नको ..

गवि's picture
गवि in जे न देखे रवी...
15 Nov 2014 - 12:59 am

मागे नको वळू कारण पुढे ठेच लागेल
मग निघेल जिभाळी अन जिव्हारी लागेल..

मागे नको वळू कारण मन वेडझवं
मागे वळून म्हणेल त्याला पुन्हा सगळं हवं..

मागे नको वळू कारण खोळंबत राहशील
सुकलेल्या पळांशी उगा झळंबत राहशील..

मागे नको वळू कारण मागे रस्ते नसतील
मागे नको वळू तुला माझे डोळे दिसतील..

कविता

प्रतिक्रिया

लैच सेंटी लिवताय हो गवि...आवडलं हेवेसांनल.

अर्धवटराव's picture

15 Nov 2014 - 3:44 am | अर्धवटराव

वाय इ एस - येस म्हणजे हो
===================================
एकदा तरी वळुन बघ, पुढे तसंही जायचं आहे.
एव्हढा वेळ मथलेलं लोणि आत्ताच तर खायचं आहे.

एकदा तरी वळुन बघ मनाला दे दिलासा
स्मृतीला काय माहित कधि क्षण येईल असा

एकदा तरी वळुन बघ घडी दोन घडी
मग तर करायचीच आहे जिंदगीची नासाडी

एकदा तरी वळुन बघ दिसतील परत वाटा
मी तरी केला नाहि तुला कधिच टाटा
=================================
स्वारी बर्का गविशेठ... शीघ्रकाव्याची स्फूर्ती आलि तुमची कविता वाचुन :)

पाषाणभेद's picture

16 Nov 2014 - 3:19 am | पाषाणभेद

गवि अन अर्धवट रावांना पूर्ण गूण देण्यात येत आहे.

माम्लेदारचा पन्खा's picture

15 Nov 2014 - 7:14 am | माम्लेदारचा पन्खा

तिथंच खरी सगळी गोम आहे.....

मन खेळी ते वैरी न खेळी ....

सतिश गावडे's picture

15 Nov 2014 - 10:33 am | सतिश गावडे

नको.. :(

प्रचेतस's picture

15 Nov 2014 - 10:34 am | प्रचेतस

गवि आणि अर्धवटराव.

दोघांच्याही रचना सुरेख.

सस्नेह's picture

15 Nov 2014 - 10:58 am | सस्नेह

+१

विवेकपटाईत's picture

15 Nov 2014 - 12:31 pm | विवेकपटाईत

मस्त कविता आवडली

मागे वळू नकोस
हरवलेली युती दिसेल
पंधरा वर्षांचा वनवास दिसेल

पुढेच बघ
पुढे पवार दिसेल
सत्तेचा पावर दिसेल

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

15 Nov 2014 - 9:38 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

__/\__!

यसवायजी's picture

15 Nov 2014 - 9:40 pm | यसवायजी

मागे नको वळू तुला सहन नाही होणार
नव्या ऐटमशी मी सेटींग करत असणार ;)

आतिवास's picture

15 Nov 2014 - 9:43 pm | आतिवास

रचना आवडली.
पण तो 'कारण' शब्द मात्र - विशेषतः इतक्या वेळा - जरा खटकला - म्हणजे भलताच गद्य वाटला तो!

गवि
जी किक बरळप्रहर वाचुन बसली ती यात नाही बसली.
कविचा अंदाज आल्याने असेल
मात्र येडझव शब्द प्रचंड खटकला ( अश्लील वगैरे कारणासाठी अजिबात नाही )
तो कृत्रिम रंगवलेला वाटला

होकाका's picture

16 Nov 2014 - 8:07 pm | होकाका

शब्द पटला, रुचला.... कधी कधी होतं असं... स्वतःबद्दल असंच काहीसं वाटून जातं.

आयुर्हित's picture

16 Nov 2014 - 12:12 am | आयुर्हित

श्री ४२० ची नादिरा आणि "मूड मूड के न देख मूड मूड के....." आठवले.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Nov 2014 - 1:05 am | अत्रुप्त आत्मा

गवि = कवि

होकाका's picture

16 Nov 2014 - 8:01 pm | होकाका

सुकलेल्या पळांशी उगा झळंबत राहशील..

"झळंबत" हा शब्द चांगलाच दमदार आहे. आवडेश. .

नव्या दमाचे जुनेच कवी गवि आणि शीघ्रकवी अर्धवटराव ह्या दोघांच्या ही कविता आवडल्या.

चाणक्य's picture

16 Nov 2014 - 8:07 pm | चाणक्य

शेवटचं कडवं विशेष