तर मंडळी आता अॅन्ड्रॉइड वरुन विंडोज ८.१ {अपडेट} वर शिफ्ट झालो आहे. नव्या ओएस आणि नव्या फोनचा अनुभव चांगला आहे. अॅन्ड्रॉइडच्या युजर इंटरफेसला आता अनेकजण कंटाळले आहेत, आणि सर्व जण नव्या नव्या ओएस वापरण्यास उत्सुक आहेत.
हा धागा लुमियाचे अनुभव / अॅप्स / सेटिंग्स /सिक्युरिटी / तांत्रिक माहिती यासाठी पूर्णपणे खुला आहे, इथे मिपावर लुमिया वापरकर्ते आहेतच त्यांनीही त्यांना माहित असलेल्या गोष्टींची भर या धाग्यात जरुर घालावी. :)
अॅप्स :-
१} Transfer my Data :-
नविन फोन घेतला की सगळ्यात पहिले काम असते ते आधीच्या फोन मधले फोन कॉन्टॅक्स नविन मोबाइल मधे मुव्ह करणे. बरेच जण गुगल सिंक करुन ठेवतात,पण काही वेळा काही तांत्रिक कारणांमुळे हे होत नाही. लुमिया मधे ट्रान्सफर माय डेटा हे अॅप आहे, हे अॅप वापरुन ब्लू-टुथ च्या सहाय्याने अॅन्ड्रॉइड मधले सगळे फोन कॉन्टॅक्स इंपोर्ट करता येतात.
२} Authenticator :-
विंडोजवर शिफ्ट होण्यापूर्वी मी आधी जी-मेल साठी असलेले २-स्टेप अॅथंटिकेटर अॅप वापरत होतो, मेल सिक्युरिटी महत्वाची असल्याने मी आधी विंडोजसाठी असे अॅप आहे का ? ते शोधले. ते मिळाले आणि मगच विंडोजवर स्वीच मारण्याचा निर्णय घेतला.
सध्या जसे जसे अॅप्स निवडत जाईन तसे तसे या धाग्यावर ती मी देत जाईन... अॅन्ड्रॉइडवर उपलब्ध असलेली बरीचशी अॅप्स विंडोजवर उपलब्ध आहेत,अगदी व्हॉट्अॅप सकट. अजुन बरीचशी यायची देखील आहेत. तेव्हा तुमच्या लुमिया संदर्भात सर्व प्रतिसादांचे स्वागत आहे.
मायक्रोसॉफ्ट अॅप स्टोअर :- http://www.windowsphone.com/en-us/store/featured-apps
मदनबाण.....
प्रतिक्रिया
13 Oct 2014 - 10:31 am | जेपी
15 दिवसापुर्वीच लुमीया घेतला.java वरुन थेट microsoft वर आलोय.थोड अवघड जात आहे.सध्या फक्त नेट वापरणे आणी गेम खेळणे एवढाच वापर आहे.
धागा आला आहे तर जरा वापर सोपा होईल अशी आशा आहे.
वाखू साठवतो
13 Oct 2014 - 10:44 am | कंजूस
चांगली सुरुवात .१)जीमेल लॉगिन करतानाच विचारतात तुम्हाला टु वे लॉगिन हवे आहे का तर वेगळे अॅप कशाला ? २)नवीनच ८.१ असलेला ६३०/७३०/८३० घेतला का जुना अपगरेड केला ?तुम्ही फोन ८ वरून ८.१ अपग्रेड केला असेल तर कुठून केला ?सर्विस सेंटरला वॉरंटी काळात फ्री करतात असे परवा कळले का घरीच वाईफाईवर केला ?
उत्सुकता म्हणून विचारले, प्रश्न चुकीचा असेल.मी त्यांच्या स्पेसि वाचून विचारले आहे.
13 Oct 2014 - 11:24 am | मदनबाण
जीमेल लॉगिन करतानाच विचारतात तुम्हाला टु वे लॉगिन हवे आहे का तर वेगळे अॅप कशाला ?
गुगल त्यांच्या मेल अकांउटसाठी 2-Step Verification पद्धत उपलब्ध करुन देते. यात कोड एसएमएसनी येण्याची सुविधा अहे तसेच अॅप थ्रू जनरेटेड कोड टाकुन सुद्धा लॉगिन करण्याची सुविधा आहे. आता समजा तुम्ही अश्या जागी गेलात जिथे नेटवर्क सारखे जाते आहे किंवा नेटवर्क मिळत नाही अशा वेळी तुम्हाला मेल चेक करायचे आहे, पण 2-Step Verification कोड एसएमएस नी कसा मिळणार ? अशा वेळी हे अॅप कामाला येते. :) शिवाय सारख्या कोडवाल्या एसएमएस नी मोबाइल भरला जाणार नाही. त्यामुळे अनेक जण कोड थ्रू एसएमएस च्या जागी अॅपला पसंती देतात ज्यात मी सुद्धा येतो. :)
नवीनच ८.१ असलेला ६३०/७३०/८३० घेतला का जुना अपगरेड केला ?तुम्ही फोन ८ वरून ८.१ अपग्रेड केला असेल तर कुठून केला ?सर्विस सेंटरला वॉरंटी काळात फ्री करतात असे परवा कळले का घरीच वाईफाईवर केला ?
उत्सुकता म्हणून विचारले, प्रश्न चुकीचा असेल.मी त्यांच्या स्पेसि वाचून विचारले आहे.
नोकिया लुमिया ७३० हिंदुस्थानी बाजारपेठेत नव्याने दाखल झाला आहे, अनेक ऑनलाइन शॉपिंग पोर्टलवर आता ते उपलब्ध होत आहेत / झालेले आहेत, पण हवा तो रंग मिळण्यासाठी वेळ लागु शकतो.
या मॉडेल बद्धल अधिक इकडे :- Nokia Lumia 730 Dual SIM - Detailed specifications
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मराठीचे सोयीस्कर अस्मिताकारण
13 Oct 2014 - 3:24 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
२ स्टेप व्हेरिफिकेशन ला १० किंवा ५ ऑफ-नेटवर्क किज सुद्धा मिळतात. त्या फोन नोट्स मधे सेव्ह करुन ठेवायच्या. बाकी जी-मेल अॅप स्लो चालत म्हनुन माझं अकाऊंट मेल सेटिंग वापरुनचं कॉन्फिगर केलयं. :)
13 Oct 2014 - 3:19 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
*२० सिरिज ला ८.१ अधिकृतरित्या उपलब्ध नाही. मी वॉरंटी वर पाणी सोडुन मा़झ्या ७२० वर ८.१ टाकलय. मस्त आहे.
13 Oct 2014 - 10:56 am | पैसा
मदनबाणाकडे नोकिया लुमिया आहे हे कळले. हुच्चभ्रू कुठचा! ;)
मी नव्या कार्बन विंड वर गूगल कॉण्टॅक्ट्स एकदाच सिंक केले आणि मग अपडेट्स ऑफ केले. आता लॉग आऊट करून कॉण्टॅक्ट्स इन टॅक्ट रहातात का ते बघायला पाहिजे. अँड्रॉईडवरच्या फेसबुक अपडेट्स इ चा मरणाचा कंटाळा आला होता. त्यातून सध्या सुटका झाली आहे. बाकी गेम्स इ. मधे फार इंटरेस्ट नाही. अँटीव्हायरस बद्दल मोठे प्रश्नचिन्ह आहे. स्टोअरमधे उपलब्ध दिसले नाही. विंडोज असल्याने अँटिव्हायरस आवश्यक असणारच.
देवनागरीसाठी हिंदी भाषा आणि कीबोर्ड पॅक डाऊनलोड केले. मात्र कीबोर्ड क्वेर्टी नसल्याने जरा अक्षरे शोधावी लागतात. खरे तर सोपे आहे, कारण अक्षरे एका लायनीत आहेत. क ख ग घ अशी. पण गूगलच्या कीबोर्डाची वैट्ट सवय झाली आहे.
बॅटरी बॅक अप उत्तम आहे. २ दिवस वापरूनही ५०% हून जास्त बॅटरी शिल्लक रहाते. अँड्रॉईड फोन म्हणजे रोज सकाळच्या चहाबरोबर फोन चार्जिंगला लावायला लागतो. वैताग आला होता.
13 Oct 2014 - 11:40 am | मदनबाण
मदनबाणाकडे नोकिया लुमिया आहे हे कळले. हुच्चभ्रू कुठचा!
टोमणे कळतात हो... ;) विंडोजवर माझ्या आधी उडी मारुन आणि व्हॉट्सअॅपवर तसे कळवुन आपण माझ्या आधी हुच्चभ्रू झाला आहात हे आधी सांगावे. ;)
अँटीव्हायरस बद्दल मोठे प्रश्नचिन्ह आहे. स्टोअरमधे उपलब्ध दिसले नाही. विंडोज असल्याने अँटिव्हायरस आवश्यक असणारच.
मी देखील बरेच शोधले पण अँटीव्हायरस बद्धल कुठे अ सुद्धा सापडला नाही.
देवनागरीसाठी हिंदी भाषा आणि कीबोर्ड पॅक डाऊनलोड केले. मात्र कीबोर्ड क्वेर्टी नसल्याने जरा अक्षरे शोधावी लागतात. खरे तर सोपे आहे, कारण अक्षरे एका लायनीत आहेत. क ख ग घ अशी. पण गूगलच्या कीबोर्डाची वैट्ट सवय झाली आहे.
अगदी ! अगदी... मी अजुनही चाचपडतोय या बाबतीत, पण तू माझ्या पेक्षा मस्त लिहतीस... ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मराठीचे सोयीस्कर अस्मिताकारण
13 Oct 2014 - 2:47 pm | प्रभो
लुमिया मधी फोन रूट करायची सुविधा नाही. ८.१ पासून फाईल्स बघायचे अॅप तरी आले.
रूट न होणार्या फोनला कसला व्हायरस येणार?
13 Oct 2014 - 3:45 pm | मदनबाण
लुमिया मधी फोन रूट करायची सुविधा नाही. ८.१ पासून फाईल्स बघायचे अॅप तरी आले.
रूट न होणार्या फोनला कसला व्हायरस येणार?
अॅप्स सॅन्डबॉक्स मधे रन होतात, आणि प्रत्येक अॅपची सर्व्हीस वेगळी रन होत असल्याने या फोनला व्हायरसचा त्रास नाही असे जालावर वाचले आहे. :)
बाकी, प्रभो च्यामारी... आता उगवलास रे ? कुठे गायबला होतास मधे ? आठवतय का आपल्याला बोलुन जमाना झाला आता ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मराठीचे सोयीस्कर अस्मिताकारण
13 Oct 2014 - 5:54 pm | प्रभो
हाहाहा...
आजकाल वेळ कमी मिळतो रे इकडे यायला. मधून अधून असतो वाचनमात्र :)
14 Oct 2014 - 8:53 pm | सुहास..
आजकाल वेळ कमी मिळतो रे इकडे यायला. मधून अधून असतो वाचनमात्र >>>
हम्म्म ! भेट, मग दाखवतोच तुला ;)
असो ..
माझा लुमिया नाही पण नोकियाचा ५०० आहे ! मस्त आहे फोन, मोबाईल टिव्ही पासुन ते कंपनीचा चाट-अॅप्लीकेशन देखील मस्त चालतो आहे , एक अधुन मधुन नेटवर्क सोडुन देतो ...त्याच काही व्हायरस ई. कारण असु शकते का ?
13 Oct 2014 - 11:22 am | भाते
मी वाटच पहात होतो हा धागा कधी येतो याची. वाखू साठवत आहे.
एक प्रश्न - विंडोज ८.१ मध्ये अॅप्स आणि गेम्स मेमरी कार्ड वर टाकायची सोय आहे का?
आधीच्या विंडोज ८ मध्ये ती सोय उपलब्ध नव्हती आणि या अपडेट मध्ये ती सोय देण्यात येणार होती असे वाचले होते.
13 Oct 2014 - 11:31 am | पैसा
वॉट्स अॅप आणि तत्सम काही प्रकार वगळता बहुतेक सगळी अॅप्स मेमरी कार्डावर सहज हलवता येतात. माझ्या फोनची रॅम ५१२ एम्बी आहे. पण एमेस ऑफिस फाईल्स व्यवस्थित उघडतात. आय ई ब्राउझरसुद्धा चांगला चालतो आहे.
13 Oct 2014 - 11:47 am | मदनबाण
विंडोज ८.१ मध्ये अॅप्स आणि गेम्स मेमरी कार्ड वर टाकायची सोय आहे का?
हो आहे. Settings => storage Sence मधे जाउन एसडी कार्ड डेटा सेव्ह करण्याचे ४ पर्याय दिलेले आहेत, शिवाय storage Sence => phone => apps+games मधे जाउन बाय डिफॉल्ट सिस्टम मधे असलेली अॅप्स सुद्धा मेमरी कार्डावर ट्रान्सफर करता येतात. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मराठीचे सोयीस्कर अस्मिताकारण
13 Oct 2014 - 7:57 pm | भाते
चला, आता लुमिया घ्यायला हरकत नाही. याचसाठी थांबलो होतो मी.
स्वस्तातल्या लुमियामध्ये फोन मेमरी फक्त ८ जीबी. त्यातली २.५/३ जीबी विंडोज घेणार.
मग उरलेल्या जागेत किती अॅप्स आणि गेम्स मावणार?
14 Oct 2014 - 7:09 am | मदनबाण
चला, आता लुमिया घ्यायला हरकत नाही. याचसाठी थांबलो होतो मी.
घेउन टाक बिनधास्त !
स्वस्तातल्या लुमियामध्ये फोन मेमरी फक्त ८ जीबी. त्यातली २.५/३ जीबी विंडोज घेणार.
मग उरलेल्या जागेत किती अॅप्स आणि गेम्स मावणार?
माझ्या फोनची Mass memory: 8 GB आहे. बरीच अॅप्स टाकुन सुद्धा ३.२१ जिबी GB फ्री आहे. :) अर्थात डेटा कार्डवर अॅप्स मुव्ह करता येत असल्याने प्रॉब्लेम इल्ले ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- काश्मीरमध्ये ISISचे झेंडे, सुरक्षा एजेन्सी सतर्क
28 Jul 2016 - 11:44 am | आशु जोग
वेबवरून पूर्वी लुमियामधे काँटॅक्ट अॅड करताना ग्रुपही देता येत असे. आता ते नाही करता येत.
आणि
एक्स्पोर्ट करताना काँटॅक्ट लिस्ट ग्रुपसकट होत नाही.
13 Oct 2014 - 3:20 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
सेटिंग मधे जाऊन अॅप्स मेमरी कार्ड वर टाकायची उत्तम सोय आहे.
13 Oct 2014 - 11:27 am | जेपी
वाखू साठवायची सोय कस काय नाय या धाग्यात.
13 Oct 2014 - 12:28 pm | रवीराज
मोठ्या साइजच्या फाइल शेअर करण्याची पुर्वी सोय नव्हती, परंतु आता Easy Transfer या अॅपमुळे अडचण दुर झाली.
13 Oct 2014 - 1:18 pm | मदनबाण
धन्यवाद रवीराज. :) आपण वापरत असलेली इतरही उपयोगी अॅप्स सांगा. जमल्यास त्या अॅपचा स्टोअर वरचा दुवा देखील द्या.
Easy Transfer
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मराठीचे सोयीस्कर अस्मिताकारण
16 Oct 2014 - 10:30 am | मदनबाण
@ रवीराज
माझ्याकडे हे अॅप वापरुन पीसीला कनेक्ट करता येत नाही ! :( बरेच टाळके चालवले, फोनला स्टॅटिक आयपी देउन पाहिला, पीसी मधे एफटीपी एनेबल करुन पाहिले. राउटरवर वायफाय चॅनल :- ११ करुन पाहिला. अजुन बरेच उध्योग करुन पाहिल पण जम्या नय ! काही मदत मिळेल का ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup
इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण
18 Oct 2014 - 5:22 pm | रवीराज
Moliplayer मधुनसुद्धा वायफाय वापरता येते, ते एकदा वापरुन पहा.
20 Oct 2014 - 9:41 am | मदनबाण
ओक्के. ट्राय मारुन पाहतो...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Maharashtra and Haryana poll victories will give Narendra Modi a tremendous boost to pursue economic reforms
13 Oct 2014 - 2:37 pm | रवीराज
सर्व प्रकारच्या विडियो फाइल चालवण्यासाठी हा प्लेयर उत्तम आहे.
(हि पण अडचण दुर झाली )
13 Oct 2014 - 3:53 pm | मदनबाण
MoliPlayer चे प्रो व्हर्जन अॅप स्टोअरवर दिसते आहे{ पेड व्हर्जन}, पण साधे { फ्री } कुठे दिसत नाही ते !
बाकी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मराठीचे सोयीस्कर अस्मिताकारण
13 Oct 2014 - 6:05 pm | रवीराज
Moliplayer काढुन टाकला वाटत स्टोर मधुन
13 Oct 2014 - 7:20 pm | रवीराज
रिजन सेटिंग मधे जाउन चायना सिलेक्ट करा नंतर स्टोर मधुन moliplayer डाउनलोड करा, आता रिजन सेटिंग परत इंडिया करा
काळजी नका करु काही प्रॅाबलेम होणार नाही फोनला.
आता moliplayer चालु करा चायनीज भाषेमधे पेज चालू होइल, त्यामधील शेवटची लिंक निवडा आणि बघा फोनमधील कोणताही फॅारमॅटमधील विडियो चकटफु.
13 Oct 2014 - 10:53 pm | मदनबाण
धन्यवाद रवीराज ! तुम्ही सांगितले तसेच केले आणि moliplayer इनस्टॉल केला. :)
तसेच Easy Transfer सुद्धा इनस्टॉल केले.
सध्या एक गोष्टीवर जाम टाळक चालवतोय पण ते होत नाही, फोन ड्युल सिम सपोर्ट करणारा आहे,पण मी सध्या एकच सीम वापरतो आहे, त्यामुळे वरती नोटिफिकेशन मधे सेकंड सिम नसल्याचा आयकॉन दिसत राहतो ! :( काल तो Settings=>notifications+ actions=>2 Phone -No SIM => OFF असा सेट केला होता. परंतु आता तो परत दिसु लागला आहे. :( काही उपाय आहे की हा बग आहे ?
जागो ग्राहक जागो :- मी जेव्हा नोकिया लुमिया घेतला तेव्हा त्या बॉक्सवर व्होडाफोनचा इंटरनेट ऑफरचा स्टिकर होता ज्यावर लिहले होते की १ जिबी डेटा एक महिना असे २ महिने. {याचा अर्थ २ महिन्यासाठी १-१ जिबी इंटरनेट डेटा चकटफु देण्यात आले आहे.} व्होडाफोनच्या गॅलरीत गेलो तिथे माझे जुने सिमकार्ड डिअॅक्टिवेट करुन नविन मायक्रो सीम कार्ड घेतले. { ७३० मायक्रो सिम कार्डच सपोर्ट करते.}तिथल्याच माणसाकडुन ते मोबाइल मधे टाकुन घेतले, तो म्हणाला हे नविन सिमकार्ड २ तासात चालु होइल आणि आधीचे कार्ड बंद होइल. त्यांना नोकियाचा बॉक्स दाखवला,व्होडाफोनचा इंटरनेट ऑफरचा स्टीकर दाखवला, तेव्हा त्यांनी सांगितले की ४८ तासात इंटरनेट चालु होइल. पण ४८ तास उलटुन देखील मला या ऑफरचा कोणताही मेसेज आला नाही. मग मी व्होडाफोन केअरला फोन लावला. वाईट अनुभव आला ! त्यांच्या म्हणण्या नुसार अशी कोणतीही ऑफर नाही ! तसेच या नोकिया मॉडलचा समावेश अशा कोणत्याही इंटरनेट ऑफर मधे नाही. आम्ही चेक करतो. दुसर्यांदा फोन केला तर बराच वेळ होल्डवर ठेवुन दिला परत तीच माहिती दिली, मी सांगितले की मला तुझ्या टिम लिडशी बोलायचे आहे, फोन ट्रान्सफर करतो म्हणाला पण केला नाही ! कॉल भलत्याच ठिकाणी डायव्हर्ट केला ज्यामुळे मला परत फोन कट करावा लागला. परत संध्याकाळी हापिसातुन घरी आल्यावर फोन केला तरी परत तेच की अशी कोणतीही ऑफर नाही. मी म्हणालो जर अशी कोणतीही ऑफर नाही तर मग व्होडाफोनचा स्टिकर बॉक्सवर कसा ? तसेच तुमच्या डेटाबेस मधे या मॉडेलचा केमांक कसा नाही ? माझी तक्रार नोंदवुन घ्या ! आधी तयार नव्हता,पण मी म्हणालो की मी आता व्होडाफोनला आणि TRAI मेल करणार आहे आणि त्यासाठी मला तक्रार नोंदवायची आहे. माझा एकंदर चढलेला पारा लक्षात येउन तक्रार नोंदवली गेली, तसेच तक्रार क्रमांक एसएमएस द्वारा मला पाठवला.
आता माझी सटकली ! ऐकत नाहीत काय ? माझ्या मोबाइलच्या खोक्याचे सगळ्या अँगलने फोटो काढले. ज्यात व्होडाफोनच्या इंटरनेटचा ऑफरचा स्टीकर सुद्धा नीट दिसेल असे.
मग इकडे गेलो:- http://www.trai.gov.in/ContactUs_List.aspx तिथला मेल आयडी घेतला तसेच या पानावर गेलो :-http://www.trai.gov.in/Content/StaffContactUs/5.aspx इथले सगळे मेल आयडी घेतले. मग व्होडाफोनला मस्त मेल लिहला आणि मोबाइल बॉक्सचे काढलेलेले सगळे फोटो मेलला अॅटॅच केले आणि व्होडाफोनला पाठवुन दिला.
हा प्रतिसाद टंकत असतानाच २ मेसेज आले,माझे फ्री इंटरनेट कनेक्शन २४ तासात चालु होइल असा पहिला मेसेज आणि तुमचे इंटरनेट चालु झाले आहे असा दुसरा मेसेज !
जो मोबाइल मॉडेल नंबर त्यांच्या डेटाबेस मधे नव्हता आणि अशी कोणतीही ऑफर उपलबध नाही असे सांगणारे व्होडाफोन एका मेल मधेच ताळ्यावर आले. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मराठीचे सोयीस्कर अस्मिताकारण
14 Oct 2014 - 7:15 am | रवीराज
वोडाफोनची सेवा चांगली आहे असे ऐकुन होते पण तुमच्या अनुभवावरुन असे दिसते कि, वोडाफोनही काही वेगळे नाही.
लढुन २ जीबी जिंकल्याबद्दल अभिनंदन
सध्या ७२० वापरत असल्याने ड्युअल सिम बद्दल आयडीया नाही.
14 Oct 2014 - 9:23 am | मदनबाण
धन्यवाद !
सध्या ७२० वापरत असल्याने ड्युअल सिम बद्दल आयडीया नाही.
ओक्के हरकत नाही. :) मी Network+ टाकल्या पासुन हा बदल झाल्याचे वाटते आहे. तसा याचा त्रास काही नाही.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- काश्मीरमध्ये ISISचे झेंडे, सुरक्षा एजेन्सी सतर्क
13 Oct 2014 - 2:54 pm | मुक्त विहारि
आम्ही पहिल्यापासूनच नोकियाचे पंखे.... अगदी १११० पासून...
असो... आता आज नाही तर उद्या, लीनोव्हाने टच स्क्रीन टाकली की, परत एकदा नोकिया एके नोकिया...
13 Oct 2014 - 5:16 pm | कंजूस
जीमेलचे अॅप समजले, धन्यवाद.
आता महत्त्वाचा प्रश्न की ज्याच्यासाठी थांबलो आहे : या फोनमध्ये जे ऑफलाईन नोटस (=OneNote ?) फोल्डर आहे त्यात किती मोठी फाईल (Character size)साठवता येते ?आणि किती मोठी(character size) त्यातून कॉपीपेस्ट करता एकावेळी उचलता येते ?
माझ्या जुन्या डबीत ५००० कैरेक्टर ची फाईल साठवता येते ,एडिट करता येते परंतु १०००कैरेक्टरचीच कॉपी पेस्ट करते त्यामुळे मोठा लेख लिहितांना हात आखडता घ्यावा लागतो. सर्वाँना धन्यवाद.
13 Oct 2014 - 10:56 pm | मदनबाण
या फोनमध्ये जे ऑफलाईन नोटस (=OneNote ?) फोल्डर आहे त्यात किती मोठी फाईल (Character size)साठवता येते ?आणि किती मोठी(character size) त्यातून कॉपीपेस्ट करता एकावेळी उचलता येते ?
माझ्या जुन्या डबीत ५००० कैरेक्टर ची फाईल साठवता येते ,एडिट करता येते परंतु १०००कैरेक्टरचीच कॉपी पेस्ट करते त्यामुळे मोठा लेख लिहितांना हात आखडता घ्यावा लागतो.
कंजुस मामा १०००कैरेक्टर टंकुन पाहणे सध्या तरी मला शक्य नसल्याने आपल्या प्रश्नाचे उत्तर देता येणार नाही. क्षमस्व !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मराठीचे सोयीस्कर अस्मिताकारण
14 Oct 2014 - 1:05 am | कंजूस
दुसरं काही लिखाण कॉपी पेस्ट करुन पाहता येईल.
14 Oct 2014 - 6:51 am | मदनबाण
दुसरं काही लिखाण कॉपी पेस्ट करुन पाहता येईल.
पुनःप्रकाशितः गुणामामा हा डांबिस कांकांचा लेख कॉपी करुन http://www.wordcounter.net/ जाउन पेस्ट केला.1 word 16972 characters असा काउंट आला. सेव्ह करायला वेळ घेतला. पण अख्खा लेख सेव्ह झाला. मला वाटते या उत्तराने आपले समाधान होइल. ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- काश्मीरमध्ये ISISचे झेंडे, सुरक्षा एजेन्सी सतर्क
14 Oct 2014 - 12:08 pm | कंजूस
होय चांगलीच मोठी फाईल कॉपी पेस्ट होते आहे. हे लगेच करून पाहिल्याबद्दल धन्यवाद.
एक तावभर (३० ओळी) मराठी लेखनाचे अंदाजे दोन हजार कैरेक्टर होतात. तुमच्या फोनने सोळा हजार म्हणजे आठ पानी लेखन कॉपी पेस्ट केले.
13 Oct 2014 - 6:20 pm | सामान्यनागरिक
मी सुद्धा नोकिया लुमिया घ्यायचा विचार करतो आहे. लुमिया मधे सर्वात उत्तम मॉडेल कुठले ? ६४जीबी चे कार्ड
टाकता येते का? की त्या पेक्षा कमी? वापरणाऱ्या लोकांकडुन उत्तम सल्ला मिळेल अशी आशा आहे. सध्या माझ्याकडे नोकिया N8 आहे.
13 Oct 2014 - 10:58 pm | मदनबाण
मी सुद्धा नोकिया लुमिया घ्यायचा विचार करतो आहे. लुमिया मधे सर्वात उत्तम मॉडेल कुठले ? ६४जीबी चे कार्ड
टाकता येते का? की त्या पेक्षा कमी? वापरणाऱ्या लोकांकडुन उत्तम सल्ला मिळेल अशी आशा आहे.
८.१ झकास आहे. बजेट नुसार मॉडेल मिळते. माझे मॉडेल Maximum memory card size: 128 GB सपोर्ट करते.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मराठीचे सोयीस्कर अस्मिताकारण
14 Oct 2014 - 6:58 am | मदनबाण
लुमिया फोन अपडेट करण्यासाठीचे टुल :-
Lumia System Updater
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- काश्मीरमध्ये ISISचे झेंडे, सुरक्षा एजेन्सी सतर्क
14 Oct 2014 - 7:29 am | रवीराज
Cortana आहे का तुमच्या फोनमधे, मी वाट बघतोय कधी उपलब्ध होईल त्याची.
14 Oct 2014 - 9:23 am | मदनबाण
Cortana आहे का तुमच्या फोनमधे, मी वाट बघतोय कधी उपलब्ध होईल त्याची.
हो आहे ना ! सॉलिड्ड आहे. :) बाय डिफॉल्ट डिसेबल आहे,पण Seetings=> speech मधे जाउन English { United Kingdom } English { United States } या भाषा टाकल्या की ते चालु होते.हे वापरण्यासाठी Seetings=> location=> On करावे लागले,आणि तुमची पर्सनल असिस्टंट मदतीला तत्पर होते. ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- काश्मीरमध्ये ISISचे झेंडे, सुरक्षा एजेन्सी सतर्क
8 Jul 2015 - 4:21 pm | शंतनु _०३१
८.१ मध्ये कोर्टाना उपलब्ध आहे, पण डेटा pack असेल तरच चालते,
14 Oct 2014 - 4:18 pm | मदनबाण
Storage Cleaner
वेळ घेत पण काम करतं हे अॅप.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- काश्मीरमध्ये ISISचे झेंडे, सुरक्षा एजेन्सी सतर्क
14 Oct 2014 - 7:56 pm | मोदक
मला जाणवलेला एकच प्रॉब्लेम.
लुमीया ७२० सोबत कंपनीने दिलेल्या हेडफोन्सला कॉल रिसीव्ह करायचे बटण नाहीये आणि फोनला ऑटो-अॅन्सर ऑप्शन नाहीये.
14 Oct 2014 - 8:45 pm | मदनबाण
७३० मधे तरी मला असा काही प्रॉब्लेम जाणवला नाही.स्क्रीनवर डबल टीक केले की स्क्रीन चालु होते. मी स्क्रीन बटनचा वापर न-करता लॉक करण्याचे अॅप शोधत होतो, ते आज मिळाले आणि इन्स्टॉल केले. जे अॅप हवे होते ते अगदी मनासारखे मिळाले. :)
१ } Touch Lock :- ह्या अॅपला टाइल करा आणि बटन दाबुन स्क्रीन लॉक करण्याच्या भानगडीतुन कायमचे मुक्त व्हा ! :)
मी वापरुन पाहिलेल्या अॅप मधे हे सगळ्यात फास्ट अॅप आहे. या अॅपला कुठल्याही कॉनफिगरेशनची गरज नाही. शिवाय लाल रंगाची टाइल असल्यामुळे पटकन लक्षात येते आणि वापरता देखील येते. सध्या मी हेच वापरतो आहे.
२ } Nice Lock :- हे दुसरे स्क्रीन लॉक करायचे अॅप आहे, यात तुम्ही या अॅपच्या टाइलचा हवा तो आयकॉन,टाइल अॅनिमेशन ,लॉकिंग साउंड आणि टाइल बॅक ग्राउंड कलर निवडु शकता. :) म्हणजे थीम मधे जो बॅकग्राउंड फोटो आहे त्या नुसार तुम्ही ही टाइल बनवु शकता. :) हे सुद्धा आवडले आणि इन्स्टॉल करुन ठेवले आहे.
वरच्या दोन अॅप मधे मी मी पहिल्या अॅपला माझी पसंती दिली आहे कारण ते जे हवे ते फास्ट करते आणि ते म्हणजे बटन न दाबता स्क्रीन लॉक करणे. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- काश्मीरमध्ये ISISचे झेंडे, सुरक्षा एजेन्सी सतर्क
14 Oct 2014 - 8:53 pm | मदनबाण
लुमीया ७२० सोबत कंपनीने दिलेल्या हेडफोन्सला कॉल रिसीव्ह करायचे बटण नाहीये आणि फोनला ऑटो-अॅन्सर ऑप्शन नाहीये.
ओह्ह... तुझा प्रतिसाद वाचण्यात माझी चूक झाली आहे... मी अजुन हेडफोन वापरुन हे चेक करुन पाहिले नाही. चेक केल्यावर सांगतो.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- काश्मीरमध्ये ISISचे झेंडे, सुरक्षा एजेन्सी सतर्क
3 Sep 2015 - 10:47 am | नरेन.
हा प्रॉब्लेम लुमीयाच्या सगळ्या फोन बरोबर आहे. अजुन तरी सोडवला नाही आहे. विन्डोस १० मध्ये सोडवला असेल तर कल्पना नाही.
3 Sep 2015 - 12:41 pm | कंजूस
कॅाल कुणाचा आहे हे स्क्रीनवर बघितल्यावरच घ्यायचा अशी योजना असावी.त्यामुळे ते कॅाल घेण्याचे बटण हेडफोनच्या वायरमध्ये ठेवले नसावे.
दुसरी कुठली बटणवाली वायर वापरू नये म्हणून हेडफोन्सचे स्टॅडर्डपिनचे कनेक्शन उलट केले आहे.
{ नेहमीच्या हेडफोनची चार पॅाइंटसची पीन हातात धरली तर हाताकडचे १)कॅामन,२)स्विच,३)कान पहिला,४)कान दुसरा
असे जोडलेले असते.
लुमियाच्या वायरमध्ये मुद्दाम १)स्विच,२)कॅामन असे फिरवले आहे.त्यामुळे दुसरी वायर चालत नाही.तर हा प्रॅाब्लेम मुद्दाम केला आहे.
3 Sep 2015 - 12:41 pm | कंजूस
कॅाल कुणाचा आहे हे स्क्रीनवर बघितल्यावरच घ्यायचा अशी योजना असावी.त्यामुळे ते कॅाल घेण्याचे बटण हेडफोनच्या वायरमध्ये ठेवले नसावे.
दुसरी कुठली बटणवाली वायर वापरू नये म्हणून हेडफोन्सचे स्टॅडर्डपिनचे कनेक्शन उलट केले आहे.
{ नेहमीच्या हेडफोनची चार पॅाइंटसची पीन हातात धरली तर हाताकडचे १)कॅामन,२)स्विच,३)कान पहिला,४)कान दुसरा
असे जोडलेले असते.
लुमियाच्या वायरमध्ये मुद्दाम १)स्विच,२)कॅामन असे फिरवले आहे.त्यामुळे दुसरी वायर चालत नाही.तर हा प्रॅाब्लेम मुद्दाम केला आहे.