(लेखणीने)

सूड's picture
सूड in जे न देखे रवी...
8 Jan 2015 - 3:19 pm

काथ्याकुटास व्हावे तय्यार लेखणीने
भक्षण घटीपळांचे करण्यास लेखणीने

स्वविरोधी बोलण्याला मातीत लोळवावे
माझे खरे म्हणावे नखदार लेखणीने

मसीहा चितारण्याची अवगत कला करावी
औक्षण जणू स्वत:चे करण्यास लेखणीने

अफवादि निर्मितेला जेथे उभार तेथे
पेरुन बीज यावे रुजण्यास लेखणीने

भाकड-वृथा कथांच्या कक्षेमध्ये फिरावे
अभिजात सृजनाला डसण्यास लेखणीने

वाणी अरण्यरुदनि शिरजोर होई तेव्हा
संपादकांनी यावे धरण्यास लेखणीने

जेव्हा सदस्य करिति वादळ विराट तेव्हा
द्यावे अभय म्हणावे पळण्यास लेखणीने

-अंगावर उठे 'शबय शबय'

कोडाईकनालगरम पाण्याचे कुंडभूछत्रीवाङ्मयशेतीसांत्वनाविडंबन

प्रतिक्रिया

सूड!!
शब्द सामर्थ्य अप्रतिम!!

अत्रुप्त आत्मा's picture

8 Jan 2015 - 3:50 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११

@'शबय शबय' >> हे काय ते कळ्ळं नै!

सूड's picture

8 Jan 2015 - 3:59 pm | सूड

>>'शबय शबय' >>

होळीच्या काळात गोव्यात वापरला जाणारा शब्द!! ;) कॉलिंग पैकाकू ;)

पैसा's picture

8 Jan 2015 - 6:28 pm | पैसा

पण सिंधुदुर्गात सुद्धा शिमग्याची सोंगे आणतात तेव्हा 'शबय शबय' म्हणतात.

नाखु's picture

9 Jan 2015 - 8:26 am | नाखु

"इथेही सोंग आणलं जातय दांभिक कळवळ्याचं,आणि मीच सर्वज्ञ असल्याच त्यामुळे ही मात्रा पण रूग्णाला लागू पडेल असे वाटते."
बॅट्मन लिखित घरचा वैद्य आणि जालीम काढा या आगामी पुस्तकातील "दाख्वायचे दात" या प्रकरणातून साभार.
*blum3* :-P :P

पैसा's picture

9 Jan 2015 - 11:12 am | पैसा

त्यातलं एक प्रकर्ण वाचलं.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Jan 2015 - 11:46 am | अत्रुप्त आत्मा

@बॅट्मन लिखित घरचा वैद्य आणि जालीम काढा या आगामी पुस्तकातील
"दाख्वायचे दात" या प्रकरणातून साभार.>> .
नाखु काकांचं आज पासून नवं नाव- ना"खून काका .

विटेकर's picture

8 Jan 2015 - 3:27 pm | विटेकर

सुन्दरच !
जरा ओरिजनल लिवा की

टवाळ कार्टा's picture

8 Jan 2015 - 3:48 pm | टवाळ कार्टा

जरा ओरिजनल लिवा की >> =))

अवांतर - आता लिही "वशाड मेलो"

स्वतःची झायरात करत नाही, पण हा ओरिगिनल चा एक प्रयत्न!!

टवाळ कार्टा's picture

8 Jan 2015 - 3:47 pm | टवाळ कार्टा

स्कोर सेटलिंग ह्यालाच म्हणतात कि आणखी वेगळे असते ;)

सस्नेह's picture

8 Jan 2015 - 4:06 pm | सस्नेह

अभ्यास वाढवा *biggrin*

मुक्त विहारि's picture

8 Jan 2015 - 3:51 pm | मुक्त विहारि

सुडांचे शाब्दिक आसूड झेलायला मनाचा मोठेपणा लागतो...

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Jan 2015 - 4:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

सूड(भावने)ला डिवचू नका, असे म्हणतात ते यासाठीच की काय, असा विचार मनात आला ! ;)

जरा ओरिजनल लिवा की ला दणकून अनुमोदन ! लै पावर दिसतिया लेखणीत :)

मुक्त विहारि's picture

8 Jan 2015 - 5:40 pm | मुक्त विहारि

फार कमी मिपाकर, योग्य शब्दांत, योग्य भाषेत, परखड मत व्यक्त करतात.

सूड, त्यातलेच एक आहेत.

आसूड ओढतात पण आणि योग्य ती दिशा पण दाखवतात.

अद्द्या's picture

8 Jan 2015 - 5:06 pm | अद्द्या

काव्यरस:
Khuni panja

=)) =)) =))

स्वविरोधी बोलण्याला मातीत लोळवावे
माझे खरे म्हणावे नखदार लेखणीने

हे फारच वृषभ-नेत्र-भेदन आहे !!! *OK*

बहुगुणी's picture

8 Jan 2015 - 6:05 pm | बहुगुणी

अगदी, अगदी! "नखदार लेखणीने" फारच भारी! (बाकी नाद-खुळा: तुमचं ते 'वृषभ-नेत्र-भेदन'ही आवडलंच :-) )

अवांतरः
मसीहा चितारण्याची अवगत कला करावी
औक्षण जणू स्वत:चे करण्यास लेखणीने या ओळी वाचून पॅरिसमधल्या व्यंगचित्रकारांच्या हत्येची आठवण झाली.

खटपट्या's picture

9 Jan 2015 - 12:51 am | खटपट्या

खूपच जबरदस्त !!
"माझे खरे म्हणावे नखदार लेखणीने" च्या ऐवजी "माझे खरे म्हणावे नखदार लेखणीने"
असे हवे होते (लहान तोंडी मोठा घास घेतोय. क्षमस्व)

वेल्लाभट's picture

9 Jan 2015 - 11:34 am | वेल्लाभट

नाही एक मात्रा जास्त होईल

''अपुलेच दामटावे नखदार लेखणीने''
कसं वाटतं?

विशाल कुलकर्णी's picture

9 Jan 2015 - 8:55 am | विशाल कुलकर्णी

लै भारी .... :)

हे वाचून आमचीबी येक जुनी कव्ता आटवली...

म्हनलं चला आपणपण कविता पाडू
तेनी म्हनले राग 'लय' नका तोडू

नायतर शब्दांन्ला नसंल शब्दांचा पायपोस
आम्ही म्हनू याला शब्दाचा लई सोस

आशय नसेल तर कोणाचं काय जातं
सुद्धलेखन करताना मन आमचं जळतं

आम्ही इचारलं हेडर फुटर काय घालू
त्येच्या नादात ते बेणं मिटर इसरलू

त्ये दादां म्हणत्यात कुटं हाये रे यति
यति विना काव्य हीच तं आमची नियती

अशानं बघा कवितेचं माज्या बारा वाजलं
क्कुणी वाचो न वाचो आमी तर वाचलं

नवकवि ईशाल म्हमईकर

पैसा's picture

9 Jan 2015 - 11:11 am | पैसा

=))

सूड's picture

9 Jan 2015 - 11:24 am | सूड

हायला !! गंडलंय का काय लिहीलंय त्यात?? माताय, हे आमचं नवकाव्याचं अपत्य अडणार बव्हतेक!!

वेल्लाभट's picture

9 Jan 2015 - 11:31 am | वेल्लाभट

वरिजनल पेक्षा खत्तरनाक भाऊ ! क्या बात है !

करितो सूडकविता अशी ताकदीची
आय लव्ह यू म्हणावे त्या खास देखणीने

-चूड

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Jan 2015 - 10:18 am | ज्ञानोबाचे पैजार

घरी कमधेनू पूढे ताक मागे, हरी बोध सांडून विवाद लागे,
करी सार चिंतामणी काचखंडे, तया मागता देत आहे उदंडे

जय जय रघुवीर समर्थ

पैजारबुवा,

गंगाधर मुटे's picture

11 Dec 2017 - 5:01 pm | गंगाधर मुटे

जबरी कविता रे सूड भावा.
छान सूड घेतलाय. :) :)
कविता शोधत गुगलायला गेलो तर ही सूडकन्या गवसली. :D