बाइक्स घेताना - भाग २
… तर आता विभागवार लोकप्रिय ठरलेल्या बाइक्सचे पर्याय बघू… मी फक्त नवीन किंवा खप जास्त असणारे पर्यायच निवडले आहेत …त्याशिवायसुध्धा प्रत्येक विभागात अजून कमी प्रसिध्द पर्याय आहेत
१००-११० cc
१. दमड्या - सगळ्यांत कमी
२. मायलेज … "कितना देती है" - सगळ्यांत जास्त
३. दिसणे - काकूबाई / वरणभात
४. ताकद (power) - ७५+ पळवली की धापा टाकणार
५. आराम - अगदीच टुकार
६. तेलपाण्याचा / सुट्टया भागांचा खर्च - सगळ्यांत कमी
७. अतिरिक्त वैशिष्ट्ये … (additional features) - फक्त महिंद्र कडून
हिरो
स्प्लेंडर
पॅशन प्रो
स्प्लेंडर प्रो क्लासिक (नवीन)
होंडा
ड्रीम निओ / युगा
ट्विस्टर
बजाज
डिस्कव्हर
टिव्हिएस
स्टार सिटी
सुझुकी
स्लिंग शॉट
महिंद्र
सेंच्युरो
पंटेरो
हा सगळ्यांत जास्त खप होणार्या बाइक्सचा विभाग … सगळ्या कंपन्यांच्या नफ्यातला मोठा हिस्सा या दुचाकींच्या विक्रीतून येतो
खपाच्या बाबतीत हिरो अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवते इथे … हिरोच्या स्प्लेंडर आणि पॅशन यांच्याबद्दल काही लिहायलाच नको … tried, tested and proven themselves मोडेल्स आहेत ती … हिरो अजून पर्यंत तरी होंडाचीच इंजिन्स वापरत आहे पण लवकरच ती EBR च्या इंजिनाने बदलण्यात येतील … पण हिरोला २ खूप मोठे फायदे आहेत …. खूप मोठे service network आणि स्वस्त सुट्टे भाग … बाइकची किंमतसुध्धा वाजवी आहे आणि ५ वर्षे हमी … मायलेज भरपूर …. दिसण्याच्या बाबतीत या ठिकठाक … या विभागातली अलका कुबल :)
नुकतीच हिरोने स्प्लेण्डर प्रो क्लासिक आणली आहे … ती या विभागातली सगळ्यात हटके बाइक आहे \m/ … साधी पण स्टाईलिश … old wine in new bottle … रेशम टिपणीस सारखी :)
सध्ध्या होंडाने ड्रीम निओ / युगा आणुन हिरोला समर्थ पर्याय उभा केला आहे … होंडाच्या इंजिनची गुणवत्ता ही सर्वोत्तम आहे … आणि शहरे व आसपासच्या परिसरात service center असतातच … ही स्मिता पाटील आणि होण्डाचीच ट्विस्टर मात्र या विभागातली वर्षा उसगावकर ;)
बजाजची डिस्कव्हर सिरीज सगळ्या विभागांत आहे … बजाजचा सर्वांत मोठा प्लस पोइण्ट म्हणजे सगळ्यात कमी किंमत, सगळ्यात जास्त मायलेज … खूप स्वस्त सुट्टे भाग … नुस्ते बघून कळतच नाही की १०० वाली का १२५ वाली का १३५ वाली 8) … परंतु इंजिन refinement मध्ये हिरो आणि होंडाच्या मागे पडते… डिस्कव्हर सिरीज थोडक्यात jack of all trades master of none अशी आहे … या विभागातली निशिगंधा वाड :P
टिव्हिएस आणि सुझुकी सध्यातरी खपाच्या बाबतीत वरच्यापैकी कोणाच्याच जवळपास सुध्धा नाहीत… service network कमी आहे
महिंद्राने सेन्च्युरो / पटेरो असे २ पर्याय दिले आहेत … यांनासुध्धा ५ वर्षे हमी … त्यांच्यात मात्र काही first in class वैशिष्ठ्ये आहेत …जसे इंजिन immobilizer, find me parking lights, remote flip key … comes with freshness but not sure about potential इथली सुप्रिया पिळगावकर :D
अवांतर -
जुन्या मराठी नायिका निवडण्याचे कारण … looks plain based on what we get to see :D
उपमा हुकल्या असतील तर पर्याय सुचवावेत ;)
क्रमश:
प्रतिक्रिया
23 Dec 2014 - 9:33 am | टवाळ कार्टा
नाय नो नेवर...
Royal Enfield आकाराला मोठी आहे पण "बेढब" नाहीये...तस्मात तिच्यासाठी कमनीय बांधाच सुचवला जाईल ;)
23 Dec 2014 - 12:20 pm | प्रसाद गोडबोले
Royal Enfield= सई ताम्हणकर?;)
बिकिनीतील फोटो डकवा रे कोणीतरी सई चा ;)
23 Dec 2014 - 12:24 pm | टवाळ कार्टा
नावे सुचवा...नक्कीच विचारात घेतली जातील
22 Dec 2014 - 4:52 pm | टवाळ कार्टा
घेऊन टाका...भन्नाट सायकल आहे नवीनच सुरु करत असाल तर \m/
मी आत्ताच घेतली आहे :)
22 Dec 2014 - 4:55 pm | टवाळ कार्टा
बाकी पोरे नशीबवान यात शंकाच नाही...आमी इथे घासून घासून मुम्बै व्हर्सीटीतून डिस्टिंक्शन काढूनपण बैक नव्हती दिली :(
23 Dec 2014 - 10:27 pm | काळा पहाड
हितं दोन हजाराची सायकल घेवू म्हटलं तर डोस्कं खाल्लं माझं बायडीनं चार दिवसापुरतं आहे म्हणून. ती पडून राहीली त्यामुळं टोमणे खावे लागतात ते वेगळेचं. तुम्ही तर १७ हजाराबद्दल बोलताय.
23 Dec 2014 - 10:35 pm | टवाळ कार्टा
भौ...गल्लीतली आणि जाहिरातीतली इतका फरक आहे दोन्हीत ;)
23 Dec 2014 - 10:44 pm | काळा पहाड
हे जरा बायडीला कसं पटवायचं ते सांगता का?
23 Dec 2014 - 11:04 pm | टवाळ कार्टा
पोट कमी करायला वजनाला हलकी असणारी सायकल घेतो म्हणून सांगायचे...हाकानाका ;)
23 Dec 2014 - 11:18 pm | कपिलमुनी
माझी बायडी म्हणाली , वजनाला हलकी कशाला जड घ्या ! लौकर वजन कमी होइल :(
24 Dec 2014 - 12:51 am | काळा पहाड
माझी बायडी म्हणाली सायकल कशाला पाहिजे, सकाळी उठून पळायला जा.
24 Dec 2014 - 5:35 am | मुक्त विहारि
पळायला हरकत नाही, पण तुझी "ती" मैत्रीण पण पळायला येते.
चुकुन-माकून आम्ही दोघेही एकत्रच पळायला लागलो तर?
24 Dec 2014 - 10:15 am | काळा पहाड
प्लान उघड होईल ना मग.
24 Dec 2014 - 10:23 am | टवाळ कार्टा
म्हणजे हाच प्लान आहे का? तसे वाटत नाही...कारण असे प्लान असणार्यांना थापा मारणे आपोआप जमते ;)
23 Dec 2014 - 9:13 am | कंजूस
बाइकची आवड नाही परंतू
बाइक्सची जी काही चर्चा चालली आहे ती फार आवडली आहे.
मीही माझे दोन शब्द लिहितो
१)हे एंजिनचं CC प्रकरण काय आहे ?
-यावरून एंजिनची एचपी (हॉर्स पॉवर कळते).
-पेट्रोल एंजिनच्या CC संख्येला वीसने भागले की एचपी कळते १००cc चे ५एचपी एंजिन असते.मारुति ८००चे ४०एचपीचे एंजिन असेल.
डीझेल एंजिनासाठी cc ला ४०ने भागावे ३लिटरD SUV वाहनाचे (३०००cc)चे ७५एचपी होतील.
23 Dec 2014 - 9:27 am | टवाळ कार्टा
तुम्ही जो फॉर्मुला लिहिला आहे तो "ठोकळेबाज" (इन जनरल) फॉर्मुला आहे
सारख्या CC असणार्या इंजिनपैकी ज्याची पॉवर जास्त त्याचे मायलेज कमी असते आणि ज्याची पॉवर कमी त्याचे इंजिन लाईफ जास्त असते
त्यामुळे जर इंजिनमधून पावर आणि मायलेज यांचा सुवर्णमध्य हवा असेल तर ढोबळमानाने वरचा फॉर्मुला वापरतात
याला सणसणीत अपवाद बघायचे असतील तर खालील बाइकबद्दल गुगलवा
Any Royal Enfield...specially check out Taurus
KTM Duke 200/400
Yamaha R-15
Honda CBR150R
23 Dec 2014 - 11:00 am | कंजूस
ठोकळेबाज फॉर्म्युलाच स्टार्टिँग पॉइंट असतो.
१००किलो वजन २७ किमीच्या वेगाने नेले की झाले १ एचपी, (याप्रमाणे २एचपी=१००किलो ५४किमी वेग इत्यादी).आता हा गुणाकार कसाही करू शकता. २७ किलो वजन १००किमीच्या वेगाने नेले तरी तेच उत्तर येणार.
मोटर कंपन्यांचे मार्केँटिंगवाले आपला खरेदीदार कोणता गट आहे आणि किती गाड्यांची मागणी येईल त्याप्रमाणे भारदस्त परंतू कमी माइलेज अथवा उलट हलक्या आणि जास्ती माइलेज शिवाय यातले एक मधले मॉडेल बाजारात आणतात.
आपली गरज ओळखायची. कधी गाडीचा भपका तर कधी कमी रिपेअर या मुद्द्यांवर गाड्या खपतात.
23 Dec 2014 - 1:32 pm | गवि
या धाग्यावर समकालीन चालू बाईक्सचीच चर्चा होणार हे स्वाभाविक आहे.
पण इथे उपस्थित प्रौढ (शब्द आवडीनुसार बदलावा) 1960-70s दरम्यान जन्मलेल्या बंधूंनी ( आणि ॲप्लिकेबल असल्यास भगिनींनी) आपल्या त्या वयातल्या बाईक्सचा नामोल्लेख तरी करायला हरकत नाही. त्या आता कै. झाल्या असल्या तरी त्या टू स्ट्रोक छाव्यानी आपली जवानी माजवली.. आपलं.. गाजवली..
माझी आदरांजली पहिली स्वत: घेतलेली सुझुकी सामुराई आणि तिची बहीण शोगन यांना. काही वर्षे सुझुकी फिएरो ही बाईकदेखील वापरली. हल्ली मिळते का ही?
येझ्दी जावा राजदूत यांना तर पुष्पचक्र अर्पण केले पाहिजे. फार आठवणी जुळल्या आहेत.
23 Dec 2014 - 1:39 pm | मदनबाण
गवि अवं... लुना राहिली की राव ! हो तीच तीच जी समस्त मराठी जाल विश्वावर ब्रह्मे यांना प्रसिद्ध करुन गेली ! ;)
शिवाय यामाहा आरएक्स -१०० ला कसे काय विसरलात बॉ ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Russia to bail out Trust Bank with up to $530 million
Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender
Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year
China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015
23 Dec 2014 - 1:44 pm | गवि
आरेक्स हंड्रेड.. होय रे होय मबाशेठ.. काय पळायची ही.. स्लिम शेप अन हंड्रेड सीसी खूप होतील असे हलके वजन. टू स्ट्रोकचे दिवस संपल्यावरही केवळ हिच्यापासून अलग होणे शक्य नसल्याने ती जपून ठेवणारे भरपूर लोक होते.
बाकी ल्युनाला अस्मादिकांनीही लिखाणात मानाचं पान दिलंय. आठवलं असेलच..
23 Dec 2014 - 1:49 pm | मदनबाण
ल्युनाला अस्मादिकांनीही लिखाणात मानाचं पान दिलंय. आठवलं असेलच..
खरं सांगु... इसरलो हाय बघा. जरा दुवा ध्या की...
बाकी टीव्हीएस सुझिकीची फोर स्ट्रोक स्पेक्ट्रा ही १५० सीसीची माझी पहिली दुचाकी होती.
23 Dec 2014 - 10:32 pm | काळा पहाड
एक शंका नेहमी मनात डोकवते. या आर एक्स १०० गाड्या नेहमी चकाचक नव्या कोर्या कशा काय दिसतात? एक पण जुनी कशी काय दिसत नाही?
23 Dec 2014 - 10:35 pm | टवाळ कार्टा
कारण त्या डायवरचे पहिले प्रेम असतात ;)
23 Dec 2014 - 10:39 pm | काळा पहाड
नै म्हणजे साफ्सूफ म्हणत नाही मी. एकदम नवीन फॅक्टरी मॉडेल टाईप दिसतात. चकचकीत कलर. वापरून वापरून जुन्या दिसायला हव्यात ना. आमची बाईक काही वर्षातच जुनाट दिसायला लागते.
23 Dec 2014 - 11:22 pm | कपिलमुनी
सर्व बाईक रिस्टोर करतात.
बफिंग आणि क्रोम पॉलिश करून घेतला की बाईक चकचकीत दिसते
23 Dec 2014 - 7:19 pm | टवाळ कार्टा
कोणी काहीही म्हणो..."झालेत बहु...होतील बहु...परंतू यासम हिच" => RD-350
अजूनही सेकंड हँण्ड घ्यायला गेलात तर १ पेटी लागतात...आणि पर्फॉर्मन्स बोले तो...मधुबाला :) \m/
23 Dec 2014 - 5:26 pm | कपिलमुनी
ह्येचा कोणाला अणुभव आहे का ?
अत्रंगी बाईक !!
23 Dec 2014 - 5:38 pm | गवि
मला भरपूर अनुभव आहे. या येxxx मधे किक मारुन झाल्यावर तीच उलट दिशेत (समोर) खाली पाडून त्याचा गियर लिव्हर म्हणून वापर करावा लागतो.
मागच्या बाजूला गियर उतरवण्यासाठी काही नसल्याने टाचेचा उपयोग करता येत नाही. त्याऐवजी लीव्हरच्या खाली पायाची बोटे नेऊन उलटी वरती ढकलून गियर खाली आणायचे.
स्टार्ट करताना लांब पाऊल असलेल्यांचा अंगठा पुढच्या फुटरेस्टवर आपटून नख उचकटण्याचा धोका. मुळासकट नख उखडणे आणि अनेक महिने ठसठसणारी वेदना अनुभवास आली आहे.
बादवे या फोटोतल्या येझदीला आडवी जादा स्टेपनी दिसत नाही. बाईकमधे सहसा नसणारं ते फीचर होतं तिच्यात.
23 Dec 2014 - 1:45 pm | कंजूस
०/गवि\०
अजून या गाड्या चालवत असाल तर गाडीसह मालकाच्या फोटोचे स्वागत फोटूशिवाय मजा नाही ९०च्या अगोदरचे फोटो टाकाच मिपा विंटेज का काय ते .
23 Dec 2014 - 1:54 pm | गवि
अजिबात संबंध उरला नाहीये दुचाकीशी. :-(
पूर्वी बाईक हेच पाय होते इतके सदैव त्यावरुनच भ्रमण असायचे अन आता आठेक वर्षं दुचाकीला हातच लावला नाही. आता नीट चालवता येईल का अशी एक शंका मनात खोलवर आहे. चारचाकीच्या अतिरेकामुळे हे असं वाटतंय.
मोठी गॅप झाली तर परत बाईक चालवताना प्रोब्लेम येऊ शकतो का ? कोणाचा काही अनुभव ?
23 Dec 2014 - 2:06 pm | योगी९००
मोठी गॅप झाली तर परत बाईक चालवताना प्रोब्लेम येऊ शकतो का ? कोणाचा काही अनुभव ?
तितका प्रॉब्लेम येत नाही पण चार-चाकी चालवताना जो स्वतःवर विश्वास असतो तो रहात नाही आणि थोडीफार भिती वाटते की पाठीमागून कोणी चारचाकीवाला उडवेल म्हणून...
24 Dec 2014 - 10:36 am | असंका
_/\_
काय सुरेख निरीक्षण!! चारचाकीची सवय नसली तरीही; चारचाकीतून उतरल्या उतरल्या दुचाकीवर बसलो तरी हे असंच होतं....
24 Dec 2014 - 10:53 am | टवाळ कार्टा
हाय तुमने तो चलायीच नही :)
24 Dec 2014 - 6:55 am | कंजूस
एकदा लोणावळा अॅम्बिवैली रस्त्यावर पक्षी बघायला फिरत होतो. इतक्यात प्रचंड मोठा आवाज झाला म्हणून कडेला उभे राहिलो तर आठ दहा बाईकस्वार खूप वेगात गेले. अशा तीनचार फेऱ्या झाल्या. १०००cc च्या असाव्यात का त्या बाइक्स?
24 Dec 2014 - 7:24 am | गवि
हो. अशी वीसतीस बाईक्सची ती ग्यांग नाशिक, इगतपुरी,लवासा,लोणावळा अश्या भागांत अनेकदा भडभडून जाताना दिसते. फास्ट असतात पण वेडेवाकडे झिगझॅग पॅटर्न , कसरती किंवा तत्सम धोकादायक आचरटपणा नसतो. कंट्रोल चांगला असावा त्यांचा.
बाकी युनिफार्मसारखे संपूर्ण लेदर कव्हर्ड कपडे आणि हेल्मेट वगैरे बरोबर नियमित घालतात असे दिसले.
24 Dec 2014 - 8:10 am | टवाळ कार्टा
हेच ते "मानसिक वय > ४० - उपप्रकार २"
24 Dec 2014 - 8:27 am | गवि
असावे तसेच असे दिसते. कारण एका बाईकवर एकच स्वार असतो मोस्ट केसेसमधे. म्हणजे पोरी भापण्याचाही उद्देश नसावा. शुद्ध बाईकिंगच असावे.
24 Dec 2014 - 8:44 am | टवाळ कार्टा
अशी बाईक असेल तर "पोरी भापण्याची" गरज नसते ;)
24 Dec 2014 - 3:11 pm | मुक्त विहारि
सहमत
24 Dec 2014 - 10:13 am | कंजूस
हे भुंगे पोरी कशाला भापवतील म्हणा. त्यांची कमळे वेगळी असतात.
एकदा केरळला जातांना शेजारचा पोरगा एक चकाचक मलयाळम (असले मराठीत येईल का ?)कार आणि बाईकचे मैगझिन चाळत होता. त्याला खुणेनेच कोणती बाईक आवडते विचारल्यावर त्याची कळी खुलली आणि त्याने एक तसल्या बाईकचा फोटो दाखवला (मुवि वाचताय ना ?)मग आमची गट्टी जमली हे सांगायला नको.
24 Dec 2014 - 10:30 am | टवाळ कार्टा
अग्गागा...मराठीत बाइकचे मासीक निघाले तर ते मासीक काढणारा डूबेल की ओ
मराठी माणसाला भांडणे पहाण्यात्/करण्यात जास्त रस असतो...त्यात दोन्ही पार्टी मराठीच असतील तर जास्तच चेव येतो...आणि तो जास्तीचा चेव मिंधीत(मराठी + हिंदी) मधे बाहेर पडतो
24 Dec 2014 - 11:09 am | काळा पहाड
ये मराठी माणूस का अपमान है. हम तुमको माफी मागो करके बोल देता है. नही तो जर मराठी माणूस भडका ना तो इतना आदळ आपट करेगा ना की तुम्हारी पाचके उपर धारण बैठेगा. मराठी माणूस को कमी लेखके देशका राजकारण नही करनेका ये लक्षात लो बाबा.
24 Dec 2014 - 11:14 am | टवाळ कार्टा
_/|\_
24 Dec 2014 - 3:01 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अगर तुम करेगा मराठी माणुस का अपमान...
अगर तुम करेगा मराठी माणुस का अपमान...
हाम आके पिळेगा तुम्हारा कान
थोर कवीवर्ज (होय वर्जचं) नावं काही "आठवतं" नाहीये. आठवले की सांगेन.
24 Dec 2014 - 11:42 am | कंजूस
अगोदरच १०००cc (फटफटी)चा आवाज मोठा आणि त्यात साइलेन्सर कशाकरता काढून टाकता हो भाऊ ?हेल्मेट घालून लेख वाचावा लागेल.
24 Dec 2014 - 12:00 pm | गुंड्या
माझी पहिली बाईक, फर्स्ट जनरेशन सीबीझी. अप्रतिम डिझाईन, सुंदर हँडलिंग या कारणांमुळं खूपच आवडायची. पण हीरो आणि होंडाच्या स्प्लिटनंतर पार वाट लावली डिझाईनची ... :(
24 Dec 2014 - 12:05 pm | टवाळ कार्टा
Hero Honda CBZ
हिच ती...जीने भारतातल्या बाइक इंडस्ट्रीमधे बदलाचा ट्रिगर दाबला \m/
रच्याकने तीच्या डिझाईनची वाट हिरो आणि होंडाच्या स्प्लिटच्या आधीच लावलेली...डिझाईन चांगले ठेवले असते तर पल्सरचे यश थोडेफार तरी नक्कीच कमी झाले असते
24 Dec 2014 - 12:13 pm | गुंड्या
सीबीझी स्टार जेव्हा बाजारात आली तेव्हापासूनच सेल कमी झाला होता...
पल्सर तेव्हाही आवडली नाही आणि आताही नाहीच!
24 Dec 2014 - 12:15 pm | टवाळ कार्टा
तुमची आवड काय?? Royal Enfield च्या पंथातले असाल तर हार्ले सोडून बाकी काहीच आवडणार नाही
24 Dec 2014 - 12:47 pm | गवि
हे अवश्य बघा..
http://youtu.be/uPjkmPLjpkE
छोटासाच व्हिडो आहे..