बाइक्स घेताना - भाग २
… तर आता विभागवार लोकप्रिय ठरलेल्या बाइक्सचे पर्याय बघू… मी फक्त नवीन किंवा खप जास्त असणारे पर्यायच निवडले आहेत …त्याशिवायसुध्धा प्रत्येक विभागात अजून कमी प्रसिध्द पर्याय आहेत
१००-११० cc
१. दमड्या - सगळ्यांत कमी
२. मायलेज … "कितना देती है" - सगळ्यांत जास्त
३. दिसणे - काकूबाई / वरणभात
४. ताकद (power) - ७५+ पळवली की धापा टाकणार
५. आराम - अगदीच टुकार
६. तेलपाण्याचा / सुट्टया भागांचा खर्च - सगळ्यांत कमी
७. अतिरिक्त वैशिष्ट्ये … (additional features) - फक्त महिंद्र कडून
हिरो
स्प्लेंडर
पॅशन प्रो
स्प्लेंडर प्रो क्लासिक (नवीन)
होंडा
ड्रीम निओ / युगा
ट्विस्टर
बजाज
डिस्कव्हर
टिव्हिएस
स्टार सिटी
सुझुकी
स्लिंग शॉट
महिंद्र
सेंच्युरो
पंटेरो
हा सगळ्यांत जास्त खप होणार्या बाइक्सचा विभाग … सगळ्या कंपन्यांच्या नफ्यातला मोठा हिस्सा या दुचाकींच्या विक्रीतून येतो
खपाच्या बाबतीत हिरो अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवते इथे … हिरोच्या स्प्लेंडर आणि पॅशन यांच्याबद्दल काही लिहायलाच नको … tried, tested and proven themselves मोडेल्स आहेत ती … हिरो अजून पर्यंत तरी होंडाचीच इंजिन्स वापरत आहे पण लवकरच ती EBR च्या इंजिनाने बदलण्यात येतील … पण हिरोला २ खूप मोठे फायदे आहेत …. खूप मोठे service network आणि स्वस्त सुट्टे भाग … बाइकची किंमतसुध्धा वाजवी आहे आणि ५ वर्षे हमी … मायलेज भरपूर …. दिसण्याच्या बाबतीत या ठिकठाक … या विभागातली अलका कुबल :)
नुकतीच हिरोने स्प्लेण्डर प्रो क्लासिक आणली आहे … ती या विभागातली सगळ्यात हटके बाइक आहे \m/ … साधी पण स्टाईलिश … old wine in new bottle … रेशम टिपणीस सारखी :)
सध्ध्या होंडाने ड्रीम निओ / युगा आणुन हिरोला समर्थ पर्याय उभा केला आहे … होंडाच्या इंजिनची गुणवत्ता ही सर्वोत्तम आहे … आणि शहरे व आसपासच्या परिसरात service center असतातच … ही स्मिता पाटील आणि होण्डाचीच ट्विस्टर मात्र या विभागातली वर्षा उसगावकर ;)
बजाजची डिस्कव्हर सिरीज सगळ्या विभागांत आहे … बजाजचा सर्वांत मोठा प्लस पोइण्ट म्हणजे सगळ्यात कमी किंमत, सगळ्यात जास्त मायलेज … खूप स्वस्त सुट्टे भाग … नुस्ते बघून कळतच नाही की १०० वाली का १२५ वाली का १३५ वाली 8) … परंतु इंजिन refinement मध्ये हिरो आणि होंडाच्या मागे पडते… डिस्कव्हर सिरीज थोडक्यात jack of all trades master of none अशी आहे … या विभागातली निशिगंधा वाड :P
टिव्हिएस आणि सुझुकी सध्यातरी खपाच्या बाबतीत वरच्यापैकी कोणाच्याच जवळपास सुध्धा नाहीत… service network कमी आहे
महिंद्राने सेन्च्युरो / पटेरो असे २ पर्याय दिले आहेत … यांनासुध्धा ५ वर्षे हमी … त्यांच्यात मात्र काही first in class वैशिष्ठ्ये आहेत …जसे इंजिन immobilizer, find me parking lights, remote flip key … comes with freshness but not sure about potential इथली सुप्रिया पिळगावकर :D
अवांतर -
जुन्या मराठी नायिका निवडण्याचे कारण … looks plain based on what we get to see :D
उपमा हुकल्या असतील तर पर्याय सुचवावेत ;)
क्रमश:
प्रतिक्रिया
24 Dec 2014 - 12:51 pm | खटपट्या
मस्त !!
24 Dec 2014 - 1:08 pm | टवाळ कार्टा
फारच जुना आहे तो व्हिडीओ
24 Dec 2014 - 1:13 pm | गवि
हो.. अर्थात यापूर्वी पाहिला नसाल तर पहा असं लिहितालिहीता तसंलिहिण्यात काही अर्थ नाही हे कळलं.. म्हणून तसाच डकवला.
30 Dec 2014 - 8:27 pm | धर्मराजमुटके
दील कुश जाला.
24 Dec 2014 - 12:58 pm | मदनबाण
पल्सरला उगा नाव ठेवतात बाँ... मी जेव्हा स्लेंडर प्लस वरुन {हिरो होंडा} वरुन पल्सरवर {बजाज} वर शिफ्ट व्हायचे ठरवले त्यावेळी असेच अनेक ऐकलेली आणि वाचलेली मते विचारात घेतल्यावर खरचं पल्सर घ्यावी का ? असा विचार केला होता... शिवाय याची गियर सिस्टम सुद्धा हिरो होंडा पेक्षा वेगळी आहे, पण जेव्हा वेगवेगळे रिव्हू वाचले आणि प्रत्यक्ष जाउन एकदा बघीतल्यावर फायनल केली. गियर टाकणे म्हणजे अगदी मख्खन काम आहे ! ट्वीन स्पार्क प्लगचे ४ व्हॉल्व इंजिन हे बहुधा पल्सर १३५ एलएस मधे प्रथमच आणले गेले आहे. आत्ता पर्यंतचा १ वर्षाचा ड्राइव्ह फिल मस्तच आहे. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Shocking CAG Report on Army, Ordnance Factories and Defence Public Sector Undertakings ! {पीडीएफ}
Huge stockpile of defective anti-tank mines hurts army ops: CAG report
As China Upgrades Navy, India Misses Deadlines and Busts Budgets
All About Arihant
24 Dec 2014 - 2:45 pm | मुक्त विहारि
नाही...
आमचे पोरगे त्या पल्सरचाच हट्ट करत आहे.
24 Dec 2014 - 2:52 pm | कपिलमुनी
पल्सर २०० एन एस पेक्षा त्याला केटीएम २०० ची ऑफर द्या .
होउ दे खर्च :) पण गाडी नाद खुळा !
24 Dec 2014 - 1:11 pm | गुंड्या
बाईकच्या बाबतीत मी तसा फारसा कल्ट फॉलोअर नाही...यामाहाच्या बाईक्स बर्या वाटतात.
प्रचंड आवडणारी म्हणाल तर होंडा गोल्डविंग :)
24 Dec 2014 - 1:22 pm | टवाळ कार्टा
ओ भौ...मी इथे फक्त सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना खिशाला झेपणार्या बाइकबद्दलच लिहिणार आहे...आवडायला काय पेनेलोपे क्रूझ पण आवडते हो :(
24 Dec 2014 - 1:33 pm | गुंड्या
स्वारी हां..जरा वाहवत गेलो. आपण दिलेली यादी पाहता ट्विस्टर उत्तम वाटते.
24 Dec 2014 - 1:49 pm | टवाळ कार्टा
ह्म्म्म ट्विस्टरला पल्सरपेक्षा प्राधान्य दिलेले पाहून अंमळ ड्वाळे पाणावले...पण पसंद अपनी अपनी...सो ठिकाय
24 Dec 2014 - 3:13 pm | मुक्त विहारि
तसेच असते रे...
कुणाला कुठली बाइक आवडेल, ते काही सांगता यायचे नाही...
9 Jan 2015 - 5:35 pm | हाडक्या
पुभाप्र.. पुभाप्र.. पुभाप्र..
9 Jan 2015 - 9:05 pm | टवाळ कार्टा
येणार...येणार...येणार...
12 Jan 2015 - 1:26 pm | प्रसाद गोडबोले
कधी ... कधी...कधी...
12 Jan 2015 - 1:55 pm | टवाळ कार्टा
काम सुरु आहे...रच्याकने जरा "नावे" सुचवा ;)
12 Jan 2015 - 3:03 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
व्यनि केलाय.
12 Jan 2015 - 3:29 pm | विटेकर
आमच्या के बी १०० बद्दल कुणीच काही लिहले नाही ?
बजाज चे पहिली वहीली बाईक ... भन्नाट ! बजाज मध्येच काम करत असल्याने स्व्तः च्या हाताने असेम्ब्ले केली होती,,
तब्बल १५ वर्षे वापरली... खतरनाक बाईक !
गाडी घेतल्याच्या ( १२ जुलै १९९० ) दुसर्याच आठवड्यात जुलै च्या पडत्या पावसात औरन्गाबाद ते विटा -४८० किलोमिटर बिना हेल्मेट / बिना गॉगल / बिना विंड्चिटर ! आठ तासात पोहोचलो होतो. आई अवाक झाली .. १५ मिनिटे कानात आवाज येत होते नुस्ते !
( बाकी ही गाडी माझा पाय ओळखायची...इतरांनी कुतुन कुतुन लाथा घातल्या तरी ढीम्म न हलणारी माझ्यासाठी हाप किक स्टार्ट होती )
12 Jan 2015 - 4:13 pm | टवाळ कार्टा
मी नाही वापरली ती...फार जुनी झाली आता :(
27 May 2016 - 5:12 pm | अभ्या..
अरे लै खतरनाक मॉडेल होते. त्यात आरटीझेड पण मॉडेल होते. केबी फायरिंग जवळपास आरेक्स १०० सारखेच होते. टाकी लांब असल्याने मस्त फील यायचा हात स्ट्रेट ठेवायचा. पिकप बिकप जबरा. सगळ्यात म्हत्त्वाचे म्हणजे त्या काळात इतर बाइक्सना नसलेल्या बर्याच फॅसिलिटीज होत्या. सेंट्रल लॉक, पार्किंग लाईट, हेल्मेट लॉक, इंजिन स्विच ह्या गोष्टी नंतर सुरु झाल्या. पण केबीला पहिल्यापासून होत्या. त्यांची 'राईड द चिता' ही कॅम्पेन गाजलेली भरपूर.
तेच २ स्ट्रोक इंजिन वापरुन बजाज ने इंपल्स सारखे एंड्युरो मॉडेल काढलेले. त्याची पण अॅड भारी होती.
बजाजने त्या सिरिज मध्ये ४एस चॅम्पन नंतर कोल्ट, बॉक्सर(स्प्लिट सीटवाली), एआर अशी लो कॉस्ट मॉडेल काढलेली. चालली नाहीत. बजाजची हवा हुडीबाबा (कॅलिबर११५) ने सुरु केली. ती विंग्ज आणि पल्सरपासून उचलली गेली.
27 May 2016 - 3:15 pm | सुधीर जी
Hero Passion Xpro
बद्दल अधिक वाचायला आवडेल.
27 May 2016 - 5:04 pm | अभ्या..
एक्स्प्रो आनि नुसती प्रो ह्यामध्ये एक्स्प्रो का निवडावी वाटली तुम्हाला?
मिनिमम दोन कारणे दिलात तर एकदम परफेक्ट माहीती देतो. ;)
27 May 2016 - 5:09 pm | सुधीर जी
110 cc engine aani looks
27 May 2016 - 5:18 pm | अभ्या..
ओके.
११० सीसी इंजिन नॉर्मल पॅशन प्रो ला पण आलेय. लुक्स चांगलेत.
एक्सप्रो चे लूक्स भारी आहेत पण इंजिन टाइम प्रुव्हन पॅशनचे हॉरिझॉन्टल सिलिंडर नाही. व्हर्टिकल आहे. हे इंजिन हिरोच्या दुसर्या कोणत्याही १५०सीसी खालच्या गाडीला वापरीत नाहीत. अॅव्हरेज प्रो पेक्षा ५ कीमी ने कमी आहे. पॉवर जाणवत नाही.
वजन जरा कमी केलेय गाडीचे. हायवेवर शेजारुन मोठी गाडी गेल्यास हलते.
ऑलोव्हर एक्सप्रो फक्त लूक साठीच घ्या. बाकी कोणताही फायदा नाही. मायलेज, बरे सस्पेन्शन आणि मज्बूती हवी असेल तर पॅशन प्रो उत्तम.
27 May 2016 - 5:31 pm | सुधीर जी
MI EK MAHINYPURVI GHETLI HI GADI
HIGWAY LA BAJUNE GADI GELI TAR BIKE HALALEI MALA JANVALE NAHI
27 May 2016 - 5:39 pm | अभ्या..
कदाचित तुमच्यासह गाडीचे वजन जास्त झाले असावे. (ह.घ्या)
एनिवे. अभिनंदन.