दोस्ताना!

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जे न देखे रवी...
9 Feb 2015 - 6:37 pm

एकदा एक पुस्तक दिसल...
'एका मैत्रीची कहाणी'... नाव होत..
'मैत्री'त कहाणी कशी असेल?
'कहाणी'तली मैत्री कशी असेल?
कुतूहल माझ जागं झाल...
पुस्तक माझ्या घरी आल!

तेवढ्यात पक्या घरी आला...
दोस्तीची 'आण'देऊन पान खायला घेऊन गेला...
'साल्या तुझी तंगी हाय? दोस्त न तुझा? सांगायच नाय?'

जीव आत कसानुसा झाला...
'याला कोणी सांगितल?' प्रश्न मनात आला...
मुलांची फी.. आईच् आजारपण.. बायकोची नोकरी गेली...
राहाते राहिलो कमावते आपण..
पैसा पूरा पडेना... आयुष्यच तंग.. काहीच मला बोलवेना...

उलाघाल मनाची... दोस्ताला कळली...
'तू नाही बोललास... काल आई भेटली...
साल्या दोस्ती आपली फार जुनी हाय..
तुझ्यामुळे बुकं शिकलो.. विसरलो नाय..
आज आपला बिजनेश झाकास चालतो...
तुझ्यावाणी आप टू डेट आपनपन असतो...
तुझ्यामुळे दोस्ता आयुष्याला वळण लागल...
मवाली-गुंड होता-होता लाईनीला लागल...
आहे हे तुझ आहे यार.. तो म्हणतो;
काळजी नको.. मी सगळ म्यानेज करतो..'
मिठी मारायच्या बहाण्याने दोघे डोळे पुसतो..

घरी येऊन मी पुस्तक खोल कपाटात टाकतो...
एक कहाणी नुकतीच अनुभवून आलेलो असतो...

मैत्रीची कहाणी ज्याची त्याची आपली असते...
ती फ़क्त अनुभवायची... पुस्तकातुन समजत नसते...
------

कविता

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

9 Feb 2015 - 6:40 pm | किसन शिंदे

पक्या पान खायला का जातो?

प्रचेतस's picture

9 Feb 2015 - 6:52 pm | प्रचेतस

त्याला करंssssट येत असेल.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Feb 2015 - 9:53 pm | अत्रुप्त आत्मा

=)))))

रेवती's picture

9 Feb 2015 - 9:58 pm | रेवती

कविता आवडली.

स्रुजा's picture

9 Feb 2015 - 11:25 pm | स्रुजा

असेच म्हणते.

एस's picture

9 Feb 2015 - 11:08 pm | एस

दैनंदिनी सप्रेम भेट!
(स्वगत - हम्म् त्या पराचा रोल कधी करावा लागेल असे वाटले नव्हते. )

दोस्ताना वाचून पॉपकॉर्न घेऊन बसावं लागतंय की काय असं वाटलं होतं, बार अंमळ फुसका निघाला!!

स्वाती राजेश's picture

10 Feb 2015 - 1:54 am | स्वाती राजेश

कविता... :)

मैत्रीची कहाणी ज्याची त्याची आपली असते...
ती फ़क्त अनुभवायची... पुस्तकातुन समजत नसते...
अशीच आणि अजून छान असते मैत्री !
आवडली कविता !