श्री गणेश लेखमाला २०२३

1

अमृतसर ६ - खरेदी

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in भटकंती
8 Feb 2015 - 8:09 pm

अमृतसर १ -
अमृतसर २ -
अमृतसर ३ -
अमृतसर ४ -
अमृतसर ५ -

खरंतर मुंबईत राहणार्‍याला बाहेर गेल्यावर आठवण म्हणुन घ्यायच्या शोभेच्या वस्तूंव्यतिरिक्त काहीही घेण्यासारखे नसते. सगळं काही इथे मिळतं. मात्र हा विचार मनातच ठेवावा लागतो. उगाच बौद्धिक ऐकण्यापेक्षा आलीया भोगासी असावे सादर असं मनातल्या मनात म्हणत आपण निमूटपणे जायचं. ज्यांना आवडतं त्यांनी खरेदीला जावं, आम्हाला काही घ्यायचं नसल्यामुळे आम्ही फिरुन येतो वगैरे चालत नाही. जावे लागतेच आणि आपल्या मताला फारशी किंमत नसली तरी आपले मत द्यावेही लागते.

अमृतसरला पंजाबी पेहरावाचे कापड फार उत्तम मिळते, अतिशय रास्त दरात मिळते - आपल्या पेक्षा खूपच स्वस्त मिळते, मुख्य म्हणजे घासाघीस होते व सर्वात कळस म्हणजे निवडलेल्या कापडाचे कपडे त्वरित शिवून मिळतात इत्यादी मौलिक माहिती आमच्या महिला वर्गाने प्राप्त करुन घेतली होती. कुठल्या भागात उगाच भपका असतो आणि कुठे कपडे उत्तम व रास्त भावात मिळतात या विषयी अर्थातच पक्की माहिती करुन घेण्यात आली होती. ठरल्याप्रमाणे आम्ही कापड खरेदीला निघालो. आमच्या सारथ्याने आम्हाला त्याच्या विश्वासाच्या दुकानात नेले. बाजारपेठेत अगदी रस्त्यालगतच असलेले हे दुकान दुमजली होते. ऐसपैस गाद्या पसरल्या होत्या. (स्त्रीयांना ठाण मांडायला आणि त्यांच्या नवर्‍यांना/ मुलांना रेलायला- लोळायला). आम्ही आत जाताच स्वागत झाले आणि ताबा विक्रेत्याने घेतला. घेण्याची घाई करु नका, आधी फक्त बघून घ्या असे त्या विक्रेते मंडळींनी धूर्तपणे सुचवले. बायका 'जरा बाजुला ठेवा, यातुनच काय घ्यायचे ते निवडु' असे म्हणत असल्या तरी प्रत्यक्षात जे जे बाजुला ठेवलेले आहे ते सर्व घेतले जाणार हे त्यांना पूर्ण माहित असते.

1
2
3

दुकान हरतर्‍हेच्या कापडाने भरले होते. गच्च भरलेले खण उपसले जात होते, हळुहळु रिकामे होत होते आणि आहे त्या ठिकाणी असलेलं कापड कमी पडत की काय म्हणुन बाहेरुनही ताजी कुमक येतच होती.

4
5
6

असाच एक गठ्ठा आला आणि विकेत्यांनी एकदम काहीतरी अद्भुत दाखवत असल्याच्या आविर्भावात नवी ठाणें उघडली. 'कराची' - "बस्स् तुम्ही दिल्ली, मुंबई कुठेही कितीही उत्तम दुकानात जा, हा कपडा मिळणार नाही हे निश्चित" विक्रेत्याने मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले. ती कापडं खरीच कराचीहुन येतात की त्या पध्द्तीच्या कापडाला कराची म्हणतात कोण जाणे. पण संच सुंदर होते आणि किमतीही बर्‍या वाट्ल्या. आता खेळ रंगात आला होता. अंतिम फेरीसाठी निवडलेले कपडे कोपर्‍यात जात होते, ठेवलेले परत दाखवले जात होते. विक्रेते आणि ग्राहक - दोघांनाही खरेदी चढली होती.

7
8
9

अखेर निवड अंतिम करण्यात आली. किमती पुन्हा ऐकवल्या गेल्या. त्यावर जोरदार आक्षेप हरकती घेण्यात आल्या. 'काय हो तुम्ही फारच किमती सांगता" आणि तिकडुन ' अहो, निर्धास्त राहा आम्ही एक पै जास्त घेणार नाही, आम्ही तुम्हाला खुष केलं तरच तुम्ही आणखी परिचितांना आमच्याकडे पाठवाल' वगैरे वगिरे. मात्र कापडं खरोखरच छान होती आणि इथल्या तुलनेत किंमतीनी खूपच वाजवी होत्या. मग एकदा निवडलेले पेहराव पुन्हा एकदा उलगडुन पाहिले गेले.

10
11
12
14
15
16
17
18
19

सगळे कपडे निवडुन झाल्यावर त्या महाभागांनी आणखी एक ठाण उघडलं - 'अहो इथे येउन कशिद्याच्या ओढण्या घेतल्या नाहीत तर मग ती काय खरेदी म्हणायची?' इती विक्रेता. पंजाबी पोशाख घेताना त्याला ओढणी असते वा नसल्यास कापडाला साजेलशी जुळत्या रंगाची ओढणी घेतली जाते इतपतच माझे ज्ञान मर्यादित होते. इथे नवी महिती मिळाली. कशिद्याची ओढणी घ्यायची मग त्यावर पोशाख शिवायला एकरंगी कापड घ्यायचं. अरे देवा! म्हणजे अजुन हे बाकी होतं

20

अखेर खरेदी संपली, घासाघीस झाली. अखेर अंतिम रक्कम जवळच्या शून्यांत रकमेवर आणली गेली. पैसे चुकते झाले. मापं देउन झाली. संध्याकाळपर्यंत कपडे हॉटेलवर पोचते करण्याचे आश्वासन मिळाले आणि आम्ही बाहेर पडलो.

इकडे महिला आघाडी कापडात दंग असताना आम्ही पुरुष मंडळी आमच्या खरेदीला सटकलो आणि यांची खरेदी संपायच्या आत परत आलो. आमची खरदी म्हणजे निव्वळ चविष्ट खरेदी.

21

अमृतसरमध्ये हॉलगेटला शिरल्यापासून इंग्रजीत 'पापर वरियान' असे लिहिलेली अनेक दुकाने दिसली होती. पापर वरियान म्हणजे पापड आणि वड्या. उत्तर आणि पूर्वेत ड आणि र ची हमखास अदलाबदल होते. कचोरीची कचोडी होते आणि वडीची होते वरी. आमच्या कंपनीतला एक बंगाली वडापावचा उच्चार बोरापाब करायचा ते आठवले. इथले पंजाबी मसाल्याचे पापड मस्त झणझणीत पण पापडखार जरा जास्तच असतो. वडी हा प्रकार जरा नवा होता. या वड्या म्हणजे आपण सांडगे करतो तशा पण चमचमीत मसालेदार वड्या होत्या. या वड्या पुलाव वा कढीमध्ये टाकायच्या. पुलावाला मस्त वास लागतो. मात्र मला वडी खायला फारशी आवडली नाही. वडीमुळे भाताला सुरेख गंध आला होता हे खरे.

दुकानांमध्ये पापड, वड्या, लोणची, मसाले व सुकामेवा यांची रेलचेल होती. इथलं लोणचही मस्त मोहरीच्या तेलातलं आणि सणसणीत. कमल काकडी, लसूण, आंबा, लिंबु, काश्मिरी लाल मिरच्या, मिश्र लोणंचं अशी अनेक लोणची होती. अनेक प्रकारचे मसालेही होते. पंजाबी मसाला, चना मसाला, गरम मसाला, मटन मसाला, चहा मसाला असे नाना मसाले होते. सुकामेव्यात खास म्हणजे अक्रोड मुबलक दिसत होते. हे दुकनदार मोठे उद्योगी. त्यांनी आम्हाला आपल्या दुकानात मिळणार्‍या पदार्थांची छापील यादीच दिली. ठराविक रकमेचा माल मागवला तर आम्ही कुरिअरने पाठवतो असे त्यांनी सांगितले.

22
23
24
25

पंजाबी पोशाख करायचा म्हणजे पंजाबी जुती हवीच! हॉल गेटला जुतीची भरपूर दुकानं. आमच्या सारथ्यानं आम्हाला हॉल गेट्च्या बरोबर समोर असलेल्या एका दुकानात नेलं. इथे बायका व पुरुष दोन्हींसाठी जुतीचे मुबलक प्रकार होते. आम्हाला फारसा उत्साह नव्हता, पण महिला आघाडी जोरात होती. आपण कुठल्या रंगाचे कपडे निवडले ते आठवुन त्या रंगाच्या जुत्या पाहायच्या होत्या.

26
27
28
29
30
31
32
33

खरेदी संपली, संध्याकळचे साडेसात वाजुन गेले होते. मंडळींनी न विसरता कपड्यांच्या दुकानात फोन लावला आणि कपडे पोचते केले का अशी चौकशी केली. 'आमचा मास्टर निघतोच आहे' असे उत्तर मिळताच, नको, आम्हीच तिथे येतो असे सांगत आमचा मोर्चा पुन्हा कापड दुकानाकडे वळला. कपडे शिवुन तयार असल्याचे समजतास महिला गटात आनंदी आनंद झाला. कपडे ताब्यात घेउन हॉटेलला पोचतात आम्ही निमूट्पणे खाली लॉबीत बसलो आणि स्त्रीवर्ग कपडे आजमावायला वर गेला. बोलावणे येताच आम्ही वर गेलो. मंडळी नव्या कपड्यात दंग होती. आवडते कपडे ठरल्या बरहुकुम मिळाल्याचा आनंद चेहेर्‍यावर दिसत होता.

34

प्रतिक्रिया

किती हौशीने फिरला आहात हो!मजा आली वाचायला आणि फोटो पहायला.रंगीत जुती तर मस्तच!

अत्रन्गि पाउस's picture

8 Feb 2015 - 8:57 pm | अत्रन्गि पाउस

फोटोतले सगळेच खरेदीयोग्य दिसतेय प्रत्यक्ष पोहोचलो तर मुश्कील आहे ...

स्वाती दिनेश's picture

8 Feb 2015 - 9:37 pm | स्वाती दिनेश

खरेदी आवडली आहे, अमृतसरला जायलाच लावणार तुम्ही साक्षीदेवा..
स्वाती

आदूबाळ's picture

8 Feb 2015 - 10:20 pm | आदूबाळ

ते हिरवं कापड आणि बहुरंगी जुती काय चिकन्या आहेत. जायलाच पायजे अमृतसरास.

खटपट्या's picture

8 Feb 2015 - 11:06 pm | खटपट्या

जबरद्स्त फोटो आणि माहीती. कुटूंबाला गेउन जायचे म्हणजे खीशाला मोठा खड्डा आहे. :)

आईग्गं! इतकं मस्त वाटलं हे बघून.......
खरेदी छान झालीये. फुलकारी भरतकाम केलेले कापडांचे प्रकार, जुती बघून तिकडे जावेसे वाटले.

छळ मांडलाय बाई तुम्ही अगदी गेले काही दिवस.

काय ते सूंदर रंग , किती ती हौस , वा वा. खाण्या पिण्याची आणि खरेदी ची अगदी बहार दिसतेय तिथे. पंजाबात जायचं मनात होतंच पण आता हे फोटो आणि वर्णन वाचून वाटत नाही की फार दिवस धीर धरवेल.

जुइ's picture

9 Feb 2015 - 3:02 am | जुइ

जावेच लागणार ;)

पलाश's picture

9 Feb 2015 - 12:58 pm | पलाश

सुंदर लेखमाला !!!! :)

आरोही's picture

9 Feb 2015 - 1:13 pm | आरोही

मस्त मस्त !! खरेच तुम्ही अमृतसर ला जायलाच लावणार बघा ..काय त्या जुत्या,,फुल्कारीच्या ओढण्या सुंदरच .. मस्त लेख आणि फारच उपयोगी !!

सविता००१'s picture

9 Feb 2015 - 1:19 pm | सविता००१

किती सुंदर ड्रेस मटेरिअल, जूती..
आईग्ग, मेलेच बघून
काय सुरेख आहे.

मृत्युन्जय's picture

9 Feb 2015 - 1:50 pm | मृत्युन्जय

पहिला, दुसरा आणि पाचवा भाग वाचला होता. आता सहावा भाग वाचल्यावर सगळेच परत वाचले. भटकंती, खादाडी आणी खरेदी अश्या सगळ्या अंगांना स्पर्ष करणारी ही लेखमाला आवडली याची ही पोचपावती

पिलीयन रायडर's picture

9 Feb 2015 - 2:55 pm | पिलीयन रायडर

अहो ती कशिद्याची ओढणी म्हणजे - फुलकारी..!! एक नंबर प्रकार आहे तो..
हे फोटो पाहुन फार म्हणजे फारच त्रास झालाय..

सविता००१'s picture

9 Feb 2015 - 3:15 pm | सविता००१

फार त्रासदायक.

मनिमौ's picture

9 Feb 2015 - 3:38 pm | मनिमौ

ईनो घेऊन सुद्धा थांबली नाही. फोटो अप्रतिम

दिपक.कुवेत's picture

9 Feb 2015 - 7:19 pm | दिपक.कुवेत

हा हि भाग मस्त रंगलाय. कधी काळी चुकुन माकुन सहकुटूंब गेलोच तर नुसत्या खरेदिसाठि किती कॅश जवळ ठेवू??

बॅटमॅन's picture

9 Feb 2015 - 7:24 pm | बॅटमॅन

आता कशाला लागतेय क्याश? कार्डचा बेनिफिट करा एनक्याश.

दिपक.कुवेत's picture

9 Feb 2015 - 7:47 pm | दिपक.कुवेत

ह्या खर्चाकरीता किती एस्टिमेट करु ट्रिप प्लॅन करताना हेच विचारतोय....

सर्वसाक्षी's picture

9 Feb 2015 - 7:51 pm | सर्वसाक्षी

सौ वर सोडा! तुम्ही मनमुराद भटका, खा प्या आणि मजा करा.

बॅटमॅन's picture

9 Feb 2015 - 7:24 pm | बॅटमॅन

क्या बात है. सफरीच्या साकल्याने मिळालेले समाधान धाग्याधाग्यातून ओसंडते आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Feb 2015 - 7:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुंदर अतिशय मन लावून सफर वाचतोय.

-दिलीप बिरुटे

सर्वसाक्षी's picture

9 Feb 2015 - 7:48 pm | सर्वसाक्षी

धन्यवाद मंडळी.

सहल संपली पण अमृतसर अजुनही आठवतय. पुन्हा एकदा जायची इच्छा आहे. किमान एक दिवस मंदिरासाठी. एक भेट तर्ण तारणला आणि अर्थातच फिरोजपूरला. आणि हो, यावेळी खरेदी नाही (एकदा झाली की !)

जमल्यास उत्साही मिपाकर भट्के मिळुन पुन्हा एकदा जाउन येउ.

मुवि, मनावर घ्या. मी आहेच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Feb 2015 - 7:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> सहल संपली

नै नै...अजून येऊ द्या. मनात राहीलेला भाग.
(वाटल्यास वरचा प्रतिसाद अप्रकाशित करतो) :)

-दिलीप बिरुटे

दिपक.कुवेत's picture

9 Feb 2015 - 7:57 pm | दिपक.कुवेत

तुम्हि तो मन लावून वाचतायेत म्हटल्यावर!!! :D

पैसा's picture

9 Feb 2015 - 8:01 pm | पैसा

काय सुरेख वस्तू आहेत सगळ्या! रंगीत जुती आणि फुलकारीच्या ओढण्या आणि ड्रेस मटेरियल्स बघून जीव गेला! तिकडे खरेदीला जायचं तर नवर्‍याचा कुठेतरी बंदोबस्त करून जावं लागणार हे नक्की! :P

अनिता ठाकूर's picture

10 Feb 2015 - 1:18 pm | अनिता ठाकूर

पैसा, नवर्‍याचा बंदोबस्त.... अगदी बरोब्बर! पण माझी एक बारीक शंका... ह्या कापडांचे रंग पक्के असतात का? मी राजस्थानात खरेदी केलेल्या दोन सुती साड्यांचे रंग पाण्यात पार उतरले.

प्रीत-मोहर's picture

10 Feb 2015 - 9:44 pm | प्रीत-मोहर

साक्षी काका खरेदी दुकानांचे आणि खादाडी दुकानांचेही पत्ते द्याना. नवर्‍याच्या खिश्याला चुना लावायचा बेत आहे

एस's picture

11 Feb 2015 - 4:44 pm | एस

पत्ते फक्त यांनाच व्यनि करा बरं का, नाहीतर अ.भा.बिचारे-खिशाला-चुना-लागलेले-नवरे-संघटनेला विनंती करून मिपावर मोर्चा आणायला लावला जाईल हा धागा ब्यान करण्यासाठी!

सर्वसाक्षी's picture

11 Feb 2015 - 5:21 pm | सर्वसाक्षी

__/\__

अहो मलाही जीवाची भिती आहे की :)

प्रीत-मोहर's picture

11 Feb 2015 - 5:29 pm | प्रीत-मोहर

व्यनि तर व्यनि. पण पत्ते द्याच. प्लॅनिंग करायला बरे पडेल. असे वाटते.

हा धागा वाचुन प्लॅन ठरलाय. आता पत्ते दिले नैतर मोर्चा ;)
अवांतरः व्यनि आल्यानंतर त्याचे काय करायचे हे ही पाहिल्या जाईल. ;)

मदनबाण's picture

11 Feb 2015 - 1:19 pm | मदनबाण

मस्त फोटो. :)
अंतिम फेरीसाठी निवडलेले कपडे कोपर्‍यात जात होते, ठेवलेले परत दाखवले जात होते. विक्रेते आणि ग्राहक - दोघांनाही खरेदी चढली होती.
हा खरेदीतला सगळ्यात महत्वाचा टप्पा ! नंतर निवडलेल्या मधुन परत निवडणे. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }

इशा१२३'s picture

12 Feb 2015 - 12:37 pm | इशा१२३

मस्त!मस्त!सगळे भाग वाचनीय.(खादाडि आणि खरेदिचा भाग त्रासदायक)एकेक पदार्थ आणि वस्तु सुरेखच!
जुतीचे फोटो तर खूप आवडले.