फ्रेन्च कार्टूनिस्ट हत्याकान्डाबद्दल

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in काथ्याकूट
11 Jan 2015 - 4:02 am
गाभा: 

फ्रेन्च कार्टूनिस्ट हत्याकान्डाबद्दल सगळीकडे गदारोळ सुरु आहे. हजारो लोक रस्त्यांवर आले आहेत "अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला", "आम्ही सगळे चार्ल्स हेब्डो", वैगेरे वैगेरे. आणि त्यातल्याच काही अतिउत्साही महाभागांनी परिसरातल्या मस्जीदी उध्वस्त करून आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क बजावला. मृतांबद्दल सहानुभूती असणे योग्यच आहे पण ती किती योग्य ते जरा तपासून बघायला हवी. मी स्वतः एक कलाकार असून कट्टरवाद्यांच्या भूमिकेतून मी ह्या हल्ल्याचे समर्थन केले कारण कुणीतरी हा वेगळा दृष्टीकोन मांडणे आवश्यक आहे, जो काही धाडसी वार्तापत्रे मांडत आहेतच. जेणे करून ह्या हत्याकांडाच्या इतर बाबींवर प्रकाश पडावा व मुस्लिमांची जी एकच एक प्रतिमा रंगवली जात आहे तो प्रयत्न हाणून पाडवा. पण काही मित्रांना माझा हा पवित्रा खटकला आणि त्याचे चेपू वर पडसाद उमटले. तिथे उदधृत काही विचार माझ्यापेक्षा जास्त चांगला,व्यवस्थित आणि माहितीपूर्ण विचार करणाऱ्या जाणकार मिपाकारांसमोर ठेवत आहे. चर्चा अपेक्षित आहे.

"चार्ल्स हेब्दो" ह्या साप्ताहिकाने केलेल्या खोडसाळपणाबद्दल आज कुणीही बोलत नाही कारण कुणाची हत्या होणे म्हणजेच फार भयंकर एवढेच सामान्यपणे लोक समजतात. ज्याची हत्या झाली तो भारी निष्पाप आणि मारणारा क्रूर अविचारी नराधम. त्याच वेळेस गोडसेच कसे बरोबर, गांधी कसे मारण्याच्याच लायकीचे होते हे गेली साठ वर्षे आपण चघळत आहोत. म्हणजेच काय तर मारणारा आणि मरणारा ह्यापैकी जो आपला त्याचीच बाजू बरोबर.

ह्यासंदर्भात आपण दोन अतिशय वेगळ्या गोष्टी लक्ष्यात घेतल्या पाहिजेत,

एक म्हणजे, "चार्ल्स हेब्दो" ह्या साप्ताहिकाने फार खवचट आणि असंस्कृत अश्या व्यंगचित्रातून पैगंबरांचा अपमान केला. त्या साप्ताहिकाचा असे करण्यामागचा हेतू जाणून बुजून भावना दुखावून उचकवणे (provocative) असाच होता. माझा आक्षेप हा हत्याकांडाच्या पूर्वी झालेल्या बेजबाबदारपणाबद्दल आहे. लोक आज म्हणत आहेत कि "साधे एक चित्र काढले तर थेट गोळ्या घालायची काय गरज होती?" ते चित्र इतरांसाठी साधे असेल मुस्लिमांसाठी नाही हा एक मुद्दा,

त्यातल्या एका व्यंगचित्रकाराचे मत असे होते "माझ्यासाठी पैगंबर पवित्र वैगेरे काही नाही, मी काही कुराणाचा कायदा मानत नाही, मी फ्रेंच कायदा मानतो." म्हणजेच इतरांच्या श्रद्धास्थानाला घाणेरड्या पद्धतीने चितारणार, त्यांचा अपमान करणार, वरून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गळे काढणार. म्हणजे त्याला ज्या पद्दतीने इतरांच्या आत्मसन्मानाची हिंसा करता येणार ते तो करणार, त्याच्यावर इतरांनी त्यांच्या पद्दतीने प्रतिकार केला तर चूक. हा काय तर्क आहे? शब्द आणि चित्रांचे वार जास्त घातक असतात. बंदुकीपेक्षा लेखणी ताकतवान ते उगाच नाही म्हणत. एक गोळी एका वेळेस एकाला मारते. एकच चित्र लाखोंना लाखो वेळा आणि आयुष्यभर मारते. त्यामुळे लेखणी चालवताना हजारदा विचार करावा लागतो.

दुसरी गोष्ट अशी कि जाणून बुजून केल्या जाणाऱ्या अपमानाचा बदला घेण्याची त्यांची ती रीत असेल, चांगली आहे कि वाईट आहे ह्यावर "आपण" कितीही काथ्याकुट केला तरी ते लोक बदलणार नाही. "हम करे सो कायदा" असाच सगळा प्रकार आहे तिकडे. जे काही बदलायचे आहे ते हेच बदलायचे आहे. जगातल्या सर्व मुस्लिमांना हे जाणवून देणे आवश्यक आहे कि "हम करे सो कायदा" हा प्रकार त्यांच्या जीवावर इतर मुठभर लोक करत आहेत. आणि आज तो शांतीप्रिय मुस्लिमांना व जगाला त्रासदायक ठरत आहे. ते करायचे सोडून तुम्ही जर पैगंबर आक्षेपार्ह स्थितीत दाखवले तर शांतीप्रिय मुस्लिम सुद्धा भडकून उठतील आणि जो उद्देश आहे तो उरणारच नाही.

माझा मुद्दा फार साधा आहे. दहशतवाद (कोणताही, कारण जगात मुस्लिम दहशतवाद सोडून इतर अनेक धर्माचे, देशाचे, समाजाचे दहशतवादी आहेत. मिडिया त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो हा भाग वेगळा) व त्याबद्दल लिहिताना किंवा चित्र काढताना किमान एक लक्ष्यात घेतले पाहिजे कि कुठल्याही दहशतवादाला केवळ एकच एक बाजू नसते. हजारो कारणे आहेत. एक कलाकार म्हणून तुम्हाला सर्वांगीण विचार किंवा समजूतदारपणा दाखवता येत नसेल तर तुम्ही मरण्याच्या लायकीचेच असाल. हुसैनला आपण हिंदुनी का भारताबाहेर घालवले मग? पिके विरुद्ध का आंदोलन चालू आहे?

जे चूक आहे त्याबद्दल जरूर लिहावे. लिहायला, छापायला मिळते म्हणून मर्यादा ओलांडू नये. साधीशी गोष्ट आहे. माझ्या-तुमच्या हातून काही गुन्हा घडला तर मला -तुम्हाला शिक्षा व्हावी किंवा ज्याने कुणी पाणउतारा करायचा त्याने माझा-तुमचा करावा. पण कुणी चारचौघात त्या गुन्ह्याला धरून आपल्या आई-बापावर अतिशय वाह्यात टीका केली तर ते तुम्ही किंवा मी सहन करू शकू काय? मुस्काट नाही का फोडणार त्याचे?

बाकी राज्यघटना आणि कोर्टस याबद्दल, तर खूप दिवसांपासून चारली हेब्दो ला त्याचे धंधे बंद करण्यास सांगितले होते, त्याने ऐकले नाही. त्याच्याविरुद्ध केस म्हणजे "अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी" म्हणून केस होत नव्हती. त्याचवेळेस स्वेच्छेने बुरखा घालणाऱ्या स्त्रियांवर बुरखा न घालण्याची सक्ती करून फ्रेंच सरकार एक वेगळ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत होते. (बहुतेक मुस्लिम स्त्रियांना बुरखा घालणे आवडते असे साधारणपणे वाचनात आले आहे, किंवा त्यांना ते त्यांचे दमन वैगेरे वाटतच नसेल कदाचित.)

आंतरराष्ट्रीय स्तरावर मुस्लिम समाजाबद्दल फार दुटप्पी कारभार आहे.

प्रत्येक कट्टरवादी आपलेच तेच खरे म्हणत असतो. तो धार्मिक असो वा कुठलाही.

दोन घटना सांगतो. माझ्या ओळखीतले एक वयस्कर दलित पोलिस इन्स्पेक्टर होते, ते मला म्हणाले तू एक चित्र प्रदर्शन भरव, तुला काय पैसा लागेल तो मी पुरवतो. पण चित्रे माझ्या संकल्पनेनुसार असली पाहिजेत. श्रीराम आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया याबद्दल अतिशय गलिच्छ प्रकारे त्यांनी वर्णन केले व म्हणाले हाच खरा इतिहास आहे. शबरी काही म्हातारी नव्हती तर ती एक तरणीताठी युवती होती, त्यांच्यात प्रेमालाप दाखव इत्यादी इत्यादी. त्यावेळेस मीसुद्धा देव वैगेरे मानणारा नव्हतो आणि रामायणातल्या असंख्य विसंगती मलाही दिसत होत्या. पण त्यांचे उद्दिष्ट वेगळे होते, त्यांना रामाचे जनमानसात असलेले पूज्यस्वरूप मलिन करायचे होते. कारण काय तर हिंदू धर्म कसा फालतू आहे हे सिद्ध करायचे. आणि "त्यांनी" स्वीकारलेला बौद्ध धर्म कसा श्रेष्ठ असे मिरवायचे. मी त्यांना सरळ नकार दिला कारण हे सगळेच बेसलेस आहे. मुद्दलातच चुकीचे आहे. एखाद्या धर्मात काही चुकीचे चाललेले असेल तर ते बदलण्याऐवजी त्यांच्या पुज्यस्थानावर हल्ला करा ते डळमळीत करा, हेच केले जाते. म्हणजे जे चुकीचे आहे ते तर चालू राहते, लोक मूर्ख राहतात आणि फ्रेममधला राम जाऊन बुद्ध किंवा जीजस येतो. कारण लोक शहाणे झाले तर सगळ्याच फ्रेम्स फेकून देतील, मग ह्या तमाम धर्मगुरुंचे कसे चालणार? पु ल देशपांडे यांचा एक अतिशय सुंदर वैचारिक लेख आहे यावर. त्यात त्यांनी धर्मश्रद्धांवरील आक्रमण आणि त्याचे माणसाच्या मनावर होणारे परिणाम याबद्दल लिहिले आहे.

दुसरी घटना. एकदा एका मित्राशी वाद झाला होता "भारतीय मुस्लिम शाळांमधून वन्दे मातरम म्हणत नाहीत" यावरून. त्यावेळी तो जो पेटला होता आणि त्याच्या डोळ्यांतून अक्षरश आग बरसत होती. मी म्हणालो कि त्यांना म्हणायचे कि नाही त्यांचे त्यांना ठरवू दे आपण त्यांच्यावर जबरदस्ती नाही करू शकत. त्यावर तू फारच चिडला होता. तेव्हा ते त्याचे वन्दे मातरम "लादणे" असेच होते. स्वतंत्र भारतात प्रत्येकाला आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याचा अधिकार आहे. कुणी एक त्यांच्यावर जबरदस्ती नाही करू शकत, हिंदू संघटना मुस्लिम शाळेतल्या वन्दे मातरम बद्दल फार संवेदनशील आहेत. जणू काही त्यांनी वन्दे मातरम नाही म्हटले म्हणजे ते देशद्रोही. मग आपले हिंदू धड राष्ट्रगीत ना म्हणू दे ना, तिकडे लक्ष नाही देणार. हा एक प्रकारचा पूर्वग्रहदुषित दृष्टीकोन आहे. मोठ्या संख्येने मुस्लिम सैन्यात आहेत, शहीद होतात, देशात इतरही क्षेत्रात देशाचे नाव मोठे करतात, तरी त्यांच्यावर संशय घेतोच.

दोन धर्मात कुणीतरी दंगली घडवून आणतो, आपण एकमेकांची डोकी फोडतो. आणि दोघेही आयुष्यभर त्यांनी असे केले म्हणून आम्ही तसे केले म्हणत असतो. फायदा घेणारा फायदा घेऊन मोकळा.

आपले बरेच मुस्लिम मित्र असतील. कधी त्यांना फेस टू फेस विचारून बघा. त्यांना काय वाटते ते. ते काहीही बोलले तरी "ते आपल्याशी कधीच खरे बोलणार नाहीत" हाच गंड सर्वसामान्य हिंदू बाळगून असतो. दुर्दैवाने तो खरा कि खोटा हे कुणीच कधी सांगू शकणार नाही.

समाजसुधारणेचा आव आणणाऱ्या सर्वाना परिस्थितीचे पूर्ण भान आवश्यक आहे. समाजात सुधारणा करण्याची खरीच अपेक्षा व तळमळ असणारे कुणाची खिल्ली उडवत नाहीत. नाहीतर प्रकाश आमटे आदिवासींना नुसते "तुम्ही किती बावळट आणि मागासलेले आहात" असेच म्हणत राहिले असते कि झाली असती त्यांच्यात सुधारणा. आणि राजा राम मोहन राय यांनी घाणेरडी व्यंगचित्रे काढली असती तर सतीप्रथा बंद झाली असती. महात्मा फुले लोक मुलीना शिकवत नाहीत म्हणून लोकांना वाकुल्या दाखवत राहिले असते. इतरही अनेक उदाहरणे आहेत.

याउपरही हाच आणि असाच मार्ग असेल तर शेवटही असाच होईल. मुस्लिमांच्या शरिया ची भीती घातली जाते. इतर लोक छुप्या मार्गाने तेच करतात ते मात्र नामानिराळे.

दुतोंडी जे म्हणतो मी ते हेच. सगळीकडेच हे होत आहे. आपणच काहीतरी करायला पाहिजे दरी मिटवायला. नाही का?

जाता जाता: ज्या जगात अमेरिका सारखा देश आहे, त्याने कधीही शांततेने जगता येईल असा विचार करू नये. अमेरिका फार कुटीलतेने दोन राष्ट्र, दोन समूह, दोन समाजामध्ये तेढ व अविश्वास निर्माण करण्यासाठी व त्यातून आपला फायदा आणि वर्चस्व मिळवण्यासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या दोन महिन्यात तेल-जगतात काय चालले आहे ते बघावे आणि आस्ट्रेलिया व फ्रांस मध्ये झालेल्या हल्ल्यांचा संबंध जोडता येतो का ते पाहावे. घटना फार सरळ आणि उघड जरी असल्या तरी त्या तितक्या सरळ कधीच नसतात. माझे मत तर असे आहे कि नेहमीप्रमाणे मुस्लिम जगताविरुध्द जनमत तापवण्याचा हा प्रकार अमेरिका करत आहे. सदर दोन्ही हल्ले अमेरिका पुरुस्कृत आहेत. कारण दोन्ही हल्ल्यांच्या कार्यपद्धतीत फारच विसंगती आहेत. ज्या साधारणपणे आढळत नाहीत.

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

20 Jan 2015 - 10:47 pm | श्रीगुरुजी

काढा की. अजून मजा येईल. पण धागा काढल्यानंतर काही दिवसांनी माझं चुकलं, मी असं म्हणायला नको होतं, मी अशी चुकीची भूमिका घेतल्याबद्दल माफी मागतो ... असा कबुलीजबाब देऊ नका.

संदीप डांगे's picture

20 Jan 2015 - 11:13 pm | संदीप डांगे

Challenge Accepted

श्रीगुरुजी's picture

20 Jan 2015 - 10:45 pm | श्रीगुरुजी

>>> तत्काळ या संघाचे राष्ट्रीयीकरण करण्यात यावे व क्रिकेटप्रेमाला देशप्रेम न समजणाऱ्यांस देशद्रोही समजण्याचा अध्यादेश मोदीमजकुरांनी काढावा अशी मागणी मी या माध्यमातून याठिकाणी करत आहे.

अनुमोदन

थॉर माणूस's picture

22 Jan 2015 - 9:47 am | थॉर माणूस

*WALL*
शोभता अनुयायी. :D

नको हो नको... बास करा आता. नाही, करमणूक उत्तम होतेय, पण विषयांतराला आणि या प्रतिसादांच्या तिरक्या रांगांनासुद्धा सीमा आहे. त्यामुळे खरंच वेगळा धागा काढा यासाठी.

श्रीगुरुजी's picture

19 Jan 2015 - 2:43 pm | श्रीगुरुजी

>>> आता खरंच वाटतंय, तुम्हाला वादासाठी वाद घालत आहात. तुम्हाला सत्य सांगीतले तरी तुम्ही म्हणाल आम्हाला हे मान्यच नाही तर काय करणार?

तुम्ही सांगताय हे सत्य कशावरून? काही पुरावे देता का?

>>> तुमच्यासाठी सत्य हे तुम्ही काय मानता यावरच अवलंबून आहे.

तुमच्यासाठी देखील सत्य हे तुम्ही काय मानता यावरच अवलंबून आहे.

>>> मी जे बीसीसीआय मध्ये सुमारे वर्षभर काम केले

हे नवीनच ऐकतो मी. ऐकावे ते नवलच!

>>> तुम्हीच वकील, तुम्हीच जज, तुम्हीच जल्लाद अशा वातावरणात तुम्हाला काही सांगायची मला काहीच गरज नाही.

तुमच्याही बाबतीत अगदी तसंच आहे.

>>> तुमचे सत्य, कल्पनेच्या भराऱ्या तुमच्यापाशी. माझ्या माझ्यापाशी. तुमच्या आंधळ्या क्रिकेटप्रेमाची खिल्ली उडवली तर तुम्ही माझ्यावर चक्क खोटारडेपणाचे आरोप करत आहात. म्हणजेच तुम्ही चिडला असून आपण मानत असलेल्या धर्मावर कुणी चिखल उडवला म्हणून तुम्ही फार व्यथित झाला आहात. हेच होत असते गुरुजी. आपण मूर्ख ठरवलो जातोय असे वाटले कि माणसे चिडतात.

तुमच्या आंधळ्या क्रिकेटद्वेषाची खिल्ली उडवली, तुमचे सट्टा आणि टिप्स याविषयींच्या दाव्यांची खिल्ली उडवली, अतिरेक्यांनी मारून टाकलेल्या निष्पाप नागरिकांच्या हत्येचे समर्थन करणार्‍या तुमच्या भूमिकेला मुद्देसूद विरोध केला म्हणून तर तुम्हाला संताप आलेला आहे व त्या संतापातून वैफल्य आलेलं आहे.

>>> नाहीतर क्रिकेट हे देशप्रेम कसे हे तुम्ही सांगत बसला नसता.

देशासाठी केलं जाणारं प्रत्येक काम हे निष्ठापूर्वक व फसवणूक न करता करणे हे देशप्रेमच असतं. जाऊ दे, तुम्हाला कळणार नाही ते.

>>> क्रिकेट व देशप्रेम किंवा देशद्रोह यांचा काही संबंध नाही. तुम्ही मानत असाल पण देशाचे कायदे असे मानत नाहीत. तसे असते तर फिक्सिंग करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून संजय दत्तसारखे जेलमध्ये टाकले असते.

संबंध आहे. दुर्दैवाने क्रिकेटचा आंधळा तिरस्कार करणार्‍या तुमच्यासारख्यांच्या लक्षात नाही येत ते. पोलिस खटला दाखल करताना ज्या कलमाखाली गुन्हा नोंदवितात त्या कलमांखालीच खटला चालतो. जर खटल्यासाठी देशद्रोहाचे कलम न लावता किरकोळ कलम लावले असेल तर देशद्रोहाच्या कलमाखाली खटला चालविलाच जात नाही. फिक्सिंग करणारे क्रिकेटपटू हे सेलेब्रिटी असल्याने पोलिस त्यांना शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करतात व त्यामुळेच देशद्रोहाचे कलम लावले गेले नव्हते. एखाद्याने अपघात करून कोणाला मारले तरी निष्काळजीपणे केलेला अपघात किंवा परिस्थितीमुळे अपरिहार्य असलेला अपघात अशापैकी ज्या कलमाखाली गुन्हा नोंदविला जातो त्यानुसार खटला चालून शिक्षा होते. सेलेब्रिटीज ना अर्थातच सौम्य कलमे लावली जातात व किरकोळ शिक्षेवर ते सुटतात. काही वर्षांपूर्वी जुना चित्रपट अभिनेता राजकुमारचा मुलगा पुरू राजकुमार याने फुटपाथवर गाडी घालून ३ लोकांना जीवे मारले व इतर दोघांचे पाय तुटले. हा पुरू जेमतेम ९०००० रूपयांच्या दंडावर सुटला कारण पोलिसांनीच त्याची केस अत्यंत सौम्य कलमांखाली दाखल केली होती. फिक्सिंग केलेले क्रिकेटपटू असेच थोडक्यात सुटले. निव्वळ क्रिकेट फिक्सिंग नव्हे, तर बोफोर्स तोफांच्या सौद्यात पैसे खाणे हा सुद्धा देशद्रोह होता. परंतु रा़ज्यकर्त्यांच्या कृपेमुळे हा देशद्रोह पचविला गेला.

असो.

क्रिकेट या विषयावर मला पुढे बोलायची गरज वाटत नाही त्यामुळे इथेच थांबतो. तुमचं चालू द्या.

संदीप डांगे's picture

19 Jan 2015 - 4:15 pm | संदीप डांगे

चला म्हणजे तुम्ही दिलेल्या उदाहरणांवरून असे दिसते कि पोलिस, कोर्ट, वकील वैगेरे देशद्रोह्यांना मदत करतात. म्हणजे कोर्टात न्याय होईलच असे नाही. त्यामुळे कुणाला न्याय मिळवायचा असेल तर त्यासाठी पोलिस, कोर्ट, खटले ही काही आदर्श व्यवस्था नाही कारण ती वाकवता येउन त्यातून सही सलामत सुटता येते. म्हणजे गुन्हा कोर्टात सिद्ध झाला नाही तर तो दोषी आहे कि नाही कसे ठरवणार? एकीकडे तुम्ही शर्ली एब्दोच्या बाबतीत कायदेशीर लढाईचे समर्थन करता त्याचवेळेस क्रिकेटर्सच्या बाबतीत देशाच्या कायदा व्यवस्थेवर अविश्वास दाखवता. म्हणजे तुमच्या मते परत तुम्हाला काय वाटते हेच महत्वाचे नाही का?

श्रीगुरुजी's picture

19 Jan 2015 - 6:59 pm | श्रीगुरुजी

>>> चला म्हणजे तुम्ही दिलेल्या उदाहरणांवरून असे दिसते कि पोलिस, कोर्ट, वकील वैगेरे देशद्रोह्यांना मदत करतात. म्हणजे कोर्टात न्याय होईलच असे नाही. त्यामुळे कुणाला न्याय मिळवायचा असेल तर त्यासाठी पोलिस, कोर्ट, खटले ही काही आदर्श व्यवस्था नाही कारण ती वाकवता येउन त्यातून सही सलामत सुटता येते. म्हणजे गुन्हा कोर्टात सिद्ध झाला नाही तर तो दोषी आहे कि नाही कसे ठरवणार? एकीकडे तुम्ही शर्ली एब्दोच्या बाबतीत कायदेशीर लढाईचे समर्थन करता त्याचवेळेस क्रिकेटर्सच्या बाबतीत देशाच्या कायदा व्यवस्थेवर अविश्वास दाखवता. म्हणजे तुमच्या मते परत तुम्हाला काय वाटते हेच महत्वाचे नाही का?

पुन्हा एकदा अत्यंत हास्यास्पद प्रतिसाद. माझा आधीचा प्रतिसाद नीट वाचा, विचार करा आणि नंतर प्रतिसाद लिहा. तुम्हाला मी काय लिहिले आहे ते कळलेले नाही आणि आपण काय खरडत आहोत ते देखील समजलेले नाही.

संदीप डांगे's picture

19 Jan 2015 - 7:10 pm | संदीप डांगे

जर खटल्यासाठी देशद्रोहाचे कलम न लावता किरकोळ कलम लावले असेल तर देशद्रोहाच्या कलमाखाली खटला चालविलाच जात नाही.

म्हणजे देशद्रोहाचे कलम लावायची मनमानी चालढकल ते लोक सेलिब्रिटी आहेत म्हणून पोलिसांतर्फे केल्या जाते असेच तुमचे म्हणणे आहे ना? म्हणजेच सेलिब्रेटिना देशद्रोह करायची पोलिसांतर्फे मुभा आहे असाच अर्थ होतो. आपण काय लिहितो आहोत तेच आधी पूर्ण विचार करून लिहा. मग ठरवू काय हास्यास्पद आहे ते

श्रीगुरुजी's picture

20 Jan 2015 - 12:49 pm | श्रीगुरुजी

>>> म्हणजेच सेलिब्रेटिना देशद्रोह करायची पोलिसांतर्फे मुभा आहे असाच अर्थ होतो. आपण काय लिहितो आहोत तेच आधी पूर्ण विचार करून लिहा. मग ठरवू काय हास्यास्पद आहे ते

कोणत्याही वाक्याचा सरळ अर्थ लावणे अपेक्षित असताना आपल्याला सोयिस्कर असा अत्यंत अतार्किक आणि हास्यास्पद अर्थ लावण्याचे तुमचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. असेच अर्थ काढत चला आणि आमची करमणूक करत रहा.

संदीप डांगे's picture

20 Jan 2015 - 1:26 pm | संदीप डांगे

कोणत्याही वाक्याचा सरळ अर्थ लावणे अपेक्षित असताना आपल्याला सोयिस्कर असा अत्यंत अतार्किक आणि हास्यास्पद अर्थ लावण्याचे तुमचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे.

तुम्हीच आमचे गुरुजी. तुमच्यापासूनच शिकलो

संदीप डांगे's picture

19 Jan 2015 - 7:55 pm | संदीप डांगे

तुमच्या माहिती साठी सांगतो खेळाचे फिक्सिंग हे देशद्रोहाच्या कायद्यात बसत नाही. असे कुठले कलम असेल तर सांगा. पोलिस फक्त सट्टेबाजी आणि व्यवहारात केलेल्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करू शकतात. तुम्ही बोफोर्स तोफांचा भ्रष्टाचार, जो लष्कराच्या व पर्यायाने देशाच्या सबलतेच्या व अर्थकारणाच्या दृष्टीने घातक आहे तो, रस्त्यावर अपघातात जाणारे जीव आणि मनोरंजनासाठी खेळल्या व बघितल्या जाणाऱ्या क्रिकेटचा जो काही बादरायण संबंध जोडताय तो खास विनोद आहे. वरील दोन (लष्कर व रस्तेसुरक्षा) गोष्टींमध्ये प्रत्येक भारतीयाच्या जीवनमरणाचा व कररूपी पैश्यांचा प्रश्न आहे आणि तो तितकाच सर्वव्यापी आहे. तुम्ही तुमच्या पैश्यातून कुठलेही मनोरंजन करू शकता, त्याच्यावर जिवाभावाने प्रेम करू शकता, त्यात फसवणूक झाली तर संतापू शकता. पण सर्वच भारतीयांनी तो तुमच्या मनोरंजनातून आलेला तुमचा संताप आपलाच समजावा हा अट्टाहास का आहे. ती फक्त खेळामधली फसवणूक आहे, देशद्रोह वैगेरे काही नाही. क्रिकेटच्या अतिप्रेमापायी तुम्हाला फार भ्रम झालेले आहेत आणि त्यांच्या समर्थनार्थ तुम्ही काहीच्या काही हास्यास्पद तर्क लढवताय.

एकंदर देशभक्ती आणि क्रिकेटचा संबंध वाचून Patriotism is the last refuge of a scoundrel हे आठवले.

श्रीगुरुजी's picture

20 Jan 2015 - 12:54 pm | श्रीगुरुजी

देशाकरीता केलेले कोणतेही काम हे देशभक्तीच असते आणि देशाविरूद्ध केलेले कोणतेही कृत्य हे देशद्रोहच असतो. तुम्हाला पटो न पटो.

श्रीगुरुजी's picture

20 Jan 2015 - 12:51 pm | श्रीगुरुजी

>>> क्रिकेटच्या अतिप्रेमापायी तुम्हाला फार भ्रम झालेले आहेत आणि त्यांच्या समर्थनार्थ तुम्ही काहीच्या काही हास्यास्पद तर्क लढवताय.

आणि क्रिकेटच्या अतिद्वेषापायी तुम्हालाही भ्रम झालेले आहेत आणि आपले भ्रम हेच एकमेव अंतिम सत्य आहे हे समजावून देण्यासाठी तुम्ही जीवाचा आटापिटा करत आहात.

संदीप डांगे's picture

20 Jan 2015 - 1:24 pm | संदीप डांगे

याचा खुलासा द्या बाकीचे सोडा

तुम्ही तुमच्या पैश्यातून कुठलेही मनोरंजन करू शकता, त्याच्यावर जिवाभावाने प्रेम करू शकता, त्यात फसवणूक झाली तर संतापू शकता. पण सर्वच भारतीयांनी तो तुमच्या मनोरंजनातून आलेला तुमचा संताप आपलाच समजावा हा अट्टाहास का आहे. ती फक्त खेळामधली फसवणूक आहे, देशद्रोह वैगेरे काही नाही.

श्रीगुरुजी's picture

20 Jan 2015 - 10:49 pm | श्रीगुरुजी

हा आमचा खुलासा

*LOL*

संदीप डांगे's picture

17 Jan 2015 - 1:09 am | संदीप डांगे

प्रत्येकवेळी सापेक्ष असतेच असे नाही.

म्हणजेच ते सापेक्ष असते. सापेक्षताचा अर्थ जरा विश्वकोषात बघून घ्या. तुम्ही रोज नेहमीच्या सवयीने जे करता ते इतरांसाठी घृणास्पद असू शकते. क्रूरही असू शकते. माझा एक हुच्च्भ्रू हिंदू मित्र माझ्यासमोर बीफ खात होता. ते मला किळसवाणे वाटले. त्याच्याच समोर मी दात कोरत बसलो तर ते त्याला किळसवाणे वाटले. पण तो मला तसे वाटावे किंवा मी त्याला तसे वाटावे म्हणून बीफ खात नव्हता ना मी दात कोरत नव्हतो. तसे असते तर ते दोन्ही बाबतीत सारखेच क्रूर आणि घृणास्पद आहे.

उदा. तान्हे मूल हे निरागस आहे ही भावना सापेक्ष नाही. ती व्यक्तीनुसार, अनुभवानुसार किंवा विचारानुसार वेगळी असूच शकत नाही. किंवा पेशावरमधील १३२ शाळकरी मुलांना मारण्याचे कृत्य हे अत्यंत क्रूर असून ते करणारे नराधम आहेत हा विचार सापेक्ष असूच शकत नाही किंवा ही भावना व्यक्तीनुसार, अनुभवानुसार किंवा विचारानुसार वेगळी असूच शकत नाही.

तान्हे मुल हे कुणाचे आहे, मुलगा आहे कि मुलगी आहे, औरस आहे का अनौरस आहे यावरून लोक त्याची निरागसता ठरवतात गुरुजी. नाहीतर तान्ह्या मुलींना राजरोस दुधाच्या भांड्यात बुडवून किंवा उशीखाली दाबून मारले नसते लोकांनी. आतातर जन्मायच्या आधीच मारून टाकतात आणि ह्यास आपले काही तथाकथित उच्चशिक्षित आणि सन्माननीय डॉक्टर्स सामील असतात. तेंव्हा तुम्ही म्हणताय तसे "वेगळी असूच शकत नाही." जर टोकाचं विधान आहे. १२३ मुले ही शत्रूंची आहेत म्हणून मारल्या गेलीत, स्वतःची नाही मारली. किंवा शत्रूशिवाय इतर कुणाची नाही मारली. मी त्या हत्याकांडाचे अजिबात समर्थन करत नाही. फक्त तुम्हाला सापेक्ष हे सापेक्षच असते त्यात पर्याय नसतो हे सांगायचे आहे.

श्रीगुरुजी's picture

17 Jan 2015 - 2:20 pm | श्रीगुरुजी

>>> म्हणजेच ते सापेक्ष असते. सापेक्षताचा अर्थ जरा विश्वकोषात बघून घ्या.

तुम्हीच तो अर्थ बघा आणि पॅरिसमधील १६ निरपराध नागरिकांची हत्या किंवा पेशावरमधील १३२ शाळकरी मुलांची हत्या ही काहीजणांसाठी दु:खदायक तर काही जणांसाठी आनंददायी अशी सापेक्ष असू शकेल का ते सांगा?

>>> तान्हे मुल हे कुणाचे आहे, मुलगा आहे कि मुलगी आहे, औरस आहे का अनौरस आहे यावरून लोक त्याची निरागसता ठरवतात गुरुजी. नाहीतर तान्ह्या मुलींना राजरोस दुधाच्या भांड्यात बुडवून किंवा उशीखाली दाबून मारले नसते लोकांनी. आतातर जन्मायच्या आधीच मारून टाकतात आणि ह्यास आपले काही तथाकथित उच्चशिक्षित आणि सन्माननीय डॉक्टर्स सामील असतात. तेंव्हा तुम्ही म्हणताय तसे "वेगळी असूच शकत नाही." जर टोकाचं विधान आहे.

कोणत्याही तान्ह्या मुलांना कोणीही व कशाही प्रकारे मारले तरी ते घृणास्पदच आहे. ही भावना सापेक्ष असूच शकत नाही. परंतु तुमच्यासारखे मारणार्‍याचा धर्म बघून त्यावर आपली भूमिका ठरविणारे त्याला अपवाद आहेत.

>>> १२३ मुले ही शत्रूंची आहेत म्हणून मारल्या गेलीत, स्वतःची नाही मारली. किंवा शत्रूशिवाय इतर कुणाची नाही मारली.

किती क्रूर आणि विकृत मनोवृत्ती आहे ही.

>>> मी त्या हत्याकांडाचे अजिबात समर्थन करत नाही. फक्त तुम्हाला सापेक्ष हे सापेक्षच असते त्यात पर्याय नसतो हे सांगायचे आहे.

प्रत्येकवेळी भूमिका ही सापेक्ष असतेच असे नाही.

विवेकपटाईत's picture

11 Jan 2015 - 3:47 pm | विवेकपटाईत

आज जगात काय चालले आहे, त्या बाबतीत लेखकाला काही ही माहित नाही. त्या मुळे प्रतिसाद देण्याचा प्रश्न येत नाही.

संदीप डांगे's picture

11 Jan 2015 - 3:57 pm | संदीप डांगे

नक्कीच आवडेल जगात काय चाललंय हे जाणून घ्यायला कारण आम्ही या जगात राहातच नाही.
आमच्या ज्ञानात भर घाला, आम्ही भटकलो आहोत, योग्य मार्गावर आणा.

श्रीगुरुजी's picture

11 Jan 2015 - 8:35 pm | श्रीगुरुजी

हे वाचा आणि विचार करा.

http://www.loksatta.com/vishesh-news/on-the-occassion-of-charlie-hebdo-a...

हिरालाल's picture

11 Jan 2015 - 4:10 pm | हिरालाल

श्रीगुरुजी +१०००%

hitesh's picture

11 Jan 2015 - 4:52 pm | hitesh

सुंदर लेख...

...

hitesh's picture

11 Jan 2015 - 5:01 pm | hitesh

अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाने आक्रोश करणार्‍या इथल्या दुतोंड्यांची मते एम एफ हुसेनच्या धाग्यावर काय होती हेही जरा तपासता आले तर मनोरंजनात अजुन भर पडेल.

कुण्वेतरी हुसेनच्या धाग्याची लिंक द्या रे

शिद's picture

11 Jan 2015 - 6:55 pm | शिद

1

साभारः सामना.

हुप्प्या's picture

12 Jan 2015 - 12:24 am | हुप्प्या

फ्रान्स ही व्यक्तीस्वातंत्र्याची काशी आहे (मक्का म्हणा हवे तर!). व्हॉल्टेअर फ्रेंच ह्या विचारवंताने फार पूर्वी असे विधान केले होते की "मला तुझे विचार आजिबात पटले नाहीत. पण तुला ते मांडायची मोकळीक मिळावी म्हणून मरेपर्यंत लढायला मी तयार आहे". ही संस्कृती जिथे निर्माण झाली आहे, जिथे रुजली आहे त्या फ्रान्समधे अशी सोवळ्याओवळ्याची भाषा कशी पटेल?
कुणी एखादे व्यंगचित्र मुद्दाम चिडवायला काढले का विचार प्रबोधन करायला काढले हे कुणी आणि कसे ठरवायचे?
फक्त अस्सल सोवळे (हलाल), कुणाच्याही भावना न दुखावणारेच व्यंगचित्र काढायचा फतवा काढला तर बहुधा अशा व्यंगचित्रामुळे कुणाला हसूही येणार नाही.
दुसरा मुद्दा असा आहे की हा एक निसरडा उतार आहे. एकदा का बंदी घालण्याची भाषा सुरू झाली की त्याला नव्या वाटा फुटून मग अमका धर्म नाही, अमके पुस्तक नाही, अमकी व्यक्ती नाही अशा प्रकारे बंधने वाढत जातील आणि मग मुस्कटदाबी सुरू होईल. सगळ्या मुस्लिमबहुल देशात हे दिसते आहे.

हुप्प्या's picture

12 Jan 2015 - 6:34 am | हुप्प्या

१. सगळ्या व्यक्तींनी समाजसुधारणेत झोकून द्यावे वगैरे अपेक्षा गैर आहे. विनोदी लिखाण वा व्यंगचित्र अनेकदा थोडक्यात ते सांगून जाते जे अनेक भाषणांनी वा अन्य कार्यक्रमांनी होणार नाही. आर के लक्ष्मण वा पु.ल. देशपांडे ह्यांच्या चित्रा वा लेखावरून तसे वाटत नाही का? माझे पौष्टीक जीवन ह्यात पोस्टातील गैरसोयींची जी खिल्ली उडवली आहे ती वाचून पोस्टात काय सुधारणा कराव्यात हे सहज कळते. आर के ची आणीबाणी व नंतर जनता पक्षा आल्यावर जी व्यंगचित्रे आली तीही अशीच डोळ्यात अंजन घालणारी होती.

२. पण मुळात जर फ्रेंच सरकारने नागरिकांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याला अबाधित ठेवण्याचे व्रत जपलेले असेल तर ते ह्या इथे भंग करावे अशी अपेक्षा का? व्यंगचित्रकाराने निव्वळ टर उडवायला चित्र काढले तर काय त्याला मारून टाकायचे? ही परंपरा पाश्चात्य विचारांची नाही. ४०० वर्षापूर्वी असेल. आधुनिक पाश्चात्य जगात नाही. संवैधानिक निषेध, मोर्चे, संबंधित मासिक जाळणे वगैरे प्रतिकात्मक निषेध करता येतो. आणि तसाच तो झाला पाहिजे. असली मासिके विकत घेऊ नका, वर्गणी भरू नका वगैरे प्रचार करता येतो. पण इस्लामी अतिरेक्यांनी मशीनगन जमवल्या आणि बेछूट्पणे गोळीबार करुन लोक मारले. असली सवंग आणि हिंसक इस्लामी भक्ती करायची तर योग्य त्या मुस्लिम देशात जाऊन रहावे. फ्रान्सने मुस्लिमांना बरे वाटावे म्हणून आपल्या मूलभूत तत्त्वांना तिलांजली द्यावी अशी अपेक्षा म्हणजे त्या अरबाची गोष्ट आठवते. आपल्या लाडक्या उंटाला थंडी वाजू नये म्हणून त्याने त्याचे डोके तंबूत आणले मग एक पाय, मग दुसरा आणि असे करता करता सगळा उंटच आत आला आणि अरबाला तंबूच्या बाहेर झोपावे लागले. भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी ही ही म्हण लागू पडेल. तर असे मागण्याचा इस्लामी लोकांना काय अधिकार आहे?

पिंपातला उंदीर's picture

12 Jan 2015 - 9:03 am | पिंपातला उंदीर

थोडा धागाकर्त्यासार्खाच व्ह्यू मांडणारा हा लेख . लेखातच आक्शेर्पाह कार्टून्स ची पण लिंक आहे ती पण नक्की बघावी । एकूणच सगळ्यांनी आवर्जून वाचावा असा लेख

http://rbk137.blogspot.in/

जर माणुस दुस्र्या माणसाबरोबर माणसासारख वागला तर काय नुक्सान होणार आहे.मग का पशुसारखे वागतात.

काळा पहाड's picture

12 Jan 2015 - 6:12 pm | काळा पहाड

निषेध. पशू असे वागत नाहीत. फक्त माणूसच तत्वा साठी दुसर्‍यांना मारतो.

काय अडाण** लेख आहे. एक मिपाकर म्हणून खरेच शरम आली.

(संपादकांनो, तो शब्द जमल्यास आहे तसाच राहू द्या प्लीज़. प्रामाणिक प्रतिक्रिया आहे.)

बॅटमॅन's picture

12 Jan 2015 - 5:59 pm | बॅटमॅन

*ऊप्स शरम वाटली.

तरिपण ह्या हल्ल्याचि दुसरी बाजु माहित नव्ह्ती. वाचुन खूप माहिति मिळालि.

कपिलमुनी's picture

12 Jan 2015 - 6:18 pm | कपिलमुनी

एम एफ हुसेन आणि चार्ल्स हेब्डो एकाच तराजू मधले का ?

बॅटमॅन's picture

12 Jan 2015 - 6:35 pm | बॅटमॅन

खी खी खी. अहो मुनिवर, असे गैरसोयीचे प्रश्न नका विचारू ना गडे =))

सुनील's picture

12 Jan 2015 - 7:16 pm | सुनील

एम एफ हुसेन आणि चार्ल्स हेब्डो एकाच तराजू मधले का ?

नक्कीच!

ज्यांना शार्ल्स हेब्डोला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे असे वाटते, त्यांना एम एफ हुसेनचेही अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य असावेच (मी ह्या गटातील).

अर्थात ह्याचा व्यत्यास - ज्यांना शर्ल्स हेब्डोला मिळालेली शिक्षा योग्य वाटते, त्यांना एम एफ हुसेनला मिळालेली वागणूकदेखिल मान्य असावी (मी ह्या गटातील नाही)

ज्यांना त्यातील एक योग्य आणि दुसरे अयोग्य वाटते ते दुतोंडी (मी ह्या गटात अर्थातच नाही!)

हुप्प्या's picture

12 Jan 2015 - 8:54 pm | हुप्प्या

काही फरक लक्षात घ्यावेत
१. एम एफ हुसेन हा चार्ली हेब्दोप्रमाणे सर्व धर्मांचा अपमान करत नाही. राधेचे व सीतेचे बीभत्स चित्र काढतो पण महंमदाचे, फातिमाचे वा आयेशाचे काढू धजला नाही.
२. तो खुद्द अशा धर्माचा अनुयायी आहे ज्या धर्मात त्या धर्माच्या मानबिंदूंचा अपमान सहन केला जात नाही. तेव्हा अन्य धर्माला दुखवताना विचार करणे आवश्यक होते.
३. सगळ्यात महत्त्वाचे: भारतीय सरकारने अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर काय भूमिका घेतली होती? सॅटेनिक व्हर्सेस व निकाह सारखे सिनेमे ह्या प्रकरणात त्यांनी असे स्वच्छ दाखवून दिले की अभिव्यक्तीस्वातंत्र्यापेक्षा धर्मभावनांचे दुखवले न जाणे जास्त महत्त्वाचे आहे. तेव्हा ह्या पार्श्वभूमीवर हिंदूंनाही आपल्या भावना जास्त हळव्या कराव्याशा वाटल्या तर चूक कसे? सरकारने अशा गळचेपीचा पायंडा पाडला होता.

आम्ही मुस्लिमांच्या भावना अगदी हळुवार जपणार. मात्र हिंदूंनी आपल्या धर्माची विटंबना, मानखंडना गुपचूप सहन करावी हा काय दुटप्पीपणा आहे?
एम एफ हुसेन चालायला पाहिजे तर सलमान रश्दीही चाललाच पाहिजे.

आजानुकर्ण's picture

12 Jan 2015 - 9:05 pm | आजानुकर्ण

आम्ही मुस्लिमांच्या भावना अगदी हळुवार जपणार. मात्र हिंदूंनी आपल्या धर्माची विटंबना, मानखंडना गुपचूप सहन करावी हा काय दुटप्पीपणा आहे?
एम एफ हुसेन चालायला पाहिजे तर सलमान रश्दीही चाललाच पाहिजे.

हा दुटप्पीपणा नाही. शिंपल कारण म्हणजे 'ते' मुसलमान आहेत व 'आम्ही' हिंदू. जर हिंदूही 'तशीच' प्रतिक्रिया देणार असतील तर हिंदूंनाही मुसलमानच म्हणावे ना! उगीच पुरोगामी परंपरा वगैरे पिरपीर नको.

हुप्प्या's picture

12 Jan 2015 - 10:08 pm | हुप्प्या

१. सगळे भारतीय आहेत. एकाच संविधानाला मानणारे आहेत. तेव्हा हे आणि ते चा भेदभाव नको. निदान सरकारकडून तरी नकोच नको.
२. एकदा का एका गटासाठी एक पायंडा पडला की दुसर्‍या गटालाही तोच न्याय हवा. नाहीतर कधी ना कधी ह्या भेदभावाविरुद्ध उद्रेक होणारच. अमका गट हळवा आणि तमका समजूतदार अशी आगाऊ गृहिते धरून न्याय देणे हे लहान मुलाकरता योग्य ठरेल फारतर पण देशाकरता घातक आणि भेदभावकारक आहे.

रश्दीच्या पुस्तकावरील बंदीला विरोध करण्याऐवजी त्या बंदीचा न्याय हुसेनच्या चित्रांना लावावा अशी अपेक्षा आहे का?

हुप्प्या's picture

14 Jan 2015 - 12:57 am | हुप्प्या

सरकारने रश्दीवर बंदी घातली ती काय विचाराने? अभिव्यक्तीपेक्षा धार्मिक भावना महत्त्वाचा. जर सरकारला तसे करणे बरोबर वाटत होते तर तसाच न्याय हुसेनच्या चित्रांनाही हवा.
जे काही करायचे ते धोरण सर्वांना समान असावे. कुणाचे उपद्रवमूल्य किती, कुणाची मतपेटी किती मोठी यावर अवलंबून नसावे.

सुनील's picture

12 Jan 2015 - 9:27 pm | सुनील

एम एफ हुसेन चालायला पाहिजे तर सलमान रश्दीही चाललाच पाहिजे.

नक्कीच!
ज्यांना एक चालतो पण दुसरा नाही ते दुतोंडीच!

अनुप ढेरे's picture

13 Jan 2015 - 10:53 am | अनुप ढेरे

हेच बोल्तो...

मृत्युन्जय's picture

13 Jan 2015 - 1:04 pm | मृत्युन्जय

१. मला कुणाच्याही धार्मिक भावना दुखावणारे लेखन अथवा अभिव्यक्तीस्वातंत्र्य मान्य नाही. परंतु एखादा जर एखाद्या धर्मातील अवडंबरावर किंवा दांभिकपणावर हल्ला करत असेल तर त्या संदर्भातील अभिव्यक्तीस्वातंत्र्य मला मान्य आहे.

२. अयोग्य पद्धतीच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मी नक्कीच निषेध करेन. पण त्यासाठी त्या माणसाचा जीव घेणार नाही. असे कोणी केलेले मला मान्य नाही.

३. एखादा माणूस जर सिलेक्टिवली एकाच धर्माची विटंबना करत असेल तर मला ते मान्य नाही. असे करणार्‍याने त्याच्या पार्श्वभागात दम असेल तर सगळ्याच धर्मांची विटंबना करुन दाखवावी (हे ही मला मान्य नसेल. पण किमान त्या माणसाच्या पार्श्वभागात दम आहे, तो दांभिक नाही, प्रामाणिक आहे हे तरी मी मान्य करु शकेन (परिस्थितीवर अवलंबुन) )

चार्ली हेब्दो (किंवा शार्ली हेब्दो किंवा जे काही असेल ते) आणी हुसेन यांची तुलना मी करु शकत नाही कारण:

१. चार्ली हेब्दो सर्व धर्मातल्या दांभिकतेविरुद्ध होते / आहे असे दिसते. पण हुसैनला मात्र पद्धतशीरपणे हिंदु देवतांना नागडे उघडे दाखवण्यात रस होता असे दिसते. मुस्लिम व्यक्तिरेखा मात्र पुर्ण कपड्यातल्या असतात.

२. एखादी व्यक्ती नग्नावस्थेत दाखवणे हे त्या व्यक्तीच्या लाचारीला आणी घ्रुणास्पद अवस्थेला अधोरेखित करण्याचे प्रतीक आहे असे हुसैनला दाखवायचे होते असे दिसते. त्यामुळेच सरस्वतीचे नग्न चित्र अमान्य आहे. चार्ली हेब्दोचा उद्देश मात्र अतिरेकी धर्मांधतेला आणी त्यातील दांभिकतेला उघडे पाडणे हा आहे / होता. एखाद्या कृती मागचा उद्देश नेहमीच महत्वाचा असतो.

३. हुसैनला कोणीही गो़ळ्या घातल्या नाहित. चार्ली हेब्दोला घातल्या.

४. चार्ली हेब्दो न्यायिक प्रक्रियेतुन सहीसलामत सुटला तर हुसैन मात्र कायदेशीर कारवाईला घाबरुन ढुंगणाला पाय लावुन पळुन गेला. चार्ली हेब्दो वरील हल्ला हा भ्याड, हिंसक आणी प्राणघातक हल्ला होता. ती एक थंडपणे आणी कृरपणे केलेली कृती होती. हुसैनचा विरोध लोकांनी कायदेशीर आणी सनदशीर मार्गांनी केला. त्याला तोंड देण्यापेक्षा पळुन जाणे हुसैनला जास्त बरे वाटले.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

14 Jan 2015 - 3:06 pm | निनाद मुक्काम प...

@एखादी व्यक्ती नग्नावस्थेत दाखवणे हे त्या व्यक्तीच्या लाचारीचा
अत्यंत बालिश विचार
आपल्याकडे भारतात जे जे स्कूल ऑफ आर्ट सारख्या कॉलेज मध्ये नग्न मोडेल समोर ठेवून चित्रे काढतात , नग्नता ही पाहण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते मात्र भारतात लोक देवांच्या बाबतीत जास्त संवेदनशील असून देवांना मजेचा किंवा इतरत्र केलेला वापर त्यांना खटकतो हे आपले सांस्कृतिक वैशिष्ट्ये आहे.
परदेशात त्यांच्या राष्ट्र ध्वजाच्या वीतभर चिंध्या अंगावर अडकवून फिरतात म्हणून भारतात असे कुणी भारतीय राष्ट्र ध्वजा बाबत करू शकत नाहीत तो कायद्याने गुन्हा ठरतो , परदेशी असे कोणी केले तर आपण नक्कीच चिडू ,
दांभिकतेचा प्रहार करायचा असेल तर तो करतांना किमान तारतम्य बाळगणे आवश्यक आहे त्यांच्या धर्मात पैगंबर चे चित्र काढत नाही हे माहिती असून मुद्दामहून ते काढणे म्हणजे खाजवून खरुज काढण्यासारखं आहे.

मृत्युन्जय's picture

16 Jan 2015 - 1:07 pm | मृत्युन्जय

अत्यंत बालिश विचार

बालिश असतील तरी माझे नाहित. चित्र काढणार्‍याचे असे विचार असावेत असे म्हणणे आहे.

आपल्याकडे भारतात जे जे स्कूल ऑफ आर्ट सारख्या कॉलेज मध्ये नग्न मोडेल समोर ठेवून चित्रे काढतात ,

जगभरात सगळीकडेच नग्न मॉडेल्स समोर ठेवुन चित्रे काढतात. इस्लामिक देशात नसतील काढत बहुधा,

नग्नता ही पाहण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते मात्र भारतात लोक देवांच्या बाबतीत जास्त संवेदनशील असून देवांना मजेचा किंवा इतरत्र केलेला वापर त्यांना खटकतो हे आपले सांस्कृतिक वैशिष्ट्ये आहे.

आपणा एका भारतीय चित्रकाराने काढलेल्या चित्रांबद्दल बोलतो आहोत की जो केवळ हिंदु देवतांना नग्नावस्थेत दाखवतो. मुस्लिम मात्र पुर्ण कपड्यात असतो.

परदेशात त्यांच्या राष्ट्र ध्वजाच्या वीतभर चिंध्या अंगावर अडकवून फिरतात म्हणून भारतात असे कुणी भारतीय राष्ट्र ध्वजा बाबत करू शकत नाहीत तो कायद्याने गुन्हा ठरतो , परदेशी असे कोणी केले तर आपण नक्कीच चिडू , दांभिकतेचा प्रहार करायचा असेल तर तो करतांना किमान तारतम्य बाळगणे आवश्यक आहे त्यांच्या धर्मात पैगंबर चे चित्र काढत नाही हे माहिती असून मुद्दामहून ते काढणे म्हणजे खाजवून खरुज काढण्यासारखं आहे.

त्यांच्या धर्मात फक्त इतर धर्मीय देवतांचे नग्नावस्थेतले फोटो दाखवतात हा दांभिकपणाचा कळस आहे आणी हे न कळणे हा पण एक दांभिकपणाच आहे. बादवे हिंदु धर्मातही सरस्वतीचे नग्न चित्र काढत नाहित हा. माहिती नसेल तर सांगतो बाकी काही नाही.

कपिलमुनी's picture

21 Jan 2015 - 4:46 pm | कपिलमुनी

लज्जागौरी सारखे दैवते आपल्या हिंदु धर्मात पुजली जात होती .
नग्नतेचा वावडे प्राचीन हिंदु संस्कृतीला मुळीच नव्हते .

आजानुकर्ण's picture

12 Jan 2015 - 9:07 pm | आजानुकर्ण

लेख आवडला. काही मते पटली नाहीत. मात्र मुद्दाम केलेला खोडसाळपणा व समाजसुधारणेच्या दृष्टीने घेतलेली रिस्क यात फरक आहेच.

हत्याकांडाचा तीव्र निषेध.

अवतार's picture

12 Jan 2015 - 11:26 pm | अवतार

आणि धार्मिक वेड यात मूलभूत फरक असतो तो तारतम्याचा. धार्मिक आक्रमण हे प्रत्येक वेळी शस्त्रांच्याच आधारावर होत नाही तर वैचारिक आधारावर देखील होत असते. केवळ शस्त्र हाती घेऊन इतर धर्मियांना मारत सुटणारी माणसेच धर्मवेडी नसतात. इतर धर्मियांवर वैचारिक आक्रमण करून त्यांच्या विचारांना आणि संस्कृतीला संपवणारी माणसेही तेवढीच धर्मवेडी असतात.

मानवी इतिहासात जेत्यांनी जितांचे धार्मिक साहित्य आणि परंपरा यांना समूळ नष्ट करणे हे कार्य अविरतपणे चालू ठेवलेले दिसते. कधी उघड आक्रमण करून तर कधी बुद्धिभेद करून तर कधी राजकीय सामाजिक पिळवणूक करून हे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न झालेला आढळतो. धर्मवेडाची खरी शक्ती ही शस्त्रांमध्ये नव्हे तर धार्मिक आक्रमणाचे वैचारिक समर्थन करण्यात दडलेली आहे.

भारतभूमीवर आजवर जे काही धर्मवेडाचे आक्रमण झाले त्या प्रत्येक आक्रमणाला पिढ्यानपिढ्या भारतातील महनीय व्यक्तिमत्वांनी आणि महावीरांनी प्रती धर्मवेडाने नव्हे तर संयमानेच प्रत्युत्तर दिलेले आहे. म्हणूनच आज देखील भारत स्वत:चे भारतीयत्व टिकवून आहे.

विकास's picture

13 Jan 2015 - 3:01 am | विकास

​जेंव्हा हिंसा होते आणि त्यात कायदा हातात घेतला जातो, तेंव्हा त्याचा निषेध करावा का त्याला बळी पडलेलेच कसे जबाबदार होते असे म्हणत हिंसेचे समर्थन करावे? दुर्दैवाने तुषार गांधी आणि इतर (मुस्लीम आणि गैरमुस्लीम) अनेक जण त्या हिंसेस केवळ जबाबदार बळी पडलेल्या व्यक्ती कशा होत्या हेच दाखवत बसतात.... अर्थात यालाच स्युडोसेक्युलॅरीजम असे म्हणतात! खालील चित्र पहाण्यासारखे आहे:

Tushar Gandhi

मी स्वतः कुठल्याही धार्मिक/अधार्मिक समुहाला अपमानास्पद वाटेल असे वागण्याच्या अथवा वागणार्‍यांच्या तत्व म्हणून विरोधात आहे. पण त्याच बरोबर एखादा समुह जर स्वतःच्या समुहाचे कायदे वरचढ ठरवत, राष्ट्राचे कायदेच मानत नसला तर त्याला त्या संदर्भात विरोध करण्यात काही हरकत नाही. आता हा विरोध हा विनोद रुपी शस्त्राने कोणी केला तरी त्यत काही हरकत नसावी, हे केवळ धार्मिक आणि ते देखील मुस्लीम समाजापुरतेच मर्यादीत नाही. नक्षलवादी देखील स्वतःचे कायदे मोठे समजतात आणि तेच कम्युनिस्ट चळवळ्यांच्या बाबतीत थोडक्यात अधार्मिकांच्या बाबतीतही लागू होऊ शकते.

​त्यातल्या एका व्यंगचित्रकाराचे मत असे होते "माझ्यासाठी पैगंबर पवित्र वैगेरे काही नाही, मी काही कुराणाचा कायदा मानत नाही, मी फ्रेंच कायदा मानतो." ...वरून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गळे काढणार.

कायदा हा राष्ट्राचा मानावा की धर्माचा? या बाबत आपले काय म्हणणे आहे? फ्रान्स हा अतिशय लिबरल देश आहे. पण त्या देशात रहात असताना, आम्हाला सार्वजनिक तरणतलाव हे अथवा त्यांच्या वेळा या स्त्री-पुरुषांसाठी वेगळ्या असाव्यात असा हट्ट देखील चालू आहे. मग काय येथे धर्माचे कायदे मान्य करायचे?

अजून एक महत्वाची गोष्टः कॅथलीक चर्चच्या विरुद्ध देखील शार्ल हेब्दोने व्यंगचित्रे काढली होती. चर्चने काय करावे. गेल्या दोन वर्षात त्यासंदर्भात या वृत्तसंस्थेविरुद्ध १४ खटले दाखल केले. ते असे नाही म्हणत बसले की बायबलचे कायदे हे फ्रान्सच्या कायद्यापेक्षा महत्वाचे म्हणून!

या संदर्भात शार्ल एब्दो चे विनोद हे केवळ इस्लामपुरतेच मर्यादीत नव्हते. इतरही धर्मांची त्यांनी थट्टा केली आहेच... ते विनोद चांगले का वाईट हा मुद्दा व्यक्तीगत आहे. पण तो हक्क त्यांना त्यांच्या राज्यघटनेने नक्कीच दिला आहे.

"चार्ल्स हेब्दो" ह्या साप्ताहिकाने केलेल्या खोडसाळपणाबद्दल आज कुणीही बोलत नाही ...त्याच वेळेस गोडसेच कसे बरोबर, गांधी कसे मारण्याच्याच लायकीचे होते हे गेली साठ वर्षे आपण चघळत आहोत.

दोन्ही मधे केवळ मारेकरी आणि कायदा हातात घाऊन निशस्त्र माणसांचा खून केला याच्यावरच चर्चा आणि निषेध होणे जरूरीचे आहे. शार्ल हेब्दोचे मारेकरी अथवा गोडसे यांना का करावेसे वाटले हा मुद्दा चघळणे योग्य नाही. जे करतात ते चूकच आहेत. मात्र त्याच बरोबर कोणी गांधीजींच्या (हत्येचे समर्थन न करता) राजकीय कारकिर्दीतील कुठल्याही निर्णय/वागण्यावर टिका केली म्हणजे ते नथुरामवादी म्हणणे हे देखील तितकेच चूक आहे. कारण त्यांना देखील भाषण स्वातंत्र्य नाकारले जाता कामा नयेच.

दुसरी गोष्ट अशी कि जाणून बुजून केल्या जाणाऱ्या अपमानाचा बदला घेण्याची त्यांची ती रीत असेल, चांगली आहे कि वाईट आहे ह्यावर "आपण" कितीही काथ्याकुट केला तरी ते लोक बदलणार नाही.
येथे एक लक्षात ठेवावे की त्यांनी ज्यूंच्या किराणा मालाच्या दुकानावर पण हल्ला केला आणि चार ज्यूंना मारले. आता देखील ज्यूंच्या शाळांना धमकी दिली गेली आहे. ज्यूंचे धर्मस्थळ त्यांना दुसर्‍या महायुद्धानंतर प्रथमच बंद ठेवावे लागले होते. आता त्यांचा काय दोष होता?

हुसैनला आपण हिंदुनी का भारताबाहेर घालवले मग? पिके विरुद्ध का आंदोलन चालू आहे?

हुसैन आणि पिके संदर्भातील विरोध मला पटत नाहीत. हुसैन यांची काही चित्रे मला कदाचीत (विरोध म्हणून नाही पण) आवडणार देखील नाहीत... पण, म्हणून त्यांच्यावर जर बंदी घातली असती तर ती देखील पटणार नाही. पण त्यासंदर्भात कुणाला न्यायमार्गाने विरोध करायचा असला आणि तसा केला असला तर तो मान्य का नसावा? हुसैन यांना देश सोडून जायला कोणी सांगितले होते? त्यांच्या विरुद्ध केवळ न्यायालयाचे दरवाजेचे ठोठावले होते ना? तो विरोध करणार्‍यांचा (मग तो विरोध कितीही चुकीचा असला तरी) हक्क नाही का? पण तेथे मात्र लगेच "हिंदूंनी घालवले" बोलणे किती योग्य आहे?

काळा पहाड's picture

13 Jan 2015 - 10:42 am | काळा पहाड

येथे एक लक्षात ठेवावे की त्यांनी ज्यूंच्या किराणा मालाच्या दुकानावर पण हल्ला केला आणि चार ज्यूंना मारले. आता देखील ज्यूंच्या शाळांना धमकी दिली गेली आहे. ज्यूंचे धर्मस्थळ त्यांना दुसर्‍या महायुद्धानंतर प्रथमच बंद ठेवावे लागले होते. आता त्यांचा काय दोष होता?

दोष एवढाच की या अतिरेकी धर्माविरुद्ध ते पुरून उरले आहेत.

अनिदेश's picture

13 Jan 2015 - 11:08 am | अनिदेश

मग 'je suis BaBaRamRahim' पण :)

श्रीगुरुजी's picture

13 Jan 2015 - 12:53 pm | श्रीगुरुजी

उद्याच्या अंकात पुन्हा एकदा व्यंगचित्रे येणार. अतिरेक्यांच्या धमक्यांना व रक्तपाताला आपण अजिबात घाबरत नाही हेच चार्ली हेब्दोला दाखवून द्यायचे आहे.

http://maharashtratimes.indiatimes.com/international/charlie-hebdo-retur...

खटपट्या's picture

14 Jan 2015 - 1:11 am | खटपट्या

बाप्रे !!

तूम्ही हत्याकांडाचे समर्थन करण्यापेक्षा चित्रांचा धिक्कार केला असता तर ते जास्त माणूसकीला धरून वागलात असे वाटले असते.

संदीप डांगे's picture

14 Jan 2015 - 9:58 am | संदीप डांगे

हत्याकांडाचे समर्थन केल्याशिवाय चित्रांमधली दाहकता लोक समजून घेत नाहीत. इथे बरेच प्रतिसाद अजूनही त्याच धाटणीचे आहेत कि काढले एखादे चित्र तर त्यात काय एवढे मनावर घ्यायचे. मूळ पार्श्वभूमी कुणाला समजूनच घ्यायची नसेल तर नाइलाज आहे. निनाद ह्यांनी एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे पैगंबर यांच्यासारखेच शिवाजी महाराजांचे चित्र संभाजी ब्रिगेडला चिडवून दाखवण्यासाठी काढले तर काय गहजब होईल. प्रत्येक समाजाची, व्यक्तीची सहनशीलता व विचारक्षमता आपल्यासारखी असावी हा हट्ट अनाठायी आहे.

बऱ्याच लोकांनी असे म्हटले कि चारली हेब्डो ने इतर धर्मियांना पण लक्ष्य केले पण इतर धर्मीय हे मुसलमानाइतके कट्टर नाहीत हेहि सत्य आहे. विशिष्ट समाजाचा अपमान आपल्याच पद्दतीने करावा आणि त्याचा निषेधही आपल्याच पद्दतीने व्हावा हा दुटप्पीपणा आहे.
पैगंबराचे ते चित्र किंवा उल्लेख हे आपण मुस्लिम नसल्याने आपणास त्यात काही आक्षेपार्ह न वाटणे साहजिक आहे. हुसैन ने काढलेली चित्रे आणि चारली ची चित्रे यात तुलना होऊ शकत नाही असेही येथे कुणीतरी म्हटले आहे, हाच तो दांभिक दुटप्पीपणा आहे.

कोण कोणास मारतंय यावर आपली भूमिका लगोलग बदलवणारे ढोंगी जगात आहेत.

श्रीगुरुजी's picture

14 Jan 2015 - 1:04 pm | श्रीगुरुजी

>>> हत्याकांडाचे समर्थन केल्याशिवाय चित्रांमधली दाहकता लोक समजून घेत नाहीत.

या व्यंगचित्रात नक्की काय दाहक व अपमानास्पद होते ते सांगता का जरा. दरवर्षी अनंतचतुर्दशीच्या मिरवणुकीनंतर अनेक वर्तमानपत्रात गणपतीवर व्यंगचित्रे येतात. त्यात गणपती गोंगाटामुळे, मिरवणुकीतील हिडीस प्रकारामुळे, गणेशोत्सवातील व्यापारीकरणामुळे वैतागलेला दाखविलेला असतो. अशा व्यंगचित्रात गणपतीचा अपमान होतो का? किंबहुना अशा व्यंगचित्राबद्दल हिंदू समाजातून कोणतीही प्रतिक्रिया येत नाही. जर अशा व्यंगचित्रात गणपती स्वतः काहीतरी घाणेरडे कृत्य करताना दाखविला असता तर ते नक्कीच आक्षेपार्ह आहे. परंतु तसे नसेल तर त्याविरूद्ध इतका गहजब करण्याचे कारण नाही. तरीसुद्धा एखाद्याला आक्षेप असेल तर कायदेशीर मार्गाने कारवाईचा आग्रह धरता येतो. इथे सर्व मार्ग टाळून थेट १६ लोकांना मारून टाकण्यात आले आहे.

चार्ली हेब्दोच्या व्यंगचित्रात नक्की काय अपमानास्पद होते की ज्यामुळे थेट १५-१६ निरपराध लोकांना गोळ्या घातल्या गेल्या?

बादवे, व्यंगचित्र कितीही दाहक असले तरी दिसेल त्याला थेट मारुन टाकणे हे रानटीपणाचे व असंस्कृतपणाचे लक्षण आहे व अशा गोष्टींचे समर्थन करणारे तितकेच रानटी आणि असंस्कृत आहेत.

>>> इथे बरेच प्रतिसाद अजूनही त्याच धाटणीचे आहेत कि काढले एखादे चित्र तर त्यात काय एवढे मनावर घ्यायचे.

बरोबर आहे. अनेक धर्मातील अनेकांची व्यंगचित्रे काढली जातात. जोपर्यंत व्यंगचित्रातून सामाजिक परिस्थितीवर उपहासात्म्क भाष्य केलेले असते तोपर्यंत त्यात काहीही आक्षेपार्ह नाही.

>>> मूळ पार्श्वभूमी कुणाला समजूनच घ्यायची नसेल तर नाइलाज आहे.

सांगा ना मूळ पार्श्वभूमी.

>>> निनाद ह्यांनी एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे पैगंबर यांच्यासारखेच शिवाजी महाराजांचे चित्र संभाजी ब्रिगेडला चिडवून दाखवण्यासाठी काढले तर काय गहजब होईल.

पूर्वी शिवाजी महाराज सुद्धा अनेक व्यंगचित्रातून सामाजिक परिस्थितीबद्दल भाष्य व चिंता करताना दाखविले आहेत. त्याबद्दल कोणीही गहजब केलेला नाही. जेम्स लेनने केला तसा अत्यंत निराधार व घाणेरडा आरोप जर कोणी केला किंवा व्यंगचित्रातून दाखविला तर ते नक्कीच आक्षेपार्ह आहे. मागील आठवड्यातील चार्ली हेब्दोच्या व्यंगचित्रात काहीही आक्षेपार्ह नव्हते. परंतु आपल्या धर्मातील कोणाचेही व कोणत्याही स्वरूपातील चित्र चितारायचे नाही या शरीयतसारख्या कर्मठ मानसिकतेतून मुस्लीम समाज टोकाला जातो. मी पूर्वी ८ वी च्या इतिहासाच्या पुस्तकाचे उदाहरण दिले आहे. त्यात गुरू नानक, गौतम बुद्ध, महंमद पैगंबर इ. धर्मसंस्थापक हे कोणत्याही आक्षेपार्ह स्थितीत दाखविले नसताना सुद्धा मुस्लिमांनी प्रचंड मोर्चे काढून शेवटी ते पुस्तक रद्द करायला लावले होते.

>>> प्रत्येक समाजाची, व्यक्तीची सहनशीलता व विचारक्षमता आपल्यासारखी असावी हा हट्ट अनाठायी आहे.

तशी ती नसतेच आणि म्हणूनच दोन समाजात, संस्कृतीत, धर्मात, विचारसरणीत थेट संघर्ष होऊन नये यासाठी राज्यघटना, कायदे व न्यायालय असते.

>>> बऱ्याच लोकांनी असे म्हटले कि चारली हेब्डो ने इतर धर्मियांना पण लक्ष्य केले पण इतर धर्मीय हे मुसलमानाइतके कट्टर नाहीत हेहि सत्य आहे. विशिष्ट समाजाचा अपमान आपल्याच पद्दतीने करावा आणि त्याचा निषेधही आपल्याच पद्दतीने व्हावा हा दुटप्पीपणा आहे.

ज्या क्रूर पद्धतीने मुस्लिम समाजाने निषेध केला आहे ती पद्धत कायदेशीर नाही आणि म्हणूनच अशा हत्याकांडाचा निषेध करणे यात कोणताही दुटप्पीपणा नाही.

>>> पैगंबराचे ते चित्र किंवा उल्लेख हे आपण मुस्लिम नसल्याने आपणास त्यात काही आक्षेपार्ह न वाटणे साहजिक आहे. हुसैन ने काढलेली चित्रे आणि चारली ची चित्रे यात तुलना होऊ शकत नाही असेही येथे कुणीतरी म्हटले आहे, हाच तो दांभिक दुटप्पीपणा आहे.

हुसेनची चित्रे आणि चार्लीची चित्रे यात तुलना होऊ शकत नाही हे बरोबर आहे. चार्लीने व्यंगचित्रे छापली होती. त्यात आक्षेपार्ह काहीही नव्हते. हुसेनने फक्त हिंदू देवदेवतांची नग्न चित्रे व ते अत्यंत आक्षेपार्ह अवस्थेत बसलेल्या स्थितीत काढली होती. ती चित्रे अत्यंत बीभत्स असून त्यात अगदी उघडउघड हिंदू देवदेवतांचा अपमान केला होता. त्या चित्रात कलाकाराचे अभिव्यती स्वातंत्र्य, अमूर्ततेचा कल्पक आविष्कार असे काहीही नव्हते. जगातले इतर सर्व धर्म सोडून फक्त हिंदू धर्मावरच त्याने आघात केला होता. परंतु तरीसुद्धा त्या चित्रांविरूद्ध त्याला गोळ्या न घालता निषेधकर्त्यांनी कायद्याचा मार्ग चोखाळला होता. आपल्याला शिक्षा होणार या भीतिने दाऊद इब्राहिमसारखा हुसेनदेखील भारतातून फरारी झाला होता.

>>> कोण कोणास मारतंय यावर आपली भूमिका लगोलग बदलवणारे ढोंगी जगात आहेत.

त्याला कोण काय करणार? भारतात सुद्धा काही जण मरणार्‍याचा धर्म बघतात तर काही जण मारणार्‍याचा. जग हे असेच असणार.

आपल्या धर्मावर टीका होऊ नये असे वाटत असेल तर मुस्लिमांनी इतर धर्मांचा आदर केला पाहिजे. मुस्लिम कलाकारांना इतर कोणत्याही धर्माच्या देवदेवतांची चित्रे काढण्याचे स्वातंत्र्य पाहिजे पण आपल्या धर्मातील कोणाचेही चित्र काढायचे नाही. मुस्लिम जगातल्या कोणत्याही देशात जाऊन तिथल्या स्थानिक मशिदीत जाऊन नमाज पढू शकतात, आपले सण साजरे करू शकतात, पण सौदी अरेबिया/मालदीव व इतर काही देशात कोणत्याही इतर धर्मियांना त्यांच्या धर्माचे पालन करण्यावर बंदी. मुस्लिम जगाच्या पाठीवर कोठेही स्वतःच्या पद्धतीने उपासना करणार पण इतर धर्मियांच्या उपासना पद्धतीला विरोध करून त्यांची देवळे तोडणे, मूर्ती नष्ट करणे असे संतापजनक प्रकार करणार. मुस्लीम स्वत:च्या देशात सर्व धर्माच्या नागरिकांवर स्वतःचे कायदे लागू करणार, पण भारतासारख्या देशात यांना स्वतःचे वेगळे कायदे हवेत.
मुस्लिमांचे अशा तर्‍हेचे दुटप्पी वर्तन जोपर्यंत सुरू राहील तोपर्यंत इतर धर्मीय या धर्माला झोडपत राहतील.

बादवे, काही दिवसांपूर्वीच सौदी अरेबियातील एका ब्लॉगरला इस्लामची नालस्ती केल्याबद्दल १५ वर्षे तुरूंगवास व १००० चाबकांच्या फटक्यांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. २-३ दिवसांपूर्वीच त्यातले पहिले ५० फटके त्याला मारण्यात आले. तुमच्या दृष्टीने ही शिक्षा सुद्धा समर्थनीय असणार.

कपिलमुनी's picture

14 Jan 2015 - 3:23 pm | कपिलमुनी

मागील आठवड्यातील चार्ली हेब्दोच्या व्यंगचित्रात काहीही आक्षेपार्ह नव्हते.

ह्याबदल त्यांचा द्रूष्टीकोन वेगळा होता . एकाद्या धर्मामध्ये इश्वराला अमूर्त मानायची प्रथा असेल आणि काही लोकांनी त्याच मूर्ती किंवा चित्र काढले तर त्यांच्या दृष्टीने ते महापाप आहे. भले तुमच्या दृष्टीने नसेल

त्यांच्या धर्माच्या दृष्टीने तुम्ही इतर धर्माचं असणे हेच मुळी महापाप आहे. त्याचं काय?

====संपादित)======

पण तुमच्या म्हणण्यात थोडे तथ्य आहे.

त्यांच्या धर्माच्या दृष्टीने तुम्ही इतर धर्माचं असणे हेच मुळी महापाप आहे. त्याचं काय?

इतर धर्म महापाप असण्याबद्दल त्यांचे पैगंबर सांगून गेले तो काळ अतिशय वेगळा होता, त्या काळात प्रचंड रानटी आणि क्रूर असा अरब समुदाय होता. त्यांच्या चालीरीती, संकल्पना न मानता अल्लाह ने सांगितलेल्या म्हणजेच पैगंबराने सांगितलेल्या मार्गावरून चालणे अपेक्षित होते. काफिर म्हणजे त्या काळात पैगंबरांचा आदेश न मानणारे अरब. पण हे सर्व "त्या विशिष्ट" काळात. त्या काळात जगात इतर काही धर्म अस्तित्वात आहेत किंवा काही याची काही एक अडाण्या अरबांना कल्पना नव्हती. तेंव्हा १५०० वर्षा आधीचे संदर्भ उकरून काढून मुलतत्ववाद्यांनी आधीच कर्मठ असेलेल्या मुस्लिमांना अजून भडकावले आहे. जगात इतर अनेक मुस्लिम धर्मगुरू आणि प्रसारकर्ते इस्लामच्या योग्य आणि काळानुरूप धर्मपालनाचे तत्व प्रसारित करत आहेत. पण त्यांच्या ढीगभर प्रयत्नांपुढे हे अतिरेकी हल्ले अधिक उठून दिसत आहेत.
मला बरेच मुस्लिम मित्र होते आणि अजूनही आहेत, त्यात शिया सुन्नी दोन्ही आहेत, बऱ्याच मुस्लिमांसोबत व्यवसाय पण केला आहे. माझे नाशिकचे ऑफिस खुद्द गाढ मुस्लिम वस्ती असलेल्या भागात होते. ठाण्यात असताना सुद्धा काही काळ मुस्लिम वस्तीमध्ये रहिवास होता. या सर्व अनुभवामध्ये कुणी मला काफिर म्हणून वागणूक दिली नाही कि माझा धर्म बदलण्याचा सूचक प्रयत्नही केला नाही किंवा कुठल्याही प्रकारे आपल्या धर्माचा कट्टरपणा, रानटीपणा दाखवला नाही.

माझे मूळ शहर अकोला येथे हिंदू मुस्लिम ऐक्य हे १९९२-९३ पर्यंत अबाधित होते. त्यानंतर सगळे बदलत गेले. आधी हिंदू मुस्लिम नंतर बौद्ध मुस्लिम अशा दंगली होऊन शहराचे अक्षरश: दोन तुकडे पडले. १९९२ आधी ज्या गल्ली बोळातून फिरताना अजिबात भीती वाटत नव्हती तिकडे फिरकण्याच्या विचाराने सुद्धा भीती वाटते. काही अघटीत होईल असे नाही पण एक मनावर भीती बसली आहे सगळ्यांच्या.

आजचा मुस्लिम आतंकवाद उफाळण्यामागे फक्त मुस्लिमांचा कट्टरपण कारणीभूत आहे असा विचार करणाऱ्यांनी अमेरिका-रशिया शीतयुद्ध व त्याभोवतीचा इतिहास तपासून पाहावा.

मला कायम एक आश्चर्य वाटत आले आहे कि सातशे वर्षे भारतावर अनिर्बंध सत्ता गाजवून सुद्धा इतक्या कट्टर मुस्लिमांना भारताचे संपूर्ण इस्लामीकरण का जमले नाही?

श्रीगुरुजी's picture

14 Jan 2015 - 10:31 pm | श्रीगुरुजी

>>> मला कायम एक आश्चर्य वाटत आले आहे कि सातशे वर्षे भारतावर अनिर्बंध सत्ता गाजवून सुद्धा इतक्या कट्टर मुस्लिमांना भारताचे संपूर्ण इस्लामीकरण का जमले नाही?

मुस्लिमांनी सातशे वर्षे भारतावर अनिर्बंध सत्ता गाजविलेली नाही. तसे असते तर भारताचे केव्हाच इस्लामीकरण झाले असते. सातशे वर्षात अनेक हिंदू राजांनी व नंतर शिखांनी मुस्लिमांचा प्रतिकार केलेला आहे. काही काळ विजयनगरचे साम्राज्य, राणा प्रताप, राणा संग, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, गुरू गोविंदसिंग, पेशवे, काश्मिरातील राजा हरिसिंगाचे पूर्वज, पंजाबचा राजा रणजितसिंह ... या व अशा अनेक हिंदू/शीख राजांनी आपापल्या शक्तीनुसार मुस्लिमांचा प्रतिकार करून हिंदू धर्म जिवंत ठेवलेला होता. मिर्झाराजे जयसिंग जरी औरंगजेबाचे सरदार असले तरी ते अत्यंत पराक्रमी होते व त्यांच्याकडे स्वतःचे ५० हजाराहून अधिक सैन्य होते. त्यामुळे औरंगजेबाची त्यांना बाटवायची कधीही हिंमत झाली नव्हती. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे "सहा सोनेरी पाने" हे पुस्तक वाचा. त्यात आपल्याला अज्ञात असलेल्या अनेक हिंदू राजांच्या संघर्षाचा इतिहास दिलेला आहे.

श्रीगुरुजी's picture

14 Jan 2015 - 10:36 pm | श्रीगुरुजी

>>> आजचा मुस्लिम आतंकवाद उफाळण्यामागे फक्त मुस्लिमांचा कट्टरपण कारणीभूत आहे असा विचार करणाऱ्यांनी अमेरिका-रशिया शीतयुद्ध व त्याभोवतीचा इतिहास तपासून पाहावा.

भारताचा अमेरिका-रशिया यांच्यातील शीतयुद्धाशी काडीमात्रही संबंध नाही. तरीसुद्धा मुस्लिम आतंकवाद का उसळला आहे?

चीनचा अमेरिका-रशिया यांच्यातील शीतयुद्धाचा काडीमात्रही संबंध नाही. तरीसुद्धा तिथे मुस्लिम आतंकवाद का उसळलायला लागला आहे?

इंडोनेशियाचा अमेरिका-रशिया यांच्यातील शीतयुद्धाचा काडीमात्रही संबंध नाही. तरीसुद्धा तिथे मुस्लिम आतंकवादी का कार्यरत आहेत?

फिलिपाईन्सचा अमेरिका-रशिया यांच्यातील शीतयुद्धाचा काडीमात्रही संबंध नाही. तरीसुद्धा तिथे मुस्लिम आतंकवादी का कार्यरत आहेत?

चेचन्याशा फक्त रशियाशी संबंध आहे. तिथे अमेरिकेचा संबंध नाही. तरीसुद्धा तिथे मुस्लिम आतंकवादी का कार्यरत आहेत?

मुस्लिम आतकंवाद अमेरिका-रशिया यांच्यातील शीतयुद्धामुळे उसळला का तो यांच्या रक्तातच आहे?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

17 Jan 2015 - 2:21 am | निनाद मुक्काम प...

भारताचा अमेरिका-रशिया यांच्यातील शीतयुद्धाशी काडीमात्रही संबंध नाही. तरीसुद्धा मुस्लिम आतंकवाद का उसळला आहे?
शीतयुद्धाचा शेवटचा टप्पा अफगाण मध्ये रशिया घुसणे त्यांना घालविण्यासाठी आय एस आय व सी आय ए ह्यांच्या अभद्र संगमातून अलकायदा व तालिबान अशी जुळी मुले जन्मणे
व अमेरिकन पैसा व शास्त्र १९८४ मध्ये खलिस्तान व काश्मिरात आतंकवाद सुरु करणे व त्याकडे वेस्टन वल्ड ला कानाडोळा करण्यास प्रवृत्त करण्यास पाकडे यशस्वी झाले.
हे खुद्द पाकिस्तानी पत्रकार टीव्ही माध्यमात काबुल करतात
आणि हो अणूबोंब बनवतांना सुद्धा पाकवर वेस्टन वल्ड ने कानाडोळा केला , शीतयुद्ध नसते तर पाकिस्तान च्या आहारी जाण्याच्या इतके अमेरिका खुळे नाही
इंदिरा ने रशियाशी सैख्य केले तेव्हा पाकिस्तान ने स्वताला अमेरिकेच्या हवाली केले.

संदीप डांगे's picture

17 Jan 2015 - 4:10 am | संदीप डांगे

भारताचा अमेरिका-रशिया यांच्यातील शीतयुद्धाशी काडीमात्रही संबंध नाही. तरीसुद्धा मुस्लिम आतंकवाद का उसळला आहे?

भारतात जो घडत आहे तो इस्लामी दहशतवाद नसून पाकिस्तानने पुकारलेले अघोषित युद्ध आहे. पाकिस्तान अतिरेक्यांना पैसा, शस्त्रे आणि काहीतरी थातुरमातुर उद्देश देऊन भारताविरुद्ध चीथावते, किंवा अतिरेक्यांच्या नावाखाली स्वत:च घातपात घडवून आणते. सरळ युद्धात निभाव लागू शकत नसल्याने छुपे मार्गांचा वापर केला जात आहे. सगळ्या जगात फक्त भारताविरुद्ध इस्लामी दहशतवादाला कुठलेही कारण देत येत नाही. नेहमी कुणीतरी हल्ल्याची जबाबदारी घेतो पण त्याचे कारण काहीच नसते. याविरुद्ध अमेरिका जसे घरात घुसून मारते तसे भारत करू शकत नाही कारण त्यालाही हजार कारणे आहेत. सबळ कारणे असलेले इतर अनेक प्रकारचे दहशतवादी भारतात होते, आहेत आणि होत राहतील.

चीनचा अमेरिका-रशिया यांच्यातील शीतयुद्धाचा काडीमात्रही संबंध नाही. तरीसुद्धा तिथे मुस्लिम आतंकवाद का उसळलायला लागला आहे?

संबंध आहे, विकिपीडिया वर संबंधीत पूर्ण माहिती उपलब्ध आहे.
The Soviet Union was involved in funding and support to the East Turkestan People's Revolutionary Party (ETPRP), the largest militant Uyghur separatist organization in its time, to start a violent uprising against China in 1968. In the 1970s, the Soviets also supported the United Revolutionary Front of East Turkestan (URFET) to fight against the Chinese.
तर चीनमधील दहशतवादाच्या मुळाशी फार जुनी वांशिक आणि राजकीय स्वातंत्र्य चळवळ आहे. तशीच ती तिबेटीय दहशतवादाच्या मुळाशी सुद्धा आहे. आपल्या मुद्द्याला पोषक एवढाच भाग उचलला तुम्ही चीनमधून. चीन सरकारचे प्रताप पण तसेच कारणीभूत आहे ह्या सगळ्यांना.

इंडोनेशियाचा अमेरिका-रशिया यांच्यातील शीतयुद्धाचा काडीमात्रही संबंध नाही. तरीसुद्धा तिथे मुस्लिम आतंकवादी का कार्यरत आहेत?

इथेही आहेच. इंडोनेशियात दहशतवाद्यांचे टार्गेट हे अमेरिकी पर्यटक व नागरिक आहेत. ज्यू लोकांच्या संशयित न्यू वर्ल्ड ऑर्डर च्या भीतीमुळे इथले इस्लामी एकवटत आहेत. त्यातून हे हल्ले होत आहेत.

फिलिपाईन्सचा अमेरिका-रशिया यांच्यातील शीतयुद्धाचा काडीमात्रही संबंध नाही.

खरंच, मग हे काय?
The Philippines values its relations with the United States. It supported the United States during the Cold War and the War on Terror and is a major non-NATO ally.
इथेतर नुसता एखाद्या काडीचा नाही तर ट्रकभर काड्यांचा आहे हो

चेचन्याशा फक्त रशियाशी संबंध आहे. तिथे अमेरिकेचा संबंध नाही. तरीसुद्धा तिथे मुस्लिम आतंकवादी का कार्यरत आहेत?

चेचन्यात अल-कायदा चे आतंकवादी आहेत. अल-कायदा हे अमेरिका-रशिया शीतयुद्धाचे जाणून बुजून जन्माला घातलेले अपत्य आहे. चेच्न्यातला अल-कायदाचा संघर्ष हा सीआयए प्रणीत आहे. इथे वाचा

मुस्लिम आतकंवाद अमेरिका-रशिया यांच्यातील शीतयुद्धामुळे उसळला का तो यांच्या रक्तातच आहे?

पहा आता इथे तुम्हीच थेट रक्तावर शंका घेतली आहे, मग म्हणू नका "असं कोण म्हणालं?"

एकीकडे विचारता यांच्या रक्तातच आहे का म्हणून आणि दुसरीकडे म्हणता असे कोण म्हणालं. याला विरोधाभासच म्हणतात न गुरुजी?

सीआयएने अल कायदा जन्माला घातली हे जर आपणास मान्य नसेल तर मग वाद घालू नये. बाबरी मस्जिद तोडण्याच्या वेळेस कारसेवकांना कसे ब्रेनवॉश केले गेले ते मला स्वतः माहिती आहे. त्यामुळे धर्माच्या नावावर माथेफिरू इतका बेमालूम तयार केला जाऊ शकतो कि ज्याचं नाव ते. तुम्ही खरंच मागच्या १०० वर्षाचा जागतिक इतिहासाचा अभ्यास करा मग जर्रा कुठे वादा-वादीला मजा येईल. नाहीतर काय उगाच तुम्ही ह्याच्या रक्तात काय आहे आणि त्याच्या रक्तात काय आहे हे शोधत राहाल.

बाद्वे आमचे पूज्य हभप श्री श्री श्री नानासाहेब एक प्रश्न विचारून गेले… त्याचे उत्तर तुम्हाला सापडले बहुतेक.

श्रीगुरुजी's picture

17 Jan 2015 - 11:22 pm | श्रीगुरुजी

>>> भारतात जो घडत आहे तो इस्लामी दहशतवाद नसून पाकिस्तानने पुकारलेले अघोषित युद्ध आहे. पाकिस्तान अतिरेक्यांना पैसा, शस्त्रे आणि काहीतरी थातुरमातुर उद्देश देऊन भारताविरुद्ध चीथावते, किंवा अतिरेक्यांच्या नावाखाली स्वत:च घातपात घडवून आणते. सरळ युद्धात निभाव लागू शकत नसल्याने छुपे मार्गांचा वापर केला जात आहे.

तो इस्लामी दहशतवादच आहे हो. भारतातील दहशतवादात फक्त पाकिस्तानी सामील असते तर छुपे युद्ध समजता आले असते. दुर्दैवाने इस्लामी दहशतवाद्यात पाकिस्तान्यांबरोबर, बांगलादेशातील आणि स्थानिक दहशतवादीही सामील आहेत. २००३ मध्ये गेटवे ऑफ इंडीया समोर दोन बॉम्बस्फोटात ५५ जणांना मारणारे स्थानिकच होते. त्यांना पाकिस्तानातील कोणीही मदत केली नव्हती. इतर अनेक बॉम्बस्फोटातील अतिरेकी हे पाकिस्तानी किंवा पाकिस्तानची मदत घेतलेले नसून भारतातीलच आहेत. ते पाकिस्तानी नसल्यामुळे त्यांच्यासाठी हे अघोषित युद्ध वगैरे नसून सरळसरळ दहशतवाद आहे.

>>> सगळ्या जगात फक्त भारताविरुद्ध इस्लामी दहशतवादाला कुठलेही कारण देत येत नाही. नेहमी कुणीतरी हल्ल्याची जबाबदारी घेतो पण त्याचे कारण काहीच नसते. याविरुद्ध अमेरिका जसे घरात घुसून मारते तसे भारत करू शकत नाही कारण त्यालाही हजार कारणे आहेत. सबळ कारणे असलेले इतर अनेक प्रकारचे दहशतवादी भारतात होते, आहेत आणि होत राहतील.

कोणत्याही दहशतवादाला कधीही सबळ कारण नसते.

>>> संबंध आहे, विकिपीडिया वर संबंधीत पूर्ण माहिती उपलब्ध आहे.

विकीपीडीया हा विश्वासार्ह स्त्रोत नाही.

>>> तर चीनमधील दहशतवादाच्या मुळाशी फार जुनी वांशिक आणि राजकीय स्वातंत्र्य चळवळ आहे.

मी तेच म्हणत होतो. अमेरिका-रशियाच्या शीतयुद्धाचा चीनमधील दहशतवादाशी अजिबात संबंध नाही. बेसिकली जिथेजिथे मुस्लिमांची संख्या वाढते, तिथे तिथे ते स्वतःला वेगळा देश मागायला लागतात व त्यासाठी दहशतवाद सुरू करतात. हे काश्मिर, चेचन्या, चीन, फिलिपाईन्स अशा अनेक देशात दिसून आले आहे. हा दहशतवाद मुस्लिम मानसिकतेशी संबंधित आहे. अमेरिका-रशियाच्या शीतयुद्धाचा या दहशतवादाशी अजिबात संबंध नाही.

>>> इथेही आहेच. इंडोनेशियात दहशतवाद्यांचे टार्गेट हे अमेरिकी पर्यटक व नागरिक आहेत. ज्यू लोकांच्या संशयित न्यू वर्ल्ड ऑर्डर च्या भीतीमुळे इथले इस्लामी एकवटत आहेत. त्यातून हे हल्ले होत आहेत.

बरोबर ना. इथेही अमेरिका-रशियाच्या शीतयुद्धाचा या दहशतवादाशी अजिबात संबंध नाही. इंडोनेशियात पुराणमतवाद वाढू लागला आहे व त्याचाच परीणाम म्हणून दहशतवाद सुद्धा वाढतो आहे.

>>> खरंच, मग हे काय?
The Philippines values its relations with the United States. It supported the United States during the Cold War and the War on Terror and is a major non-NATO ally.
इथेतर नुसता एखाद्या काडीचा नाही तर ट्रकभर काड्यांचा आहे हो

फिलिपाईन्समध्ये अनेक इस्लामी दहशतवादी संघटना आहेत. फिलिपाईन्सच्या दक्षिण भागात इतर भागांपेक्षा मुस्लिम थोड्या जास्त प्रमाणात आहेत. तिथे त्यांना मुस्लिमांचे वेगळे राज्य हवे आहे व त्यासाठी आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी दहशतवादाचा मार्ग स्वीकारला आहे. इथेही अमेरिका-रशियाच्या शीतयुद्धाचा या दहशतवादाशी अजिबात संबंध नाही. स्वतःची संख्या जिथे वाढते तिथे मुस्लिम वेगळे व्हायची भाषा बोलायला लागतात व त्यासाठी दहशतवादाचा आसरा घेतात.

>>> चेचन्यात अल-कायदा चे आतंकवादी आहेत. अल-कायदा हे अमेरिका-रशिया शीतयुद्धाचे जाणून बुजून जन्माला घातलेले अपत्य आहे. चेच्न्यातला अल-कायदाचा संघर्ष हा सीआयए प्रणीत आहे.

चेचन्यात मुस्लिम बर्‍याच प्रमाणात आहेत. त्यांना चेचन्या हा वेगळा देश हवा आहे व हेच दहशतवादाचे मूळ कारण आहे.

>>> सीआयएने अल कायदा जन्माला घातली हे जर आपणास मान्य नसेल तर मग वाद घालू नये. बाबरी मस्जिद तोडण्याच्या वेळेस कारसेवकांना कसे ब्रेनवॉश केले गेले ते मला स्वतः माहिती आहे.

कारसेवकांचा माहित नाही, पण ज्या तावातावाने तुम्ही दहशतवाद्यांचं समर्थन करत आहात त्यावरून तुमचं मात्र नक्कीच ब्रेनवॉशिंग झालेलं दिसतंय.

>>> त्यामुळे धर्माच्या नावावर माथेफिरू इतका बेमालूम तयार केला जाऊ शकतो कि ज्याचं नाव ते. तुम्ही खरंच मागच्या १०० वर्षाचा जागतिक इतिहासाचा अभ्यास करा मग जर्रा कुठे वादा-वादीला मजा येईल. नाहीतर काय उगाच तुम्ही ह्याच्या रक्तात काय आहे आणि त्याच्या रक्तात काय आहे हे शोधत राहाल.

१०० कशाला मागील १००० वर्षांचा इतिहास पाहिला तरी पॅरिस किंवा पेशावर किंवा इतरत्र दहशतवाद्यांनी केलेल्या हत्यांचे समर्थन करता येणार नाही.

इतर धर्म महापाप असण्याबद्दल त्यांचे पैगंबर सांगून गेले तो काळ अतिशय वेगळा होता, त्या काळात प्रचंड रानटी आणि क्रूर असा अरब समुदाय होता. त्यांच्या चालीरीती, संकल्पना न मानता अल्लाह ने सांगितलेल्या म्हणजेच पैगंबराने सांगितलेल्या मार्गावरून चालणे अपेक्षित होते. काफिर म्हणजे त्या काळात पैगंबरांचा आदेश न मानणारे अरब. पण हे सर्व "त्या विशिष्ट" काळात. त्या काळात जगात इतर काही धर्म अस्तित्वात आहेत किंवा काही याची काही एक अडाण्या अरबांना कल्पना नव्हती.

बरोबर !! जर ईतर धर्म आपल्यातल्या जुन्या टाकाउ परंपरांबद्द्ल विचार करु शकत असतील तर मुस्लीम धर्मच एवढा जुन्या गोष्टींना का चिकटून रहातोय. कुराण हे पुस्तक आता आउटडेटेड झालंय हे मानायला ते का तयार नाहीत. कुराणात लिहिलंय म्हणून आपलं डोकं बाजूला ठेवून काफरांना मारायलाच पाहिजे का ?

मला बरेच मुस्लिम मित्र होते आणि अजूनही आहेत, त्यात शिया सुन्नी दोन्ही आहेत, बऱ्याच मुस्लिमांसोबत व्यवसाय पण केला आहे. माझे नाशिकचे ऑफिस खुद्द गाढ मुस्लिम वस्ती असलेल्या भागात होते. ठाण्यात असताना सुद्धा काही काळ मुस्लिम वस्तीमध्ये रहिवास होता. या सर्व अनुभवामध्ये कुणी मला काफिर म्हणून वागणूक दिली नाही कि माझा धर्म बदलण्याचा सूचक प्रयत्नही केला नाही किंवा कुठल्याही प्रकारे आपल्या धर्माचा कट्टरपणा, रानटीपणा दाखवला नाही.

थोडी ट्क्केवारी वाढली की कट्टरपणा, रानटीपणा दिसु लागतो...

संदीप डांगे's picture

15 Jan 2015 - 12:56 pm | संदीप डांगे

जर ईतर धर्म आपल्यातल्या जुन्या टाकाउ परंपरांबद्द्ल विचार करु शकत असतील तर मुस्लीम धर्मच एवढा जुन्या गोष्टींना का चिकटून रहातोय. कुराण हे पुस्तक आता आउटडेटेड झालंय हे मानायला ते का तयार नाहीत. कुराणात लिहिलंय म्हणून आपलं डोकं बाजूला ठेवून काफरांना मारायलाच पाहिजे का ?

मागचा २ हजार वर्षांचा कालखंड पाहिला तर इस्लामी टोळ्या ह्या अजून ६-७ शतके मागेच आहेत असे म्हणून शकतो. त्यांचा धार्मिक नितीमुल्ये तपासून पाहण्याचा काळ (The Renaissance )अजून आलेला नाही. इतर धर्मांमध्ये तो फार आधीच येउन गेला आहे. हिंदू धर्म किंवा संस्कृतीने तो काल केंव्हा पार केला त्याचा माग तर आजही आपण काढू शकणार नाही, ख्रिस्चन धर्माने किंवा युरोपियन जगताने तो काळ १४ ते १७ व्या शतकादरम्यान पहिला. त्याआधी ख्रिश्चनही बरेचसे आजच्या कट्टर मुस्लिम टोळ्यांची हुबेहूब प्रतिमा होते. धर्माधारित गुन्ह्यांना प्रचंड भयंकर शिक्षा होत्या, लाखो माणसे त्यात मारली गेली. आज मुस्लिम सोडून सर्वच पुढारलेले झाल्याने हे मुस्लिम आपल्याला वेगळेच भासतात जणू काही त्यांच्या डीएनएमध्ये काही लोच्या आहे. आता इतर जग व स्वतः मुस्लिम ह्याला कसे सामोरे जातात त्यावर भविष्य अवलंबून आहे.

इस्लामिक इतिहासाचे शून्य आकलन असल्याचा धडधडीत पुरावा आहे हा. इस्लाममध्ये सुधारणा आणण्याचे प्रयत्न झाले, पण दर वेळेस ते हाणून पाडल्या गेले.

प्रसाद१९७१'s picture

16 Jan 2015 - 1:37 pm | प्रसाद१९७१

थोडी ट्क्केवारी वाढली की कट्टरपणा, रानटीपणा दिसु लागतो...

+१११११११११११११११११११

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

14 Jan 2015 - 6:25 am | निनाद मुक्काम प...

गुरुजी हे पहा त्यांनी पुढील अंकात परत व्यंग चित्र काढले.
झाल्या प्रकारावर माझे मत
भांडवलशाही अर्थव्यवस्थेत लोकशाहीचा बुरखा घालून व्यापारी राज्यकर्ते होतात. त्यांचे दबाव गट हे राजकारणी व समाजातील इतर प्रभावी सत्ता केंद्रांना आपल्या नुसार वागण्यास मजबूर करतात.
जगात कोणत्या धर्माच्या किंवा राष्ट्रांचा आणि त्यांच्या अनुयायांचा दबावगट कार्यरत आहे ह्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात.
मी येथे काही उदाहरणे देतो.
मुंबईत एका उपहार गृहाचे नाव काहीतरी वेगळे असावे ह्या उद्देशाने हिटलर चे नाव दिले , भारतात हे नाव अनेकदा बोलीभाषेत वापरले जाते उद्द एखादी व्यक्ती स्वभावाने एकदम हिटलर आहे ,ह्या नावाने टीव्ही वर एक सिरियल पण आली होती .पण मुंबई मधील अल्प संख्यांचा ज्यू समुदायाच्या ह्यामुळे भावना दुखावल्या गेल्या त्यांनी विरोध केला व आपल्या सरकारने मध्यस्थी करून त्या उपहार गृहाचे नाव बदलायला लावले ,
यहुदी राष्ट्राशी आपले संबंध हे त्यामागील महत्त्वाचे कारण व ह्या विषयावर समस्त यहुदी लॉबी वेळ पडल्यास कार्यरत झाली असती ,
दुसरे प्रकरण अमेरिकेत नुकतेच घडले
अमेरिकन बियर कंपनी ने बाटलीवर गांधीजी ह्यांचे चित्र छापले.
भारत सरकारने निषेध केला आपला दबावगट अमेरिकेत सक्रिय झाला लगेच कंपनीने माफी मागितली .
पैगंबर वर व्यंग चित्रे लढून मग हल्ले ओढवून घेणे हे युरोपला नवीन नाही ,मात्र पैशाने व संख्येने जगभरातील मुस्लिम नेते एकत्र येउन दबाव गट निर्माण करू शकले नाही , वेस्टन वल्ड वर त्यांनी दबाव आणण्यासाठी आर्थिक बहिष्कार व चीन व रशियाच्या आहारी जाण्याची धमकी किंवा अजून बरेच काही करू शकत होते ,
जर्मनी मध्ये हिटलर च्या विचार धारेचा प्रचार होऊ नये म्हणून एवढे कडक कायदे आहेत की सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या संबंधित काही गोष्टी केल्या तर चक्क कायद्याने गुन्हा ठरतो तुरुंगवास होऊ शकतो.
सांगण्याचा मुद्दा एवढाच कि ह्या जगात सन्मानाने जगायचे असेल तर हिंदुनी ह्या प्रकरणातून बोध घेऊन एकत्र आले पाहिजे आपला दबाव गट जगभरात बनवला पाहिजे , भारतात पंजाबी व मराठी माणूस अनुक्रमे नानक सिंग व शिवाजी महाराज ह्यांची व्यंग चित्र एखाद्यानं वृत्त पत्राने काढली तर हिंसक मार्गाने व्यक्त होणार नाही. ह्याची खात्री देऊ शकणार नाही ,
सुवर्ण मंदिरांचे पावित्र्य मलिन केले म्हणून राग ठेवून इंदिरा ह्यांची हत्या झाली आजही पंजाबात त्यांचे मारेकरी व भिन्द्रवाले ह्यांच्या प्रती सहानुभूती असणारे अनेक आहेत , प्रभाकरन ची निष्ठा व सहानुभूती असणारे अनेक आहेत.थोडक्यात भारतात हिंसेचेच समर्थन करणारे अनेक आहेत ,
जे गांधी हत्या की वध झाला ते योग्य झाले असे मानतात अश्या काही व्यक्ती फ्रेंच मेले तर जाहीर दुख व्यक्त करतात जगाची ,हिंसेला नाही तर कोण मेले ह्यावरून निषेध व्यक्त करावा की नाही हे ठरवायची जगरहाटी आहे.
फ्रेंच लिबिया मध्ये अमेरिकेच्या साथीने विमानाने गडाफी वर हल्ले करते आता ह्या बॉंब हल्ल्यात निरपराध मेले तर ओल्या बरोबर सुके ही म्हण वापरता येते , आफ्रिकेत कोणा अनामिक देशात अलका यदा विरुद्ध फ्रेंच सरकार सैन्य पाठवते संयुक्त राष्ट्राला धाब्यावर बसवून आपली मनमानी करते , हिंसा करते त्या बद्दल निषेध व्यक्त होत नाहीत.
युरोपात अनेक देश आहेत जे इतरांच्या देशात ढवळाढवळ करत नाहीत , त्यांना कधीही इस्लामी निर्वासित आपल्या देशात आणावे लागत नाहीत. ह्या देशांना इस्लामी दहशतवाद सतावत नाही ,
तेलासाठी व शस्त्रे विकण्यासाठी फ्रेंच सरकार मुस्लिम जगतात जी ढवळाढवळ करते त्यांचे परिणाम ह्या ना त्या मार्गाने दिसतात.
सध्या फ्रेंच तुरुंगात मुस्लिम क्रिमिनल जिहादी शिकवणी घेत आहेत. अशी शिकवणी घेऊन बाहेर पडलेल्या मारेकर्याने हे कृत्य केले ,

लॉट ऑफ लर्नींग्स बिट्वीन द लाइन्स.

संदीप डांगे's picture

14 Jan 2015 - 9:17 am | संदीप डांगे

मला बेअक्कल, अडाणचोट वैगेरे म्हणणाऱ्या सर्वसाक्षी, सर्वज्ञानी, सर्वव्यापी सर्वगुणसंपन्न लोकांनी जरा ह्या प्रतिसादावर टिप्पणी करावी.

थॉर माणूस's picture

14 Jan 2015 - 10:14 am | थॉर माणूस

*clapping* *clapping* *clapping*
योग्य ते रेफरन्सेस लावलेत तुम्ही.

हिंसेला नाही तर कोण मेले ह्यावरून निषेध व्यक्त करावा की नाही हे ठरवायची जगरहाटी आहे.

एकच नंबर... फक्त हे असं उघड बोलायचं नसतं हो. कुठल्याही लोकांना त्यांचे मुखवट्यामागचे चेहरे उघड केलेले आवडत नाहीत. :)

हुप्प्या's picture

14 Jan 2015 - 11:18 am | हुप्प्या

१. जर्मनीत हिटलरवर बंदी असणे हे त्या देशाच्या इतिहासातील एका वाईट पर्वाशी निगडित आहे. नाझी आणि हिटलर हे जर्मनीवर पडलेले काळे डाग आहेत ह्याबाबत सर्व सुसंस्कृत जगात एकमत आहे. पण म्हणून बाकी देशांनी उठताबसता बंदी घालावी ही अपेक्षा आहे का?
२. हिटलर नावाच्या रेस्टरॉवर बंदी घातली ही माहिती नवी आहे. मात्र हिटलर नामक चित्रपट आला होता ज्याचा हिटलरशी थेट संबंध नव्हता. त्यावर बंदी घातली नव्हती. अर्थात बीयर, चपला, हॉटेल वगैरे ठिकाणी जिथे कुठलातरी माल वा सेवा विकायची असते तिथे उत्पादनावरील चित्रा वा नावाबद्दल असंतोष होणे कंपनीला परवडत नाही. व्यंगचित्राच्या बाबत असे काही नसते. ते व्यंगचित्र हेच उत्पादन असते आणि त्यावर दबाव आणणे अवघड झाले असणार. पण त्यावरून गांधींच्या बियरवरील चित्राविरुद्धचा निषेध जास्त तीव्र होता असे म्हणणे धाडसाचे आहे. फारतर बियर उत्पादकाचा निर्धार तितकासा प्रबळ नव्हता असे म्हणू.

२. सनदशीर मार्गाने निषेध करुन उत्पादन बाजारातून हटवणे आणि गोळीबार करून डझनभर लोक मारणे ह्यात फरक आहे की नाही?

३. युद्धातील कोलॅटरल डॅमेज. अमेरिकेने अनेकदा चुकीच्या कारणाने युद्ध पुकारले आहे. पण कधीही डूख धरून केवळ निरपराध लोक पोरेबाळे मारू या या उद्देशाने बाँब टाकले आहेत असे मला वाटत नाही. चुकीची माहिती मिळाल्यामुळे वा अन्य फसवणुक झाल्यामुळे निरपराध लोक मरत असणार. अर्थात त्यामुळे हे मृत्यू समर्थनीय होत नाहीत. पण थंडपणे कारस्थान आखून, केवळ बदला म्हणून एखाद्या प्रकाशनाच्या ऑफिसवर हल्ला करून तिथे असणार्‍या तमाम लोकांना मारणे हे तसे नाही. लिबियावरील हल्ल्यात कदाचित गदाफी मरण्याची शक्यता आहे. बगदादच्या हल्ल्यात कदाचित सद्दाम मारला गेला असता. पण ह्या पॅरिसच्या हल्ल्यात कुणी दोषी मारला जाण्याची सुतराम शक्यता नव्हती. चित्र काढणार्‍यांची चूक असलीच तर मृत्यूदंडाच्या लायकीची नक्कीच नव्हती.

४. तुमचा हा दावा साफ खोटा आहे की जे लोक अन्य देशात ढवळाढवळ करत नाहीत त्यांना इस्लामी अतिरेक्यांचा त्रास होत नाही. उदा. हॉलंड. इथे मुस्लिम देशातील लोकांना आश्रय द्यायच्या अट्टाहासापोटी काही अतिरेकी तिथे स्थायिक झालेले आहेत. अशाच एका मोरक्कन अतिरेक्याने थिओ व्हॅन गॉग नामक सिनेमा दिग्दर्शकाला दिवसाढवळ्या भोसकून ठार केले. कारण त्याने काढलेला सिनेमा ज्यात मुस्लिम स्त्रियांचे गार्‍हाणे मांडले होते. आता हा अतिरेकी मोरक्कोचा होता. हॉलंडने मोरक्कोशी कधी युद्ध केले?
युरोपातील अतिरेकी उदारमतवादापायी कुठल्याही प्रकारे सांस्कृतिक प्रशिक्षण न देता अत्यंत मागास, रानटी वातावरणात वाढलेले नग नागरिकत्व मिळवतात. संस्कृतीतला हा प्रचंड बदल हा अशा लोकांकरता कॅलेंडर २००-३०० वर्षांनी पुढे नेण्याप्रमाणे मोठा असतो. त्यांना युरोपातील विचारांशी काहीही देणेघेणे नसते आणि त्यातून हे अतिरेकी प्रकार होतात असे मला वाटते. काही मुस्लिम लोक निष्कारण लादलेल्या युद्धाचे बळी असतीलही पण सरसकट सगळ्यांना हा न्याय लागू होत नाही.

संदीप डांगे's picture

14 Jan 2015 - 12:13 pm | संदीप डांगे

युरोपातील अतिरेकी उदारमतवादापायी कुठल्याही प्रकारे सांस्कृतिक प्रशिक्षण न देता अत्यंत मागास, रानटी वातावरणात वाढलेले नग नागरिकत्व मिळवतात. संस्कृतीतला हा प्रचंड बदल हा अशा लोकांकरता कॅलेंडर २००-३०० वर्षांनी पुढे नेण्याप्रमाणे मोठा असतो. त्यांना युरोपातील विचारांशी काहीही देणेघेणे नसते आणि त्यातून हे अतिरेकी प्रकार होतात असे मला वाटते.

हाच मुद्दा आहे. त्यामुळेच आपण कुणाविरुद्ध कोणत्या पातळीवरचे विनोद करतो याची सारासार विवेकबुद्धी स्वत:ला सुसंस्कृत आणि पुढारलेल्या समजणाऱ्या समाजाने ठेवली पाहिजे अशी किमान अपेक्षा आहे. बहुतेक पाश्चात्त्यांना असे वाटते कि इतर जगात माणसे राहत नाहीत, राहतात ती फक्त डुकरे आणि कुत्री. त्यांना मेंदू नसतो आणि त्यांची माणूस म्हणून जगण्याची लायकी नाही. अमेरिकेचे ड्रोन हल्ले व इतर कुरापातींमध्ये मारले जाणारे निष्पाप हे नेहमीच "चुकून" मरतात. मारणारे आपले, मिडिया आपली, युनो, नाटो सगळे आपल्या खिशात असताना सत्य नेहमीच आपल्याला पाहिजे तसे वाकवता येते. ह्याची जाण फार कमी लोकांना आहे असे इथे दिसते.

फ्यानड्री चित्रपटातील शेवटचा प्रसंग आठवा. शेवटी जब्या चिडून दगड उचलतोच. त्याचे दगड उचलणे सुसंस्कृत समाजाला नसेल पटत पण त्याआधी तो दगड उचलण्यास भाग पडणारी निंदानालस्ती याचा प्रथम सुसंस्कृत जगाने निषेध केला पाहिजे. शेवटी जब्या दगडच उचलणार, मोर्चे आंदोलने करून कुणी भिक घालत नाही हे त्याला माहित आहे.

हुप्प्या's picture

14 Jan 2015 - 9:38 pm | हुप्प्या

जर इतका हीन दृष्टीकोन असता तर युरोपने इतक्या अफ्रिकन वा अन्य देशातील रहिवाशांना आसरा दिला असता का?
आता भूतदया केलीत ना मग आपल्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यालाही तिलांजली द्या असे म्हणणे म्हणजे भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी असला प्रकार आहे. मग असेहि म्हणता येईल की शिस्तीत लाईन धरून बसमधे चढणे वा पोस्ट ऑफिसातले व्यवहार करणे हे ह्या मागास देशातील लोकांना जमत नाही. म्हणून युरोपाने लाईन धरणे बंद करुन बेबंद घुसाघुशी करायला सुरवात करावी!
खालील विरोधाभास लक्षात घ्या
१. अत्यंत श्रीमंत अरबी देश अन्य देशातील कुणालाही नागरिक बनू देत नाहीत. मग तो अस्सल सुन्नी मुस्लिम का असेना. याउलट युरोपातील अनेक देश आश्रय देतात. उद्योगधंदा करायचे प्रशिक्षण देतात. भत्ताही देतात.
२. आपला धर्म अनुकरणे, प्रार्थनास्थळे उघडणे हे युरोपात नित्य घडते आहे. मुस्लिमांना ती मुभा आहे. अरबी देश परधर्मीयांना अशी मुभा देत नाहीत. बाकी अनेक रानटी रुढीही बिनबोभाट चालू असतात. जोवर अन्य नागरिकांच्या हक्कावर गदा येत नाहीत असे सगळे कार्यक्रम करायला पूर्ण परवानगी असते.
असे वागवणे हे डुक्कर वा अन्य प्राण्यांना वागवण्याप्रमाणे आपल्याला वाटत असेल तर असे म्हणावे लागेल की झोपलेल्याला उठवणे शक्य आहे पण झोपेचे सोंग घेतले असेल तर उठवणे अशक्य.
ड्रोन हल्ल्यांचा काहीही संबंध नसताना तो इथे जोडणे चूक आहे. इस्लामी मारेकर्यांनी ते चित्र काढल्याबद्दल त्या हत्य केल्या. ड्रोन हल्ल्यामुळे नाही.

संदीप डांगे's picture

14 Jan 2015 - 10:12 pm | संदीप डांगे

मध्य-पूर्वेत प्रत्यक्ष राहणाऱ्या हिंदू भारतीयांकडून त्यांचे अनुभव ऐकायला आवडेल.

टवाळ कार्टा's picture

14 Jan 2015 - 12:28 pm | टवाळ कार्टा

१. जर्मनीत हिटलरवर बंदी असणे हे त्या देशाच्या इतिहासातील एका वाईट पर्वाशी निगडित आहे. नाझी आणि हिटलर हे जर्मनीवर पडलेले काळे डाग आहेत ह्याबाबत सर्व सुसंस्कृत जगात एकमत आहे. पण म्हणून बाकी देशांनी उठताबसता बंदी घालावी ही अपेक्षा आहे का?

पाकिस्तान लश्करे तोयबाबद्दल तुमचेच ऐकते वाटते :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

16 Jan 2015 - 6:01 am | निनाद मुक्काम प...

तुमच्या माहितीसाठी सांगतो
स्विस किंवा इयु मध्ये नसलेले अनेक श्रीमंत देश जसे मोनेको ह्यांनी इस्लामी देशात हस्तशेप करत नाहीत पण त्याच्यावर सिनेमे काढून त्यांना प्रबोधन देण्याचे धंदे सुद्धा करत नाहीत कारण त्याचा परिणाम गाढवापुढे वाचली गीता असा होणार हे त्यांना माहिती असते , ह्या देशाला स्वतःच्या रक्षणासाठी अण्वस्त्र मोठी फौज लागत नाही , महाराष्ट्रातले एक उदहरण पहा नुकतेच दलित हत्याकांड झाले त्याचे फोटो आपण नेट वर पहिले अंगावर शहरा आला , पण हे काही आपण पहिल्यांदा पाहत किंवा ऐकत नाही आहोत ह्याआधी खैरलांजी झाले ,भारतात खेड्यांमध्येअश्या घटना नित्य नियमाने घडतात.
आपण आपल्या मनाची समजूत काढतो हे झाले खेड्यात
तेथे जाती व्यवस्था प्रबळ आहे , अशिक्षित मध्ययुगीन काळात जगणारे तोच कायदा मानणारे लोक आहेत , आपण शहरात राहतो आपली संस्कृती मुल्ये वेगळी आहेत ,
थोडक्यात काय आपण आता भारतीय लोक एकाच वेळी वेगवेगळ्या शतकात जगात आहेत हे वास्तव स्वीकारून जगत आहोत , मुंबई मधील माणसाला न्यूयार्क मध्ये पहिल्यांदा आल्यावर जो सांस्कृतिक धक्का बसतो तोच आजमगढ मधून पहिल्यांदा मुंबई मध्ये आपल्यावर लोकांना बसतो ,
गावातील लोकांचे सामाजिक सांस्कृतिक आर्थिक सबलीकरण झाले पाहिजे असे आपल्याला वाटते पण त्यासाठी कोणीच काहीही करत नाही , तेव्हा निदान आपण तरी ह्या जगत अफगाण किंवा आफ्रिकन देश अजून मध्य युगात राहतात , त्यांना शिक्षण देऊन आर्थिक सबलीकरण करायचे सोडून वेस्टन वल्ड स्वतःच्या स्वार्थासाठी ह्या लोकांना साक्षर करत नाही , प्रगत होऊ देत नाहीत
ह्यांच्या हातात शस्त्रे देतात आणि शस्त्र हाती आलेल्या समूहाची मानसिकता अधिक कडवी होते तिची बाधा होऊन मग प्रगत देशात एखादी घटना घडली कि त्यांच्या जनता बोंब मारते.
आपल्या भारतात मुसलमान समाजात बोहरी मुसलमान
हे सधन सुशिक्षित आहेत त्यांची हिंदू समाजाला व त्यांना हिंदू समाजाची भीती वाटत नाही हेच जैन पारशी सारख्या अल्प संख्यांक लोकांच्या विषयी लागू पडते
ज्या दिवसही भारतीय व जगातील मुसलमान शिक्षित व सधन होईल तेव्हा त्यांची जगाला व जगाची त्यांना भीती उरणार नाही.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

22 Jan 2015 - 3:05 am | निनाद मुक्काम प...

ह्या धाग्यावरून मी रजा घेतली होती पण मी माझ्या मूळ प्रतिसादात जर्मनी व हिटलर संबंधी कायदे ह्याबाबत माहिती दिली होती.
जर्मनी मध्ये ह्याच घटनेसंबधी नुकतीच घटना घडली.
मुसलमानधार्जिणे युरोप होऊ नये म्हणून जर्मनीत कार्यरत संघटना पेगीदा च्या प्रमुखाने गंमतीत हिटलर च्या पोशाखात फोटो काढले होते हे जर्मन वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले त्यामुळे आता त्याला संघटनेच्या प्रमुख पदावरून पायउतार व्हाव्हे लागले .

मृत्युन्जय's picture

14 Jan 2015 - 11:54 am | मृत्युन्जय

१. ज्यु लोकांनी त्या उपहारगृहाच्या मालकाला गोळ्या घातल्या की सनदशीर मार्गाने निषेध केला?
२. भारताने बियर कंपनीच्या मालकाला रॉ एजंट मार्फत गोळ्या घातल्या की त्याचा शांततामय मार्गाने निषेध व्यक्त केला?
३. तुषार गांधींनी बियर कंपनीच्या मालकाला मारण्यासाठी मारेकरी पाठवले की आपली नापसंती शांततामय मार्गाने व्यक्त केली?
४. हिटलरची स्तुती केल्यावर जर्मनीतले ज्यु लगेच त्या माणसाला जाळतात की त्याच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी करतात?

युरोपात अनेक देश आहेत जे इतरांच्या देशात ढवळाढवळ करत नाहीत , त्यांना कधीही इस्लामी निर्वासित आपल्या देशात आणावे लागत नाहीत. ह्या देशांना इस्लामी दहशतवाद सतावत नाही ,

काय बोलता? दहशतवादी इतके तत्ववादी आहेत हे माहित नव्हते?

१. भारताने कुठल्या देशात ढवळाढवळ केली म्हणुन त्यांचे निर्वासित इकडे येउन भारतावर दहशतवादी हल्ले होतात? (बांग्लादेश स्वातंत्र्याबद्दल नक्का बोलु. ती गोष्ट वेगळी आहे)
२. ऑस्ट्रेलियाचा दोष नक्की काय?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

14 Jan 2015 - 4:00 pm | निनाद मुक्काम प...

माझा प्रतिसाद नीट वाचला आहे का
भांडवलशाहीत सनदशीर काहीहि नसते मात्र सनदशीर मार्गाने आम्ही अमुक अमुक केले असे म्हणण्याची पद्धत असते.
ज्यू लोकांनी निरपराध लहान मुले व महिला पेलेस्तैन येथे हल्ले करून त्यांच्या राज्य कर्त्यांनी मारल्या म्हणून वाईट वाटू घेतले नाही , आमचा १ नागरिक मारला तर तुमचा १० मारू असा हिशोब असतो, भारतात दहशतवादी हे पाकिस्तान काश्मीर व इतर मुद्द्यांच्या मुळे पारंपारिक युद्धात निभाव लागत नाहीत म्हणून छुपे युद्ध जिहादचा भाग म्हणून पाठवतात , बोको हराम , हमास किंवा मुल्ला ओमर ची तालिबान भारतात अतिरेकी पाठवत नाही . इतर देशांच्या भानगडीत भारत पडत नाही म्हणूनच पाकिस्तान वगळता बहुतेक सर्व मुस्लिम देशात भारताबाबत चांगले मत आहे. शीत युद्धाच्या काळात दोन्ही बाजूने अनेक पत्रकार विचारवंत राजकीय नेते ह्यांच्या हत्या झाल्या , हे दोघांना माहिती आहे ,
पैगंबर चे चित्र काढणे कायद्याने गुन्हा म्हणून सिद्ध केले तर असे प्रकार होणार नाहीत , तुम्हाला उपहास करायचा असेल तर अनेक मुस्लिम राज्यकर्ते आहेत त्यांचा करा ,अनेक हॉलीवूड सिनेमातून तो होतो ,
आमच्या कार्यालयात सलग ३ दिवस भीतीचे वेदनेचे वातावरण होते कारण जे पेरिस येथे घडले ते म्युनिक मध्ये घडू शकते
ह्याची त्यांना जाणीव होती. मात्र भारतात असा हल्ला झाला तर निषेध सोडा पण आपल्याला काय पडले आहे त्याचे असा त्यांचा अभिर्भाव असतो ,
माफ करा माझ्या माणसांच्या मरणाचे तुम्हाला मोल नाही आणि तुमच्या दुक्खात आमचे काही भारतीय मात्र आगंतुक रुदाल्या बनून सोशल मिडीयावर मातम करतात.
शस्त्र न विकता मानवी समाजाला उपयोगी गोष्टींची निर्यात करून प्रगत देशांनी आपली प्रगती राखण्याची सवय अंगिकारली तर जगातून दहशतवाद संपेल ,
जगाला विंडोज देणारा गेट्स व जगावर अणु युद्धाची टांगती तलवार ठेवणारा नित्य नियमाने नवीन हुकुमशहा जगाला सप्रेम भेट देणारी अमेरिका आहे.
थोडक्यात ह्या प्रकाराकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन
नुकतेच आपल्या सीमेवर दोन्ही बाजूने तुफान गोळीबार झाला ह्यात दोन्ही बाजूचे निरपराध नागरिक व काही सैनिक मारल्या गेले , आता पाकिस्तानी काश्मीर मधील काही नागरिक मेले म्हणून भारतात कोणत्याही राजकीय पक्षाने विरोध दर्शविला नाही , आमची माणसे सैनिक मारलीत तर आम्ही तुमची माणसे मारू
सैनिक मारू थोडक्यात काय जश्यात तसे
मग फ्रेंच लोकांनी लिबियात एक गडाफी मारण्यासाठी तुफानी हल्ला केला जेणेकरून भारताला त्यांचे रफाल विमान किती उपयोगी व बहुगुणी आहे हे दाखवून हवाई इतिहासातील सर्वात मोठा सौदा करायचा होता , तो त्यांनी केला पण त्यांच्या दुर्देवाने
तो पूर्णत्वास गेला नाही.
रशिया विरुद्ध लढणारा लादेन धर्म योद्धा व अमेरिका विरुद्ध लढणारा लादेन दहशतवादी
कृपा करून वेस्टन चष्म्यातून जगाकडे पाहू नका
पाकिस्तानला लाख शिव्या देऊन त्याहून जास्त लाखो रुपयाचे नुकतेच अनुदान देणारी अमेरिका भारताने रशियाची ह्या वेळेस शस्त्र करार का केले म्हणून मोदी सरकारला जाब विचारते.
हीच युरोपियन राष्ट्रे मुसलमानाचा पुळका येउन मोदींना विसा व गुजरातची व्यापार नाकारतात व ते प्रधान मंत्री झाले की त्यांची भाट गिरी सुरु करतात , ह्या लोकांची नैतिकता हि पैशांची स्वार्थाची मिंधी आहे व त्याहून मिंधे आहेत ह्याची जनता जी वाल्या कोळ्याच्या मुलांची बायकोची भूमिका पार पाडते, अमेरिका व युरोपियन राष्ट्रे हे वाल्या कोळी आहेत , त्यांना नारदाची गाठ अजून पडायची आहे ,

संदीप डांगे's picture

14 Jan 2015 - 4:06 pm | संदीप डांगे

कृपा करून वेस्टन चष्म्यातून जगाकडे पाहू नका

अगदी हेच म्हणायचे आहे.

श्रीगुरुजी's picture

14 Jan 2015 - 1:18 pm | श्रीगुरुजी

>>> मुंबईत एका उपहार गृहाचे नाव काहीतरी वेगळे असावे ह्या उद्देशाने हिटलर चे नाव दिले , भारतात हे नाव अनेकदा बोलीभाषेत वापरले जाते उद्द एखादी व्यक्ती स्वभावाने एकदम हिटलर आहे ,ह्या नावाने टीव्ही वर एक सिरियल पण आली होती .पण मुंबई मधील अल्प संख्यांचा ज्यू समुदायाच्या ह्यामुळे भावना दुखावल्या गेल्या त्यांनी विरोध केला व आपल्या सरकारने मध्यस्थी करून त्या उपहार गृहाचे नाव बदलायला लावले ,

या नवी मुंबईतील उपाहारगृहाचे नाव 'हिटलर्स क्रॉस' असे होते. दबावामुळे मालकाला ते बदलावे लागले. भारतात दिल्लीत औरंगजेब रस्ता, महाराष्ट्रात औरंगाबाद ही शहरे आहेत. औरंगजेब या क्रूर नराधमाचे नाव दिलेले आहे. ते बदलायची अनेकवेळा मागणी झाली. ही मागणी करणार्‍यांची जातीयवादी अशी संभावना करण्यात येते. परंतु हिटलरचे नाव बदलणारे मात्र मानवतावादी असतात.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

14 Jan 2015 - 4:13 pm | निनाद मुक्काम प...

अगदी बरोबर गुरुजी
हिटलर चे नाव सुध्धा जगात कोणताही प्रकारे पुढे येउन नये हे पाहणारी हि लोक ह्या बाबतीत अत्यंत संवेदनशील असतात मात्र संवेदनशील असण्याचा नैतिक हक्क गोरे व प्रगत लोकांना असतो
अमेरिका लांदेन ला सनदशीर मार्गाने कोर्टात नेत नाही त्यांची मर्जी जर्मनी व फ्रांस इराक व सिरियात कुर्दिश लोकांना शस्त्रे देतात ,कुर्दिश मुलांचे बालपण ह्यांची शस्त्रे चालविण्यात वय जाणार उद्या ते तरुण झाले व त्यांचा बुद्धीभ्रंश करून त्यांना युरोपात जिहाद साठी कोणी पाठवले तर त्यांना नावे ठेवण्यात हीच लोक पुढे असतात .महाराष्ट्रात अहमदाबाद चे अहिल्याबाई नगर होणार आहे तसे एकदिवस औरंग्या चे सुद्धा नाव रस्त्यावरील धुळीत जाईल
आमेन

चिऊकाऊ's picture

14 Jan 2015 - 10:24 am | चिऊकाऊ

The usual argument by the "GOOD" islam followers is "All Islam followers are NOT the terrorist". Agreed. But what those GOOD islamic doing against these BAD except such condemning to terrorist attacks? What do they say about the Sharia, Kuran and Jihad? Do they justify or oppose?
I see many gals even some young girls with covered head who appear to be family and peace loving. Do they at least dare to say that we need freedom from these bindings? Many men keep on drinking alcohol against islamic laws and I am dam sure many of the women must be longing to throw away her hijab, niqab and burka. Of course nobody from all those GOOD islamics dares to ask for change in the Sharia law. So what these good people worth for? They just want the good lifestyle, leisure and comforts, scientific equipment and gadgets and even weapons from our modern countries and wish to protect their islamic laws and impose all such 1400 years old bindings and thoughts on their kids who go to the same school where our kids go.
Modern world is really looking for the voice from peaceful GOOD islamic to CHANGE as per the time, as per the 21st century. Every religion has extremist and the bad customs and traditions. While whole world is altering the lifestyle, religious behavior, islamic yet ask to follow 1500 years old sharia in our advanced countries, ask to allow mask at public places and organizations which I see a serous threat for security. We see the islamic women downtrodden and that disturbs us as a human. We wish the islam women MUST have all the rights that today we have. We wish the Imams to explain how they teach the koran TODAY. How do they and parents define and explain the concepts of jihad against the non-islamic to kids who were born as the citizens of the developed nations where most of the people have almost no dominance of religion on their daily life. And if they don't wish to CHANGE they have no moral right to exploit the modern science and technological advances and they deserve life in dessert with camels to travel and birds for exchanging messages, and that 1500 years old health facilities.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

14 Jan 2015 - 4:26 pm | निनाद मुक्काम प...

@BAD except such condemning to terrorist attacks?
किती अमेरिकन व वेस्टन वल्ड मधील सामान्य सुजाण सुसंस्कृत जनता हिरोशिमा ,अफगानिस्तान इराक मधील नर नरसंहाराचा निषेध करत्तात.
किती इंग्रजी जनतेने जालियानवाला बाग हत्या कांडाचा निषेध केला
जनरल डायर सुटला म्हणून किती जण इंग्लड अधे रस्त्यावर उतरले
आपले टेबल मेनर हे जगात सर्वोत्तम असून ते जगात सर्वांनी पाळले पाहिजे , ते न पाळता जपानी चीनी व भारतीय तोंड उघडे ठेवून अन्नाचे तोंडात चर्वण करतात , ढेकर मोठ्याने देतात म्हणून त्यांना असंस्कृत ठरवून त्यांची खिल्ली उडवणारे व आपलाच धर्म आपलीच संस्कृती श्रेष्ठ म्हणणारे धर्मांध उन्नीस बीस फरकाने सारखेच

संदीप डांगे's picture

14 Jan 2015 - 4:50 pm | संदीप डांगे

आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्टे असाच न्याय तमाम अमेरिका व मित्रमंडळींचा असतो नेहमी.
आताही अतिरेक्यांना मारण्याच्या नावाखाली अमेरिकेचा ड्रोन नावाचा जो मनमानेल तसा विडिओ गेम सुरु आहे त्याबद्दल सर्वज्ञानी लोकांना काय म्हणायचे आहे?

काळा पहाड's picture

14 Jan 2015 - 6:00 pm | काळा पहाड

आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्टे असाच न्याय तमाम अमेरिका व मित्रमंडळींचा असतो नेहमी.
आताही अतिरेक्यांना मारण्याच्या नावाखाली अमेरिकेचा ड्रोन नावाचा जो मनमानेल तसा विडिओ गेम सुरु आहे त्याबद्दल सर्वज्ञानी लोकांना काय म्हणायचे आहे?

आता हसू यायला लागलंय. अहो, जो तो देश आपला फायदा पहाणारच ना? किंबहुना भारताकडेही ड्रोन्स आहेत. ते वापरून अत्यंत अचूक निशाणा साधता येतो आणि आपल्या सैनिकांना धोका नसतो. यात वाईट काय आहे? जग कायम आपल्या फायद्याचंच बघत असतं. अमेरिकेने त्यांच्या राष्ट्राच्या संरक्षणासाठी अणुअस्त्रे वापरतील. जर पाकिस्तानशी युद्ध झाले तर भारतालाही शेवटचा पर्याय म्हणून का होईना ती वापरावीच लागतील. जसे ते इराक मध्ये लोक मारतात तसेच लोक आपल्यालाही काश्मीर मध्ये मारावेच लागतील. यात नैतिकतेचा प्रश्न येत नाही कारण हा संरक्षणाशी संबंधित विषय आहे. एक लक्षात ठेवा. काश्मीर मधला शेवटचा माणूस मारावा लागला तरीही चालेल पण भारत काश्मीर कधीही सोडणार नाही कारण तो स्ट्रॅटेजिकली महत्वाचा भाग आहे. अगदी इंच आणि इंच बाँब्सचा भडिमार करून स्वतंत्रता मागणारा प्रत्येक जीव नष्ट केला जाईल पण काश्मीर मिळणार नाही. मी याचं समर्थन करतो आणि तिथे बटण दाबणारा मी असतो तरी मी हे एक कर्तव्य समजून केलं असतं. हे गरजेचं आहे आणि हे असंच करायचं असतं.

संदीप डांगे's picture

14 Jan 2015 - 7:09 pm | संदीप डांगे

तुम्ही ड्रोन हल्ल्यांबाबत फारच अज्ञानी दिसताय. निष्पाप (अतिरेकी नाही, सामान्य लोक नाहीतर परत शब्दात पकडलं मला) लोकांना टिपून टिपून मारण्याच्या अमेरिकेच्या उद्योगाबद्दल बोलत होतो. आला संशय, हाण मिसाईल असा प्रकार आहे. कोण कुठले कायदे, राज्यघटना वैगेरे गेले तेल लावत. आता तुम्हाला जगातला प्रत्येक मुसलमान हा आतंकवादीच वाटत असेल तर बरंय बाबा

हे वाचा आणि अजून हसा.
On 3 June 2009, the United Nations Human Rights Council (UNHRC) delivered a report sharply critical of US tactics. The report asserted that the US government has failed to keep track of civilian casualties of its military operations, including the drone attacks, and to provide means for citizens of affected nations to obtain information about the casualties and any legal inquests regarding them.[146] Any such information held by the U.S. military is allegedly inaccessible to the public due to the high level of secrecy surrounding the drone attacks program.[147] The US representative at UNHRC has argued that the UN investigator for extrajudicial, summary or arbitrary executions does not have jurisdiction over US military actions,[146] while another US diplomat claimed that the US military is investigating any wrongdoing and doing all it can to furnish information about the deaths.

म्हणजे कसे आम्हीच अन्वेषण करणार आमच्यावरच्या आरोपांचे पण जरा कुठे जगात कुणी खुट्ट केले कि संशयास्पद ठरवून बेधडक बॉम्बिंग करणार.

पूर्ण इथे वाचा
http://en.wikipedia.org/wiki/Drone_strikes_in_Pakistan

खुलासा: मी अमेरिकेच्या दुटप्पी परराष्ट्रनीती विरोधात आहे. म्हणजे पाकिस्तानप्रेमी आहे असा त्याचा अर्थ होत नाही. जगात जिथे कुठे विनाकारण निष्पाप लोक मारली जातात त्याच्याविरोधात आहे.

काळा पहाड's picture

14 Jan 2015 - 7:20 pm | काळा पहाड

हो हे असंच असतं. पटलं तर व्हय म्हणा नै तर सोडून द्या. असंच बेधडक बॉंबिंग केलं जातं आणि पुढंही केलं जाईल. त्याला नाईलाज आहे. मुसलमानांनी त्यांच्यातल्या अतिरेक्यांना टिपून मारावं. त्यांना शोधून टिपणं ही जगाची जबाबदारी नाही. उदाहरणार्थ, जर पाकिस्तानातल्या अतिरेक्यांनी भारतावर हल्ला केला तर त्यांना पाकिस्तानात शोधणं ही भारताची जबाबदारी नाही. त्यांना पाकिस्ताननं शोधून मारावं नाहीतर भारतानं पाकिस्तानवर बाँबिंग करावं. अमेरिका असंच करत असते आणि हाच जगाचा नियम आहे. तुम्हाला त्यात मरणारे काही निरपराध सापडत असतील तर ते दुर्दैवी कोलॅटरल डॅमेज आहेत. आणि त्यांबद्दल फार तर दु:ख वगैरे व्यक्त करू शकतो पण चौकशी वगैरे काही ते करू देणार नाहीत. सर्वधर्मसमभावी वगैरे मूर्खपणा येत नाही ना त्यांना, त्यामुळं. भारताची पॉलिसीही आता याच मार्गानं जाईल. तुम्ही मेणबत्या लावून निषेध करायला मोकळे आहात.

संदीप डांगे's picture

14 Jan 2015 - 7:43 pm | संदीप डांगे

मेणबत्त्याच तर नाही पटत बा आपल्याला, फक्त अमेरिका व मित्रराष्ट्रांच्या कुणी कानाखाली वाजवली कि त्यांनी आम्हाला मारणारे आतंकवादी आहे म्हणून बोंबलू नये. सनदशीर मार्गाने विरोध करा वैगेरे म्हणू नये. आपणच खतपाणी घालून वाढवलेले भूत आपल्यालाच झोम्बतंय म्हणून गावभर फिरू नये "मी आहे चार्ली" चे टी-शर्ट घालून…

काळा पहाड's picture

15 Jan 2015 - 12:19 am | काळा पहाड

तुम्ही जे तथाकथितरित्या कानाखाली वाजवणं वगैरे जे बोलताय, त्याला राज्यबाह्य कर्त्यां (नॉनस्टेट अ‍ॅक्टर्स) नी केलेला टेररिझम असं म्हटलं जातं. एक पाकिस्तान सोडला तर अशा कर्त्यांना सध्या वाईट दिवस आहेत हे मान्य करण्यात काहीच प्रत्यवाय नसावा. सुरक्षा यंत्रणा या यडपटांची ज्या प्रकारे सालटी सोलतात ते जर तुम्हाला माहीत असतं तर हा अतिरेक्यांबद्दल दाखवत असलेला उसना हीरोइझम लगेच गळून पडेल. एखाद्या राष्ट्राला त्यांना त्रास देणार्‍या बाजारबुणग्यांना कोणत्याही प्रकारे व कोणत्याही ताकतीने उत्तर देण्याचा हक्क असतोच. हा अधिकार त्यांना जनतेनं दिलेला असतो. केन्या दुतावासावरच्या हल्यानंतर अमेरिकेनं काबूलबर बाँबफेक केली होती. इथं त्यांनी निरपराध मरतील, मानवाधिकाराचं काय वगैरे विचार करत बसले असते तर अवघड होतं. तेव्हा तुम्ही सांगताय ते कट्ट्यावर बोलायला ठीक आहे पण त्याला फारसं महत्व नाही. असा प्रयत्न अल कायदाने ९/११ ला केला होता, तर अमेरिकेनं दोन मुस्लीम राष्ट्रं बेचिराख केली आणि बाकीची अपंग केली. ती अमेरिकेच्या कानाखाली वाजवायची धमक दाखवताय तर अमेरिका जेव्हा ते हात उखडेल आणि आणखी दोन मुस्लीम राष्ट्रं भिकेला लागतील तेव्हा सहानुभूतीची अपेक्षा करू नका.

संदीप डांगे's picture

15 Jan 2015 - 12:29 pm | संदीप डांगे

चला, एक मस्त पैकी चहा मारूया, नाहीतर तुम्ही मला पुढच्या २-४ प्रतिक्रियांमध्ये थेट अल-कायदा चा हस्तक म्हणून मोकळे व्हाल.

बाद्वे, ही तुमची लाडकी अम्रीक्का जिथे आपला काही संबंध नाही तिथेही जाउन नासधूस करत असते, त्याबद्दल आपले मौल्यवान मत जाणून घ्यायला आवडेल.

श्रीगुरुजी's picture

14 Jan 2015 - 10:23 pm | श्रीगुरुजी

>>> खुलासा: मी अमेरिकेच्या दुटप्पी परराष्ट्रनीती विरोधात आहे. म्हणजे पाकिस्तानप्रेमी आहे असा त्याचा अर्थ होत नाही. जगात जिथे कुठे विनाकारण निष्पाप लोक मारली जातात त्याच्याविरोधात आहे.

पण तुम्ही तर तुमच्या मूळ लेखात इस्लामी अतिरेक्यांनी पॅरिसमध्ये मारलेल्या १६ जणांच्या हत्येचे समर्थन केले आहे. काय हा विरोधाभास! कदाचित तुम्हाला असे म्हणायचे असावे - "जगात जिथे कुठे विनाकारण अमुस्लिमांकडून निष्पाप लोक मारली जातात त्याच्याविरोधात आहे."

संदीप डांगे's picture

15 Jan 2015 - 12:48 am | संदीप डांगे

तुम्ही पत्रकार आहात का हो?

नै म्हणजे बोलणाऱ्याच्या तोंडी नसलेले शब्द कोंबून आपल्याला पाहिजे तशी सनसनाटी बातमी तयार करतात ते.

मंग आजकाल कुठल्या च्यानल वर असता?

श्रीगुरुजी's picture

15 Jan 2015 - 12:54 pm | श्रीगुरुजी

"खुलासा: मी अमेरिकेच्या दुटप्पी परराष्ट्रनीती विरोधात आहे. म्हणजे पाकिस्तानप्रेमी आहे असा त्याचा अर्थ होत नाही. जगात जिथे कुठे विनाकारण निष्पाप लोक मारली जातात त्याच्याविरोधात आहे." हे तुमचेच वाक्य आहे. थोडं वर स्क्रोल करा. तुम्हाला आपलीच प्रतिक्रिया दिसेल. त्यात तळाला हे वाक्य आहे. तुमची याच्या बरोबर विरूद्ध भूमिका तुमच्या मूळ लेखात आहे ज्यात तुम्ही अतिरेक्यांनी पॅरिसमध्ये मारलेल्या निष्पाप नागरिकांच्या हत्येचं समर्थन आहे.

एकाचवेळी तुमचा निष्पाप लोकांच्या हत्येला विरोध आहे आणि त्याचवेळी मुस्लिम अतिरेक्यांनी पॅरिसमध्ये मारलेल्या निष्पाप नागरिकांच्या हत्येला तुमचा पाठिंबा आहे. या दोन्ही परस्परविरोधी भूमिका एकत्र केल्या तर एकच निष्कर्ष निघतो तो म्हणजे, "तुम्ही जगात जिथे कुठे विनाकारण अमुस्लिमांकडून निष्पाप लोक मारली जातात त्याच्या विरोधात आहे आणि जर मुस्लिमांनी निष्पाप लोक मारले तर त्याला तुमचा पाठिंबा आहे.". थोङक्यात म्हणजे तुमचा विरोध किंवा पाठिंबा मारणार्‍याच्या धर्मावर अवलंबून आहे.

संदीप डांगे's picture

17 Jan 2015 - 12:17 am | संदीप डांगे

माझा मूळ लेख जरा व्यवस्थित चष्मारहित अवस्थेत वाचा. निष्पाप याचा अर्थ ज्यांच्यावर कुठलाही आरोप नाही, ज्यांनी कुठलीही आगळीक केली नाही. "विनाकारण" ज्यांचा जीव घेतला जातो ते निष्पाप. जसे सीएसटीवर मारले ते, ताज मध्ये मारले ते, ट्रेनमध्ये थकून भागून घरी जात होते ते, ते खरे निष्पाप.

आपल्या व्यंगचित्रातून कुठलाही सृजनात्मक विचार न देता विखारी प्रचार करणारे कसे काय निष्पाप? समजून उमजून खोड्या केल्या तर कसे काय निष्पाप?

कुणीतरी फ्रान्समध्ये चित्र काढून अपमान करतो म्हणून इथल्या भारतातल्या चित्रकाराला नाही ना मारले? किंवा हे सारे व्यंगचित्रकार सारखेच म्हणून तर कुणी दिसेल त्या व्यंगचित्रकाराला नाही ना मारले? मग तेवढे शर्ली एब्दोचेच कसे मारले?

तुमची निष्पाप ची व्याख्या म्हणजे जे अमुस्लिम ते सारे निष्पाप अशीच आहे असे वाटते

श्रीगुरुजी's picture

17 Jan 2015 - 11:27 pm | श्रीगुरुजी

>>> माझा मूळ लेख जरा व्यवस्थित चष्मारहित अवस्थेत वाचा. निष्पाप याचा अर्थ ज्यांच्यावर कुठलाही आरोप नाही, ज्यांनी कुठलीही आगळीक केली नाही. "विनाकारण" ज्यांचा जीव घेतला जातो ते निष्पाप. जसे सीएसटीवर मारले ते, ताज मध्ये मारले ते, ट्रेनमध्ये थकून भागून घरी जात होते ते, ते खरे निष्पाप.

एखाद्यावर आरोप झाले म्हणजे लगेच तो पापी ठरून हत्येस पात्र होतो हे तुमचं अजब तर्कट आहे.

>>> आपल्या व्यंगचित्रातून कुठलाही सृजनात्मक विचार न देता विखारी प्रचार करणारे कसे काय निष्पाप? समजून उमजून खोड्या केल्या तर कसे काय निष्पाप?

कोणत्या कायद्यानुसार ते निष्पाप नसून पापी आहेत हे सिद्ध झालंय? फ्रान्सच्या का शरियतच्या का अल-कायदाच्या का अजून दुसर्‍या कोणत्यातरी न्यायासनाच्या?

>>> कुणीतरी फ्रान्समध्ये चित्र काढून अपमान करतो म्हणून इथल्या भारतातल्या चित्रकाराला नाही ना मारले? किंवा हे सारे व्यंगचित्रकार सारखेच म्हणून तर कुणी दिसेल त्या व्यंगचित्रकाराला नाही ना मारले? मग तेवढे शर्ली एब्दोचेच कसे मारले?

जे १७ जण मारले गेले त्यातला व्यंगचित्रकार एकच होता व उरलेले व्यंगचित्रकार नव्हते. तरीसुद्धा त्यांना मारून टाकण्यात आले आणि त्याचं तुम्ही समर्थन करताय. धन्य आहे.

>>> तुमची निष्पाप ची व्याख्या म्हणजे जे अमुस्लिम ते सारे निष्पाप अशीच आहे असे वाटते

पण दहशतवाद व हत्या हे तुम्हाला पुण्यकर्म वाटतंय त्याचं काय?

श्रीगुरुजी's picture

18 Jan 2015 - 1:36 pm | श्रीगुरुजी

>>> >>> आपल्या व्यंगचित्रातून कुठलाही सृजनात्मक विचार न देता विखारी प्रचार करणारे कसे काय निष्पाप? समजून उमजून खोड्या केल्या तर कसे काय निष्पाप?

>>> कोणत्या कायद्यानुसार ते निष्पाप नसून पापी आहेत हे सिद्ध झालंय? फ्रान्सच्या का शरियतच्या का अल-कायदाच्या का अजून दुसर्‍या कोणत्यातरी न्यायासनाच्या?

नक्की कोणत्या कायद्यानुसार ते व्यंगचित्रकार निष्पाप नव्हते हे सिद्ध झालंय ते नाही सांगितलंत अजून?

इरसाल's picture

17 Jan 2015 - 3:32 pm | इरसाल

आपले टेबल मेनर हे जगात सर्वोत्तम असून ते जगात सर्वांनी पाळले पाहिजे , ते न पाळता जपानी चीनी व भारतीय तोंड उघडे ठेवून अन्नाचे तोंडात चर्वण करतात , ढेकर मोठ्याने देतात म्हणून त्यांना असंस्कृत ठरवून त्यांची खिल्ली उडवणारे व आपलाच धर्म आपलीच संस्कृती श्रेष्ठ म्हणणारे धर्मांध उन्नीस बीस फरकाने सारखेच

आपल्याला ह्याबद्द्ल नावे ठेवणारे ते नालायक कारमधे "ढुम्म" करुन गरम हवेचा झोका सोडतात तेव्हा कुठे जातात ह्यांचे मेनर्स. प्रत्येक देशाच्या आपापल्या मॅनर्स बद्दल काही सीमारेषा आहेत.

संदीप डांगे's picture

14 Jan 2015 - 12:30 pm | संदीप डांगे

हे पण वाचावे.

श्रीगुरुजी's picture

14 Jan 2015 - 1:14 pm | श्रीगुरुजी

>>> हे पण वाचावे.

याच लेखातील खालील परिच्छेद वाचा.

One of Egypt’s highest Islamic authorities warned that the cartoon would exacerbate tensions between the secular West and observant Muslims, while death threats circulated online against staff members.

A preacher, Anjem Choudary, the former leader of a radical group that was banned in Britain, was quoted by a British newspaper, The Independent, as saying that the image was “an act of war” that would be punishable by death if judged in a Shariah court.


हा अंजेम चौधरी नावाचा मुल्ला राहतो इंग्लंडमध्ये. पण याला इंग्लंडमध्ये राहून देशाचे कायदे न पाळता शरियाचे कायदे पाळायचेत. मुस्लिमांचा दुटप्पीपणा तो हाच.

.....या सेक्युलर लोकांचे, आपल्या देशात तर हे असले 'वेड पांघरून पेडगावला जाणारे' बरेच 'विचारजंत' आहेत, यांच्या ढुंगणाखाली बॉम्ब फुटले तरी ते शहाणे होणार नाहीत.

यांच्या द्रुष्टीने तसे घडविणारे हे नेहमीच निर्दोष असतात व तसे करण्याचा त्यांना अधिकारच असतो, आपण त्यात काही ढवळाढवळ करु नये. कोणत्याही देशाचे कायदे-कानून, त्याची घटना, त्याचे सार्वभॉमत्व हे सगळे आमच्या धर्मवेडापुढे अगदीच क्षुद्र आहेत, आमची धर्माज्ञाच काय ती सर्वश्रेश्ठ असाच त्याचा अर्थ होतो नाही का ?? आम्ही आमच्या मनास येइल तसेच वागणार, इतर गोष्टींशी आम्हांला काही घेणे देणे नाही. एक तर आमचे म्हणणे मान्य करा किंवा मरायला तयार व्हा. अशी ही टोकाची भूमिका घेणारी 'वाळ्वंटी विचारसरणीची' माणसे, याच्याकडून जगाने वेगळी अपेक्षा ती कसली करायची ??

संदीप डांगे's picture

14 Jan 2015 - 3:35 pm | संदीप डांगे

हिंदू धर्म व हिंदू धर्म हा बेस असलेले धर्म सोडून जगात सगळ्या धर्मांनी, पंथांनी क्रूरता केली आहे. बाकी हिंदू धर्मही काही फार सोवळा राहिला आहे असे नाही. चातुर्वर्ण व स्त्री-दमन, जाती-पातीवरून चाललेल्या सद्यस्थितीतल्या हत्या हे त्याचेच उदाहरण आहे. त्यामुळे कुठल्याही धर्माला त्याच्या बळींच्या संख्येवरून किती क्रूर आणि किती मवाळ हा निकष लावायचा तर कठीण आहे कारण सगळी सांख्यिकी कुठून मिळवणार?

बलात्कार वैगेरे तत्सम गंभीर गुन्हे झाल्यावर आपल्या कडे मध्यपुर्वेचे हात-पाय छाटण्याचे, लिंग छाटण्याचे कायदे करावे अशी जनमानसात मागणी होते. ह्या अघोरी प्रथा तिकडून उचलण्यास आपला समाज फारच उत्सुक आहे. पण तोच न्याय कट्टरवाद्यांनी स्वतः लावला कि त्रास होतो.

बलात्कार वैगेरे तत्सम गंभीर गुन्हे झाल्यावर आपल्या कडे मध्यपुर्वेचे हात-पाय छाटण्याचे, लिंग छाटण्याचे कायदे करावे अशी जनमानसात मागणी होते. ह्या अघोरी प्रथा तिकडून उचलण्यास आपला समाज फारच उत्सुक आहे. पण तोच न्याय कट्टरवाद्यांनी स्वतः लावला कि त्रास होतो.

..काय, वाळ्वंटी विचारसरणीच्या कट्टरवाद्यांना जगात कुठेही जाउन आपल्या प्राणप्रीय 'वाळ्वंटी विचारसरणी' प्रमाणे जगाचा न्यायनिवाडा करण्याचा अधिकार आहे ?? असेल तर तुम्हाला तो मान्य आहे का ??

बाकी, ते बलात्कार वैगेरे तत्सम गंभीर गुन्ह्यांबददल त्या अघोरी शिक्षा आपल्याकडेही कायद्याने असाव्यात असे मलासुद्धा वाटते, त्याबाबतीत सहमत.

माहितगार's picture

14 Jan 2015 - 6:37 pm | माहितगार

हा अल जझिरावरील खालेद दिआब यांचा लेख देखील जिज्ञासूंनी जरूर वाचावा.

hitesh's picture

14 Jan 2015 - 1:41 pm | hitesh

अतिरेक्याम्चा हिम्दु पुराणांचा अब्यास दांडगा दिस्तोय..

१०० वेळा साम्गुनही न ऐकलेल्या शिसुपालाला मारणार्‍या भगवंतांचा आदर्श त्यान्नी घेतला.

.. श्रीकृष्णार्पणमस्तु

पिंपातला उंदीर's picture

14 Jan 2015 - 3:21 pm | पिंपातला उंदीर

हा पण एक चार्ली हेब्डॉ

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Tamil-author-announces-his...

अर्धवटराव's picture

14 Jan 2015 - 4:44 pm | अर्धवटराव

या धाग्यावरुन मिपावर रणकंदन माजवणार्‍या केजरीवाल साहेबांवरील धाग्यांची आठवण झाली.भ्रष्टाचारी हि पदवी कोणि कोणास द्यावी, नैतिकतेचे पाठ देण्याचा अधिकार कोणाचा, आंदोलनं कोणि आणि कोणत्या स्वरुपात करावी, आंदलोनांचा उद्देश राजकारण आहे कि समाजकारण इ. अनेक बौद्धिकं झडली मिपावर. फेब्रुवारी नजीक आलाय मित्रांनो... :)

बाकि फ्रांन्स मधील हत्याकांड हे धार्मीक, सामाजीक, राजकीय आणि व्यक्तीगत दुटप्पीपणाचा परिणाम आहे एव्हढं कळतय...आणि हे दोन्हि बाजुंना लागु पडतय. आता मुद्दा असा कि हा वडवानल पुढे आणखी कोणाची राखरांगोळी करणार... दुसरं महायुद्ध संपुन अजुन शतक देखील ओसरलं नाहि. मध्यंतरी महायुद्धचे रिपल इफेक्ट्स जाणवतच राहिले. त्याची परत त्सुनामी बनणार कि काय आता :(

प्रसाद१९७१'s picture

14 Jan 2015 - 4:59 pm | प्रसाद१९७१

भिकार** लेख आहे. आणि लेखकाचा उद्देश नापाक ( हा शब्द आवडेल लेखकाला ) आहे.
सौदीतुन अमेरिकेत जाउन भारतात आलेल्या पैश्यावर चालणार्‍या NGO वर लेखकाचे पोट अवलंबुन असावे असे दिसतय.

संदीप डांगे's picture

14 Jan 2015 - 5:12 pm | संदीप डांगे

तुमचे पोट कशावर अवलंबून आहे ते आधी कळवा इथे. इतर लोकांच्या पोटापाण्याची चिंता वाहायची काय गरज? तुम्हाला आवडेल, पटेल, रुचेल, गोड गोड वाटेल असेच लिहायचे असा काही नियम आहे का मिपाचा ? तुमच्या पोटात अमेरिकेचे मीठ पडत असेल म्हणून खाल्ल्या मिठाला जागताय का?
जरा आपली दिव्यदृष्टी कार्यान्वित करून लेखकाचे पोटापाण्याचा उद्योगही बघून घ्या आणि असले भिकारचोट आरोप करण्याआधी शंभर वेळ विचार करा.

hitesh's picture

14 Jan 2015 - 9:06 pm | hitesh

:)

hitesh's picture

14 Jan 2015 - 9:08 pm | hitesh

मारणारे मुसलमान . मरणारे ख्रिश्चन ..

हिंदु बिच्चारे त्यांच्यावर वाद घालत बसलेत

गंमत आहे नै !

वाद घालणे सुसंस्कृत समाजाचे लक्षण आहे, गोळ्या घालणे असंस्कृत समाजाचे.

आणि सुसंस्कृत समाजाने असंस्कृत समाजाशी कसा वाद घालावा याचाच वादविवाद सुरु आहे. बाकी कै नी तसं …!

आर यु शुअर ?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

15 Jan 2015 - 6:19 am | निनाद मुक्काम प...

जर्मनीत सध्या मुस्लिम विचारवंताना इस्लाम टेरेरिझम वर प्रश्न विचारला असता त्याने जे उत्तर दिले त्याचे इंग्रजीत भाषांतर करून अजून एका ठिकाणी टंकले तेच येथे अडकवत आहे.
German Muslim scholar replies on TERRORISM. I liked the answer of this German Muslim scholar when he was asked about terrorism and Islam. He said. "Who started the first world war? Not Muslims!! Who started the second world war? Not Muslims!! Who killed about 20 millions of Aborigines in Australia ? Not Muslims!! Who sent the nuclear bombs of Hiroshima and Nagasaki? Not Muslims!! Who killed more than 100 millions of Indians in North America? Not Muslims!! Who killed more than 50 million of Indians in south America? Not Muslims!! Who took about 180 millions of African people as slaves and 88% of them died and were thrown overboard into Atlantic ocean? Not Muslims!! No, NOT Muslims!! First of all, You will have to define terrorism properly. If a non-Muslim does something bad. It is crime. But if a Muslim commits the same. He is a Terrorist. So first remove this double standards. Then come to the point. I am proud to be a MUSLIM !! ARE YOU?? SPREAD THIS Message & don't BREAK THE CHAIN!!
आपल्याला अनेक गोष्टी मुळापासून तपासून पहिल्या पाहिजे.
भारतात आज कितीतरी कोटी मुसलमान आहेत सगळ्याची घर वापसी शक्य नाही तेव्हा त्यांना मुख्य प्रवाहात आणणे किंबहुना मी म्हणतो भांडवलशाही व त्याने येणाऱ्या चंगळवादाची चटक लावावी भारत एक बाजारपेठ म्हणून स्वदेशी व विदेशी लोकांना आकर्षित करतो ह्या बाजारपेठेला मुस्लिम समूह हातभार लावू शकतो किंवा सिमी सारख्या संघटना निर्माण करून सुरुंग तरी लावू शकतो ,
ह्या घटनेमुळे जर्मनीत सॉलिड राडा झाला ,
तीन दिवस लोक प्रचंड तणावाखाली होते. आता जर्मन असो वा तुर्की किंवा अन्य मुस्लिम
दोन्ही बाजूच्या सामान्य माणसाच्या मनात क्रुसेड सुरु झाले आहेत ,
अश्यावेळी भारतीय म्हणून मोदींना विशेष धन्यवाद मला द्यावेसे वाटतात , योग्य वेळी त्यांनी गांधी ह्यांचे महात्म्याचा उदो उदो केला ,
आता गांधी ह्यांचे सर्व विचार पटो अथवा न पटो त्यांचे नाव घेऊन
एक भारतीय म्हणून आंतरराष्ट्रीय समुदायात उपदेशाचे डोस वाफाळलेल्या कॉफीचे घोट वाफाळलेल्या चर्चेत पाजता येतात .
जगभरातील मिडियाचा ची पण गंमत पहा विविध स्तरावर हिंसक गुन्हे होण्यात आघाडीवर असलेला भारत त्याच्या लेखी गांधीचा देश आहे तर ह्याबाबतीत भारताच्या पासंगाला न पुरणारा गुन्हे हिंसा आटोक्यात ठेवणारा जर्मनी म्हटले की त्यांना हिटलर आठवतो .

अर्धवटराव's picture

15 Jan 2015 - 8:13 am | अर्धवटराव

या सो कॉल्ड विचारवंताला एकदम साधं उत्तर देता येतं. जेव्हढं काहि त्याने नॉट मुस्लीम्स म्हणुन मोजलं तेव्हढ्या मुस्लीम शासीत राज्यांच्या लढाया देखील दाखवता येतात. इतरांनी केला तर गुन्हा आणि मुस्लीम करतात तो आतंकवाद असं का? तर तो आतंकवादच आहे म्हणुन. ज्याला आपण इस्लाम म्हणतो ते आहे तरी काय? इस्लाम एक धर्म आहे (रिलीजन या अर्थाने), संस्कृती आहे, फिलॉसॉफी आहे आणि इस्लाम एक राज्य/राजकारण देखील आहे. त्यातल्या रिलीजन, संस्कृती, फिऑसॉफी वगैरे भागात जगाला देण्यासारखं खुप चांगलं काहि आहे आणि त्यात सुधारणांचा स्कोप देखील आहे (हे इतर सर्वच धर्मांना, संस्कृतींना लागु होतं). पण राज्य/राजकारण इस्लाम अजीबात कालसुसंगत नाहि.

आजवर मानवी इतिहासात अनेक प्रकारच्या शाह्या अस्तित्वात आल्या. टोळ्या, गोपालक, गणराज्ये ते अगदी आजचं कॅपिटलीझम, कम्युनीझम, लोकशाही वगैरे ( यातलं प्रत्येक उदाहरण एखाद्या शाहीचं नाहि... पण त्यात राज्यकारणाचे अंग दाखवले आहेत ). या सर्व राज्यव्यवस्था माणसाच्या तत्कालीन परिस्थितीतुन अस्तिवात आल्या व त्यात मानवाच्या उदात्ततचं प्रतिबिंब पडलं. तसच त्यामध्ये मुलभूत स्खलनशीलता देखील होती व म्हणुन या सर्व राज्यपद्धती एक विशिष्ट काळपर्यंत टिकल्या व आपल्या मरणाने मेल्या/मरतील. हे आयु:चक्र प्रत्येक सिस्टीमधे आढळतं कारण ते मानवी असतं.

इस्लाम नावाचं जे राज्य/राजकारण आहे त्यात या मानवीपणाचा अभाव आहे. ते सेक्रेड समजल्या जातं , सोवळ्यात राहतं. नॉन इस्लामीस्टला त्याची कालविसंगतता अगदी ठळकपणे दिसत असते पण इस्लामीस्ट ते स्पष्टपणे नाकारतो. पॅन इस्लाम अशी ओळख निर्माण करायची. त्यात अस्मितेचा स्फुल्लींग ओतायचा. त्याला डिव्हाइन पर्सेप्शन द्यायचं. त्यातुन अगदी कौटुबीक पातळीवर योद्धे निर्माण करायचे. व या पॅन इस्लाम झेंड्याखाली जमलेलं राज्य रक्षण करायला प्रत्येकाने जिथे असाल तिथुन, जमेल त्या मार्गाने लढायचं, असं काहिसं स्वरुप आहे याचं. अशा राज्याचं अस्तित्व प्रत्याक्षात लवकर दिसत नाहि, पण त्याचं अस्तित्व जाणावतं. या अस्तित्वाच्या भितीचं नाव म्हणाजे दहशतवाद.

इस्लामी जगातल्या अनेक विचारवंतांनी देखील असल्या राज्य/राजकारणातला पोकळपणा ओळखला व त्याविरुद्ध आवाज बुलंद करायचा प्रयत्न देखील केला. पण काहि ना काहि कारणाने त्यांचा आवाज कमि पडला व आज हे गुप्त स्वरुपातलं पॅन इस्लाम राज्य सगळ्या जगाला आव्हान देण्या इतपत सशक्त झाल्यासारखं वाटतय.

भारतात इंग्रजांनी हिंदु-मुस्लीम संघर्ष पेटवला अन्यथा इथे फार धार्मीक सौदार्ह्य होतं असा प्रचार केला जातो. तसच अमेरीका-रशीया वगैरे सांडांच्या भांडणात मुस्लीम मूलतत्ववादाचं मूळ दाखवल्या जातं. पण ते तितकसं बरोबर नाहि. माणसाच्या रक्ताचा देखील व्यापार करणार्‍या युरोप, अमेरीकेने या आगीत तेल ओतलं हे अगदी खरं आहे. अन्यथा २१व्या शतकातल्या वैज्ञानीक वातावरणात हि आग विझली असती असाही तर्क केल्या जातो. पंण शेवटी हा एक तर्कच आहे, आणि पॅन इस्लामने सुरु केलेला दहशतवाद नावाचा युद्धप्रकार हे एक वास्तव आहे.

या युद्धाचा पहिला बळी नैतीक मुल्यांची भलावण करणारा इस्लाम धर्म, खान-पान, संगीत शास्त्रादी अमृताने ओथंबलेली इस्लामी संस्कृती व शांकर अद्वैतवादाच्या गाभ्याची इस्लामी फिलॉसॉफी असणार आहे... इट्स बॅड, रिअली बॅड.
असो.

जेपी's picture

15 Jan 2015 - 10:34 am | जेपी

आपल्याला अनेक गोष्टी मुळापासून तपासून पहिल्या पाहिजे.
भारतात आज कितीतरी कोटी मुसलमान आहेत सगळ्याची घर वापसी शक्य नाही तेव्हा त्यांना मुख्य प्रवाहात आणणे किंबहुना मी म्हणतो भांडवलशाही व त्याने येणाऱ्या चंगळवादाची चटक लावावी भारत एक बाजारपेठ म्हणून स्वदेशी व विदेशी लोकांना आकर्षित करतो ह्या बाजारपेठेला मुस्लिम समूह हातभार लावू शकतो किंवा सिमी सारख्या संघटना निर्माण करून सुरुंग तरी लावू शकतो ,
ह्या घटनेमुळे जर्मनीत सॉलिड राडा झाला ,
तीन दिवस लोक प्रचंड तणावाखाली होते. आता जर्मन असो वा तुर्की किंवा अन्य मुस्लिम
दोन्ही बाजूच्या सामान्य माणसाच्या मनात क्रुसेड सुरु झाले आहेत ,
अश्यावेळी भारतीय म्हणून मोदींना विशेष धन्यवाद मला द्यावेसे वाटतात , योग्य वेळी त्यांनी गांधी ह्यांचे महात्म्याचा उदो उदो केला ,
आता गांधी ह्यांचे सर्व विचार पटो अथवा न पटो त्यांचे नाव घेऊन
एक भारतीय म्हणून आंतरराष्ट्रीय समुदायात उपदेशाचे डोस वाफाळलेल्या कॉफीचे घोट वाफाळलेल्या चर्चेत पाजता येतात .
जगभरातील मिडियाचा ची पण गंमत पहा विविध स्तरावर हिंसक गुन्हे होण्यात आघाडीवर असलेला भारत त्याच्या लेखी गांधीचा देश आहे तर ह्याबाबतीत भारताच्या पासंगाला न पुरणारा गुन्हे हिंसा आटोक्यात ठेवणारा जर्मनी म्हटले की त्यांना हिटलर आठवतो .

+१११

हुप्प्या's picture

15 Jan 2015 - 10:55 am | हुप्प्या

खरे कारण काय? ६०-७० वर्षापूर्वी बुडाखाली पेट्रोल सापडण्याच्या पूर्वी सौदी अरेबिया व अन्य अमिराती म्हणजे वाळवंटातील रानटी टोळ्या होत्या. त्यामुळे महायुद्ध सुरू करणे वा त्यात सहभागी होणे शक्यच नव्हते. ज्या काळात वसाहतवाद फोफावला त्या काळात युरोप हे बाकी जगाच्या कितीतरी पुढे होते म्हणून ते अन्य जागी जाऊन जुलूम करू शकले. ह्या काळात कुठल्याही मुस्लिम राजवटीकडे इतकी ताकदच नव्हती की हजारो मैल दूर जाऊन राज्य करायचे.

पण जेव्हा शक्य होते तेव्हा त्यांनी ते केले. इराणमधून पर्शियन साम्राज्य नष्ट केले. तेव्हा किती लोक मारले असतील? अफगाणिस्तानात हिंदू व बुद्ध मारले. इतके की हिंदूकुश पर्वत हे हिंदूंची कत्तल ह्या अर्थी आहे.
गुलामगिरीविषयी बोलायचे तर कुराणापासून अरेबियन नाईटपर्यंत सगळीकडे गुलाम ही कल्पना आहे. त्यातही काळे गुलाम गोर्‍यांपेक्षा कनिष्ठ असे साफ लिहिलेले आहे. तेव्हा त्याही बाबतीत अरब लोक मागे नाहीत.

धर्माचा आधार घेऊन, देशाच्या, भाषेच्या सीमा पार करून केला जाणारा दहशतवाद, आजच्या घडीला ह्या प्रकारात नि:संशय मुस्लिमच आघाडीवर आहेत. उगाच ७०, ९०, २००, ३०० वर्षे मागे काय झाले त्याच्या नावाने गळे काढून ही वस्तुस्थिती बदलत नाही.

चिऊकाऊ's picture

15 Jan 2015 - 8:30 pm | चिऊकाऊ

Whatever the European and Americans have done was the past. And in fact the reason for the wars those days was never the religion only. They saw the other regions as their colonies. So do you think that because the Europeans and Americans have killed millions of people in past so now it is Islam's turn or right to kill? Europeans and Americans have contributed
many scientific and technological advances also. What is Islam's contribution to the modern science for human life? And even if some scientists are Islamic it is not the Islamic land where they work. All such scientists have to migrate to Europe and america to do any kind of constructive research. Even the terrorist who claim to follow 1500 years old Islam use the latest weapons and not swords. To make image is banned and they use the videos. They use modern communication means.
This is 2015 and the whole world (at least a common man all over the world) is now looking forward to peace. Instead of changing your lifestyle and beliefs to date you are imposing the whole world to follow your 1500 years old rules? We are free to express our own views. We don't want just to follow blindly because it is written 1500 years ago. And what the hell that German Islamic so called philosopher doing in the Europe? if he really thinks the Europeans and Americans are that bad and his Islamic terrorists' killing is not terrorism, he, that Anjem Choudary and all such should ENJOY his pure obsolete Islamic life in Syria or Afghanistan.

चित्रेचा तारा's picture

15 Jan 2015 - 12:52 pm | चित्रेचा तारा

आपण इंग्लंड मध्ये राहत असे दिसते. तुम्हाला माहित आहे का एका व्यंग चित्रकाराने असे म्हटले होते कि - ज्याचे चित्र आहे त्याचेच व्यंग चित्र काढता येते. आता मोहमद साहेबांचे चित्र नाही तर व्यंगचित्र आले कोठून?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

16 Jan 2015 - 6:13 am | निनाद मुक्काम प...

मोहमद साहेबांचे चित्र नाही तर व्यंगचित्र आले कोठून?

हे माहिती असून उगाच खाजून खरुज काढण्याचा प्रकार होतो
नुकतेच पोप ने त्यांना कानपिचक्या दिल्या , खुद ख्रिस्ती धर्मावर
अशी व्यंग चित्र काढल्याने त्यांनी ह्या वृत्त पत्रावर अनेक खटले ठोकले आहेत अर्थात आम्ही ख्रिस्ती धर्मावर ताशेरे ओढले मग हिंदू व मुस्लिम धर्मावर ओढले तर कुठे बिघडले
हे म्हणजे
एखादा टवाळ पोरग म्हणेन मी माझ्या एरिया मधील मुलींना छेडतो, मग बाजूच्या एरियातील मुलींना सुद्धा छेडले तर कुठे बिघडले.
व्यक्ती स्वातंत्र्यांचा गैरवापर टाळला पाहिजे,
मिपा ला एक राष्ट्र मानले तर निलीकांत सारखा खमका राष्ट्रप्रमुख व त्यांचे कर्तबगार दक्ष संपादक येथे अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा गैर वावर होणार नाही ह्यासाठी धागा त्यावरील प्रतिसाद ह्यावर लक्ष ठेवून असतात प्रसंगी कारवाई करतात असे अलर्ट कायदेशीर फ्रेमवर्क प्रगत देशात हवेत ,
भारतात व जगात प्रसार माध्यमांना मोकळे रान देऊ नये

हुप्प्या's picture

16 Jan 2015 - 8:42 am | हुप्प्या

मुलीला छेडणे आणि व्यंगचित्र प्रकाशित करणे सारखे? काय वाट्टेल ते बेलगाम बोलायचे का?
मुलीला छेडणे हे थेट त्या मुलीला उद्देशून असते. एखाद्या पेपरात व्यंगचित्र काढले तर आग्रहाने हे चित्र बघाच असे म्हणून संपादक मंडळी तो अंक मुस्लिमांच्या गळ्यात मारतात का? ज्यांना अशा गोष्टीची घृणा वाटते त्यांना तो पेपर विकत न घेणे, संपादकाला खरमरीत पत्र लिहिणे शक्य आहे. पण बेछूट गोळीबार?
कुठल्याही सुसंस्कृत देश असे स्वीकारणार नाही.

एकदा का अशा गोष्टींना बंदी घालायचा पायंडा पडला की कुठल्याही खटकणार्‍या गोष्टीला तितकीच निषिद्ध बनवणे आणि त्यावर बंदी घालणे सुरु होते. कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या की नाही हे ठरवणे अत्यंत व्यक्तीसापेक्ष आहे. आणि बंदी घालणे हा उपाय नाही. फ्रान्ससारख्या व्यक्तीस्वातंत्र्याच्या कैवार्याला तर नाहीच नाही.

टवाळ कार्टा's picture

16 Jan 2015 - 12:15 pm | टवाळ कार्टा

तुमच्या प्रतिसादाने माझ्या भावना दुखावल्या आहेत
पुढची भारतवारी कधी करणार ते कळवावे मग मी गोळ्यांचा बंदोबस्त करतो ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jan 2015 - 12:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

ते येण्याअगोदर त्यांना लिमलेटच्या गोळ्या आवडतात की चॉकलेट इक्लेर्स हे नीट विचारून ठेवा... नायतर तुमच्या गोळ्या फुकट जातील. +D

टवाळ कार्टा's picture

16 Jan 2015 - 12:45 pm | टवाळ कार्टा

जेम्सच्या :)

हाडक्या's picture

22 Jan 2015 - 4:06 pm | हाडक्या

हा जेम्स कोण आणि त्याच्या गोळ्या त्यालाच मागा की मग.. ;)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

17 Jan 2015 - 2:36 am | निनाद मुक्काम प...

नक्की करा
येथे बाळासाहेब वारले तेव्हा एका मुलीने चेपू वर एक पोस्ट टाकले तेव्हा तिच्या जीवाला धोका नको व नसता राडा नको म्हणून तिला पोलिसांनी अटक केली,
मुली व व्यंग चित्र ह्यांचा संबंध नाही संबंध आहे आमच्यात चालते म्हणून तुमच्यात पण तुम्ही चालवून घ्या असे वर्तन करणे
पैगंबर ह्यांचे चित्र काढणे ह्यावरून डेन्मार्क हॉलंड येथे राडे झाले होते हे माहिती असून मुद्दाहून परत परत ती गोष्ट फक्त मुस्लिम ह्यांना भडकावणे मग त्यातून दोन समाजात दुही त्यातून महत्वाचे म्हणजे सामन्य मुस्लिम कट्टरते कडे ढकलणे सुरु झाले
ह्याद्धी ९ एकेवन नंतर ब्रिटन मध्ये तेथील लोकांनी मुस्लिमांना टार्गेट केले व त्यातून वृत्तीने ब्रिटीश असलेले अनेक मुस्लिम कट्टरवादाकडे झुकले. पण तेव्हा फ्रांस मध्ये असे मोठ्या प्रमाणात झाले नव्हते , आता ते जर्मनी मध्ये सुरु झाले आहे.

श्रीगुरुजी's picture

16 Jan 2015 - 12:54 pm | श्रीगुरुजी

आपल्या धर्माशी संबंधित कोणत्याही स्वरूपातील चित्रे/व्यंगचित्रे काढू नयेत असे मुस्लिमांना वाटत असेल तर त्यांनी इतर धर्माशी संबंधित कोणाचीही कोणत्याही स्वरूपातील चित्रे/व्यंगचित्रे/बीभत्स चित्रे काढता नयेत.

जर आपल्या धर्माबद्दल इतर धर्मियांनी आदरभाव बाळगावा असे वाटत असेल तर मुस्लिमांनी इतर धर्माबद्दल आदर बाळगला पाहिजे. आपल्या धर्मात मूर्तीपूजेला विरोध आहे म्हणून इतर कोणत्याच धर्मातल्या लोकांनी मूर्तीपूजा करायची नाही व जिथे संधी मिळेल तिथे आम्ही मूर्ती, देवळे वगैरे तोडून टाकणार असे वर्तन केले तर इतर धर्मीय सुद्धा संधी मिळताच तसाच प्रतिसाद देतील.

सौदी अरेबिया, मालदीव इ. देशातले मुस्लिम इतर कोणत्याही देशात गेले तरी तिथल्या स्थानिक मशिदीत जाऊन नमाज, ईद वगैरे करतात. परंतु त्यांच्या स्वतःच्या देशात इतर कोणत्याही धर्माच्या लोकांना आपल्या धर्माचे पालन करायची बंदी आहे. हा दुटप्पीपणा किती दिवस चालणार?

आपल्याशी इतर धर्मियांनी जसे वागावे अशी मुस्लिमांची इच्छा असेल तसेच वर्तन त्यांनी इतर धर्मियांशी केले पाहिजे. अन्यथा इतर धर्मीय संधी मिळताच यांच्याविरूद्ध वागतील.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

17 Jan 2015 - 2:41 am | निनाद मुक्काम प...

माझ्या बायकोने हा प्रश्न आबू धाबी मध्ये एका शेखला विचारला
आमच्या देशात तुम्ही तुमचे धार्मिक स्वातंत्र्य मागतात तुमच्या देशात का देत नाही
ह्यावर त्याचे उत्तर होते तुमच्या देशातील लोकशाही आम्हाला आमच्या मागण्या मागायच्या हक्क देते तो आम्ही का सोडू
आमच्या देशात लोकशाही नाही शरियत कायदा आहे तेव्हा बंधने घालणे हा आमचा हक्क आहे
लोकशाही व सेक्युलर असल्याचे दुष्परिणाम भारताने हिंदू समजणे भोगले आहेत आता वेस्टन वल्ड भोगत आहे
पेरिस मध्ये बुरखा बंदी केली तशी भारतात मोदी मनात असून आणू शकत नाही तुमची आणि माझी इच्छा असली तरी

चला निदान एक मुद्दा तरी मान्य आहे तुम्हाला.
मग आता मी विचारते, १० वर्षापुर्वी ऑस्ट्रीलियात सिडनी येथील एका बीचजवळ या लोकांची वस्ती वाढली. मग त्यांनी हळुहळु त्या बीचवर येणार्‍अ‍ॅया ऑस्सीजना हटकायला सुरवात केली.येथे स्त्रीयांनी पूर्ण कपडे घालुन फिरल पाहिजे, या बिचवर तुमच वर्तन इस्लाम विरोधी नसल पाहिजे. आमच्या धार्मिक भावना दुखावताहेत वगैरे वगैरे. या बातमिचे मेसेजेस सगळीकडे फिरले आणि हजारोने ऑस्सीज एका दिवशी तेथे जमले. अर्थात तरुण पोरं. राडा झाला. कोण जबाबदार? तुमच्या देशात तुम्हाला खायला प्यायला नाही, सुरक्षा नाही म्हणुन तुम्ही बोटी भरुन भरुन येथे निर्वासित म्हणुन येता. य्थले सरकार तुम्हाला इंग्लीश शिकवण्यापासून घरादारातल्या सगळ्या गोष्ती देउन तुमच पुनर्वसन करते आणि मग तुम्ही तुमचा धर्म काढता..काय म्हणायच?
अगदी हीच परिस्थीती एका डोक्युमेंट्रीत मी इंग्लंड जवळच्या गावात पाहिली. हे लोक तेथे रहायला गेले. यांची जनसंख्या वाढली. आणि आज अशी परिस्थीती आहे की इंग्लीश बायकांना "यु आर अलमोस्ट नेकेड, मला तुझी लाज वाटते" अस सुनावल जाऊ लागलं. प्रसंगी बळाचा वापर सुरु झाला. जी मुलगी ही डॉक्युमेंटरी तयार करत होती, ती स्व्तः या गावात जन्मलेली. तू येथे आलीसच कशी असा प्रश्न तीला विचारला गेला. येथे यायच असेल तर माझ्या धर्माचा आदर राख अस सुनावलं गेलं. काय म्हणन आहे तुमच यावर?
आणि आता या सगळ्यावर कडी म्हणजे कालची सौदी मधुन आलेली भारतिय आणि पाकिस्तानी मुस्लिमांना "स्वतःला उगा अरब समजू नका" अशी खडसावणी!! ब्राव्हो!!

संदीप डांगे's picture

17 Jan 2015 - 9:58 am | संदीप डांगे

चला, आत्ता या क्षणी मी तुमची बाजू, तुमचे मत शंभर टक्के मान्य करतो.
चर्चा या वळणावर आली आहे कि मुस्लिमधर्मीय शांतीप्रिय नाहीत हे सिद्ध होत आहे.
पुढे काय?
नक्की काय करायचं या लोकांचं? रवांडा जिनोसाईड किंवा गेलाबाजार गुजरात? काय करून प्रश्न सुटेल नेमका?

प्रश्न जर एवढा गंभीर आहे तर नुसत्या त्यांच्या खोड्या काढून किंवा बोटचेपं समाजप्रबोधन करून काही सकारात्मक आणि परिणामकारक होणार तर नाहीच. उलट ते लोक अजून वाईट पद्धतीने एकवटत जातील. एक सामान्य नागरिक किंवा काहीही, एक मुस्लिमेतर माणूस म्हणून मी काय करावे?

माझे काही हिंदू मित्र आहेत जहालमतवादी पक्षातले. मुसलमान म्हटले कि त्यांची तळपायाची आग मस्तकात जाते. मुस्लिमांबद्दल बोलताना तावातावाने, खाऊ का गिळू असे करून बोलतात, त्यांच्याशी भविष्यात कधीतरी लढावे लागेल म्हणून कुठेतरी जाउन लाठ्याकाठ्या दांडपट्टा खेळतात. मी त्यांना म्हणतो कि बाबानो एवढाच तुमचा राग आहे तर का नाही अवघा हिंदुस्थान म्लेञ्छमुक्त केलात आता पर्यंत? कशाची वाट बघताय? कुणाला घाबरताय? हि आपलीच मातृभूमी आहे मग कशाने तुम्हाला रोखून धरले आहे?

त्यांच्याकडे याची उत्तरे नसतात. किंवा जी असतात ती फार शेपूटघाल्या वृत्तीची असतात. मग ते इकडे तिकडे बोट दाखवायला सुरुवात करतात. सेकुलर-सुडो सेकुलारांना फाट्यावर मारण्याची भाषा करणारांकडे याचे काय उत्तर आहे? जरा कुणी मुस्लिमांबद्दल काही चांगले बोलत आहे असे कळले रे कळले कि हे लगेच त्यांना थेट पाकिस्तानात निघून जा वैगेरे सांगतात. प्रत्यक्षात एकाही मुस्लीमास तोंड वर करून बोलायची हिम्मत नसते. गुजरात मध्ये जे झाले ते देशात इतरत्र का नाही झाले?

हिंदुस्थान इस्लाममुक्त करण्यासाठी तथाकथित हिंदुत्ववादी लोकांनी तोंडातून गरम गरम हवा दवडण्याखेरीज काय केले? कोण कुठल्या बांगलादेशी मुस्लिमांसाठी मुंबईत गोंधळ घातला, आपण माजघरात बसून तावातावाने बोलाण्याखेरीज खरेच तोडीस तोड असे काय केले?

मेणबत्ती मोर्चे आणि चर्चाविनिमय यांतून खरेच काही साध्य होत नाही. पाकिस्तानात मारलेल्या मुलांसाठी आपल्या देशातली मुले मेणबत्त्या घेऊन मौनात बसवल्या गेली. एवढा मूर्खपणा मी आयुष्यात कधी पहिला नाही. माझ्या देशातल्या मुलांना कणखर आणि निडर बनवण्याएवजी त्यांना असे नेभळट आणि लाचार का बनवले जात आहे? ६-१६ वर्ष वयोगटातल्या संस्कारक्षम मनांवर आपण भयाचे आणि अगतिकतेचे संस्कार करत आहोत. लोक बंदुका घेऊन येणार, आपल्याला मारणार, आपण मरून जाणार, मग मेणबत्त्या घेऊन बसायचे असते. मरण ही संकल्पनाही नीट माहित नसलेल्या कोवळ्या मनांमध्ये हे भीतीचे रोप का पेरावे?

दहशतवादाला चेहरा नसतो पण धर्म आहे. मग त्या धर्माशी नेमके कसे वागायचे हे ठरलेच पाहिजे.

श्रीगुरुजी's picture

17 Jan 2015 - 1:54 pm | श्रीगुरुजी

>>> नक्की काय करायचं या लोकांचं? रवांडा जिनोसाईड किंवा गेलाबाजार गुजरात? काय करून प्रश्न सुटेल नेमका?

या लोकांच्या कालबाह्य व बेकायदेशीर रूढींना विरोध करायचा (उदा. ३ वेळा तलाक म्हणून दिलेला घटस्फोट, एकापेक्षा जास्त लग्ने, महिलांची सुंता इ.) व त्यांचे फाजील लाड बंद करायचे. बहुतेक अमुस्लिम देशात हे असले फाजील लाड केले जात नाहीत. मुस्लिमांना तिथल्या कायद्यानुसारच वागावे लागते. आमचा शरियतचा वेगळा कायदा असले चाळे तिथे खपवून घेतले जात नाहीत. दुर्दैवाने भारतात निधर्मांध यांच्या असल्या कृत्यांना पाठिंबा देतात आणि तुमच्यासारखे देखील त्यांच्या दहशतीचे समर्थन करतात.

>>> प्रश्न जर एवढा गंभीर आहे तर नुसत्या त्यांच्या खोड्या काढून किंवा बोटचेपं समाजप्रबोधन करून काही सकारात्मक आणि परिणामकारक होणार तर नाहीच. उलट ते लोक अजून वाईट पद्धतीने एकवटत जातील. एक सामान्य नागरिक किंवा काहीही, एक मुस्लिमेतर माणूस म्हणून मी काय करावे?

धर्मातील वाईट चालीरीतींना विरोध करणे म्हणजे खोड्या काढणे नव्हे.

>>> माझे काही हिंदू मित्र आहेत जहालमतवादी पक्षातले. मुसलमान म्हटले कि त्यांची तळपायाची आग मस्तकात जाते. मुस्लिमांबद्दल बोलताना तावातावाने, खाऊ का गिळू असे करून बोलतात, त्यांच्याशी भविष्यात कधीतरी लढावे लागेल म्हणून कुठेतरी जाउन लाठ्याकाठ्या दांडपट्टा खेळतात. मी त्यांना म्हणतो कि बाबानो एवढाच तुमचा राग आहे तर का नाही अवघा हिंदुस्थान म्लेञ्छमुक्त केलात आता पर्यंत? कशाची वाट बघताय? कुणाला घाबरताय? हि आपलीच मातृभूमी आहे मग कशाने तुम्हाला रोखून धरले आहे?

हाच तो निधर्मांधांचा प्रोपागंडा. आजवर निधर्मांध हाच प्रोपागंडा करून मिरवत आले आहेत.

>>> त्यांच्याकडे याची उत्तरे नसतात. किंवा जी असतात ती फार शेपूटघाल्या वृत्तीची असतात. मग ते इकडे तिकडे बोट दाखवायला सुरुवात करतात. सेकुलर-सुडो सेकुलारांना फाट्यावर मारण्याची भाषा करणारांकडे याचे काय उत्तर आहे? जरा कुणी मुस्लिमांबद्दल काही चांगले बोलत आहे असे कळले रे कळले कि हे लगेच त्यांना थेट पाकिस्तानात निघून जा वैगेरे सांगतात. प्रत्यक्षात एकाही मुस्लीमास तोंड वर करून बोलायची हिम्मत नसते.

पुन्हा एकदा प्रोपागंडा

>>> गुजरात मध्ये जे झाले ते देशात इतरत्र का नाही झाले?

ट्रेनचा डबा फक्त गुजरातमध्येच जाळला गेला. इतरत्र नाही. नाही तर तिथेही नागरिकांचा असाच प्रक्षोभ झाला असता.

>>> हिंदुस्थान इस्लाममुक्त करण्यासाठी तथाकथित हिंदुत्ववादी लोकांनी तोंडातून गरम गरम हवा दवडण्याखेरीज काय केले? कोण कुठल्या बांगलादेशी मुस्लिमांसाठी मुंबईत गोंधळ घातला, आपण माजघरात बसून तावातावाने बोलाण्याखेरीज खरेच तोडीस तोड असे काय केले?

त्यांनी काय करायला हवे?

>>> मेणबत्ती मोर्चे आणि चर्चाविनिमय यांतून खरेच काही साध्य होत नाही. पाकिस्तानात मारलेल्या मुलांसाठी आपल्या देशातली मुले मेणबत्त्या घेऊन मौनात बसवल्या गेली. एवढा मूर्खपणा मी आयुष्यात कधी पहिला नाही.

त्यात काय मूर्खपणा आहे? मुले ही मुलेच असतात. ती कोणत्याही देशातील असली तरी ती मुलेच असतात. दुर्दैवाने तुम्हाला इस्लामी अतिरेक्यांनी केलेल्या हत्या योग्य वाटतात आणि तुमच्या आणि इस्लामी अतिरेक्यांच्या दृष्टीने धर्म हा निष्पापांच्या जीवापेक्षा जास्त मोठा आहे. त्यामुळे तुम्हाला ही भावना कळणार नाही.

>>> माझ्या देशातल्या मुलांना कणखर आणि निडर बनवण्याएवजी त्यांना असे नेभळट आणि लाचार का बनवले जात आहे? ६-१६ वर्ष वयोगटातल्या संस्कारक्षम मनांवर आपण भयाचे आणि अगतिकतेचे संस्कार करत आहोत. लोक बंदुका घेऊन येणार, आपल्याला मारणार, आपण मरून जाणार, मग मेणबत्त्या घेऊन बसायचे असते. मरण ही संकल्पनाही नीट माहित नसलेल्या कोवळ्या मनांमध्ये हे भीतीचे रोप का पेरावे?

अत्यंत हास्यास्पद वाक्ये!

>>> दहशतवादाला चेहरा नसतो पण धर्म आहे. मग त्या धर्माशी नेमके कसे वागायचे हे ठरलेच पाहिजे.

तुम्हाला या धर्माचे व त्यांच्या दहशतवादाचे कौतुक आहे. तुम्ही जसे वागता तसे इतर वागतीलच असे नाही.

संदीप डांगे's picture

18 Jan 2015 - 6:32 pm | संदीप डांगे

>>> गुजरात मध्ये जे झाले ते देशात इतरत्र का नाही झाले?

ट्रेनचा डबा फक्त गुजरातमध्येच जाळला गेला. इतरत्र नाही. नाही तर तिथेही नागरिकांचा असाच प्रक्षोभ झाला असता.

आता तुमच्या प्रतिक्रियेवरून असे दिसतंय कि गुजरात दंगलीला तुमचे समर्थन आहे. गुजरात दंगलींमध्ये जे काय झाले त्याबद्दल तुमचे काय मत आहे? ट्रेनचा डबा तर गोध्रात जाळला मग सगळ्या गुजरात मध्ये निष्पाप मुसलमानांचे शिरकाण का झाले?

नागरिकांचा प्रक्षोभ… ओ के. चांगली पळवाट आहे

म्हणजे नागरिकांचा प्रक्षोभ हा न्यायसंमत आहे असे मानायचे काय? बाबू बजरंगी यांचे कृत्य कोठल्या प्रेरणेतून झाले असावे? आता बाबू बजरंगी स्वत:च सांगत आहेत म्हणून बरे नाहीतर असे काही झालेच नाही असे तुम्ही म्हणाल.

श्रीगुरुजी's picture

19 Jan 2015 - 3:01 pm | श्रीगुरुजी

>>> आता तुमच्या प्रतिक्रियेवरून असे दिसतंय कि गुजरात दंगलीला तुमचे समर्थन आहे. गुजरात दंगलींमध्ये जे काय झाले त्याबद्दल तुमचे काय मत आहे? ट्रेनचा डबा तर गोध्रात जाळला मग सगळ्या गुजरात मध्ये निष्पाप मुसलमानांचे शिरकाण का झाले?

गुजरातमध्ये जे झाले ते इतरत्र का नाही झाले या तुमच्या प्रश्नावर मी कारणमीमांसा दिलेली होती. त्यावरून लगेच गुजरात दंगलीला माझे समर्थन आहे हा स्वतःला सोयिस्कर निष्कर्ष काढून मोकळे पण झालात!

>>> ट्रेनचा डबा तर गोध्रात जाळला मग सगळ्या गुजरात मध्ये निष्पाप मुसलमानांचे शिरकाण का झाले?

तुमचा इतर सर्व गोष्टींप्रमाणे इतिहासाचा अभ्यास सुद्धा खूप कच्चा आहे. गुजरात दंगलीत जे गेले त्यात अनेक हिंदू सुद्धा होते. गुजरात दंगलीत दोन प्रकारे माणसे गेली. काही जण जमावाच्या दंग्यात मारले गेले तर काही जण दंगा करणार्‍या जमावाला थोपविण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलिस व लष्कराच्या गोळीबारात मारले गेले. दोन्ही प्रकारे मारले गेलेल्यांमध्ये जसे मुस्लिम होते तसेच हिंदू सुद्धा मोठ्या प्रमाणात होते. हिंदू-मुस्लीम दंगली भारतात गेली अनेक शतके सुरू आहेत. १९९२-९३ च्या मुंबईतील दंगलीतील मृतांची संख्या २००२ मधील गुजरातमधील मृतांच्या संख्येपेक्षा कितीतरी जास्त होती.
त्यामुळे "निष्पाप मुस्लिमांचे शिरकाण का झाले" असा चुकीचा प्रश्न विचारण्याऐवजी निष्पाप नागरिकांचे शिरकाण का झाले असा प्रश्न विचारणे जास्त योग्य होईल.

आणि मुख्य म्हणजे रेल्वेच्या डब्यातील ६० निष्पाप महिला व मुले यांना का जिवंत जाळण्यात आले हा प्रश्नच तुम्हाला पडलेला दिसत नाही.

>>> नागरिकांचा प्रक्षोभ… ओ के. चांगली पळवाट आहे

तुम्ही नाही का पॅरिसमधील निष्पाप नागरिकांच्या हत्येचे समर्थन करण्यासाठी व्यंगचित्राची पळवाट शोधली. आठवतंय ना? बादवे, व्यंगचित्र काढण्याच्या तुलनेत रेल्वेच्या डब्यातील ६० निष्पाप महिला व मुले जिवंत जाळण्याचे कृत्य खूपच जास्त भयंकर आहे ना?

>>> म्हणजे नागरिकांचा प्रक्षोभ हा न्यायसंमत आहे असे मानायचे काय?

असं कोण म्हणालं? म्हणजे तुम्हाला पॅरिसमधील अतिरेक्यांचा हल्ला हा न्यायसंमत वाटतोय, पण गुजरातमधील नागरिकांचा प्रक्षोभ मात्र बेकायदेशीर वाटतोय.

>>> बाबू बजरंगी यांचे कृत्य कोठल्या प्रेरणेतून झाले असावे?

पेशावरमध्ये १३२ मुलांना मारण्याची जी प्रेरणा तीच ही प्रेरणा, पॅरिसमध्ये १७ निष्पाप नागरिकांना मारून टाकण्यामागे जी प्रेरणा होती तीच ही प्रेरणा आणि पेशावर, पॅरिस इ. ठिकाणच्या हत्याकांडाचे समर्थन करण्याची जी प्रेरणा होती ती ही प्रेरणा.

टवाळ कार्टा's picture

19 Jan 2015 - 3:08 pm | टवाळ कार्टा

रेल्वेच्या डब्यातील ६० निष्पाप महिला व मुले यांना का जिवंत जाळण्यात आले

याचे कारण तर मी अजूनपर्यंत मिपावर वाचलेले नाहीये

अर्धवटराव's picture

19 Jan 2015 - 1:01 am | अर्धवटराव

अच्छा... म्हणजे फ्रेंच हत्याकंडाच्या समर्थनाचं मूळ इथे आहे तर... तरिच...

संदीप डांगे's picture

19 Jan 2015 - 1:54 am | संदीप डांगे

"तरीच…" म्हणजे काय?

गुजरात दंगल ही एक विशिष्ट घटनेची प्रतिक्रिया होती. शारली हेब्दो सुद्धा कुठल्यातरी घटनेची प्रतिक्रिया आहे. मी या दोन्ही घटना चांगल्या किंवा वाईट म्हणत नाही.

माझ्यासाठी यात एकच गोष्ट सत्य आणि समान आहे ती म्हणजे एका कट्टरतेला दुसऱ्या कट्टरतेने उत्तर दिले. बाकी आदर्शांच्या आणि सुसंस्कृतपणाच्या गप्पा फक्त गप्पा असतात. वेळ आणि परिस्थितीप्रमाणे साळसूद नराधम होतात आणि नराधम साळसूदपणाचा आव आणतात.

२००७ पासून मी ह्या पैगंबर चित्रप्रकरणाबद्दल वाचत आहे. हा हल्ला कधी ना कधी होणारच होता आणि हे त्या संपादकासह सगळ्यांनाच माहिती होते. इस्लामीच नाही तर इतरही कट्टर धर्मीय त्यांच्या जीवावर उठले होते. यात पेन्सिल विरुद्ध बंदूक असा संघर्ष दिसत असला तरी तो कट्टर विरुद्ध कट्टर असाच आहे. अश्या लढाईत कुणीच जिंकत नाही. हेच सत्य आहे आणि ती स्वीकारून प्राप्त परिस्थितीवर निश्चित आचरता येणारी आणि परिणाम देणारी कृती अपेक्षित असते. म्हणून भरमसाठ संख्येने वाढून सुसंस्कृत समाजाला शांततेत जगायला अडचण करणाऱ्या ह्या मुस्लिम धर्माचा गुजरात करणे हाच एक योग्य मार्ग आहे का असे विचारले इथे. तुम्ही भलताच अर्थ काढला. अजून काही ठोस परिणामकारक मार्ग असेल तर सांगा.

अर्धवटराव's picture

19 Jan 2015 - 2:47 am | अर्धवटराव

म्हणून भरमसाठ संख्येने वाढून सुसंस्कृत समाजाला शांततेत जगायला अडचण करणाऱ्या ह्या मुस्लिम धर्माचा गुजरात करणे हाच एक योग्य मार्ग आहे का असे विचारले इथे

म्हणजे 'गुजरात करणे' हा एक 'उपाय' आहे इथपर्यंत तुमचे विचार प्रगल्भ आहेत तर. व्हेरी गुड. देन आय एम नॉट सर्प्राइझ्ड मि. संदीप. तुम्ही ऑलरेडी ठोस आणि परिणामकारक मार्गावरुन चालत आहात. त्याची फळं तुम्ही आरामात सहन करु शकाल, किंबहुना एंजोय कराल याबद्दलही काहिच शंका नाहि.

संदीप डांगे's picture

19 Jan 2015 - 5:01 am | संदीप डांगे

आतापर्यंत झालेल्या चर्चेतून फक्त एवढेच कळले कि काहीजणांनी मला मुस्लिमांचा कसा पुळका आलाय, मी कसा सुडोसेकुलरवादी आहे असा ठाम निर्णय आपल्यावतीने घेऊन टाकला आहे. त्यामुळे त्यांना आपण कसे कायदेप्रिय, न्यायप्रिय, सुसंस्कृत नागरिक आहोत ह्याचा दंभ मिरवता आला असेल. असो. कुणाला कशात आनंद वाटेल सांगता येत नाही.

"भरमसाठ संख्येने वाढून सुसंस्कृत समाजाला शांततेत जगायला अडचण करतात" हा माझा नाही तर माझ्या मताच्या विरोधात मत मांडणाऱ्याचा दावा आहे. त्याच वेळेस "प्रत्येक मुस्लिम दहशतवादी नाही" हा पण त्यांचा दावा आहे. एकाच बाजूने केल्या जाणाऱ्या परस्परविरोधी विधानांमुळे गोंधळलो आहे त्यामुळेच मी आता नेमके कसे वागायचे हे विचारलं आहे.

२ पर्याय समोर आले आहेत.
एक म्हणजे श्रीगुरुजींनी दिलेला सल्ला कि त्यांच्या कालबाह्य व चुकीच्या चालीरीतींना विरोध करा. आता घटनेने त्यांना त्यांच्या चालीरीती व मला माझ्या चालीरीती पाळायची मुभा दिली आहे, त्यामुळे त्यांच्या चालीरीतींचा किंवा कालबाह्य रुढींचा (उदा. ३ वेळा तलाक म्हणून दिलेला घटस्फोट, एकापेक्षा जास्त लग्ने, महिलांची सुंता, कोण कशी आंघोळ करतो, गाय खातो कि बैल खातो, वैगेरे वैगेरे) मला काही त्रास होत नाही तर मी का विरोध करायचा? तो त्यांच्या धार्मिक सुधारणेचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यांचे सुधारक बघतील काय करायचे ते. आमच्यातल्या सुधारणा करायला आम्ही काही आउटसोर्सिंग नव्हते केले.

दुसरा उपाय म्हणजे नागरिकांचा प्रक्षोभ वैगेरे: त्यांच्याविरोधात मिळेल तेवढा राग, द्वेष गोळा करत जायचे. एखादी गोधरासारखी घटना घडली कि सगळा संताप मोकळा करून त्याचे गुजरात करायचे.

माझ्यामते दोन्हीही पर्याय पूर्ण चुकीचे आहेत. तुमच्याकडे काही पर्याय असेल तर द्या. उगाच माझ्यावर कसला ठप्पा मारायचा प्रयत्न करू नका.

अर्धवटराव's picture

19 Jan 2015 - 8:24 am | अर्धवटराव

काहीजणांनी मला मुस्लिमांचा कसा पुळका आलाय,

उगाच माझ्यावर कसला ठप्पा मारायचा प्रयत्न करू नका

संस्थळावर काहि आठवड्यांची सदस्यसता असणार्‍या व वैयक्तीक रित्या कुणि ओळखण्याची शक्यता कमि असणार्‍या एका आयडीला इथे कुणि काहि मुद्दाम लेबलं लावायचा प्रयत्न करतोय असं वाटणं हे प्रचंड हास्यास्पद आहे. असो. तुमच्या या गैरसमजाला उगाळण्यात काहि पॉइण्ट नाहि.

२ पर्याय समोर आले आहेत.

कुणिही काहिही पर्याय वगैरे दिलेले नाहित. तुम्ही स्वतःला कलाकार म्हणवता. व त्या चश्म्यातुन मानवी हत्याकांडाबद्द्लचे आपले उदात्त विचार तुम्ही प्रकट केलेत. इतरांनी त्यावर आपली प्रतिक्रीया दिली फक्त. शिवाय ज्यापद्धतीने तुम्हाला गुजरात पॅटर्न वगैरे दिसतात त्यावरुन तुम्हाला उपाय वगैरेशी काहिही घेणं देणं दिसत नाहि. उपाय तुमच्या डोक्यात ठाम आहेत व त्याचे परिणाम तुम्ही नक्की एंजोय करु शकाल याची मला खात्री आहे.

श्रीगुरुजी's picture

19 Jan 2015 - 3:10 pm | श्रीगुरुजी

>>> त्यामुळे त्यांच्या चालीरीतींचा किंवा कालबाह्य रुढींचा (उदा. ३ वेळा तलाक म्हणून दिलेला घटस्फोट, एकापेक्षा जास्त लग्ने, महिलांची सुंता, कोण कशी आंघोळ करतो, गाय खातो कि बैल खातो, वैगेरे वैगेरे) मला काही त्रास होत नाही तर मी का विरोध करायचा?

वा! काय तर्कशास्त्र आहे. धन्य आहे. पलिकडच्या घरातील कोणी स्त्री सती गेली तर मला काहीच त्रास नसतो. मग कशाला सतीबंदीचा कायदा आला?

बादवे, चार्ली हेब्दोने काढलेल्या व्यंगचित्राचा तसा तुम्हाला व्यक्तिशः काहीच त्रास नव्हता. पण मग त्यांच्याविरूद्ध एवढी आदळआपट कशासाठी केलीत?

संदीप डांगे's picture

19 Jan 2015 - 5:15 pm | संदीप डांगे

वा! काय तर्कशास्त्र आहे. धन्य आहे. पलिकडच्या घरातील कोणी स्त्री सती गेली तर मला काहीच त्रास नसतो. मग कशाला सतीबंदीचा कायदा आला?

तुमचे पण तर्कशास्त्र बरेच चांगले आहेकी. मी जर हिंदू आहे आणि हिंदूंमध्ये सतीची प्रथा आहे तर ती माझ्या घरातही लागू होतेच की. त्याचा विरोध तर हिंदू धर्माचा एक सुधारणावादी म्हणून करणारच. दुसऱ्यांच्या धर्मात आपण का लुडबुड करावी? ओवेसी किंवा झाकीर नाईक सारखी टुकार लोकं हिंदू धर्मातल्या चालीरीतींबद्दल वाईट बोलतात तेंव्हा आपण हेच म्हणतो ना कि तू तुझ्या धर्मातले बघ आधी, आमच्या धर्माचं आम्ही बघू.

बादवे, चार्ली हेब्दोने काढलेल्या व्यंगचित्राचा तसा तुम्हाला व्यक्तिशः काहीच त्रास नव्हता. पण मग त्यांच्याविरूद्ध एवढी आदळआपट कशासाठी केलीत?

दोन वेगवेगळ्या घटनांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो इतकेच म्हणायचे होते. "कसे आहे" ह्यापेक्षा "कसे असले पाहिजे" ह्यावरच समाजाचा काथ्याकुट चालू आहे. कसे आहे ह्यावर पुर्वग्रहरहित दृष्टीकोनातून चर्चा केल्यावरच काय केले पाहिजे ह्याचे उत्तर मला हवे होते. मला काय म्हणायचे ते लेखात स्पष्ट केले आहे. सगळे जग जर मुस्लिमांना एकजात Not eligible to live in Humans ठरवत असेल तर त्यांच्याबाबतीत माझी भूमिका काय असावी. माझीच मते ठाम असती तर इथे लेख टाकायच्या फंदात पडलो नसतो. मी हल्ल्याचे समर्थन केले, जगात अनेक विचारवंत, पत्रकार तेच म्हणत आहेत फक्त ते हल्ल्याचे समर्थन करत नाहीत. पोपट मेला आहे हे कोण सांगणार?

बायदवे, शर्ली च्या एका जुन्या सदस्याने ह्या हत्याकांडाचे समर्थन केले व हे एका दुसऱ्या नियतकालिकाने छापले. तर शर्ली च्या वकिलाने त्यावर प्रतिक्रिया देत म्हटले कि त्यांचे जरी बरोबर असले तर सद्यपरिस्थितीचे भान ठेवून त्यांनी असे छापायला नको होते.

हाच तो दुटप्पीपणा. स्वत:चे अभिव्यक्ती स्वातंत्र्य तर बिनघोर हवे, दुसऱ्यांनी मात्र विचार करून बोलावे.

त्याला तुम्ही आदळआपट म्हणताय तर तोही तुमच्या एका दृष्टिकोनाचाच भाग आहे.

श्रीगुरुजी's picture

19 Jan 2015 - 7:12 pm | श्रीगुरुजी

>>> तुमचे पण तर्कशास्त्र बरेच चांगले आहेकी. मी जर हिंदू आहे आणि हिंदूंमध्ये सतीची प्रथा आहे तर ती माझ्या घरातही लागू होतेच की. त्याचा विरोध तर हिंदू धर्माचा एक सुधारणावादी म्हणून करणारच. दुसऱ्यांच्या धर्मात आपण का लुडबुड करावी? ओवेसी किंवा झाकीर नाईक सारखी टुकार लोकं हिंदू धर्मातल्या चालीरीतींबद्दल वाईट बोलतात तेंव्हा आपण हेच म्हणतो ना कि तू तुझ्या धर्मातले बघ आधी, आमच्या धर्माचं आम्ही बघू.

सतीची चाल हिंदू धर्मात सक्तीची नव्हती हो. फारच थोड्या भागातील थोड्या कुटुंबात सती गेल्याची उदाहरणे आहेत. तरीसुद्धा समाजसुधारकांनी स्वतःच्या घरात ही चाल नसताना आणि स्वतःला याचा त्रास होत नसताना यावर बंदी आणलीच कारण ही चाल समाजविघातक होती. दुसर्‍याच्या धर्मात आपण का लुडबूड करावी ही मानसिकता अत्यंत घातक आहे. दुसर्‍या धर्मात याऐवजी हळूहळू दुसर्‍या गावात, नंतर दुसर्‍या गल्लीत, नंतर दुसर्‍या घरात अशी कक्षा अरूंद होऊ शकते. दुसर्‍या धर्मात घातक गोष्टींची परंपरा असेल तर त्याला विरोध करायलाच हवा. दुर्दैवाने अल्पसंख्याक या गोंडस नावाखाली मुस्लिमांच्या वाईट चालीरीतींकडे दुर्लक्ष करून या चालीरीतींना कायदेशीर पाठबळ देण्याचे काम काँग्रेसने केले व निधर्मांधांनी तीच तळी उचलली.

>>> दोन वेगवेगळ्या घटनांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो इतकेच म्हणायचे होते. "कसे आहे" ह्यापेक्षा "कसे असले पाहिजे" ह्यावरच समाजाचा काथ्याकुट चालू आहे. कसे आहे ह्यावर पुर्वग्रहरहित दृष्टीकोनातून चर्चा केल्यावरच काय केले पाहिजे ह्याचे उत्तर मला हवे होते. मला काय म्हणायचे ते लेखात स्पष्ट केले आहे. सगळे जग जर मुस्लिमांना एकजात Not eligible to live in Humans ठरवत असेल तर त्यांच्याबाबतीत माझी भूमिका काय असावी. माझीच मते ठाम असती तर इथे लेख टाकायच्या फंदात पडलो नसतो. मी हल्ल्याचे समर्थन केले, जगात अनेक विचारवंत, पत्रकार तेच म्हणत आहेत फक्त ते हल्ल्याचे समर्थन करत नाहीत. पोपट मेला आहे हे कोण सांगणार?

आता तुम्ही विचारवंत झालात तर. अभिनंदन! तसंही भारतात हिंदूविरोधी व मुस्लिमांच्या बाजूने बोलणार्‍याला विचारवंत समजले जातेच. वेलकम टू विचारवंत क्लब!

>>> बायदवे, शर्ली च्या एका जुन्या सदस्याने ह्या हत्याकांडाचे समर्थन केले व हे एका दुसऱ्या नियतकालिकाने छापले. तर शर्ली च्या वकिलाने त्यावर प्रतिक्रिया देत म्हटले कि त्यांचे जरी बरोबर असले तर सद्यपरिस्थितीचे भान ठेवून त्यांनी असे छापायला नको होते.

बरं मग?

>>> त्याला तुम्ही आदळआपट म्हणताय तर तोही तुमच्या एका दृष्टिकोनाचाच भाग आहे.

तुमचा पण तोच दृष्टीकोन आहे, पण जास्त तीव्र स्वरूपात आहे.

संदीप डांगे's picture

19 Jan 2015 - 8:39 pm | संदीप डांगे

हाच तो दुटप्पीपणा. स्वत:चे अभिव्यक्ती स्वातंत्र्य तर बिनघोर हवे, दुसऱ्यांनी मात्र विचार करून बोलावे.

हे वाक्य कुठे गेले?

तुमचे हे कसलेल्या पत्रकारांसारखे सोयीस्कर शब्द काढणे-घालणे, वाक्य उडवणे, त्यावर असंबद्ध प्रतिक्रिया देणे, बिनामुद्द्यांची चर्चा करणे, नुसते लाजवाब. गुरुजी, मानलं बा तुमच्या चिकाटीला. लगे रहो. निखिलराव वागळ्यांच्या तोडीस तोड आहात

संदीप डांगे's picture

19 Jan 2015 - 8:46 pm | संदीप डांगे

आता तुम्ही विचारवंत झालात तर. अभिनंदन! तसंही भारतात हिंदूविरोधी व मुस्लिमांच्या बाजूने बोलणार्‍याला विचारवंत समजले जातेच. वेलकम टू विचारवंत क्लब!

मी हिंदुविरोधी आणि मुस्लिमप्रेमी आहे या श्रीगुरुजींनी लावलेल्या अप्रतिम शोधाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक घोषित करण्यात येत आहे. :-)

श्रीगुरुजी's picture

19 Jan 2015 - 3:06 pm | श्रीगुरुजी

>>> गुजरात दंगल ही एक विशिष्ट घटनेची प्रतिक्रिया होती. शारली हेब्दो सुद्धा कुठल्यातरी घटनेची प्रतिक्रिया आहे. मी या दोन्ही घटना चांगल्या किंवा वाईट म्हणत नाही.

किती साळसूदपणा हा. तुमच्या मूळ लेखात तर पॅरिस हत्याकांडाचं जोरदार समर्थन आहे.

बादवे, गोध्रा हत्याकांड विसरलात वाटतं?

गोध्रा हत्याकांड काय, गुजरात दंगल काय, पॅरिस हत्याकांड काय, पेशावर हत्याकांड काय ... सर्व हत्याकांडे निंदनीय आहेत. तुम्ही मात्र सेलेक्टिव्हली कोणती हत्याकांडे वाईट व कोणती चांगली हे ठरवत आहात.

श्रीगुरुजी's picture

17 Jan 2015 - 2:01 pm | श्रीगुरुजी

>>> आमच्या देशात लोकशाही नाही शरियत कायदा आहे तेव्हा बंधने घालणे हा आमचा हक्क आहे

याच धर्तीवर अशी फ्रान्सची भूमिका आहे की आमच्याकडे शरियत कायदा नसून लोकशाही व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे कोणाचीही व्यंगचित्रे काढणे हा आमचा हक्क आहे.

>>> लोकशाही व सेक्युलर असल्याचे दुष्परिणाम भारताने हिंदू समजणे भोगले आहेत आता वेस्टन वल्ड भोगत आहे

भारतातील सेक्यूलॅरिझमची अंमलबजावणी व पाश्चिमात्य जगातील सेक्यूलॅरिझमची अंमलबजावणी यात जमीनअस्मानाचा फरक आहे. भारतात सेक्यूलॅरिझम म्हणजे सेक्यूलॅरिझमच्या नावाखाली मुस्लिमातल्या अत्यंत अन्यायकारक गोष्टींकडे पूर्ण दुर्लक्ष करून अन्यायकारक गोष्टींना कायदेशीर संरक्षण देणे व आम्ही इतर धर्मात हस्तक्षेप करत नाही अशी पाठ थोपटून घेणे असा होतो.

याउलट पाश्चिमात्य देशात सेक्यूलॅरिझम म्हणजे सर्वधर्मियांना सर्व समान कायदे असणे व कोणत्याही विशिष्ट धर्माला झुकते माप ने देणे असा आहे.