हातात आहे ग्लास आणि सर्वकाही सत्य आहे
बहरत्या या बरळप्रहरी सर्वकाही शक्य आहे
फेसाळती शाम-ए-गझल अन बेगडीसा सूर आहे
आज सच्ची काहीबाही वाहवाही शक्य आहे
अधभरा अन अधरिकामा जीवनाचा जाम आहे
याच प्रहरी भाडखाऊ फलसफाही शक्य आहे
और जामे-आरजू गर मुठ्ठिमध्ये घट्ट आहे
बाकी सारे मिथ्य कहेना या प्रवाही शक्य आहे
यकृताच्या गाळणीला कुछ पलांचे काम आहे
याचवेळी काव्य काही अर्थवाही शक्य आहे
प्रतिक्रिया
5 Nov 2014 - 12:52 pm | सतिश गावडे
बरेच दिवसांनी गवि लिहिते झाले. :)
5 Nov 2014 - 12:55 pm | स्वप्नज
>>>>>यकृताच्या गाळणीला कुछ पलांचे काम आहे
याचवेळी काव्य काही अर्थवाही शक्य आह<<<
क्या बात.....!
5 Nov 2014 - 12:59 pm | अत्रुप्त आत्मा
वाह्ह!
5 Nov 2014 - 1:09 pm | मदनबाण
झिंग आली ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Pentagon report a manifestation of Pakistan's support to terrorism: India
ANNUAL REPORT TO CONGRESS Military and Security Developments Involving the People’s Republic of China 2014 {2014_DoD_China_Report PDF}
Robert Vadra's Sky Light Realty inventory zooms tenfold over three years
5 Nov 2014 - 1:18 pm | कंजूस
कृतकृत्य झालो दोपहरी.
5 Nov 2014 - 1:39 pm | यसवायजी
एकदम ग्लास.. आपलं हे.. ते.. क्लास्स !!!
5 Nov 2014 - 1:59 pm | समीरसूर
क्या बात!
5 Nov 2014 - 2:22 pm | सूड
ह्म्म्म !!
5 Nov 2014 - 2:39 pm | ज्ञानोबाचे पैजार
यकृताच्या गाळणीला कुछ पलांचे काम आहे
याचवेळी काव्य काही अर्थवाही शक्य आहे
हे विषेश आवडले
पैजारबुवा,
5 Nov 2014 - 3:08 pm | मारवा
अगदि खर विचारल मला एक शंका होती गवि निबंध नाही लिहु शकणार म्हणजे प्रकृतीला सुटेबल नाही म्हणुन.
परंतु वरील कविता वाचली आणी माझी खात्री झाली गवि कुठलाही फॉर्म हाताळु शकतात ली....ल.....या....
उदा. त्यांना कोणी नितंब हा विषय दिला निबंधा साठी तरी
बघा एक झकास निबंध ते लिहुन देतात की नाही.
सुरुवात थोडी नॉस्टॅल्जीक करतील स्वभावाप्रमाणे म्हणजे थोडीशी अशी
एक काळ होता आमच बुड टेकायच सहजच जुन्या अॅटलस च्या आखुड सीट वर आणि आम्ही सहज शेअर करायचो शाळेत एका बाकड्यावर च तीन बुड.
पर अब वो बात नही रही और अब ये आलम है की तशरीफं टिकती नही हमारी ...
गवि कविता जबराट आवडली !!!
(सहज गंमत जंमत केली कृपया रागावु नका आदरवाइज घेउ नका )
5 Nov 2014 - 5:24 pm | कवितानागेश
मस्तय गझल.
मला तो जुना 'मराठीवर हिन्दीचं अतिक्रमण'... का असाच काहीतरी असलेला एक धागा आठवला. ;)
5 Nov 2014 - 6:32 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
चीयर्स!!
5 Nov 2014 - 8:12 pm | विवेकपटाईत
कविता आवडली.
5 Nov 2014 - 10:18 pm | आयुर्हित
"बरळप्रहर" एक नवीन प्रहर जन्माला घातल्या बद्दल आभार.
आता गविंना "प्रहरपिता" म्हणून संबोधनात यावे.
आजपासून संपूर्ण दिवसात(अहोरात्र) ९ प्रहर राहतील याची सर्व पंचांगकर्ते व ज्योतिषी यांनी नोंद घ्यावी.
संगीत तज्ञांनो या नवीन प्रहरासाठी कोणकोणते राग गावेत हे स्पष्ट करावे!
गजल फारच छान जमली आहे.
5 Nov 2014 - 10:34 pm | प्रकाश१११
सुरेख
6 Nov 2014 - 12:13 am | अर्धवटराव
च्यामारी... काय ति डोक्यालिटी =))
6 Nov 2014 - 1:54 am | पहाटवारा
वनडे एके दिवशी ..फोक्सनची कोल्हा .. गार्ड्नच्या बागेमधे .. फिरायला गेला !
-पहाटवारा
6 Nov 2014 - 4:05 am | स्पंदना
शिर्षक वाचुनच विकेट उडाली.
मस्त कविता.
6 Nov 2014 - 2:43 pm | psajid
"यकृताच्या गाळणीला कुछ पलांचे काम आहे
याचवेळी काव्य काही अर्थवाही शक्य आहे"
अर्थात घेतल्याने सर्व शक्य आहे आधी घेतलेची पाहिजे हेच खरं ! पण काहीही असू दे गझल आवडली !
9 Nov 2014 - 2:44 pm | गणेशा
बहरत्या या बरळप्रहरी सर्वकाही शक्य आहे