उदयनराजे विक्रमी मतांनी विजयी

raudransh_27's picture
raudransh_27 in राजकारण
16 May 2014 - 10:30 pm

क्लिंटन सर यांच्या पडघम मालिकेचे पुर्नवाचन करत असताना माझ्या एका प्रतिसादावर http://misalpav.com/node/27769 काही सदस्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या, त्या वाचुन खरच कीव आली. या प्रतिसादावरुन आणि अशाच तत्सम अनुभवांवरुन एकदंरीत विचारांची पातळी, द्वेष, एकांगी विचार, दुसर्याना कमी लेखण्याची आम्हीच श्रेष्ठ वृत्ती पाहुन दु:ख वाटते. विशेषत छत्रपती शिवराय याचां अनादर आणि वरील प्रतिसादात असलेले अंधत्व,दत्तक,बिरूदावली सारखे टोमणे.

असो, ज्या गोष्टी आपण वैयक्तिक बदलवु शकत नाही त्यावर काय करणार. त्या सर्व प्रतिसादावर, प्रत्येक मुद्दयावर माझ्याकडे संतुलित उत्तरे आहेत पण त्याच त्या विषयावर वाद घालण्याची अजिबात इच्छा नाहीये. इंटरनेट सिग्रेडी आणि RCC वाल्यांची एक पद्धत नेहमीची आहे they brings you down at their level and try to beat you by experience. तुमचे विचार तुम्हाला मुबारक. आम्हाला सिग्रेडी होऊन अशा २० % लोकामुंळे ८० % वर (एकुण ३%) गरळ ओकण्यापेछा काही दुसरे चांगली कामे करणे पसंत करू.

योगायोगाने आजच लोकसभा निकाल लागले. छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज
श्रीमंत छत्रपत्री उदयनराजे भोसले
सातारा लोकसभा मतदारसंघात
उदयनराजे भोसले हे तब्बल विक्रमी 5 लाख 22
हजार 531 मतांनी निवडून आले आहेत. ज्या भागात NDA ची एक जागा येत नव्हती तिथे आज राष्ट्रवादी हिंदुत्ववादी विचारसरणीचे shri. नरेंद्र मोदी यांच्या लाटेत पुणे, सांगली, सोलापुर वाहुन गेले (माढ्यात सदाभाऊ खोत थोडक्यात) त्याच पश्चिम महाराष्ट्रात उदयनराजे विक्रमी आघाडीने येतात हेच पुरेशे वाटते. उदयनराजे राष्टवादी नामक पार्टीच्या उमेदवारीमुळे निवडुन आले ही वस्तुस्थिति नाही. उदयनराजे पार्टी राजकारणा पलीकडचे व्यक्तित्व आहे. http://www.ibnlokmat.tv/archives/123983 तसा माझा आणि साताराृ्याचा विशेष संबंध नाही पण गेल्या वर्षभरात दुर्गभ्रमंती च्या निमित्ताने शिवकालिन प्रांत सातारा, कराड (सध्याचा ढोबळमानाने सातारा जिल्हा) पाहण्याचे भाग्य लाभले. महिमानगड, भुपालगड कोळदुर्ग, मच्छिंद्रगड ते वर प्रतापगड, केंजळ पर्यंत मुलुख फिरलो, उदयनराजें बद्दल आदर अधिकअधिक वाढत गेला. आधी फक्त दुर्गदुर्गेश्वर रायगड वर त्यांचे भाषण ऐकलेले, यंदाही राज्याभिषेक सोहळ्याला (०६ जुन २०१४) उदयनराजे येतीलच.

जनतेचे ॠण फेडणार अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांनी दिल्याची
http://livesatara.com/जनतेचे-ॠण-फेडणार-खा-उदयनर/
संकेतस्थळावर वाचायला मिळाली. उदयन महाराजानां ऩविन टर्म साठी शुभेच्छा. ग्रामीण भागास वाढीव निधि मिळावा ही त्यांची लोकसभेतील मागणी पुर्ण होवो, तसेच दुर्गसवंर्धन सारखी विधायक कामे होवोत हीच आई भवानी चरणी प्रार्थना.

जय शिवराय....। जय सह्याद्री....।
-- रौद्रांश
Intoxicated With Wine Of Holy and
Pride....

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

17 May 2014 - 10:22 am | प्रसाद गोडबोले

सातार्‍यात महाराजांना हरवणे अशक्य आहे अशक्य

खरेतर हिंदुत्ववादी पक्षांनी महाराजांना आपल्याबाजुला घ्यायला हवे ...पण महाराजांचा आधीचा बीजेपी बरोबरचा अनुभव वाईट असल्याने महाराज परत बीजेपी मधे जाण्याची शक्यता नाही .

ह्या सगळ्या मधे सातार्‍यातला हिंदुत्ववाद्यांची गोची होते , हिंदुत्ववादी पक्षाला मत द्यायचे की ज्यांच्यामुळे हिंदु धर्म तरला त्यांना ? त्यामुळे मी मतदान करतच नाही :)

पण मोदींनी एकदा प्रत्यक्ष भेट घेतली आणि पवारसाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव जरासा कमी केला तर महाराज परत हिंदुत्ववादी पक्षाकडे येतील अशी आशा आहे !

अवांतरः मागे एकदा संभाजी भिडे गुरुजी ह्यांनी रायगडावर मोदी आणि महाराजांची भेट घडवुन आणण्याचा प्रयत्न केला होता पण ते जमले नाही :(

विजुभाऊ's picture

17 May 2014 - 12:23 pm | विजुभाऊ

गिरीजा काका
कोणतीही व्यक्ती जाणता राजा या पदापर्यन्त पोहोचते ते रयतेच्या प्रश्नांची जाण असल्यामुळे. ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केल्यामुळे.
सातार्‍यात गेल्या किमान तीस वर्षांपासूनच्या काही समस्या आहेत.
१) येथील तरुणाना स्थानीक रोजगार उपलब्ध नाहीत त्यामुळे मुम्बै/पुणे येथे स्थलांतर करावे लागते :- मागील तीस वर्षांपासून उत्तम भौगोलीक परिस्थिती ( वीज / पाणी / राष्ट्रीय महामार्ग/प्रशिक्षीत मनुष्यबळ) उपलब्द असूनही येथे एकही नवा मोठा उद्योग आलेला नाही. उलट जे होते ते उद्योगच इतरत्र स्थलांतरीत झाले ( उदा अ‍ॅरीस्टोक्रॅट / डोबर्ग ) महाराष्ट्र स्कूटर्स चे तर मागील किमान पंधरा वर्षाम्पासून उत्पादन बंदच आहे. एकाही लोकप्रतिनीधीनी याबाबत कधीच आवाज उठवला नाही.
२) यामुळे त्यावर अवलंबून असलेले छोटे उद्योजकसुद्धा देशोधडीला लागले आहेत.
३) केवळ साखर कारखाना हीच काय ती जमेची बाजू.
४) शेजारीच सूत गिरणी प्रकल्पाची भकास अर्धवट बांधलेली मोडकळलेली इमारत येताजाता नजरेस पडते. त्या प्रकल्पाचे काय झाले कोण जाणे.
५) सातार्‍याच्या आसपास निसर्गाने अक्षरश: वैभवाची उधळण केलेली आहे. शक्य असुनही एकाही पर्यटनस्थळाचा विकास केलेला नाहिय्ये. ( कोयनानगर हे अक्षरशः नम्दनवन आहे)
६) सातार्‍यात शक्य असूनही योग्य वैद्यकीय सोयी उपलब्ध नसल्याने रुग्णाना पुण्याला जावे लागते.
७) सातार्‍यात आयटी पार्क सारख्या किंवा तत्सम गोष्टी आणणे सहज शक्य आहे. मात्र त्यासाठी प्रयत्नच होत नाहीत.
८) शेतीमालावर प्रक्रीया करणारा एकही मोठा उद्योग येथे नाही.
९) सातार्‍यात बर्‍याच हिंदी मराठी चित्रपटांची चित्रीकरणे होतात ( दबंग / अपहरण हे खुद्द सातारा शहरात) मात्र त्या अनुशंगीक एकही सोयी येथे उपलब्ध नाहीत.
१०) स्मशानभूमी देखील लोकवर्गणीतून झालेली आहे. यात कोणते राजकारण आडवे येत होते कोण जाणे. पण इच्छेचा अभाव )
११) जागा असुनही तीस वर्षात एकही नवे उद्यान , पोहोण्याचा तलाव , खेळण्याच्या सुविधा निर्माण केल्या नाहीत.
सातार्‍यातील लोकांचे शिवाजी महाराजांवर असलेले प्रेम आणि आदर यामुळे एका हाकेसरशी अक्षरशः लाखो लोक जमा करण्याची क्षमता या नेत्यांकडे आहे मात्र याच उपयोग विकासासाठी कधीच केला गेला नाही.

पर्यटन , कृषी उद्योग ,अ‍ॅटोमॉबाईल या उद्योगांत मोठ्याप्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. मात्र केवळ इच्छेचा अभाव यामुळे क्षमता असूनही सातार्‍याचा विकास झालेला नाहिय्ये.
हे झाले काही मोजकेच मुद्दे. कोणत्याही व्यक्तीबद्दल तक्रार नाही. मात्र तीस वर्षे हे मुद्दे असेच राहिले आहेत.
या उलट पवारानी बारामतीसारख्या छोट्या गावाचा उत्तक विकास केलेला आहे. तेथे मोठे उद्योग आहेत. आसपासच्या कुरकुंभ. जेजुरी सारख्या गावातही मोठे उद्योग आलेले आहेत. ही वस्तुस्थिती नाकारत येत नाही.
कोणाबद्दल वैयक्तीक आक्षेप नाहीत मात्र कोणाची व्यक्तीपूजा करताना ती विभागाच्या विकासाच्या निकषावर घासुन पाहिली तर दुर्दैवाने सर्व आक्षेप योग्य आहेत हेच खरे असे म्हणावे लागेल.

नगरीनिरंजन's picture

17 May 2014 - 11:22 pm | नगरीनिरंजन

विजुभाऊ,
जनतेच्या प्रतिनिधीने जनतेसाठी काम करणे अपेक्षितच आहे. कोणी कितीही विकास केला तरी व्यक्तिपूजा सर्वथैव असमर्थनीय आहे, हो की नाही?

बॅटमॅन's picture

17 May 2014 - 12:25 pm | बॅटमॅन

या माणसाने सातार्‍यासाठी नक्की काय केले ते खरेच ऐकायला आवडेल. जे ऐकलेय त्यात फक्त मुजोरी सोडून दुसरे काही आढळले नाही आजवर. पण सातारकर नसल्याने काही प्रत्यक्ष अनुभव नाही, तरी कुणा सातारकराने माहिती पुरवावी-अभिनिवेशरहित होऊन. सातार्‍याच्या विकासात यांचे योगदान नक्की काय? छत्रपतींचा वंशज असणे हे काही कर्तृत्व नाही.

नगरीनिरंजन's picture

17 May 2014 - 11:18 pm | नगरीनिरंजन

क्या बोला! क्या बोला!
आजच्या जमान्यात एखाद्याला महाराज वगैरे संबोधणे वगैरे पाहून मला तर काय म्हणावे तेच कळत नाही.
एकीकडे सत्तापालट करून स्थैर्यासाठी पक्षाला मतदान करण्याची परिपक्वता देशभरातले मतदार दाखवत असताना इथे व्यक्तिपूजेची थाळी सजवण्यात येत आहे हे पाहून अजून लोकशाही सगळीकडे रुजायची आहे याची साक्ष पटली.

हाडक्या's picture

19 May 2014 - 3:33 am | हाडक्या

या इथे एक सातारकर म्हणून थोडक्यात काही बाबी मांडल्या आहेत यांच्याबद्दल. पण या साहेबांना चर्चा नको आहे असे त्यंनी

असो, ज्या गोष्टी आपण वैयक्तिक बदलवु शकत नाही त्यावर काय करणार. त्या सर्व प्रतिसादावर, प्रत्येक मुद्दयावर माझ्याकडे संतुलित उत्तरे आहेत पण त्याच त्या विषयावर वाद घालण्याची अजिबात इच्छा नाहीये.

या इथे सांगितले असल्याने चर्चेचा प्रश्न येत नाही असे वाटले, त्यांची जी काही 'संतुलित उत्तरे' जरी द्यायला ते तयार असतील तर आम्ही पण बोलू.. पण RSS वाले आणि सीग्रेडी अशी मुक्ताफळे आधीच उधळल्यावर काय मग ?

उदयन राजे आणि त्यांचे भरपूर 'प्रताप' आम्ही सातारकरांनी पाहिले आहेत.

तसा माझा आणि साताराृ्याचा विशेष संबंध नाही पण गेल्या वर्षभरात दुर्गभ्रमंती च्या निमित्ताने शिवकालिन प्रांत सातारा, कराड (सध्याचा ढोबळमानाने सातारा जिल्हा) पाहण्याचे भाग्य लाभले.

म्हणजे उदयन राजे तुमच्यासाठी दूरून डोंगर साजरे आहेत असेच म्हणायचे.
निव्वळ शिवरायांचे वंशज मुद्द्यावरून यांना मते का द्यावीत कुणी..?

विशेषत छत्रपती शिवराय याचां अनादर

शिवरायांचा अनादर वगैरे लगेच मध्ये आणू नका हो.. आम्ही तिथेच सातार्‍यात वाढलोय. आणि तुम्ही एकदा शिवाजी संग्रहालयाची अवस्था पहा आणि मग या त्यांच्या वंशजानेच तिथे दुर्लक्ष करून कसा शिवरायांचा अपमान केलाय ते कळेल.

बाकी तुम्हाला चर्चा करायची नसल्याने काहीच मुद्दे मांडत नाहीये तरी पण फारतर इथे विजुभाऊनी मांडलेले मुद्दे आहेत त्याच्याबद्दल बोललात तरी भरपूर..

प्रसाद१९७१'s picture

19 May 2014 - 1:32 pm | प्रसाद१९७१

हाडक्या - उत्तम प्रतिसाद

मालोजीराव's picture

20 May 2014 - 6:15 pm | मालोजीराव

सातार्यातील अनेक जेष्ठ व्यक्ती, राजकारणातील काही लोक, राज्यातील बरेच पत्रकार उदयनराजेंना एकेरी नावाने संबोधतात, त्यांना महाराज वगैरे म्हणणे चूक आहे या तुमच्या मताशी मी पूर्ण सहमत आहेच.
पण आमचे घराणे असेल किंवा इतर अनेक घराणी आहेत ज्यांचे छत्रपतींच्या घराण्याशी पूर्वापार संबंध आहेत, त्यामुळे त्यांना राजे किंवा छत्रपती संबोधणे आमच्या चालीरितीमध्ये आहे आणि त्याबद्दल कुणाला आक्षेपही असू नये.

इथे काहीजणांनी या लोकांना पत्त्याच्या कॅटमधल्या राजाएवढी सुद्धा किंमत नाही असे म्हंटले आहे, यांना कदाचित ठावूक नसावं देशातील काही पंतप्रधान उदा. विश्वनाथ प्रताप सिंह कित्येक आजी /माजी मुख्यमंत्री … वसुंधराराजे,अर्जुन सिंह ,दिग्विजय सिंह,भैरोसिंह शेखावत हे राजघराण्याशीच संबंधित आहेत. कित्येक आजी /माजी केंद्रीय मंत्री,राज्यांतील मंत्री यांची संख्या तर मोठीच आहे .
महाराष्ट्रापुरते सांगायचे झाले तर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (जाधवराव) , सध्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण , खासदार विजयसिंह मोहिते, पुण्याचे नवीन खासदार अनिल शिरोळे हेही अश्याच घराण्यांशी संबंधित आहेत.

नानासाहेब नेफळे's picture

20 May 2014 - 7:02 pm | नानासाहेब नेफळे

व्वा !व्वा !!व्वा!!!
मालोजी, ही एवढ्या कर्तृत्वाशाली व्यक्तींची यादी देऊन तूम्ही या भारतभूला उपकृतच केले नै का!
हेच राजमान्य, मुजरामात्रे ,स्वकतृत्ववान लोक जेव्हा जाहिर सभेत फुले आंबेडकरांचे नाव घेतात व सत्ता येताच खुर्च्या उबवायला आपल्या ९६ बगलबच्च्यांची वर्णी लावतात ,आरक्षणाची मागणीकरुन तळागाळातल्या लोकांच्या भाकरीतला चतकोर तुकडा हिसकावण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अंमळ गंमत वाटते.
एक सांप्रतकालीन महाराष्ट्रीय नरपुंगव राजे सध्या आरक्षण मागत फिरत आहेत, तेही आलिशान मर्सिडीज, ऑडी यांचा ताफा घेऊन... कमाल नै!

वाडीचे सावंत's picture

20 May 2014 - 11:25 pm | वाडीचे सावंत

नेफळे ( खर आडनाव असल्यास ) तुमचा प्रोब्लेम काय आहे...एकंदरित ब्राह्मण आणि मराठा ह्यान्च्याबद्दल तुमच्या मनात फ़ार आकस आहे...
तुम्ही कोणताही विषय नेहमी धर्म आणि जातींकडे का नेता....
टीप: मी मराठा आरक्शणाचा कडवा वीरोधक आहे... पण मराठा आरक्शणा बाबत तुमच्या पोटात फ़ारच दुखत ... तुमचा टक्का कमी होईल म्हणुन का?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 May 2014 - 11:17 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मालोजीराजे, छत्रपतींच्या घराण्याविषयी लोकांना आस्था असलीचं पाहीजे. शिवाजी महाराजांचं कर्तुत्व तेवढं मोठं होतच ह्यात काही वाद नाही.
पण त्यांचे वंशज म्हणुन छत्रपती लेव्हलचं कर्तुत्व नसताना मिरवणं मात्र नक्की खटकतं. शिवाजी महाराजांसारखं कर्तुत्व असेल तर त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायला पण सगळ्यांची तयारी असेल.

विजुभाऊ's picture

17 May 2014 - 12:34 pm | विजुभाऊ

ब्याटम्यान काका
केवळ याच व्यक्तीने नाही तर त्यांच्या पूर्वसुरींनी सुद्धा. त्यामुळेच गेल्या तीस वर्षात असे म्हणतोय.
त्यांच्या काकानी निदान काही पाणीपुरवठा योजना , सहकारी साखर कारखाना , नाट्यगृह इत्यादी मोजके का होईना काही गोष्टी जमेकडे आहेत. मात्र बाकी शून्य.

बॅटमॅन's picture

17 May 2014 - 12:40 pm | बॅटमॅन

यांचे काका म्ह. ते अभयसिंहराजे काय?

बाकी पूर्वसूरींचं माहिती नै पण मी उदयनराजेंचाच उदोउदो जास्त ऐकलाय, सबब प्रश्न त्यांच्याबद्दलच आहे.

अन अजून एक प्रश्न असा की जर काहीच नै केले तर लोक मतं का देतात? फक्त दहशतीच्या जोरावर असे जमत असेलसे वाटत नै. नक्की माजरा क्या है?

विजुभाऊ's picture

17 May 2014 - 12:39 pm | विजुभाऊ

सातार्‍यातील डोंगर दगड खाणीमुळे पोखरले जात आहेत.
ऐतीहासीक अजिंक्यतारा तर मागील बाजूने अक्षरश पूर्ण उभा कातरला गेला आहे.
अशाच एका दगड खाणीतील वादामुळे एका राष्ट्रवादी गुंडाचा खून झाला होता.

प्रसाद गोडबोले's picture

19 May 2014 - 12:43 am | प्रसाद गोडबोले

अजिंक्यतार्‍यातील गौणखनिज पश्याला बंधी होवुन किमान २० वर्षे होवुन गेलीत ... मी लहानपणापासुन खिडीतल्या गणपतीला जातोय पण चौथी नंतर एकदाही सुरुंग लावला आहे ह्या कारणाने थांबण्याचा योग आलेला नाही .

llपुण्याचे पेशवेll's picture

19 May 2014 - 4:35 pm | llपुण्याचे पेशवेll

हे गुंड म्हणजे शरदभाऊ लेवे काय हो विजुभाऊ?

बरोबर ब्याटम्यान्काका. तेच ते .
दहशत नाही मात्र छ. शिवाजी महाराजांबद्दल लोकाना इतके प्रचंड प्रेम आणि आदर आहे. ते प्रेम राजघराण्याबद्दल आहे.
त्यांच्या मातोश्री ज्यावेळेस निवडणूकीत पडल्या त्यावेळेस अभयसिंह्राजे भोसले हेच विरोधात उभे होते. त्यामुळे लोकानी थोडा मवाळ पर्याय निवडला होता. अभयसिंहराजे भोसले आनि उदयनराजे यांच्यात एकदा लढत झाली होती. त्यावेळेस अभयसिंह राजे भोसले निवडणूक हरताहरता थोडक्यात बचावले. (तेही काही इतर कारणांमुळे).

नानासाहेब नेफळे's picture

17 May 2014 - 12:54 pm | नानासाहेब नेफळे

कराडकडे जाताना हायवेवरुन पोखलेले दिसते ते ना? काय राव लै पोखल्याचे सांगताय.

विजुभाऊ's picture

17 May 2014 - 12:58 pm | विजुभाऊ

नानासाहेब नेफळे.( पूर्वाश्रमीचे ग्रेट थिंकर) मी अजिंक्यातार्‍याच्या मागील बाजूचा म्हणजे हायवेकडच्या नव्हे तर "खिंडीतील गणपती" बाजूकडचे बोलतोय. उगाच वस्तुस्थिती माहीत नसताना उचलले बोट आपटले की बोरडावर असे करु नका.

बॅटमॅन's picture

17 May 2014 - 1:05 pm | बॅटमॅन

आयला, फक्त इतकेच आहे तर मग गांधी-नेहरू घराणेशाहीला तरी कुठल्या तोंडाने दोष द्यायचा ओ.

प्रसाद गोडबोले's picture

19 May 2014 - 12:46 am | प्रसाद गोडबोले

गांधी(फिरोज)/ नेहरु = शिवाजी महाराज असे गणित आहे का ? तसे असल्यास दोष देता येणार नाहीच .

बॅटमॅन's picture

19 May 2014 - 1:17 am | बॅटमॅन

नक्की फरक काय आहे?

शिवाजी महाराज काय किंवा गांधी-नेहरू काय, त्या त्या लोकांचे जे काही कर्तृत्व होते त्या बळावर त्यांच्या वंशजांनी किती माज करावा याला लिमिट असते. त्या दृष्टीने पाहता फरक नाहीच.

समर्थ स्वतःच म्हणतात ना, "सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख" म्हणून? मग हे कसं चालतं? शिवाजीराजांचे वंशज असण्यात स्वतःचे कर्तृत्व काय आहे या प्रश्नाचे उत्तर द्या बॉ कुणीतरी. इतक्या प्रतिष्ठित कुळात जन्म घेऊन पुढं काही केलं तर ठीक, नैतर पोकळ बढाईपेक्षा त्याला काडीमात्र महत्त्व नाही.

नानासाहेब नेफळे's picture

17 May 2014 - 1:08 pm | नानासाहेब नेफळे

सएमाम

विजुभाऊंच्या सर्व प्रतिसादाशी अगदी सहमत.
करता येण्यासारखी अनेक कामे केवळ करण्याची इच्छाशक्ती नसल्याने त्या घराण्याने केली नाहीयेत. मग ते अभयसिंह असो, उदयन असो किंवा शिवेंद्र असो.

उदयनराजेंनी कार्यकर्त्यांची फौज मात्र उत्तम बांधली आहे. त्यामुळे सातारा शहर सोडा पण आसपासची अनेक गावे एकगठ्ठा मतं देतात. जोडीला गुंडगिरी आहेच.
रच्याकने कालच्या निवडणुकीनंतर एबीपी माझा ला त्यांनी दिलेली प्रतिक्रिया ऐकली का?
जरा जास्तच झालं त्यात .. किंवा " जास्त झाली" असावी .

http://abpmajha.abplive.in/videos/2014/05/16/article324016.ece/कार्ट्यांनो-असे-घाणेरडे-प्र?id=324016#.U3fpR9q9KSM

दुश्यन्त's picture

18 May 2014 - 12:14 pm | दुश्यन्त

महायुतीने ही जागा आर पी आय ला सोडली होती. आर पी आय ला तिथे उमेदवार मिळत नव्हता, एक उमेदवार मिळाला तो नामांकन भरायच्या आदल्या दिवशी बदलला. महायुतीत सगळा संभ्रम होता. त्यात सेनेच्या पुरुषोत्तम जाधवांनी बंडखोरी केली होती.महायुती खासकरून मुंडे आणि उदयन राजेंचे संबंध चांगले आहेत. सेनेने स्वतःचा उमेदवार दिला असता तर किमान एक चांगली लढत तरी झाली असती मात्र आठवलेंच्या पक्षाची ताकद एकदम तोल मासा तेव्हा एका अर्थाने हा महयुतीकडून उदयनराजेना बाय होता असेच म्हणावे लागेल. उद्या उदयनराजे भाजपमध्ये आले तरी नवल वाटायला नको.

प्रसाद गोडबोले's picture

18 May 2014 - 7:02 pm | प्रसाद गोडबोले

सातार्‍याचा "पुणे मुंबई बारामती स्टाईल" विकास न होवु देणे हे माझ्या लेखी एक खुप मोठे पॉसिटीव्ह काम आहे ... नकोच आमच्या सातार्‍यात तसला विकास ...

अवांतर : डॉ. पुष्कर श्रोत्रींनी एक कासच्या फुलांवर लिहिलेले पुस्तक आणि त्यांचे वर्ल्ड हेरीटेज करणाचे काम इतके सुप्रसिध्द झाले की आता कासला २-३ लाख लोक भेट देतात ... लवकरच कास उध्वस्त होईल ! आणि ऐकीव माहीती नुसार डॉक्टरांनाही कास बाबत जे झाले त्याबद्दल वाईटच वाटत आहे :(

बाकी सविस्तर प्रतिसाद देतो जरा निवांत पणे !

बेशिकमध्येच लोच्या झालाय अशी शंका आहे.

सगळीकडे शिमिटाची खुराडी अन धुराडी उभी करणे म्हंजेच फक्त विकास नाही. पण संतुलित विकासही करता येऊ शकतो. पण यांनी नक्की केले तरी काय? विकास होऊ न देणे?

प्रसादराव, अतिशयच असहमत. तुमच्या प्रतिसादाची वाट पाहतो आहे.

प्रसाद गोडबोले's picture

19 May 2014 - 12:19 am | प्रसाद गोडबोले

संतुलित विकासही करता येऊ शकतो.

संतुलित विकास हेच कॉन्ट्रॅडिक्शन आहे ... एकीकडे खडडा खणल्या शिवाय दुसरीकडे डोंगर उभारताच येत नाही असे म्हाझे ठाम मत आहे. तुम्ही म्हणता तसल्या संतुलित विकासाचे माझ्या पाहण्यात तरी एकही उदाहरण नाही

Please enlighten me !!

प्रसाद गोडबोले's picture

19 May 2014 - 12:47 am | प्रसाद गोडबोले

ह्या निमित्ताने "विकास म्हणजे नक्की काय ?" ह्यावर एकदा सविस्तर चर्चा कली पाहिजे .... स्वतंत्र धागा काढतो त्याबद्दल :)

लॉरी टांगटूंगकर's picture

19 May 2014 - 12:54 am | लॉरी टांगटूंगकर

संतुलित विकास गोव्याला म्हणावे? आहेत त्या इंडस्ट्रीज नीट चालल्या आहेत आणि धुराडी उभी राहिली नाहीयेत.

साताऱ्याने आहे तसेच रहावे आणि बदलू नये असं मला पण वाटतं. आणि एकीकडे त्यात लै लै स्वार्थीपणा असं पण वाटतं आहे. आपण सगळे (म्हणजे इथे चर्चा करणारे सातारकर कोणी राहतंय साताऱ्यात?? मी बंगळूरात आहे) ऑब्व्हीयस कारणासाठी बाहेर रहाणार आणि लोकल पब्लिक आहे तसंच रहावे, त्यांनी बदलू नये अशी अपेक्षा का करावी??
कोल्हापुरात मजबूत कास्टिंग आहे, पुण्यात कंपन्या आहेत. साताऱ्यात मशीनिंग जोरदार होण्यास काय हरकत आहे? नगर रोडवर सणसवाडी वगैरे एमआयडीसी झाल्यात. अ‍ॅबनॉर्मल सूज असलेली ग्रोथ नको पण वरती म्हणाल्या प्रमाणे आर्यांग्ल एक चांगलं फेमस कॉलेज झालं तर काय बिघडेल??
परिवारापैकी शिवेंद्रसिंह यांनी सुरुवात करून फुलं एक्स्पोर्ट (दुबईमध्ये वगैरे) करायला बऱ्याच जणांना मदत केली आहे. बरीच ग्रीन हाउस बांधली गेली आहेत. काही जणांनी एक्स्पोर्ट साठी स्ट्रॉबेरी वगैरेची पण उत्पादने घ्यायला सुरुवात केलेली आहे.

बॅटमॅन's picture

19 May 2014 - 1:17 am | बॅटमॅन

तेच तर. आहे तसं रहावं, बदलू नये, इ. म्हटले तर तो एक स्वार्थीपणाच आहे कारण असे म्हणणारे लोक अन्य ठिकाणच्या डेव्हलपमेंटचा फायदा घेत असतात. उद्या मिरजेनेही बदलू नये असे मी म्हटले तर तो ढोंगीपणाच होईल.

हाडक्या's picture

19 May 2014 - 3:52 am | हाडक्या

हॅ हॅ हॅ .. आम्ही पममई, ममई आणि परदेशात काम करतो.. मंग सुट्टीला सातार्‍याला जातो.. मग कशाला पायजे बदल ?
;)

फक्त तुमच्या एरिया मधल्या गुंडाशी ओळख ठेवा (तो पण कधी बदलत नाही) मग पोलिसाने अडवू दे नायतर अजून काय राडा होवू दे.. बिंदास सांगा 'वाड्यावर फोन लाऊ का रे ?' बास.. सिंपल लाईफ..

बॅटमॅन भौ, ढोंगीपणा आपल्या भारतीय रक्तातच खोलवर मुरला आहे, त्यात नवीन ते काय हो ?

गिरीजाकाका विकासाचा स्थानीक निसर्गाच्या प्रश्नाशी बादरायण संबन्ध जोडून नका. कास ची व्यथा वेगळी आहे.तेथे निसर्गाला धोका असण्याचा प्रश्न आहे. पण त्याव्यतिरीक्त अनेक मुद्दे आहेत.
पुणे बारामती स्टाईल विकास म्हणजे काय जो? स्थानीक लोकाना रोजगार उपलब्ध व्हायला नको का?
सातार्‍यातील लोकाना किमान सोई असलेली स्मशानभूमी देखील न मिळणे / मुलाना खेळण्यासाठी एकही उत्तम ग्राउंड / अकादमी नसणे / चांगल्या वैद्यकीय सोयी नसणे याचा विकासाशी काहीच संबन्ध नाही असे का म्हणायचे आहे.
सातार्‍यात असलेल्या शैक्षणीक सोयी या काही खाजगी संस्थानी उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.

"सातार्‍याचा "पुणे मुंबई बारामती स्टाईल" विकास न होवु देणे हे माझ्या लेखी एक खुप मोठे पॉसिटीव्ह काम आहे ...

"
आपल्या अफाट तार्कीकाला लाख सलाम. धन्यवाद. बरे झाले तुम्हीच तुमच्या बुद्धीमत्तेचे प्रमाण दिलेत.

बॅटमॅन's picture

18 May 2014 - 8:40 pm | बॅटमॅन

स्थानिकांना रोजगार मिळणे, चांगली कॉलेजेस असणे, इ. महत्त्वाचे आहे. हेच सांगली-मिरजेत किंवा कोल्हापुरात पहा. मेडिकल सेवांबाबतीतच पहायचे झाले तर अख्ख्या दक्षिण महाराष्ट्रात आणि उत्तर कर्नाटकात मिरज फेमस आहे. सांगलीत वालचंद कॉलेज आहे. कोल्हापुरात फौंड्री बिझनेस जोरात आहे. सातार्‍यात असं काय आहे साखर कारखाना एक वगळला तर?

आनन्दिता's picture

18 May 2014 - 11:02 pm | आनन्दिता

सातार्याचं आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय १९१३ ला स्थापन झालंय. हे भारतातलं पहिलं आयुर्वेदिक महाविद्यालय आहे. याचा विदा शोधायचा प्रयत्न करतेय. पण कुठे मिळाला नाही. ' पुढारी ' मधे त्यावर एक मोठं आर्टीकल आलं होतं दोन-तीन वर्षापुर्वी त्यात हा उल्लेख होता.

सातार्याच्या नाकर्त्या नेतॄत्वामुळे हे कॉलेज आता अखेरच्या घटका मोजतंय. कॉलेज च्या इमारतीकडे पाहुन भुतबंगल्याची आठवण होते. होस्टेल ची अवस्था तर गचाळ शब्द कमी पडावा अशी आहे.

बॅटमॅन's picture

18 May 2014 - 11:12 pm | बॅटमॅन

धन्यवाद. अशा अजूनही काही गोष्टी असतील, पण त्यांचे कधी कुणी नावही ऐकलेले नसणे हे बाहेरच्यांचे अज्ञान सोडून तत्रस्थांच्या अनास्थेचाच परिणाम होय.

दुश्यन्त's picture

19 May 2014 - 4:14 pm | दुश्यन्त

सहमत.
सातार्यापेक्षा सांगली, कोल्हापूर, कराड झालच तर जवळचे फलटण, अकलूज पण बर्याचदा विकसित वाटतात.

प्रसाद गोडबोले's picture

19 May 2014 - 12:33 am | प्रसाद गोडबोले

गिरीजाकाका विकासाचा स्थानीक निसर्गाच्या प्रश्नाशी बादरायण संबन्ध जोडून नका.

विकास म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्शन मधील वाढ ... निसर्गातल्या रीसोर्सेस वर ओव्हर्लोडींग केल्या शिवाय अशी वाढ शक्यच नसते त्यामुळे हा बादरायण संबंध मुळीच नव्हे . ज्याला तुम्ही विकास म्हणता तो १६व्या शतकातील औद्योगिक क्रांती नंतर झालेला बदल आहे आणि त्यानंतर झालेला निसरगाचा र्‍हासही आपल्या पाहण्यात असेलच !!

पुणे बारामती स्टाईल विकास म्हणजे काय जो?

>>> पुण्याच्या आसपास उभे रहात असलेल्या काँक्रीटचा जंगलांकडे पहा मग लक्षात येईल की मला काय म्हणायचे आहे ते

स्थानीक लोकाना रोजगार उपलब्ध व्हायला नको का?

>>> नको . स्थानिक लोक अकार्यक्षम असतिल तर त्यांना रोजगार उत्पन्न व्हाय्ला नकोच्च. आणि जे कार्यक्षम असतील ते त्यांचा मार्ग शोधुन काढतील ( जसा की मी काढलाय :P)

सातार्‍यातील लोकाना किमान सोई असलेली स्मशानभूमी देखील न मिळणे / मुलाना खेळण्यासाठी एकही उत्तम ग्राउंड / अकादमी नसणे / चांगल्या वैद्यकीय सोयी नसणे याचा विकासाशी काहीच संबन्ध नाही असे का म्हणायचे आहे.

स्मशानभुमी हा चोरगेंनी केलेला राजकीय मुद्दा आहे . उत्तम शाहु स्टेडीयम हाही चोरगेंनीच केकेला राजकीय मुद्दा आहे . क्रांतीसिंंह नानापाटील रुग्णालया इतक्या सोयी अन्य कोणत्याही रुग्णालयात असल्याचे माझ्यातरी ऐकीवात नाही ९ अर्थात तुम्ही खाजगी रुग्णालयाशी तुलना करीत असाल तर ते अ‍ॅप्पल अ‍ॅन्ड ऑरेंजेस होईल )

सातार्‍यात असलेल्या शैक्षणीक सोयी या काही खाजगी संस्थानी उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.

>>> रयत शिक्षण संस्था खाजगी आहे काय ? आणि सातार्‍यात नवोदय आहे, सैनिक स्कुल आहे त्याबद्दल काय मत आहे ? शिवाय सगळ्याच गोष्ठी सरकारने पुरवाव्यात अशी का अपेक्षा ? समजा जरी पुरवल्यात तरी त्याचा किती जण लाभ घेतील ? सातार्‍यातील ३ सरकारी शाळांचे पत्ते सांगा पाहु ....

आपल्या अफाट तार्कीकाला लाख सलाम. धन्यवाद. बरे झाले तुम्हीच तुमच्या बुद्धीमत्तेचे प्रमाण दिलेत.

>>> व्यक्तीगत आरोप ! ज्याची त्याची स्वतंत्र मते असु शकतात आणि आपण आपल्यातील मतभिन्नतेचा आदर करायला शिकले पाहिजे !
. आपण ज्येष्ठ आहात , बहुत काय लिहिणे :)

आनन्दिता's picture

19 May 2014 - 7:04 am | आनन्दिता

>>> रयत शिक्षण संस्था खाजगी आहे काय ? आणि सातार्‍यात नवोदय आहे, सैनिक स्कुल आहे त्याबद्दल काय मत आहे ?

गिरिजाकाका, रयत शिक्षण संस्था सरकारी संस्था नक्कीच नाही. ती एक खासगीच संस्था आहे. रयत मधल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा कॉलेजं सरकार द्वारा ' अनुदानित' आहेत. सरकारी आणि अनुदानित संस्थांमधे बराच फरक असतो.

याच रयत ची वोकेश्नल कॉलेजं म्हणजे " के. बी. पी. इंजिनिअरिंग कॉलेज " किंवा लॉ कॉलेज यासाठीची अ‍ॅड्मिशन्स खासगी कॉलेज म्हणुन होतात. सरकारी नाही कारण त्यांना सरकारचं अनुदान नाही,

नवोदय विद्यालय सातार्यात आहे कारण सातारा हे जिल्ह्याचं ठिकाण आहे. आणि नवोदय विद्यालये भारतातल्या सर्व जिल्ह्यांमधे आहेत ( तामिळनाडू सोडुन ). किंबहुना तसा नियमच आहे. त्यामुळे त्यात स्पेशल असं काही नाही.

प्रसाद१९७१'s picture

19 May 2014 - 1:37 pm | प्रसाद१९७१

पुण्याच्या आसपास उभे रहात असलेल्या काँक्रीटचा जंगलांकडे पहा मग लक्षात येईल की मला काय म्हणायचे आहे ते >>>>>>> गिरिजा काकू - लोकांनी कायम झोपडीत च रहावे अशी तुमची अपेक्षा आहे काय? लोकसंख्या वाढते आहे, इमारती नाही बांधल्या तर लोकांनी रहायचे कुठे?

सातार्‍यात तसे बघायला गेले तर अनेक कोलेजेस उपलब्ध आहेत.
मात्र मिरजसारखे गव्हर्न्मेंट मेडीकल कॉलेज उपलब्ध नाही. काही उपचार घ्यायचे झाले तर कराडच्या कृष्णा मेडीकल मधे जावे लागते.
महाराष्ट्र स्कूटर्स सारखा कारखाना जोवर चालू होता तोवर स्थानीक छोट्या उद्योगाना फाउम्ड्री, मशिनिंगची कामे मिळायची. तो कारखाना गेली कित्येक वर्षे उत्पादन बंद अवस्थेत आहे. महाराष्ट्रा शासनाची थेट गुंतवणूक त्या उद्योगात आहे. तेथे इतर कोणतेही उत्पादन करणे सहज शक्य आहे.
सातार्‍यात महाराष्ट्रात होणारी बहुतेक सर्व ( संत्री वगळता) पिके होतात. मात्र कृषी मालावर प्रक्रीया करणारा एकही मोठा उद्योग नाहिय्ये.
सर्व सोयी उपलब्ध असूनही सातार्‍यातली एम आयडीसी कायम आजारी आहे. कारखाने बंद पडले आहेत.
अर्थात हे सर्व त्या

मोठ्या पॉझीटीव्ह कामाचा

भाग असावा बहुतेक.
सातार्‍यात काय आहे असे विचाराल तर पर्यतनासाठी अनेक स्थळे आहेत. उदा माहुली इथला कृष्णा कोयनेचा संगम. इथे अनेक सुंदर मंदीरे आहेत. पण ती अक्षरशः दुर्लक्षीत. काही मंदीरे तर कळसापर्यन्त अर्धवट वाळूत गाडली गेली आहेत. इथे तिथे साफसफाई करून एखादे अप्रमतीम ऐतीहासीक स्थळ उद्यान करणे शक्य आहे, पण इथे वाळू उपसा करून नदीचे डबके करून टाकले आहे. अर्थात हे सुद्धा कदाचित त्या "मोठ्या पॉझीटीव्ह " कामात अंतर्भूत असेल.
करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. पाटेश्वर सारख्या स्थळाचा विकास करणे शक्य आहे.
सातार्‍यावर निसर्गाने भरभरून दिलेले आहे. कण्हेर धरणावर एखादे सुंदर बाग करणे शक्य आहे.
पण असो........ मोठे पॉझीटीव्ह काम.

प्रसाद गोडबोले's picture

19 May 2014 - 12:38 am | प्रसाद गोडबोले

येस्स करेक्ट ... सातार्यात ज्या योगे बाहेरचे लोक येतील असे काहीच नको ... आम्ही आहे तसे आहे त्यात मस्त खुष आहोत ... ( खोटं नाही बोलत हो ... मागल्या वेळेस कासला फोटो काढायसाठी फी मागितली त्या भैयाच्या डोकयात दगड घालायची इच्छा झाली होती... हायला ह्या कासवर आम्ही खेळलो बागडलो लहानाचे मोठे झालो तिथे येवुन हिंदीत बोलुन आमच्याच कडुन फी वसुल करतो ... त्याच्यामायला #$%&*& )

तात्पर्य : असल्या लोकांना आणि असल्या विकासाला(?) सातरबाहेर ठेवणे हेच मोठ्ठे काम आहे

मंदार कात्रे's picture

18 May 2014 - 11:40 pm | मंदार कात्रे

1

मृत्युन्जय's picture

19 May 2014 - 11:11 am | मृत्युन्जय

रस्ते, पाणी आणि वीज या ३ बाबतीत सातार्‍यामध्ये काय विकास झाला हे कळाले तर उदयनराजेंनी काय केले हे कळेल. नाहितर लोक उगाचच उदयनराजेंच्या दारु पिउन बेफाम वर्तन करण्याबद्दल, त्यांच्या गुंडगिरीबद्दल आणि उर्मटपणाबद्द्ल, बेताल वर्तनाबद्दल अफवा पसरवत असतात. शिवाजी महाराजांच्या थोर घरण्यात जन्म घेउन कोणीही माणूस असली नीच कृत्ये करुच शकणार नाही. त्यांनी केलेली विकासकामे लोकांसमोर येउ द्यात म्हणजे लोकांची तोंडे आपोआप बंद पडतील. उदयनराजे इतक्या मताधिक्याने निवडुन येतात "ये लोगो का प्यार नही तो और क्या है?"

टवाळ कार्टा's picture

19 May 2014 - 12:55 pm | टवाळ कार्टा

सातार्यात लोडशेडींग आहे??
रस्त्यांवर खड्डे आहेत??
झोपडपट्ट्या आहेत??
सार्वजनिक शौचालये (स्वछ्छ) आहेत??
बेकायदेशीर बांधकामे आहेत??

मैत्र's picture

19 May 2014 - 3:27 pm | मैत्र

बाकी गोष्टींची माहीती सद्य सातारकर देतीलच
पण सातार्‍यात रस्त्यांवर खड्डे नाहीत! -- कारण त्यासाठी रस्ते असावे लागतात.
गेली किमान वीस वर्षे दर भेटीला सातार्‍यात "वरचा" रस्ता, राजवाडा रस्ता आणि पोवई नाका ते नगरपालिका इथे रस्ता शोधण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे.

उदयनराजे हे शिवाजी महाराजांचे थेट वंशज म्हणून आदर आहेच आणि राहील.
पण संसदीय लोकशाहीत लोकप्रतिनिधी म्हणून त्याव्यतिरिक्त काही जबाबदार्‍या असतात त्याबद्दल फारसं काही घडल्याचं ऐकलेलं नाही.

पिलीयन रायडर's picture

19 May 2014 - 3:40 pm | पिलीयन रायडर

मला एकच प्रश्न विचारायचाय..

महाराज.. राजे एकच.. छत्रपती शिवाजी महाराज..
त्यांचा राज्याभिषेक झाला म्हणुन राजे नव्हेत.. ते खर्‍या अर्थानी राजे..

तर ह्या बाकीच्यांना कशामुळे "श्रीमंत..छत्रपती" अशा पदव्या द्यायच्या? हक्कच काय म्हणते मी हे लावण्याचा? केवळ वंशज म्हणुन? छत्रपती म्हणवुन घ्यायला कर्तुत्व काय ह्यांचे?

उदय भोसले ह्या माणसा बद्दल चर्चा करा.. राजे बिजे कोणी नाही आता..

बॅटमॅन's picture

19 May 2014 - 3:53 pm | बॅटमॅन

आधीच्या तुलनेत काहीच पॉवर नाही. कर्तृत्व तर त्याहून नाही.

प्रसाद गोडबोले's picture

19 May 2014 - 4:00 pm | प्रसाद गोडबोले

तर ह्या बाकीच्यांना कशामुळे "श्रीमंत..छत्रपती" अशा पदव्या द्यायच्या? हक्कच काय म्हणते मी हे लावण्याचा? केवळ वंशज म्हणुन? छत्रपती म्हणवुन घ्यायला कर्तुत्व काय ह्यांचे?
उदय भोसले ह्या माणसा बद्दल चर्चा करा.. राजे बिजे कोणी नाही आता..

करेक्ट पिरा ! तुमच्या मताला कोण अनुमोदन देतय ते पहा ... हा व्हिडीयो ( २ मिनिट १५ सेकंद ला पहा )

https://www.youtube.com/watch?v=Gz28tde5FNo

पिलीयन रायडर's picture

19 May 2014 - 4:01 pm | पिलीयन रायडर

हापिसात बॅन आहे.. काय आहे व्हिडिओ मध्ये?