अशांतिचे गाणे... (गीत.)

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
10 Jan 2015 - 12:36 am

(चाल-​ ऐ दिल मुझे बता दे, तू किस पे आ गया है )

होतोच एकटा मी,राहिन एकटा ही
मन हे असेच वेडे,सांगून गूज पाहि॥धृ॥

तेथून गार वारा,शिडकावतो मनाही
निपचीतं शांत निजल्या,बोलावितो तनाही
आता कळून चुकले,काहिच शांत नाही॥१॥
मन हे असेच वेडे,सांगून गूज पाहि............॥धृ॥

शांती कशात आहे?,नक्की कुठे कळे ना!
देवात शोधली ती...सुरंहि तिथे जुळे ना!
वळले मलाहि तेथे,ती शोधण्यात नाही॥२॥
मन हे असेच वेडे,सांगून गूज पाहि............॥धृ॥

गेलो तिच्याही पाठी, नक्की कुठे कशी ती?
सारी मनुष्य जाती, वेडी तिच्याच साठी
कळले ही धावते ती,आमुच्या पुढे..न पाठी॥३॥
मन हे असेच वेडे,सांगेलं गूज गाठी॥धृ॥

सोडून नाद सगळा,ध्यानस्थ बैसलो मी
शांतीत काय आहे?,शोधुन भागलो मी
शांती मला म्हणे बा,तू स्वस्थ फक्त राही॥४॥
मन हे असेच वेडे,सांगून गूज पाहि............॥धृ॥

बोलावितो मला ही,तो शांत शांत तारा
खुणवून दाट आहे,आकाशिचा पसारा
म्हणतो खुळ्या अरे का?तू गप्प गप्प राही॥५॥
बोलून टाक सगळे,गेली अशांतता ही............॥धृ॥
https://lh3.googleusercontent.com/-onoRACleFm4/VLAj22RviRI/AAAAAAAAGt8/-EB_xxpQ98Y/w314-h405-no/shukra%2Btara.jpg
=============
अतृप्त..
.
.
.
.
(प्र.चि. - अं.जा.वरून..)

अद्भुतरसकविता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

10 Jan 2015 - 5:07 am | प्रचेतस

अतिशय सुंदर आणि लयबद्ध.

सतिश गावडे's picture

10 Jan 2015 - 6:32 am | सतिश गावडे

आपण गीताची जन्मकथा सांगितल्याने विशेष भावलं.

अफाट आहे तुमची काव्यप्रतिभा !!!

पैसा's picture

14 Jan 2015 - 2:30 pm | पैसा

गीता, प्रतिभा, कविता, शांति. नेमके कोण?

'कविता' छानच!

गेय कविता दुर्मिळ होत चालल्या आहेत ?नाही, ही एक पाहा आशयगर्भ. वेरुळालेण्यांत सापडेल का शांती ?डोळे भरून पाहा १ते ३४लेण्यांत.प्रतिभा असतांना शांतीची सवत कशाला पाहिजे ?
अप्रतिम बुवा.
सोमवारी लेख नको महाकाव्य हवे.

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jan 2015 - 8:58 am | अत्रुप्त आत्मा

@कंजूस काका >> बाप रे!!! :-D

स्पंदना's picture

10 Jan 2015 - 9:05 am | स्पंदना

कूठे चालला आत्मुस?
अन ही शांती कोण? कोण ही शांती? कोण शांती ही?

लय भारी कविता, मस्त फोटोची निवड!!!

कंजूस's picture

10 Jan 2015 - 9:25 am | कंजूस

आता बापरे! नको. फक्त शरणम गच्छामि, नम: शिवा , णमो आदिनाथा॥ शांति शांति शांति

खटपट्या's picture

10 Jan 2015 - 9:47 am | खटपट्या

चांगलीय !! शांतीवरची कविता !!

नाखु's picture

10 Jan 2015 - 3:58 pm | नाखु

प्रत्यक्षाहून प्रतीमा उत्कट.
तळटीप :शब्दजुळारींना ही कवीता सिलॅबसला लावू काय?

गौरी लेले's picture

10 Jan 2015 - 7:37 pm | गौरी लेले

सुंदर कविता अतृप्त आत्माजी

पुढील लेखनास शुभेच्छा !

मुक्त विहारि's picture

10 Jan 2015 - 11:57 pm | मुक्त विहारि

बादवे,

आजकाल कविता बर्‍याच करत आहात.

तुमची "स्फुर्ती-प्रेरणा" कोण?

अत्रुप्त आत्मा's picture

11 Jan 2015 - 6:13 am | अत्रुप्त आत्मा

नाखु(न)काका-- हां भावानुवाद नाही.. फ़क्त त्या चालिवारून सुचलेली आहे.

मूवी-- तुमची "स्फुर्ती-प्रेरणा" कोण? >>> नेहमीचीच! ;-)

टवाळ कार्टा's picture

11 Jan 2015 - 12:12 pm | टवाळ कार्टा

नेहमीचीच! >> औं?? तांब्या??? =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 Jan 2015 - 10:56 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मराठी व्याकरण विसरलास का बे?

तांब्या नेहेमीचा असेल का नेहेमीची? =))
पेर्णा=स्त्रिलिंग (नेहेमीची)
तांब्या= पुल्लिंग (नेहेमीचा) =))

हाडक्या's picture

13 Jan 2015 - 5:46 pm | हाडक्या

ट़का.. बुवांनी ताम्रकलश वापरलाय हो. उगी तांब्या म्हणायचं काम नाय.. ;)

@ बुवा, मस्त हो . :)

hitesh's picture

11 Jan 2015 - 10:53 pm | hitesh

छान.

आनंदकंद वृत्त.

एका तळयात होती बदके पिले सुरेख.

चूडी मझा न देगी कंगन मझा न देगा

अत्रुप्त आत्मा's picture

12 Jan 2015 - 10:05 am | अत्रुप्त आत्मा

थँक्यू!!!

एका तळयात होती बदके पिले सुरेख.>>>हीच चाल जास्त मॅच होते आहे.

कंजूस's picture

12 Jan 2015 - 12:11 pm | कंजूस

लाजून हासणे अन हासून ते पाहाणे ॥मी ओळऽखून आहे साऽरे तुझे बहाणे -ही चाल अन आशय फिट्ट बसतोय का ते सांगा ना ऽऽगडे

अत्रुप्त आत्मा's picture

12 Jan 2015 - 12:54 pm | अत्रुप्त आत्मा

वृत्त तेच म्हटल्यावर चाल बसणारच पण तिच्यातून शब्द-उभे राहिले पाहिजेत..ते काम हितेसभाय म्हणतात त्यातच परफेक्ट होते आहे..म्हणून अनुमोदन त्यासच कायम ठेवत आहे. :)

सूड's picture

12 Jan 2015 - 3:09 pm | सूड

ओह्ह ओक्के!! शांती!!

प्रमोद देर्देकर's picture

13 Jan 2015 - 2:16 pm | प्रमोद देर्देकर

बुवा का ब्र शांतीच्या मागे लागले असावेत?
Confused face

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jan 2015 - 4:49 pm | अत्रुप्त आत्मा

@बुवा का ब्र शांतीच्या मागे लागले असावेत?>> गाणं नीट वाचल/ऐकलं नैत बहुतेक! ;) अहो सोप्पं आहे..अशांतीच्या शोधासाठी! :)

सुचेता's picture

14 Jan 2015 - 10:12 pm | सुचेता

गेयताप्र्धान कविता, आवड्ली

सोडून नाद सगळा,ध्यानस्थ बैसलो मी
शांतीत काय आहे?,शोधुन भागलो मी
शांती मला म्हणे बा,तू स्वस्थ फक्त राही॥४॥
मन हे असेच वेडे,सांगून गूज पाहि............॥धृ॥

मस्त एकदम .. पुन्हा पुन्हा वाचण्यासारखी...

---
अवांतर :

शांती म्हणे न जेंव्हा काही.. तेंव्हा अशांतीची सुरुवात असेन ती.

नरेंद्र गोळे's picture

24 Jan 2015 - 4:05 pm | नरेंद्र गोळे

पोत्यानी होती गीते, मी श्राव्य शोधताहे
हितगूज जे वदे ते, मी गीत शोधताहे
शांतीस साक्ष व्हावे, ही आस धरून राही
मन हे असेच वेडे, सांगून गूज पाही

अत्रुप्त आत्मा's picture

24 Jan 2015 - 8:35 pm | अत्रुप्त आत्मा

व्वाह!!! :HAPPY:

खमक्या's picture

24 Jan 2015 - 9:49 pm | खमक्या

बुवांना तांबीय संप्रदायात खुपच 'शांती' लाभलीय बहुतेक. म्हणूनच आता ते अशांतीच्या मागे लागले असावेत.

-शांत खमक्या