भाजपला मत देण्याअगोदर या प्रश्नाची उत्तरे भाजपाने, त्यांच्या समर्थकांनी अथवा कोणीही द्यावीत ..??
वरील पैकी मी कोणीही या सदरात येतो व कोणीही उत्तरे दिल्यास हवीत म्हणून मी माझ्या अल्प बुद्धी प्रमाणे ती देत आहे.
१) महाराष्ट्रात सुद्धा मोदींच्या नावेच मते का मागता ..
>> मोदी हे देशव्यापी नेतृत्व आहे. राज्य भाजपा ही अखिल भारतीय स्तरावरील पक्षाची शाखा आहे. न चालणारा माल दुसरीकडून कच्च्या ब्रांड खाली विकायला काढलेली स्वतंत्र सिस्टर कन्सर्न नव्हे. मग देशव्यापी नेता जो काही नवीन घडवू पहात आहे त्याच्याच नावाने मते मागायची ना ?
२) लोकसभेत मोदींना बघून मत दिले, ते पंतप्रधान झाले, आता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार का ?
>> मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत , ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत हे उघड आहे. तरी प्रश्न विचारावासा वाटतो कुणाकुणाला म्हणून हे उत्तर.
३) नसेल तर मग महाराष्ट्रात मोदीएवढा आश्वासक चेहरा कोण ..?
>>> महाराष्ट्रात आज पर्यंत अखंड आश्वासक चेह-यांचीच परंपरा जणू आहे असे समजून हा प्रश्न विचारलेला दिसतो. या राज्याने बाबासाहेब भोसलेंसारखे मुख्यमंत्री पण पाहिले आहेत. तरीही सांगायचे तर प्रशासकीय कामकाज, विधीमंडळाचे कामकाज, समस्यांची जाण या निकषावर टिकणारी अनेक नावे आहेत - नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे ही काही उदाहरणे. निव्वळ आश्वासक चेहरा नव्हे तर आश्वासक धोरणे व नीती आणि ती अंमलात आणण्याची क्षमता देखील आवश्यक आहे. नुसते अग्रलेखातून शब्दांचे फवारे उडवण्यापेक्षा भविष्याची जाण , दीर्घकालीन धोरण, नियोजन आणि गव्हर्नन्स मध्ये सकारात्मक बदल याची आवश्यकता आहे. ती फक्त भाजपाच पूर्ण करु शकेल असे वाटते.
४) नसेल तर मग युती का तोडली.. ?
>> क्र. तीन चे उत्तर आहे असे असल्यामुळे प्रश्न लागू नाही. तरीही . . . युती तोडली नाही चर्चा करण्यास पुरेशा वेळेअभावी तुटली.
५) राष्ट्रवादी - पवार साहेब , काॅग्रेस - पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना - उद्धव ठाकरे, मनसे - राज ठाकरे, तर मग भाजप - ?????? महाराष्ट्राचा चेहरा कुठे आहे. दोन डझन आयात नेते /उडते कावळे आता भाजप चालवणार का..? (कृपया मोदींना या मध्ये ओढू नये. ते केंद्रात उत्तम काम करताहेत)
>>>> या ???? प्रश्नातच भाजप चे वेगळे पण आहे. दुस-यांच्या मांडीवर बसून मोठे होणारे नेते या पक्षात कमीच आहेत. पक्ष = व्यक्ती हा लोकशाहीचा जावई शोध नवाच आहे. मोदी केंद्रात उत्तम करत आहेत याचे दाखले मागण्याची वेळ अद्याप आली नाही.
६) सबब मी मोदींच्या नावे महाराष्ट्रात भाजपला मत का द्यायचे... ?
>>> वर प्रश्नांची उत्तरे दिलीच आहेत. केंद्रात आणि राज्यात एक पक्ष सरकार असणे राज्याच्या फायद्याचे हे धोरण म्हणून मत द्यायचे.
>>> घरात पोर अंगठा चोखत मोठे होऊ लागले की आपोआप ते पोर बालनेता, युवानेता, उद्याचे आशास्थान, आणि मग नेता होत जाते आणि कार्यकर्ते खपत रहातात. ही संस्कृती अपवाद वगळता सरसकट या पक्षात नाही म्हणून मत द्या.
>>> घराणेशाही, घराणेशाहीच्या बोंबा मारत तीच घराणेशाही पाळण्याची पद्धात गल्ली ते दिल्ली पर्यंत या पक्षात सरसकट नाही म्हणून मत द्या.
>>> मोदी केवळ स्वत:चांगले काम करत नाहीत तर सहका-यांनी पण तसे केले पाहिजे याचा आग्रह धरतात तसे करायला लावतात आणि हेच ते राज्यात भाजप सरकार आले तर करायला लावतील हि खात्री बाळगायला जागा आहे म्हणून मत द्या.
>>> कावळे मावळे गद्दार तलवार असल्या शब्दांच्या फुलो-यात आणि सतराव्या शतकात वावरण्यापेक्षा प्रशासन, नियोजन, विकासकारण याचे भान आणि अनुभव इतरांच्या मानाने चांगला असलेल्या कार्यकर्त्यांचा भरणा या पक्षात तुलनेने अधिक आहे म्हणून मत द्या.
७) उत्तरा शिवाय मत नाही..., कारण आम्ही आंधळे किंवा कळपातले प्राणी नाही. आम्ही छञपती शिवरायांचे मावळे आहोत..
>>> उत्तरावर विचार करालच, आंधळे तुम्ही नाहीतच, कळपातले नाही ना मग झुंडी मागे जाऊ नका. शिवरायांचे मावळे आहात ना मग शिवराय धोरणी होते, प्रशासक होते, आणि मी शहाजी राजेंचा मुलगा आहे म्हणून मला राजा करा असे त्यांनी न म्हणता ईश्वरी प्रेरणा म्हणून स्वकर्तृत्वाने स्वराज्य निर्माण केले. दोन दोन हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेली एखादी पालिका वर्षानुवर्षे खड्ड्यांमध्ये आणि झोपड्यांमध्ये कशी रहाते , किल्लेदारच किल्ल्याची रसद खातो आहे काय याचा शोध सच्च्या मावळ्या प्रमाणे घ्या.
-- एक सामान्य नागरिक
प्रतिक्रिया
4 Oct 2014 - 8:53 pm | माम्लेदारचा पन्खा
चालू द्या....
4 Oct 2014 - 9:35 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
रक्षा खडसे,पंकजा मुंडे? असो.
दोन्ही सेना नेते वात्रटासारखे बरळत आहेत. त्यामानाने भाजपावाले बरे. राष्ट्रवादी आता पवारवादी झाले आहेत.शरद आपल्या कन्येचे व पुतण्याचे घोडे पुढे दामटतोय.'शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदित्य ठाकरे....' अशी बातमी ह्यांनी कुठ्ल्या एका चॅनेलवर ऐकली व ह्यांना ताप भरला...
तो बीट्स पिलानीवाला संगणकतज्ञ पृथ्वीराजच योग्य वाटतोय.
4 Oct 2014 - 10:21 pm | नाव आडनाव
"ह्यांना" एकदा चंद्रकांत खैरेंनी आदित्य ठाकरेंचे पाय धरल्याचा विडेओ दाखवा आणी रिअॅक्शन काय होतेय ते लिहा इथे :)
5 Oct 2014 - 12:01 am | एकुलता एक डॉन
https://www.facebook.com/www.ncp.org.in/posts/505158286266187
6 Oct 2014 - 5:08 pm | vikramaditya
सर्व नेत्यांना 'एकेरी' संबोधलेले बघुन भारी मौज वाटते.
अर्थात तो तुमचा अधिकारच आहे म्हणा.
5 Oct 2014 - 12:14 am | नानासाहेब नेफळे
हा कुठचा नवीन पक्ष आहे का? आजच नाव ऐकले मी!
5 Oct 2014 - 2:06 am | काउबॉय
लाइफ़ मिलेगी या तवे पे फ्राय होगा... रे भैया आल इज वेल. कठिन समय आहे फिंगर्स क्रोस्स्ड.
5 Oct 2014 - 6:57 am | कंजूस
केंद्रासारखेच येथे बहुमत मिळेल असे भाजपला वाटते आहे.
5 Oct 2014 - 8:27 am | चौकटराजा
कॉग्रेस हा भाजपाचा राजकीय गुरू असून. हळू हळू भाजपाचा ही बॅका, युनियन्स , कारखाने यात प्रवेश होत आहे. त्यानी ऑलरेडी म गांधी उचलले आहेतच .शिवाजी महाराज ही. काही दिवसानी ते इतरानाही राजकारणाच्या पाशात ओढतील. मुळात संघात काही काळ घातलेला माणूस किंवा सेवादलात असलेला माणूस काँग्रेसी नेत्यापेक्षा भाषणबाजीत अधिक तेज असतोच. व भाषणांचा राजकारणात फार मोठा रोल असतो. श्री शरद पवारांची भाषणे ऐकलीत तर त्यात काही दम नसतो. हे दिसून येईल.
तात्पर्य- भाजपा ही एक वीट असून ती इतर दगडांपेक्षा मऊ आहे हे नक्की.
5 Oct 2014 - 9:02 am | नानासाहेब नेफळे
भाजपा वीट नसून दगडच आहे, फक्त काव फासलेला.
(कावेचा रंग भगवा असतो हा योगायोग समजावा)
5 Oct 2014 - 9:57 am | विवेकपटाईत
वीत आणि दगडांनी इमारती बांधल्या जातात, पोकळ आश्वासनांनी नाही. आज वीट आणि दगडांची देशाला गरज आहे.
5 Oct 2014 - 9:48 am | पिवळा डांबिस
तुम्हीच प्रश्न विचारलेयत आणि तुम्हीच उत्तरं दिलियेत...
त्यामुळे हा प्रचार धागा ठरून त्याचं मूल्य शून्य झालंय.....
तरीही महाराष्ट्रापुरता भाजपाचा विचार करता....
मोदी नॅशनल नेते आहेत हे चांगलं आहे, पण जर ते भारताचं पंतप्रधानपद सोडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला तयार नसतील तर...
महाराष्ट्रातलं विद्यमान भाजपा नेतेमंडळ अगदी म्हणजे अगदीच सुमार आहे!!!!
खडसे एका विरोधी पक्षाचे नेते म्हणून ठीक आहेत पण त्यांच्यात मुख्यमंत्रीपद पेलण्याची क्षमता आहे असं वाटत नाही. तरी सर्वाधिक आदर खडसेंबद्दलच आहे.
बाकीचे नेते काय वर्णावे?
फडणवीस, हे गेल्या काही महिन्यांपूर्वी कोण होते, कुठे होते?
तावडे, हे कोकणातले नेते असावेत. आधी कोकणातल्या एखाद्या मतदारसंघातून निवडून आले तरच यांचा विचार करूया.
आणि रक्षा खडसे आणि पंकजा मुंडे? महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद म्हणजे काय भातुकली आहे का?
(हाच प्रश्न आम्ही आदित्य ठाकरेंना करू इच्छितो, सबब आमच्यावर सेक्सिस्ट असा आरोप करू नये!!!)
5 Oct 2014 - 11:03 am | प्रभाकर पेठकर
रक्षा खडसे आणि पंकजा मुंडे? महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद म्हणजे काय भातुकली आहे का?
ह्यांच्यापैकी कोणाला उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद देण्याचा मूर्खपणा, मला वाटतं, भाजपात कोणी करणार नाही. फक्त भविष्यातील महिला नेत्यांना पुढे आणण्यासाठी आत्तापासून 'हवा' निर्माण करण्याचे कार्य सुरु झाले आहे.
5 Oct 2014 - 11:09 am | पिवळा डांबिस
हेडलाईन गिराके, मैं जो आई!
केहेती हूं तुमसे "मैं हवा-हवाई!!"
:)
6 Oct 2014 - 4:24 pm | llपुण्याचे पेशवेll
फडणवीस कोण होते हे शोधले तर सापडेल. वयाच्या २१व्या वर्षी स्वकर्तृत्वाने नागपूराचे महापौर फडणवीस झाले होते. भारतातले लहान वयात महापौर बनणारे दुसरे नेते होत. कायद्याची पदवी प्राप्त केलेले फडणवीस बर्लिनमधील कोणत्यातरी कायदेविषयक संस्थेचे पदवीधरही आहेत. आताच्या लेटेस्ट इलेक्शन मधे मुंडे, गडकरी गटांमधल्या साठमार्या थांबवण्याचे श्रेय फडणवीसांचेच. त्यांच्या अभ्यासपूर्ण मुलाखती पाहील्या असत्या तर हा प्रश्न कदाचित पडला नसता. पण भारताबाहेर कदाचित या बातम्यांचा रतीब नसावा म्हणून तुम्हाला त्या पहायला मिळाल्या नसतील असे असणे शक्य आहे. कारण भाजपाच नव्हे तर इतर विरोधकही देवेंद्र हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो म्हणून 'शेटजी भटजी' असा प्रचार करू लागले आहेत.
तावडे कोण आहेत बरे? २००३-०४ मधे गीतरामायणाच्या ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईच्या शिवाजी पार्कावर गीत रामायाणाचा जंगी कार्यक्रम घडवून हे प्रकाशात आले. तेव्हा पासून ते भाजपाचा मराठा चेहरा म्हणून ओळखले जातात आशिष शेलार हे त्यांचे एक मोठे सहकारी.
असो.
6 Oct 2014 - 4:28 pm | उदयन
केंद्रीय मंत्री असणार्या शोभा फडणवीस या देवेंद्र फडणवीस यांच्या नातेवाईक आहेत का ?
7 Oct 2014 - 1:14 pm | विजुभाऊ
हो त्याच त्या चणा डाल घोटाळा फेम शोभा फडणवीस या देवेंद्र यांच्या आई आहेत.
7 Oct 2014 - 1:23 pm | नानासाहेब नेफळे
चणा डाळीत घोटाळा!!! निदान मसुर डाळीत तरी घोटाळा करायचा ,तेवढेच ,'भगव्याशी ईमान राखले' अशी पळवाट शोधता आली असती!!!! :lol:
7 Oct 2014 - 8:01 pm | होबासराव
देवेंन्द्र फडणवीस आणि शोभा फडणवीस ह्यांच्यात फक्त आडणाव साध्यर्म आहे. भुमिकेचं बेअरिंग सांभाळा पण विरोध करायचा म्हणुन काहिहि बोलु नका...तुमच्यात आणि त्या माईसाहेब, नानासाहेब आणि आणखी काही अशी बरीच पात्रे एकाच वेळेस बजावणार्यात काहि फरक ठेवा..
6 Oct 2014 - 4:34 pm | काउबॉय
इम्प्रेसिव. डोमिनेटिंग.हम्म ...!
7 Oct 2014 - 1:56 pm | विजुभाऊ
त्यात नवल काही नाही. ते जेंव्हा महापौर झाली त्या काळात त्याम्च्या मातोश्री राज्यात मंत्री होत्या.
भाजप ला तेथे घराणी शाही जाणवली नाही.
7 Oct 2014 - 1:58 pm | दुश्यन्त
शोभा फडणवीस या देवेंद्र यांच्या आई नव्हेत मात्र नात्यातल्या आहेत हे नक्की.
7 Oct 2014 - 2:00 pm | उदयन
घोटाळा झाला हे मात्र नक्की आहे ना.
तरीच ....
7 Oct 2014 - 2:27 pm | दुश्यन्त
शोभा फडणवीस यांचा चणा डाळ घोटाळा गाजला होता. बाकी देवेंद्र यांचे पिता गंगाधर फडणवीस हे पण आमदार होते म्हणजे घराणेशाही इकडे पण आहेच.
7 Oct 2014 - 12:03 am | पिवळा डांबिस
करेक्ट, तसंच झालं असावं.
आणि तो रतीब घालण्याच्या निमित्ताने का होईना बर्याच दिवसांनी आमच्या प्रतिसादी पायधूळ झाडल्याबद्दल आपल्याला पेशल धन्यवाद!!! :)
7 Oct 2014 - 12:19 am | पिवळा डांबिस
ओके वकील आहेत, महापौर होते, ठीक आहे.
पण श्री. फडणवीस यांना राज्यपातळीवर कितीसा अनुभव आहे?
विरोधी पक्षात असल्याने त्यांना मंत्रीपदावरच्या कामाचा प्रत्यक्ष अनुभव नसावा पण ते गेली किती टर्म आमदार आहेत?
एखाद्या खात्याचे मंत्री ते कदाचित होऊ शकत असतीलही, पण येकदम थेट मुख्यमंत्री?
जर भाजपाच्या विजयाच्या शक्यतेचाच विचार केला तर त्यांच्यापेक्षा माझ्या मते श्री. खडसे कितीतरी जास्त योग्य आहेत मुख्यमंत्री व्हायला...
पण तुम्हाला ते पटणार नाही याची जाणीव आहे!!!
7 Oct 2014 - 12:50 am | श्रीरंग_जोशी
देवेंद्र १९९९ पासून सलग आमदार आहेत.
नाथाभाऊ अधिक अनुभवी आहेत परंतु त्यांची प्रकृती आजकाल साथ देत नाही अशा बातम्या मध्यंतरी आल्या होत्या.
7 Oct 2014 - 10:23 am | पिवळा डांबिस
ओके, मग मी माझा विरोध मागे घेत आहे.
फडणवीसांना शुभेच्छा!
7 Oct 2014 - 12:43 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
अरे बाबा, शरद ३८व्या वर्षी मुख्यमंत्री झाला होता. तुझा तो राजीव ४०व्या वर्षी पंतप्रधान झाला होता. आणी तुझा तो ओबामा?
7 Oct 2014 - 12:47 pm | श्रीगुरुजी
आणि वयाच्या चाळीशीतच नानाचा माई झाला!
7 Oct 2014 - 11:34 am | श्रीगुरुजी
>>> जर भाजपाच्या विजयाच्या शक्यतेचाच विचार केला तर त्यांच्यापेक्षा माझ्या मते श्री. खडसे कितीतरी जास्त योग्य आहेत मुख्यमंत्री व्हायला...
सहमत आहे. भाजपकडे मुख्यमंत्रीपदासाठी ४-५ नावे आहेत. त्यापैकी गडकरी हे रस्तेबांधणी मंत्री म्हणूनच जास्त योग्य आहेत. या कामातच त्यांचे कौशल्य दिसून येते. उगाच मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आली तर त्यांची कार्यक्षमता कमी होईल.
विनोद तावडे अननुभवी आहेत.
फडणवीस कितीही चांगले वाटत असले तरी त्यांचे आडनाव त्यांना कायम त्रासदायक ठरेल. त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय त्यांच्या आडनावाशी जोडला जाईल.
त्या तुलनेत खडसे खूपच अनुभवी आहेत. ते फारश्या वादात सापडलेले दिसत नाहीत. सद्यपरिस्थितीत मुख्यमंत्रीपदासाठी तेच योग्य वाटतात.
7 Oct 2014 - 12:10 pm | नानासाहेब नेफळे
रोडकरीला मुख्यमंत्री केले तर पाच वर्षे फक्त मुंबई पुणे एक्सप्रेस वे, पंच्चावण्ण उड्डाण पुल याचेच गणित सांगत बसेल. मागच्या पंधरा वर्शांत नव्वद किमीच्या एक्प्रेसवे च्या पुण्याईवर दुकान चालू आहे यांचे. बेरोजगारी ,शेतकी, महसुल, आरोग्य या विषयी यांचा अभ्यास शुन्य असावा.
फडणवीस- नागपुरचे महापौर व तीथले आमदार असतानाचे एकही विधायक काम आजपर्यंत ऐकलेले नाही ,
तावडे- हाच एक मोठा विनोद आहे.
खडसे- कालपर्यंत तोंड फाटोस्तोर ज्यांना भ्रष्टाचारी म्हणत होते, त्यांना आज भाजपात घेऊन खडसे त्याचे निर्लज्ज समर्थन करत आहे .कसा विश्वास ठेवायचा यांच्यावर?
हा आघाडी सरकारचेच मंत्रीमंडळ राज्याला देईल, पाचपुते गावीत वगैरे.
त्यापेक्षा ओरीजनल काँग्रेस काय वाईट आहे असाच लोक विचार करतील.
पृथ्वीबाबा तसेही जनेत शिस्तप्रिय म्हणुन प्रसिद्ध आहेतच.
7 Oct 2014 - 12:46 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
हेच म्हणते.
बिल्डर्,साखर्,कंत्राटदार लॉब्यांना पृथ्वीराज दूर ठेवेल तर राज्याचे तेवढेच हिताचे आहे.
7 Oct 2014 - 1:10 pm | दुश्यन्त
खडसे तोडपाणीसाठी प्रसिद्ध आहेत. तावडे खरा विनोद आहेत. फडणवीस आधी अभ्यासू वाटायचे पण आता त्यांची वक्तव्ये बघून तेपण काही फार वेगळे वाटत नाहीत. मुंडेनंतर तेवढ्या ताकदीचा नेता राज्य भापाकडे नाहीच काही अंशी गडकरी आहेत जे मास लीडर नाहीत मात्र शहा- मोदिंपुढे उभे राहण्याची हिम्मत तरी दाखवू शकतील. भाजप आकड्यांचे गणित जमवू शकली तर गडकरीच तुलनेने बर वाटतात पण जीभेवर ताबा हवा. मात्र हे जर तरच्या गोष्टी आहेत. शिवसेनेच्या जास्त जागा येणार आणि मुख्यमंत्री सेनेचाच असेल हा आपला अंदाज आहे.
7 Oct 2014 - 7:00 pm | आनन्दा
मुंडे जिवंत असते तर असे बोल्ला असतात का हो? का आपले उगीच मेल्या म्हशीला म्हणभर दूध?
बाकी मुंडे गेल्यामुळे महाराश्ट्रात भाजपाचे खूप नुकसान झाले आहे याच्याशी मात्र सहमत.
5 Oct 2014 - 10:08 am | बोका-ए-आझम
गोपीनाथ मुंडे अकाली जातील असं कोणालाच वाटलं नव्हतं. ते गेल्यावर भाजपला समर्थ चेहरा नाही हे जरी खरं असलं तरी नवीन चेहरा या निवडणुकीत मिळेल असं समजायला हरकत नाही. शिवाय भाजपची अजून एक चांगली गोष्ट म्हणजे इथले नेते निवडणूक लढवून, जनाधार घेऊन विधिमंडळात जातात, अगदी पंतप्रधान सुद्धा.
5 Oct 2014 - 10:19 am | पिवळा डांबिस
सहमत
फक्त आपल्या मतदारसंघातून निवडणूक जिंकली की ती व्यक्ती मुख्यमंत्रई बनायला योग्य ठरते?
आणि अरूण जैटलींचं काय? विचार करावा हो लिहिण्यापूर्वी!!!!
:)
6 Oct 2014 - 6:48 am | राजेश घासकडवी
भलत्यासलत्या अपेक्षा ठेवण्याबद्दल मी एका बाजूने पिवळा डांबिस यांची कीव करतो. दुसऱ्या बाजूने 'अमुक आचार करा' असे आदेश ऐकण्याची सवय असणारांना 'विचार करा' असा कन्फ्युजिंग सल्ला देण्याबद्ल निषेध.
6 Oct 2014 - 11:57 pm | पिवळा डांबिस
तुमचं पायतान आमच्या शिरावर!!!
:)
6 Oct 2014 - 4:29 pm | उदयन
निवडुन जनाधार घेउनच गेल्यात ना? तसेच ते जावडेकर देखील प्रचंड मताधिक्याने जिंकुन आलेले त्यांना देखील मोठ्ठा जनाधार मिळालेला
बरोबर ना ?
5 Oct 2014 - 11:34 am | उदयन
भाजपाचा प्रचार चालु आहे का ? चालु द्या. असे ही खोटे बोलायची सवय आहेच
ज्यांनी गुजरात मधे १०-१५ वर्षात मेट्रो जाउ द्या साधी लोकल ट्रेन आणली नाही ते मुंबईत येउन मेट्रोवर भाषणे ठोकत आहेत. या पेक्षा मोठ्ठा विनोद काय असेल
6 Oct 2014 - 4:27 pm | llपुण्याचे पेशवेll
पुण्यातल्या ब्यार्टीपेक्षा गुजरातेतल्या ब्यार्ट्या अगदी चान आहेत. आणि मध्य प्रदेशातल्या पण. असो.
5 Oct 2014 - 11:35 am | उदयन
तेलगी स्कॅम मधल्यांना भाजपाने गंगेसारखे स्वच्छ पवित्र करुन पक्षात घेतले त्यावर काय मत आहे ?
5 Oct 2014 - 11:49 am | अन्या दातार
राजकीय धाग्यांनी, पक्षांनी आणि त्यांच्या समर्थकांनी वीट आणि काव असे दोन्ही आणलंय राव! बस करा आता. १४ दिवस धीर धरा काय ते कळेलच.
5 Oct 2014 - 12:00 pm | पिवळा डांबिस
आनि आमी तुमच्या दाराशी 'पर्तिसाद द्या!!' म्हनून आक्षत आनून धरलीया जनू!!!!!
आता तुमी उद्या सकाळच्याला मिशरी लावल्यावर जर आमी "आता १४ दिवस धीर धरा!!" आसं म्हनलं तर भागेल काय?
:)
5 Oct 2014 - 12:29 pm | कलंत्री
पिवळा डांबिस : जबरा.
प्रत्येक पक्षाची जागा निवडणूक संपल्यानंतर जनता दाखवेलच अशी अपेक्षा आहे.
5 Oct 2014 - 3:20 pm | दुश्यन्त
मोदी गुजरातमधून बाहेर पडायला तयार नाहीत. महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातकडे वळवले जात आहेत. मुंडे गेल्यावर भाजपकडे राज्यव्यापी चेहरा नाही. आताचे जे नेते आहेत ते शहा- मोदींकडे पाहून निर्णय घेतील म्हणून पंतप्रधान आता जिल्हा-तालुका ठिकाणी जावून सभा घेत आहेत. मुंबई या आर्थिक केंद्रावर गुजरातींचा आधीपासून डोळा आहे. पृथ्वीराज जसे सोनिया दरबारी चकरा मारायचे तसाच प्रकार भाजपकडून होईल. राष्ट्रवादीतून भ्रष्ट नेते आयात करून भाजपला पक्ष वाढल्याचा भास होत आहे.लोकसभेचे चित्र वेगळे होते. तेव्हा मोदींनी अध्यक्षीय निवडणुकीसारखे चित्र बनवून फायदा घेतला. आता तसे चित्र नाही १०० दिवसातला कारभार बघून लोक पण जमिनीवर आले आहेत. विधानसभेत स्थानिक प्रश्न महत्वाचे असतात. मराठी जनतेला भाजप पेक्षा शिवसेना जवळचा पक्ष वाटत आला आहे.
5 Oct 2014 - 3:36 pm | उदयन
लोकसभेत राहुल सारखा समोर उभा होता पण महाराष्ट्रात एकसेएक नग आहेत. मोदीच्या खोट्या आणि भंपकबाजीचे धिंडवडे काढणारे खोर्याने सापडतील. हरियाणा दरडोई उपन्नात ८ व्या स्थानावर आहे मोदी म्हणालेत तो शतकिय विनोद होता. खरतर लिस्ट काढणार्याने बघितले सुध्द्दा नाही की अल्फाबिटीक्ली नाव लिहिलेली आहेत त्यानुसार हरियाणा ८व्या क्रमांकावर आहे आणि उत्पन्नाने १-२ र्या क्रमांकावर आहे पण हे तथ्य अतिहुशारीत घाई केली आणि भाजपाच्या पंतप्रधानांचा भरसभेत विचका झाला. इतकी गंभीर चुक या पदावर बसणार्या व्यक्तीने केली नाही पाहिजे. एका सभेत ५ महिन्या अगोदर काय झाले हे आठवा म्हणणारे मोदी स्वतः एका महिन्या अगोदर काय झाले विसरुन गेलेत :)
5 Oct 2014 - 3:48 pm | नानासाहेब नेफळे
एक महीन्यापुर्वा पोटनिवडणुकात हरले, तेव्हा भाजपचे लोक तिथे स्थानिक मुद्द्यावर मतदान झाले असे म्हणत होते. मग जर विधानसभेत स्थानिक मुद्दे महत्वाचे असतात तर मोदीला कशाला तालुका लेवलवर सभा घ्यायला लावतायत ?
5 Oct 2014 - 3:46 pm | दुश्यन्त
लोकसभेत राहुल सारखा समोर उभा होता पण महाराष्ट्रात एकसेएक नग आहेत. मोदीच्या खोट्या आणि भंपकबाजीचे धिंडवडे काढणारे खोर्याने सापडतील. +१
हेच म्हणत होतो. लोकसभेत मोदी अध्यक्षीय निवडणुकीचे चित्र उभे करण्यात यशस्वी ठरले. महाराष्ट्रात तसे नाही. कॉंग्रेस राष्ट्रवादी बदनाम आहे पण नुसता नेतृत्वाचा चेहऱ्यावर निवडणूक लढवली तर देवेंद्र-तावडे- खडसे हे पृथ्वीराज/ उद्धव ठाकरे/ शरद पवार यांच्यासमोर कच्चे ठरतील. म्हणून मोदींना पोस्टरबॉय बनवत आहेत पण हे लोकसभा नाही विधानसभा नाही. राज्यात सेनेचे संघटन जास्त मजबूत आहे आणि उद्धव यांच्याकडे ओरभावी वक्तृत्व नाही पण सेनेचे ते एकमुखी नेतृत्व आहे. भाजपच्या नेत्यांची तोंडे विरुद्ध दिशेला आणि त्यांना चावी द्यायला मोदी आणि शहा.सेनेची साथ सोडून भाजपच्या उतावीळ नेत्यांनी चूक केली.
5 Oct 2014 - 6:19 pm | चैदजा
जर बीजेपी सत्तेवर आली तर, मुख्यमंत्री मोदीच्या तालावर नाचणार. ईतर कोणी पक्ष निवडुन आला तर केंद्र सरकार त्यांच्या धोरणांना मदत करणार नाही.
मह्णजे काय? कोणीही येवो महराष्ट्राची झोळी रिकामी होत रहाणार आणि गुजरातची झोळी भरत रहाणार.
मला तर मोदीं फक्त गुजरातचे पंतप्रधान वाटतात.
5 Oct 2014 - 7:27 pm | उदयन
नाशकात भुरभुर पाउस फक्त आहे तरी मुसळधार पाउस आहे बातमी फिरवुन सभा रद्द केली.
लोकच जमली नाहीत सभेला म्हणुन तर रद्द केली नाही ना ;)
6 Oct 2014 - 4:30 pm | llपुण्याचे पेशवेll
टीव्ही बघत नाही वाटते? का केबल नाही? असो. जालावर फोटो मिळतात बघा कुठे.
6 Oct 2014 - 9:16 pm | श्रीगुरुजी
मोदींच्या सगळ्याच सभा फ्लॉप गेल्या. तासगावमधल्या सभेला तर आख्खे मैदान रिकामे होते. नाशकातही रिकामे राहणार हे ओळखून भाजपच्या लोकांनी मैदानात टँकरमधून पाणी आणून ओतले आणि चिखल करून ठेवला आणि नंतर पावसाचे कारण पुढे करून सभा रद्द केली.
7 Oct 2014 - 7:20 pm | पुण्याचे वटवाघूळ
अहो श्रीगुरूजी ज्यांना पुण्याच्या पेशव्यांनी प्रतिसाद दिला ते एक अत्यंत विद्वान महाशय आहेत-- साक्षात बृहस्पतींनी त्यांचे शिष्यत्व पत्करावे इतकी त्यांची योग्यता आहे हे तुम्हाला माहित नाही का? म्हणूनच त्यांना पंतप्रधानांनी केलेले विदेश दौरे आणि पिकनिक यात फरक जाणवत नाही. इतक्या ज्ञानी माणसाचा प्रतिवाद करायची आपल्यासारख्यांची लायकी आहे का?
6 Oct 2014 - 11:41 am | विजुभाऊ
भाजप इतका डोळे झाकून दूध पिणारा पक्ष दुसरा कोणता नसावा.
त्यांच्या राजकीय झैराती म्हणजे मोठ्ठा विनोद आहेत.
उदा :
१) इथले उद्योग परप्रान्तात गेले आहेत. कूठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा : इथले उद्योग गुजराथ मधे गेले आहेत. तेथे भाजपचेच राज्य आहेत.
२) टोल बाबतीतेल विधाने: हा तर अती मोठ्ठा विनोद आहे.: टोल सम्राट गडकरी हे भाजपचेच आहेत. पूर्ती कम्पनी ही गडकरींचीच आहे. टोल मुक्ती कशी देणार महाराष्ट्राला?
6 Oct 2014 - 11:53 am | नानासाहेब नेफळे
एक नंबर विभा, महाराष्ट्र हा गुजराथचा एकमेव प्रतिस्पर्धी आहे .एकदा महाराष्ट्र कंगाल केला कि मग तो गुजरातच्या तुलनेत बराच मागे पडेल ,हे मोदीचे धुर्त षडयंत्र आहे .राज्यातली लाखो कोटींची गुंतवणुक गुजरातकडे गेलीय ,जरा विचार करा.
ठिकाय काँग्रेसविरोधी असाल तर इतर पक्षांचे पर्याय उपलब्ध आहेत ,त्यांना मत द्या हवेतर, पण या धुर्त भाजपाला नको.
6 Oct 2014 - 3:36 pm | श्रीगुरुजी
>>> राज्यातली लाखो कोटींची गुंतवणुक गुजरातकडे गेलीय ,जरा विचार करा.
काही पुरावे? आकडेवारी? का नेहमीप्रमाणे नुसत्याच तोंडच्या गप्पा?
6 Oct 2014 - 9:17 pm | श्रीगुरुजी
प्रतिसादाची वाट बघतोय नाना.
6 Oct 2014 - 9:22 pm | हाडक्या
ते काही असो, पण विजुभाऊंचे नवीन नामकरण आवडल्या गेलेले आहे असे नमूद करतो.. *lol*
6 Oct 2014 - 12:00 pm | नानासाहेब नेफळे
आज मनसेचे लोक व सेनेचे लोक कोस्टल पोलिस संस्था ,JNPT बंदरातला व्यापार,RBI, पुण्यातली फोक्सवॅगनची फॅसलीटी गुजरातला गेल्यामुळे गळे काढत आहेत ,ते योग्यही आहेच .परंतु उपरोक्त संस्था ,JNPT वगैरे काँग्रेसने राज्याला दिल्यात असेच अप्रत्यक्ष त्यांच्या टीकेतून सिद्ध होत आहे. याचा अर्थ काँग्रेसने राज्याचा प्रगतीचा विचार केला होता असाच होतो व त्याला काँग्रेसचे विरोधी सेना मनसे अप्रत्यक्ष अनुमोदनच देत आहेत.
6 Oct 2014 - 3:40 pm | श्रीगुरुजी
>>> आज मनसेचे लोक व सेनेचे लोक कोस्टल पोलिस संस्था ,JNPT बंदरातला व्यापार,RBI, पुण्यातली फोक्सवॅगनची फॅसलीटी गुजरातला गेल्यामुळे गळे काढत आहेत ,ते योग्यही आहेच .
या संस्था गुजरातला गेल्यात हे सिद्ध करणारे काही पुरावे आहेत का? का आपली नेहमीचीच फेकाफेकी?
>>> परंतु उपरोक्त संस्था ,JNPT वगैरे काँग्रेसने राज्याला दिल्यात असेच अप्रत्यक्ष त्यांच्या टीकेतून सिद्ध होत आहे. याचा अर्थ काँग्रेसने राज्याचा प्रगतीचा विचार केला होता असाच होतो व त्याला काँग्रेसचे विरोधी सेना मनसे अप्रत्यक्ष अनुमोदनच देत आहेत.
बादवे, JNPT या महाराष्ट्रातील बंदराला नेहरूंचे नाव कोणी दिले हो? त्यासाठी महाराष्ट्रातील एकही महापुरूष सापडला नाही वाटतं? आणि २-३ वर्षांपूर्वी वरळी येथील सागरपुलाला राजीव गांधींचं नाव द्या अशी जाहीर सूचना कोणी केली होती ते आठवतं का? तेव्हासुद्धा एकही मराठी माणूस सापडला नाही?
6 Oct 2014 - 4:37 pm | llपुण्याचे पेशवेll
अगदी खरे. पूर्वी मिशलिन कंपनी अर्थमूव्हर्सचे टायर बनवायचा प्लांट चाकणमधे करणार होते. प्रंप्रिय, प्रुगामी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ४९% स्टेक त्यांच्या गरीब कार्यकर्त्याच्या नावाने मागितल्या मुळे शेवटी तो प्लांट चेन्नै ला गेला. एमाअयडीसीतली धर्मनिरपेक्ष गुंडगिरी अनुभवली असेल तर उद्योगधंदे गुजराथला का जातात ते कळेल.
जे एन पी टी च्या सुविधा सुमार असल्याने पुण्याच्या सँडविक कंपनी मधे येणारा माल देखील गुजरातेत अडाणीच्या बंदरात उतरतो आणि रस्त्याने पुण्यात येतो आणि जातो देखील. जे एन पी टी ची अवस्था का बरे दुर्दैवी झाली? मोदिंनी केली का?
7 Oct 2014 - 12:18 pm | श्रीगुरुजी
>>> >>> आज मनसेचे लोक व सेनेचे लोक कोस्टल पोलिस संस्था ,JNPT बंदरातला व्यापार,RBI, पुण्यातली फोक्सवॅगनची फॅसलीटी गुजरातला गेल्यामुळे गळे काढत आहेत ,ते योग्यही आहेच .
पुराव्यांची आतुरतेने वाट बघतोय नानासाहेब. पुरावे नसतील तर ही सगळी फेकाफेकी होती हे तरी मोठ्या मनाने कबूल करा.
7 Oct 2014 - 12:46 pm | नानासाहेब नेफळे
http://www.dnaindia.com/mumbai/report-safer-coasts-maharashtra-sets-mari...
http://www.timesofindia.com/city/ahmedabad/Gujarat-to-get-marine-police-...
या दोन बातम्या वाचा. २०१३ आणि २०१४च्या .आता बोला यावर..... कुणी पळवले मरीन ट्रेनिंग सेंटर?
बाकीच्या दरोडेखोरीचे पुरावे देईनच, आधी याविषयी समाधानकारक उत्तर द्या.खोटे आरोप करुन पळुन जायला मी सोमय्या किंवा खडसे वाटलो की काय तुम्हाला?
7 Oct 2014 - 4:21 pm | श्रीगुरुजी
नानासाहेब फेकडे,
तुम्ही स्वतःच दिलेल्या लिंक्स नीट वाचा हो आणि नंतर फेकाफेकी करा.
तुम्हीच दिलेल्या लिंकमधील ही खालील वाक्ये वाचा.
In the terrorist attack on Mumbai in November 2008, boats belonging to Porbandar fishermen were used by the Pakistan-trained terrorists. It was after this incident that the Gujarat government proposed such an academy in the state.
तत्कालीन गुजरात सरकारनेच या संस्थेच्या स्थापनेची मागणी केली होती.
The Centre is believed to have granted approval to a proposal of the state government for a first-of-its-kind National Marine Training Academy in Gujarat that was rejected by the previous UPA regime.
>
तुमच्या युपीए सरकारने ही मागणी धुडकावून लावली होती कारण अर्थातच ती मोदींनी केली होती. देशाच्या सुरक्षेपेक्षा मोदींना त्याचे क्रेडीट मिळू नये म्हणून केवढी ही धडपड.
आता मोदी पंतप्रधान झाल्यानंतरच ही मागणी मान्य झाली आहे.
या संस्थेची मागणी तत्कालीन मुख्यमंत्री मोदींनी केली होती. मोदींना अपशकुन करण्यासाठी युपीएने ती धुडकावली होती आणि आता त्या संस्थेचे महत्त्व ओळखून मोदींनी मान्यता दिली आहे. या सगळ्यात महाराष्ट्राचा काय संबंध?
पुन्हा एकदा माती खाल्लीत नाना!
7 Oct 2014 - 5:56 pm | नानासाहेब नेफळे
गुरुजी ,मोदींनी मागणी केली असली तरी ती संस्था महाराष्ट्राला मिळाली होती, ती गुजरातला नेण्याचं काहीच कारण नव्हतं. हे मोदी' तुझं माझं' कधीपासुन करायला लागले बरं? गुजरातचे मुख्यमंत्री असताना तुझं माझं ठिक होतं....
कि आताही ते गुजरातचेच पंतप्रधान आहेत?
हाच तर मुद्दा आहे ,देशाचा पंतप्रधान फक्त गुजरातचाच विचार करतोय, हेच तुमी कोट केलेल्या पॅसेजवरुन कळतेय.
7 Oct 2014 - 10:28 pm | श्रीगुरुजी
>>> मोदींनी मागणी केली असली तरी ती संस्था महाराष्ट्राला मिळाली होती, ती गुजरातला नेण्याचं काहीच कारण नव्हतं.
ही संस्था कधी महाराष्ट्राला मिळाली होती? किती तारखेला? म्हणजे युपीएच्या काळात की वाजपेयींच्या काळात की मोदींच्या काळात? समजा युपीए किंवा वाजपेयींच्या काळात असली तर ती संस्था आजतगायत का सुरू झाली नव्हती?
मोदींनी युपीएने केवळ मोदीद्वेषामुळे परवानगी नाकारलेली संस्था सुरू करायला परवानगी दिली. यात महाराष्ट्राचा काहीही संबंध नाही.
>>> हे मोदी' तुझं माझं' कधीपासुन करायला लागले बरं? गुजरातचे मुख्यमंत्री असताना तुझं माझं ठिक होतं....
कि आताही ते गुजरातचेच पंतप्रधान आहेत?
त्यांनी कधी केलं तुझं माझं? ज्या राज्याने परवानगी मागितली त्याच राज्याला परवानगी दिली. महाराष्ट्राने परवानगी मागितली असती तर तिथे परवानगी मिळाली असती. २६/११/२००८ ते १६/५/२०१४ या साडेपाच वर्षात केंद्रात व राज्यात युपीएचे सरकार होते. या काळात महाराष्ट्र सरकारने परवानगी मागितली होती का? आणि असल्यास साडेपाच वर्षात परवानगी कोणी व का दिली नव्हती?
>>> हाच तर मुद्दा आहे ,देशाचा पंतप्रधान फक्त गुजरातचाच विचार करतोय, हेच तुमी कोट केलेल्या पॅसेजवरुन कळतेय.
तुमचा निव्वळ इतिहास-भूगोलच कच्चा नसून तुम्हाला इंग्लिशही कळत नाही असं दिसतंय. आपणच दिलेल्या लिंका जरा नीट वाचा आणि बाता मारणे बंद करा.
6 Oct 2014 - 10:49 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
पुण्यातली वॉक्सवॅगन गुजरातला गेली? बाप रे....काय सांगता काय नेफळेबुवा? म्हैतीचं न्हवतं....आमच्या मित्राला भौतेक कंपनीनी नवा पत्ता दिला नसेल म्हणता का काय?
7 Oct 2014 - 12:20 pm | इरसाल
मागची कंपनी का सोडली.
कंपनी रिलोकेट झाली. कुठे ते मला कंपनीने नाय सांगितलं. ;)
7 Oct 2014 - 2:32 pm | मृत्युन्जय
RBI, पुण्यातली फोक्सवॅगनची फॅसलीटी गुजरातला गेल्यामुळे गळे काढत आहेत ,ते
RBI गुजरातला गेल्याचा काही पुरावा आहे का नेफळे की उगा फुकाची बडबड?
7 Oct 2014 - 4:04 pm | श्रीगुरुजी
>>> RBI गुजरातला गेल्याचा काही पुरावा आहे का नेफळे की उगा फुकाची बडबड?
नेफळे कशा पुड्या सोडतात आणि पुरावे मागितले कसे सोयिस्कर मौन पाळतात याची कल्पना आहे ना तुम्हाला? त्यांचं नाव नानासाहेब नेफळे ऐवजी नानासाहेब फेकडे असायला हवं होतं.
7 Oct 2014 - 4:21 pm | मृत्युन्जय
ते फेकत आहेत ते माहिती आहे हो मला. पण मग विचार केला की माझ्याकडे नसलेली एखादी माहिती नानासाहेबांकडे असेल तर बघावे म्हणुन प्रश्न विचारला आपला. बाकी ते आता बर्याच कोलांट्या उड्या मारणार हे तर माहिती आहेच. पण त्यांनी आपल्या ज्ञानात भर घातली तर आपल्याला बरेच आहे की. आभारच मानेन मी त्यांचे मग.
7 Oct 2014 - 6:01 pm | नानासाहेब नेफळे
RBIचे महत्वाचे तीन डीव्हीजन मुंबईतून दिल्लीत हलवणार आहेत.
http://www.ahmedabadmirror.com/news/business/RBI-to-shift-3-forex-divisi...
7 Oct 2014 - 6:07 pm | मृत्युन्जय
एकुणात तुम्ही निखालस खोटी विधाने करत आहात हे मान्य करत आहात तर.
तुम्ही म्हणालात की आख्खे मुख्यालय गुजरात मध्ये हलवले. इथे तर दिसते आहे की ३ डिव्हिजन्स दिल्लीला हलवली. तुमचा खोटारडेपणा इथेच सिद्ध होतो.
तरीही तुम्हाला अजुन खोटा पाडतो:
The divisions will continue to be part of Foreign Exchange Department, Central Office, Mumbai, RBI added
अजुन ऐका:
आरबीआयची एकुण २० -२५ डिपार्टेमेंट्स आहेत. फोरेन एक्स्चेंज हे त्यापैकी एक. फोरेन एक्स्चेंज डिपार्टमेंट मध्ये अनेको डिव्हिजन्स आहेत. त्यातील ३, केवळ ३ डिव्हिजन्स दिल्लीला हलवली आणि तुम्ही म्हणत आहात की "मुख्यालय गुजरातमध्ये हलवले".
अजुन किती वेळा माती खाणार नेफळे?
7 Oct 2014 - 6:15 pm | नानासाहेब नेफळे
चला वादासाठी मान्य करु ! पण मुंबईतच ठेवायला काय धाड भरलीय?, तीन डीविजन्स जड झाली आहेत का मुंबईत?
7 Oct 2014 - 6:20 pm | मृत्युन्जय
वादासाठी मान्य करु? म्हणजे काय? इतरवेळेस अमान्य करण्यासारखे आहेच काय त्यात? आधी तुम्ही अपप्रचार करता आहात हे मान्य करा. चला तुमच्या सोयीसाठी असे मान्य करा की तुमची माहिती निखालस चुकीची होती. ढळढळीत पुरावे दिले आहेत. मग पुढचे बोलु.
7 Oct 2014 - 6:33 pm | नानासाहेब नेफळे
निखालस चुकीची कशी काय बुवा? RBIचे विभाजन झाले आहे हे तरी मान्य करा!
7 Oct 2014 - 6:49 pm | मृत्युन्जय
तुम्ही लिहिले होते "आरबीआय गुजरातला हलवले" हे १००% चुकीचे विधान आहे.
7 Oct 2014 - 6:50 pm | उदयन
आंधळे भक्तांना काही दिसत नाही
कुठे तुम्ही प्रकाश दाखवत आहेत.
मराठी मत मिळावे म्हणुन मोदी म्हणत आहे मुंबई महाराष्ट्रापासुन वेगळी करणार नाही विदर्भ वेगळा होणार नाही. शिवसेनेच्या प्रचाराला "घाबरुन" शेवटी बोलावे लागले. नाहीतर आधी यांची भाषा वेगळी होती
रंगबदलु लोकांचा काय भरोसा ठेवतात
7 Oct 2014 - 6:53 pm | काळा पहाड
फुकट्या लोकांच्या हाती मुंबई असल्यापेक्षा ती वेगळी केलेली काय वाईट? बाकी विदर्भाला वेगळं व्हायचं असेल तर रोखणारे आम्ही कोण? त्यांचं काय भलं केलंय आतापर्यंतच्या सरकारांनी?
7 Oct 2014 - 6:57 pm | उदयन
विदर्भात जे प्रकल्प आहेत ते काय गुजरात ने उभे केले का?
नागपुरातल्या काही लोकांनाच वेगळा विदर्भ हवा आहे कारण उभ्या महाराष्ट्रात डाळ शिजत नाही. मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पडत आहेत त्यांना म्हणुन्च हे खेळ
7 Oct 2014 - 7:20 pm | काळा पहाड
इथं गुजरातचा काय संदर्भ? बाकी तुम्ही म्हणता तसा विदर्भ सुजलाम सुफलाम असता तर त्यांना वेगळं राज्य मागायची काही गरजच नव्हती. बाकी तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही नागपूर मधल्या लोकांना मुख्यमंत्री बनू देत नाही तर. मग त्यांची मागणी वाईट कशी? की कायम पस्चिम महाराष्ट्रातल्याच लोकांनी मुख्यामंत्री व्हायचं?
7 Oct 2014 - 7:34 pm | उदयन
काय हास्यास्पद लिहिले आहे . जरा परत वाचुन बघा काय लिहिले ते.
महाराष्ट्रातुन पंतप्रधान मिळाला नाही तर काय तुम्ही महाराष्ट्र देशच वेगळा मागणार आहेत का? ;)
काहीही प्रतिवाद करायचा ?
7 Oct 2014 - 8:02 pm | दुश्यन्त
मुख्यमंत्रीपद पश्चिम महाराष्ट्राकडे कायम कधी होते? विदर्भाचे वसंतराव नाईक (११ वर्षे सलग) आणि मारोतराव कन्नमवार (१ वर्षे) मुख्यमंत्री राहिले आहेत.मराठवाड्याचे पण शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण, विलासराव, निलंगेकर, शिवराज पाटील चाकूरकर असे मुख्यमंत्री झाले आहेत. उत्तर महाराष्ट्राला कधी मुख्यमंत्री पद मिळाले नाही.मात्र ते वेगळे राज्य मागत नाहीत.
7 Oct 2014 - 6:57 pm | प्रसाद१९७१
मुंबई आणि विदर्भ वेगळी झालीच पाहीजे महाराष्ट्रातुन, म्हणजे पुण्याचे, सातार्याचे, कोल्हापूर चे महत्व वाढेल
7 Oct 2014 - 6:15 pm | सौंदाळा
अरे मृत्युन्जया, श्रीगुरुजी गपा की रे जरा.
किती छळता माझ्या नानाला. तो एकटा एका बाजुला अजुन आठ महिन्याचाच आहे आणि तु रे मृत्युन्जया साडेसहा वर्षाचा आहेस ना सांभाळुन घेत जा त्याला जरा
आपला
आप्पासाहेब फुरसुंगीकर
6 Oct 2014 - 12:12 pm | लोटीया_पठाण
@ विजुभाऊ,
१) इथले उद्योग गुजराथला गेले हा काय गुजराथ सरकारचा दोष आहे काय ?? पळवले नाहीत त्यांनी. कर्नाटकात पण जात आहेत इथले उद्योग.
२) १५ वर्षे सत्तेत नसलेले गडकरी टोल सम्राट कसे काय??
नेफले भाऊ,
RBI स्वायत्त संस्था आहे. अन फोक्सवॅगन खासगी … मनसेचे रेमेडोके सांगणार अन तुम्ही ऐकणार
6 Oct 2014 - 12:25 pm | नानासाहेब नेफळे
@लोटीया पठाणजी, RBI स्वायत्तवगैरे सांगोवांगी असतं ,अर्थखात्याचाच अप्रत्यक्ष होल्ड असतो. आणि तुमचे लॉजिक लावले तर गॅस कंपन्या पेट्रोल डीझेल कंपण्यानाही बरीच स्वायत्तता आहेच की, मग दरवाढीविरोधात सरकारच्या नावे दहा वर्षे शिमगा का चालू होता?
महाराष्ट्रात येऊन गुजरातच्या मुख्यमंत्री राज्यातल्या उद्योगांना गुजरातेत यायचे आमंत्रण देत आहेत, मोदी सरकारकडून अशा कंपन्यांना करसवलतीचे आमिष दाखवून महाराष्ट्राबाहेर पडायला उद्युक्त करत आहेत.
मुंबई पुणे बुलेट ट्रेन कॅन्सल करुन अहमदाबादकडे नेली, कशासाठी?
आजपर्यंत परदेशी पाहुणे दिल्लीत यायचे व नंतर मुंबईत, मोदीने दोन्हीला टांग देउन चीनच्या पंतप्रधानांना अहमदाबादेत कशाला नेले?
तुंबड्या भरुन घेणारा धुर्त माणुस आहे मोदी, महाराष्ट्र अशांच्या ताब्यात अजिबात नको देऊयात.गुजरात्यांनी अखेर लायकी दाखवली.
6 Oct 2014 - 12:39 pm | प्रसाद१९७१
काही चांगल्या गोष्टी, कंपन्या, उद्योग गुजरात मधे गेले तर इथे लोक "पाकीस्तानात" गेल्या सारखे गळे काढत आहेत.
इथल्या पि.चि. MIDC मधे छोटे, मध्यम उद्योग चालवणे ह्या गुंडांनी आणि खंडणीखोरांना कसे अशक्य करुन ठेवले आहे हे माहीती दिसत नाही. असे वातावरण असेल तर जाणारच कंपन्या गुजरात मधे.
स्क्रॅप सुद्धा खंडणी दिल्या शिवाय विकता येत नाही पुणे परिसरात.
6 Oct 2014 - 1:08 pm | नानासाहेब नेफळे
पिंचिमध्ये NCPची सत्ता आहे ,काँग्रेसची नाही.
6 Oct 2014 - 2:02 pm | प्रसाद१९७१
मी मांडलेला मुद्दा पक्षीय नव्हता. मला म्हणायचे होते, जे राज्य चांगले व्यवसायिक वातावरण देइल तिथे उद्योग आणि इतर संस्था जातील.
मोदी किंवा दुसरे कोणी असे जबरदस्तीने घेउन जाउ शकत नाही. जर नविन सरकारनी पिं.चि. मधली गुंडगीरी कमी केली नाही तर कोणाचेही सरकार असेल तरी उद्योग दुसरीकडे जातील.
6 Oct 2014 - 1:10 pm | विजुभाऊ
@ प्रसाद : तुमचे म्हणणे मान्य आहे. कोंग्रेस असो की इतर कोणी स्थानीक पुढार्यानी इथल्या एम आय डी सी ची अक्षरशः वाट लावली आहे. सातारा वाई इथल्या एम आयडीसी पाहिल्या तर वाटते की उद्योजकानी केवळ मागील जन्माचे पाप फेडण्यासाठी उद्योग स्थापले आहेत. सातार्यात असलेले बरेच उद्योग तेथून स्थलांतरीत झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आधारीत उद्योग हे डबघाईस आलेले आहेत. सातार्यात पथेजा फोर्जींग्स , परांजपे ऑटोकास्ट , डोबर्ग ब्रूअरीज हे उद्योग गायब झालेत. महाराष्ट्र स्कूटर्स चा कारखाना गेले वीस एक वर्षे उत्पादन बंद अवस्थेत आहे. तेथे पर्यायी अनेक उत्पादने निर्मान होऊ शकतात. मात्र स्थानीक अडमुठे नेतृत्व आणि त्यांची जी हुजुरी करणारे यांचे प्राबल्य असणारे यांची चलती असल्यामुळे विकासाच्या नावाने ठणाणाच आहे.
अर्थात हा कोंग्रेस चा दोष आहे असे नाही. तेथले खासदार एकदा भाजपच्या नावावर निवडून आले होते. त्यानंतर ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नावार निवडून येतात. आमदारानी नक्की काय केले हे त्याम्चे त्याना माहीत असेल तरीही खूप म्हणायचे.
अर्थात मुख्य दोष आहे तो सातार्याच्या नागरीकांचा.
6 Oct 2014 - 2:06 pm | प्रसाद१९७१
@विजुभाऊ - तसे बघायला गेले तर देशाच्या सर्वच प्रॉब्लेम साठी सर्व नागरीकच जबाबदार आहेत. तेच तर प्रत्येकवेळेला सरकार निवडुन देतात.
माझ्या मते अति लोकशाही करण झाले आहे. काही चमत्कार झाला तरच ह्या देशाला भवितव्य आहे.
आत्ता तरी मोदी हाच एक आशेचा कीरण आहे.
6 Oct 2014 - 2:08 pm | उदयन
असे सरळ मान्य करा ना मग
7 Oct 2014 - 2:47 pm | हाडक्या
नाना, सातारच्या लोकांबद्दल सरसकटीकरण करण्याची ही तुमची दुसरी वेळ.. आता ह्या साताराबाहेरच्या व्यक्तीने लिहिलेल्या लेखावरची 'सातारच्या' लोकांच्या (म्हणजे आमच्यापण) प्रतिक्रिया वाचा. मग बोला.
कुठल्याही बाबतीत सरसकटीकरण वाईटच. आणि मुजरे/दंडवत/चपला उचलणे अशी लाळघोटी कामे (आपल्या देशात तरी) पक्षनिरपेक्ष व स्थल-काल निरपेक्ष चालू असतात.
सातारकरांना या बाबतीत 'निर्लज्ज' आणि 'बसा बोंबलत' म्हणायची गरज नाही आणि तुमची लायकीही नाही.
6 Oct 2014 - 11:00 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
एम.आय.डी.सी. सारख्या ठिकाणी व्यवसाय करायला महाराष्ट्र सगळ्यात नालायक राज्य आहे. अरे उद्योजकाला किती नाडतात स्थानिक गुंड ते एकदा फिरुन बघा. साध्या भंगाराच्या कंत्राटावरुन पार खुन पडायच्या वेळा येतात.
6 Oct 2014 - 11:09 pm | नानासाहेब नेफळे
जर इतकी गुंडगिरी आहे तर या कंपन्या आल्याच कशा राज्यात ?एखाद्या ठिकाणी घडत असेलही प्रत्येक ठिकाणी नाही.
7 Oct 2014 - 11:31 am | सौंदाळा
कंपन्या आधीपासुनच होत्या हो. पण PCMC बद्दल बोलायचे झाले तर सलग ३०+ वर्षे शरद पवार / एनसीपीचे वर्चस्व आहे या भागावर. मागच्या १० वर्षात जनरल मोटर्स, वोक्सवॅगन, जेसीबी वगैरे कंपन्या आल्यामुळे त्यांना पुरवठा करणार्या लघु-उद्योगांची गरज वाढली. कित्येक नविन वर्कशॉप्स उभे राहीले, जुने वर्क्शॉप्स अजुन वाढले. आधीपासुन सत्तेत असलेल्या एनसीपीने (त्यांचे नगरसेवक, कार्यकर्ते) युनियन बनवल्या. उद्या वर्कशॉप चालु करायचे तर सुरक्षारक्षक, सफाई कामगार यांचे घ्यायचे, ट्रान्स्पोर्टेशन ट्रक, क्रेन, ट्रेलर वगैरे यांचेच वापरायचे, भंगार हे सांगतील तिकडेच विकायचे. या सगळ्यात यांचे कमिशन. एखादी मोठी ऑर्डर आली तर सरळ टक्केवारीत कमिशन द्यायचे.
या दादागिरीतुन जुने, मोठे वर्कशॉप्स टिकले मात्र ज्यांनी ७/८ वर्षापुर्वी मोठ्या हिम्मतीने आधीची नोकरी सोडुन नविन वर्कशॉप टाकले त्यातले बहुतांश बंद पडले. माझ्या ओळखीत दोन उदाहरणे आहेत. १०-१२ वर्षाची नोकरी झाली होती त्याची बचत धंद्यात टाकली सुरुवातीला बरा चालला पण नंतर या दादागिरीमुळे पैसे सुटेनासे झाले तरी आज्-उद्या ठीकठाक होईल म्हणुन १.५-२ वर्षे काढली मात्र शेवटी धंदा बंद करावा लागला, नविन नोकरीची मारामार आता दुसर्या वर्कशॉपमधे सुपरवायजरची कामे करतायत.
7 Oct 2014 - 11:51 am | नानासाहेब नेफळे
हे कल्चर पवारने माजवले आहे, त्याचा काँग्रेसशी संबंध नाही. थोरली पाति काँग्रेसमध्ये असताना वरुन दट्ट्या आल्यानंतर सरळ व्हायची, आता पवार प्रा लि कंपनी असल्याने कोण बोलणार तिकडे?
मुंबईतही जय भवानी जय शिवाजी टाक खंडणी 'वाले बंधुद्वयी प्रायवेट लीमीटेडच आहेत. यासाठीच राष्ट्रीय पक्षांना निवडून द्यायचे असते ,तिथे शिस्त असते.
7 Oct 2014 - 12:39 pm | प्रभाकर पेठकर
वर्कशॉप चालु करायचे तर सुरक्षारक्षक, सफाई कामगार यांचे घ्यायचे, ट्रान्स्पोर्टेशन ट्रक, क्रेन, ट्रेलर वगैरे यांचेच वापरायचे, भंगार हे सांगतील तिकडेच विकायचे. या सगळ्यात यांचे कमिशन. एखादी मोठी ऑर्डर आली तर सरळ टक्केवारीत कमिशन द्यायचे.
ह्यात नक्कीच तथ्य असावे.
माझ्या मित्राने नविन मुंबईत त्याचे स्वतःचे घर दुरुस्तीला काढले तर लोकल गुंडांनी त्याला हव्या असलेल्या कंत्राटदारास काम देण्यास, त्याला हवे असलेल्या ठिकाणाहून दुरुस्तीला आवश्यक सामान आणण्यास बळजबरी करून विरोध केला. प्रकरण मारामारी पर्यंत पोहोचलं. शेवटी मित्राला स्नायूबलापुढे नमतं घ्यावच लागलं. भरपूर पैसे गेले आणि निकृष्ट काम गळ्यात आलं. अजूनही अश्रू ढाळतोय बिचारा.
7 Oct 2014 - 6:48 pm | काळा पहाड
मुंडे उपमुख्यमंत्री असताना त्यांनी गुंडांवर एन्काऊंटर्ची कारवाई केलेली माहिती आहे. दुर्दैवाने ते आता नाहीत. या काँग्रेसच्या (रा.काँ. ही काँ. तर आहे!) किंवा शिवसेनेच्या गुंडांना संपवून टाकायची गरज निर्माण झाली आहे.
7 Oct 2014 - 6:54 pm | नानासाहेब नेफळे
काय धडधडीतखोटं सांगत आहात, ९३च्या बॉम्बब्लास्टनंतर शरद पवारांना काँग्रेसने मुख्यमंत्रीपदी पाठवले, शरद पवारांनी मुंबई पोलिस कमिशनर रिबेरो यांना सर्वाधिकार देऊन अंडरवर्ल्डचा कणा मोडला होता.
7 Oct 2014 - 7:05 pm | काळा पहाड
नेफळेसाहेब, काही दुवे देतोय आंतर्जालावरचे.
१) The BJP-Shiv Sena government saw its credibility slipping as the 40,000-strong Mumbai Police watched helplessly. The then home minister Gopinath Munde gave the police a virtual carte blanche to eliminate the gangsters. In 1999, the police department recruited officers for their newlyformed CIU. Hard-nosed policemen with an extensive network of informants and a track record showing they were unafraid to pull the trigger were picked up. The CIUs eliminated gangsters in cold, extra-judicial killings. Select policemen were armed with sweeping powers, allowed to tap phones, given secret service funds to pay informants and rewarded with cash bounties ranging from Rs.1-15 lakh. Gangsters were abducted, detained and then shot in cold blood. Weapons were planted on their bodies.
http://indiatoday.intoday.in/story/mumbai-encounter-specialists-killers-...
२) When he assumed office, among the first priorities was to improve the law and order scenario – and the department cracked the underworld's backbone. “There were several encounters in which criminals of various gangs – Dawood Ibrahim, Chhota Rajan, Arun Gawli and their splinter groups were killed and several arrested,” said an officer, who served in the Mumbai Police during that period. “There were allegations of human rights violations, but he always stood by the teams,” the officer added.
http://www.sakaaltimes.com/NewsDetails.aspx?NewsId=5509317610950310437&S...
३) As the then State Home Minister, Munde contributed in a big way in controlling organised crime in
Mumbai. At a time when the metropolis came under the iron grip of the underworld, who thrived on
handing extortion threats to moneyed people from different walks of life and killing those who failed to
oblige them, Munde gave a free hand to “encounter-specialists” of the Mumbai police, who went virtually
for the kill, eliminated scores of gangsters and broke the very back of the once-powerful underworld.
http://www.dailypioneer.com/print.php?printFOR=storydetail&story_url_key...
7 Oct 2014 - 10:35 pm | उदयन
मोदींना हिशोब काय मागितला इतकी मिर्ची लागली की सगळी कडे तेच सांगत फिरत आहे
मात्र हिशोब देत नाही
काय जबरदस्त मिर्ची झोंबली
6 Oct 2014 - 12:42 pm | दुश्यन्त
कॉंग्रेसचे राज्यसभेतील उपनेते आनंद शर्मा यांनी केलेली टीका पहा. टीका कोण करताय यापेक्षा काय करत आहे या बाजूने पहा. '..पंतप्रधान मंत्रिमंडळाला गौण समजतात. केंद्रीय मंत्री नामधारी बनले आहेत. इतिहासात प्रथमच देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्री नाही. अर्थमंत्र्यांना संरक्षण मंत्रालयाची हंगामी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मोदींनी आजवर एकदाही देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावलेली नाही.' मोदींना आम्ही पण लोकसभेत मत दिले होते मात्र गेल्या ४-५ महिन्यात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मोदींची मनोवृत्ती ही एकाधिकारशाहीची आहे. गुजरातमध्ये ते चालून गेले. राष्ट्रीय स्तरावर असेच करत राहिल्यास त्यांना अडचणी येतील. महाराष्ट्रात मोदी २५ सभा घेणार आहेत अगदी तासगाव, तुळजापूर अश्या तालुका ठिकाणी ते जाणार आहेत. एवढी अगतिकता कश्यासाठी तर नक्कीच मुंबई हे आर्थिक केंद्र आपल्या ताब्यात असावे. मुंबईत बसणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपल्या ऐकण्यातला असावा हेच असू शकते.राज ठाकरे म्हणतात तसे राज्य भाजपचा एकही नेता उद्या मुख्यमंत्री झाल्यास मोदींना उलट प्रश्न विचारू शकणार नाही. मोदी- शहांसमोर बोलण्याची तावडे/ खडसे /देवेंद्र यांची छाती होईल का? मुंडे असते तर गोष्ट वेगळी होती. उद्या महाराष्ट्रावर अन्याय होत असता ते उठून बोलले असते आता तशी स्थिती नाही.अशोक चव्हाण, पृथ्वीराज यांना महामंडल नियुक्त्या, राज्यमंत्री नेमणे यासाठी दिल्लीत ४-४ चक्र माराव्या लागायच्या. सत्ता परिवर्तन होवूनही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीश्वरांच्या हातचे बाहुले ही परिस्थिती राहायला नको. महाराष्ट्रात लोक विधानसभेला स्थानिक मुद्दे पाहूनच मत देतात. आघाडी नको तर लोकांना शिवसेना तर काही ठिकाणी मनसे हा पर्याय जास्त जवळच वाटू शकतो.
6 Oct 2014 - 12:55 pm | उदयन
भाजपाच्या गृहमंत्र्यांनी मुक्ताफळे उधळली आहेत. पाकिस्तानाला दम देताना बोलले की "पांढरे निशाण फडकवायला" आधीचे सरकार नाही. आता पांढरे निशान म्हणजे शरणागती. भारताने कधी पाकिस्तानापुढे शरणागती पत्करली ??? अरे राजनाथासाहेब याच काँग्रेस ने पाकिस्तानाचे दोन तुकडे केले होते. हे विसरतात का ? तुमच्यासारखे अतिरेक्यांना सोडुन नाही आले होते.
उपमा द्यायला पण येत नाही म्हणे हे गृहमंत्री
6 Oct 2014 - 1:11 pm | नानासाहेब नेफळे
संपुर्ण कॅबिनेट मोदींच्या दहशतीखाली आहे, अगदी राजनाथसुद्धा. इतका स्वार्थी पंतप्रधान देशाने पाहिला नव्हता.
6 Oct 2014 - 10:54 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अगदी अगदी खर्र्र्र बोल्लात....अगदी शु ला जायचं असलं तरी सोडत नाहीत म्हणे मोदीगुर्जी....कमीत कमी दरारा असणारा तरी पी.एम. आहे आमच्याकडे. कळसुत्री नाही.
6 Oct 2014 - 1:57 pm | उदयन
मै "हरियाणा" को नंबर १ बनाउंगा ...!!
मै "महाराष्ट्र" को नंबर १ बनाउंगा ...!!
कधी दोन राज्य एकाच नंबरवर असु शकतात का ?
6 Oct 2014 - 2:14 pm | नानासाहेब नेफळे
मोदी म्हणणार की नंबर एक पोझिशनवरुन हरीयाणा व महाराष्ट्रात भांडण नको, त्यापेक्षा मध्यममार्ग म्हणुन मी गुजरातचा विकास करतो.
6 Oct 2014 - 2:17 pm | दुश्यन्त
अर्थमंत्री अरुण जेटली आजारी असल्याच्या बातम्या गेले काही दिवस येत आहेत. आपल्याकडचा संरक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त भार हंगामी असून लवकरच नवीन संरक्षण मंत्री नेमला जाइल असे ते ४ महिन्यापूर्वी म्हणाले होते मात्र अजून कुणाची नेमणूक झाली नाही. अर्थ, गृह, संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार ही अति महत्वाची खाती असतात. कॅबिनेट कोर कमिटीमध्ये या चार खात्याचे मंत्री असतात.आपल्या ऐकण्यातला संरक्षण मंत्रीपदाचा दावेदार मिळत नसल्याने मोदी पूर्ण वेळ संरक्षण मंत्री नेमत नाहीत असे दिसतेय. पण अशी परिस्थिती चांगली नक्कीच नाही. पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष पण आपल्या ऐकण्यातलाच हवा यासाठी अमित शहांची पार्श्वभूमी, सध्या प्रलंबित असलेले गुन्हे याकडे पण डोळे झाक केली आहे. सत्ताधारी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष हा त्याच्याच गुजरातमधून तडीपार केलेला आहे.सगळ्या महत्वाच्या पदावर आपले पित्तू बसवण्याचा हा मोदींचा अट्टाहास चांगला नाही.'सबका साथ सबका विकास' वगैरे नुसत्या गप्पा आहेत.
6 Oct 2014 - 2:24 pm | विजुभाऊ
भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व मनसेतून आयात उमेदवार केलेले आहेत काँग्रेसचे १६, राष्ट्रवादीचे २०, शिवसेनेचे ९, मनसेचे २, शेतकरी संघटनेचा १, अपक्ष २ व समता परिषदेच्या एकाचा समावेश आहे.
गेली १५ वर्षे महाराष्ट्र खड्ड्यात घालणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनाच भाजपने प्रवेश देऊन तत्काळ उमेदवारी का दिली
भाजपचे स्वतःचे असे काय उरले आहे आता. त्याना सगळ्या ठिकाणी उभे करायला स्वतःचे असे उमेदवार देखील मिळत नाहीत.
भाजपच्या आयात उमेदवारांची यादी
उमेदवार मतदारसंघ आधीचा पक्ष
मनोहर बडने धुळे ग्रामीण काँग्रेस
सुनील देशमुख अमरावती काँग्रेस
समीर मेघे हिंगणा काँग्रेस
माधवराव किन्हाळकर भोकर काँग्रेस
आनंद भरोसे परभणी काँग्रेस
शिवाजीराव नाईक शिराळा काँग्रेस
अजित घोरपडे तासगाव काँग्रेस
प्रशांत ठाकूर पनवेल काँग्रेस
राजन तेली सावंतवाडी काँग्रेस
संजय दुधगावकर उस्मानाबाद काँग्रेस
शैलेश लाहोटी लातूर काँग्रेस
माणिकराव कोकाटे सिन्नर काँग्रेस
बाळासाहेब मुरकुटे नेवासा काँग्रेस
भाऊसाहेब वाकचौरे श्रीरामपूर काँग्रेस
विलासराव खरात घनसावंगी काँग्रेस
अमोल महाडिक कोल्हापूर दक्षिण काँग्रेस
अभय नगरकर नगर राष्ट्रवादी
विजयकुमार गावित नंदुरबार राष्ट्रवादी
संजय सावकारे भुसावळ राष्ट्रवादी
योगेंद्र गोडे बुलढाणा राष्ट्रवादी
किसन कथोरे मुरबाड राष्ट्रवादी
मंदा म्हात्रे बेलापूर राष्ट्रवादी
लक्ष्मण जगताप चिंचवड राष्ट्रवादी
बबन पाचपुते श्रीगोंदा राष्ट्रवादी
शरद बुट्टे पाटील खेड राष्ट्रवादी
राहुल कुल दौंड राष्ट्रवादी
प्रताप चिखलीकर कंधार राष्ट्रवादी
स्नेहलता कोल्हे कोपरगाव राष्ट्रवादी
भीमराव धोंडे आष्टी राष्ट्रवादी
मोनिका राजळे पाथर्डी राष्ट्रवादी
जगदीश वळवी चोपडा राष्ट्रवादी
शिवाजी कर्डिले राहुरी राष्ट्रवादी
राजेंद्र पिपाडा राहाता राष्ट्रवादी
अद्वय हिरे नांदगाव राष्ट्रवादी
अरविंद चव्हाण जालना राष्ट्रवादी
रामदास सदाफुले देवळाली राष्ट्रवादी
भगवान बोरस्ते निफाड शिवसेना
किशनचंद तनवाणी औरंगाबाद मध्य शिवसेना
बाबासाहेब तांबे पारनेर शिवसेना
विनायक हिवाळे पैठण शिवसेना
शरद ढमाले भोर शिवसेना
नेताजी डोके जुन्नर शिवसेना
जयसिंग एरंडे आंबेगाव शिवसेना
चंद्रकांत खाडे इगतपुरी शिवसेना
दिलीप कुंदकर्ते नांदेड दक्षिण शिवसेना
संगीता राजे निंबाळकर पुरंदर मनसे
राम कदम घाटकोपर पश्चिम मनसे
संजय गव्हाणे कन्नड समता परिषद
प्रशांत बंब गंगापूर अपक्ष
अनिल गोटे धुळे शेतकरी संघटना
शिवाजी मानकर येवला मागील वेळी अपक्ष उमेदवार
6 Oct 2014 - 9:21 pm | श्रीगुरुजी
>>> भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व मनसेतून आयात उमेदवार केलेले आहेत
जो पक्ष निवडून यायची सर्वात जास्त शक्यता तिकडेच आयात होणार ना?
बादवे, इतर पक्षाने आयात केलेल्यांची सुद्धा नावे दिलीत तर बरे होईल.
उदा. पुण्यात कसब्यातून राकाँचा उमेदवार दीपक मानकर आहे. तो कुठून आयात केला.
पर्वतीत शिवसेनेने सचिन तावरेला कोठून आयात केले?
कोकणात दीपक केसरकरला शिवसेनेने कोठून आयात केले?
6 Oct 2014 - 9:26 pm | उदयन
तुम्ही तुमच्या आवडत्या पक्षाबद्दल तर बोला मास्तुरे
उगाच बगल देऊ नका जुनीच सवय आहे म्हणा तुमची काय अपेक्षा करावी
6 Oct 2014 - 4:05 pm | नित्य नुतन
पंकजा मुंढे ला एका मुलाखतीत बघितले होते ... तोंडात च्विंगम चघळत एखाद्या भाईच्या आवेशात उत्तरं देत होती ... पोकळ अतिआत्मविश्वास ठासून दिसत होता .. असले नेते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार ???
अर्रे कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा ???
6 Oct 2014 - 4:09 pm | दुश्यन्त
मुळात याआधी भक्तजन गुजरातचे जे आकडे द्यायचे तेच फुगवून सांगितलेले असायचे हे एव्हाना सिद्ध झाले आहे. गुजरातपेक्षा महाराष्ट्र, तामिळनाडू ही राज्ये बर्याच (चांगल्या) बाबतीत पुढे आहे.
6 Oct 2014 - 9:19 pm | श्रीगुरुजी
>>> मुळात याआधी भक्तजन गुजरातचे जे आकडे द्यायचे तेच फुगवून सांगितलेले असायचे हे एव्हाना सिद्ध झाले आहे.
हे कधी सिद्ध झाले?
6 Oct 2014 - 9:28 pm | उदयन
हरियाणाचा 8 वा नंबर कोणी सांगितले?
तुमच्याच प्रधानसेवकाने आकडे खोटे सांगितले हाच पुरावा आहे
अजून काय पुरावा हवा ;)
6 Oct 2014 - 4:24 pm | भाते
इतर राजकीय पक्षांनी किमान त्यांचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तरी घोषित केले आहेत. भाजपावाल्यांचे काय?
जसे लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणुन आधीच घोषित केले होते तसे महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निवडणुकीअगोदर घोषित करायला का घाबरत आहेत हे भाजपावाले? त्यांच्यातच एकमत नाही आहे. मुंडे यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राचे नेतृत्व करू शकणारा कोणीही नेताच भाजपाकडे नाही आहे. म्हणुन तर विधानसभा निवडणुक प्रचारासाठी देशाच्या पंतप्रधानाला यायची गरज वाटते.
दिल्लीमधुन केंद्रीय नेतृत्व सांगेल त्याला/तिला मुख्यमंत्री बनवणार हा कुठला न्याय? आधीचा मुख्यमंत्री दिल्लीमधुन पाठवलेला होता. यावेळीही भाजपाचा दिल्लीमध्ये ठरलेला उमेदवार मुख्यमंत्री म्हणुन आला तर गेल्यावेळी प्रमाणे तो/ती प्रत्येक लहानसहान गोष्टीसाठी दिल्लीच्या वाऱ्या करणार. दिल्लीमधुन आलेल्याला जर प्रत्येक गोष्टीसाठी तिकडे धाव घ्यायला लागत असेल तर काय करायचा आहे तो दिल्लीतला मुख्यमंत्री? मग काय बदल झाला महाराष्टात?
6 Oct 2014 - 9:18 pm | श्रीगुरुजी
शिवसेना, मनसे व राकाँचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण आहे?
7 Oct 2014 - 1:53 pm | उदयन
वृत्ती गेली नाही अजुन ?
भाजपाचा विचारला तर आधी उत्तर द्या मग प्रश्न विचारा. उत्तर न देताच प्रश्न विचारुन पळुन काय जातात
7 Oct 2014 - 1:58 pm | मृत्युन्जय
अर्रे. बाकीच्यांनी जाहीर केला पण भाजपाने नाही केला म्हणून गळा काढता आहात ना? मग द्या की उत्तर, कोणी कोणी जाहीर केला काँग्रेसशिवाय?
7 Oct 2014 - 2:04 pm | उदयन
पार्टी विथ डिफ्रन्स ना.. मग इतरांचे काय विचारतात
7 Oct 2014 - 10:46 pm | मृत्युन्जय
अर्रे डिफरंट आहे म्हणुन केवळ त्यांनीच उमेद्वार जाहीर करायचा?
पार्टी विथ डिफ्रन्स म्हणजे काय हेच तुम्हाला कळालेले नाही हाच मुख्य लोच्या आहे. असो. अभ्यास वाढवा.
7 Oct 2014 - 11:21 pm | उदयन
नीरो च्या पार्टी बद्दल काय समजायचे आहे
तिथे भारतीयांवर गोळीबार होत आहे आणि हे प्रचार करत आहे ना काळजी ना खंत....
निर्लज्जपणा तो हाच आहे
8 Oct 2014 - 7:15 am | प्रदीप
http://www.hindustantimes.com/india-news/india-hits-back-with-vengeance-...
हेही पहा:
http://www.hindustantimes.com/india-news/ceasefire-violations-govt-tough...
8 Oct 2014 - 7:41 am | उदयन
आधीच्या सरकारांमधे पण होत होते
पण धडा शिकवायची भाषा करणारे स्वतः काय करत आहे वेगळे ते सांगा
आर्मी स्वतः कामगिरी चोखच बजावत असते
8 Oct 2014 - 7:54 am | प्रदीप
तुम्ही प्रथम लिहीलेतः
"तिथे भारतीयांवर गोळीबार होत आहे आणि हे प्रचार करत आहे ना काळजी ना खंत.... निर्लज्जपणा तो हाच आहे"
आता ह्या दुव्यांवरून असे दिसते की भारतही चोख प्रतिसाद देत आहे. विशेषतः हे पहा:
"The Narendra Modi government on Tuesday directed the Border Security Force (BSF) and the Indian Army not to seek a flag meeting with Pakistan on the international border that has witnessed heavy firing in the last two days."
एका विशीष्ट पातळीपलिकडील निर्णय सरकार घेते, आर्मी नव्हे. ते इथे घेतले गेलेले दिसतात.
अगोदरची सरकारे काय करत होती, हा प्रश्न नाही, तुमचा आरोप सध्याचे मोदी सरकार ह्या बाबतीत काहीही करत नाही, असा आहे.
आता अर्थात, moving goalposts च्या न्यायाने, तुम्ही मोदींनी स्वतःच सीमेवर जावयास पाहिजे होते, असे म्हटलेत, तर pass!
8 Oct 2014 - 8:41 am | उदयन
लोकसभेच्या प्रचारात 56 इंचची छाती दाखवून पाकिस्तान ला ललकारणारे आता प्रचारात एक अक्षर बोलत नाही यावरून दिसते कि लोकसभेत मारलेल्या फुशारक्या होत्या
काँग्रेसच्या 10 वर्षात जितके उल्लंघन केले असेल तितके या 6 महिन्यांतच झाले
म्हणे भारताचा डंका बाजवला ;) आताचा प्रधानसेवक फक्त बोलूच शकतो करू काहीच शकत नाही हे जगाला कळले
8 Oct 2014 - 9:13 am | प्रदीप
म्हणजे सरकारने प्रत्यक्ष कृती केली, ते पुरेसे नाही. आता, तुमची (सरकलेली) अपेक्षा ही की मोदींनी त्यांच्या महाराष्ट्र व हरीयाणा येथील विधानसभांच्या निवडणूकांच्या प्रचारधुमाळीच्या दरम्यान ह्या मुद्द्यावरून डरकाळ्या फोडल्या पाहिजेत!
ते इथे कमी पडले हे खरे :)
बाकी, त्यांनी प्रत्यक्ष तिथे जाऊन रणधुमाळीत भाग घेतला पाहिजे, असे (सध्यातरी) न म्हटल्याबद्दल (सध्यातरी) तुमचे कौतुकच केले पाहिजे!
8 Oct 2014 - 11:08 am | मृत्युन्जय
नाही सरकारने स्वतः जाउन त्यात मोदींनी स्वतः बंदूक हातात घेउन सीमेवर जाउन लढावे आणि लाहोर, कराची, इस्लामाबाद आणि पेशावर मध्ये स्वतः जाउन गाढ्वाचा नांगर फिरवावा आणि भुट्टॉ आणि शरीफला बैलगाडीला जुंपुन दिल्लीला घेउन यावे अशी अपेक्षा आहे,
8 Oct 2014 - 2:08 pm | श्रीगुरुजी
बंदूक? कुठल्या काळात वावरताय? मोदींनी वाघनखे घेऊन पाकड्यांचा कोथळा बाहेर काढावा, पाकड्यांना मातीत गाडावे, गेलाबाजार त्यांची बोटे तरी तोडावी, निदान त्यांच्या मस्तवाल जिभा तरी छाटाव्यात ... मोदींनी पाकड्यांवर अशा तर्हेची २१ व्या शतकातील कारवाई करावी. बंदूक वापरणे म्हणजे १७ व्या शतकात वावरण्यासारखे आहे. जरा २१ व्या शतकात या हो.
8 Oct 2014 - 2:24 pm | नानासाहेब नेफळे
खरंय !बंदुकीच्या कॅलिबरऐवजी व फायरींग रेट ऐवजी पहाडी छाती ,५६ इंच अशा गप्पा देखिल माराव्यात.
8 Oct 2014 - 2:27 pm | श्रीगुरुजी
बरोबर. पण कोणी अशा गप्पा माराव्यात. त्यांच्या छातीच्या घेराची इतरांनाच जास्त काळजी लागलेली दिसतेय.
8 Oct 2014 - 2:19 pm | श्रीगुरुजी
प्रतिकारवाई सुरू झालेली दिसतेय.
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/pakistan-targets-bsf-posts...
पंतप्रधान मोदींची मैत्री झिडकारुन वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय नागरिक आणि सैनिकांना लक्ष्य गोळीबार करणा-या पाकिस्तानच्या बंदुका आणि तोफांचा आवाज बंद करण्याचा निर्णय केंद्रातल्या मोदी सरकारने घेतला आहे. पाकिस्तानचा गोळीबार पूर्णपणे थांबेपर्यंत प्रत्युत्तर देण्याचे स्पष्ट आदेश भारतीय सैन्याला देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या हल्ल्याला कोणत्या भागात किती प्रमाणात प्रत्युत्तर द्यायचे याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य सैन्याला देण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून हिरवा कंदिल मिळताच भारतीय सैन्याने पाकचे कंबरडे मोडण्यास सुरुवात केली आहे.
मागील काही दिवसांपासून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करणा-या पाकने रविवारपासून गोळीबाराचे प्रमाण एकदम वाढवले आहे. मागील बारा वर्षात झाला नाही एवढा गोळीबार आणि मॉर्टरचा मारा पाकने सुरू केला आहे. पाकच्या या हल्ल्याला मंगळवारी रात्री भारताने तीव्र प्रत्युत्तर दिले. भारताने पाकच्या ३७ चौक्या आणि आसपासच्या भागात गोळीबार केला. भारताने दिलेल्या प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानमध्ये सियालकोट भागात १५ जण ठार आणि ३० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. याआधी पाकिस्तानच्या रेंजरनी सीमा सुरक्षा दलाच्या ६३ चौक्या आणि २५ गावांना थेट लक्ष्य करुन गोळीबार केला तसेच मॉर्टरचा मारा सुरू केला. पाकच्या हल्ल्यात सतरा नागरिक आणि सीमा सुरक्षा दलाचे तीन सैनिक जखमी झाले तसेच ५५ वर्षाच्या एका महिलेचा मृत्यू झाला.
याआधी भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओ (लष्कराचे महासंचालक) पातळीवर तब्बल आठ मिनिटे चर्चा झाली पण तोडगा निघाला. या चर्चेत दोन्ही डीजीएमओंनी परस्परांवर गंभीर आरोप केले. अखेर पाकच्या कारवाया बंद होईपर्यंत गोळीबार करा, असा स्पष्ट आदेश केंद्राकडून सैन्य दलांना आला आणि त्याचे लगेच पालन करण्यात आले.
8 Oct 2014 - 2:44 pm | नानासाहेब नेफळे
हेच मोदी तीन महीन्यापुर्वी नवाज शरीफच्या आईला साडी पाठवत होते, कालपर्यंत पाकिस्तानला मिठाई पाठवत होते. यांच्या हे लक्षातही आले नाही कि आपला शेजारी किती घातक मनसुबे रचतोय!
हे म्हणे कणखर देश बनवणार आहेत, इतका बाळबोध पंतप्रधान देशाने आजपर्यँत पाहिला नव्हता. मनमोहन सिंग यांनी या पाकड्यांशी लाळघोटेपणा कधीच केला नव्हता, अतिरेकी कारवाया थांबवा चर्चा करतो असे ठणकावले होते.
8 Oct 2014 - 3:02 pm | मृत्युन्जय
खिक्क. आणि २०, ५०, १०० ची यादी आणि निषेध खलिते पाठव्ले होते. आणि ते ही काम इतके धेडगुजरीपणाने केले होते की त्यातले काही लोक नंतर बर्याच काळापासुन भारतीय तुरुंगातच सापडले. मनमोहन सिंगांनी कोणाला ठणकावले तरी ते मजा करताहेत असे वाटत असेल. त्यांना काय डोंबलाचे ठणकावले?
बादवे हिंदी पाकी भाई भाई असे नारे तर नाही ना दिले मोदींनी. नवाझ शरीफांना एनडीएत नेउन स्वतःची तयारी किती तोकडी आहे हे तरी नाही ना सांगितले?
8 Oct 2014 - 3:39 pm | नानासाहेब नेफळे
खरंय! बहुधा ५६ इंच छातीवाले पाकड्यांना मिठाया पाठवुन त्यांना डायबेटीक करणार, मग ते पाकडे डायबेटीसने मरणार!!!
काय जबरी प्लान आहे! ५६ इंच छातीच्यावरती यांना डोकेही आहे तर! इतका कुटनितीने वागणारा पीएम देशाने कधीच पाहिला नव्हता.
:lol:
8 Oct 2014 - 4:13 pm | मृत्युन्जय
मिठाई वाटणे ही लष्कराची परंपरा आहे. त्यासाठी ते सरकारची परवानगी घेत नाहित. बाकी छाती च्या वरच्या भागावर डोके असणारा पंतप्रधाना आहे हे बरे आहे. गुडघ्यात असणारा नाही हे उत्तम.
8 Oct 2014 - 4:43 pm | मृत्युन्जय
लोकसभेच्या प्रचारात 56 इंचची छाती दाखवून पाकिस्तान ला ललकारणारे आता प्रचारात एक अक्षर बोलत नाही
उदयना दादा लोकसभे आणि विधासभा यातला फरक कळतो का तुम्हाला? तो केंद्राच्या निवडणुकांचा प्रचार होता. तिथे राष्ट्रीय पातळीवरचे मुद्दे चर्चिले जातात. हा महाराष्ट्राचा प्रचार आहे. इथे स्थानिक पातळीवरचे मुद्दे चर्चिले जातात. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत पुण्याचे विषय चर्चिले जातील. तिथे काश्मीरच्या रस्त्यांची दुरावस्था या विषयावर व्याख्यान झोडुन काय उपयोग.
असो. आजचा तुमचा गृहपाठ: केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिका यांच्या कार्यक्षेत्राचा अभ्यास करणे आणि दहा वेळ पाटीवर लिहुन काढणे.
अवांतरः नानासाहेबांची मदत घेउ नका. ते खोटे बोलतात. ते तुम्हाला कदाचित सांगतील की मोदींनी सग्ळ्या शाळा गुजरातेत नेल्या.
8 Oct 2014 - 4:38 pm | मृत्युन्जय
मग त्यांनी बंदुका घेउन सीमेवर जावे की काय? चोख प्रत्त्युत्तर द्यायला सांगितले आहे सेनेला आणि लागणारा सगळा सपोर्ट देत आहेत. नुसतेच निषेध खलिते नाही पाठवलेले.
6 Oct 2014 - 4:27 pm | मोग्याम्बो
महारष्ट्रात आघाडी ची १५ वर्षे सत्ता होती आणि गुजरात मध्ये बीजेपी ची होती, जर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी उद्योग्धन्द्यांना आमंत्रण दिल्यावर ते जर तिकडे जात असतील तर ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या सरकारचा दोष आहे.
उद्योगपती काय गुजरातला फिरायला चालले आहेत का ? मुख्यामात्र्यांचे आमंत्रण आले आहे. जाऊन येतो गुजरातला. असे थोडीच चालले आहे.
गुजरात मध्ये उद्योग सुरु करण्याची processs सोपी आहे. आणि त्याना करांमध्ये खूप सवलत दिली गेली आहे.
महाराष्ट्रामध्ये आघाडीची १५ वर्षे सत्ता असून त्यांनी ह्या गोष्टींमध्ये खूप बदल नाहीत केले.
त्यामुळे इथून उद्योगधंदे गुजरात मध्ये चालले आहेत ह्यात आपल्या राजकारण्याचा दोष आहे
6 Oct 2014 - 4:35 pm | उदयन
पण इथे येणार्या उद्द्योगधंध्यांना विरोध कोण करते ? प्रकल्पांना जमिनी देताना गावकर्यांना चुकिची माहीती सांगुन विरोधात कोण उभे करते. ? जेव्हा महाराष्ट्राला वीजेची आवश्यकता होती तेव्हा एनरॉन प्रकल्प अरबी समुद्रात कोणी बुडवलेला ? नंतर तीच वीज महाग दराने कोणी घेतली ? जैतापुर प्रकल्पाला विरोध कोण करत आहे ?
सरकार उद्योगधंद्यांना राज्यात आणते परंतु विरोधी पक्षात असणार्यांना राज्याची प्रगती झालेली पाहवली जात नाही म्हणुन प्रत्येक प्रकल्पांना विरोध करायचे चुकिचा प्रचार करायचे आनि प्रकल्पांना त्रास द्यायचा
आनि दुसर्या बाजुने गुजरात मधुन त्याच प्रकल्पांना मदतीचा हात द्यायचा मग तो उद्योग जातो गुजरात मधे. हेच चालु आहे गेले १० वर्ष. राज्यातील प्रकल्प उद्योगधंदे कसे बाहेर जातील हेच विरोधी पक्षाचे काम होते.
7 Oct 2014 - 2:27 pm | मृत्युन्जय
हेच चालु आहे गेले १० वर्ष.
गेली १० वर्षे (गेली सहा महिने सोडुन) राज्यात आणि केंद्रात सत्ता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हातात आहे. प्रकल्पांना मंजुरी देणे आणि धडाडीने ते सुरु करणे / करवणे याची जबाबदारी सरकारची असते. विरोधक विरोध करत असतील तरीही जे योग्य असेल त्यावर निर्णय घेउन कारवाई करण्यापासुन सरकारला कोणीही थांबवु शकत नाही. खासकरुन सरकार अल्पमतात नसताना तर नक्कीच नाही. जर सरकार योग्य ती पावले उचलत नसतील तर प्रकल्प दुसर्या राज्यात जाणारच. प्रकल्प फक्त महाराष्ट्रातुनच दुसर्या राज्यात जातात तिकडून इकडे येत नाहित तुमच्याकडे केंद्रात आणि राज्यात सत्ता असुनही हे तुमच्या आळशीपणाचे आणि अकार्यक्षमतेचे लक्षण आहे.
गुजरातमधले कित्येक पॉवर प्लांट्स केंद्रीय पर्यावरण खात्याच्या लालफितीत अडकल्याचे सर्वज्ञात आहे. तरीही हे प्रकल्प दुसर्या राज्यात गेले नाहित कारण मोदी सरकारने वेळोवेळी त्यांना योग्य ते सहकार्य दिले. हे गुजरातमधल्या मोदी सरकारचे यश.
महाराष्ट्रातले प्रकल्प फक्त गुजरातमध्ये जातात हा अजुन एक अपप्रचार. ते कर्नाटक, तामिळनाडु आणी आंध्रातही जातात / गेले आहेत. गुजरातमध्ये फक्त महाराष्ट्रातलेच प्रकल्प येतात हा अजुन एक अपप्रचार. सगळ्या अकार्यक्षम राज्यांतुन मोदींनी प्रकल्प ओढुन आणले. टाटांनी तर मोदींच्या कार्यक्षमतेचे जाहीर कौतुक केले आणि प. बंगाल सरकारवर जाहीर टीका.
मागच्या वर्षी गुजरातमधल्या एका बड्या कंपनीत मोठ्या प्रमाणावर कामगार कपात झाली. त्यावर एका आठवड्यात मोदींनी स्वतः कंपनीच्या प्रवर्तकाला फोन करुन त्याचा जाब विचारला आणि राज्यात इतर रोजगार सुरु करण्याची विनंती केली. राज्याचा मुख्यमंत्री जेव्हा एवढा कर्तव्यदक्ष असतो तेव्हा उद्योजकांच्या मनात देखील विश्वास निर्माण होतो.
उद्योजक नफा कमाविण्यासाठी धंदा करत असतो. त्याला जर जेएनपीटीत माल उतरवुन घेणे आधिक फायदेशीर असेल तर तो तसेच करेल आणी गुजरातमध्ये फायदेशीर ठरत असेल तर तिथेच उतरवुन घेइल. कोणीही स्वतःच्या पदराला खार लावुन जे एन पीटी डुबवण्यासाठी मोदींना साथ देणार नाही. जर गुजरात सरकार काही इंसेंटिव्हस देत असेल तर महाराष्ट्र सरकारचेही हात कोणी धरुन ठेवलेले नाहित. पण इथला धंदा बसल्यावरच तुम्ही जागे होणार असाल तर त्यासाठी मोदींना कशाला दोष देता? तुमचे सरकार तरावे म्हणुन गुजरात सरकारने त्यांच्या राज्याचा विकास करु नये की काय? तुमची अकार्यक्षमता विरोधी पक्षांनी झाकावी ही भलतीच अपेक्षा झाली महाराजा.
बाकी एन्रॉणसारख्या भ्रष्ट कंपनीला भारतात आवताण दिलेच कशाला ते कळत नाही.
7 Oct 2014 - 7:10 pm | उदयन
इतके कळले असते तर आज महाराष्ट्रात लोडशेडींग झाली असती का ?
आधी विरोध मग सत्तेवर आल्यावर स्वतः काहीच काहीच करायचे नाही हेच तर चालु आहे युतीचे
तु गोंधळ घाल मी प्रकल्प पळवतो
6 Oct 2014 - 4:36 pm | दुश्यन्त
दिल्लीमधुन केंद्रीय नेतृत्व सांगेल त्याला/तिला मुख्यमंत्री बनवणार हा कुठला न्याय? आधीचा मुख्यमंत्री दिल्लीमधुन पाठवलेला होता. यावेळीही भाजपाचा दिल्लीमध्ये ठरलेला उमेदवार मुख्यमंत्री म्हणुन आला तर गेल्यावेळी प्रमाणे तो/ती प्रत्येक लहानसहान गोष्टीसाठी दिल्लीच्या वाऱ्या करणार. दिल्लीमधुन आलेल्याला जर प्रत्येक गोष्टीसाठी तिकडे धाव घ्यायला लागत असेल तर काय करायचा आहे तो दिल्लीतला मुख्यमंत्री? मग काय बदल झाला महाराष्टात? +१
मोदी स्वतः मान्य करतात कि मुंडे असते तर मला प्रचाराला यायची गरज नव्हती.उद्या सत्ता आलीच आणि फडणवीस/खडसे/तावडे/ मूनगुन्तीवर यापैकी कुणाला मुख्यमंत्री केलेच तर तो मोदी-शहांचा पित्तू म्हणूनच काम करेल.
7 Oct 2014 - 12:39 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
थोड्या वेळापूर्वीच निखिल्च्या आय.बी.एन. लोकमतवर राज ठाकरेंची मुलाखत पाहिली. हा मनुष्य नक्की कोणासाठी काम करतोय काही कळत नाही.उद्योगधंदे गुजरातमध्ये चालले आहेत म्हणून सारखे रडगाणे चालू होते,मोदींवर टिका करत होता पण गेल्या १५ वर्षातल्या राज्यातल्या परिस्थितीबद्दल,भ्रष्टाचाराबद्दल चकार शब्दही नाही.
7 Oct 2014 - 12:42 pm | दुश्यन्त
निखिल वागले आयबीनएन वर परतले कि काय? ते तर मी मराठी' मध्ये आहेत ना.
7 Oct 2014 - 1:55 pm | उदयन
स्वतंत्र विदर्भ करणार आहेत की नाही.. तिथे मोदी मी दिल्लीत असेल पर्यंत अखंड महाराष्ट्र राहिल म्हणुन वचने देत फिरत आहे आणि फडणवीस हे स्वतंत्र विदर्भ होणारच म्हणुन ओरडत फिरत आहे ( उगाच आरडाओरडा करणे ही त्यांची फॅशन आहे )
पक्षातच विरोधाभास आहे तर राज्य देश काय चालवणार हे