आज सकाळी कळव्यावरुन फोन आला. "मला गुरुजींसाठी आरती लिहायची आहे."
मी म्हटलं चांगलं आहे; लिहा की. फोनवरचा आवाज अडखळला. मी काय झाले असे विचारताच "मी आता तांब्या पंथाची दीक्षा घेतली आहे. मला आरती लिहिणे जमणार नाही. तुम्ही लिहून दया ना."
मी प्रयत्न केला.
-------–------------------
अत्रुप्त आत्मा माझे आई
स्थाण दयावे तुझे पायी
तुझा तांब्या मी वाहीन
तुझाच दास मी होईन
गायछापाचा नैवैद्य तुजला
जिलबीचा प्रसाद दे मजला
जरी थांबेन मी दाबून नीट
आतल्या आत पडेल पीठ
येऊ दे माझी तुला करुणा
लल्लल्लल्लल्ललू दयाघना
अत्रुप्त आत्मा माझे आई
स्थाण दयावे तुझे पायी
प्रतिक्रिया
17 Jan 2015 - 9:42 pm | पैसा
आरती चंगली लिहिता हो तुम्ही धण्याजी. आता तुम्हाला आत्माजींच्या शिष्यगणंगात स्थाण णक्की मिळेल.
17 Jan 2015 - 9:45 pm | स्पा
=)) मेलो
17 Jan 2015 - 9:52 pm | अजया
=)) =)) =))
17 Jan 2015 - 9:55 pm | प्रसाद गोडबोले
तुमचा ऐकण्यात घोळ झाला असावा हे आता नसुन अता असे असावे =))
17 Jan 2015 - 9:56 pm | प्रसाद गोडबोले
आणि
=))))
18 Jan 2015 - 1:21 am | बॅटमॅन
अगदी अगदी =)) =)) =))
ते लल्लल्लल्लल्ललू वगैरे वाचून अंमळ ठंठंठठंठं ची आठवण झाली =))
18 Jan 2015 - 1:05 pm | प्रचेतस
"ठंठंठठंठं" च्या आठवणीमुळे कालिदासाच्याच "गुलुगुग्गुलुगुग्गुलु" ची आठवण झाली.
जम्बुफलानि पक्वानि पतन्ति विमले जले |
कपिकम्पितशाखाभ्यो गुलुगुग्गुलुगुग्गुलु ||
वानरांनी जांभूळववृक्षाच्या फांद्या गदागदा हलवल्यामुळे पक्व झालेली जांभळे पाण्यात पडून 'गुलु गुग्गुलु गुग्गुलु' असा आवाज येत आहे. =))
18 Jan 2015 - 3:03 pm | बॅटमॅन
एक नंबर!
दुसर्या दोन ओळी मात्र "तानि मत्स्या न खादन्ति जलमध्ये डुबुक् डुबुक्" अशा ऐकल्या आहेत.
18 Jan 2015 - 11:27 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१
आणि नंतर त्या कवींची राजसभेत चेष्टामस्करी झाल्याने ते नाराज झाल्यानंतर कालिदासाने त्यांना;
"जलमध्ये डुबुक् डुबुक्" ऐवजी "जालगोलिका शंकये"
असा फरक करायला सांगून राजसभेत बक्षीस मिळवून दिले अशी कथा ऐकली होती.
19 Jan 2015 - 3:34 pm | बॅटमॅन
यग्झाक्टलि!!!!
19 Jan 2015 - 3:39 pm | प्रचेतस
जलमध्ये डुबुक डुबुक हे अगदी अलीकडचे संस्करण असावे कारण हे दोन्ही शब्द मराठी आहेत. डुबुक हां नादवाचक शब्द असला तरी संस्कृतात कुठे वापरलेला पाहिला नाही.
19 Jan 2015 - 3:48 pm | बॅटमॅन
जलमध्ये हा शब्द/रचना मराठीच नाही. (अमुकतमुक)मध्ये अशा प्रकारची रचना संस्कृतात कैक ठिकाणी आढळते, उदा.
सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत - गीता.
जलमध्ये असा सर्च दिल्यावरही कैक उदा. दिसतात.
https://www.google.co.in/?gws_rd=ssl#q=%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4...
बाकी ध्वनिवाचक शब्दाकरिता डुबुक् हा शब्द खास मराठी आहे हे खरेच. पण तेवढ्यावरून तो अंदाज बांधता येईलसे वाटत नाही.
19 Jan 2015 - 3:51 pm | प्रचेतस
हायला भारीच.
19 Jan 2015 - 4:04 pm | डॉ सुहास म्हात्रे
जलमध्ये हा शब्द/रचना मराठीच नाही.
हेच सांगायला येत होतो. मराठीत ते जलामध्ये असे होईल.बाकी, ही गोष्ट बहुतेक हायस्कूलातल्या संस्कृत अध्यापकांनी सांगितली होती... कालिदासाचे माणूस आणि कवी म्हणून मोठेपण दाखवायला.
जांभळाची फळे आणि मासेमारीसाठी वापरलेल्या जाण्यार्या जाळ्यांच्या शिश्याच्या गोळ्या यातील साधर्म्य पकडून आणि त्याचबरोबर "मासे जाळ्याच्या गोळ्या समजून पाण्यात पडलेल्या जांभळांना खात नाहीत" ही अफलातून कवीकल्पना वापरून, काव्याची एकच ओळ बदलल्याने, संपूर्ण चारोळी काव्याच्या वरच्या स्तरावर गेली आहे ! ...मग हे काम स्वतः कालिदासाने केले असो वा नसो.
19 Jan 2015 - 4:05 pm | अत्रुप्त आत्मा
अरे खाटुक..
आत्मा स खलु अतृप्त: अग्निवेताल संनिधौ
..।.........
खव मध्ये डुबुक डुबुकं! :-D
हे लिही ना परत!
19 Jan 2015 - 4:07 pm | सूड
लाल रंगात लिही रे ब्याट्या!! चांगलं मोठ्ठ्या अक्षरात लिही हो!! ;)
19 Jan 2015 - 4:47 pm | बॅटमॅन
हे बघा.
http://www.misalpav.com/node/25004
इथे ते तीनही श्लोक आहेत.
यो आत्मा सर्वकाव्येषु जिल्बीरूपेण संस्थितः |
नमस्तस्मै नमस्तस्मै नमस्तस्मै नमो नमः ||
आत्मा सः खलु अत्रुप्तः अग्निवेतालसन्निधौ |
मरिचलवणेभ्यो हि प्रोक्षणं कुरुते सदा ||
दुष्टो स अग्निवेतालः क्रीडते हि इतस्ततः |
विशेषेण आत्मनस्तु खवमध्ये डुबुक् डुबुक् ||
19 Jan 2015 - 5:42 pm | चौकटराजा
जलाचा मध्य - षष्टी तत्पुरूष. त्या मध्याच्या आत सप्तमी विभक्ति .
19 Jan 2015 - 6:35 pm | बॅटमॅन
समास वगैरे मी साफ विसरलो बगा. पुन्हा रिव्हिजन करावी लागतीय आता. तुम्ही म्हणताय ते बरोबर वाटतंय पण कन्फर्म नाही.
19 Jan 2015 - 6:40 pm | सूड
जलाचा मध्य= मध्यमपदलोपी पण होईल ना? उदा. पुरणपोळी=पुरणाची पोळी?
19 Jan 2015 - 7:47 pm | चौकटराजा
सुड्राव, पुरण घालून केलेली पोळी असा विग्रह करून मध्यमपद लोपी समास हा बरोबर आहे. पण त्याची तुलना जलमध्य या
शबदाशी होत नाही. मध्य अशी काही एंटीटी नाही. डोंगरमाथा -( डोंगराचा माथा-) हा जसा शब्द आहे तो षष्ठी तत्पुरूष आहे. तसेच जलाचा मध्य-जलमध्य. षोडषे वर्षे ही जशी सप्तमी तसेच 'जलमध्ये' हा शब्द .
19 Jan 2015 - 7:56 pm | सूड
वोक्के!! उगाच आपली शंका आली हो!!
19 Jan 2015 - 5:59 pm | अत्रुप्त आत्मा
17 Jan 2015 - 9:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पहिल्या चार ओळीत खपल्या गेलो आहे. :)
-दिलीप बिरुटे
17 Jan 2015 - 10:43 pm | प्रचेतस
कसं काय सुचतं राव तुम्हाला हे असं लिहायला?
17 Jan 2015 - 10:55 pm | टवाळ कार्टा
शिष्योत्तम धनाजीराव
17 Jan 2015 - 11:05 pm | डॉ सुहास म्हात्रे
सगाश्रींना तांबी... आपलं तांब्यासंप्रदायातला सुपरशिष्योत्तम असे बिरूद देण्यात येत आहे हे झाईर कर्ण्यास आमाला अत्यानंद होत हाये होssssssssssssssssssss
17 Jan 2015 - 11:13 pm | अत्रुप्त आत्मा
स.गा. जी राव वाकडे
तुमचे थोबाड करा इकडे
रोकेल्चा एक डबा आणि
जाळायला लाकडे!
=========
कारण नसताना काढली माझि खोडी
.......................
ही घ्या तुमच्या टाळक्यात हातोडि!
19 Jan 2015 - 3:27 pm | प्रमोद देर्देकर
झालं गेलात आमच्या गुरुजींच्या वाटेला आता "मला स्थान द्याना गडे" असे म्हणुन धुमाकुळ घालु नका तुमला
तुम्हला आता बाबाजीचा ठेंगा.
17 Jan 2015 - 11:45 pm | यसवायजी
बुवांकडून धन्याला जळकं थोटूक मिळणारसं दिसतंय :D
18 Jan 2015 - 12:08 am | मुक्त विहारि
उत्तम...
18 Jan 2015 - 1:52 am | आनन्दिता
सुंदर आरती..
भावविभोर !! :)
18 Jan 2015 - 2:33 am | खटपट्या
बाबौ !! आरतीपुस्तक छापावे लागेल !!
रच्याकने ! मीबी कळव्याचाच रहीवासी आहे. पण मी नाय फोन केला हा...
18 Jan 2015 - 7:31 am | सतिश गावडे
ते वेगळे.
त्यांचा गुरुजींवर फार जीव. एकदा पुण्याला आले असता गुरुजींनी त्यांना भेटायचे वचन देऊन ऐनवेळी अपेक्षाभंग केला.
हे शल्य उरी ठेवून त्यांनी एकलव्याच्या निष्ठेने तांब्याभ्यास सुरु ठेवला. आज ते तांब्या संप्रदायाचे उत्तराधिकारी म्हणून ओळखले जातात.
18 Jan 2015 - 10:38 am | टवाळ कार्टा
पहिली ३ वाक्ये म्हणजे धनाजीरावांचे मनाचे श्लोक आहेत ;)
18 Jan 2015 - 12:15 pm | सतिश गावडे
आम्हाला त्याच दिवशी साक्षात्कार झाला होता.
19 Jan 2015 - 3:43 pm | नाखु
दुसरी गोष्ट : टका अता मनाचे (माझ्या) श्लोक लिहा हे सुचवतायत. *ACUTE*
आता पहिली गोष्ट यात "भांडे का लपविता" हा शब्द प्रयोग का हुकला. ;-) ;) (का राखून ठेवलाय पुढच्या आरतीसाठी ?)
बुवाज भक्तगण नेह्मी निशाणी डावा अंगठा संघ.
19 Jan 2015 - 4:00 pm | टवाळ कार्टा
हे चूक
बुवा'ज भक्तगण नेह्मी निशाणी गायछाप अत्तर संघ. असे हवे ;)
19 Jan 2015 - 4:03 pm | नाखु
फ्लेक्स प्रिंटायच्या आधी दुरुस्ती आली.
18 Jan 2015 - 5:10 pm | चौकटराजा
मी एकदम कळलाव्याचा निवासी वाचले. जवळच रहाणार्या एका नारदाकडे तुम्ही पेंइंग गेष्ट म्हून आलेत की काय अशी श़ंका आली !
18 Jan 2015 - 11:20 pm | खटपट्या
कोण आहेत ते जवळच रहाणारे नारद ? नाव पत्ता दील्यास त्यांचेही दर्शन घेईन :)
18 Jan 2015 - 10:14 am | जातवेद
>> अत्रुप्त आत्मा माझे आई
>> स्थाण दयावे तुझे पायी
हे बेळगावी लिखाण आहे :D
18 Jan 2015 - 11:04 am | चौकटराजा
आरती वाचली. तक्राद अशी की मीट्रात गंडलीय. गाता आली पाहिजे न अडखळता. बरं तांब्या पंथ नक्की कोणता ? एक तांब्या जिलबीचा बरोबर आहे दुसरा कोणता तरी आहे ना ? तुम्ही नक्की जिलबीकर लेखकांच्या बाजूचे की तांब्याकर कवी
अ. आ चे . असो. बाराव्या शतकात एक महान संतकवि होऊन गेले .पंथाने त्याना " पुरूष" असूनही माउली म्हणून संबोधले. तुम्ही आई या शब्दाचा वापर करून इतिहासाची पुनरावृत्ति केलीय. धन्य तो भक्त धन्य धन्याची माउली !!!!!!!
18 Jan 2015 - 12:13 pm | सतिश गावडे
मीटर डोंगा परी भाव नोहे डोंगा.
या आरतीत अभिप्रेत असलेला तांब्या "तिकडे" नेतात.
धन्यवाद सर. आभारी आहे.
18 Jan 2015 - 11:14 am | जेपी
'अ..'ला... टिपीकल कंपुबाजांचा धागा.. *wink* -))
18 Jan 2015 - 12:10 pm | सतिश गावडे
कंपू म्हणजे काय हे कुणी समजावून सांगेल का ?
18 Jan 2015 - 12:31 pm | प्रसाद गोडबोले
कंपु म्हणजे कंड पुरक रे .
काही लोकांना अध्यात्माचा कंड असतो , काहींना मानसशास्त्राचा , काहींना लेण्या पाहण्याचा , काहींना उदारमतवादाचा तर काहींना संस्क्रुताभ्यासाचा वगैरे वगैरे. तर असा ह्या विषयांवर चर्चा करण्याचा कंड ज्या घोळक्यात विशेष हरकत न घेता पुरवला जातो त्याला म्हणतात कंड पुरक अर्थात कंपु
=))
18 Jan 2015 - 12:36 pm | अत्रुप्त आत्मा
@म्हणतात कंड पुरक अर्थात कंपु>> =))))) अशुद्ध लेखन शास्त्रानुसार तुमची व्याख्या बरोबर,आणि बेशुद्ध लेखनशास्त्राणुसार आमची! :-D
18 Jan 2015 - 12:40 pm | सतिश गावडे
हे तर चांगलेच आहे की. "वादे वादे जायते तत्वबोध" किंवा उगाच चकाटया पिटण्यापेक्षा हे बरं आहे.
मी जेव्हा आठवीला होतो तेव्हा ("मी जेव्हा बोटीवर होतो तेव्हा" हे पुन्हा पुन्हा वाचल्याचा परीणाम) माझे शंभर मार्कांचे संस्कृत होते. तेव्हा सुभाषितमाला नामक प्रकारात रटलेला एक श्लोक आठवला या निमित्ताने:
पण हा कंपू बनवायचा कसा?
18 Jan 2015 - 1:07 pm | प्रचेतस
कंपू बनवायचा नसतो. तो आपोआप बनत असतो. कंपूभावणांशी जुळवून न घेऊ शकणारे बाजूला पडतेत.
18 Jan 2015 - 2:23 pm | अत्रुप्त आत्मा
@कंपूभावणांशी जुळवून न घेऊ शकणारे बाजूला पडतेत.>>> कचकून सहमत हाय!
कंपूत आल्यावर सहज विलिन होणारा-
आत्मू मिसळकर.
18 Jan 2015 - 3:31 pm | प्रसाद गोडबोले
>>> नकळत पणे तुम्ही सगाजीरावांच्या हातात कोलीत दिले आहे , आता पुढील कट्ट्याला ते महाआरतीचा घाट घालणार बघा १००%
=))
18 Jan 2015 - 3:53 pm | टवाळ कार्टा
पण त्यांचा छुपा कंपू असला तर? ;)
19 Jan 2015 - 6:43 am | चौकटराजा
थोबाडातील वाफ व चहातील वाफ या दोन्हीशी भांडण असता नये.
19 Jan 2015 - 3:35 pm | बॅटमॅन
कंड पूरक >>>> खपल्या गेलो आहे =)) =)) =))
18 Jan 2015 - 12:33 pm | अत्रुप्त आत्मा
कंपू म्हणजे,आपली टोळि सोडुन इतरांचे नाव सहभावाने मधे येताच ज्यांच्या अंटर्मणास कंप सुटून,त्यातून व्यक्तिवादाच्या दुर्गंधिचि घाण येते... अश्या व्यक्तिंच्या टोळिसमुहास कंssssपू ( :P ) असे म्हणतात. =))
19 Jan 2015 - 3:58 pm | सूड
घटं भिन्द्यात, पटं छिन्द्यात, कुर्याद रासभरोहणम्! सहज आठवलं.
19 Jan 2015 - 4:17 pm | जेपी
हाफ शेंच्युरी निमीत्त श्री.सतिश गावडे आणी त्यांचे कळव्याचे मित्र यांचा सत्कार आरती ओवाळुन करण्यात येत आहे.
शुभेच्छुक-जेपी आणी तमाम कार्यकर्ते
19 Jan 2015 - 4:21 pm | सौंदाळा
धन्यासेठ आरती मधे स्वतःचे नाव गुंफुन अजुन एक कडवे अॅड करा.
19 Jan 2015 - 5:08 pm | गणेशा
सतिश गावडे म्हणजेच धन्या आहे का ?
19 Jan 2015 - 6:35 pm | सतिश गावडे
होय रे गण्या.
हां माझा मिपावरचा पहिला अवतार.
सदस्यकाळ: 6 years 11 months :)
19 Jan 2015 - 6:49 pm | गणेशा
सर्व अवतारांची लिस्ट असेल नाही तुझ्या कडे ?
असो तुमच्या अवतारानंतर ३ महिन्यांनी आमचा मिपावरती प्रवेश झाला होता. म्हणजे हा अवतार आमचा समकालीन असल्याने आमचा प्रवेश पावन झाला असे म्हणावे लागेल..
धनाजीराव हा अवतार काय करतोय मग ?
20 Jan 2015 - 9:07 am | नाखु
"अवतार" आहे हे आज कळाले आणि डोले पानावले.
20 Jan 2015 - 9:16 am | प्रमोद देर्देकर
गणेशा तो त्याचा एकच अवतार नाहिये हो! हे पहा....
"आधी होता फटु
मग झाल्या धन्या"
डु आयडींचा पायघोळ झगा"
कसा रे सावरतोस तु सगा?"
20 Jan 2015 - 9:22 am | सतिश गावडे
वन आयडी अॅट अ टाईम. *lol*
20 Jan 2015 - 9:27 am | प्रमोद देर्देकर
बघा भौ नाहीतर तो पायघोळ सावरता सावरता पाय अडकुन पडशील. +))
रचल्याने :- या पायघोळ झग्याची लांबी कीती आहे हो?
नाही म्हणजे त्या हिंग्लीशच्या राणीसारखं मागे दोन टंकनिका ठेवौन द्या ना गडे तो झगा सावरायला. +))
20 Jan 2015 - 9:31 am | सतिश गावडे
फिकर नॉट. मी हे आयडी "वन आयडी अॅट अ टाईम." या तत्वावर चालवतो. त्यामुळे पाय अडकण्याचा प्रश्नच नाही. किंबहूना हे तिन्ही माझे आयडी आहेत हे सार्यांना माहिती असल्याने ते रुढार्थाने डुआयडी नाहीत.
डुआयडीमध्ये आयडीमागची व्यक्ती अज्ञात असते. :)
20 Jan 2015 - 10:00 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
=)) =))
झॅक...पहिल्या ६ ओळीतं वारलो गेलोय...गायछापचा नैवेद्य... =))
अग्गागाग्गाग्गगगग्ग!!! =))