शिवरांयांच्या राज्याभिषेकाच्या काळात त्यांच्या दरबारातल्या काही लोकांनीच विरोध केला. आण्णाजी दत्तो हे त्यांपैकीच एक. सगळ्यांचा आक्षेप एकच होता की शिवराय हे क्षत्रिय नाहीत!
अशावेळी भोसले धराण्याचं मूळ शोधण्याची आवश्यकता भासू लागली. ही जबाबदारी शिवरायांच्या दरबारातल्या बाळाजी आवजी चिटणीसांकडे देण्यात आली. संशोधनाअंती शिवरायांचं मूळ रजपुतांच्या सिसोदिया या क्षत्रिय घराण्याचं निघालं. या मूळ घराण्याला नंतर बरेच फाटे फुटले. घोरपडे घराणं हे या पैकीच एक. मूळ सिसोदिया घाराण्याच्या भोसाजी नावाच्या एका राजा नंतर "भोसले" हे आडनाव रुढ झालं.
या वंशवॄक्षाची एक फांदी तंजावूर (तंजावर्)ला स्थयि़क झाली. तंजावरचे राजे व्यंकोजी हे शिवरायांचे (कि शहाजी राजांचे?) सावत्र बंधू.
भोसले घराण्याची एक फांदी ही वेरूळला स्थायिक झाली. हे शिवरायांचं घराणं. तर दुसरी फांदी नागपूरला स्थयिक झाली.
शिवरायांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी राजे यांची वंशावळ आताच्या सातारा जिल्ह्यात आहे. उदयनराजे भोसले हे या वंशातले विद्यमान राजे. हि शिवरायांची अकरावी पिढी.
तर धाकटे पुत्र राजाराम यांची वंशावळ आताच्या कोल्हापुरात पहायला मिळते. कोल्हापुरातल्या विद्यमान राजांच नाव नक्की माहीत नाही. पण बहूदा 'शाहू' असावं.
कोल्हपुरातल्या या वंशवळीत एक दत्तक प्रकरण झालं. कोल्हापुरातल्या कागल मधील घाटगे घराण्यातल्या "राजर्षी शाहू महाराजां'ना कोल्हापुरातल्या भोसले घराण्याचा वारसदार म्हणून दत्तक घेण्यात आलं. राजर्षी शाहू महाराजांना दत्तक घेताना सुद्धा घाटगे घराणं मूळ भोसले घराण्यांशी संबधीत आहे याची खात्री करण्यात आली.
सातारा, कोल्हापूर आणी तंजावर येथील पुर्ण वंशावळ उपल्ब्घ आहे. पण नागपूरातल्या भोसले घराण्यांबद्दल कुणाला काही माहीती आहे का?
(शिवप्रेमी) रम्या
प्रतिक्रिया
8 Nov 2008 - 9:22 pm | कशिद
अवघड आहे हे सगळा !!!!!
बाबा साहेब पुरान्दरेना फ़ोन लावा बरोबर माहिती सापडेल .
बाबा साहेबांचा fan (अक्षय)
13 Nov 2008 - 12:57 pm | अनंत छंदी
मध्यंतरी शिवरायांची वंशावळ कर्नाटकातल्या एका लढाऊ राजघराण्याशी संबंधित आहे, असे कोणा संशोधकाने शोधल्याचे वृत्तपत्रातून वाचल्याचे स्मरते. अर्थात त्याने काहीच फरक पडत नाही. शिवरायांची थोरवी व पराक्रम हा वादातीत आणि तमाम मराठीजनांना अभिनास्पद आहे.
13 Nov 2008 - 6:19 pm | तात्या विंचू
कोल्हापुरातल्या विद्यमान राजांच नाव मालोजीराजे ....
(कोल्हापुरी)
-तात्या विंचू
13 Nov 2008 - 6:34 pm | सागर
आपले एक प्रिय मित्र "उदय सप्रे" याबाबत नक्की माहीती देऊ शकतील... त्यांना व्य.नि. धाडा....
- सागर