मन... मनाचे पाखरु
घाले गवसणी नभी
कधी बनुन कोकरु
दूर पळे रानोमाळी
मन विशाल सागर
कुशी घेई नदी नाले
मन सशाच्या दिलाचे
दडू बसे बिळामधे
मन कधी असे वारु
कधी प्रेमाचा सागरु
कधी मर्द त्याला म्हणु
कधी कलिकेचा वेणु
मन पियानोची धुन
मन मुरलिची तान
मन गंभीर आरोह
मन सतारीच गान
मन वेल हसणारी
मन नदी पळणारी
मन पर्वत शिखरी
मन पाताळही ढुंडी
मन... मनाची कविता
प्रत्येकाच्या मनि फुले
त्याच्या सुवासाच्या संगे
जीव प्रत्येकाचा डोले
मन हिशोबी काळाचे
नफा तोटा मोजू पाहे
मन पल्याड काळचे
काळजाला भिडू पाहे
----------------
प्रतिक्रिया
5 Feb 2015 - 3:43 pm | गणेशा
छान आहे कविता
5 Feb 2015 - 6:51 pm | चुकलामाकला
रचना आवडली.