुठेशी आपण? सहज हं. मी नौपाड्याचा.

अत्रन्गि पाउस's picture

24 Feb 2015 - 9:58 pm | अत्रन्गि पाउस

जन्म गेला हो त्या नौपाड्यात
व्य णी करतो

शालेय जीवन नौपाड्यात घालवले. बरे वाटले, कोणीतरी आहे नौपाड्याचे.

माझीही शॅम्पेन's picture

1 Mar 2015 - 12:36 pm | माझीही शॅम्पेन

विवियाना ला परवानगीच कशी दिली कळत नाही

आम्ही विवियाना मध्ये पडीक असतो त्यामुळे आम्हाला हि नाही आवडत अस कोणी विचारलं कि :)

अम्बुलंस जुपिटर मध्ये घुसण्याची जबाबदारी जुपिटर वर पण आहे , त्यांना मागच्या बाजूने सहज गेट उघडू शकतात पण ते तस करत नाहीत

दुसरी गोष्ट जुपिटर दुचाकी वाहनांना काही अतर्क्य कारणाने प्रवेश नाकारते (पार्किंग साठी) ते सर्व दुचाकी वाले विवियाना मध्ये पार्क करतात

तिसरी गोष्ट साधारण उच्च मध्यम वर्गासाठी असलेल हे इस्पितळ बाहेरच्या चारचाकी वाहनांना फार कमी प्रमाणात पार्किंग करून देत , ते सर्व विवियाना पैसे मोजून पार्किंग करतात , तेंव्हा आमच्या विवियानाच्या नावाने बोंबलू नका :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Feb 2015 - 8:01 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

५००००% सहमत रे टका. खरं तर चुका ह्या दुरुस्तं केल्या पाहिजेत. हल्ली सगळ्यांचा कल त्या झाकुन ठेउन वरवरच्या गोष्टी चकाचक ठेवण्यावर असतो.

वेळ मिळाला तर एक जिलबी होंडाच्या व्हाईट अटायर पॉलिसीवर टाकीन. तुमच्या कपड्यावर शॉप फ्लोअर वर ऑईल चा डाग दिसला तर कुठेतरी काहीतरी चुकतयं. ती गोष्ट दुरुस्तं केल्याशिवाय पुढे कामं होतं नाहीत.

अत्रन्गि पाउस's picture

23 Feb 2015 - 10:24 pm | अत्रन्गि पाउस

बराय तिथे खालील वाक्ये म्हणणारे कुणी एतद्देशीय नाहीत ..
-चाय्यला एक डाग पडला तर काय झाले
-साला आता तो जप्पू पिडेल ..@#$त प्रोदक्षान चा @#$@#...साला xxxx लाखचा नुकसान
-तो डाग पडला म्हणजे ३ मिली ओईल वेस्ट ..साला नुकसान...तुझ्या बापाने आणला का रे वेस्ट करायला ओईल ..
-हा साला मालक पण xत्या आहे .. ऑटोमोबाईल प्रोडक्सन लाईन मध्ये कवा सफेद कपडा घालते के ??
-साला कलसे एक स्पेयार शर्ट रखो रे बाबा ऐसा कूच हुअवा तो फटाफट बदली कर ने ...वो सस्ता गिरेगा...
.
.
.
.
ये जपानी प्रोसेस वाले साले बेपारी लोग ला लय सतावते ...

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 Feb 2015 - 10:51 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

खरयं....

टवाळ कार्टा's picture

23 Feb 2015 - 11:05 pm | टवाळ कार्टा

फार चुकीची उदाहरणे...ही वाक्ये भारतातील कोणत्याही भाषेत खपून जातील

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Feb 2015 - 1:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

उत्तम सोल्यूशन डिझाईनींग...

"वापरण्यासाठी कमीत कमी प्रशिक्षणाची जरूरी असलेली आणि कमीत कमी श्रम, वेळ व वित्त खर्च करून वापरणार्‍याला जास्तीत जास्त अपेक्षित साध्य साधून देणारी प्रणाली म्हणजेच उत्तम संकल्पना असलेली प्रणाली (well-designed solution). उत्तम संकल्पना असलेल्या प्रणालीच्या मागे किती का किचकट तंत्रज्ञान असेना, त्याचा वापरणार्‍याला त्रास व्हायला नको, किंबहुना ते त्याला दिसले/समजले नाही तरच बेहत्तर !"

(A well-designed solution is the one that allows user to extract the highest level of the expected benefits after the least amount of training; and with the least expense of time, effort and money. A well-designed solution does not bother or even expose the user to the technological excellence and efforts that may have been employed to construct it.)

अर्थातच, उत्तम संकल्पना असलेली प्रणाली तयार करणे येरागबाळ्याचे काम नोहे !

अमेरिकन त्रिशंकू's picture

21 Feb 2015 - 6:57 pm | अमेरिकन त्रिशंकू

मधे कधीतरी अ‍ॅपल आयपॅड्बद्दल एक कथा ऐकली होती. खरंखोटं माहित नाही.

अ‍ॅमेझॉनच्या जंगलतील आदिवासींच्या ५-६ वर्षाच्या मुलांना - ज्याना आधुनिक तंत्रज्ञानाचा अजिबात गंध नाही - आयपॅड्स खेळायला हातात दिली.

पाच मिनिटाच्या आत सर्व मुलं त्यावर गेम्स खेळू लागली होती.

संदीप डांगे's picture

21 Feb 2015 - 7:07 pm | संदीप डांगे

हे अमेरिकन काहीही पिल्लू सोडुन देतात आणि जग त्यावर आंधळा विश्वास ठेवतं.

पहील्यांदा हाती घेतल्यावर काहीच माहीत नसतांना कुठलीही प्रणाली लिलया हाताळणं हे अचाट बुद्धिचे काम आहे.
असं असतं तर सामान्य वयस्कर मंडळींना अजिबात कष्ट न पडते ते शिकायला.

टवाळ कार्टा's picture

21 Feb 2015 - 8:03 pm | टवाळ कार्टा

अमेरिकन लोक पिल्लू सोडण्यात हुशार अस्तात हे मान्य पण...

असं असतं तर सामान्य वयस्कर मंडळींना अजिबात कष्ट न पडते ते शिकायला.

लहान मुलाला काही नविन नवीन गोष्ट दाखवायला गेलो की ती वस्सकन बोलत नाहीत "ह्या...ठेव तो तुझा आयपॅड-फायपॅड बाजूला...आयपॅड नस्ताना सुध्धा आम्ही संसार केलेच ना....कुठे काही अडलं?"

मुद्दा इतकाच की लहान मूल जे शिकवाल ते शिकते कारण त्यांच्यात इगो, मानापमान याची जाणिव नस्ते
या जाणीवा जशा जशा वाढतात तशी तशी शिकण्याची कुवत कमी होत जाते :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Feb 2015 - 9:06 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अगदी सहमतं. शिवाय लहान मुलांना नवीन गोष्ट म्ह्णलं की आधी त्यांची उत्सुकता जागी झालेलीचं असते. त्यातं मग जर संगणक किंवा तत्सम वस्तु असेल तर मग विचारायलाचं नको.

संदीप डांगे's picture

22 Feb 2015 - 1:04 am | संदीप डांगे

लहान मूल जे शिकवाल ते शिकते

हाच मुद्दा आहे टकाभाऊ,

प्रश्न आयपॅड कित्ती उपभोगकर्ताभिमुख (user friendly) आहे याचा टेंभा मिरवण्याचा आहे. त्यासाठी ते उदाहरण देतात आदिवासी मुलांचे. म्हणजे त्यांचा मेंदू शहरी लोकांच्या तुलनेत तंत्रज्ञान वापरण्याच्या बाबतीत कमी आहे हा एक यांचा अहंगंड. तर 'त्यांनाही' आमचे आयपॅड वापरता येते म्हणजे बघा कित्ती कित्ती सोपे आहे. त्या मुलांना टेपरेकॉर्डर पासून बंदूकीपर्यंत, सायकलपासून रणगाड्यापर्यंत काही दिले तरी ते पाच मिनिटांत चालवायला शिकतील. आमच्या शेजारच्या चार वर्षाच्या चिमुरड्याने घरासमोर उभी असलेली गॅससीलेंडरची तीनचाकी गाडी उभ्याउभ्या पाच मिनिटांत सुरु करून चांगली ६०-७० फूट पळवली ते स्वत:च्या डोळ्यांनी पाहीले आहे.

दुसरा वयाचा प्रश्न. सामान्यतः विशिष्ट वयापुढे गेल्यावर शिकण्याचा उत्साह (जीवन-मरणाचा प्रश्न नसेल तर) कमी होतो. हीच आयपॅड झिडकारणारी पिढी त्यांच्या बाल्यावस्थेत, तरुणपणी रेडीओ आणि तत्कालिन तंत्रज्ञानाशी (वापरायला लवकर शिकता यावे यासाठी) कशी झटापट करत होती हे त्यांना आठवतच असेल.

प्रत्येक नव्या पिढीला नवे नवे शिकायला आणि शोधायला भन्नाट आवडते. हेच सत्य, बाकी सारे मार्केटींग.

टवाळ कार्टा's picture

22 Feb 2015 - 10:08 am | टवाळ कार्टा

तुम्ही "god must be crazy" बघाच...एखादी गोष्ट आदिवासी जर ५ मिनीटांमधे शिकत असतील...ते सुध्धा त्यांचा आधुनिक जगाशी काहीही आणि कधीही संपर्क नसताना...तर ती वस्तु उपभोगकर्ताभिमुख (user friendly) आहे

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Feb 2015 - 10:38 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

भारी सिरिज आहे ती.. =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Feb 2015 - 2:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१००

हाडक्या's picture

22 Feb 2015 - 10:18 pm | हाडक्या

तुम्ही "god must be crazy" बघाच..

टका.. __/|\__ तुझे धन्यवाद कसे मानू राव..! तुला कल्पनाही नसेल तू किती मोठी मदत केली आहेस.!

मी हा चित्रपट कोणाच्या तरी पाहुणा म्हणून गेलो व्हीसीआर वर थोडासा पाहिला होता लहान असताना. खूप आवडला होता. लहान असल्याने आणि व्हीसीआरचा रिमोट कोणा दुसर्‍याच्या हातात असल्याने पुरा पाहू शकलो नव्हतो. नव्वदीच्या दशकात जेव्हा माहिती मिळणे अवघड होते तेव्हा मी गेली कित्येक वर्षे अनेक दुकानांत, चित्रपटप्रेमी मित्रांना या चित्रपटातले प्रसंग वर्णन करून विचारत होतो हा कोणता चित्रपट आहे म्हणून. अगदी गूगलत पण होतो. पण जास्त काही आठवत नसल्याने सापडत नव्हता.

ही लिंक सहज म्हणून उघडली आणि बालपणीच्या त्या आठवणींतले प्रसंग पाहून कसला खुश झालोय मी यार. कधीही तेव्हा मी विचार केला नव्हता की मला हा चित्रपट परत पहायला मिळेल म्हणून.
परत परत आभार.!!

टवाळ कार्टा's picture

22 Feb 2015 - 10:24 pm | टवाळ कार्टा

हेहे :)
त्यात काय मोठे इतके आभार वगैरे मानण्याइतके...कट्ट्याला १ प्लेट भजी खाउ घाला...हाकानाक :) :)

हाडक्या's picture

22 Feb 2015 - 10:35 pm | हाडक्या

नक्की रे.. भेट तू पुढच्या वेळेस.. :)

टवाळ कार्टा's picture

22 Feb 2015 - 11:40 pm | टवाळ कार्टा

लवकरच १ ठाणे कट्टा होणारै असे कानावर आले आहे :)

अत्रन्गि पाउस's picture

23 Feb 2015 - 7:42 am | अत्रन्गि पाउस

कट्टा मिस करून चालणार नाही ...
साधारण काय तारखा आहेत ?

टवाळ कार्टा's picture

23 Feb 2015 - 12:21 pm | टवाळ कार्टा

छुपा कट्टा नसेल तर मिपाच्या प्रंप्रेनुसार धागा येईलच :)

संदीप डांगे's picture

22 Feb 2015 - 10:24 pm | संदीप डांगे

"god must be crazy" सदाबहार... :-)

वेल्लाभट's picture

24 Feb 2015 - 5:28 pm | वेल्लाभट

लहान मुलाला काही नविन नवीन गोष्ट दाखवायला गेलो की ती वस्सकन बोलत नाहीत "ह्या...ठेव तो तुझा आयपॅड-फायपॅड बाजूला...आयपॅड नस्ताना सुध्धा आम्ही संसार केलेच ना....कुठे काही अडलं?"

मुद्दा इतकाच की लहान मूल जे शिकवाल ते शिकते कारण त्यांच्यात इगो, मानापमान याची जाणिव नस्ते
या जाणीवा जशा जशा वाढतात तशी तशी शिकण्याची कुवत कमी होत जाते

प्रचंड पटेश !

अमेरिकन त्रिशंकू's picture

22 Feb 2015 - 11:24 pm | अमेरिकन त्रिशंकू

ही कथा खरी आहे का खोटी हे माहित नाही असं मी लिहीलेलच आहे पण या स्पेसिफिक गोष्टीमध्ये उगीच अमेरिकन लोकांना नावं ठेवण्यात काही अर्थ नाही.

पहील्यांदा हाती घेतल्यावर काहीच माहीत नसतांना कुठलीही प्रणाली लिलया हाताळणं हे अचाट बुद्धिचे काम आहे.

असहमत. असं असतं तर जगातले कोट्यावधी लोक जे आधुनिक तंत्रज्ञान वापरतात त्यांना अचाट बुद्धीचे म्हणावे लागेल तुमच्या व्याख्येप्रमाणे.

जाता जाता
अ‍ॅपलचे प्रॉडक्ट्स अतिशय यूझर फ्रेंडली आणि अत्यंत विचारपूर्वक डिझाईन केलेले असतात याबद्दल वादच नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Feb 2015 - 9:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

पाच मिनिटाच्या आत सर्व मुलं त्यावर गेम्स खेळू लागली होती.

"पाच मिनिटाच्या आत" ही जरा जास्तच अतिशयोक्ती झाली :)

पण काही दिवस संगणक हातात आला तर पूर्वी संगणकाचा काहीही संपर्क नसलेली मुलेही कोणत्याही मदतीशिवाय त्याचा यशस्वीपणे मूलभूत वापर करू शकतात हे डॉ सुगत मित्रा नावाच्या एका भारतीय शास्त्रज्ञाने सिद्ध केले आहे. ते संशोधन Hole-in-the-wall या नावाने प्रसिद्ध आहे.

इ स १९९९ मध्ये दिल्लीतील त्यांचे ऑफिस आणि कालकाजी या झोपडपट्टीमध्ये असलेल्या कुंपणाच्या भिंतीत एक छिद्र पाडून त्यातून त्यांना एक संगणक टच-स्क्रीनच्या सहाय्याने वापरता येईल अशी सोय केली. काही दिवसातच त्या झोपडपट्टीतील लहान मुले तो संगणक वापरायला शिकली. हा प्रयोग नंतर अनेक ठिकाणी यशस्वीपणे केली गेला आहे. यासाठी त्यांना TED सन्मान दिला गेला आहे.

अधिक माहिती इथे मिळेल.

आनंदी गोपाळ's picture

27 Feb 2015 - 10:03 am | आनंदी गोपाळ

त्या आयफोनवर गेम्स डालो करण्याचे पैसे कुणी भरले होते?

सांगलीचा भडंग's picture

19 Feb 2015 - 5:05 pm | सांगलीचा भडंग

गवंडी कामामध्ये विटा ठेवणे हे काम फारसे बदलत नाही . इमारत दवाखाना आहे का सुलभ शौचालय का एस टी बसस्थानक आहे यामध्ये विटा वर विटा ठेवायची पद्धत तीच असते . त्यामुळे तिथे एखादा सिव्हिल इंजिनियर सुपरवायझर म्हणून पूर्ण इमारत बघू शकतो .
आईटी मध्ये असे जनरल काम थोड्या वर्षात नक्की येईल कि कामाचे स्वरूप अजीबात बदलणार नाही

प्रसाद१९७१'s picture

19 Feb 2015 - 5:12 pm | प्रसाद१९७१

गवंडी कामात कष्ट असतात साहेब आणि ते करुन जे बनते त्याचा खरोखरच काही उपयोग असतो.

आयटी मधे गेल्या ७-८ वर्षात खरे खुरे उपयोगी असे नविन काही ही घडले नाहीये. शेवटची उपयोगी गोष्ट म्हणजे ऑनलाईन पेमेंटचे गेटवे असावी.
गेले काही वर्ष नुस्तीच रंगरंगोटी चालू आहे.

स्वता आयटीत फक्त पैश्यासाठी असलेला आणि भारतीय आयटी बद्दल पूर्ण अनादर असलेला प्रसाद.

सांगलीचा भडंग's picture

19 Feb 2015 - 5:20 pm | सांगलीचा भडंग

बरेचशे लोक बराचश्या ठिकाणी फक्त पैश्यासाठीच असतात.आणि कष्ट प्रत्तेक जन आपल्या क्षमते प्रमाणे करतच असतो . गवंडी पण आपण फार काय निर्माण करतोय असे मनात ठेवून काम करत नसावा .
आणि आदर म्हणालात तर नक्कीच आहे . जी इंडस्ट्री हजारो लोकांना नवीन जोब देते त्याबद्दल आदर ठेवायला काय हरकत आहे?

कपिलमुनी's picture

19 Feb 2015 - 5:39 pm | कपिलमुनी

७-८ वर्षात ??
२००७ पासून लिनक्स बेस्ड अँड्रॉइड सिस्टम वापरणे सुरू झाले .
क्लाऊड तंत्रज्ञान प्रगत झाले .
गूगल ग्लास सारखे तंत्रज्ञान वापरात आले स्मार्ट फोन हा प्रकार रुजला.
तंत्रज्ञान 'सोशल' झाले.
आणि छोटे कितीतरी बदल झाले.

प्रसाद१९७१'s picture

19 Feb 2015 - 6:36 pm | प्रसाद१९७१

२००७ पासून लिनक्स बेस्ड अँड्रॉइड सिस्टम वापरणे सुरू झाले .
क्लाऊड तंत्रज्ञान प्रगत झाले .
गूगल ग्लास सारखे तंत्रज्ञान वापरात आले स्मार्ट फोन हा प्रकार रुजला.
तंत्रज्ञान 'सोशल' झाले.

एक एंड युसर म्हणुन मला काय फरक पडला. क्लाऊड किंवा अँड्रोइड नसते आले तर काय फरक पडला असता. त्यापूर्वी पण सर्व सिस्टीम चालतच होत्या की.

स्मार्ट फोन हा प्रकार मला स्वताला आवडत नाही.

क्लाऊड आल्याने मला तरी फरक पडला बुवा. आता फ्लॉप्यांचा माहीम हलवा आणि यूएसब्यांचे फाफडे जवळ बाळगावे लागत नाहीत.

२००७ पासून मला यूजर म्हणून पडलेले फरकः

- सोपं फाईल शेअरिंग
- बर्‍याचशा इंटरनेटमध्ये आता युनिकोड वापरता येतं
- क्रॉस-डिवाईस सुलभीकरण
- स्काईप, गूगल हँगाऊट्स सारख्या सहजी उपलब्ध सेवा
- पेपाल सारख्या ई-वॉलेट सुविधा

"सिस्टिम चालणे" हा मला यूजर म्हणून फार दरिद्री बेंचमार्क वाटतो.

हाडक्या's picture

19 Feb 2015 - 7:10 pm | हाडक्या

"सिस्टिम चालणे" हा मला यूजर म्हणून फार दरिद्री बेंचमार्क वाटतो.

:)))) . :)))) . :)))) .

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Feb 2015 - 10:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

"सिस्टिम चालणे" हा मला यूजर म्हणून फार दरिद्री बेंचमार्क वाटतो.

सहजपणे फार भारी बोलून गेलात ! *ok*

जसे : आधुनिक मानव अगदी गेल्या ८०-९०,००० वर्षांपासून करतच आला आहे. पण पहिला पायाने, मग घोड्यावरून, मग घोड्याच्या गाडीतून, मग यांत्रिक गाडीने (तिची तर इतकी व्हर्शन्स झाली की सांगू नका), मग रेल्वे आली, मग विमाने उडायला लागली, आणि आतातर रॉकेट वापरून माणसाला चंद्र व मंगळावर रहायला जायची स्वप्ने पडताहेत... तसं बघायला गेलं तर ह्या सगळ्या "ट्रान्स्पोर्टेशन सिस्टीम्स"च आहेत नाही का ?

पण, एकीपेक्षा तिच्या पुढची कितीतरी फरकाने वेळ-श्रम-आरामाचा फायदा करून देतात यात कोणाला संशय आहे का ?

"मानवी जीवनाच्या कित्येक सर्वसामान्य गोष्टींचे झालेले ई-एनेबल्मेंट" ही मानवाच्या इतिहासातली सर्वात मोठी आणि सर्वात जलद झालेली क्रांती आहे *... फक्त ती आपल्या डोळ्यासमोर इतकी जलद झाली आहे की आपण तिला गृहीत धरतो आहोत आणि तिची व्याप्ती सहज ध्यानात येत नाही... जसे आपल्या रोज डोळ्यासमोर असणार्‍या बालकाची वाढ आपल्या ध्यानात येत नाही पण दोन-चार वर्षांनी भेट देणारा पाहुण्याच्या तोंडी, "किती मोठा झालाय हा दोनेक वर्षांत?" असे वाक्य येते !

==================

* संगणक क्रांतीपूर्वीची जागतिक मानवी जीवनावर सर्वांगीण परिणाम करणारी क्रांती-- जिला आपण "औद्योगिक क्रांती" म्हणतो-- इ स १७६० ते १८४० अशी १८० वर्षे चालू होती आणि तिने जगाच्या केवळ १०% टक्के लोकजीवनात फरक पडला होता.

त्याविरुद्ध, संगणकाने आपल्या जीवनात किती फरक पडला आहे हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने;
अ) संगणकाचा तडक अथवा दुरान्वयाने संबंध नसणार्‍या किती गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत ? आणि
आ) त्या गोष्टी रोजच्या जीवनातून काढून टाकल्या तर काय होईल ?
या फक्त दोनच प्रश्नांचीच उत्तरे शोधावीत !

मित्रहो's picture

20 Feb 2015 - 2:08 pm | मित्रहो

"मानवी जीवनाच्या कित्येक सर्वसामान्य गोष्टींचे झालेले ई-एनेबल्मेंट" ही मानवाच्या इतिहासातली सर्वात मोठी आणि सर्वात जलद झालेली क्रांती आहे *

मला नेहमी आवडनार म्हणजे इनकम टॅक्स रिटर्न आणि रेल्वे टिकिट. फार जुनी नाही पण २००3/४ मधली गोष्ट असेल रेल्वे टिकिट काढायला केवढी मोठी लाइन लागत होती. त्यातल्या त्यात मधेच लिंक मिळत नव्हती म्हणजे बोंबला. आज हेच काम घर बसल्या होते तरीही मी irctc ला शिव्या घालतो.
सरल यायच्या आधी इनकम टॅक्स भरायला सीएच लागायचा. सरल आल्यानंतर फॉर्म भरता येउ लागला पण जमा करायला त्रास व्हायचा आज सारच काम ऑनलाइन होत.

टॅक्स रिटर्न आणि रेल्वे टिकिट.
खरयं टॅक्स रिटर्नचा ऑनलाईन वापर सुखद आहे, परंतु रेल्वे, महावितरण आणि एमटीएनएल यांचे बुकिंक /बिल भरताना पेमेंट गेटवेचा एरर त्रास दायक ठरत आहे.congestion issues हा मुख्य दोष. २०१३ मधे IRCTC ने अपग्रेडसाठी ११ कोटींची गुंतवणुक केली होती. पण ऑनलाईन बुकींची वेगाने वाढणारी संख्या पाहता टिकीट बुकींगची समस्या अनेकांना येत आहे.पैसे अकाउंट मधुन डेबिट होतात आणि तिकीट मात्र बुक होत नाही ! हाच त्रास महावितरणचे बिल भरताना देखील होतो.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
HTTP/2 finished, coming to browsers within weeks
HTTP/2 Frequently Asked Questions

मित्रहो's picture

20 Feb 2015 - 4:28 pm | मित्रहो

कधी कधी येतात, डोक भडकत मग शांत विचार केला की पटते चार तास उन्हात लाइन मधे उभे राहून टिकीट काढण्यापेक्षा हे नक्कीच सुखावह आहे. त्या काळात स्टेशनवर आतासारखे मार्बल नव्हते, ना अशा खिडक्या होत्या, पंखे असले तरी चालत नव्हते. अरे मोबाइलमधले टिकिट दाखवून प्रवास करु शकता अजून काय पाहीजे. पुढची पायरी टीटीइ टिकीट चेक करायलाही येनार नाही तुम्ही ट्रेनमधे चढताच टिकीट चेकींग आपोआप होउन जाइल. रात्री अकरा वाजता येउन टिकीट दाखवा म्हणून कोणी झोप मोड करनार नाही. असो हा काही मूळ लेखाचा विषय नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Feb 2015 - 5:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

ग्राहकांना येणार्‍या समस्यांच्या मागे तंत्रज्ञानाच दोष नसून संगणकीय सेवा व्यवहारात आणण्यासाठी जबाबदार असलेल्या लोकांचा/संस्थांचा दोष आहे.

सद्या संगणकशास्त्र/तंत्र इतके विकसित आणि इतके स्वस्त झाले आहे की, एखादी संगणकीय (ई-एनेब्ल्ड) सेवा व्यवहारात आणण्यातले सर्वात मोठे दोन अडथळे (अ) "वैचारीक प्रतिभादौर्बल्य (lack of imagination)" आणि (आ) "प्रस्थापित गैर हितसंबंधाना (vested interests) येणारी बाधा" हेच आहेत.

महावितरण ज्याला अभिमानाने "आधुनिक संगणकीकरण" म्हणते तिचे व्यवहारातले सत्यरूप "एका ऑफिसमधून दुसरीकडे सीडीवर डेटा नेण्याची गरज असलेली आणि इंटरनेटवर बिल भरण्याची मंद वेगाची सेवा" असे आहे. इंटरनेटवर बिले भरण्याच्या त्यांच्या पानावरही ग्राहकांची त्यांना "इतकी काळजी" आहे की त्यावर; (अ) "BU* म्हणजे SUB/DIVISION" हे ग्राहकाने महावितरणचा कर्मचारी असल्यासारखे पटकन ओळखावे" आणि (आ) त्यातल्या ड्रॉपडाऊन लिस्टमधले आपले ठिकाण त्याच्या नावावरून नाही तर महावितरणने ठिकाणाला दिलेल्या क्रमांकावरून (जे क्रमांक ग्राहकाला अगम्य असतात आणि माहित असण्याची अजिबात गरज नाही) शोधून काढावे" अशी त्यांची अपेक्षा आहे ! So much for user friendliness ! (क्षमस्व, मराठीत इतका चपखल वाक्प्रचार न सुचल्याने इंग्लिशमध्ये लिहीले आहे.)

बंद केलेल्या वीज-जोडाची सुरक्षाठेव परत देण्यासाठी महावितरण कमीत कमी सहा महिने तरी लावते. त्यासंबंधात महावितरणच्या एका वरिष्ठ कार्यकारी अधिकार्‍याशी नुकतेच थोडे परखड बोलणे झाले. तेव्हा इतर वेळेचा कडक इस्त्री फिरवलेला चेहरा बदलून गालातल्या गालात हसत "राजकीय इच्छाशक्ती (?!)" ला दोष देत त्यांनी मान डुलवली. हे राजकारण कसले हे वेगळे सांगण्याची गरज नसावी :)

एक एंड युसर म्हणुन मला काय फरक पडला.

बाकी सर्व जाउद्या, इथे अभिव्यक्तीच्या पिंका टाकता येण्यापेक्षा दुसरा मोठा फायदा/उपयोग क्लाऊड/वेब २.० कुठला नाही हे तर मान्य करता येइल?

- (स्मार्ट फोन वापरून स्मार्ट झालेला) सोकाजी

वेल्लाभट's picture

24 Feb 2015 - 5:23 pm | वेल्लाभट

एक एंड युसर म्हणुन मला काय फरक पडला.

तुम्हाला फरक पडला नाही कारण तुम्ही यूजर झालाच नाहीत.
ज्यांनी यूज केलं त्यांना फरक पडला.

सतिश गावडे's picture

15 May 2017 - 10:28 am | सतिश गावडे

स्मार्ट फोन हा प्रकार मला स्वताला आवडत नाही.

तुम्ही जेष्ठ नागरीक आहात काय? ;)

स्वता आयटीत फक्त पैश्यासाठी असलेला आणि भारतीय आयटी बद्दल पूर्ण अनादर असलेला प्रसाद.

"जिस थीली मे खाना उसी मे ..." ह्या असल्या वृत्तीनेच भारतीय सर्विस इंडस्ट्रीचा बट्याबोळ होत/होणार आहे!

- (रोजी-रोटी देणार्‍या भारतीय आयटी इंडस्ट्रीबद्दल पूर्ण आदर असलेला) सोकाजी

थॉर माणूस's picture

20 Feb 2015 - 10:23 am | थॉर माणूस

जाऊद्या हो सोकाजीराव, कुणाशी वाद घालताय... राणीच्या नोकरांचे पगार एक्सेल शीटसमधे भरण्याला चुकून सॉफ्टवेअर इंडस्ट्री समजलेत ते. :D

चांगला परफॉर्मन्स दीला तर मग गवंडीकामाच्या वरचं जरा बरं काम पण मिळू शकतं. ;)

असल्या पिंका टाकणे दोनच प्रकारच्या लोकांकडून होते, आपल्या नाकर्तेपणाचा भयानक न्युनगंड आलेले नैतर बाहेरच्या देशात उंदीर मारण्याच्या विभागात काम मिळाल्याचा अहंगंड बाळगणारे. माफ करा त्यांना. ;)

हाडक्या's picture

21 Feb 2015 - 6:34 am | हाडक्या

अग्गायाया .. थॉर माणूस, डेटा मायनिंग मध्ये हायसा काय ?? नाय म्हंजे हे लई जुनं खोदून खोदून काढलंय म्हणून विचारतोय.. ;)

तो ड्वायलॉकच असला भारी मारलाय त्या साहेबांनी की या जन्मात तरी त्यांना तो विसरता येणार नाही. वाचनखूण साठवण्याजोगा प्रतिसाद आहे तो. :D

अभिजित - १'s picture

20 Feb 2015 - 6:09 pm | अभिजित - १

सोत्रि हि खालचि तुमचि वाक्ये कय आदर दखवतत ? तुमच्या खलिल वाक्यशि पुर्ण सहमत ..
------------------------------------------------------------------------------------
ह्या सर्वामुळे भारतीय आयटी इंडस्ट्री ही खर्‍या अर्थाने 'अ‍ॅक्चुअल सॉफ्टवेयर बांधणी'च्या विभागात पुढे गेलीच नाही (काही तुरळक अपवाद वगळता). त्यामुळे भारतीय आयटी इंडस्ट्री 'टॉप हेवी' होऊन ओव्हरहेड्स वाढत गेले.

मोड्यूल लीड, टीम लीड, प्रोजेक्ट लीड, मॅनेजर, सिनीयर मॅनेजर, ग्रुप मॅनेजर... हे काय आहे? कोडींग कोण करणार? अनुभव वाढला की कोडींग करण्याची मॅच्युरीटी वाढते पण इथे मॅनेजर बनून कोडींग करायचेच नाहीयेय, अशी आजची स्थिती आहे!

'सिव्हिल इंजिनियर' सुपरवायझर म्हणुन चालु शकतो कारण त्याला भिंत बांधायला त्या विटा नेमक्या कशा रचायच्या ह्याचे शास्त्रोक्त ज्ञान असते. त्यामुळे गवंडी नेमक्या कशा वीटा रचतोय हे त्याला कळू शकते! त्याच्याऐवजी जर इलेक्ट्रॉनिक्स इंजीनीयर सुपरवायझर म्हणुन नेमला भिंत बांधायला तर चालणार नाही!

- (भिंतं चालवणारा*) सोकाजी

* फेसबुकवर ;)

सांगलीचा भडंग's picture

19 Feb 2015 - 5:07 pm | सांगलीचा भडंग

@सोत्रि : अतिशय उत्तम,सविस्तर माहिती

अभिजित - १'s picture

19 Feb 2015 - 9:07 pm | अभिजित - १

एकदम खरे !! एका नामवंत कंपनीत ३० / ४० हेड दिसतात (कमितकमि ) ..इतके खरेच गरजेचे आहेत काय ? सेंटर हेड, बिझनेस हेड, प्राकटीस हेड , solution हेड, ग्लोबल हेड, Delivery हेड, ग्रुप हेड .. हा पण काय प्रकार आहे कळत नाही. LTITL

इरसाल's picture

21 Feb 2015 - 1:57 pm | इरसाल

तुमची ग्रास्पिंग पॉवर जाम भारी आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Feb 2015 - 4:47 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

हेडस्ट्राँग :)

(ह.घ्या.)

फर्स्टमॉन्क's picture

15 May 2017 - 5:45 pm | फर्स्टमॉन्क

आमच्या सारखे तुम्ही पण तिथलेच काय ...?

वाक्या वाक्याशी सहमत. नेमकं हेच लिहिणार होतो.

तमाम मॅनेजर्स आणि नॉन हॅन्ड्स ऑन मंडळींसाठी (३५-४० च्या वयातील) हा 'वेकअप कॉल' समजावा. TCS चे नुकतेच झालेले ले ऑफ्स हे फक्त ट्रेलर होते.

१०००% खरं

आमच्या हापिसात पण सध्या तीच परिस्थिती आहे. मॅनेजर जास्त पण एकही धड चांगला टेक्निकल अर्किटेक्ट नाही.
कस्ट्मर तिकडे बोंबा मारतो आणि इथे मॅनेजर हात वर करुन मो़कळा होतो, "I don't have the required resource available". पिरॅमिड उलटा झाला आहे.

इथुन पुढे मी फक्त मॅनेजर आहे माझा फारसा टेक्नॉलॉजीशी संबंध येत नाही असं कोणी म्हणालं तर त्याची नोकरी धोक्यात आहे हे नक्की.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Feb 2015 - 5:12 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

माझ्या काही आय.टी. मित्रांकडुन फ्रेशर्सना मिळालेला सल्ला ऐकवतोय इथे.

थोड्या दिवसांनी, रादर आत्ताचं बहुतेक सॉफ्टवेअर इंजिनिअर्स कोड रायटिंगपेक्षा कोड असेंब्लीचं काम जास्तं करतात. गरजेप्रमाणे कोडमधे जुजबी बदल केले जातात. कदाचित ह्या दहा वर्षात एखादा दिवस असा येईल की तुमच्यापैकीचं एखादा दिवटा इंजिनिअर कोड रायटींग ऑटोमेशनचा प्रोग्राम तयार करेल. इंजिनिअर्स ची गरज फक्त आणि फक्त ट्युनिंग पुरतीचं उरेल.

सॉफ्टवेअर इंडस्ट्री एवढ्या मॅच्युअर्ड लेव्हलला पोचली आहे की नाही ह्याची कल्पना नाही. पण हे लो़क्स ही मतं ऐकवुन गरिब बिचार्‍या फ्रेशर्स ना मात्र घाबरवतं असतात हे नक्की. =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Feb 2015 - 5:13 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ता.क. वरच्या प्रतिसादामधली मतं माझी स्वतःची नसुन माझ्या आय.टी. मित्रांची आहेत. त्यामुळे कोड-गवंडी मित्रांनी हलके घ्यावे ही णम्र इनंती. =))

टवाळ कार्टा's picture

19 Feb 2015 - 8:02 pm | टवाळ कार्टा

कोड-गवंडी हा शब्द फार आवडला :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Feb 2015 - 9:51 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

खरं तरं कोड-ग्या म्हणणार होतो...पण इथे आय.टी.ची मेजॉरिटी असल्यानी आवरतं घेतलं =))

सोत्रि's picture

19 Feb 2015 - 9:55 pm | सोत्रि

म्हणा म्हणा! तसेही आयटीवाले ह्या 'मॅनेजरां'च्या तडाख्यात तावून सुलाखून कोडगे झालेलेच असतात :)

- (हार्ड-को(अ)डर) सोकाजी

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Feb 2015 - 7:49 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

आयबीएम वॉटसन आतापासूनच याच्या मागे लागली आहे. आयबीएम जीबीएस मध्ये होणार्‍या ले ऑफ्स मध्ये हे देखील एक कारण आहे असे ऐकून आहे. खरे खोटे तो वॉटसनच जाणे.

श्रीगुरुजी's picture

19 Feb 2015 - 8:37 pm | श्रीगुरुजी

१. स्वत: ला सारखे अपडेट ठेवणे सगळ्यांना शक्य होईल का ?
आईटी मधले स्किल हे साधारण ३-४ वर्षात पूर्ण बदलत असते . जी लोक सो कॉल्ड मेनेज्मेण्ट मध्ये
नसतील त्यांना जर नोकरी टिकवायची असेल तर रिटायर होऊ पर्यंत सतत अभ्यास करावा लागणार . सतत नवीन शिकावे लागणार . ३०-४० पर्यन्त नवीन स्किल आत्मसात करणे जमू शकेल पण ४५+ नंतर हे शक्य होईल का ?

स्वतःला कायम अपडेट ठेवणे हे बहुतेकांना शक्य होते आणि बहुतेक जण स्वतःची स्किल्स कायम अपडेट करत असतात. जो स्वतःची स्किल्स अपडेट करत नाही तो संपला.

२.अजून १५-२० वर्षांनी भारतीय आईटी(सर्विस) कंपनी वर परिणाम कसा होईल आणि त्या तो कसा हाताळतील ?
साधारण पणे भारतीय आईटी(सर्विस) कंपनी या ओफशोर वरच्या २-७ वर्ष अनुभव असलेल्या लोकामुलेच फायदा कमवत असतात आणि एखादी वेळ अशी येईल कि कंपनीमधले बरेच लोक १५-२०् वर्षे
अनुभव असलेलो साधारण लोक असतील . एक तर कंपनी त्यांचा पगार कमी करेल नाही तर कामावरून काढून टाकेल . पण काहीही झाले तरी नुकसानी मध्ये धंदा करणार नाही , त्यावेळचे चित्र कसे असेल ?

अजून १५-२० वर्षांनी आजच्या कंपन्यांचे स्वरूप फार बदललेले नसेल. थोडेफार बदल होतील, परंतु काम करण्याची बरीचशी पद्धत तशीच राहील. ऑनसाईटचे काम कमी होऊन बहुतेक सर्व काम ऑफशोअरच केले जाईल. साधारणपणे १५-२० वर्षे काम केल्यावर बरेचसे कर्मचारी स्वतःहून बाहेर जातील व स्वतःचा काही वेगळा उद्योग करतील किंवा स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करतील. सध्या विदेशी कंपन्या आपले काम भारतीय संगणक कंपन्यांना आऊटसोर्स करतात. १५-२० वर्षांनी भारतीय कंपन्या तेच काम पूर्णपणे स्वतः करण्याऐवजी इतर छोट्या भारतीय कंपन्यांना आऊटसोर्स करून त्यांच्याकडून ते काम करून घेतील.

३ आईटी मधला रिटायर झालेला माणूस कसा असेल ?
सध्या तरी आईटी मधला एवेरेज वय साधारण ३० च्या आसपास असेल असे मानले तरी यातले सगळेच लोकांना काही दर वर्षी ५-२० टक्के पगार वाढ , दर ३-४ वर्षांनी प्रोमोशन मिळणार नाही .
तर अजून २०-३० वर्षांनी आईटी चे चित्र कसे असेल ?
आईटी मधील लोकांना रिटायर होने नशिबात असेल का ?

गेल्या काही वर्षांपासून ४०+ वय असलेले आयटीतील वरीष्ठ कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती घेऊन स्वत:च्या आवडीचे काम करतात किंवा पूर्णपणे वेगळ्या प्रकारचे काम करतात. आयटीत साधारणपणे २० वर्षे काम केल्यावर भरपूर माया जमा झाली असते. प्रमोशन मिळण्याची शक्यता अत्यंत कमी असते. डोक्यावर प्रचंड जबाबदार्‍या व ताण असतो व त्यातून अनेक आजार मागे लागलेले असतात. त्यामुळे जमा केलेले पैसे योग्य प्रकारे गुंतवून निवृत्त होऊन ताणमुक्त होणे हा सध्याचा नवीन ट्रेंड आहे. माझ्या माहितीतल्या ४०+ वय असलेल्या अनेकांनी हा मार्ग स्वीकारलेला आहे.

४. सध्या तरी आईटी ओफशोरिंग मध्ये भारत बाप आहे . पण फिलिपिन्स , मलेशिया पोलंड , चाइना , स्लोवाकिया सारखे देश पण सध्या बराच मार्केट मारत आहेत . या देशाकडून स्पर्धा चालू झाली कि भारत कसा रीस्पोंड करेल ? हि स्पर्धा एकदम तीव्र झाली तर वरचे सगळेच प्रश्न इनव्हेलीड होतील का ?

फार पूर्वीपासून या देशांची भारताशी स्पर्धा आहे. ब्राझील, चीन, फिलिपिन्स असे अनेक देश गेली अनेक दशके ऑफशोअरिंगचे काम करत आहेत. भारताकडे त्यांच्या तुलनेत प्रचंड मनुष्यबळ असल्याने भारताचा वाटा मोठा आहे.

- (पीएमपी सारखी अनेक प्रमाणपत्रे मिळविलेला, अनेक कॉर्पोरेट आयटी कंपन्यात २० वर्षे काम करून स्वेच्छानिवृत्ती घेतलेला आणि सध्या आयटीशी दुरूनही संबंध नसलेल्या विषयात ज्ञानदानाचे काम करणारा) श्रीगुरूजी

श्रीगुरुजी's picture

19 Feb 2015 - 10:02 pm | श्रीगुरुजी

१५-२० वर्षात भारतात अजून एक मुख्य बदल होईल तो म्हणजे कायमस्वरूपी पेरोल वरील कर्मचार्‍यांची संख्या बरीच कमी होउन कंत्राटी कर्मचार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल. जॉब गॅरंटी वगैरे प्रकार मोठ्या प्रमाणात कमी होतील. जॉब असुरक्षितता बरीच वाढेल. लोकांनी आपले गाव सोडून दुसर्‍या शहरात जाण्याचे प्रमाण वाढीस लागेल.

श्रीगुरुजी एका पर्सोनल प्रश्न - तुम्ही Clustra डेटाबेस वर काम केले आहे का ?