बिड्या मारायला, तंबाखू मळायला निवांत टपरी

आगाऊ म्हादया......'s picture
आगाऊ म्हादया...... in काथ्याकूट
21 Nov 2014 - 11:02 am
गाभा: 

शीर्षक वाचून दचकू नका.
मी माझ्या प्रोजेक्ट साठी एक विषय घेतला आहे.
Barriers to intention to quit tobacco among adult tobacco users.
आता यासाठी किती जणांना विचारू ना की तुम्ही सेवन करता का म्हणून...म्हणून मीच टपर्यांवर जाणार आहे.
आपण पीत असलो काय नसलो काय, चांगल्या निवांत टपऱ्या नक्की माहित असू शकतात, खास अड्डे असू शकतात.
४०० लोकांचा इंटरव्यू मला घ्यायचा आहे. सर्वांची माहिती अत्यंत गुप्त ठेवली जाईल, अन माझ्या रिसर्च साठी त्याचा उपयोग केला जाईल. Intenet based survey हे भारतात तरी सर्व वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यास असमर्थ ठरतात. म्हणून हा प्रकार.
म्हणून मग म्हटल मिपाकरांनाच विचारावं, पुण्यात असे निवांत अड्डे,वेळा कुठले आणि काय असू शकतील?
सकाळी गडबड असते. दुपारी rush नसते (त्यामुळे respondent मिळत नाहीत). संध्याकाळी लोक मित्रांसोबत गप्पांच्या मूड मध्ये असतात.
म्हणून निवांतपणा महत्वाचा.
सिगारेट, बिडी, हुक्का, चिलीम, तंबाखू, पान, चैनी खैनी, गुटखा, मिश्री, तपकीर यापैकी काहीही.

काथ्याकूट होण्याची वाट पाहतोय.
आपला आगाऊ म्हाद्या....__/\___

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

21 Nov 2014 - 11:13 am | खटपट्या

र्‍हायला कुटं तुमी, मुंबै, पूने की आनकी कुटं ?

खटपट्या's picture

21 Nov 2014 - 11:15 am | खटपट्या

अरारा आत्ता वाचलं. पुणे. पुण्याचं काही माहीत नाही बुवा.

टवाळ कार्टा's picture

21 Nov 2014 - 11:55 am | टवाळ कार्टा

पुण्यात १ आत्मुबाबा गायछापवाले रहातात :)

हाडक्या's picture

12 Mar 2015 - 10:32 pm | हाडक्या

संन्यास चालू आहे ना रे तुझा सध्या.. ;)

आगाऊ म्हादया......'s picture

21 Nov 2014 - 5:39 pm | आगाऊ म्हादया......

चालायचच!

कल्याणीनगर ला "अ‍ॅडलॅब्स" च्या मागे cybage, TCS अशा नावाजलेल्या आय.टी कंपन्या आहेत. तिथे भरपूर टपर्या आहेत. संध्याकाळी/रात्री त्या भागात सिगारेटच्या थोटकांचा ढीग पडलेला असतो. त्या भागात तुम्ही गेल्यास एकाच दिवशी तुम्ही ४०० लोकांचा इंटरव्यू घेउ शकाल.
अवांतरः त्या भागात पुरुषांपेक्शा स्त्रीया सिगारेट ओढताना जास्त दिसतात.

आगाऊ म्हादया......'s picture

21 Nov 2014 - 5:38 pm | आगाऊ म्हादया......

नवीन माहिती.
धन्यवाद!!

कपिलमुनी's picture

21 Nov 2014 - 1:52 pm | कपिलमुनी

एक पंढरीची वारी करा !
४००० तरी सहज सापडतील एकाच ठिकाणी

पाषाणभेद's picture

21 Nov 2014 - 2:53 pm | पाषाणभेद

काथ्याकुट हा धागा लिहीतांना शिर्षक आकर्षक न ठेवता केवळ शिर्षकातून अर्थबोध झाला पाहीजे.
असे शिर्षक प्रश्नार्थक हवे. असा नियमच करायला हवा किंवा असले धागे संपादीत व्हायला हवे.
केवळ शिर्षक वाचून फसगत होते अन आपल्या संबंधीत नसलेल्या विषयाचे अकारण वाचन होते.
या विषयी वेळोवेळी जाग्रूती केली आहे. पण स्ंपादन हाच उपाय दिसतो आहे.

१. आर्यभूषण छापखान्याची गल्ली (डेक्कन)
२. हॉटेल पॅरेडाईज (कर्वे रस्ता, रेल्वे आरक्षण केंद्राच्या जवळ)
३. तिलक (टिळक रस्ता)
४. "नाद" नामक पानाची दुकानं (कर्वेनगर, कोथरूड)
५. शौकीन (नळस्टॉप)

अवांतरः तुम्ही उत्पन्न-गटांनुसार आणि व्यवसायांनुसार stratification केलं असेलच.

आगाऊ म्हादया......'s picture

21 Nov 2014 - 5:37 pm | आगाऊ म्हादया......

हो हे सगळ आहे माझ्या लिस्ट वर, तो आर्यभूषण स्पोट सोडून.
हॉटेल पॅरेडाईज तर मला हुकमी एक्का वाटलेला, कालच जाऊन आलो, पण लोक अगदी गहन चर्चा करीत असतात, मोस्टली नाकारतात इंटरव्यू.
आणि सगळे स्मोकर्स. त्यामुळे नको म्हटल/,

आगाऊ म्हादया......'s picture

28 Nov 2014 - 8:27 am | आगाऊ म्हादया......

ते आर्यभूषण छापखाना गल्ली सांगून सोडलात ते बेष्ट झाल घ्या.काल जाऊन आलो. चांगले झाले इंटरव्यूज.

पाषाणभेद's picture

21 Nov 2014 - 3:29 pm | पाषाणभेद

आपण कोणत्या व्यवसायाशी संब्ंधीत आहात? जसे विद्यार्थी, वैद्यकिय, समाजसेवक आदी.
हा विषय गहन आहे. केवळ ४०० व्यक्तींच्या तेही एकाच शहरातील व्यक्तींच्या मुलाखती घेवून आपण या विषयाला न्याय देवू शकत नाही.
केवळ पदवीसाठी ठिक आहे.

आगाऊ म्हादया......'s picture

21 Nov 2014 - 5:34 pm | आगाऊ म्हादया......

पाषाणभेद, Occupation ला महत्व आहे आणि त्यासाठी मी Kuppuswamy scale वापरत आहे. एकाच शहरातील ४०० लोकांचा मी एरवीच घेऊ शकतो कारण ३१.३ % लोकांना तंबाखूजन्य पदार्थ सोडण्याची इच्छा आहे असा GATS चा रिपोर्ट आहे. यावरून काढलेला तो sample size आहे. Data monotonous , skewed होऊ नये याची काळजी मी घेतो आहे.

सुबोध खरे's picture

28 Nov 2014 - 9:49 am | सुबोध खरे

फक्त ३१ टक्के.
जवळ जवळ १०० टक्के लोकांना कधी न कधी तरी तंबाखू सोडण्याची इच्छा होते. कळत पण वळत नाही याचे हे उत्तम उदाहरण आहे. कारण तंबाखू आपल्या मनावर इतकी जबरदस्त पकड बसवून ठेवतो कि सोडा म्हटले तरी सुटत नाही.
http://www.drugabuse.gov/publications/research-reports/tobacco/nicotine-...

आगाऊ म्हादया......'s picture

12 Mar 2015 - 10:17 pm | आगाऊ म्हादया......

अहो आयुष्यात प्रत्येक जन एकदातरी सोडतोच तंबाखूचं सेवन. पण GATS चा रिपोर्ट 'who were ready to set a quit date' याचा prevalence देतो, आणि तोच हवाय म्हणून घेतलाय तो.