केंद्रसरकारच्या पैशाने निंदनीय जाहिराती

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
13 Nov 2014 - 6:50 pm
गाभा: 

आंदमानातील काही आदीवासी समाज आहेत, त्याच प्रमाणे पार्सी समाजाची लोकसंख्या देशात आणि विदेशातही वेगाने खालावते आहे. चांगल्या राहणीमानासाठी उशीरा अथवा आंतरधर्मीय विवाह हे त्याचे मुख्य कारण आहे असे म्हटले जाते. पार्सी लोकांना जन्मदर वाढवण्याच्या दृष्टीने केंद्रसरकारच्या अल्पसंख्यांक खात्याने दहाकोटीच्या जाहीराती काढल्या आहेत इथ पर्यंतही ठिक आहे.

पण या जाहीरातीतील काही विधान निश्चितपणे विवाद्य स्वरुपाची आहेत असे वाटते. हिंदू पार्सी असा सद्यकाळात कोणताही संघर्ष अस्तीत्वात नसताना "पारशींनी लग्न करुन मुलांना जन्म दिला नाही तर लवकरच पारशी कॉलनीचे हिंदू कॉलनीत रुपांतर होईल, " अशा पद्धतीच्या समाजात दुही पसरवणार्‍या विधानांची आणि चित्रांची जाहीरातीत गरज आहे का ? जाहिरातीचे बजेट काँग्रेसकालीन असलेतरीही जाहिराती भाजपासरकारच्या काळात प्रस्तूत होतात हा एक विचीत्र विरोधाभास आहे.

आंतरधर्मीय विवाहामुळे पारसी संस्कृतीचे लोक कमी होत असतील तर सांस्कृतीक जतनासाठी त्यांची चांगली गाणी नृत्य चांगले उत्सव हिंदू बांधवांना अंगिकार करण्यास सांगता येतील, हवेतर पारसी धर्मीयांचे कोण मूळपुरुष होते त्यांना हिंदू धर्मात संत म्हणून स्थान द्या; आंतरधर्मीय विवाह थांबवणे अथवा चुकीच्या जाहिराती करणे हा अल्पसंख्यांकाच्या संस्कृती संवर्धनाचा उपाय नव्हे नाही भारताची आंतरधर्मिय ओळख शाबूत ठेवण्यासाठी आपापसात विश्वास असलेल्या दोन समाजात दुफळी माजवण्याचा प्रकार तेही परकीय नव्हे तर स्वकीय सरकारांनी करणे अथवा असे होताना झोपा काढणे निंदनीय आहे.

संदर्भ लोकसत्तामधील ही बातमी

प्रतिक्रिया

प्रदीप's picture

13 Nov 2014 - 7:06 pm | प्रदीप

ह्या अ‍ॅडमधे दादर पारसी कॉलनीमधील घर दाखवण्यात आलेले दिसते. दादर व महेश्वरी उद्यान ह्यांच्या दरम्यान आंबेडकर रोडचा (पूर्वीचा व्हिन्सेन्ट रोड) जो भाग आहे त्याच्या एका बाजूस, मागल्या बाजूस दादर पारसी कॉलनी ही पारश्यांची वसाहत पसरलेली आहे, व दुसर्‍या बाजूस, मागल्या भागात हिंदू कॉलनी तशीच पसरलेली आहे. ह्या अ‍ॅडचा संदर्भ हा असा आहे. थोडक्यात, पारश्यांनी आपला धर्म टिकवला नाही, तर पारशी कॉलनी आकुंचित होईल, हा मेसेज आहे. वरील संदर्भ ध्यानात घेतला तर त्यात गैर, दोन धर्मांत दुफळी माजवणारे असे काहीही वाटण्यासारखे नाही. अत्यंत खुल्या दिलाच्या पारश्यांना तर ते अजिबात वाटू नये.

माहितगार's picture

13 Nov 2014 - 7:13 pm | माहितगार

अत्यंत खुल्या दिलाच्या पारश्यांना तर ते अजिबात वाटू नये.

अत्यंत खुल्या दिलाच्या हिंदूंना सुद्धा खटकू नये याची काळजी घेतली जावयास हवी. तुमची लोकसंख्या कमी झाली तर हा बोर्ड असेल पण संस्कृती नसेल असे काही बाही म्हणता आले असते. तिसर्‍या विशीष्ट धर्माकडून अधिग्रहण होईल अशी भिती घालणे आजू बाजूला कोणतीही कॉलनी असलीतरी ही मलातरी निंदनीय वाटते. उद्या सरकारची उर्वरीत खाती हिंदूंनो तुमची लोकसंख्या टक्केवारी कमी होते आहे, मराठ्यांनो तुमची टक्केवारी कमी होते आहे तिसर्‍याच धर्माची किंवा जातीचा बोर्ड तुमच्या कॉलनीवर लागेल असे म्हणत अशाच प्रकारच्या जाहीराती देतील त्याचे समर्थन होऊ शकेल का ?

पगला गजोधर's picture

14 Nov 2014 - 9:39 am | पगला गजोधर

याबाबतीत माहितीगार यांना माझा पाठींबा. (त्यांना तो जाहीररीत्या नको असेल तर, मिपासभेवर मतदानाच्या दिवशी मी अब्सेंट राहून अप्रत्क्ष पाठींबा देईन. - - कंसातील वाक्य विनोद जाणून हळू घ्यावे)

मी व्ही जे टी आय मधे चार वर्षे होतो. त्या वेळी पारसी कालनीतुनच जा ये करायचो. अत्यंत सुंदर आणि टिकवलेली ही जागा होती. आणि पारसी जमात धर्म टिकावा असे मनापासून वाटते. आता हे जाहिरातीतुन होणार का हे माहित नाही पण पारसी लोकांनी मनावर घ्यावेच ! जर आपण प्राण्यांतली जैव विवीधता टिकवण्यासाठी प्रयन्त करतो तर तेच माणसांच्या प्रजाती विषयी करायल काय हरकत आहे ?

प्रसाद गोडबोले's picture

13 Nov 2014 - 7:15 pm | प्रसाद गोडबोले

हवेतर पारसी धर्मीयांचे कोण मूळपुरुष होते त्यांना हिंदू धर्मात संत म्हणून स्थान द्या

>>>>

हाहाहा .... आमच्या मिपामाहीतीनुसार पारश्यांचे मुळपुरुश हे असुर होते अन त्यांचा वैदिकांशी कट्टर संघर्ष होता ते इन्द्राला व्हिलन मानतात म्हणे ....

माहितगार's picture

13 Nov 2014 - 7:19 pm | माहितगार

मला वाटते आजचा तरूण हिंदू पुरेसा खुल्या दिलाचा निश्चित असेल. पारसी असो वा कोणत्याही संस्कृतीतील चांगल्या गोष्टी आणि चांगले संत हिंदूच नव्हे तर समस्त भारतीयांनी सामावून घेण्यास काही हरकत नाही. विशेषतः दादाभाई नौरोजी सारख्या वंदनीय व्यक्ती संत म्हणून भारतीय समाज सामावून घेऊ शकेल असे वाटते.

आधूनिक काळातील अजून एक संतत्व देण्या जोग पारसी नाव म्हणजे फिरोझ गांधींच स्वतंत्र भारतातील भ्रष्टाचार विरोधातील हा पहिला सेनानी ज्याने भ्रष्ट्राचाराची भंडाफोड करताना हा माझ्या धर्माचा तो माझ्या पक्षाचा किंवा माझा सासरा पंतप्रधान असा विचार केला नाही. फिरोझ गांधींना त्यांच्या घरातील लोकांनी उपेक्षीत ठेवले असेल तर नवल नाही पण विरोधी पक्षीयांनीसुद्धा दुर्लक्ष केले हे दुर्दैव माणूस एक दुर्लक्षीत संतच

विवेकपटाईत's picture

16 Nov 2014 - 11:28 am | विवेकपटाईत

चूक माहिती आहे. असुर आणि देव हे वेगळे नव्हते. फक्त 'मानसिक आणि शारीरिक कर्मांमुळे' देव आणि असुर वेगळे ठरले. अधिकांश असुर (राक्षस) ब्राह्मण होते. बाकी इराण आणि भारतात राहणारे अग्नी पूजक होते. काळानंतर मूर्ती पूजा भारतात सुरु झाली बहुतेक बुद्ध धर्म देशात अस्तित्वात आल्यानंतर.

प्रसाद गोडबोले's picture

18 Nov 2014 - 12:40 pm | प्रसाद गोडबोले

बरं

hitesh's picture

13 Nov 2014 - 7:24 pm | hitesh

सनातनवालेही लिहितात.. दर वाढवा न्हाइतर हिर्वे होउन जईल

माहितगार's picture

13 Nov 2014 - 7:32 pm | माहितगार

होना मग हि असली न संपणारी स्पर्धा होते. धर्मनिरपेक्ष व्यक्तींनी सर्वच निंदनीय गोष्टींचा निषेध नोंदवला पाहीजे. एकाच्या चुकीने दुसर्‍याच्या चुकीचे समर्थन हे प्रकार सुज्ञ व्यक्तींनी आवर्जून टाळावयास हवेत.

प्रसाद गोडबोले's picture

13 Nov 2014 - 7:37 pm | प्रसाद गोडबोले

मी हेच म्हणणार होतो .... जर पारश्यांना सरकार अनुदान देत असेल तर इतर अल्पसंख्यसमाजाला अनुदान का बरे देत नाही ... आधी २.५% अल्पसंख्य समाजाला अनुदान दिले पाहिजे असे आमचे स्पष्ट मत आहे =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 Nov 2014 - 11:19 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

३.५....

माहितगार यांचा आयडी नाना ने हॅक केला काय ?

माहितगार's picture

13 Nov 2014 - 9:00 pm | माहितगार

काय हो काय झाले, काही चुकले का आमचे ? चुकले असल्यास मोकळेपणाने कळावे हि विनंती.

जेपी's picture

13 Nov 2014 - 9:21 pm | जेपी

हो थोडे चुकलेच.
मरण्याला मरु द्या.
सर्व्हायवल फॉर फिटेस्ट हा स्रुष्टीचा नियम आहे. जे लढणार नाही ते मरणार हे निश्चीत.पारसी संपले तर आरसी येतील. सविस्तर प्रतिसादासाठी उद्या भेटु .शुभरात्री.

सविस्तर प्रतिसादाची प्रतिक्षा असेल.

सुबोध खरे's picture

13 Nov 2014 - 9:03 pm | सुबोध खरे

पारशी लोकांना एक गोष्ट माहित आहे कि त्यांना त्यांच्या देशातून हाकलून देणारे मुस्लिम राज्यकर्ते होते आणि त्यांना आश्रय देणारा देश भारत हाच आहे आणि येथील हिंदू लोकांनी त्यांच्या धर्मात कधीही ढवळाढवळ केलेली नाही.त्यामुळे "तिसर्‍या विशीष्ट धर्माकडून अधिग्रहण होईल अशी भिती घालणे आजू बाजूला कोणतीही कॉलनी असलीतरी ही मलातरी निंदनीय वाटते" असे होण्याची शक्यता जोवर भारत हिंदू बहुसंख्यांक आहे अन धर्मनिरपेक्ष आहे तोवर होण्याची शक्यता नाही.
त्यांची लोकसंख्या कमी होण्याचे कारण त्यांचे बरेचसे लोक लग्न करीत नाहीत किंवा लग्न केले तरीही मुले नको असे म्हणतात. पारशी पंचायतीमध्ये याबद्दल बराच उहापोह होत असतो. पारशी माणसाने गैर पारशी स्त्रीशी विवाह केला तर त्याची संतती पारशी होऊ शकते पण ती स्त्री पारशी होत नाही. पण पारशी स्त्रीने बाहेर विवाह केला तर ती पारशी राहत नाही. यात एक प्रवाह असा पण आहे कि पारशी स्त्रीने बाह्य धर्मात विवाह केला तरी तिच्या मुलाना पारशी म्हणून मान्यता द्यावी. परंतु त्यांचे धर्मगुरू अजूनही याला मान्यता देत नाहीत. त्यांच्या माणसांनी आपली लोकसंख्या वाढवावी यासठी सरकार दरबारी सुद्धा प्रयत्न चालू आहेत. त्याचा हा एक भाग आहे. तो प्रचार कदाचित चुकीच्या तर्हेने होत असेल पण आपण म्हणता तितका वाईट नाही असे वाटते.
सुडोसेक्युलर चष्म्याने याकडे पहिले जाऊ नये असे वाटते.

मी अबसोल्यूट सेक्यूलरीस्ट आहे आणि अबसोल्यूटली सेक्यूलर असण्याबद्दल अत्यंत दक्ष असतो. चुकीला चुक न म्हणण्यामुळे खर्‍या खुर्‍या धर्मनिरपेक्षतेचे आणि भारतीय सहिष्णू संस्कृतीचे मोठे नुकसान झाले आहे. कोणत्याही बाजूच्या चांगल्याला चांगले आणि चुकीच्या बाजूला चुक म्हणूनही; सुडोसेक्युलर अशी व्यक्तीगत टिका चुकीचे लेबलींग करण्याची घाई द्खावणारी आणि म्हणून अभिनंद्नीय निश्चितच वाटत नाही.

त्यांच्या माणसांनी आपली लोकसंख्या वाढवावी यासठी सरकार दरबारी सुद्धा प्रयत्न चालू आहेत. याला हरकत नाहीच आहे. जाहीरातीची पद्धत पारसी लोकांची लोकसंख्या टिकून राहण्याने समस्त भारतीयांना आनंद होईल असा संदेश देणार्‍या जाहीरातीला आनंदाने हार घालावा वाटेल. पण पारसी कॉलनी गेली तर हिंदूंचीच कॉलनी येईल अशी भिती घालण्यास म्हणण्याला मी पारसी असतो तरीही त्या जाहीरातीला मी काळा रंग स्वत:हून फासला असता. ओरडून निषेध नोंदवला असता. पारसी कॉलनी गेली तर ज्यूंची येऊ शकते खोजांची येऊ शकते मुसलमानांची येऊ शकते ख्रिश्चनांचीही येऊ शकते मारवाड्यांची येऊ शकते मुंडा आदिवासींची येऊ शकते. आणि शांततामय मार्गाने जे काही बदल होतील ते होतील.

कुणी जाहिराती केल्याने लोकसंख्या वाढवत अथवा कमी करत असे दोन्हीही होत नाही. आतून येणार्‍या प्रबोधनाची जागा अशा खुळचट जाहीराती घेत नाहीत पण जाहीरातीतील तारतम्याचा अभाव हा टिकेस जरुर पात्र आहे.

भिंगरी's picture

18 Nov 2014 - 12:31 pm | भिंगरी

पारशी माणसाने गैर पारशी स्त्रीशी विवाह केला तर त्याची संतती पारशी होऊ शकते पण ती स्त्री पारशी होत नाही
माझ्या नणंदेच्या नणंदेने वयाच्या ३५ वर्षी पारशी नवरा केला.त्यांना संतती झाली नाही.
तिची सासू व नणंद वेगळ्या घरात,रहात असत.तिच्याशी त्यांचे वागणे चांगले होते.पण तिच्या सासुच्या व नणंदेच्या अन्तिम संस्कारात तिला सामिल करून घेतले नाही.
तसेच दोन वर्षापूर्वी तिचेही निधन झाले.पण अन्तिम संस्कार हिंदू स्मशान भूमीतच झाले.(पारशी पद्धतीने नाही)
तिचा नवरा अजूनही येतो जातो.चांगले संबंध ठेउन आहे.पण त्यांना मुलबाळ नसल्याने त्यांची संपत्ती टृस्ट्ला दिली जाईल.(म्हणजे आपल्याकडच्या संपत्तीवर डोळा ठेवणार्‍याना ठेंगा)

माहितगार यांच्या विचारांशी पूर्णपणे सहमत !
पारशी समाजाची लोकसंख्या वाढवण्यासाठी सरकारने हवी ती मदत करावी, पण त्यासाठी तुमची पारशी कॉलनी हिंदू कॉलनी होइल अशी आडमार्गाने भिती घालण्याची काही एक गरज नाही.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आप की कशिश सरफरोश है.... आप का नशा युह मदहोश है ;) {Aashiq Banaya Aapne }

विश्वनाथ मेहेंदळे's picture

18 Nov 2014 - 11:59 am | विश्वनाथ मेहेंदळे

आक्षेपावर आक्षेप घेणाऱ्यांसाठी....
हीच जाहिरात वेगळ्या धर्मासाठी आहे असे समजा. "हिंदुंनो जागे व्हा, अन्यथा भायखळयाचा भेंडीबाजार होईल". चालेल ?? Acceptable ???

वामन देशमुख's picture

18 Nov 2014 - 8:42 pm | वामन देशमुख

हीच जाहिरात वेगळ्या धर्मासाठी आहे असे समजा. "हिंदुंनो जागे व्हा, अन्यथा भायखळयाचा भेंडीबाजार होईल". चालेल ?? Acceptable ???

हो, चालेल, नक्की चालेल.
आता असे म्हणू नका की हे चालते तर ते का चालत नाही,

  1. भारताच्या जवानांनी पाकिस्तानी सैनिकांवर गोळीबार केला
  2. पाकिस्तानी सैनिकांनी भारताच्या जवानांवर गोळीबार केला

यात दोन्हीत (एक भारतीय म्हणून) काही फरक आहे की नाही?
की दोन्ही स्वीकारा किंवा दोन्ही नाकारा अशी बायनरी भूमिका घ्यायची?

कुठलाही धर्म जात टिकवण्यासाठी संतती जन्माला घालणे हा सरासर मूर्खपणा आहे. संततीचा निर्णय जोडप्याने केवळ कौटुंबिक/ आर्थिक परिस्थिती बघुनच घ्यावा.