प्रिय पंडितराज

व्यंकु's picture
व्यंकु in जनातलं, मनातलं
6 Nov 2008 - 6:07 pm

'प्रिय पंडितराज जगन्नाथ',
सप्रेम नमस्कार
'वेगळं व्हायचंय मला' हे तुझ्या तोंडून ऐकताच मी 'झोपी गेलेला जागा झालो' आणि 'जणू काही कट्यार काळजात घुसली' 'माझी बायको माझी मेव्हणी' यांनी मला सावरलं पण मला प्रश्न पडला कि 'या चांगल्या घरात असं झालंच कसं' एवढं मोठं घर श्रीमंताचं असं व्हायला नको होतं असो.
'सिमेवरुन परत जा' असं तु मत्स्यंगंधेला का म्हणालास? उलट तु तिला प्रेमाने म्हणायला हवं होतं 'प्रेमा तुझा रंग कसा?' त्या दिवसापासून ती 'घराबाहेर' पडली आणि सगळीकडे 'बायको पळाली माहेरी' अशी बोंब झाली. अम्मलदार आले पण काही उपयोग झाला नाही पण 'काका किश्याचा' होता म्हणून तिला 'बटाट्याच्या चाळीत आश्रय मिळाला असो.
अरे परवा तु 'एकच प्याला' घेतलास आणि हमीदाबाईच्या कोठीवर जाऊन 'लेकुरे उदंड जाहली' असे बडबडलास 'मोरुच्या मावशीला' ते फार लागलं ती रागाने म्हणाली 'ह्यांच मेलं असंच' 'वात्रट मेले' 'पुरुष सगळे सारखेच' 'मानापमान' प्रत्येकालाच असतो हे तुला कळायला हवं होतं.
तु हल्ली स्वत:ला 'गारंबीचा बापू' आणि पुन्हा 'तो मी नव्हेच' असं म्हणायची तयारी असतेच. घरोघरी हीच बोंब आहे. तसा 'मी तुझ्या पाठीशी आहे' 'झालं गेलं विसरुन जा' या डोळ्यांची दोन पाखरं तुझी वाट पाहत आहेत. 'यदाकदाचीत' कधी आलोच तर बोलू.
पण या सुटीत गावी येताना 'लवंगी मिरची कोल्हापुरची' आणायला विसरु नको. 'शारदेला' घेउन ये 'दिनुच्या सासुबाई राधाबाई' 'सविता दामोदर परांजपे' 'कुसुम मनोहर लेले' 'मकरंद राजाध्यक्ष' या सर्वाँना 'साष्टांग नमस्कार'
कळावे आपला,
'नटसम्राट'

साहित्यिक

प्रतिक्रिया

सुनील's picture

6 Nov 2008 - 6:48 pm | सुनील

कुठल्याशा हिंदी चित्रपटात एक गाणे आहे. त्यात अशीच इतर चित्रपटांची नावे गुंफली गेली आहेत. नाटकांची नावे गुंफून केलेला हा प्रयोग आवडला.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर's picture

7 Nov 2008 - 12:30 am | विसोबा खेचर

कुठल्याशा हिंदी चित्रपटात एक गाणे आहे. त्यात अशीच इतर चित्रपटांची नावे गुंफली गेली आहेत. नाटकांची नावे गुंफून केलेला हा प्रयोग आवडला.

चित्रपट : एक दुजे के लिये...

गाण्याचे बोल : मेरे जीवन साथी प्यार किये जा जवानी दिवानी खूबसूरत जिद्दी पडोसन सत्यम शिवम सुंदरम्.. .... :)

आपला,
(गाण्यातला) तात्या अग्निहोत्री.

विसोबा खेचर's picture

7 Nov 2008 - 12:30 am | विसोबा खेचर

कुठल्याशा हिंदी चित्रपटात एक गाणे आहे. त्यात अशीच इतर चित्रपटांची नावे गुंफली गेली आहेत. नाटकांची नावे गुंफून केलेला हा प्रयोग आवडला.

चित्रपट : एक दुजे के लिये...

गाण्याचे बोल : मेरे जीवन साथी प्यार किये जा जवानी दिवानी खूबसूरत जिद्दी पडोसन सत्यम शिवम सुंदरम्.. .... :)

आपला,
(गाण्यातला) तात्या अग्निहोत्री.

कवटी's picture

12 Jan 2009 - 6:47 pm | कवटी

आयला.... साक्षात तात्याबासुद्धा कधी कधी गंडतात आणि दोन दोन प्रतिसाद देतात तर....
मला वाटले आमच्या सारखे णविण लोकच असे गंडतात....
असो.
ह.घ्या.

(गंडेश)कवटी हसन

mina's picture

6 Nov 2008 - 8:24 pm | mina

छान वाटलं वाचतांना..मजा आली.प्रयत्न उत्तम आहे.असेच लिहा व्यंकुराजे...

आम्ही असेचं हाव भाऊ...(मनीम्याऊ)

चाफा's picture

6 Nov 2008 - 10:43 pm | चाफा

छान गुंफ़ण ! मधे मधे काही नावे राहीलीत ती मार्क कर ! :)

विसोबा खेचर's picture

7 Nov 2008 - 12:28 am | विसोबा खेचर

मस्तच लिहिलं आहे... नाट्यपंढरी आवडली..! :)

व्यकूशेठ, प्लीज येऊ द्या अजूनही असं मजेशीर लेखन..

आपला,
(मराठी असल्याने 'बाय डिफॉल्ट' नाट्यवेडा असलेला) तात्या. :)

मी राधिका's picture

18 Nov 2008 - 5:45 pm | मी राधिका

अप्रतिम, सुंदरच लिहीलय

गुरुजी's picture

12 Jan 2009 - 12:51 pm | गुरुजी

सुंदर गुंफण. खरच अप्रतिम

कवटी's picture

12 Jan 2009 - 6:49 pm | कवटी

व्यंकू... छान लिहिलयस रे...
आता तुझ्याकडे "शिकवणी" लावायला लागणार......

कवटी

व्यंकु's picture

12 Jan 2009 - 7:09 pm | व्यंकु

आभार सर्वांचे
कवटी चेष्टा करता काय?

सुहास.'s picture

12 Jan 2009 - 8:24 pm | सुहास.

थ॑ड्च की...म्हणजेच.....cool

आपला अभिजित's picture

13 Jan 2009 - 12:05 am | आपला अभिजित

असेच म्हणतो!!

प्राजु's picture

13 Jan 2009 - 12:11 am | प्राजु

दगडाची फुले.. (पथ्थर के फूल) या चित्रपटात, "कभी तू छलिया लगता है, कभी दिवाना लगता है, कभी अनाडी लगता है...." या गाण्यात सगळी भन्नाट चित्रपटांची नावे आहेत.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

कोलबेर's picture

13 Jan 2009 - 12:13 am | कोलबेर

बरोबर. ह्याच चित्रपटातील आणखी एका गाण्यामुळे आम्हाला मुंबईतले सर्व रस्ते देखिल पाठ झाल्याचे आठवते.

प्राजु's picture

13 Jan 2009 - 12:30 am | प्राजु

ते गाणं.. तुमसे जो देखतेही प्यार हुआ...
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com