सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
6 Nov 2008 - 8:25 pm | ब्रिटिश टिंग्या
मला निवृत्त व्हायला आवडेल!
आर्रामात पेन्शन खायची अन् तंगड्या पसरुन आराम करायचा! ;)
(निवृत्त) टिंग्या
6 Nov 2008 - 10:41 pm | veebee009
जाउ दे... मला कन्टाळा आलाय.... मी घरीच बस्तो...
6 Nov 2008 - 8:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पर्याय कोणताही निवडला तरी भरपूर पगार असल्यामुळे, मिळालेल्या वेळेत मोफत वावरायला मिळणा-या मराठी संस्थळावर कै च्या कैच काथ्याकुटाला विषय टाकीत जाईन. त्यामुळे पगारातील तफावतीचे तितके वाईट वाटणार नाही.
-दिलीप बिरुटे
6 Nov 2008 - 8:49 pm | सुनील
सरकारी नोकरी
पगार----१८०००/-
कामाची वेळ ----- ८ तास
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
6 Nov 2008 - 10:01 pm | छगनराव
मी खाजगी नोकरी करणे पसंत करीन. कारण निवड करताना माझा क्रम खालीलप्रमाणे आहे.
१. ग्रोथ (बढ्ती)
२. पगार
३. स्थैर्य .
6 Nov 2008 - 10:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
म्हणून १८ हजारापेक्षा कमी पगाराची, दिवसाचे २४ तासही काम करता येईल, तेवढा वेळ नाही, पण बराच वेळ काम करते, किंवा डोक्यात काही ना काही सुरु रहातं अशा प्रकारची सरकारी नोकरी करते.
खासगी क्षेत्रात मी करते ते काम कोणीही करत नाही.
6 Nov 2008 - 10:30 pm | धोंडोपंत
सरकारी नोकरीत आठ तास काम करायला लागते असे तुम्हाला कोणी सांगितले?
आणि सरकारी नोकरीचा नुसता पगारच लिहिलात..... वरकमाईचे काय?
आपला,
(सनदी) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com
(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
6 Nov 2008 - 11:00 pm | कशिद
सरकारी नोकरी
पगार----१८०००/-
कामाची वेळ ----- ८ तास
पंत सगल कशाला बोलता....
7 Nov 2008 - 5:49 am | आनंद घारे
" सरकारी नोकरी म्हणजे काम न करता वरची कमाई" हे समीकरण चावून चोथा झालेले आहे, कांही क्षेत्रात ते तसे असेलही. पण ज्या क्षेत्रांमध्ये (मुख्यतः तंत्रज्ञानाच्या) खासगी आणि सरकारी असे पर्याय उपलब्ध आहेत त्या ठिकाणचे दृष्य वेगळे असते. पगार आणि कामाचे तास हे कोणाला किती महत्वाचे वाटतात याचे प्रमाण वेगवेगळे असते. यापेक्षा जास्त महत्वाच्या अनेक गोष्टी जीवनात असतात. उदाहरणार्थ कामाचे स्वरूप, स्थैर्य, स्थान, निवास, वातावरण, मान, प्रतिष्ठा, वगैरे
7 Nov 2008 - 8:11 am | अनिल हटेला
काम भी कोइ करने की चीज है ?
सरकारी असो किंवा खाजगी काहीही फरक पडत नाही .....
महत्त्वाच हे आहे की किती वेळात काम पूर्ण करून टी पी करायला मोकळा होणार ?
(टीपीकार)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
7 Nov 2008 - 8:51 am | शेखर
नोकरी कोणतीही असो, रात्री शांत झोप लागेल अशी हवी.
शेखर
7 Nov 2008 - 9:32 am | मदनबाण
सध्याच्या परिस्थीत आहे ती नोकरी टिकवुन धरणे हेच महत्वाचे आहे !!
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
7 Nov 2008 - 9:38 am | झकासराव
ह्यापेक्षा जास्त पगाराची नोकरी नै काय???
ह्या दोन्ही पगारात पुण्यातच काय पिम्परी चिन्चवड येथे देखील घर घेण कठीण आहे. :(
जर सरकारी नोकरीत क्वार्टर मध्ये घर मिळत असेल तर तोच जास्त सोयीस्कर पर्याय राहिल.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
7 Nov 2008 - 9:39 am | पिवळा डांबिस
जर मला सचिवालयातल्या शिपायाची नोकरी असेल तर मी खाजगी क्षेत्रातल्या नोकरीची आस धरीन....
मला जर टीआयेफारमध्ये संशोधकाची नोकरी असेल तर मी सरकारी नोकरीत खूष राहीन......
टीआयएफआर मध्ये खूप जिवलग मित्र असलेला,
पिवळा डांबिस
7 Nov 2008 - 9:45 am | वासुनाना आले
सरकारी नोकरी नको रे बाबा त्या पेक्शा बेरोज्गार राहीन पण हरामखोरगिरि करुन पैसे मिळ्वनार नाही
त्या पेक्शा आप्लि खसगि नोकरि बरी जितना काम उतना दाम
7 Nov 2008 - 9:53 am | पिवळा डांबिस
आसं म्हणू नका हां नाना!
आमी टीआयएफ आर, बीएआरसी यासारख्या संस्थातल्या लोकांची नोकरी पाह्यलीय!!
काही लेक्चर्सपण दिलीयेत त्या लोकांच्या ज्ञानवर्धनासाठी....
डेडिकेटेड आहेत ते लोक....
गरज आहे मार्गदर्शनाची, ते आमच्यासारखे लोकं पुरवता आहेत....
तिथे काही पैसे खायचा संबंध नाही हो......
आपल्या देशाच्या प्रगतीसाठी झटताहेत ते लोक.....
7 Nov 2008 - 10:11 am | शिंगाड्या
अतिशय संयमीत प्रतिसाद...
खुप आवडला..
माझे मत खाजगी नोकरीला..
7 Nov 2008 - 11:30 am | वेताळ
तु काय पसंत करतो ते नाही सांगितलेस?
वेताळ
7 Nov 2008 - 4:22 pm | योगी९००
हिच जर सरकारी नोकरी बिहार मध्ये दिली तर चालेल काय...
सरकारी नोकरी
पगार----५००००/-
कामाची वेळ ----- ४ तास
नोकरीचे ठिकाण : बिहार
7 Nov 2008 - 4:58 pm | अवलिया
नोकरी करणे म्हणजे काय भौ?
(बिजनेसमन) नाना
8 Nov 2008 - 2:15 am | अभिज्ञ
अतिशय सोपे आहे.
सर्वप्रथम मी सरकारी नोकरी पकडेन.
तिथे "काहिहि" करून मला सस्पेंड करून घेईन.जेणेकरून मला अर्धा पगार सुरु राहिल.
त्यानंतर मी पुर्णवेळ खाजगी नोकरी पकडेन. ;)
अभि़ज्ञ.