एकदा एका वळणावर जुनी मैत्री भेटली
आठवणी घेउन थांब ना... ऐक ना... हट्ट धरून बसली
ऑफिसची वेळ; नव-याचा डबा...
पोरांची शाळा; boss चा चेहरा..
आठवल क्षणात सार; अन् पाठ केली तिच्याकड़े...
थोड़ी हिरमुसली-थोड़ीशी फुगली...
निघून गेली दुसरीकडे...
जाणवल तिच हिरमुसण फुगण...
पण वेळ नव्हता मला... मनात होत office ला वेळेत पोहोचण
संध्याकाळी परत train च्या डब्यात दिसली..
ओळख दाखवू की नको... या confusion मधे होती;
मी हसले... तशी ती पण हसली...
पटकन् जवळ येउन कुशीत शिरली..
'कळत ग मला तुझ्या असण्याच महत्व...
सुटत नाही पण हे संसाराच देण'--
तिला मिठीत घेउन मी मनातच म्हंटल;
Station आल म्हणून स्वतःला आवरल.
ती हसली ... समजूतदार आहे पट्ठी
तिच हो ती...
कुमारी मैत्री विश्वास आठवणी
प्रतिक्रिया
6 Feb 2015 - 11:24 pm | प्रचेतस
एक लिंबू झेलू बै........
6 Feb 2015 - 11:30 pm | किसन शिंदे
=)) =))
जे लिहायचं मी टाळत होतो ते तू लिहीलंच.
7 Feb 2015 - 5:59 am | अत्रुप्त आत्मा
आगोबाच्या डोक्यावर बुद्दुक्कन फोड़ू! =))
7 Feb 2015 - 5:33 am | जेपी
शिर्षक वाचुन गोंधळात पडलो...
मंजे कुमारी (पद) मैत्री (मुलीचे नाव-आजकाल काय सांगता येत नाय) विश्वास(तिर्थरुप/नवर्याचे नाव) आठवणी (आडनाव) ... *biggrin*
7 Feb 2015 - 9:00 am | अजया
=))
7 Feb 2015 - 11:03 am | चुकलामाकला
टांगा पलटी घोडे फरार!;)
7 Feb 2015 - 12:16 pm | मितान
:))
मी तुमची फ्यान !
7 Feb 2015 - 4:07 pm | पिंपातला उंदीर
मला वाटल कुमार विश्वास वर आहे कि काय कविता
7 Feb 2015 - 6:08 pm | जेपी
आता गोंधळ दुर झाला.
कुमारी (पद) मैत्री(नाव)विश्वास(तिर्थरुप)आठवणी(आडनाव)
टका,जमतय का बघ *wink* =))
8 Feb 2015 - 11:06 pm | माम्लेदारचा पन्खा
ही त्यातलीच पायरी म्हनावी का काय? ( ह. घ्या )
9 Feb 2015 - 11:06 am | सविता००१
:))
9 Feb 2015 - 3:48 pm | पैसा
मला कुमार विश्वास माहीत आहेत. हे नवीन काय म्हणून धागा उघडला!